गणेशचित्रमाला

रंगभूषा मंडळ's picture
रंगभूषा मंडळ in लेखमाला
5 Sep 2016 - 9:02 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

नमस्कार मंडळी,

मिपागणेशचित्रमालेतील पहिले पुष्प गणेशचरणी अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांमध्ये असलेल्या विविध कला, कलेच्या सादरीकरणात असलेला त्यांचा उत्साह पाहता अशा कित्येक चित्रमाला मिपावर येऊ शकतील, हा विश्वास आहे.

g1

विविध कलांचा स्वामी गणाधिदेव गणेशाचे हे प्रथमरूप आहे ओरिगामीतील. कागदाला केवळ घड्या घालून साकारलेली ही त्रिमित शिल्पे बनवण्यात आपले मिपाकर सुधांशुनूलकर ह्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ओरिगामीत साकारलेला हा गणेश व मोदक समुच्चय. आपल्या मिपाच्या विशेषांकांच्या मुद्रितशोधनात सुधांशूदादांचा सिंहाचा वाटा आहे. कीटक/पक्षी/निसर्गनिरीक्षण ह्या त्यांच्या निस्सीम छंदांबद्दल मिपाकरांना माहीत आहेच.
-------
०६/०९/२०१६
.
1
.
पारदर्शक काचेवर मेहंदीसारख्या दाट रंगाने बाह्यरेषा रेखाटून त्यात पारदर्शक रंग भरणे म्हण्जे ग्लास पेंटिंग. हा छंद जोपासलाय आपल्या मिपाकर सूड ने. प्रभावी व अनवट शब्दकळा लाभलेल्या ह्या मिपाकराची गती स्वयंपाकघरातही चालते. अनेक लेख, कविता, विडंबने आणि पाककृती मिपावर सादर करतानाच ग्लास पेंटिंग मध्ये सूडने साकारलेला हा गणेश तितकाच अप्रतिम आहे यात शंका नाही.
--------

०७/०९/२०१६
1

रंगीत कागदाच्या पट्ट्यांना गुंडाळ्यांचा आकार देऊन त्यांनाच विविध आकारात बसवायचे. पेपर क्विलिंग असे नाव असलेल्या या तंत्राने विविध आकारातून,रंगातून साकारलेल्या गणेशचित्रकृतीला सादर केलेय आपल्या मिपाकर कलावंत नूतन यांनी. लहानपणापासूनच निसर्गरंगांशी गोडी लागली की प्रत्येक कृती कशी कलाकृती बनत जाते हे जाणवून देणारा अनोखा बाप्पा. पेपरक्विलिंग बाप्पा.
--------

०८/०९/२०१६
.
मिपा बाप्पा मोरयाच्या ह्या उपक्रमात अगदी नवीन/अपरिचित आयडींनी पण उत्साहाने आपल्या कलाकॄती पाठवल्यात. भिंतीवर लावण्यासाठी केलेले हे बाप्पाचे सुंदर म्युरल बनवले आहे आपले मिपाकर झुमकुला यांनी. एकदम साध्या भौमितिक आकारांचा, आकर्षक रंगाचा व पोताचा (टेक्ष्चर) वापर केलेले हे म्युरल नजर वेधून घेतेय एवढे मात्र नक्की.

---------

०९/०९/२०१६
.

कुलाबा (अलीबाग) किल्ल्यातील उजव्या सोंडेचे गणेश पंचायतन. आपण सहसा विष्णूपंचायतन बघीतलेले असते पण गणेश पंचायतन कमी आहेत. हे किल्ल्यातील गणेश मंदीराच्या गाभार्‍यात आहे आणि हे मंदीर रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्र्यांचा नातु) यांनी १८व्या शतकात बांधले आहे. हा फोटो टिपलाय आपला भटकंतीचा ज्ञानकोष असलेल्या स्वच्छंदी_मनोज ने. डोळस भटकंती आणि अफाट माहितीचा खजिना हा मिपावरच्या अनेक लेख व प्रतिसादातून कायम दिसतो.
त्याचे ह्या फोटोसोबतच मांडलेले विचार वाचायला हरकत नाही.
..................................
"गणेश चित्रमालेची मिपावर घोषणा झाली आणि आपल्या जवळील गणपतीची चित्रे, फोटो पाठवण्याची विनंती झाल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण काय पाठवू शकतो. मग असे सुचले की आपण एवढे ट्रेक करतो आणि इतक्या वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी गणपतीच्या मुर्ती बघीतल्या आहेत, मग त्या किल्ल्यावर असोत, कि कुठल्या घाटवाटेत असोत, की कुठल्या लेण्यात असोत की कुठल्या गावातल्या मंदीरात, मग त्याच पाठवायला काय हरकत आहे.

सध्या आजूबाजूला वर्षागणीक वाढत जाणारा गणपती उत्सवाचा आनंद बघितला की वाटून जाते की एखाद्या मुर्तीलापण मिरवून घ्यायला तिचे स्वतःचे नशीब लागत असावे. कोणे एके काळी (फार नाही हो फक्त काहीशे वर्षेच झाली असतील) ह्या किल्ल्यांवरच्या, आडवाटेवरच्या, कुठल्यातरी गुहेतल्या, दुर्गम आणि कोपर्‍यातल्या गावातल्या मंदीरातल्या ह्या गणेशमुर्ती पुजल्या जात होत्या, नवस बोलल्या जात होत्या. पण जशी जशी माणसांची गळती गावातून शहराकडे होऊ लागली तशी ही गणेश मंदीरे ओस पडू लागली. एके काळी ज्यांच्या समोर दिपमाळा लागल्या, नैवैद्य ठेवले गेले, आरत्या म्हटल्या गेल्या, नवस बोलले/फेडले गेले, गावातल्या पोरापासून थोरापर्यंत ज्यांनी त्याला तुच आमचा रक्षणकर्ता, तुच आमचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता असे म्हटले त्या गणाधीशाला असे वर्षभर भक्तांच्या दर्शनापासून वंचीत बघीतले की वाईट वाटते. ज्या मंदीरांनी विजयगाथा ऐकल्या, ज्या गणेशाने विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी भुमीका बजावली, ज्याच्यात तिथे मंत्रानी प्राणप्रतिष्ठा करून देवत्व फुंकले त्याच गणपतीला तिथेच त्याच जागी असे भक्तवंचीत बघून वाईट वाटते.

शहरातल्या डिजेंच्या कोलाहालात, खिशातल्या पैश्यांच्या वजनावर भक्त जोखणारा, आमचाच राजा कसा श्रेष्ठ असे हिरीरीने ओरडणार्‍या कार्यकर्त्यांमधे हरवलेला गणपती उत्सव त्याला तरी आवडेल काय याची शंका वाटते. गणेशोत्सव हा सण न गणेश केंद्रीत न राहाता सत्ता आणि पैसा केंद्रीत झालाय किंवा होतोय की काय अशी शंका शहरातले उत्सव बघून वाटते.

शेवटी देव हा देखील भक्तांचा भुकेला असतो हे खरे, पण न जाणे का पण माझे हात ह्या शहरातल्या मंदीरांपेक्षा त्या दुर्लक्षीत मंदीरातल्या एकदंताला जास्तच भक्तीभावाने जोडले जातात."
-----------

१०/०९/२०१६
.
हरिश्चंद्रगडावरचा हा बाप्पा राकट, कणखर, दगडाच्या देशाचा बाप्पा वाटतो कि नाही? अगदी त्याच्या ह्या शेंदूरमाखल्या रुपाला कॅमेर्‍यात उतरवलेय आपला मिपाकर मंदार भालेराव याने. सोबत कुणा अनामिक भक्ताने लावलेल्या अगरबत्तीचा दरवळ दिसतोय ह्या प्रकाशचित्रात. मंदारचे अनेक सुंदर अनुवाद मिपावर वाचायला मिळतात. प्रतिसादातून अन लेखनातून नवीन मिपाकराच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतोय असे म्हणायला हरकत नाही.
------------

११/०९/२०१६
.

मिपाकरांच्या वाढत्या अन उत्साही प्रतिसादाने आज मात्र मिपाचित्रमालेचे रूपांतर एका चित्रगॅलरीत झाले आहे. आज या गॅलरीत तीन सुंदर चित्रे विराजमान झाली आहेत. डावीकडून पहिले जे गणेशचित्र आहे, ते पाठवले आहे amol gawali यांनी. राजकारणावर आणि सामाजिक कार्टून्स काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. मध्यभागीचे जे चित्र आहे ते रेखाटले आहे ज्येष्ठ मिपाकर राजेश घासकडवी यांनी. उत्क्रांतीविषयक अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणार्‍या घासकडवी गुरुजीकडून ही सरप्राईज गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूचा झेंटँगल या चित्रकला शैलीतला गणेश आहे मिपाकर मोक्षदा यांचा. रासायनिक प्रदूषण टाळून नैसर्गिक गोष्टींचा पुरस्कार करणार्‍या चित्रकर्तीकडूनच गणेशाचे हे रूप आलेले आहे.

-------------

१२/०९/२०१६
.

उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या खोऱ्यामध्य १२,०७३ फूट उंचीवर तुंगनाथाचे शिखर उभे आहे. शिखराच्या माथ्यावर पंच- केदारांपैकी तिसरेे म्हणून गणले जाणारे १००० वर्षांचे जुने शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील हा द्वारपाल गणराया.
ह्या अप्रतिम गणेशाला आपल्या भेटीसाठी आणलेय मनाने हिमालयातच मुक्काम ठोकून असलेल्या मिपाकर यशोधरा यांनी.

-------------
१३/०९/२०१६
.

आजचे प्रकाशचित्र कुणी पाठवले असावे ते सांगायची गरज नसावी. अर्थातच प्रचेतस. लेण्या, मंदीरे आणि इतिहासावर अत्यंत अभ्यासू लेखांचा धनी असणार्‍या प्रचेतसला भुलेश्वराने पाडलेली भूल मिपाकरांना परिचयाची आहे. पुणे-सोलापूर रोडवरील यवतनजिक असलेल्या भुलेश्वर मंदिरातील हे अप्रतिम वैनायकी/गणेशिनी शिल्प. जशा मातृका ह्या त्यांच्या पुरुष रुपाच्या शक्ती असतात तशी ही गणेशाची शक्ती शाक्त वा तंत्र पंथीयाकडून मानली जाते.

--------------
१४/०९/२०२१६
.
ह्या रॉकस्टार गणेशाला फोटोशॉप वापरुन सजवलेय मिपाकर कलावंत नीलमोहर यांनी. नेहमीच्या रंगीत माळांच्या उजेडात असणारा बाप्पा आज निऑनग्लो मध्ये स्टार बनलाय.

--------------
१५/०९/२०१६
.

आज समारोपाचे हे बॅनर देताना मला अतिशय समाधान वाटतेय. आपल्या मिपाचा हरहुन्नरी कलाकार स्पा याने खास मिपासाठी वेळात वेळ काढून ही गणेशाची प्रतिमा पाठवली आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर, थ्रीडी मॉडेलर आणि भयकथा लेखक म्हणून स्पा यांची मिपाला ओळख आहेच. सोबतच ह्या चित्रात ज्या काव्यमाला दिसताहेत त्या आहेत आपल्या मिपाकर साहित्यिक माधुरी विनायक यांच्या. जडणघडण सारख्या प्रांजळ लेखमालेतून आपला एक ठसा उमटवणार्‍या माधुरी विनायक यांनी ह्या भक्तीपूर्ण ओळी खास मिपाचित्रमालेसाठी लिहिल्यात हे विशेष.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

13 Sep 2016 - 4:28 pm | महासंग्राम

निमो हे

अभिजीत

कोण ओ

नीलमोहर's picture

13 Sep 2016 - 5:59 pm | नीलमोहर

अभ्या ड. ज.
:)

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 9:34 am | महासंग्राम

हैला अभ्याशेठ आणि मंडळी यांच खरं नाव अभिजित आहे हे माहितीच नव्हतं :) ..

किसन शिंदे's picture

13 Sep 2016 - 5:08 pm | किसन शिंदे

हो हो, अगदी असेच म्हणतो.

कंपूबाजीला प्रेरणा देणारा प्रतिसाद.

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 6:19 pm | पिलीयन रायडर

आजचं बॅनर प्रचेतस ह्यांचंच आहे की नाही! सांगयची गरजच नाही!
अत्यंत सुरेख!

सतिश गावडे's picture

13 Sep 2016 - 10:24 pm | सतिश गावडे

वेगवेगळ्या ठीकाणचे गणपती खुपच सुंदर दिसत आहेत. रंगभूषा मंडळाने त्यांना दिलेली रंगसंगतीही अप्रतिम आहे.

महासंग्राम's picture

14 Sep 2016 - 9:29 am | महासंग्राम

वाह, रॉकस्टार बाप्पा सुरेख... कसा बनवला आहे हा फोटोशॉप मध्ये.

यशोधरा's picture

14 Sep 2016 - 9:59 am | यशोधरा

संपूर्ण गणेशचित्रमालिका देखणी झाली! ह्या कल्पनेबद्दल व उत्तम सादरीकरणासाठी रंगभूषामंडळाचे खूप कौतुक! मी दिलेले प्रकाशचित्र मालिकेसाठी निवडल्याबद्दल मंडळाचे मनापासून आभार.

मंडळमंडळी, ह्या मालिकेमध्ये सहभागी करून घेतलेत, खूप आनंद वाटला. :)

लगेच समारोप करु नकात. उद्याचा स्पेशल बाप्पा आहे. एका स्टार मिपाकराचा. शिवाय समारोपात पण अजुन बाप्पा आहेत. एका सुंदर गणेशस्तुतीने होईल सांगता. सो....स्टे ट्युन्ड.

यशोधरा's picture

14 Sep 2016 - 10:13 am | यशोधरा

अरे वा, वाट बघते!

क्या यह स्टार वही हय जो हम सोच रहे हय?

पैसा's picture

14 Sep 2016 - 10:26 am | पैसा

नीलमोहर, प्रोसेसिंग ठीक. पण बाप्पाला अशी आधुनिक रूपे दिलेली बघायला आवडत नाही. त्यामुळे पास.

सगळीकडचा गाण्यांचा उच्छाद ऐकून बाप्पाने कान झाकलेत गं! ;)

पैसा's picture

14 Sep 2016 - 2:32 pm | पैसा

मग कानात बोटे घालून त्रासलेला बाप्पा जास्त रिअ‍ॅलिस्टिक वाटला असता!

अ‍ॅनिमेशनसाठी तुम्ही घेतलेल्या कष्टांचं कवतिक आहे, पण बाप्पाला अशा रुपात बघायची सवय नसल्याने थोडं वेगळं वाटलं.

नीलमोहर's picture

14 Sep 2016 - 4:15 pm | नीलमोहर

सकाळी वडिलांना हे चित्र दाखवले तेव्हा ते हेच म्हटले, रॉकस्टार वगैरे छान आहे पण लोकांना देवाचे असे रूप चालेल का,

बाप्पांना थोड्या वेगळ्या रुपात दाखवले असले तरी हे काम पूर्ण श्रध्देने आणि स्वच्छ मनाने केलेय,
यात देवाचा अवमान वा चेष्टेचा विचारही मनात नाही. चित्र करतांना थोडी साशंकता होतीच, असे वेगळे काही करावे
की नको म्हणून, पण मग त्या बाप्पावरच विश्वास ठेवून पूर्ण केले.
कदाचित देवापेक्षाही जास्त तो एक मित्र, जीवाचा सखा वाटतो म्हणून असेल.

मूळ कन्सेप्ट डिजीटल बाप्पा ची ठरवली होती, त्यासाठी सोशल मीडियाचे आयकॉन्स वगैरेही वापरले होते,
पण मग बाप्पांची एन्ट्री झाली आणि त्यांनी, हॅ, हे नको ते नको, असं पायजे तसं पायजे करत चित्र लिटरली
बदलून टाकले, हे रॉकस्टार रूप बाप्पांनी स्वतःला हवे तसे बनवून घेतले आहे, वर मिस्किलपणे म्हणतात कसे,
नेहमी काय शांत गंभीर बेअरिंग घ्यायचं, मलाही चेंज नको का ;)
i love rock & roll .... \m/

पिलीयन रायडर's picture

14 Sep 2016 - 8:02 pm | पिलीयन रायडर

मला आवडलं! रंग तर फारच.. डोळ्यांना फार सुदिंग का काय म्हणतात तसं झालं!

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 11:42 am | जव्हेरगंज

नीमोताई,
एकदम ढिंक्च्याच बॅनर....!!

लै आवडलं..!!!

अनन्न्या's picture

14 Sep 2016 - 5:50 pm | अनन्न्या

नीममोहर सॉरी पण गणपतीचे विडंबन नाही आवडत! वॉट्सअप वर सैराटमधल्या हिरोचे
रूप देऊन विहीरीवर उभा गणपती आणि शेजारी आर्ची, आणि दुसरे बाजीराव आणि गौरीना मस्तानी काशीबाई केलेले पाहून डोळे तृप्त झालेत!
गालबोट वाटले हे चित्रमालेला.

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 6:06 pm | बोका-ए-आझम

नीमोतै, छान झालंय बॅनर! मुळात देव हीच माणसाच्या मनातून आलेली संकल्पना असल्यामुळे पावित्र्य आणि अपवित्रता हे सगळे मनाचे खेळ आहेत असं माझं मत आहे. तस्मात एक पतंग घ्या आणि....

बोकोबा, माझ्यासाठी तरी पावित्र्याचा काही संबंध नाही. शिर्‍यात आमटी घातलेली काही जणाना आवडते, हे कालच वाचलं ना! मला आवडत नाही. इतकंच. बाकी पतंग तर आम्ही पण बरेच उडवतो! =))

आनन्दिता's picture

14 Sep 2016 - 7:52 pm | आनन्दिता

बॅनर आवडलं निमो.. एक कलाकारी म्हणुन बघताना तर जास्तच भावलं

यशोधरा's picture

15 Sep 2016 - 9:55 am | यशोधरा

आजचं बॅनर आवडलं. माधुरी विनायक ह्यांच्या ओळीही प्रसंगानुरूप आहेत.

चांदणे संदीप's picture

15 Sep 2016 - 11:25 am | चांदणे संदीप

यथोचित समारोप!

स्पा व माधुरी विनायक या दोघांचेही अभिनंदन व आभार! ___/\___

मिपारंगभूषामंडळाचेही विशेष कौतुक, ज्यांनी सर्व कलाकृतींना मिपाबॅनरच्या सुरेख कोंदणात सजविले! दुधात साखर मिसळावी तशा गणेशाच्या सर्व कलाकृती बॅक्ग्राऊंड इमेजमध्ये एकरूप झालेल्या आहेत!

मी सर्व बॅनर्स एकत्र जमवून ठेवण्यासाठी गेले दहा दिवस वाटच पाहत होतो. आज वो दिन आगया! ___/\____

Sandy

सॅन्डीबाबा हा समारोप नाहीये, लगेच पळू नको. समारोप तुलाच करायचाय. यायचाय तो धागा अजुन.

नि३सोलपुरकर's picture

15 Sep 2016 - 11:28 am | नि३सोलपुरकर

संपूर्ण गणेशचित्रमालिका अत्यंत सुरेख आणी देखणी झाली ..
ह्या कल्पनेबद्दल व उत्तम सादरीकरणासाठी रंगभूषामंडळाचे खूप कौतुक.

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2016 - 12:05 pm | स्वाती दिनेश

स्पा चा बाप्पा आणि माधुरी यांची गणेशस्तुती दोन्ही फार छान..
पूर्ण चित्रमाला खूप सुंदर झाली.
गणपतीबाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
पुढच्या वर्षीही मिपाकरांच्या कलाकारीतून अशीच सुंदर गणेशरुपे पाहणार आहोत. :)
स्वाती

पैसा's picture

15 Sep 2016 - 12:36 pm | पैसा

स्पावड्या, लै भारी! माधुरी विनायक यांच्य ओळीही आवडल्या.

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Sep 2016 - 7:36 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच आणी अतीशय सुंदर.
प्रत्येक प्रवेशीकेला प्रतीसाद दिला नाही पण सर्वांना __/\__. एकाहून एक सरस चित्रपट्टीका आणी ते सजवणार्‍या अभ्याचे कौतूक. आमच्यापर्यंत मिपाकरांची कला न चुकता दररोज पोचवणार्‍या अभ्या आणी प्रशांतचे मनापासून आभार.

या वर्षीतर सुरुवात झोकात झालीय. पुढच्या वर्षी ह्याहून सरस बघायला मीळेल याची खात्री आहे.

सूड's picture

15 Sep 2016 - 8:50 pm | सूड

ओह आय सी!!