चायना मालाचा बट्ट्याबोळ...

अर्थहीन's picture
अर्थहीन in काथ्याकूट
5 Oct 2016 - 11:59 am
गाभा: 

चीन च्या वस्तू खरेदी करू नका
--कैम्पेन जोरात चालुय.!!!


मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की
"या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय"
आणि अजून पुढे म्हणजे...
.
Bla bla bla bla bla वगैरे वगैरे
--/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं.

मेसेज वाचला. थोडा विचार केला.

...---
अन त्याचा फोन मागितला. आय-फोन.
11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला.
मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली.
त्यावर क्लियरली लिहिलं होतं.
"Designed in California. Assembled in China.".

///
त्याला चूक कळालीच होती.
पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की...

"बापाला **** शिकवत जाऊ नको."

///

मुद्दा असाय की...
आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे.
अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.??
फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता??
का?????
दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार???

अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा??
का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये???

मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे?

लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.

अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो???

की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड.

तर एकूण
वैलेंटाईन आला की
"14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते...

दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो.

(ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.)

अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???

प्रतिक्रिया

मोदक's picture

10 Oct 2016 - 2:36 pm | मोदक

बर्र मग..?

नितिन थत्ते's picture

11 Oct 2016 - 11:08 am | नितिन थत्ते

एल & टी* सारखी कंपनी त्यांच्या नफ्यासाठी चीनमधून प्लेटी आणणार.

आम्ही मात्र आमचे पैसे वाचवण्यासाठी चिनी माल घेतला तर तो भारतद्रोह वगैरे ठरणार !!!

*We make things that make India proud !!! वगैरे.

भारतद्रोह वगैरे लेबलांची साक्षात तुम्ही चिंता केलेली पाहून किमान मिपावर अच्छे दिन आले असे जाहीर करण्यास हरकत नाही. ;)

मदनबाण's picture

12 Oct 2016 - 10:03 am | मदनबाण

हँहँहँ... मोदक असं करुन नये बरं चच्चा आहेत ते ! ;)
बाकी प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने चीनी वस्तू टाळुन हिंदुस्थानी बनावटीच्या किंवा निदान भारतात उत्पादित मालाला प्राधान्य दिले तरी बराच फरक पडावा.
मी स्वतः माझ्यापासुन याची सुरुवात केली आहे, आणि जमेल तसे चायनीज माल घेण्याचे कटाक्षाने टाळण्याचे प्रयत्न करणार आहे. सध्या पहिल्या प्रयत्नात अ‍ॅमेझॉन इंडिया साईटवर चायनीज कंपनीच्या पॉवर बँकची ऑर्डर दिली होती, ती रद्द करुन हिंदुस्थानी बनावटीच्या पॉवर बँकची ऑर्डर प्लेस केली आहे...
भारत माता की जय !

आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

नितिन थत्ते's picture

12 Oct 2016 - 11:12 am | नितिन थत्ते

कंपनी हिंदुस्तानी आहे की वस्तू हिंदुस्तानात बनवलेली आहे?

मदनबाण's picture

12 Oct 2016 - 11:42 am | मदनबाण

कंपनी हिंदुस्थानी आहे आणि वस्तू सुद्धा मेड इन इंडिया आहे.
आधी ही मागवली होती :-
http://www.amazon.in/Xiaomi-20000mAh-Power-Bank-White/dp/B01AXIMU5G
ती कँन्सल करुन

http://www.amazon.in/COOLNUT-20000mah-Power-Bank-Black/dp/B01GCVCK8U
वरील मागवली.
आता पॉवर बँकच्या आतले पार्ट मेड इन चायना का ते माहित नाही बाँ...

आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum
Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts

कंपनी हिंदुस्तानी आहे की वस्तू हिंदुस्तानात बनवलेली आहे?

आलूची फॅक्टरी असेल तर कंपनी आणि वस्तू सगळेच हिंदुस्तानी असेल.

गरीब लोकांना फक्त चायनाचा माल विकून पैसे मिळत नाहीत त्यांना अजूनही बरेच व्यवसाय करता येतात. उगीच त्यांची तरफदारी करण्यात काहीच अर्थ नाही.

कोणते व्यवसाय करता येतात?

नमकिन's picture

10 Oct 2016 - 3:57 pm | नमकिन

मेक इन इंडिया हे आजचे पण भूतकालीन करार GATT, WTO, रुपया चे अवमूल्यन, ट्रेड व नॅान ट्रेड बॅरियर्स, परदेशी गुंतवणुकीचा ओघ या सर्व धोरणाचा एकत्रित परिणाम व परीक्षण गरजेचे आहे हा जटील प्रश्न चर्चा करताना.
एक गोष्ट नक्की की समस्या आहे दहशतवादाची व त्याला छुपा/उघड पाठिंबा देणारे पाकिस्तान व चीन /अमेरिका इ. देशांची भूमिका.
एकंदरित भारत ५०बिलियन डॅालर दरवर्षी चीनला आयात माला समोर देतो.
CPEC नावावर चीनने थेट ग्वादार बंदरा पर्यंत जा-ये महामार्ग उभारले ५० बि डॅा खर्च करुन. त्याने काराकोरम पर्वत रांगा भारतीय (PoK) हद्दीतून जाते तेथून थेट संपर्क आफ्रिका व आखाती देशात प्रस्थापित केलाय जवळ-जवळ.
म्हणजे पूर्ण वळसा वाचला भारतीय महासागराचा. अबब किती फायदा चीनचा! कुणाच्या जीवावर ? भारतियांच्या,आापल्याच जीवावर उठलाय चीन, कसा काय ते समजून घ्या चीन ची राक्षसी महत्वाकांक्षा व त्यासाठीचे क्रूर मार्ग लपून राहिलेली नाहीं.
खरा दहशतवादी पुरस्कृत करणारा चीन आहे हे समजल्यावर नैसर्गिक प्रतिक्रिया बहिष्काराची यथायोग्य वाटते भारतीय जनतेची. सरकार वैश्विक अर्थव्यवस्था व करार बंधनात असल्याने थेट बंदी चे घोषित पाऊल ऊचलू शकत नाहीं त्यामुळे सर्व नागरिकांची संघटीत शक्ती सुरुवात नक्कीच करु शकते. आज चीनी मालाचे पैसे तिकडे पोचले असा विचार करुन माघार घेऊन चालणार नाहीं कारण धंदा एक दिवसीय नसतो तर रोलिंग चा असतो, मागणी घटली की कोण मुर्ख जातोय तिकडे?
माझी कंपनी वार्षिक रु ३०० कोटी ची उलाढाल करते (मी मालक नाहीं हा) प्लास्टिक पाईप व पिशवी बनविण्याचे यंत्रसामुग्री निर्यात ८५ देशांत होते. आम्हाला चीनी कंपनियां शी स्पर्धा करावी लागते देशांतर्गत व अंतर्राष्ट्रीय बाजारपेठेत. जी वस्तु ₹१ मध्ये विकतो ती चीनी ३०पैसे ला विकतो तरी आम्ही गुणवत्ता व अनुभव व सेवा उपलब्धता सुनिश्चित करताो व तग धरुन आहोत.
निदान कुठेतरी क्रांतिकारी बदलाव आता सुरु करु. आपल्या देखत आपली वाट लागताना मी तरी नाहीं पाहू शकत. कैक लोकांचे मन वळवलेय कामानिमित्त हेची समाधान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Oct 2016 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतका विचार करण्याची प्रगल्भता दाखवली तर भारत एकदोन दशकांत महासत्ता नाही तरी फार महत्वाचे राष्ट्र बनेल. फक्त...

(अ) सर्वसामान्य लोकांनी पुढचा मोठा तोटा पाहून आजचा तात्कालिक फायदा सोडायला शिकले पाहिजे आणि

(आ) त्याहून महत्वाचे म्हणजे चीनच्या वस्तूंचे "ट्रेडिंग" करून जलद फायदा मिळविणार्‍या लोकांनी देशाबद्दल थोडेसे ममत्व दाखविले पाहिजे.

यातले पहिले काम जनजागृतीने करणे (तितकेसे सोपे नाही, पण) तुलनेने सोपे काम आहे. मात्र, दुसर्‍या लोकांचे मतपरिवर्तन करणे फार कठीण आहे... कारण "सबसे बडा रुपय्या !".

नितिन थत्ते's picture

12 Oct 2016 - 11:10 am | नितिन थत्ते

>>इतका विचार करण्याची प्रगल्भता दाखवली तर भारत एकदोन दशकांत महासत्ता नाही तरी फार महत्वाचे राष्ट्र बनेल. फक्त...

असो. भारत फार महत्त्वाचे राष्ट्र ऑलरेडी आहेच. प्रगल्भता की काय ती न दाखवता सुद्धा !!!

तर बहिष्कार करावा म्हणजे नेमकं काय करावं या गोंधळाची आहे. आणि ते स्वाभावीक आहे. सगळी गुंतावळ सोडवुन एखादा स्वच्छ कार्यक्रम लोकांसमोर आला तर पब्लीक निश्चीत सपोर्ट करतील (या धाग्यावरसुद्धा सरकारप्रती आंधळ्या द्वेषाने पछाडलेले, खास राहुलजींचे फॅन मेंबरं कुजकटपणा दाखवुन गेलेच. ते इग्नोर करावे). तसंही आपल्याला मधुनच चरखा, मेणबत्त्या टाईप आंदोलनं करायची लहर येतेच :)

या सगळ्यातुन फेसबुकी मार्ग निघणार नाहि. याचा प्रोग्राम टाटा सारखे मंडळी बनवु शकतील. पण अर्थजगत, उद्योगपती इत्यादीविषयीची आपली अनास्था मधे टांग अडवते. मग आपण प्राणायामबाबांचे अर्थशास्त्र स्विकारायला लागतो (ते अगदीच टाकाऊ नसते... प्राणायाम तर मस्ट आहे :) )

इतर उपाय तर ठाऊक नाहित, पण कुटीर उद्योगांचे संगोपन एक जनरल मेडीसीन आहे अशा समस्यांवर. थोडं डोळे उघडे ठेऊन एक व्यवसाय म्हणुन कुटीर उद्योग केल्यास त्याची एफीशियन्सी कशालाही टक्कर देऊ शकते. अर्थात, त्याच्या मर्यादांचे भान ठेवावेच लागते. आयफोन किंवा लॅपटॉप बनवणं कुटीर उद्योगाला जमणार नाहि. पण जसं कोरल्स समुद्राच्या प्रवाहाला जमीनीवर आक्रमण करण्यापासुन यथाशक्ती रोखुन धरतात तसच कुटीर उद्योग डंपींग पॉलिसीने आक्रमण करणार्‍या उद्योगांना थोपवुन धरु शकतात.

हा विषय खुप गहन, पण मजेशीर आहे. असो.

हेमंत लाटकर's picture

11 Oct 2016 - 3:02 pm | हेमंत लाटकर

यासाठी जपानसारखी देशभक्ती पाहिजे. अमेरीकने जपानवर अणुबाॅब टाकला म्हणून जपानमध्ये अजूनही अमेरीकन एकही वस्तू विकत घेतली जात नाही.

लाटकर साहेब,
अमेरिका दरवर्षी जपानला 63 बिलीयन डॉलर्सची निर्यात करते...
त्यमुळे जपानमध्ये अजूनही अमेरीकन एकही वस्तू विकत घेतली जात नाही वगैरे विधाने जरा जपून..

chitraa's picture

11 Oct 2016 - 6:13 pm | chitraa

जपान जर्मनी वगैरे नावं वापरली की राष्ट्रभक्तीची टॉनिकं पाजणं सोपं जातं, म्हणून अशी नावे वापरली जातात ..

chitraa's picture

11 Oct 2016 - 6:16 pm | chitraa

आता मेक इन इंडियाच्या अंतर्गत परदेशी कंपनीनी भारतात तयार केलेला माल स्वदेशी म्हणायचा की परदेशी?

चायना जसे स्वस्त वस्तू जगभर पुरवतो, तसे भारतही स्वस्त फार्मा प्रॉडक्ट / कच्चा माल जगभर पुरवतो. देशाभिमानाच्या नावानी इतर देशानी ही उत्पादने नाकारली तर चालेल का?

इंडिया ईज फार्मा क्यापिटल ऑफ वर्ल्ड...

नितिन थत्ते's picture

12 Oct 2016 - 11:14 am | नितिन थत्ते

>> मेक इन इंडियाच्या अंतर्गत परदेशी कंपनीनी भारतात तयार केलेला माल स्वदेशी म्हणायचा की परदेशी?

आणि भारतीय कंपनीने उदा. बजाज इलेक्ट्रिकल्स चीनमधून आयात करून आपल्या नावाने विकलेली वस्तू भारतीय की चिनी?

नितिन थत्ते's picture

12 Oct 2016 - 11:16 am | नितिन थत्ते

किंवा याच बजाज* इलेक्ट्रिकल्सने चीन मधून आणलेले सुटे भाग वापरून भारतात अ‍ॅसेम्ब्ली केलेली वस्तू भारतीय की चिनी?

*बजाज हा प्लेसहोल्डर आहे त्यात टाटापासून फिलिप्सपर्यंत सगळे आले.

मी नाइलाजाने भारतीय आहे, माझ्या शेजारच्याने माझी दहा गुंठे जमीन हडपली आहे मी त्याचे काहीच वाकडे करू शकत नाही,. जातीचा फायदा घेणारे लाेक, समान नागरी कायदा नाही इथे. काय चाटायचा हा देश

chitraa's picture

12 Oct 2016 - 8:20 am | chitraa

वाजपेयीची पाच व मोदींची २ .... सात वर्षे राष्ट्रप्रेमी सरकार होउनही समान नागरी कायदा नाही.

बायदवे , नेमके काय समान व्हावे ?

सर्वानी एकच बायको करावी ?
सर्वाना ४ बायका मिळाव्यात ?

टवाळ कार्टा's picture

12 Oct 2016 - 8:25 am | टवाळ कार्टा

प्रत्येकीला ५ पती मिळावेत

chitraa's picture

12 Oct 2016 - 10:19 am | chitraa

बायकाना अनेक नवरे अलाउड आहे ना ?

कायदा द्विभार्याप्रतिबंधक असा आहे.... द्विपतीप्रतिबंधक असा कायदा नाही.

या कायद्याचे इंग्लिश नाम काय आहे ?

सुबोध खरे's picture

12 Oct 2016 - 10:31 am | सुबोध खरे

हिंदू विवाह कायद्याप्रमाणे(१९५५) आपला लग्नाचा जोडीदार( नवरा किंवा बायको) जिवंत असताना आपल्याला दुसरा विवाह करता येत नाही. द्विभार्यापर्तिबंधक "कायदा" असे नाव कायद्यात कुठेच नाही (माझ्या स्वल्प माहितीनुसार).
https://indiankanoon.org/doc/590166/

chitraa's picture

12 Oct 2016 - 10:44 am | chitraa

पुरुषाने दुसरे लग्न केले तर शिक्षा होते.

स्ट्रीने दुसरे दुसरे लग्न केले तर तिला बहुतेक कोर्ट शिक्षा देत नाही , तिला चॉईस विचारतात , तुला हा पाहिजे की तो , ? आणि त्यानुसार तिला मान्य नसलेला नवरा बाजूला होतो , असे ऐकून आहे.

पेप्रात मराठी बातम्यात द्विभार्याप्रतिबंधक असा शब्द अनेकदा वाचला आहे. द्विपतिबंधक असे काही कुठे वाचले नाही.

म्हणुनच या कायद्याच्या इंग्लिश नावाचे कुतुहल आहे.

1. इथला भ्रष्टाचार कधी संपणार हे कोणालाच ठाऊक नाही.
2. अमेरिकन अर्थव्यवस्था जोरात आहे म्हणून रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकन अर्थव्यवस्था जोरात आहे. अशा अर्थाचे वाक्य तुम्ही पण वाचले असेल. भारतात हे साधारण पणे कधी शक्य होईल असे वाटते ? अंदाजे किती वर्षात ?
बाकी आपल्याला आत्ताच स्वातंत्र्य मिळाले. आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे वगैरे नेहमीची फेकूगिरी नको.
आणि दिवे , कंदील वर बहिष्कार वगैरे सगळे फक्त सिम्बॉलिक आहे. बाकी फटाकयवर कोणी काहीच बोलत नाही. आतले केमिकल तर चीन मधूनच येते. भले फटाके इथे शिवकाशी मधले असुदे. पण फटाके आले मग सगळे गप्प. कारण ते तर फोडायलाच हवे.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/xiaomi-ind...
झाओमी दर तीन महिन्यात 10 ते 15 लाख फोन विकते. या वेळेस तर 18 दिवसात 10 लाख फोन विकले.
वर्षाला 50 लाख फोन . एका फोनची किंमत 10,000 पकडली तरी 5000 कोटी रु होतात इथे. 100 रु च्या लाईट माळेवर बहिष्कार , पण फोन मात्र चायना मेड.
जनतेने आपल्या परीने लढा देण्या पेक्षा , आपल्यात असलेले दोष ( जे वर चायना डेली सांगतेय ) दूर करण्या करता सरकार ने प्रयत्न केले पाहिजेत . आज चायनीज कंपन्यांनी जग जिंकलेय त्याच्या मागे चिनी सरकारची खूप मोठी मदत आहे. ( कृपया विदा मागे नये. आपण शोधावा ) इथे फेकू सरकार आणि RSS वाले हे फक्त जनतेने त्याग कसा करावा हेच सांगतात .
आपले रस्ते , टोल धोरण , दर काही अंतराने नाक्या नाक्य्वर द्यावी लागणारी दक्षिणा हे प्रश्न सोडवल्या शिवाय आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही. सरकारला हे प्रश्न सोडवायची इचछा आहे असे वाटत नाही. कायम जनतेने त्याग करावा हेच सांगण्यात येते.

पुंबा's picture

24 Oct 2016 - 1:41 pm | पुंबा

शत प्रतिशत सहमत..

अन्नू's picture

25 Oct 2016 - 11:58 am | अन्नू

एकांगी लेख असल्याने, लेखातल्या विचारांशी पुर्णपणे असहमत.
मुद्दा असा आहे की, इतकं झाल्यावरही विरोध करायचा नाही तर मग कधी?
कालपर्यंत फक्त भारतात बोलणं चाललं होतं पण चायनाने मात्र खरोखरच भारताकडे येणार्‍या ब्रम्हपुत्रा नदीचं एक पात्र सरळ बंद करुन टाकलं! कारण काहीही पुढे केलेलं असो, पण ती इनडायरेक्टली भारताला दिलेली समज नव्हती का? जिथे सर्वजण पाकीस्तानच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत होते तिथेच चायनाने अगदी पद्धतशीरपणे पाकच्या बाजुने उभे राहण्याची भुमिका घेतली. 'दुश्मन का दुश्मन- अपना दोस्त' ही निती तिथे अगदी स्पष्ट दिसली. कारण त्याला माहित आहे भारत फक्त झेंडे दाखवून विरोध करेल. आपल्या वस्तूचं व्यसन बंद करणार नाही! कशासाठी त्याचा हा माज खपवून घ्यायचा?
आता चायना जे काय बोलतंय त्या गोष्टीचा कधी उलट विचार केलाय का?
चायनाची सर्वात जास्त बाजारपेठ ही फक्त आणि फक्त भारत आहे. जर भारतात त्यांना जागा भेटली नाही तर चायनाचं इनकम निम्म्याहून कमी होऊ शकतं. आणि हे खरं आहे. आज बाहेर आपण जितक्या चायनीज वस्तू घेतो तितका क्वचितच कोणी देश घेतो.
इथं फक्त दिवाळीचाच विषय नाही तर इतर वेळीही भारतात दिवसाला- करोडोने चायना वस्तूंची उलाढाल चालते. मी त्याबद्दल बोलतोय. त्याच्यावर आपल्याकडे अल्टरनेट नसतो का? मग त्याचाच अट्टाहास का?

आता मुद्दा दिवाळीचा, तर जे सहा महिन्याच्या आयातीचं चाललंय ते कोणी केलं? अगदी सोप्प उत्तर आहे. गल्लीत विकणारा साधा विक्रेता इतक्या मोठ्या क्वानटीटीने ते विकत घेऊ शकतो का? नाही. त्यामागे बडे व्यापारी लोक असतात. त्यांच्याकडून मग सगळीकडे तो माल वितरीत केला जातो. मग या छोट्या विक्रेत्यांनी तो माल कधी घेतला? सहा महिने अगोदर? आणि ठेवला कुठे आपल्या बंगल्यात? त्यामुळे उगीच त्यांचं नुकसान होईल त्यांनी तो सहा महिने अगोदर घेतलाय हे म्हणणं वेडेपणाचं होईल. मला आठवतंय कोणीतरी असाच शेतकर्‍याबद्दल मॅसेज फॉरवर्ड केला होता. त्यात म्हणे, भाजीपाला विकणारा कष्टाळू शेतकरी आहे आणि त्याच्याकडून आपण माल पाडूनच का मागतो? अरे बाबा, शेतकरी कोण? आणि जो तुला इथं बाजात माल विकतो तो कोण? (काही अपवाद वगळता) सरसकट सगळेच शेतकरी आहेत का? म्हणजे खर्‍या शेतीकर्‍याकडून मातीमोल किमतीने माल विकत घेतो आणि तिसर्‍याला बाजारात विकायला लावतो तो शेतकरी का? असा किती फायदा ते शेतकर्‍यांना देतात? भाव वाढला तरी चारन पाच रुपये किलोने माल घेऊन ते शेतकर्‍याला ती पिळत असतात!
असो,
तर ज्यांनी दिवाळीचा माल घेतलाय त्यांनी तो कधी विकायला घेतला? तर अलिकडच्याच दिवसात. मग आता माल विकला गेला नाही तर नुकसान कोणाचं? विकायला गेला त्याचं कि ज्याच्याकडून त्याने विकायला म्हणून घेतला त्या मालकाचं? म्हणजे जिओचं पैसे पेड केलेलं आहे. बिचार्‍या अंबानीचं नुकसान नको म्हणून यावेळी आपण घेऊ! किती मुर्खपणाचं आहे हे? त्या अंबानीला काय फरक पडणार आहे? आज नफा भेटला. उद्या दुपटीने तो माल इंपोर्ट करेल!
हे म्हणजे, नुकसान होईल म्हणून आपण सरसकट (आत्ता आलेला) सगळा चायना माल संपवायचा. आणि घेतायत लोक म्हणून त्यांनी पुढच्या वेळी असाच भरभरुन माल भारतात आणायचा. म्हणजे पुन्हा- पहिले पाढे पंचावन्न!

कधीपर्यंत चालणार हे? आपला इतिहास काय फक्त शाळेत पाठ करायला होता का? काय होती ब्रिटीशनीती? कशामुळे चालली? आपल्या याच विचाराने ना! भेटतंय स्वस्त घ्या! नंतर काय झालं? हेच आपण पुन्हा रिपिट करणार आहोत का?
मी हे म्हणत नाही आत्ता या क्षणापासून सगळं मेड इन चायना बंद करा. ते पॉसिबलही नाही. पण शक्य होईल तितकं तरी आपण करु शकतो ना? दिवाळी कंदील, लाईट्स, फटाके.. आहे ना अल्टरनेट याला? तेच जिओच्या सिमच. ते कार्ड अगदी स्वतः अंबानीने घरात येऊन हातात दिलं तरी मी ते घेणार नाही. काय गरज त्याची?
जवळचा फायदा बघण्यापेक्षा लांबचं नुकसान बघावं आणि त्याचाच या घडीला विचार होणं गरजेचं आहे.

मराठी_माणूस's picture

25 Oct 2016 - 4:14 pm | मराठी_माणूस

चायनाची सर्वात जास्त बाजारपेठ ही फक्त आणि फक्त भारत आहे.

विकिपिडीआ वरुन तरी असे वाटत नाही.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_the_largest_trading_partners_of_China

आदित्य कोरडे's picture

25 Oct 2016 - 4:26 pm | आदित्य कोरडे

काहीतरी घोळ होतोय. सरकारने ह्या दिवाळीत चीनी माळा आणि फटाक्यांवर बहिष्कार टाका असे सांगितलेले नाही. नरेंद्र मोदींच्या सहीचे तसे आवाहन करणारे एक पत्र हि फिरत होते पण ते बनावट आहे असा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. चीनचा व्यापार जगभर पसरला आहे आणि खेळणी, फटाके, माळा ह्याचा त्यातला वाटा फार लहान आहे. आज आपले मोबाईल, कॉम्प्यूटर, tv इतर इलेक्ट्रोनिक समान ह्यातला बराचसा भाग चीन मध्य बनतो, त्याला पर्याय उपलब्ध केल्याशिवाय बहिष्कार घालता येणार नाही आणि तसे करून बहिष्कार घातल्यानेही चीनचे शष्पही वाकडे होणार नाही. (सुरुवातीच्या काळात स्वदेशीची हाक देणारे रामदेव बाबा आता स्वदेशी ची जास्त भलावण करताना दिसत नाहीत.हे जातं जातं नमूद करायला हरकत नाही.) ग्लोबल व्हायचे असेल तर असले धेडगुजरी थेर चालत नाहीत.एकीकडे आपण चीनबरोबर संयुक्त लष्करी सराव करतो आणि इकडे चायनीज मालावर बहिष्काराची भाषा काही लोक करतात, हे हास्यास्पद आहे. ह्याला सरकार सोडा कोणीही सुज्ञ माणूस भिक घालणार नाही.
आणखी एक चीनी माळा म्हणून ज्या माळा बाजारात मिळतात त्या खऱोखर चीनी असतात कि नाही याची मला शंका आहे. असा माल जर परदेशात बनून इकडे येत असेल तर आपले कस्टम department दिव्य आहे, काय टुकार Quality चा माल पाठवतात.काही नियम, standard, rules & regulations आहेत कि नाहीत.(आमच्या कंपनीत बऱ्याच गोष्टी बाहेरील देशातून मागवल्या जातात अगदी चीन मधून सुद्धा) आणि कस्टम विभाग आम्हाला कशी पाळता भुई थोडी करते ते मला स्वानुभवावरून माहित आहे.) एक तर त्यात वापरलेले वायर/तारा आणि प्लग इतके पातळ आणि तकलादू आणि nonstandard असतात कि त्यामुळे शोर्ट सर्किट होऊन आग लागायचा, शॉक बसायचा संभव जास्त. मी तरी स्वदेशी पेक्षा सुरक्षेच्या कारणावरून हा माल घेत नाही. पण मला शंका आहे कि हा माल चीन नाही तर भारतातच कुठे तरी बेकायदेशीर रित्या बनतो.चांगल्या गुणवत्तेच्या माळाही बाजारात मिळतात पण त्या महाग असतात. आपल्याला सगळ स्वस्त किंवा फुकट पाहिजे. एक खूण गाठ बांधा मनाशी, महाग एक वेळ चांगले नसेल पण वाजवी पेक्षा स्वस्त कधीच चांगले नसते, ते गुणवत्तेशी, पर्यावरणाशी तडजोड करूनच स्वस्त झालेले असते. बहुसंख्य लोक पतन्जलीची उत्पादनं घेतात कारण त्यांना स्वदेशी प्रिय आहे म्हणून नाही तर ती स्वस्त आहेत म्हणून, तेव्हा जरा सावध रहा. मी असे म्हणत नाही कि ती खराबच असतील पण सावधानता कधीही चांगली. मला मधातले कळते म्हणून सांगतो पतन्जलीचा मध मी वापरून पहिला आहे आणि तो कमी प्रतीचा आहे, त्यात भेसळ आहे का? हे सांगता येणार नाही मला, पण डाबर चा मध नक्कीच जास्त चांगला आहे, बाय द वे डाबर हि स्वदेशीच कंपनी आहे बर का !
तीच गोष्ट फटाक्यांची. फटके चीनी असो वं स्वदेशी , ते पर्यावरणाला आणि आरोग्याला घातकच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही घराच्या दार खिडक्या बंद करून बसतो किंवा बाहेर कोकणात वगैरे जातो इतका विषारी धूर हवेत भरलेला असतो. कालपरवाच बातमी होती कि शिवकाशी ला फटके बनवण्याच्या कारखान्यात आग लागली आणि केवढे नुकसान झाले. तिथे अत्यंत अस्वच्छ, असुरक्षित वातावरणात लहान मुलांकडून तुटपुंज्या पगारात १८-१८ तास काम करून हे फटके बनवण्याचे काम केले जाते.आजही फटके काहीस्वस्त मिळत नाहीत पण ह्या मुलांना त्याचा मोबदला काय मिळतो! त्यांची पिळवणूक करणाऱ्या भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी आणि आपल्याच शहराची हवा खराब करण्यासाठी का आपण हि घाण खरेदी करायची. जागे व्हा! स्वत:चे डोकं वापरा. स्वतःच्या आणि स्वता:च्या कुटुंबियांच्या आरोग्याची, पर्यावरणाची काळजी घ्या.तुम्ही तुमचे आप्तजन सुरक्षित तर देशही सुरक्षित!

आदित्य कोरडे's picture

25 Oct 2016 - 4:26 pm | आदित्य कोरडे

काहीतरी घोळ होतोय. सरकारने ह्या दिवाळीत चीनी माळा आणि फटाक्यांवर बहिष्कार टाका असे सांगितलेले नाही. नरेंद्र मोदींच्या सहीचे तसे आवाहन करणारे एक पत्र हि फिरत होते पण ते बनावट आहे असा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. चीनचा व्यापार जगभर पसरला आहे आणि खेळणी, फटाके, माळा ह्याचा त्यातला वाटा फार लहान आहे. आज आपले मोबाईल, कॉम्प्यूटर, tv इतर इलेक्ट्रोनिक समान ह्यातला बराचसा भाग चीन मध्य बनतो, त्याला पर्याय उपलब्ध केल्याशिवाय बहिष्कार घालता येणार नाही आणि तसे करून बहिष्कार घातल्यानेही चीनचे शष्पही वाकडे होणार नाही. (सुरुवातीच्या काळात स्वदेशीची हाक देणारे रामदेव बाबा आता स्वदेशी ची जास्त भलावण करताना दिसत नाहीत.हे जातं जातं नमूद करायला हरकत नाही.) ग्लोबल व्हायचे असेल तर असले धेडगुजरी थेर चालत नाहीत.एकीकडे आपण चीनबरोबर संयुक्त लष्करी सराव करतो आणि इकडे चायनीज मालावर बहिष्काराची भाषा काही लोक करतात, हे हास्यास्पद आहे. ह्याला सरकार सोडा कोणीही सुज्ञ माणूस भिक घालणार नाही.
आणखी एक चीनी माळा म्हणून ज्या माळा बाजारात मिळतात त्या खऱोखर चीनी असतात कि नाही याची मला शंका आहे. असा माल जर परदेशात बनून इकडे येत असेल तर आपले कस्टम department दिव्य आहे, काय टुकार Quality चा माल पाठवतात.काही नियम, standard, rules & regulations आहेत कि नाहीत.(आमच्या कंपनीत बऱ्याच गोष्टी बाहेरील देशातून मागवल्या जातात अगदी चीन मधून सुद्धा) आणि कस्टम विभाग आम्हाला कशी पाळता भुई थोडी करते ते मला स्वानुभवावरून माहित आहे.) एक तर त्यात वापरलेले वायर/तारा आणि प्लग इतके पातळ आणि तकलादू आणि nonstandard असतात कि त्यामुळे शोर्ट सर्किट होऊन आग लागायचा, शॉक बसायचा संभव जास्त. मी तरी स्वदेशी पेक्षा सुरक्षेच्या कारणावरून हा माल घेत नाही. पण मला शंका आहे कि हा माल चीन नाही तर भारतातच कुठे तरी बेकायदेशीर रित्या बनतो.चांगल्या गुणवत्तेच्या माळाही बाजारात मिळतात पण त्या महाग असतात. आपल्याला सगळ स्वस्त किंवा फुकट पाहिजे. एक खूण गाठ बांधा मनाशी, महाग एक वेळ चांगले नसेल पण वाजवी पेक्षा स्वस्त कधीच चांगले नसते, ते गुणवत्तेशी, पर्यावरणाशी तडजोड करूनच स्वस्त झालेले असते. बहुसंख्य लोक पतन्जलीची उत्पादनं घेतात कारण त्यांना स्वदेशी प्रिय आहे म्हणून नाही तर ती स्वस्त आहेत म्हणून, तेव्हा जरा सावध रहा. मी असे म्हणत नाही कि ती खराबच असतील पण सावधानता कधीही चांगली. मला मधातले कळते म्हणून सांगतो पतन्जलीचा मध मी वापरून पहिला आहे आणि तो कमी प्रतीचा आहे, त्यात भेसळ आहे का? हे सांगता येणार नाही मला, पण डाबर चा मध नक्कीच जास्त चांगला आहे, बाय द वे डाबर हि स्वदेशीच कंपनी आहे बर का !
तीच गोष्ट फटाक्यांची. फटके चीनी असो वं स्वदेशी , ते पर्यावरणाला आणि आरोग्याला घातकच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही घराच्या दार खिडक्या बंद करून बसतो किंवा बाहेर कोकणात वगैरे जातो इतका विषारी धूर हवेत भरलेला असतो. कालपरवाच बातमी होती कि शिवकाशी ला फटके बनवण्याच्या कारखान्यात आग लागली आणि केवढे नुकसान झाले. तिथे अत्यंत अस्वच्छ, असुरक्षित वातावरणात लहान मुलांकडून तुटपुंज्या पगारात १८-१८ तास काम करून हे फटके बनवण्याचे काम केले जाते.आजही फटके काहीस्वस्त मिळत नाहीत पण ह्या मुलांना त्याचा मोबदला काय मिळतो! त्यांची पिळवणूक करणाऱ्या भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी आणि आपल्याच शहराची हवा खराब करण्यासाठी का आपण हि घाण खरेदी करायची. जागे व्हा! स्वत:चे डोकं वापरा. स्वतःच्या आणि स्वता:च्या कुटुंबियांच्या आरोग्याची, पर्यावरणाची काळजी घ्या.तुम्ही तुमचे आप्तजन सुरक्षित तर देशही सुरक्षित!