एका वाग्दत्त वधूचे किंवा प्रेयसीचे भावविश्व व्यक्त करणारी एक सर्वश्रेष्ठ गझल !
सलोना सा साजन है और मैं हूँ
आता माझा सुंदर सजणा आणि मी हेच माझे विश्व आहे असे सांगत आपल्या भावविश्वाचे सुंदर वर्णन या गजलेत ही तरुणी करते.
शबी अब्बास यांचे शब्द , गुलाम अली यांचे स्वर्गीय संगीत आणि आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी यांनी सजलेली हि गजल रसिकांना भावून गेली नाही तरच नवल! व्हायोलिन चा लाजवाब प्रयोग संगीतात आहे.
मिराज ए गजल या अल्बम मधील ही गजल ! या अल्बम मधील सर्व गजल लाजवाब आहेत.
ही गजल मराठीतील मेहेंदीच्या पानावर किंवा फुलले रे क्षण माझे फुलले रे या गाण्यांप्रमाणेच !
ही सुंदर युवती पुढे म्हणते, मनात प्रेमाच्या भावनांनी आग लागली आहे तसेच माझ्या प्रियकराच्या रूपाच्या सावलीत एक थंड ज्वाला आहे. विरोधाभास व्यक्त करणारा अलंकार! आता भान हरपणे आणि रात्रीची झोप त्याच्या विचाराने उडणे नित्याचे झाले आहे. तशातच हि लाज लपवत असताना त्याच्यासमोरच हा चंचल पवन पदर उठवतो आणि लाजून मी आणखी चूर होते. .
क्षणोक्षणी , विवाहाच्या प्रसंगी सजणाऱ्या मेंदीचा विचार आणि मी हेच माझे आता भावविश्व आहे,
शांत संगीत , कमीत कमी वाद्यांचा वापर आणि अर्थपूर्ण अलंकारिक काव्यकृती याने सजलेली हि गजल म्हणजे गज़लप्रेमींसाठी पर्वणीच!
स्त्रीचे असे सुंदर वर्णन करणारी काव्ये या दुनियेत केली जात असताना , पुरुष स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही .
ही गजल खालील युट्युब दुव्यावर आपण ऐकू शकाल !
https://www.youtube.com/watch?v=uPV3pXVMBPM
सलोना सा साजन है और मै हूँ
जिया मे एक अगन है और मै हूँ
तुम्हारे रूप की छाया में साजन
बडी ठंडी जलन है और मै हूँ
चुराये चैन रातों को जगाये
पिया का यह चलन है और मै हूँ
पिया के सामने घूंघट उठा दे
बडी चंचल पवन है और मै हूँ
रचेगी जब मेरे हातों मी मेहेंदी
उसी दिन की लगन है और मैं हूँ
प्रतिक्रिया
8 Nov 2016 - 2:01 am | सही रे सई
माझी अत्यंत आवडती गझल. शब्द तर सुरेख आहेतच पण आशा तैंचा आवाज म्हणजे नुसती जादू आहे या गाण्यात.
प्रत्येकाने एकदा तरी ऐकलीच पाहिजे आणि मग तिच्या प्रेमात पडून पुन्हा पुन्हा ऐकत राहावी अशी ही गझल.
8 Nov 2016 - 11:48 am | उपटसुंभ
अप्रतिम रचना..!
8 Nov 2016 - 12:05 pm | झेन
मिराज ए गजल संपूर्ण अल्बमच कातील आहे
8 Nov 2016 - 2:56 pm | मितान
अत्यंत तरल सुरेल आवडती गजल !