पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
31 Aug 2016 - 4:43 pm

औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.

१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.

२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार

३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत.

४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.
मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.

५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.

६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस

७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.

८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.

९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.

हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

7 Sep 2016 - 2:40 pm | गणामास्तर

जाऊ कि. मी कालचं आणल्या किलोभर.

प्रचेतस's picture

7 Sep 2016 - 2:43 pm | प्रचेतस

भारीच.

तिथेच जरा अलीकडे प्रेमलोक पार्कच्या चौकात पेण समोसेवाला होता. घरगुती बनवलेले सामोसे एकदम चवदार होते. हल्ली त्याची गाडी कुठे दिसत नाही.

तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील.
ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.

सत्याचे प्रयोग's picture

31 Aug 2016 - 9:41 pm | सत्याचे प्रयोग

सांगवीत शितोळे चौकातील हाॅटेल जलसा मध्ये बिर्याणी मिळते प्रत साधारण असते पण भरपूर असते बर्‍याच वेळा संपूर्ण खाल्ली जात नाही.

औरंगजेब's picture

31 Aug 2016 - 10:08 pm | औरंगजेब

वरील सर्व ठिकाणी मिपाकट्टा करुया :-)

कपिलमुनी's picture

31 Aug 2016 - 10:10 pm | कपिलमुनी

जुन्या सांगवी मधे आला की बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत वळायचे तिथे छोटासा हॉटेल गोमंतक आहे .
तिथे मासे चांगले मिळतात.अनलिमिटेड रस्सा आहे.

गणामास्तर's picture

31 Aug 2016 - 11:20 pm | गणामास्तर

मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या चौकात 'मालवण समुद्र' आहे तिथे पण मासे चांगले मिळतात. कोलंबी भात तर अफलातून एकदम.

विनटूविन's picture

1 Sep 2016 - 9:49 am | विनटूविन

चव, पर्यायाने नाव आणि इज्जत घालवलेली आहे. शिळे आणि अती तळलेले मासे खाऊन लोक बोअर झाले आहेत.

कपिलमुनी's picture

1 Sep 2016 - 1:23 pm | कपिलमुनी

मालवण समुद्र अतिशय वाइट आहे . शिळे मासे असतात

कपिलमुनी's picture

31 Aug 2016 - 10:11 pm | कपिलमुनी

सुकांता , बादशाही सारखी थाळी पिंचि मधे कुठे मिळते?

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 10:37 pm | प्रचेतस

रामदेव थाळ -निगडी चौक
हॉटेल भोला - केएसबी चौक
मयुर - चिंचवड स्टेशन ( हे भलतंच महागडं आहे)
श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश

रुपी's picture

31 Aug 2016 - 11:58 pm | रुपी

मयूर महाग आहे, पण सुकांतासारखे सुरुवातीला पेये देऊन उगीच अर्धे पोट भरवून नाही टाकत ;) शिवाय मालक स्वतः उभे राहून व्यवस्था बघत असतात, अगदी आग्रह करुन करुन मुलाला भरपूर जिलेब्या खाऊ घातल्या होत्या :)

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 12:36 am | चाणक्य

घरगुती थाळी हवी असेल तर खरे यांचा सुहास डायनिंग हाॅल. खूप वर्षापासून आहे.
अजून एक थाळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे नैवेद्यम. हायवे ला आहे खंडोबाच्या माळाजवळ

विनटूविन's picture

1 Sep 2016 - 9:50 am | विनटूविन

सुकांता अथवा बादशाहीची लज्जत नाही.

लालगरूड's picture

31 Aug 2016 - 11:05 pm | लालगरूड

अरे वा आमची जन्मभूमी

..... काय आहे त्या पुण्यात... छोटे रस्ते ट्राॅफिक गटार

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 11:09 pm | अभ्या..

अरे एक ओळ राह्यली.
छोटे रस्ते ट्रॅफिक गटार,
तुणतुण्याला म्हणती सतार

जिन्गल बेल's picture

1 Sep 2016 - 9:57 am | जिन्गल बेल

खिक्क ....जामच हसले!!

रातराणी's picture

31 Aug 2016 - 11:11 pm | रातराणी

हिंदुस्तान बेकरीच पॅटीस?

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 11:12 pm | अभ्या..

संपले, उद्या या. ;)

गणामास्तर's picture

31 Aug 2016 - 11:14 pm | गणामास्तर

=))
तिथे बऱ्याच वेळी हेचं उत्तर मिळते रे !

रातराणी's picture

31 Aug 2016 - 11:29 pm | रातराणी

=))

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 1:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

बेक्कार हसलो भाऊ!!!, बाकी हे एक निरीक्षण आहे आमचे, चितळ्यांच्या बाकरवडी पुरवठा योजनेच्या लाईन मध्ये शेवटला नंबर असताना जर बाकरवडी संपली तर तो माणूस अत्यानंदाने "संपलीsssss" असं सांगतो!, त्या माणसाला त्यात कसला जबरी आनंद मिळतो देव जाणे!! =)),

(मला लिहून तो भाव व्यक्त करता येत नाहीये त्या काउंटर वरल्या बाप्याचा, कधी भेटू तेव्हा साभिनय करून दाखवू) =)) =))

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 11:15 pm | प्रचेतस

हा उल्लेख करायचा राहिला.
लै भारी आहे ते चवीला.

आता गरम पण बंडल एवढा एकच अभिप्राय सुचतो

नाखु's picture

1 Sep 2016 - 3:19 pm | नाखु

खुषखबर

आता चितळे शाखा चाफेकर चौकातही (अगदी पुना गाडङीळ शेजारी म्म्डईलगतची इमारत.

वर्षामागे प्राधिकरणात शाखा उघडलेली आहेच, आता चिंचवडातही.

एस's picture

31 Aug 2016 - 11:25 pm | एस

वाखुसाआ.

अमितदादा's picture

31 Aug 2016 - 11:28 pm | अमितदादा

एक नंबर उपयोगी धागा. मटन, मासे आणि वडापाव यांची माहिती सांगणाऱ्यांचे विशेष आभार!

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 12:14 am | चाणक्य

१. मत्स्याहारींसाठी मालवण समुद्र:- फार झकपक नाही पण स्वच्छ आणि चव चांगली. यांच्या दोन शाखा आहेत. गावडे काॅलनीजवळ एक आणि कामिनी हाॅटेल शेजारी एक
२. शिल्पा गावरान :- बसणा-यांसाठी मस्त जागा. ईथली कडक भाकरी आणि रस्सा....आहाहा. कितीही प्या, समाधानच होत नाही. पुण्याहून चिंचवडला येताना नाशिकफाट्याच्या जस्ट आधी आहे.
३. रंगोली:- राजस्थानी पदार्थ चांगले मिळतात. दाल बाटी वगैरे. राघवेंद्र स्वामी मठाजवळ.
४. बाबा रामदेव ढाबा:- रंगोलीप्रमाणेच. दाल बाटी मस्त एकदम. जयपुरी गट्टे की सबजी पण झकास. निगडी ट्रांसपोर्ट नगरीत
५. वराडेची भुर्जी:- अशक्य चव. चापेकर चाैकात संध्याकाळी साडे सातनंतर गाडी लावतो. बायको गेल्यापासून जरा अनियमित झालाय. प्रचंड अहं, पण भुर्जी आणि बाॅईल फ्रायच्या चवीपुढे सगळं माफ. याच्या हातगाडीवर तेरा सूचना असलेला बोर्ड आहे. 'सुटे पैसे असल्याची खात्री केल्याशिवाय आॅर्डर देऊ नये' ही त्यातली एक. यावरून माजाची क्लपना यावी.
६. वाघेरे यांचा रानमळा.वाल्हेकरवाडी रोडवर. भाकरी व चिकन मटन उत्तम.
७. हाॅटेल समाधान:- डांगे चाैकातून रावेत कडे येताना बकेट/बास्केट ब्रिजच्या आधी. अळणी मटण भारी. आणि अस्सल ईंद्रायणी भात. गरम गरम भात आला की मस्त सुवास येतो तांदळाचा
८. ग्लोबल ग्रिल:- सिगरी. पिंपरी सेंट्रलच्या ईमारतीत. बार्बेक्यू नेशन पेक्षा ईथली चव आणि विविधता चांगली आहे
९. जनाबाईचे मटण:- वाल्हेकरवाडी रोडला. मी खाल्लेले नाही अजून पण नाव ऐकून आहे खूप.

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 12:37 am | चाणक्य

१०. हिंजवडीत एक 'ए वन'नावाची बिर्यानी मिळते. उच्च असते.

महासंग्राम's picture

1 Sep 2016 - 9:36 am | महासंग्राम


बाबा रामदेव ढाबा:-

चा उगाच हाईप ठेवलाय प्रचंड गर्दी आणि खूप जास्ती दर, लोक तुमच्या खाटेमागे पानात नजर ठेवून असतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Sep 2016 - 10:30 am | अनिरुद्ध.वैद्य

स्वस्त न मस्त दाल्बाटी मिळते तिथ! हा गर्दी खुप असती आजकाल. पण ती कुठे नसते?

महासंग्राम's picture

1 Sep 2016 - 2:24 pm | महासंग्राम

रामदेव पेक्षा फक्कड डाल बाटी देणारे हॉटेल आता वाकड मध्ये सुरु झाले आहेत. आणि रेट पण कमी.

परिंदा's picture

3 Sep 2016 - 3:39 pm | परिंदा

रामदेव पेक्षा फक्कड डाल बाटी देणारे हॉटेल आता वाकड मध्ये नक्की कुठे आहे ते सांगा?

सहमत.. प्रचंड निराशा झाली..

९. तुम्हाला बहुतेक जगुबाई म्हणायचे असेल.. इथे इतरही ठिकाणच्या जगुबाई हॉटेलचा उल्लेख आहे.. बहुधा त्याचीच शाखा असावी.

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 6:15 pm | चाणक्य

जगुबाईच. बरोबर.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Sep 2016 - 12:50 am | माम्लेदारचा पन्खा

शाकाहारी लोकांनी काय करावं ?

स्वगत-पिंचिवाले बोलवत तर नाहीत.... फक्त आपल्या खाद्य ठिकाणांच्या झैराती करतात !

DeepakMali's picture

1 Sep 2016 - 2:21 am | DeepakMali

आनखी काही...
होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक.. अप्रतिम फ़िश थाळी, मटण थाळी..
गुड फुड रोल हाऊस , भुमकर चौक...
भज्जन सिंह दा धाबा.. सोमाट्णे फ़ाटा..

म्याप टाकाना लवकर नाहितर मलाच बहिर्जी नाइक बनावं लागेल.

सतिश गावडे's picture

1 Sep 2016 - 8:05 am | सतिश गावडे

कामिनी हॉटेल चुकून राहिलं का? ;)

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 8:25 am | चाणक्य

पूर्वी चांगलं होतं. आता गंडलंय.

नंदन's picture

1 Sep 2016 - 8:25 am | नंदन

वाखू साठवली आहे. गणामास्तर यांचा प्रतिसाद वाचूनच जीभ खवळली आहे!

इल्यूमिनाटस's picture

1 Sep 2016 - 8:34 am | इल्यूमिनाटस

थंडा मामला , सोमाटणे फाटा
मुग भजी, कांदा भजी, बटाटा भजी, पकोडे
भजीच भजी

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 9:19 am | कैलासवासी सोन्याबापु

थंडा मामला मध्ये सब्जी लसुनी आमचा वीकपॉईंट होता, त्या सब्जीसाठी आम्ही प्रसंगी बिर्याणी सुद्धा सोडत असू!,

लोकेशन तेच, सोमाटणे फाट्याच्या थोडं पुढे खिंडीतून उतरले की :)

थंडा मामला लै भारी आहे. तिथलं पनीर बदामी पसंदा आहाहा.

इल्यूमिनाटस's picture

3 Sep 2016 - 7:22 pm | इल्यूमिनाटस

आम्ही तिथे फक्त भजीच खातो!
पावसात मस्त बाईक वर एक शॉर्ट ड्राईव्ह घेऊन तिथे फक्त भजी खायची आणि गरमागरम चहा प्यायची मजा औरच.
पण आता हे दोन्ही पदार्थ ट्राय करण्यात येतील!

प्रचेतस's picture

1 Sep 2016 - 8:58 am | प्रचेतस

अजून काही वेगळी ठिकाणं.

भक्ती शक्ती उद्यान, निगडी ह्याच्या इथे एक चाटवाला गाडी लावतो त्याच्याकडची दहीभल्ला चाट एकदम अनोखी. पाणीपुरीच्या लांबट पुरीमध्ये दहीवडा भरुन त्यावर भरपूर थंडगार दही, चिंचेचं पाणी, तिखट वगैरे भरुन जबरा प्रकार देतो. आलू टिकी चाट पण त्याच्याकडे मिळते.

माउली चहा (पिंपरीगाव) आणि नीलम चहा (पिंपरी कॅम्प) अतिशय कडक चहासाठी प्रसिद्ध. मसाला अजिबात नाही. कडक चहा हीच खासियत.

हॉटेल सावली, निगडी चौक इथले लसूणी पालक सूप लै भारी. बाकी पदार्थ तसे नेहमीचेच पण चव छान.

सॉल्टी चायनिज - मासुळकर कॉलनी हे बहुधा पिंपरी चिंचवडमधलं पहिलं चायनिज सेंटर असेल. हातगाडीपासनं सुरुवात करुन ह्यानं आज छोटेखानी हॉटेल टाकलंय. ह्याच्याकडची अमेरिकन चॉपसुई जबरदस्त. तशी कुठेच खाल्ली नाही.

कैलास डेअरी - चिंचवड स्टेशन. ह्याचाकडची ताक, लस्सी अतिसुंदर. संध्याकाळी हाच बाहेर मसाला दूधाची गाडी लावतो. साय टाकलेलं घट्ट मलईदार मसाला दूध, नशिबात असेल तर कधी कधी हा साय टाकलेली कॉफीसुद्धा करुन देतो. ती तर अजूनच भारी.

संत घोडेकर's picture

1 Sep 2016 - 10:28 am | संत घोडेकर

पिंपरी कॅम्पतील वरलमल पॅटिसवाला आहे का हो अजून?

प्रचेतस's picture

1 Sep 2016 - 10:36 am | प्रचेतस

नाही.
शेजारचं महादेव प्याटीसवाला त्याचंच आहे मात्र.

संत घोडेकर's picture

1 Sep 2016 - 10:28 am | संत घोडेकर

पिंपरी कॅम्पतील वरलमल पॅटिसवाला आहे का हो अजून?

पिं.चिं. धाग्यावर इतके प्रतिसाद बघून भरून पावले...मि.पा. वर इतकी मंडळी आहेत तर पिं.चिं. ची ....वाह वाह...

मोदक's picture

1 Sep 2016 - 1:54 pm | मोदक

वाखु साठवली आहे..

भारी व्यासंग रे मास्तुरे..

महासंग्राम's picture

1 Sep 2016 - 2:21 pm | महासंग्राम

वल्ली शेठ यांचा याबाबतीत पण व्यासंग दांडगा आहे असं दिसतंय. अख्ख पिंची पाठ है त्यांना

मोदक's picture

1 Sep 2016 - 3:45 pm | मोदक

टाकलीत काडी..??

वल्ल्या पडला शाकाहारी. त्यामुळे मला मास्तुरेचा व्यासंग जास्त भावणार. मास्तुरेचे कौतुक केले म्हणजे वल्ल्याचे कौतुक नाही असे काही नाहीये.

बाकी वल्लीच्या कट्टर शाकाहारीपणाचा एक पुरावा माझ्याकडे आहे. एकदा वर काढला पण होता. (पळतो आता..!!)

:=))

प्रचेतस's picture

1 Sep 2016 - 6:01 pm | प्रचेतस

=))

महासंग्राम's picture

1 Sep 2016 - 9:38 pm | महासंग्राम

नै हो असा काही उद्देश नव्हता माझा सब जण अपने अपने क्षेत्र में शेर है

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2016 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

एव्हढी प्रचंड आकर्षक ठिकाणं आणि प्रचंड असलं तरी एकच पोट. धावत्या पुणेभेटीच्या काळात कसे जमवावे सगळे?

पाटीलभाऊ's picture

1 Sep 2016 - 3:40 pm | पाटीलभाऊ

कस्पटे वस्तीत दक्षता नगरमध्ये एका गाडीवर वडापाव मिळतो, चव मस्त असते.
मिसळीसाठी अजून एक ठिकाण, चाफेकर चौकाजवळ अरिहंत हॉटेल.
डी. वाय. पाटील कॉलेजजवळ चिकन बिर्याणी मस्त मिळते.

शाहुनगरच्या बागेबाहेर असलेला पवार वडापाव चांगली चव थोडे थांबावे लागते पण समोरच (लगेच तळलेला गरमागरम)मिळतो.
पाव पॅटीससाठी प्रेमलोक पार्क मध्ये बेंगलोर साई हाटेलवजा खादाडी केंद्र (मोठ्ठी खूण म्ह़नजे रस्त्यामधल्या पारासमोरच)
कचोरी चिंचव्ड स्टेशनचा स्वीटमार्ट.
ढोकळा प्रदीप आणि गावातला वाघेश्वर स्वीट मार्ट.
दडपे पोहे आणि कट दोसा गायत्री एक्दम विरूद्ध बाजूल (हिंदुस्थान बेकरीच्या समोर)
बिजली नगरला एके ठिकाणी शेगाव कचोरीच्या नावाखाली बकवास कचोरी मिळते अजिबात घेऊ नका.थोडे पुढे प्राधिकरणात (चिमणच्या इलाक्यात) स्वीट जंक्शन नावाच्या स्वीट मार्टात चांगली कचोरी व समोसा मिळतो ,थोडे वेळ्वेअर ७.३० पर्यंत गेल्यास गरमही लाभतो.

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 6:18 pm | चाणक्य

बंद झाले नाखु. खूप दिवस झाले.चांगले असायचे पदार्थ त्याचे. आणि मुख्य म्हणजे मालकाच्या तोंडात साखर होती अगदी.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:07 pm | संदीप डांगे

शिळे मासे, ताजे मासे ओळखू शकणार्‍या तमाम खवैय्यांबद्दल मला प्रचंड आदर आणि असूया आहे.

आम्हाला शिंचे कोणते खायचे आणि कोणते फक्त पाहायचे ते पण ओळखता येत नाहीत.

---

काही महान लोकांना तर ताजा वडा आणि शिळा पावही ओळखता येत नाही. =))

अप्पा जोगळेकर's picture

1 Sep 2016 - 5:00 pm | अप्पा जोगळेकर

मयूरची मिसळ २ दिवसांपूर्वीच खाल्ली. खासच आहे.
भूमकर चौकात 'जोशी वडेवाले' नावाने जो फालतू वडा विकला जातो त्याच्या बाजूलाच 'रोहित वडेवाले' चा बटाटावडा, साबुदाणा वडा आणि इतर चाट आयटेम भारी आहेत.
तिथून हायवेने मुंबईच्या दिशेने आणखीन थोडे पुढे गेल्यास स्वागत नावाचे बिअर शॉप कम हॉटेल आहे. तिथे मटकी फ्राय अतिशय चवदार. त्याच्या आणखीन थोडे पुढे गेल्यास गावरान नावाचे हॉटेल आहे. तिथले सुके चिकन मस्त.
डांगे चौकात स्टेट बँकेच्या शेजारी नविन लोणी स्पंज डोसाचे दुकान झाले आहे. तो लोणी स्पंज डोसा मस्त आहे.
असाच डोसा चापेकर चौक क्रॉस केल्यावर ज्या गाड्या लागतात तिथेही मिळतो. पण डांगे चौक वाला खास आहे.
डांगे चौक्चे रोजवूड आणि आकुर्डी स्टेशनचे प्राईड ओक्के आहे. आकुर्डी (वेस्ट ) स्टेशनला एक बेकरीवाला आहे. तिथे व्हीट खारी भन्नाट.

अप्पा जोगळेकर's picture

1 Sep 2016 - 5:11 pm | अप्पा जोगळेकर

रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड स्टेशनची एकच आहे का ? मी रावेतला खाल्ली.

नाखु's picture

1 Sep 2016 - 5:15 pm | नाखु

त्यांची एक शाखा चिंचवड स्टेशनला आहे आणि मुख्य शाखा खंडोबाच्या माळाकडून थर्मॅक्स्ला जातानाचे रस्त्यावर (मोठी खूण समोर असलेली भली थोरली "नक्षत्र"सोसायटी.

चौकटराजा's picture

1 Sep 2016 - 7:21 pm | चौकटराजा

ती मयूर मिसळ आमच्या घरासमोर आहे हो हे नक्षत्र कुठं काढलं मधुनच. बाकी मी थोडी भर घालतो. चिंचचड लोकमान्य ब्रिज खाली अप्पांचा वडा, प्रतिभा कॉलेज काळभोर नगर समोरील वडा( शेट्टी उद्यान) हे आपल्या घरगुती वड्याच्या चवीसारखे. भेळ चौकात शर्मा पाव भाजी मस्त व लोकप्रिय. वासूचा वडा ओव्हर रेटेड. ( नुकतीच दोन खादाड॑ मिपाकरं आम्हाला " सावली " निगडीत दिसली. जाम हाणत होते. जोडी म्हण्जे अभ्या ते कोण ते ओळख ... सात अजुबे ... आठवी अपनी जोडी ) सबब सावली हे आलेच. माझ्या मते चिंचवडातील कोण्त्याही सामोशापेक्षा सोमाटणे फाट्यावर सामोसा चांगला मिळतो.

गणामास्तर's picture

1 Sep 2016 - 5:36 pm | गणामास्तर

रावेत, चिंचवड स्टेशन आणि थरमॅक्स एनर्जी हाऊस. या सर्व एकचं आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

2 Sep 2016 - 10:49 am | अप्पा जोगळेकर

आणखीन एक विसरलो. कोयते वस्ती, पुनावळे इथल्या पुरोहित स्वीट्स नामक छोट्या दुकानात कलाकंद मिळतो. माझ्या मते हा जगातला सर्वोत्तम कलाकंद आहे.

विशाल चंदाले's picture

1 Sep 2016 - 6:15 pm | विशाल चंदाले

बारामती वडापाव, अख्या सांगवी/पिंपळे गुरवात वर्ल्ड फेमस आहे. चटणी पण भारी असते त्याची. साई चौकातल्या मंडईत, संध्यकाळीच असतो फक्त.

आजानुकर्ण's picture

1 Sep 2016 - 6:54 pm | आजानुकर्ण

मस्त माहिती... जोरदार धागा

आमच्या इथे सर्वात उत्तम मिसळ आमचेकडेच होणार आहे, पण त्याचे जी एस टी सारखे चालू आहे. आत्मबंध हे सर्व बंध॑ सोडून टाकणारा रस्सा पुण्याहून आणणार आहेत.

कपिलमुनी's picture

1 Sep 2016 - 9:21 pm | कपिलमुनी

अस्सल खानदेशी ऑथेटिकेटेड डिश मिळण्याचे ठिकाण !
संभाजी चौक , निगडी

कपिलमुनी's picture

1 Sep 2016 - 9:27 pm | कपिलमुनी

असे वाचावे

संभाजी चौकात नेमके कुठे रे?
आणि खानदेशी म्हणजे काय काय मिळते?

तिखट आणि तेलकटपणामुळे खानदेशी खाणे अंमळ जडच जाते.

आजानुकर्ण's picture

1 Sep 2016 - 9:48 pm | आजानुकर्ण

खाताना जड जात नाही पण... असो.

कपिलमुनी's picture

1 Sep 2016 - 11:39 pm | कपिलमुनी

चौकात स्वीट मार्ट आहे त्याच्या विरुद्ध दिशेस , सध्या गणपती बसतो , खालच्या गाळ्यात आहे हे हॉटेल.

बिबडा(coarse papad made from Jowar), चिकनीचे पान(coarse papad made of red Jowar), गुरमई रोटी( a sweet roti made of jiggery infused with cinnamon and special homemade Masala), खानदेशी पुरणपोळी, केळीची भाकरी(Bhakri made with flour made of dried and ground banana), कळण्याची भाकरी(bhakri made of black gram & Jowar), केळीचा बिबडा बिबडा, खानदेशी शेव भाजी, खानदेशी पाटोड्यांची भाजी असे बरेच वेगळा पदार्थ मिळतात

अमितदादा's picture

1 Sep 2016 - 10:50 pm | अमितदादा

वर मान्यवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादांचं मी स्वतः साठी एकत्रीकरण केलेलं. मिपाकारासाठी सुद्धा सोयीचं होईल म्हणून इथं देत आहे, काही चूक असल्यास माझी टंकन चूक समजावी. काही गोष्टींचं संकलन नाहीये

वडापाव
1. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, 2. वासू वडापाव निगडी प्राधिकरण 3. काका वडापाव, थरमाक्स चौक 4. दत्ता वडापाव, चाफेकर चौक 5. कॅम्प एजुकेशन जवळ वडापाव गाडी 6. रोहित वडेवाले भूमकर चौक 7. बारामती वडापाव, साई चौक 8.

मिसळ
1. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन, 2. नेवाले मिसळ चिंचवड गाव, 3. दे धक्का लिंक रोड, 4. अतिथी पिंपरी 5. निसर्ग पिंपरी, 7. जनता पिंपरी, 8. बालाजी मिसळ मोरया गोसावी 9.

पावभाजी व भेळ
1. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी, 2. ओम शिव स्वादिष्ट, निगडी प्राधिकरण 3. शर्मा निगडी प्राधिकरण, 4. नायडू निगडी प्राधिकरण 5. पिंगारा निगडी प्राधिकरण 6.

स्वीट मार्ट
1. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. 2. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव 3. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. 4. प्रदीप स्वीट निगडी 5. यशवंत गांधी पेठ 6. गोकुळ स्वीट निगडी चौक 7. बंदन स्वीट शाहूनगर बाग 8. मिठास
परिहार चौक,औंध 9.

मासे
1. मुंबई मासोळी डी वाय पाटील आकुर्डी-रावेत रोड 2. मालवण समुद्र गावडे कॉलनी जवळ 3. होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक. 4.

बिर्याणी
1. KGN चाफेकर चौक 2. पथिक चिंचवड 3. हैद्राबाद बिर्याणी हिंजवडी 4. मुघल महाल हिंजवडी 5.

मटण व चिकन
1. काबील-ए-तारीफ पिंपळे सौदागर 2. राजवर्धन थरमॅक्स चौक 3. समाधान वाल्हेकरवाडी 4. मराठवाडा हिंजवडी जवळ 5 जय मल्हार मोरवाडी चौका जवळ 6. शिल्पा गावरान नाशिक फाट्याजवळ 7. वाघेरे रानमळा वाल्हेकरवाडी रोडवर 8. हाॅटेल समाधान डांगे चौक जवळ 9. ग्लोबल ग्रिल सिगरी 10. जगूबाईचे मटण वाल्हेकरवाडी रोडला.

शाहकारी
1. रामदेव थाळ -निगडी चौक 2. हॉटेल भोला - केएसबी चौक 3. मयुर - चिंचवड स्टेशन 4. श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश

DeepakMali's picture

2 Sep 2016 - 2:04 am | DeepakMali

सन्ड्वीच, पाव भाजी आणि pizzaa साठी .. स्लाईस ओफ़ हेवन - पिंपरी... झक्कास चव...

प्युअर वेज साठी पिंपरी मधे होटेल गणेश... खास प्रसिद्ध

देवांग's picture

7 Sep 2016 - 11:42 am | देवांग

वडापाव
1. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, 2. वासू वडापाव निगडी प्राधिकरण 3. काका वडापाव, थरमाक्स चौक 4. गिरिधारी वडापाव, चापेकर चौक 5. कॅम्प एजुकेशन जवळ वडापाव गाडी 6. रोहित वडेवाले भूमकर चौक 7. बारामती वडापाव, साई चौक 8.

मिसळ
1. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन, 2. नेवाले मिसळ चिंचवड गाव, 3. दे धक्का लिंक रोड, 4. अतिथी पिंपरी 5. निसर्ग पिंपरी, 7. जनता पिंपरी, 8. बालाजी मिसळ मोरया गोसावी 9.शशीची मिसळ गांधींपेठ

पावभाजी व भेळ
1. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी, 2. ओम शिव स्वादिष्ट, निगडी प्राधिकरण 3. शर्मा निगडी प्राधिकरण, 4. नायडू निगडी प्राधिकरण 5. पिंगारा निगडी प्राधिकरण 6.

स्वीट मार्ट
1. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. 2. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव 3. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. 4. प्रदीप स्वीट निगडी 5. यशवंत गांधी पेठ 6. गोकुळ स्वीट निगडी चौक 7. बंदन स्वीट शाहूनगर बाग 8. मिठास
परिहार चौक,औंध 9.

मासे
1. मुंबई मासोळी डी वाय पाटील आकुर्डी-रावेत रोड 2. मालवण समुद्र गावडे कॉलनी जवळ 3. होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक. 4.

बिर्याणी
1. KGN चाफेकर चौक 2. पथिक चिंचवड 3. हैद्राबाद बिर्याणी हिंजवडी 4. मुघल महाल हिंजवडी 5.न्यू प्रतीक बिर्याणी हाऊस, जुना जकातनाका चिंचवड

मटण व चिकन
1. काबील-ए-तारीफ पिंपळे सौदागर 2. राजवर्धन थरमॅक्स चौक 3. समाधान वाल्हेकरवाडी 4. मराठवाडा हिंजवडी जवळ 5 जय मल्हार मोरवाडी चौका जवळ 6. शिल्पा गावरान नाशिक फाट्याजवळ 7. वाघेरे रानमळा वाल्हेकरवाडी रोडवर 8. हाॅटेल समाधान डांगे चौक जवळ 9. ग्लोबल ग्रिल सिगरी 10. जगूबाईचे मटण वाल्हेकरवाडी रोडला.

शाहकारी
1. रामदेव थाळ -निगडी चौक 2. हॉटेल भोला - केएसबी चौक 3. मयुर - चिंचवड स्टेशन 4. श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश

चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला.
दिल्ली स्वाद - निगडीत.
आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.

इल्यूमिनाटस's picture

3 Sep 2016 - 7:12 pm | इल्यूमिनाटस

दिल्ली स्वाद चा पराठा मस्त!

चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला.
दिल्ली स्वाद - निगडीत.
आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.

चांदणे संदीप's picture

2 Sep 2016 - 8:40 pm | चांदणे संदीप

हा लेख म्हणजे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

अजून बरीच ठिकाणे राहिली असल्याने रुमाल टाकून ठेवतो!

स्टे ट्यून्ड!! :)

- पिंचिकर
Sandy

आजानुकर्ण's picture

2 Sep 2016 - 9:45 pm | आजानुकर्ण

आंबेडकर चौकातील रत्ना हॉटेलचा दर्जा ढपलाय काय? पूर्वी तिथे अतिशय उत्तम पंजाबी/उडुपी पदार्थ मिळत असत.

प्रचेतस's picture

2 Sep 2016 - 10:00 pm | प्रचेतस

नाही.
अजूनही तीच चव आहे. तिथलं टॉमेटो सूप खूपच जबरदस्त.
स्पेशल उतप्पा,मसाला डोसा आणि पंजाबी डिशेस अजूनही लाजवाब मिळतात.

आजानुकर्ण's picture

2 Sep 2016 - 10:19 pm | आजानुकर्ण

वर कुठे उल्लेख आला नाही म्हणून सहज चौकशी केली. तिथल्या पंजाबी डिशेससारखी चव अद्याप कुठे चाखायला मिळाली नाही.

नाखु's picture

3 Sep 2016 - 8:33 am | नाखु

उतरलाय हे नक्की,

हलकट बाब्या's picture

3 Sep 2016 - 10:30 am | हलकट बाब्या

नजीकच्या काळात इथे मैसूर मसाला डोसा खाण्याचा योग आला होता. हिरवी (पुदिना) चटणी लावून बनवला होता, चव साधारण. बऱ्याच उपहार गृहांमधे लाल चटणी लावून बनवतात. कॉफी पण ठीकच होती.

चाणक्य's picture

3 Sep 2016 - 4:51 am | चाणक्य

कासारवाडीचं शेर-ए-पंजाब पूर्वी फार भारी होतं. आता कसं आहे माहिती नाही.

चाणक्य's picture

3 Sep 2016 - 4:51 am | चाणक्य

कासारवाडीचं शेर-ए-पंजाब पूर्वी फार भारी होतं. आता कसं आहे माहिती नाही.

चौकटराजा's picture

3 Sep 2016 - 5:48 am | चौकटराजा

पिंची मधील काही ठिकाणी ट्रीप अ‍ॅडव्हाझर व्हिझिटेड असा स्टीकर लावलेला असतो. आता एका काळ्या टी शर्ट मधील आसामी चा फटू लावण्यात येंणार खादाड सम्राट विझिटेड असा ..सदर स्टीकरची आर्डर एक सोलापूर वासी फर्म ला मिळाली आहे असे कळते.