नवमनुस्मृती

वैभव पवार's picture
वैभव पवार in काथ्याकूट
29 Oct 2016 - 10:04 am
गाभा: 

भगवान परशुराम क्षत्रियांची कत्तल करता करता स्वतः क्षत्रिय झाले होते.
त्याप्रमाणे,
डाॅक्टर बाबासाहेब मनुस्मृती जाळता-जाळता स्वतः मनु तर नाही झाले ना?
"चला, पडताळुन पाहुया!"

(मस्मृ)
आरक्षण >>
ज्ञान मिळवण्याचा,यज्ञ, पुजा वगैरे करण्याचा अधिकार केवळ ब्राम्हणांना(असं ही असु शकतं की, सुरुवातीला यात आरक्षण. मिळवुन नंतर मक्तेदारी निर्माण केली गेली.)

असमान-न्याय>>
ब्रम्हहत्या केल्यास जास्त शिक्षा.

शिष्यवृत्ती वाटप>> दान केवळ ब्राम्हणांनाच द्यावे. राजाने ब्राम्हणांना इतके दान द्यावे की ब्राम्हण "पुरे पुरे" म्हणाले पाहिजे.

ब्राम्हणांकडुन दक्षिणा घेवुन नये.
-ऋषी मनु

[नवमस्मृ]
आरक्षण>>
सरकारी सेवेत विशिष्ट वर्गाला आरक्षण.(भविष्यात हा वर्ग सरकारी सेवेत मक्तेदारी निर्माण करु शकतो.)

असमान-न्याय>>
विशिष्ट वर्गावरील अत्याचारास जास्त शिक्षा.

शिष्यवृत्ती वाटप>>
राजसंस्थेने विशिष्ट वर्गाला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातुन पैसा दान देत रहावा, शिष्यवृत्त्या देत रहाव्या.

विशिष्ट वर्गाकडुन फि घेवु नये.
-डाॅक्टर बाबासाहेब

[मनु व बाबासाहेबांनी लिहीलेल्या मुळ घटनेमध्ये बरेच बदल केले गेले. तरीही मनुस्मृती मनुंच्या व राज्यघटना बाबासाहेबांच्या नवावर आहे. म्हणुन केवळ दोघांची नावे पण या नियमांना स्वतःच्या फायद्यासाठी मोडतोड करुन अन्यायकारक बनवनारे लोक वेगळेच आहेत. ]

तुमचे मत काय?

{विनंती: सध्या दिवाळी चालु असल्याने कुणी काथ्याकुटत बसणार नाही, पण चार-पाच दिवसांनंतर मत जरुर नोंदवा.}

प्रतिक्रिया

जॉनी's picture

29 Oct 2016 - 10:43 am | जॉनी

नावांसहित उदाहरण नाही देऊ शकणार मी, पण बरेच जण सरकारी सेवेत अधिकारी झाल्यावर आरक्षण सोडून देतात. काही चालू ठेवतात कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजही समानता आलेली दिसत नाही. तथाकथित उच्चवर्णीयांबरोबर त्यांचे रोटी बेटी व्यवहार अजूनही खूप कमी दिसतात. बाकी मक्तेदारी निर्माण होईल असं वाटत नाही कारण आरक्षण असलं तरी त्यांची संख्या खूप जास्त नाही.

असमान-न्याय -
काही वर्षांपूर्वी पर्यंत त्या समाजावर उघडपणे खूप अन्याय व्हायचे. आता हर प्रमाण बरंच कमी झालंय. त्यामुळे आता समानता यायला हवी असं वाटतंय. कायद्याचा गैरफायदा हा मुद्दा जास्त चिंताजनक आहे.

शिष्यवृत्ती व फी बद्दल बोलण्याआधी बाकी प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

29 Oct 2016 - 6:18 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

तथाकथित उच्चवर्णीयांबरोबर त्यांचे रोटी बेटी व्यवहार अजूनही खूप कमी दिसतात रोटी चे ठीक आहे परन्तु बेटीचे व्यवहार न झालेलेच बरे. भारताची बहुरन्गी बहुढन्गी बहुजातीय चौकट मोडण्याचे प्रयत्न कधीही सफल होणार नाहीत ,होउ नयेत याचे कारण एकीकडे सैराट अन दुसरीकडे कोपर्डी सारख्या घटना स्वातन्त्र्यानन्तर ७० वर्षानन्तर देखील घडत राहताअत . यातच भारतरत्न बाबासाहेबान्चे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसते

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 7:41 pm | बोका-ए-आझम

बेटीचे व्यवहार न झालेलेच बरे

ते बेटीला ठरवू द्या की. तिने कुणाशी लग्न करायचं हा तिचा अधिकार असला पाहिजे.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

30 Oct 2016 - 9:38 am | झपाटलेला फिलॉसॉफर

ते बेटीला ठरवू द्या की. तिने कुणाशी लग्न करायचं हा तिचा अधिकार असला पाहिजे.

अहो बोकाभौ परन्तु त्यामुळेच तर सैराट अन कोपर्डी घडतात ना?

त्यामुळे सैराट आणि कोपर्डी घडत नाही. स्त्रीलाही निवडीचा हक्क आहे, नाही म्हणायचे स्वातंत्र्य आहे, हे अमान्य असल्याने आणि स्त्री कडून नाहे हे ऐकणे हा स्वतःच्या पौरुषाला अव्हान असल्या खुळचट कल्पना मनात ठासून भरलेल्या असल्या की अशा घटना घडतात.

जगायला लायक माणसे स्वत:चे इस्राइल राष्ट्र उभे करतात, नालायक दुस-यांकडून सवलती मिळणे यालाच हक्क समजतात.

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 4:35 pm | संदीप डांगे

जपून!! ;)

दिवाळी मुबारक!!!

Nitin Palkar's picture

29 Oct 2016 - 6:58 pm | Nitin Palkar

इस्रायलशी कोणत्याही बाबतीत बरोबरी करण्यास आपल्याला किमान एक शतक लागेल, अर्थात त्याला अनेक आयाम (बरा शब्द सापडला)आहेत. ना-लायक दुस-यांकडून सवलती मिळणे यालाच हक्क समजतात. हे अगदी बरोबर

चौकटराजा's picture

29 Oct 2016 - 6:22 pm | चौकटराजा

जेंव्हा नव्या भारताने घटना स्वीकारली त्यावेळेस धर्म व जात यांच्यापुढे लोटांगण घातले. ते नक्की कुणी याबद्द्ल वाद असतील. पण ते घातले हे खरे आहे. ते उंबरठ्यापर्यंतच ठेवले असते तर ......? सामाजिक प्रगतीस वेळ लागला असता पण ती झालीच नसती असे मात्र नाही. सामाजिक प्रगतीस वैज्ञानिक प्रगतीचाही मोठा हातभार लागत असतो.

वैभव पवार's picture

29 Oct 2016 - 10:19 pm | वैभव पवार

सहमत!

प्रतापराव's picture

29 Oct 2016 - 6:47 pm | प्रतापराव

मला वाटते जातिभेदाने भरडलेल्या या समाजात हक्क मिळवण्यासाठी दलित समाजाला मोठा लढा द्यावा लागला होता. फुले आणि आबेडकरांनी याचे नेत्रुत्व केले. अर्थात ही एक प्रकारची क्रांतीच होती आणि ह्याला सहाय्यभुत ठरले ब्रिटीशांचे ह्या देशावर असलेले राज्य. पेशवाई असती तर ही क्रांति कधी झालीच नसती.धर्मसत्तेपुढे लोटांगण घालावे लागले असते. कुठल्याही क्रांतिचा प्रभाव नष्ट करण्यासाठी प्रतिक्रांती करावी लागते। आरक्षणविरोधकात त्या तोडीचे कुठले नेत्रुत्व आहे का?

खरे तर जाती ह्या कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत.हा त्यावरचा उपाय आहे.

चौकटराजा's picture

29 Oct 2016 - 7:01 pm | चौकटराजा

खरे तर जाती ह्या कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत.हा त्यावरचा उपाय आहे.
हेच नेम्के आपण २६ जाने १९५० रोजी बासनात गुण्डाळून टाकले व नवनिर्माणाची मोठी संधी कायमची गमावून बसलो. जात व धर्म लोकांच्या मनातून जात असताना त्याना कायद्याच्या कक्षेत " भारतातील वास्तव" मानण्याची ऐतिहासिक चूक करून बसलो आहोत.

कायद्याचे कोणतेही बम्धन नसताना वा आग्रह नसताना देशस्थ व कोकणस्थ कराडे ब्राहमण एकमेकात रोटी बेटी व्यवहार करण्यास तयार झाले आहेत. जर भारतीय घटनेत त्याना पुढारलेले व मागासलेले असे विभागण्यात आले असते तर हे शक्य झाले असते का ? आजही को़कणस्थ देशस्थापेक्षा आपण श्रेष्ट आहोत असे मानतात पण ते फक्त उम्बरठ्याच्या आत.

बोका-ए-आझम's picture

29 Oct 2016 - 7:39 pm | बोका-ए-आझम

ब्रिटिश सत्ता नसती तर फुले-आंबेडकर निर्माणच झाले नसते? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?

प्रतापराव's picture

29 Oct 2016 - 7:05 pm | प्रतापराव

1950 ला माझ्यामते ते शक्य नव्हते.उच्चवर्णियांकडुन कडाडुन विरोध झाला असता. आतापर्यत ज्या जातिच्या नावावर प्रगती झाली याच्या उलटही होउ शकते हे समजायला पन्नास वर्षे तरी द्यावीच लागली असते.

प्रतापराव's picture

29 Oct 2016 - 7:52 pm | प्रतापराव

ब्रिटीश सत्ता नसती तर आंबेडकर, फुले निर्माणच झाले नसते हेच माझे मत आहे. तेव्हा धर्मसत्ता प्रभावि होती. ब्रिटीशांच्या राजवटीत त्यांच्या
या कार्यक्षेत्राला जो वाव मिळाला तो पेशवाईत मिळाला नसता.कारण जातिभेदात काही वावगे आहे हेच फुलेंच्या उदयापर्यत कोणाला वाटत नव्हते.प्रत्येक जण धर्मपालन ह्या हेतुने जातिभेद पाळत होता.फुलेंनी लावलेल्या ज्योतिचा आंबेडकरांनी वणवा पेटवला.

अर्धवटराव's picture

29 Oct 2016 - 10:51 pm | अर्धवटराव

कारण जातिभेदात काही वावगे आहे हेच फुलेंच्या उदयापर्यत कोणाला वाटत नव्हते.

करेक्ट

कारण जातिभेदात काही वावगे आहे हेच फुलेंच्या उदयापर्यत कोणाला वाटत नव्हते. प्रत्येक जण धर्मपालन ह्या हेतुने जातिभेद पाळत होता.

धर्मव्यवस्थेसोबतच जातीव्यवस्थेचं एक महत्वाचं कारण डिव्हिजन ऑफ लेबर सुद्धा होतं. मानवी श्रमांवर आधारीत राज्य/अर्थव्यवस्था आपोआप माणसांमधे उतरंडी तयार करते. आज आपण नव्या "वैज्ञानीक" जातव्यवस्थेच्या आरंभाशी उभे आहोत.

फुलेंनी लावलेल्या ज्योतिचा आंबेडकरांनी वणवा पेटवला.

"गुलमाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल" हे बाबासाहेबांचं तत्व सर्वकालीन क्रांतीकारी आहे. आजही त्याच्या प्रकाशात आपल्याला नवे मार्ग शोधता येतात.

ब्रिटीश सत्ता नसती तर आंबेडकर, फुले निर्माणच झाले नसते

सहमत.

मात्र ब्रिटिश सत्ता या ऐवजी लोकशाही प्रणाली हा शब्द पाहिजे.
अमेरिकेत गुलामी नष्ष्ट होण्याचे कारण काय असावे ?

शाम भागवत's picture

29 Oct 2016 - 11:54 pm | शाम भागवत

म्हणजे ब्रिटिश सत्ता हे निमित्त असून मूळ कारण लोकशाही प्रणाली हे आहे.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:30 am | बोका-ए-आझम

लोकशाहीशिवाय दुसरी कुठलीही राज्यपद्धती विरोधी मताला सन्मान देत नाही. माझा आक्षेप ब्रिटिशांना एवढं महत्त्व देण्याला होता. पण लोकशाही असलेलं साम्राज्य या अर्थाने जर ते म्हटलं असेल तर मान्य आहे.

चौकटराजा's picture

31 Oct 2016 - 8:04 am | चौकटराजा

पेशवाई ही धर्मसत्तेच्या प्रभावाखाली काम करीत होती याला काही पुरावा....... ? शिवाजी मह्राराजानी मग काशीचे गागाभट्ट
यांचे कडून का राज्याभिषेक करून घेतला की त्यांच्यावर देखील धर्मसत्तेचा पगडा होताच..... ?

वैभव पवार's picture

31 Oct 2016 - 8:24 pm | वैभव पवार

भारतात हिंदु व्यक्तीच्या राज्याला, राज्य म्हणून दर्जा मिळण्यासाठी (दुर्दैवाने) केवळ 'राज्याभिषेक' हिच एक पध्दत होती. छ.शिवाजी म.यांवर पगडा वगैरे काही नव्हता. ते एक परिपुर्ण छत्रपति होते. स्वतःच एक विचारधारा, स्वतःच एक धर्म! ॥ सिंहासनाधिश्वर ॥