अमावास्या

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Sep 2016 - 5:28 pm

अमावास्या हा दिवस आपल्या कडे अशुभ मानतात ..
वातावरणात अनेक अघोरी व अमानवी शक्ती वास करत असतात व त्या अमावास्येला कार्य रत होतात.
या बाबतच्या दोन आठवणी ..
१...भोसरीत तुफान पाऊस सुरू झाला होता...
कारखान्यात अडकून बसण्याची वेळ आली..गाडी सर्विसिनंग ला टाकली होती
तेवढात मित्राची गाडी दिसली व त्याला थांबवून रिक्षा स्ट्यांड पर्यंत सोडण्याची विनंती
केली..
पुण्याचे भाडे म्हटल्यावर रिक्शावाला पण खूश..
पुल ओलांडला अन चौकात जाम होता.
रिक्षावाल्याला म्हटले भाऊ..खडकीवरुन होळकर पुलावरून येरवडा मार्गे चल..
तो बोलेना..म्हटले ५-५० ज्यादा घे..
मागे वळून तो म्हणाला १००० दिले तरी आज नाही..
आज आमोशा..होळकर पुलावर आज हमखास अपघात होतात..गप्प बसणे आले
आजही अमावास्येला होळकर पुलावरून रात्री वाहने भीत भीत जातात ...
२..एक घटना [ऐकीव]
यरवड्याच्या गुंजन सिनेमा हाउस मधला "निल कमल" सिनेमाचा रात्रीचा शो सुटला होता..
१२- सव्वा १२ वाजुन गेले होते..एक तरुण कपल.रिक्षा मिळते का म्हणून वाट पाहत होते.
एकदाचा रिक्षावाला तयार झाला ....खडकीला जायचे होते..
कपल रिक्षांत बसले व रिक्षा चालू झाली.दोघे जण पण रिक्षांत गप्पा मारत होते..रात्रीची वेळ व निरव शांतता असल्याने रिक्षावाल्याच्या कानावर गप्पा पडत होत्या व तो पण गप्पांची मजा घेत होता...
होळकर पुलावरून रिक्षा गेली अन रिक्षा वाल्याच्या ध्यानात आले की कपल गप्पा मारत नाही म्हणून त्याने मागे वळून पाहिले अन तो चाट झाला..रिक्षांत कुणीच नव्हते...
रिक्षावाला घाबरला. अन साइडला रिक्षा घेतली त्याने ओळखले काही तरी अमानवी प्रकार आहे..तो ओरडला न बेशुद्ध पडला..
पुढे हि बातमी पसरली व त्या कपल नी प्रेम सफल होत नाही असे समल्यावर आत्महत्या केली होती असे समजले ..
निल कमल त्यांचा आवडता सिनेमा होता. व हा सिनेमा आला की हमखास असे घडत असे.

जीवनमान

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

2 Sep 2016 - 5:59 pm | जव्हेरगंज

हा हा!

तरीच. हल्ली निलकमल पिच्चर येत नै.
अजून अश्याच ऐकीव घटना वाचायला आवडतील.

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2016 - 8:20 pm | ज्योति अळवणी

मस्त

नीळा's picture

2 Sep 2016 - 8:39 pm | नीळा

भुत बीत काही नसतात ओ

Rahul D's picture

2 Sep 2016 - 10:06 pm | Rahul D

असतात. भूत असतात. पण ते झाडाच्या फांदीवर नाही तर आजकाल माणसात राहतात.

अभ्या..'s picture

2 Sep 2016 - 10:41 pm | अभ्या..

सहमत.
मला असली सुभाषिते फार आवडतात. अकुकाकांच्या कथा त्याहून आवडतात.

Rahul D's picture

2 Sep 2016 - 11:22 pm | Rahul D

अकु??

ते वरच्या कथेतले. भोसरीचे

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:32 pm | रातराणी

अरे ये अकु नहीं जानता! ;)

कळाले. मंडळ आभारी आहे.

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:22 pm | रातराणी

भन्नाटच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2016 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला ! त्या पुलावरून दहा वर्षे आठवड्याचे सहा दिवस रात्री गाडी चालवलेली आहे. आमाला नाय बा भूतबित दिसले ! :) ;)

आमाला भूतेबी घाबरतात असे वाटते =))

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Sep 2016 - 12:24 am | माम्लेदारचा पन्खा
माम्लेदारचा पन्खा's picture

3 Sep 2016 - 12:24 am | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही कारमधून जात असणार.....कसं जमायचं....

शिवाय नीलकमल लागला होता का दहा वर्षात ? आता डिव्हिडीवर नीलकमल फुल आवाजात लावा आणि गाडी फिरवा पुलावर रात्रभर ...मग बघा.... दिसतील !

अभ्या..'s picture

3 Sep 2016 - 12:33 am | अभ्या..

कोण?
अकुकाका??

बोका-ए-आझम's picture

3 Sep 2016 - 12:34 am | बोका-ए-आझम

तो स्वतःच अव्वल भूत दिसतो. अजून वेगळं भूत कशाला पाहिजे?

सिरुसेरि's picture

3 Sep 2016 - 10:46 am | सिरुसेरि

नीलकमल हा भुताचाच सिनेमा आहे . त्यामध्ये भुत आहे . ते बघायला लांबुन लांबुन भुते येतात .

नगिना हा नागाचा सिनेमा आहे . त्यामध्ये नाग आहे . तो नाग बघायला लांबुन लांबुन नाग येत असत असे म्हणतात .

बोका-ए-आझम's picture

3 Sep 2016 - 10:48 am | बोका-ए-आझम

नागालँडमधून?

तिमा's picture

3 Sep 2016 - 10:54 am | तिमा

दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानतात. म्हणजे ती सगळी भुते आहेत का ? की त्यांच्याकडे पोर्णिमेला भूत दिसते ?

सं.राऊत ,सामना

हा शुद्ध वाह्यात्पणा आहे आमची खडकीला होळकरपुलापाशी नवीन शाखा मोठ्या जोमात निघाली म्हणून.असल्या भाकड आणि भेकडकथाम्ना आम्चा शिववसैनीक पुरून उरेल हे सगळ्या "काकांनी" लक्ष्यात ठेवावे.भूताम्चा बंदोबस्त गृहखाते करीत नसेल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत हे लक्ष्यात ठेवावे. रिक्षात पक्षात जे आले तेच आमचे उरले ते भुताचे..

प्रकाश बाळ सम विचारवंत लोक्सत्ता

भूत असणे ही हिंदुत्ववाद्यांनी उठवलेली आवई दिसते,एक्दा का भूत मान्य केले की भूतबाधा अधिकृत समजली जाईल आणि जादू टोणा कायद्यातून भूतांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना वगळता येईल. मला तर वाटते हा संघाचाच कुटील डाव असावा, माझा पुण्यातील मित्राने त्याच भागात नुकतेच एक नमोंचे आणि गडकरींचा अभिनंदन करणारा फलक पाहिला होता आणि ही बातमी.नक्कीच काही धागा दोरा असावा.सगळ्या धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांना याचा निषेध करावा व रिक्षावाल्यांनी (नेहमी प्रमाणे) संप करावा.

पटा पटा मटा

रिक्षावालयांचे दु:ख आणि त्यांची अवहेलना समोर आणल्याबद्दल अकुकाकांचे अभिनंदन्,आम्ही त्यांचा एक फोटो पण छापला असता (पण हीच बातमी एक्ष्कुल्सीव्हली आम्हाला दिली असती तरच) आम्हालाही नेट आवृत्तीत वेग्वेगळ्या शीर्षकाखाली बातमी ५-७ ठिकाणी लावता आली असती (मासलेदार वाक्याने).
पण फक्त रिक्षाच का सायकल दुचाकीवाल्यालाही भूत दिसले पाहिजे,नव्हे तो त्याचा हक्कच आहे.आम्चे वार्ताहर नक्की एक्च भूत आहे का त्यांची टोळी सक्रीय झाली याची खात्री करून घेत आहेत.

लोकमत

आम्ही अधीच सांगीतले गाव भर बोंबलून की आम्ही पुण्याचे एक नंबर वृत्तपत्र आहोत म्हणून त्याव्र तुम्ही कुजकट पुणेकरांनी विश्वास ठेवला नाही,आणि अता भुताची गोष्टीवर मात्र लगेच विश्वास.नक्कीच हा सोनीयाम्ना बदनाम करण्याचा डाव असावा असे दिसते.खरे तर भूत आहे असे प्रथम कॉन्ग्रेसनेच सिद्ध केले होते (काही जण काँन्ग्रेसचे भूत डोक्यातून जात नाही असे म्हणतात ते ऊगाच नाही)
बोफोर्सेचे भूत्,भोपाळ गॅसगळतीचे भूत्,तरंग (लहरी) वाटपाचे भूत्,कोळसा खाणीचे भूत असा भूतांचा भरभक्कम वारसा आमच्या कडे असताना आम्ही घाबरणार नाही,पक्षाला राहुल गांधीच दशा दिशा दाखवतील असा आम्चा विश्वास आहे.
अकु काकांना छाजेड साहेबांना सांगून दापोडीतून महापालिकेचे तिकिट देता येईल का ते बघू (सध्या अंतर्गत लाथाळीने फक्त ३७ संभाव्य उमेदवार असल्याने जागा येणार नाहीच तेंव्हा हीच देऊन टाकू असे हाय्क्मांडचे सांगणे आहे)

सरकारी तजुर्मा व पेपरातील इशारा

ज्या अर्थी सदरहू दावा करणार्या इसमास ,तथाकथीत भूताबद्दल बातमी कळली आहे त्या अनुषंगाने:

  • खबरदारीचा उपाय म्हणून होळकर पुलावरून रिक्षांना बंदी करावी
  • पोलींसाना एकटे असताना भूत दिसले तर अडचण होऊ नये म्हणून किमान तीन्च्या संख्येंने गस्त घालावी (डोक्यावर हेल्मेट अनिवार्य असेल)
  • परिसरातील नागरीकांनी सावध्गिरीचा उपाय म्हणून ऊपरोक्त मार्ग टाळावा व प्रशासनास सहकार्य करावे.
  • ऊड्डाण पूल बांधूनही हा प्रश्न सुटत नसेल तर भुयारी मार्ग बांधण्यात यावा अशी शिफारस करण्यात येत आहे.अश्या प्रकारच्या समस्याम्साठी "सिंगापूर-बर्लिन-टोकियो-लंडन" ईथे काय उपाय योजना केली जाते याचा अभ्यास करण्यासाठी शासकीय समीती पुनर्गठीत करून पाठविण्यात यावी,(त्यात स्थानीक आमदार व विरोधी पक्षनेत्याचा समावेश केल्यास कुठलीही तक्रार राहणार नाही)

संकलक नाखु

तेजस आठवले's picture

3 Sep 2016 - 3:57 pm | तेजस आठवले

आवडले. खुसखुशीत आहे.

होळकर ब्रिज ना ?? बरोबर बरोबर...मलापण तिथे भूत दिसला होतं एका रात्री..

मी नुसता गाडीचा हॉर्न काय वाजवला तर..."माणूस...माणूस" बोंबलत पळून गेलं..येडपट कुठलं..

इरसाल's picture

3 Sep 2016 - 4:06 pm | इरसाल

पण त्यातही काका "नंग" पणा घेवुन आलेत. धागा नीट वाचा ;))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2016 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टोरी भारी वाटली. लिहीत राहा. :)

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

3 Sep 2016 - 4:57 pm | कंजूस

भुताची श्टोरी सांगा कुठल्यातरी पुलावरची अथवा बातम्या आवरा.

तोडगे वापरतात एकच पुल असेल तर.इगतपुरीकडचे आमचे एक मास्तर भूताच्या गोष्टी सांगायचे.अमुश्याला पुल ओलांडायचा असेल तर एक विडी बंडल टाकावे लागायचे.एका बैलगाडी गाडीवानासकट पडून तिघेही गेले होते.गाडीवाल्याला विडी आवडायची.(बैलांसाठी काही टाकत नव्हते.मुके प्राणी बिचारे)