चला दिवाळी संपतीये... बरेच पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आता सुटकेचा निःश्वास सोडत असतील. मला माहितीये, नव्हे नव्हे खात्री आहे, कि ह्या दिवाळी नंतर ते सर्वजण पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरणार आहेत. स्वतःच्या गाड्या भंगारात टाकतील. आजूबाजूचा परिसर अजिब्बात घाण करणार नाहीत. थुंकणं तर सोडाच पण दुसरं जर कोणी थुंकताना दिसलं तर त्याच्या थूतरीत द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांची जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही झालं तरी विकणार नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक अतिशय भीषण समस्या आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आता पूर्णपणे शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण कुत्र्या-मांजरांना होणार त्रास बघून कशाला कोंबड्या, बोकडं वगैरे वगैरे कापून खायचं असे विचार त्यांच्या मनात जोरजोरात घोळत आहेत. ते एसीत चुकूनसुद्धा बसणार नाहीत. सिनेमा हॉल मध्ये गेल्यावर एक तर आंदोलन करून एसी बंद करायला लावतील नाहीतर. मल्टिप्लेक्सवर आजन्म बहिष्कार टाकतील.. पुण्यातल्यांसाठी अलका, विजय, निलायम, लक्ष्मीनारायण आहेच कि आणि अगदी तिकीट नाहीच मिळालं तर बुधवारातलं वसंत टॉकीज जिंदाबाद म्हणतील. ज्याप्रमाणे दिवाळीतल्या फटाक्यांचा आणि हिंदुधर्माचा काहीच संबंध नाही त्याप्रमाणे गुरांच्या निरपराध कत्तलीचा आणि मुस्लिम धर्माचा, वेगवेगळ्या चमत्काराचा आणि ख्रिश्चन संत पदाचा काहीच संबंध नाही हेही त्यांनी मान्य केलंय...
पण त्यांच्या संदर्भातली लहान मुले जरा गोंधळातअसतील... त्यांच्यासाठी खेळायला मैदानं, शिवारं कोणी ठेवली नाहीत, तिथे सोसायट्या केल्या थोरांनी. पोहायला विहिरी ठेवल्या नाहीत. त्या बुजवल्या, थोरांनी. खांदे पुस्तकांनी आणि डोळे स्वप्नांच्या ओझ्यानीं झुकत आहेत. बहुतांश वेळ हा वेगवेगळ्या क्लासेसनी खाऊन टाकलाय. मनोरंजनाचं एकंच माध्यम टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स, त्याने डोळे खराब होतायेत.. लहान पण सुंदर असतं? ते कसं बुवा? कदाचित हा प्रश्न त्यांना पडत असेल...
आपल्यासारख्या थोरांनी बर्याच गोष्टीची वाट लावली. भोगत आहे आपली पुढची पिढी... तसंही दिवसेंदिवस फटाक्याचं मार्केट कमी होतंच आहे, महागाईमुळे. आई सांगते त्यांच्या लहानपणी २ रुपयात दोन मोठ्ठ्या पिशव्या भरून फटाके आणायचे तिचे वडील. प्रत्येक फटाक्याच्या दुकानासमोर रांग असायची. मी लहान असताना तेव्हढे फटाके नाही बघितले. हजार रुपयात एक पिशवी भरून फटाके आणायचे बाबा. लहानपणी फटाके उडवायचा सोस जेव्हढा असतो मोठेपणी तेव्हढा रहात नसतो. मी अक्षरशः मार खाल्लाय फटाके उडवण्यावरून. आता गेल्यावर्षीचे फटाके ह्या वर्षी उडवले त्यात अजून काही राहिलेच आहेत. कदाचित पुढच्या वर्षी तेच उडवेन... मी लहान असताना दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापासूनच फटाक्यांच्याआवाजाला सुरुवात व्हायची... आता ऐन दिवाळीत पण तसे आवाज ऐकले नाहीत.. कित्येक सोसायट्यात फटाके नाहीत उडवू देत. ज्यांना उडवायचेत ते बाहेर येऊन उडवताना दिसतात... फटाक्यांचं प्रमाण तसं कमीच होतंय कि...
तसंही जसं वय वाढतं तसं फटाक्याची संकल्पना बदलत असतेच कि..... काय??...बरोबर ना? असो...
अरे मग जो काही आनंद ज्या काही वयात घ्यायचाय घेऊ द्या कि... एवढीच काळजी असेल तर लावा झाडं खास दिवाळीसाठी. दिवाळीचं वाढणार प्रदूषण होईल त्या झाडांसाठी फराळ...
अरे विसरलोच... विरोधकांनी वर सांगितल्याप्रमाणे आधीच ठरवलेलं आहे. त्यामुळे मी कोण पामर त्यावर बोलणारा...
बिलेटेड दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 11:35 am | सतिश गावडे
पुढच्या वर्षी आमच्या आनंदनगर भागातील लोकांना तुमच्या घरासमोर फटाके वाजवायला पाठवू. संध्याकाळी सहा ते रात्री दहा असा कानठळ्या बसणार्या आवाजाचा अखंड आनंद लुटा.
1 Nov 2016 - 12:19 pm | llपुण्याचे पेशवेll
आमच्या घराकडेही पाठवा. आम्ही आमचे पण थोडे फटाके देऊ करू त्यांना.
सायकलने किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्टने पाठवा. त्यानिमित्ताने पर्यावरण संवर्धनाचे हे ही उपाय आहेत हे कळले तर हे ही नसे थोडके असे म्हणता येईल.
1 Nov 2016 - 11:44 am | वटवट
चालेल...
बार्शीत भगवंत मंदिराच्या मागे पाठवून द्या...
पण आधी किती जण येणार आहेत ते कळवा...
त्यांच्या फराळाचं बघावं लागेल ना??
1 Nov 2016 - 12:01 pm | सतिश गावडे
मोजून सांगतो. :)
वटवटराव, प्रत्येक गोष्टीला "आमचे आणि त्यांचे" हा रंग द्यायचा नसतो.
मी पुण्यात ज्या भागात राहतो त्या भागात फटाक्याच्या आवाजाने प्रचंड त्रास होतो. माझ्यासारख्या धडधाकट माणसाला जर त्रास होत असेल तर लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसे यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. यावर्षी माझे आईबाबा दिवाळीला कोकणातून पुण्यात आलेत. या त्रासाला कंटाळून ते म्हणत आहेत, पुन्हा दिवाळीच्या दिवसांत आम्ही पुण्याला येणार नाही. माणूस बहीरा होईल या आवाजाने.
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे; आवाजाचा नाही. फार पूर्वी कुणाला तरी "आवाजाचे" मार्केट दिसले असणार आणि त्याने हे फटाके प्रकरण सुरु केले असणार. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी फटाके वाजवून किती लक्ष्मी विषारी धुरात आणि आवाजात फुंकून टाकली जाते. ही कुठली आनंद मिळवण्याची विकृत पद्धत.
1 Nov 2016 - 12:22 pm | llपुण्याचे पेशवेll
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे; आवाजाचा नाही. फार पूर्वी कुणाला तरी "आवाजाचे" मार्केट दिसले असणार आणि त्याने हे फटाके प्रकरण सुरु केले असणार. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी फटाके वाजवून किती लक्ष्मी विषारी धुरात आणि आवाजात फुंकून टाकली जाते. ही कुठली आनंद मिळवण्याची विकृत पद्धत.
बरोबर. हा आवाजाचे मार्केट सुरु करणारा कोणीतरी शिवकालीन असणार हे नक्की. कारण तेव्हापासून चंद्रनाळे आणि फुलबाज्या उडवल्याचे उल्लेख वाचलेले आहेत.
1 Nov 2016 - 12:21 pm | llपुण्याचे पेशवेll
लेखाच्या आशयाशी सहमत आहे. आजवर कोणत्याही शाळेने मुलांना मी कायम सायकल वापरून किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरून पर्यावरण संवर्धन करेन अशी शपथ दिल्याचे ऐकिवात नाही. तेरड्याचे रंग ३ दिवस सारखा पर्यावरण संवर्धनाचा उत्साह दिवाळीपुरते ४ दिवस, इतकाच.
1 Nov 2016 - 12:31 pm | सतिश गावडे
लेखाचा आशय काय असेल तो असो मात्र फटाक्यांच्या कानठळ्या बसवणार्या आवाजाने त्रास होतो हे मी सामान्य नागरीक म्हणून लिहीलं आहे. पर्यावरणवादी म्हणून नव्हे.
एखाद दुसरा फटाका वाजवणे वेगळे आणि तीन चार तास सलग फटाक्यांच्या हजारांच्या माळा पेटवणे वेगळे. काही लोकांच्या आनंदाच्या विकृत कल्पनांचा त्रास इतरांनी का सहन करायचा?
1 Nov 2016 - 1:14 pm | मराठी कथालेखक
सहमत
1 Nov 2016 - 1:38 pm | यशोधरा
सहमत.
1 Nov 2016 - 1:42 pm | वटवट
सरसकट फटाक्यांना विरोध करणाऱ्यांना उद्देशून हा लेख आहे... (तो संदर्भ लिहायचा राहिला..)
फटाक्यांना निकष लावून त्याचे नियमन करणे वेगळे आणि सरसकट बंदी घालण्याचे बोलणे वेगळे...
1 Nov 2016 - 3:22 pm | भालचंद्र_पराडकर
हे अगदी मान्य... फटाक्याच्या आवाजावर निश्चित मर्यादा याला कुणीच विरोध करणार नाही, तसेच फटाके वाजवताना घेण्याचे खबरदारीचे उपाय लहान मुलांना शिकणे सक्तीचे करणे इ. इ. मुद्द्याला कुणीच ना म्हणणार नाही. पण सरसकट फटाक्यांवर बंदीचा आग्रह धरण्याचे प्रयोजन काय? ते समजत नाही.
1 Nov 2016 - 1:56 pm | llपुण्याचे पेशवेll
एखाद्याची सोय हि दुसर्यासाठी गैर सोय किंवा त्रास असू शकतो. चालायचंच भारतात सहिष्णुता कमी झाली आहे हे खरं. :)
1 Nov 2016 - 2:07 pm | वटवट
हे भारीये राव....
काही झालं कि लगेच सहिष्णुता धोक्यात...
लैच अशक्त आहे राव ही सहिष्णुता...
1 Nov 2016 - 2:15 pm | llपुण्याचे पेशवेll
काय करणार ते मोदी सरकार आलं नाय. सगळीकडचीच असहिष्णूता संपली.
आमच्या सोसायटीत्ले एक आजोबा असेच फटाक्यांवर चिडायचे. आम्ही लहान होतो तेव्हा. मोठे झाल्यावर आम्ही विचारले (म्हणजे प्रश्न विचारायचि हिम्मत आली तेव्हा) "अजोबा, तुम्ही नाही का उडवायचात फटाके?" ते म्हणाले "आमच्या वेळेला असले फटाके नव्हते, आम्ही फक्तं केपं आणि लवंग्या वाजवायचो आणि ते ही दुपारी नाही (बघायला कोण होतं तेव्हा)". मग म्हटलं मग " तेव्हाच्या म्हातार्यांना त्याचा त्रास नाही व्हायचा का? " त्यावर ते चिडून म्हटले "शिंग फुटलीयेत तुला". त्यातून काय ते उत्तर कळलं. असहिष्णुता कमी होते ती अशी.
1 Nov 2016 - 12:46 pm | संदीप डांगे
बहुसंख्य लोक्स मिळून करतात तेव्हामात्र विकृतीला संस्कृती असे म्हटले जाते!
दिवाली मुबारक!
1 Nov 2016 - 1:14 pm | प्रकाश घाटपांडे
+१
1 Nov 2016 - 2:09 pm | वटवट
+११११
हाच न्याय मग विरोधाला पण लागू करा कि राव..
शुभेच्छा
1 Nov 2016 - 1:23 pm | मराठी कथालेखक
लेख अजिबात पटला नाही.
फटाके उडवणे ही धार्मिक गोष्ट नाहीच.
मी BS-IV मानकांत बसणारं वाहन वापरतो. शिवाय त्याची नियमित देखभाल करतो. पुढे जावून CNG मध्ये अधिक पर्याय उपलब्ध होतील तसे CNG वाहन वापरेन. cng मूळे प्रदूषण अत्यंत कमी होते.
फटाक्यांतून होणार्या धूराचे काहिच प्रमाणीकरण नाही.
बाकी १००० रुच्या पेट्रोल/डिझेल मधून मी दहा-बारा दिवस थोडे थोडे प्रदूषण घडवतो. हजार रुपयांचे फटाके दहा-बारा दिवस थोडे थोडे करुन उडवणार का ? फटाक्यांमुळे एकाच वेळी एकाच ठिकाणी खूप जास्त प्रदूषण होते , ते बरेच घातक असते.
'मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायची' प्रतिज्ञा नाही केली तरी वाहनाची नियमित देखभाल करण्याची प्रतिज्ञा केली आणि तसं वागलो (आणि इतर सगळेच जण वागलेत ) तर वाहनांनी होणारे प्रदूषण खूप आटोक्यात येवू शकेल. बाकी पंपावरील इंधन भेसळ रोखण्यासाठी मात्र सरकारलाच प्रयत्न करावे लागतील.
1 Nov 2016 - 2:02 pm | llपुण्याचे पेशवेll
कुठलीही मानकं वापरा किंवा कुठलीही इंधनं वापरा. जळलं की प्रदुषण झालंच. अपवाद पब्लिक ट्रान्स्पोर्टसाठी केला जाऊ शकतो कारण ते थोडे प्रदूषण बरेच पोटेन्शियल प्रदूषन प्रीवेंन्ट करते.
आमच्या कंपनीच्या रस्त्यावर असलीच कसली तरी भारी भारी मानकं असलेल्या गाड्या ये जा करतात. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम आणि 'प्रदूषण' होत असते. त्याची तीव्रता आजिबात कमी नसते.
त्यामुळे सायकल, चालणे, बैलगाडी सोडून सगळी वाहने प्रदूषकच आहेत. पब्लिक ट्रान्स्पोर्टला फक्त रस्त्यावर ट्रॅफिक कमी ठेवल्याबद्दल थोडीफार सूट देता येईल.
1 Nov 2016 - 2:06 pm | अभ्या..
बाकी प्रदुषणापेक्षा ह्या तीन गोष्टींचाच उपद्रव जास्त आहे रस्त्यावर. कसा तो पाह्यचा असेल तर सोलापुरात या अन पहा.
1 Nov 2016 - 2:11 pm | llपुण्याचे पेशवेll
पुण्यात चौथ्या गोष्टीचा म्हणजे पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पण भयंकर त्रास असतो. आणि पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुधारला पाहीजे ही रड त्याचा अजिबात वापर न करणारे आणि स्टॉपला बस थांबल्यावर त्याच्या मागे थांबायला लागल्यांमुळे चरफडणार्यांची देखील असते हे विषेश.
:)
1 Nov 2016 - 2:13 pm | वटवट
मुळात कसंय माहिती का? पेठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही ना...
1 Nov 2016 - 2:16 pm | अभ्या..
हीहीहीहीही
1 Nov 2016 - 2:17 pm | llपुण्याचे पेशवेll
पण पुण्याचे प्रातिनिधीक म्हणून उदाहरण घ्यायला हरकत नाही. आणि अजून वरती एका प्रतिसादकाने पुण्याचेच उदाहरण घेतलेले आहे.
1 Nov 2016 - 2:30 pm | वटवट
अहो तेच म्हणतोय... पुण्याचे प्रतिनिधी म्हणजे महाराष्ट्राचे प्रतिनिधी नाहीत ना?? काय??
1 Nov 2016 - 2:11 pm | मराठी कथालेखक
CNG हा निव्वळ hydrocarbon आहे. तो जाळल्यावर फक्त पाणी आणि CO2(कार्बन डाय ऑक्साईड) निर्माण होते. कार्बन डाय ऑक्साईड विषारी वा घातक नाही, तो green house gas असून global warming वाढवतो पण विषारी नाही.
(स्वयंपाकखोलीत LPG जळत असताना कधी प्रदूषणाचा त्रास वाटलाय का ? CNG चं ही तसंच आहे)
झालंच तर वाहनातील सगळ्या प्रणाली catalytic convertor ई नीट कार्यक्षम असल्यास इंधनाचं अपुर्ण ज्वलन होवून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तय्रार होण्याचा धोकाही खूप कमी होतो.
फटाके उडवून सल्फर डायॉक्साईडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात.
1 Nov 2016 - 2:11 pm | मराठी कथालेखक
CNG हा निव्वळ hydrocarbon आहे. तो जाळल्यावर फक्त पाणी आणि CO2(कार्बन डाय ऑक्साईड) निर्माण होते. कार्बन डाय ऑक्साईड विषारी वा घातक नाही, तो green house gas असून global warming वाढवतो पण विषारी नाही.
(स्वयंपाकखोलीत LPG जळत असताना कधी प्रदूषणाचा त्रास वाटलाय का ? CNG चं ही तसंच आहे)
झालंच तर वाहनातील सगळ्या प्रणाली catalytic convertor ई नीट कार्यक्षम असल्यास इंधनाचं अपुर्ण ज्वलन होवून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तय्रार होण्याचा धोकाही खूप कमी होतो.
फटाके उडवून सल्फर डायॉक्साईडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात.
1 Nov 2016 - 2:21 pm | llपुण्याचे पेशवेll
कार्बन मोनोक्साईडही निर्माण होतो. धोका कमी नाही हो. बाकीचे मुद्दे ठीक. खालील लिंकेवरचा तक्ता पहा.
http://naturalgas.org/environment/naturalgas/
1 Nov 2016 - 2:37 pm | मराठी कथालेखक
अपुर्या ज्वलनामुळे कार्वन मोनॉक्साईड निर्माण होत असतो. catalytic convertor मध्ये या कार्वन मोनॉक्साईडचे ऑक्सिडेशन होवून कार्बन डाय ऑक्साईड बनते.
1 Nov 2016 - 1:40 pm | वटवट
चला... या नादाने खूपच जागरूक मंडळी आहेत हे समजलं....
ते तसेच असावेत...
1 Nov 2016 - 2:29 pm | मराठी कथालेखक
बाकी लहान मुल ऐकत नसतील तर त्यांना उडवू द्यावे थोडे फटाके.. पण वीस-तीस-चाळिस वर्षांच्या माणसांनाही फटाके उडवल्याखेरीज रहावत नसेल तर काय म्हणावे.
अवांतर : मी वयाच्या बारा किंवा तेराव्या वर्षी फटाके उडवणे सोडून दिले. त्यासाठी कोणी प्रतिज्ञा घ्यायला लावली नव्हती. पण 'फटाके उडवले नाहीतर आपण विडीओ आणून सिनेमा पाहू' या ऑफरमूळे फटाके सोडलेत.
1 Nov 2016 - 2:33 pm | वटवट
मी हे लहान मुलांच्याच अनुषंगाने लिहलंय ओ...
1 Nov 2016 - 2:41 pm | मराठी कथालेखक
बरोबर आहे. पण निदान मोठ्यांनी तरी स्वतः फटाके उडवणं विनातक्रार बंद करावं ना... लहान मुले लवकरच अनुकरण करतील
1 Nov 2016 - 2:30 pm | मराठी_माणूस
गल्ली बोळात व सोसायटीत क्रिकेट खेळुन होणारे गाड्यांचे नुकसान, पतंगाच्या मांज्याने होणारी दुखापत, गणपती आणि दहीहंडी ला होणारे डीजेंचे कर्कश आवाज हे सुध्दा सहन करायलाच हवे
1 Nov 2016 - 3:04 pm | भालचंद्र_पराडकर
काय चाललंय काय या धाग्यावर?
धागालेखक, विरोधक, समर्थक, परंपरावादी, सुधारणावादी सगळे चक्क "तुझ्या गळा माझ्या गळा" करीत एकमेकांना दुजोरे देताहेत?
पूर्वीचं मिपा राहिलं नाही ब्वाॅ! ;)
(कृ.ह.घ्या.)
1 Nov 2016 - 3:11 pm | मराठी कथालेखक
दिवाळी आहे.. होळी नाही :)
1 Nov 2016 - 3:11 pm | वटवट
हीच खरी सहिष्णुता ओ...
तरी अजून काही लोकांची एंट्री झालेली नाहीये...
1 Nov 2016 - 3:04 pm | भालचंद्र_पराडकर
काय चाललंय काय या धाग्यावर?
धागालेखक, विरोधक, समर्थक, परंपरावादी, सुधारणावादी सगळे चक्क "तुझ्या गळा माझ्या गळा" करीत एकमेकांना दुजोरे देताहेत?
पूर्वीचं मिपा राहिलं नाही ब्वाॅ! ;)
(कृ.ह.घ्या.)
1 Nov 2016 - 3:10 pm | वेल्लाभट
फेसबुकवरची माझी कालचीच पोस्ट इथे जशीच्यातशी देतो. लेखकाशी सहमत. फटाक्यांनी प्रदूषण होतं अशा ढोबळ वाक्यांचं टुमणं लावून धरणार्या प्रत्येकाला आत्मपरिक्षणाचा सल्ला.
प्रदूषण फटाक्यांनी होत नाही, प्रदूषण विचारांनी, मानसिकतेने होतं. आज पैसे आहेत म्हणून चढाओढीच्या भावनेने २५,२५ हजारांचे फटाके माणसं आणतात, ज्यांनी एकेकाळी मिळालेल्या ५०० रुपयात बजेट आखून फटाके आणले होते. त्या बजेटमधल्या आनंदाने कधीच प्रदूषण होत नाही, प्रदूषण उन्मादाने होतं, बेफिकिरीने होतं, जी आज तरूण पिढी करतेय, आणि ज्यांना प्रदूषणाचा प्र'ही कळत नाही त्या लहान लहान मुलांना कुठल्या हक्काने हे असले फंडे दिले जातात? का? आपला अतिरेक आणि पुढचा विचार त्यांच्या माथी? त्यांच्या आनंदाचं कॅास्ट कटिंग? वा रे वा! यालाच म्हणतात डबल स्टँडर्ड्स.
1 Nov 2016 - 3:12 pm | वटवट
ज्जे ब्बात... अगदी सहमत...
1 Nov 2016 - 3:14 pm | भालचंद्र_पराडकर
+11111
1 Nov 2016 - 3:34 pm | सतिश गावडे
मुद्दा प्रदुषणाचा नाही. विरोध चिमुरड्यांच्या आनंदाने फटाके वाजवण्याला नाहीच. विरोध आहे तो वीस-तीस-चाळीस वर्षांच्या सुजाण नागरीकांनी तीन चार तास सलग कानठळ्या बसवणार्या आवाजाचे फटाके वाजवून परीसरातील लोकांना त्रास देण्याला.
1 Nov 2016 - 5:26 pm | वेल्लाभट
हो मग त्या व्यक्तीला नक्कीच ही समज द्या. मला नाही वाटत धागाकर्त्याचाही त्याला पाठिंबा असावा.
1 Nov 2016 - 3:45 pm | कपिलमुनी
मी दुसर्या मजल्यावर रहातो . खाली फटाके वाजवण्याच्या आवाजाचा आणि धुराचा प्रचंड त्रास झाला . मोठे आवाजाच्या फटाक्याचा तर अतोनात त्रास होतो . खिडक्या हादरतात. ल्हान बाळे तर रडतात.
फटाके आनंद म्हणून उडवा पण सलग ४ तास एखाद्याच्या घरासमोर किंवा रस्त्यावर फटाके फोडणे चुकीचे आहे.
( त्यात वरच्या मजल्याच्या शहाण्याने "इतका त्रास होत असेल तर वरती फ्लॅट घ्यायचा असा टोमणा दिला , त्यावर उद्या मी ४० शॉट्सचा रॉकेट आणणार आहे असा जाहीर केल्यावर बिचारा मावळला =) )
1 Nov 2016 - 6:02 pm | पुंबा
शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात चिमुरडयांचं जे शोषण होतं त्याबद्दल वाचल्या-ऐकल्यानंतर फटाके उडवावेसे वाटलेच नाहीत. फटाके उडवणे हे आनंदाचे चांगले एक्स्प्रेशन नाही आणि दीपावलीमागचा मूळ मंगल हेतू त्यामुळे साध्य होत नाही. बाकी हवा, ध्वनी प्रदुषण फटाक्यांमुळे होतेच, त्यांना विरोध करणं म्हणजे हिंदू धर्माला विरोध असं वाटून घेऊन आपण उगाच इनसिकयुअरीटी दाखवतो असं वाटतं. फटाक्यांविना दीपोत्सव साजरा करणं लहानग्यांना शिकवणं हा संस्कारांचा भाग आहे, ते जमतं हे माझ्या पुतण्यांकडे पाहून पटतं. शाळेत आणि घरीही फटाक्यांच्या दुष्परीणामांबद्दल सांगितल्याने स्वतःहून फटाके आणायचे नाहीत असं ठरवलं त्यांनी.
1 Nov 2016 - 6:45 pm | वटवट
सौराजी .... चिमुरड्यांचं शोषण हा कधीच समर्थनाचा मुद्दा होत नाही... आणि होऊ नये... ह्याही मुद्द्यावर मला एक लेख लिहायचा आहे... जमल्यास लिहीन..
जवळपास गावाकडच्या हॉटेलमध्ये किंवा इव्हन शहरातल्या साध्या हॉटेल मध्ये बालकामगार असतात म्हणून तिथे जाणे टाळता? टाळत असाल तर चांगलंय. सिनेमात बरेच बालकलाकार असतात म्हणून ते बघणे टाळता? टाळत असाल तर चांगलंय (का तिथे पैसे चांगले मिळतात म्हणून ते चालतं?)
बरेच कुरियर बॉय ही लहान मुलेच असतात म्हणून त्यांची सर्व्हिस डिनाय करता? करत असाल तर तेही चांगलं आहे. आजूबाजूला अशी असंख्य उदाहरणे आहेत... सिलेक्टिव्ह मत बनवणे सोपे आहे... जनरलायझेशन केलं कि अडचणी वाढतात...
असो....
बाकी हवा, ध्वनी प्रदुषण फटाक्यांमुळे होतेच,त्यांना विरोध करणं म्हणजे हिंदू धर्माला विरोध असं वाटून घेऊन आपण उगाच इनसिकयुअरीटी दाखवतो असं वाटतं.>>> मी वैयक्तिक मानतो कि फटाके उडवणे आणि हिंदू धर्म ह्यांचा काडीचाही संबंध नाही. पण कसा सिलेक्टिव्ह टीका करणारे हे जाणत नाहीत आणि फटाक्यांमागून हिंदूधर्मावरच अनुल्लेखाने त्यांना बोलायचे असते. टीकाकारांची नावे बघा...
पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र>> इतर धर्माच्याबाबतीत ह्यांचा स्टॅन्ड काय असतो कृपया सांगाल?
1 Nov 2016 - 6:51 pm | संदीप डांगे
पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र>> इतर धर्माच्याबाबतीत ह्यांचा स्टॅन्ड काय असतो कृपया सांगाल?
^^^
तुम्हाला कशासाठी हवाय यांचा स्टॅन्ड? जर तुम्ही स्वतःच फटाके व धर्म यांचा संबंध मानत नाही तर...?
आजकाल फ्याशन आलीये म्हणून वरील तिघांना झोडपणे चालू असते, तोच उद्देश आहे काय?₹
2 Nov 2016 - 4:29 pm | पुंबा
तेच तर. जर फटाके आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही तर, पर्यावरणवाद्यांनी फटाक्यांच्या विरोधात जागृती केली तर काय हरकत आहे. उलट आपण हिंदूंनीच असली जूनी त्रासदायक एक्स्प्रेशन्स सोडून द्यावीत.
2 Nov 2016 - 4:24 pm | पुंबा
१. तुम्ही या धाग्यावर प्रत्येक मुद्द्यावर व्हॉटबाऊटरी करताय. त्यामुळे तुम्हाला फटाक्यांचे दुष्परीणाम कळूनसुद्धा, केवळ विरोधक हिंदू धर्माला विरोध म्हणून फटाक्यांना विरोध करतात असा तुमचा समज झाल्याने तुम्ही फटाक्यांचं समर्थन करताहात.
२. ज्या पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आदींनी इतर धर्मांतील चुकिच्या गोष्टींवर आक्षेप घेतला आहे त्यांनी जर फटाक्यांना विरोध केला तर तुमचे उत्तर काय असेल? फटाक्याविरुद्ध लोकांना सजग करण्यास कधी तुमची हरकत नसेल.
३. बाल शोषण, पर्यावरण, सिव्हील सेन्सचा विचका आणि चांगल्या धार्मीक परंपरेची विकृत अभिव्यक्ती या कारणांनी फटाके दीपावलीच्या मांगल्याला उणेपणा आणतात असं मला वाटतं.
1 Nov 2016 - 6:06 pm | पुंबा
ह्यांची इतकी हेटाळणी हिंदूत्ववादी करतात की काही कारण नसताना हिंदू धर्म या सगळ्यांच्या विरोधात आहे असा समज होतो.
1 Nov 2016 - 6:13 pm | संदीप डांगे
व तसेच हे तिघेही हिंदू धर्मच्याच विरुद्ध आहेत असेही...
1 Nov 2016 - 6:16 pm | पुंबा
अगदी अगदी..
1 Nov 2016 - 6:46 pm | एस
मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणाऱ्यांना एका खोलीत खुर्चीला बांधून आजूबाजूला त्यांचेच फटाके वाजवले पाहिजेत. त्याशिवाय सुधारायचे नाहीत.
1 Nov 2016 - 10:32 pm | एस
त्याचं असं असतं श्रीयुत पराडकर (उर्फ ... उर्फ ... आणि असे अनेक आयडी) की चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्यासाठी अपरिमित धैर्य लागतं, कमालीचा प्रामाणिकपणा लागतो. पण स्वतःच्या चुकीच्या गोष्टींना होत असलेला विरोध सहन होत नसला की मग ताळतंत्र राहत नाही. आणि ताळतंत्र सोडायला काही लागत नाही. नाही का? असो. तुमचे या आयडीचे मिपावय पाहून मौज वाटली. किमान एक वर्ष होईपर्यंत थांबायचं ना! वादिहाशु दिल्या असत्या. आता तेही शक्य दिसत नाहीये. चलो, बाय बाय!
1 Nov 2016 - 6:54 pm | संदीप डांगे
कसा सिलेक्टिव्ह टीका करणारे हे जाणत नाहीत आणि फटाक्यांमागून हिंदूधर्मावरच अनुल्लेखाने त्यांना बोलायचे असते.
^^^ हे तुम्हीच ठरवायचे का?
टीकाकारांची नावे बघा...
^^^ कोणती नावे?
1 Nov 2016 - 7:25 pm | वटवट
कठीण आहे .... एव्हढंच..
1 Nov 2016 - 7:39 pm | संदीप डांगे
अगदी अगदी, उत्तरं देणं कठिण आहेच हो.
काहि विशेष कारण नसतांना उठसुठ पुरोगामी, पर्यावरणप्रेमी आणि प्राणिप्रेमींना झोडपणे अगदी सोपे...
1 Nov 2016 - 8:25 pm | सतिश गावडे
थोडक्यात सांगायचं तर आम्ही कसेही वागू आणि कुणी जाब विचारायला लागला की त्यांना "पुरोगामी, पर्यावरणप्रेमी आणि प्राणिप्रेमीं" लेबलं लावू. तुम्हाला फटाक्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही कानात बोळे घाला. आम्ही आमची "संस्कृती" बुडू देणार नाही. :)
1 Nov 2016 - 8:48 pm | वटवट
सतीशजी वरच्या सर्व कमेंट्स वाचा एकत्रित... मग माझं मत कळेल...
स्पष्ट सांगितलेल्या गोष्टी कितीवेळा रिपीट करायच्या??
1 Nov 2016 - 9:02 pm | संदीप डांगे
फक्त कानात बोळे घातल्याने प्रश्न सुटले असते तर तेही चालले असते म्हणा.
पत्नीला सायनसचा त्रास आहे, गेले तीन दिवस धुरामुळे तिचा त्रास अनेकपटींनी वाढलाय, आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो असता नेहमीपेक्षा पेशंटची गर्दी जास्त व त्यात सायनसचा त्रास असणारे होतेच चारपाच जण, काहीजण दमा, खोकला यानेही बेजार होते. आमची कुत्री मार्गी हीला पहिले दोन दिवस प्रचंड त्रास झाला, तो तिने आमच्याकडे ट्रान्सफर केला. असा जालिम त्रास मलातरी इतर इतर कोणत्याही धर्माच्या कोणत्याही सेलिब्रेशनने होत नाही त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध लिहित नाही, ह्याच्याविरुद्ध लिहिले म्हणून कोणी मला सिलेक्टीव टिकाकार म्हणून हिणवत असेल तर हिणवणार्याच्या बुद्धीची किव करावी की माणुसकीशून्य विचारांची काळजी करावी ह्याबद्दल प्रश्न पडतो.
(इथे धाग्यात पर्यावरणप्रेमी, प्राणिमित्र व धर्मनिरपेक्ष यांच्यावर केलेली टिका मी का अंगावर घेतोय असा कांगावा करु नये.)
1 Nov 2016 - 9:12 pm | वटवट
असा जालिम त्रास मलातरी इतर इतर कोणत्याही धर्माच्या कोणत्याही सेलिब्रेशनने होत नाही त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध लिहित नाही>>> अगदी बरोब्बर बोललात. सतीशजी ह्यालाच सिलेक्टिव्ह टीकाकार म्हणतात, निदान माझ्यामतेतरी.....
काही मोजकी ठिकाणं सोडली तर फटाक्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालंच आहे. विश्वास ठेवा ओ...
आणि दुसऱ्या धर्मात काय चालतं? मला काहीही देणंघेणं नाही. ती त्यांची पद्धत असेल. त्यांना सुधरवण्याचा वा बिघडवण्याचा ठेका घेण्याची आपल्यात धमक नाही. तर हे बोलायचं अशांसाठी कि जे तिकडे सोयीस्कर कानाडोळा करतात आणि हिंदूधर्माचं पायपुसणं करतात उठसुठ... दिवाळीत तेच चालू होतं... म्हणून हा शब्दप्रपंच....
अर्थात तुमचंही बरोबर आहे म्हणा... वैयक्तिक भोगणाऱ्याचं मत जास्त तीव्र असतंच. त्याबद्दलच्या सच्चेपणाबद्दल मला शंका नाही...
1 Nov 2016 - 9:38 pm | संदीप डांगे
आणि दुसऱ्या धर्मात काय चालतं? मला काहीही देणंघेणं नाही. ती त्यांची पद्धत असेल. त्यांना सुधरवण्याचा वा बिघडवण्याचा ठेका घेण्याची आपल्यात धमक नाही. तर हे बोलायचं अशांसाठी कि जे तिकडे सोयीस्कर कानाडोळा करतात आणि हिंदूधर्माचं पायपुसणं करतात उठसुठ... दिवाळीत तेच चालू होतं... म्हणून हा शब्दप्रपंच....
>>> कसं आहे वटवटराव, तुम्हाला तुमची इतर धर्मियांबद्दलची मळमळ काढायची असेल म्हणून असले धागे काढत असाल. पण कुणाची धमक बिमक वगैरे बोलणे जरा अति होतंय... बहुधा आपली स्वतःची धमक असे धागे काढण्यापेक्षा बरीच वेगळी असेल म्हणून असावं.
दिवाळीच्या फटाक्यांचा, ढोलांचा, डिजेंचा मला प्रत्यक्ष त्रास होतो, इतर कोणत्या धर्माच्या सेलीब्रेशनचा होत नाही (होत नाही याचा अर्थ 'मी करुन घेत नाही' असा नव्हे, माझ्या आसपास तसलं काही होत नाही) ह्यात तुम्हाला सिलेक्टीव टिकाकार सापडत असेल तर तुम्हीच किती सिलेक्टीव बघता हेच दिसत आहे.
कसं आहे ना, काही लोकांना विकृत उन्मत्तपणा दाखवायचाच असतो, त्यांना होणारा विरोध हा धर्माच्या नावावरच होतो असा कांगावा मग ते करायला सुरुवात करतात. एकाबाजूने त्यांचे चुकत आहे हे त्यांना कुठेतरी खटकत असतेच, पण विकृत उन्मत्तपणा जास्त प्रखर असल्याने आपली पडती बाजू सावरायला काहीतरी बादरायण मुद्दे उचलून आणायचे असले धंदे करतात. बकरी-इद, मदरतेरेसा हे असंबंद्ध मुद्दे मांडणे जालावर चालू आहेच. स्वतःच्या धर्मातल्या चुकीच्या चालिरीतींबद्दल बोलणं, त्या सुचनांचे चिंतन-मनन-पालन करणं, आपला धर्म अधिकाधिक सुंदर बनवणं ह्यापेक्षा उन्माद करणे फार सोपे आहे. त्या उन्मादाला सपोर्टीव आर्गुमेंट म्हणून इतर धर्मातल्या चुकीच्या चालिरीतींबद्दल उहापोह करणे हे कितीही बेसलेस असले तरी मग केले जातेच. म्हणजे "आम्हाला सांगू नकाच, आम्हाला सांगताय कारण आम्ही ऐकून घेतो म्हणून, त्यांना सांगत नाही कारण ते कापून ठेवतात म्हणून" असे काही महान विचार फक्त गुडघ्यात निपजतात व असले गुडघेधारी आपण हिंदूधर्मिय आहोत असे मिरवतात तेव्हा आमच्यासारख्या हिंदूंना रेम्या डोक्यांच्या मुस्लिमांमधे व असल्या हिंदूंमधे काही फरक आहे की नाही असा प्रश्न पडतो.
1 Nov 2016 - 9:40 pm | सतिश गावडे
ते बरोबर म्हणाले हो. तुम्ही समजून घ्यायला कमी पडलात. इतर धर्मात पाच दिवस कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजाचे सतत फटाके वाजवण्याचा सण नाही.
डोंबलाचे कमी झाले आहेत. पुण्यात येऊन बघायला हवं होतं. अगदी आताही माझ्या फ्लॅटखाली धडाम असा हादरवून टाकणारा आवाज होतोय दर दोन तीन मिनिटांनी. गावी असतो तर खाली जाउन एखाद्याच्या कानफटात वाजवली असती. इथे शहरात कोणाचे उपद्रव मुल्य किती आहे याचा अंदाज येत नसल्याने गप्प बसावे लागते.
तुमच्यासारखे शिकले-सवरलेले लोक जेव्हा असल्या त्रासदायक पायंड्याचे सार्वजनिक मंचावर भलामण करतात तेव्हा वाईट वाटते.
1 Nov 2016 - 9:45 pm | भालचंद्र_पराडकर
इथे शहरात कोणाचे उपद्रव मुल्य किती आहे याचा अंदाज येत नसल्याने गप्प बसावे लागते. हेच लक्षात घ्या सरजी! आम्हाला पण हे आवडत नाही आणि वटवटरावांचा पण त्याला नाठिंबा नाहीए... नीट वाचा वरपासून...
तुम्ही उगाच आम्हाला शत्रु समजताय! आम्ही त्या बाजूचे नाहीये... पण उगाच कुणी हिंदु सणांविषयी वाईटसाईट बोलत आसेल तर ते सहन करणार नाही...
आम्ही यातले नाही आहोत हे कृपया समजून घ्या!!!
1 Nov 2016 - 11:10 pm | वटवट
सतीशजी आपली नेमकी अडचण काय आहे देव जाणे... अहो पुणे हा महाराष्ट्राचा एक भाग आहे... संबंध महाराष्ट्र नाही... एखादी गोष्ट पुण्यात घडते म्हणजे सर्व महाराष्ट्रात घडते आणि एखादी गोष्ट पुण्यात घडत नाही म्हणजे ती महाराष्ट्रात कुठेच घडत नाही?? असं नसतं ओ...
मुळात ह्या पोस्टचा विषय आणि तुमची धार्मिक धारणा ह्यात तसा फारसा संबंध नाही... असो...
1 Nov 2016 - 11:22 pm | सतिश गावडे
तुम्हाला लोकांचे दुखणे समजून न घेता तुमचेच म्हणणे पुढे रेटायचे असल्याने खरंच असो. :)
1 Nov 2016 - 9:15 pm | भालचंद्र_पराडकर
तुमची समस्या कळली त्याबद्दल खरेच साॅरी. पण अशी प्रकरणे किती असतील,? तर शेकडा एक दोन? त्यासाठी इतरांना का जबाबदार धरावे?
काहीजणांना आंबामोहोर व गव्हाचे पाॅलिनेशनची पण अॅलर्जी येते म्हणून काय त्यांची लाखवड बंद करणार काय?
माफ करा! मी तुम्हाला खिजवत नाहीये!
अर्थात फटाक्यांच्या आवाजावर व प्रदूषणकार घटकांवर निर्बंध आलेच पाहिजेत. त्यात दुमत नाही. पण सरसकट सर्वांवरच चुकीचा शिक्का मारणे समजत नाही.
1 Nov 2016 - 9:16 pm | भालचंद्र_पराडकर
त्यांना सुधरवण्याचा वा बिघडवण्याचा ठेका घेण्याची आपल्यात धमक नाही. हे बाकी खरे! तिथे हे स्वयंघोशित टीकाकार सुधारणावादी शेपटे घालून बसतात!
1 Nov 2016 - 9:26 pm | आनंदी गोपाळ
नेहेमीचा स्टँडर्ड, बेसिक "आमचा हिंदूधर्म भारी हे सिद्ध करण्यासाठी, त्यातल्या सर्व चुकांचे आम्ही समर्थनच करू. समर्थनासाठी, आमच्यासारखे घाणेरड्या प्रथा न पाळणारे लोक, अप्रत्यक्षरित्या/इतर बाबींत कसे वाईट, याचे दाखले निर्बुद्धपणे देत राहू" या लॉजिकचा लेख व प्रतिसाद.
डांगे साहेब यांच्याशी डोकं लावायचा जो प्रयत्न करीत आहेत, तो मी लहानपणी करीत असे.
आता, मला जे म्हणायचंय ते म्हणून मी थांबतो. समजवून सांगायच्या भानगडीत पडत नाही.
1 Nov 2016 - 9:38 pm | संदीप डांगे
=)) =)) धन्यवाद डॉक!
1 Nov 2016 - 11:07 pm | वटवट
लै मनापासुन आभार...
1 Nov 2016 - 11:25 pm | भीमराव
जरा यावर सुद्धा लक्ष द्या
फटाके फोडण्यास मज्जाव करणार्या वृद्धाचा वीस वर्षीय तरुणाने खुन केल्याची घटना कालपरवाच सोलापुर येथे घडली,
1 Nov 2016 - 11:36 pm | वटवट
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
2 Nov 2016 - 11:10 am | आनंदी गोपाळ
सुधारणा दिसतेय की.
आपल्या "धार्मिक" बाबींत लुडबुड करणाऱ्यांना कापून काढण्याचे संस्कार शेवटी दिसू लागलेत एकदाचे. याला म्हणतात धर्मतेज!
2 Nov 2016 - 8:10 am | नेत्रेश
भर दिवाळीत धाग्यावरची धुळवड पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
(आमच्यावेळी असे नव्हते)
2 Nov 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी
सर्व तर्हेच्या फटाक्यांवर कायद्याने कायमस्वरूपी बंदी आणायला हवी असे माझे मत आहे. अर्थात कोणी असे करायला गेले तर फटाके निर्मात्यांच्या पोटावर पाय येईल, फटाके विक्रेत्यांचा धंदा बुडणार, कर्मचार्यांचा रोजगार बुडणार, दिवाळीच्या आनंदावर विरजण, गरीबांच्या आनंदावर विरजण इ. नेहमीचीच आरडाओरड होईलच. परंतु त्याकडे लक्ष न देता सर्व तर्हेच्या फटाक्यांचे उत्पादन, आयात व विक्री यावर कायमस्वरूपी बंदी हवी.
2 Nov 2016 - 4:52 pm | अभ्या..
सहमत आहे. धर्म, समारंभ, राजकारण, खेळ आदिमधले सेलेब्रेशन वगैरे गोष्टी दुसर्यांना त्रास न देताच झाल्या पाहिजेत. रस्त्यावर फटाके उडवणार्यांवर तर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. गेल्या दिवाळीत रस्त्यावरच्या फटाक्यामुळे अॅक्टीव्हा बॅलन्स झाली नाही अन डोळ्यासमोर एक मित्र प्राणाला मुकला. ह्या दिवाळीत आम्ही अॅड एजन्सीवाल्या सर्व मित्रांनी फटाके नकोत अशाच अर्थाचे मेसेज आणि ग्रीटिंग्ज दिवाळीला पाठवले. पॅम्प्लेटही वाटले. कॉलनीत एक दोन अतिशहाण्याखेरीज कुणीही बॉम्ब, लडी वगैरे उडवल्या नाहीत. भुचक्रे फुलबाज्या आणि झाडे लहान मुलांनी उडवले. तेही लिमिटेड एकदम. आनंद वाटला.
2 Nov 2016 - 5:18 pm | संदीप डांगे
+100000000
2 Nov 2016 - 5:40 pm | नाखु
मुलांसाठी सुतळी अॅटम बाँब आणायचे बंद करून किमान ९-१० वर्षे झाली.
मुलांच्या आवडीसाठी फक्त भुईनळे,भुईचक्र आणि फुलबाजी व लवंगी फटाके (अलिकडे आलेला किटकॅट व लेकीसाठी टिकली) इतके वाजविले जाते तेही फक्त रात्री १०.०० च्या आत व सकाळी ६.३० नंतरच.
प्रचंड आवाजी फटाके आणि मोठ्ठ्या माळा कन्येला अजिबात आवडत नाहीत (लेकाला हट्ट करतो म्हणून एकदा मुद्दाम लक्ष्मीपुजनाला चिंचवडगावात नेऊन मोठ्या माळेचा इतरांना कसा उप्द्रव्/त्रास होतो, ते दाखविले तेव्हापासून त्याचाही हट्ट नाही फक्त लवंगी किंवा पानपट्टी वाजवायला आवडते त्याला).
नागगोळी,तडतडी,आगपेट्या,रंगीत फुलबाज्या एकदा कन्येला (दुसरीकडे) वाजविताना दाखविल्या आणि दिसलेल्या धूर्+प्रदूषणामुळे तिनेच तेंव्हापासून एक्दाही हट्ट केला नाही. स्वतंत्र घर असल्याने फक्त गच्चीवर फटाके वाजविण्याचा कटाक्ष गेली १० वर्षे पाळत आहे.पक्ष्यांना कसा त्रास होतो हेही कन्येला दाखविले आहे त्या मुळे कन्याही जरा मोठी झाल्यावर स्वतः होऊन फटाके वाजविण्याचे बंद्/कमी करेल याची खात्री आहे.
मर्यादीत नाखु संसारी
2 Nov 2016 - 11:08 pm | सतिश गावडे
फटाके फोडण्यास विरोध, तरुणाच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू
3 Nov 2016 - 1:37 pm | मंदार दिलीप जोशी
http://growingindia.org/2016/10/31/diwali-fireworks-facts-and-numbers/
http://yugaparivartan.com/2016/10/31/data-shows-no-significant-increase-...
http://indiaarising.com/no-crackers-is-a-misleading-media-campaign-to-ta...
http://swarajyamag.com/culture/at-another-time-in-another-place-a-commun...
https://prashantparikh.wordpress.com/2016/10/28/an-open-letter-to-anushk...
http://www.opindia.com/2016/11/great-derangement-syndrome-the-new-bogey-...
http://indiafacts.org/dahi-handi-debacle-edict-thessalonica-attack-hindu...
3 Nov 2016 - 2:18 pm | संदीप डांगे
सगळ्या लिंक उघडून वाचल्या नाहीत, पहिली वाचली, जरतर च्या भाषेत बुद्धिभ्रम आहे!
बाकीच्या साईट्सची नावं बघून इच्छा नै झाली बघायची, तरी वेळ मिळाला की नक्की वाचेन!
महत्त्वाचे म्हणजे तुमचा पत्ता द्या, आमच्या कडच्या हजाराची लड, ऍटम बॉम्ब फोडणाऱ्याना तुमच्या घराजवळ पाठवणार, मग तुमची मतं अशीच राहतात का ते बघुया...
3 Nov 2016 - 4:21 pm | एस
अत्यंत धूर्त अशी गोबेल्सनीती. जर्फरी तुर्फरीत्यादि पण्डितानाम् वच: स्मृतम्!
असो.
3 Nov 2016 - 7:54 pm | कपिलमुनी
तुमचा प्रतिसाद उखाडला की ओ !
भलत्या ठिकाणी चॅलेंज केला की असा होता =))
3 Nov 2016 - 4:04 pm | आतिवास
आणि हो, फटाके फुटणार, दर वर्षी फुटणार. काहीही झालं तरी फुटणार.
वा! याला म्हणतात निष्ठा, जाज्वल्य की काय तो अभिमान.
वरवर पाहता हिंदू असणं नेहमीचं सोपं आहे, तेच हिंदू धर्माचं बलस्थान आहे. पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नाही.
बाकी जुन्या काळच्या सुधारकांना कशाला तोंड द्यावं लागलं असेल याचा नेमका अंदाज यायला आंतरजालाची मदत होते आहे.
3 Nov 2016 - 4:39 pm | मराठी कथालेखक
आपल्या प्रतिसादाला आपणच 'खिक' म्हणून द्यायची :)
3 Nov 2016 - 6:07 pm | मराठी कथालेखक
आपल्या प्रतिसादाला आपणच 'खिक' दाद म्हणून द्यायची :)
असे वाचाचे
3 Nov 2016 - 6:29 pm | शब्दबम्बाळ
फटाक्यांनी बरेच 'प्रदूषण' झालंय कि इथे!
3 Nov 2016 - 6:33 pm | मराठी कथालेखक
दिवाळीनंतरची आतषबाजी !!
3 Nov 2016 - 9:04 pm | सतिश गावडे
इथले प्रदुषण साफ झाले. आनंदाची गोष्ट आहे. लोक दिवसाढवळ्या प्रतिसाद द्यायला बसले की असं होत असावं.
3 Nov 2016 - 9:16 pm | टवाळ कार्टा
बळी दिला गेल्या आहे
3 Nov 2016 - 10:05 pm | कपिलमुनी
टक्या़, जपून कळा दाबत जा हो!
3 Nov 2016 - 11:42 pm | सतिश गावडे
तो आता सरावला आहे. ;)
4 Nov 2016 - 7:09 am | टवाळ कार्टा
:ड
4 Nov 2016 - 2:38 pm | सिरुसेरि
फटाक्याचा धुर म्हणजे एकप्रकारे पैशाचा धुर . तसेच यामधे अपघात , निसर्ग / पर्यावरण यांची हानी हे धोकेही असतात .