रंजीश ही सही ...

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in जनातलं, मनातलं
18 Sep 2016 - 11:11 pm

आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ".

अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.

मग ते
“हो गई रुखसत घटा बारीश के बाद ,
ईक दिया जलता रहा बारीश के बाद !!”

असेल किंवा

“अभी तो ईश्क़ मे ऐसा भी हाल होना है ,
के अश्क़ रोकना तुम से मोहाल होना है !!”
असेल .

आपण म्हणतो ना काटा रुतलेला दिसत नाही पण बोच कायम राहते. फराजजींच्या लेखनातली ही खुबी मला फार आवडते. “रंजिश-ही-सही” ही तशातीलच एक रचना.

बांधणी राग यमन अन सोपा पण डौलदार ताल दादरा मध्ये केलेली. आणि मेहदी हसन साब , रुना लैला , फरीदा खानम , इक्बाल बानो यांनी अजरामर केलेली रचना.

ही गझल म्हणजे एका प्रियकरानी केलेली प्रेयसीची हट्टी विनंती ... जितकी गोड तितकीच बोचणारी . पण गम्मत अशीये की फराज साहेबांनी प्रेमी युगुला मधला “ईगो” इतका खुबीने पकडलाय की ऐकतांना मजा येते . म्हणजे “तुझ्या वाचून जमेना “ हे तर मान्य आहे पण जाहीर ही करायचं नाहीये.

या गझल मधले काही शेर मला फार आवडतात. ( हे खरं तर नूतन का मधुबाला ? या प्रश्नाच्या उत्तराईतके अवघड आहे , शेर सगळेच एक से एक मोती आहेत पण तरी काही वरचढ ठरतात )

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

आहाहाहा ... बघा ना ... अजून ही “दिल-ए-खुशफेहेम” तुझ्या कडूनच आस लावून बसलंय ... अजून ही तू दिलातच आहेस. विसरलेलो नाहीये मी तुला. (तुला ही माझी आग , माझी तडप दिसतच नाही का ?) फक्त एकदा ये ... ही शेवटची धग विझवायला, शेवटची आशा संपवायला का होईना ... पण ये ... बास्स ईतकीच अपेक्षा ... बाकी काही नको !!

पुढे प्रियकर म्हणतो

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

मला माहीत आहे ... तुही मला अजून विसरू शकलेली नाहीयेस ... पण तू ही माझ्यासारखीच हट्टीयेस !! प्रेम जरी भावनेतून व्यक्त होत असलं , शब्दांनी व्यक्त करायची गरज नसली ... तरी मला भेटायला म्हणून का होईना ये ... मला हे तुझ्याकडूनच ऐकायचय ... कधी तरी ये आणि हे माझ्याशी असलेलं ईश्क़ “जता मुझसे “”!!

क्या बात .... आग बराबर की लगी है ... आधी ईधर भी आधी उधर भी ... धुआं बराबर उठा है .. थोडा ईधर भी थोडा उधर भी ...

आणि या रचनेचा Epitome … म्हणजे

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ...


भले जियो ....
तुही हट्टी आहेस ... मी सुद्धा “झिद” सोडणारा नाही ... दोघेही दूर आहोत ... पण “जमाना” सारखा तुझ्याबद्दल मला विचारतो ... (तुला ही विचारत असेलच माझ्याबद्दल हे ही मला माहित आहे ) .... “जुदाई का सबब” तरी काय सांगू प्रत्येकाला ? त्यापेक्षा तूच एकदा ये ... मान्यय की तू “खफा” आहेस ... पण या “जमान्या” ची तोंडं बंद करण्यासाठी का होईना .... तू ये .. येशील न ?

क्या बात है !! किती सुंदर आणि सोपी रचना ? पण किती व्याकुळ करणारी भावना ? आणि त्याच वेळेला खट्याळपणा सुद्धा भरून राहिलाय या गझल मध्ये .. वा !!

या गझले बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट पण ऐकिवात आहे (खरी खोटी माहित नाही). पण ही कळण्या आधी मी ही गझल कायम “प्रियकर-प्रेयसी” मधील “तकरार” म्हणूनच ऐकत आलो. पण अस ही ऐकलं, की मधील काही “वख्त” फराजजींच्या आयुष्यात असा आला की जणू “लव्ज खफा हो गये !!” . कल्पनाच करवत नाही की अश्या ताकदीच्या माणसाची प्रतिभा आटली . अन मग असं म्हणतात, की या तडप अन कशीश मधून व्यक्त झाली ती None Other Than “रंजिश-ही-सही” ही रचना.

हा किस्सा कळल्या नंतर मी ही गझल परत ऐकून पहिली . आणि कळलं की खरच की .. या रचनेत प्रेयसी ऐवजी “गझल” सुद्धा तितकीच परिणामकारक प्रेयसी ठरते. काही असो , ही रचना म्हणजे खरच गझलप्रकारा मधील रचनांचा “सुवर्ण”योग ठरवा अशीच आहे !!

या गझलेने नि:संशय अनेक मेहफिली , अनेक Gatherings , अनेक एकट्या रात्री आणि सतत भरले जाणारे पेले व्यापले असतील . अनेक गायक जसे मेहदी हसनजी , गुलाम अलीजी , इक्बाल बानो , फरीदा खानम यांनी ही गझल सादर अन लोकप्रिय केली. पण त्यात सगळ्यात जास्त आवडलेली वर्जन खाली लिंक मध्ये डकवत आहे. आणि त्यांची सौंदर्यस्थळे पण नमूद करतोय ... नक्की आनंद लुटा ...

https://www.youtube.com/watch?v=wRG2XJcmhDc

या वर्जन मध्ये “तबला” हा Not to Miss पार्ट आहे. गझल जितकी सुरेख गायलीये तितक्याच ताकदीचा तबला. क्या बात है.
https://www.youtube.com/watch?v=Jra_myoiskE
या वर्जन मध्ये हसन साहेबांनी गझलेची सौंदर्य स्थळे , यमन आणि यमन कल्याण या बाबत केलेलं विवेचन केवळ शब्दातीत ...

https://www.youtube.com/watch?v=SfjFzNk7QPQ

हे वर्जन माझं अत्यंत आवडत आहे. हे गायलंय “इक्बाल बानो” यांनी आणि याची विशेषता अशी की या गाण्यात त्यानी मूळ सांगीतिक-रचनेचा पूर्ण “ढंग”च बदलून टाकलाय. ९९% ठिकाणी ही रचना “यमन” (काही ठिकाणी “यमन कल्याण”) मध्ये गायली जाते/गेलीये. पण येथे .. “देस” मध्ये अनपेक्षित प्रेझेन्टेशन अत्यंत सुखद धक्का देतं. आणि देस हा राग तसा “आळवणी”पूर्ण राग असल्याने गझल रचनेची पूर्ण ढबच या वर्जन मध्ये बदलून गेलीये .

https://www.youtube.com/watch?v=ZxSde6et0_U

हे अत्यंत अलीकडचे वर्जन. गायक माझ्या आवडीच्या गायकांपैकी एक. याच्या आवाजात काही गाणी ऐकणे हीच एक मेजवानी आहे. गायक आहे पपोन (अंगराग महंता ) . सिम्पली ऑफ बीट आणि अफलातून “एम-टीवी” अन्प्लगड वर्जन !!

तर आता मी घेतो आपली रजा .... या रचनेशी जोडलेल्या खूप साऱ्या आठवणी , खूप सारे किस्से आणि रविवार रात्र माझी वाट पाहतेय ... !!

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

आपलाच –
ज्याक ऑफ ऑल ...

संगीतसमीक्षा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Sep 2016 - 11:40 pm | यशोधरा

अतिशय आवडती गजल.
तुम्ही चांगलं लिहीलंय.

साहना's picture

18 Sep 2016 - 11:53 pm | साहना

शतशः धन्यवाद!

स्वर्गीय ! ह्या गजल चे जे शब्द आणि भावना आहेत त्यांच्या बद्दल लिहायला सुद्धा फार मोठी प्रतिभा लागेल.

पु ल देशपांडे जपान मधील एका शहरातील दिवे पाहतात आणि लिहितात कि "अश्याच एका संध्याकाळी असे दिवे पाहून शुभम करोति कल्याणम असे रबिन्द्रनाथांनी लिहिले आणि आमच्या सारखे माणूस मात्र आपल्याला ती प्रतिभा नाही म्हणून हळहळण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत". [आठवणीतून काही चुकले असल्यास क्षमा करावी भावना पोचवून घ्याव्या]

गजल क्रिकेट असेल तर हि गझल म्हणजे युवीची ६ षटकार वाले षटक आहे.

ह्या गजल चे असेच आहे. सर्व प्रथम मी आशा भोसले ह्यांना ऐकले आणि थक्क होऊन गेले. त्यानंतर सादर गझल आणेल गायकांच्या तोंडून ऐकली. दवे उजवे करू शकत नाही पण कॉलेज मध्ये असताना अनुराग बसू ह्यांची एक टीव्ही मालीका येत होती (रोमिओ जुलिएटचे मॉडर्न अडाप्टेशन) नाव होते लव्हस्टोरी. समाजाच्या आणि एक लेव्हल वर स्वतःच्या इगो मुळे प्रेम आहे आणि नाहीहि अश्या स्थितीत असलेल्या कॉलेज प्रेमी युगलची हि कथा अतिशय छान पद्धतीने मांडली होती. त्यांत हि गझल येते आणि तिचा अर्थ अगदी बरोबर लागतो. [हि कथा खरे तर सस्पेन्स/थ्रिलर लव्हस्टोरी असून ह्याच गझल चा खरा अर्थ शेवटच्या सिन मध्ये समजतो]

https://www.youtube.com/watch?v=CNyzo-7beOA [ ह्या एका सिन मध्ये सुद्धा हि गझल किती चपखल बसते. ]

आशा भोसले ह्यांचे रेन्डिशन : https://www.youtube.com/watch?v=QuRaM_k4YJ8 हे हृदयाला स्पर्श करून जाते पण मेहंदी हसन ह्यांची यमन कल्याण वाली गजल माझ्या मते सर्वांत चांगली आहे.

पण गझल ची एक वेगळी विशेषतः आहे. बार टेंडर ज्याप्रमाणे बाटल्या फिरवून वगैरे कॉकटेल करतो फ्लॅमिंग शॉट्स वगैरे करतो ते पाहून माही त्याच्या कलेला दाद देऊ शकतो पण हळहळण्याची गरज नाही कारण त्या कलेची खरी कदर ते पेय पिऊन मद्यधुंद होण्यात आहे. त्याच प्रमाणे गझल चा खरा आस्वाद त्यांतील भावना आपल्या प्रमाणे समजून त्यांत धुंद होण्यात आहे.

दोन्ही आवडले.

रातराणी's picture

19 Sep 2016 - 10:05 am | रातराणी

छान लिहिलं आहे. ऑल टाइम फेवरेट गझल!

ज्याक ऑफ ऑल's picture

19 Sep 2016 - 11:09 am | ज्याक ऑफ ऑल

धन्यवाद !!

गंम्बा's picture

19 Sep 2016 - 12:08 pm | गंम्बा

मी असे ऐकले आहे की "फराज" पाकीस्तानात लोकशाही यावी म्हणुन चालू असलेल्या आंदोलनात सहभागी होते, त्यात त्यांना तुरुंगवास पण झाला होता. ही गजल त्यांनी लोकशाहीला उद्देशुन लिहीली आहे.

पाकीस्तानात एक आड एक लोकशाही आणि लष्करशाही चा खेळ चालतो. म्हणुन लोकशाहीला आर्जव आहे की " आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ"

ज्याक ऑफ ऑल's picture

21 Sep 2016 - 12:49 pm | ज्याक ऑफ ऑल

शक्याय .... असं असणं पण शक्यय . याच सारखं "हंगामा है क्यो बरपा" ला पण एक गोष्ट जोडलेली आहे (असं म्हणतात). की त्यावेळी पब्लीकली मद्य सेवन प्रतिबंधीत होते आणि बहुदा गझलकार यांना त्याबद्दल जाहीर शिक्षा देण्यात आली म्हणून नंतर त्यांनी "हंगामा है क्यो बरपा" लिहिली.

ना-तजुर्बाकारी से, वाइज़ की ये बातें हैं
इस रंग को क्या जाने, पूछो तो कभी पी है ...

त्यामुळे अश्या गोष्टी (खऱ्या अथवा रंजित ) गझल किंवा ती रचना ऐकण्याला वेगळी मजा आणतात !!

निनाव's picture

19 Sep 2016 - 12:14 pm | निनाव

अप्रतीम !!!! असे काहि वाचायला मिळणे - म्हण्जे पर्वणिच!

ज्याक ऑफ ऑल's picture

21 Sep 2016 - 12:50 pm | ज्याक ऑफ ऑल

हौसला अफजाई साठी धन्यवाद !!

चिनार's picture

19 Sep 2016 - 12:43 pm | चिनार

उत्तम लेख....

रंजीश म्हणजे अजरामर गझल आहे. फराज यांनी लिहिलेले शेर खाली दिले आहेत.

रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ,
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ....

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो,
रस्मो - ए - राहे दुनिया ही निभाने के लिये आ...

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम,
तु मुझसे खफा है तो झमाने के लिये आ...

कुछ तो मेरे पिंडार-ए-मुहब्बत का भरम रख,
तु भी तो कभी मुझको मनाने के लिये आ...

एक उम्र से हुं लझ्झत-ए-गिरिया से भी महरूम,
अय राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ...

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ

अब तक दिल-ए-ख़ुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिये आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त\-ए\-गिरिया से भी महरूम
ऐ राहत\-ए\-जाँ मुझको रुलाने के लिये आ

काही उत्साही शायर लोकांनी या गझलेसाठी आणखी शेर लिहिले आहेत. असे जवळ पास 30 शेर आहेत. कोणाजवळ असतील तर कृपया टंकवावे. मला माहिती असलेला एक खालीलप्रमाणे

माना के तुम्हे पिने के आदत ही नाही वाईज...
मयखाने की रौनक ही बढाने के लिये आ.......

ज्याक ऑफ ऑल's picture

21 Sep 2016 - 12:51 pm | ज्याक ऑफ ऑल

असे नवे काही आढळल्यास नक्की शेयर करूत !!

कदाचित गुगल्या ची चुकी असेल. तसं असल्यास ह.घे.

नीलमोहर's picture

19 Sep 2016 - 3:06 pm | नीलमोहर

अत्यंत आवडती रचना आहे ही, गझलेचा दुसरा किस्सा ही भारी,

क्या बात है!! फराज़ माझेही अतिशय आवडते शायर....मस्तच लिहिले आहे तुम्ही!

एक विनंती ते मेहदी हसन असे आहे, मेहंदी हसन नाही (अनुस्वार नाही).

फराज़ वारले तेंव्हा मी हे लिहिले होते -

अवांतर – मेहदी हसन कित्येक वेळा ‘रंजीश ही सही’ गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर ’तालिब बाग़पती’ ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ ‘रंजिश ही सही’ ह्या गज़ल मधे ते नाहित.

ते अशआर असे –

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ|

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|

काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून ‘रंजिश ही सही’ ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही — आणि अर्थातच शायरही तो नाही.

ज्याक ऑफ ऑल's picture

21 Sep 2016 - 12:54 pm | ज्याक ऑफ ऑल

टेक्नीकलीटीज फार मस्त अन सोप्या भाषेत सांगितल्यात !! आणि शेवटचे विवेचन पण फार मस्त. ते दोन अशआर फराज यांचे नाहीत हे माहित नव्हते !!

आणि हो ... मेहंदी ... चुकून झालंय हो .. बघा न एकदाच झालय !! तेवढे गुण वाढवून द्या ना !! :P

मनिष's picture

21 Sep 2016 - 10:18 pm | मनिष

आणि हो ... मेहंदी ... चुकून झालंय हो .. बघा न एकदाच झालय !! तेवढे गुण वाढवून द्या ना !! :P

का लाजवताय? तुम्हाला आहेच पैकीच्या-पैकी मार्क! :-)

ट्रेड मार्क's picture

20 Sep 2016 - 5:10 pm | ट्रेड मार्क

https://www.youtube.com/watch?v=vzog7FYnKt8

यातील सुरुवातीला लावलेला खर्ज म्हणजे आहाहा... आणि मध्ये मध्ये कठीण शब्दांचे अर्थ सांगत गायलेली गझल, खरंच स्वर्गीय!

जरा मोठी आहे गझल, जवळपास अर्ध्या तासाची. संध्याकाळी निवांत एकटेच कमी उजेडात बसून ऐकायला मजा येते.

ज्याक ऑफ ऑल's picture

21 Sep 2016 - 12:57 pm | ज्याक ऑफ ऑल

असं बसून ऐकण्याची मजाच काही और आहे ..
अश्या सेटिंग ला सुट होणाऱ्या गझलांवर (गझल्स पेक्षा गझला जवळचं वाटतं मला) एक अक्खा गप्पा कट्टा होऊ शकतो खरं तर. वेळ मिळाल्यास अश्या दुसऱ्या रचनांवर लिहायची इच्छा आहे. बघू कसं किती अन केव्हा जमतंय !!