मी गेली ७ वर्षे विविध मराठी संस्थळे जवळून पहात आहे . त्यात काही संस्थळावर सदस्य म्हणून तर इतरत्र रोमात वावरताना मी खालीलप्रमाणे ट्रेन्ड्स किंवा आयडीज चे वर्गीकरण केले -
१. अभ्यासू व तज्ज्ञ -यामध्ये खरोखर एखाद्या विषयाचा सखोल माहितीपूर्ण अभ्यास करून विविध विषयावर लेख लिहिणारे . उदा. आर्किओलॉजी / टेक्नॉलॉजी / आर्मी / अर्थकारण / अध्यात्म इ.
२. भटक्या जमाती यामध्ये विविध देशांचे पर्यटन अथवा ट्रेक्स/भटकन्ती यांची प्रवासवर्णने लिहिणारे
३. स्युडो-स्पिरिच्युअल- यांचे अध्यात्म हा एक भ्रम अथवा न फुटलेले बिंग असते . उगाच कुठल्यातरी बाबा-बुवाचे ढोल बडवण्यात ही मंडळी दंग असतात
४. संघ-भाजपा-हिन्दुत्ववादी /मोदीभक्त ह्याच्या अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी
५. स्युडो सेक्युलर अथवा फुर्रोगामी
हे सहज ओळखू येतात . कोणत्याही विषयावर संघ-भाजपा-हिन्दुत्व/मोदी विरोधी भूमिका घेवून भारतीय संस्कॄती /इतिहास /धर्म /परंपरा यांची टिन्गल टवाळी / निन्दा / खिल्ली उडवणे
६. मनोरुग्ण / डिप्रेस्ड - हे वैयक्तिक आयुश्यातील अपयश अथवा फ्रस्ट्रेशन संस्थळावर येवून काढत असतात अथवा काहीतरी बिनडोक्/बाळबोध प्रतिसाद अथवा धागे काढून संस्थळाची बॅन्डविड्थ वाया घालवत असतात .
७. निर्लज्ज नव-मत-वादी - हे सेक्स सारख्या वैयक्तिक विषयावर जाहीर आणि नको तितके/ नको ते जाहीरपणे मत व्यक्त करत फिरतात
८. प्युअर ट्रोल
९. सामान्य मूकवाचक
१०. प्युअर टाइमपास म्हणून संस्थळावर येणारे / भेट देणारे
११. गॄहिणी - देशस्थ्/परदेशस्थ हाउसवाइफ
आपण यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो ,हे प्रत्येकाने गम्भीरपणे विचार करून ठरवावे असे मला वाटते. त्याचप्रमाणे याखेरीज अन्य कोणत्या कॅटेगरीज असतील तर त्या इथे सांगाव्यात .
प्रतिक्रिया
2 Sep 2016 - 1:07 pm | संन्यस्त खड्ग
लयी जबरा अभ्यास दिसतोय तुमचा भावू
2 Sep 2016 - 2:14 pm | सतिश रानडे
आपण संस्थळा ची यादी दिली असती तर इतर वाचकांना बरे वाटले असते.
2 Sep 2016 - 3:24 pm | टवाळ कार्टा
यापैकी तुम्ही कोण?
2 Sep 2016 - 3:50 pm | कपिलमुनी
१ काडी सारक
२ मज्याशी मयतरी कर्नार कं
हे दोन समुदाय राहिले
2 Sep 2016 - 3:30 pm | मारवा
बाजीचा-ए-अत्फाल कॅटेगरी
मला सर्व कॅटेगर्या माहीत आहेत असा एक तीव्र अभिनिवेष असलेला.
मी सर्व कॅटेगर्याना पुरुन उरलोय
मी सर्व कॅटेगर्या कोळुन प्यायलोय
मी सर्व कॅटेगरीजच्या पलीकडे गेलोय
आणि इथुन उंचावरुन फार उंचावरुन खोल दरीत ती चालणारी शुद्र मानवांची धडपड मोठ्या मौजेने बघतोय.
हे आपण स्वतः किती व्हल्नरेबल आहोत हे सोयिस्कररीत्या विसरुन इनफॅक्ट आपण चक्क लॉगिन आहोत व टंकत आहोत
हे विसरुन एका बेभान शैलीत अॅज इफ मेस्मराइज्ड बाय सेल्फ इमेज लिहीतात ते म्हणजे
बाजीचा-ए-अत्फाल कॅटेगरी.
त्यांना एक भीती ही असते त्याला मीफोबिया म्हणतात. त्याची व्याख्या अशी
MEPHOBIA
Fear of becoming so awesome, that the human race can,t handle it and everyone dies.
2 Sep 2016 - 4:29 pm | जव्हेरगंज
_/\_
2 Sep 2016 - 3:57 pm | चौकटराजा
ही मला जिलबी वाटतेय कुणीतरी चित्र टाका जिलबीच्या ताटाचं !
3 Sep 2016 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही चांगली पाकात मुरलेली जिल्बी वाटली. पण चांगली कुरकुरीत आहे.
-दिलीप बिरुटे
(हलवाई)
3 Sep 2016 - 11:12 am | सिरुसेरि
लेस बांधलेला समुदाय
3 Sep 2016 - 10:30 pm | एक होता गणू
व्यक्त होणारे...
आणि हो खरे सेक्युलर पण असतात बरं का...
3 Sep 2016 - 11:22 pm | बोका-ए-आझम
त्यावर लिहा की. आयडींचे हे प्रकार माहित आहेत आणि अनेक जण वेळ आणि प्रसंग बघून वेगवेगळ्या भूमिका घेत असतात. अत्यंत अभ्यासू लेख टाकणारा आयडी अत्यंत टारगट लेखही टाकू शकतो. त्यामुळे आयडींचं stereotypical profiling करण्याऐवजी मजकुराबद्दल लिहावे ही विनंती.