प्रथमेश

कोदरकर's picture
कोदरकर in काथ्याकूट
31 Jan 2009 - 10:48 am
गाभा: 

प्रथमेश लघाटे चे गायन आमच्या मनाला आनंद देवुन जाते... Lil Champs मध्ये तो 'महागायक' व्हावा असे वाटते.....हे झाले वाटणे गायनातले 'ओ का ठो' न कळणार्‍याचे......
बोला.....तुम्हाला काय वाटते मंडळी?

प्रतिक्रिया

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:49 am | अघळ पघळ

सहमत

सुधा's picture

31 Jan 2009 - 11:18 am | सुधा

प्रथमेश
प्रथमेश लघाटे चे गायन आमच्या मनाला आनंद देवुन जाते... Lil Champs मध्ये तो 'महागायक' व्हावा असे वाटते.....
चाबूक
मला मनापासून तसेच वाटते

मैत्र's picture

31 Jan 2009 - 12:43 pm | मैत्र

पण आजकाल आर्या खूप सुंदर आणि सहज गाते आणि तिच्या गाण्यात जास्त वैविध्य आहे प्रथमेश पेक्षा..

मिहिर's picture

31 Jan 2009 - 10:16 pm | मिहिर

मला आर्यापेक्षा प्रथमेश कधीही आवडतो. आर्या अनेकदा हवेत जात असल्याचे जाणवते.

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 10:21 pm | महेंद्र

मला आर्या आवडते. तिचे उच्चार क्लिन आहेत. प्रथमेश ची गाणी डाउन्लोड करुन ऐका. त्याच्या 'स' च्या उच्चारात प्रॉब्लेम आहे. स्पष्ट नाही तो 'स'!

खरं तर मुग्धा ..... read here...
http://tinyurl.com/d92nj2

मीनल's picture

31 Jan 2009 - 10:23 pm | मीनल

प्रथमेशला स्वर ताल ज्ञान सर्वाधिक आहे.शास्त्रिय संगिताची उत्तम जाण आहे. म्हणून तो कुठलेही गाण उत्तम प्रकारे गाऊ शकतो, शकेल.
उडाऊ, परफॉर्मन्स ची गाणी ही सरावाने म्हणू शकेल असं वाटत.

मीनल.

टारझन's picture

31 Jan 2009 - 10:37 pm | टारझन

:) आम्हाला कलर्स वरचे छोटे मिया मधले नन्ने हसगुल्ले फार आवडतात ... त्यांच्या टॅलेंटला सलाम ..
त्यात पुण्याची एक अत्तिशय क्यूट पोरगी पण आहे ..

बाकी हे लिटील चँप्स पैकी एक दोघं विणाकारण काणाखाली वाजवावे असे वाटतात .

- टार्‍या

मुक्तसुनीत's picture

1 Feb 2009 - 10:32 am | मुक्तसुनीत

बाकी हे लिटील चँप्स पैकी एक दोघं विणाकारण काणाखाली वाजवावे असे वाटतात .
-----------------------------------------------------------------------------------------------
मला वरील वाक्य फारच आश्चर्यकारक , रोचक वाटले.
असे का आणि कुणाबद्दल वाटते ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि असे करायला त्यांचा नक्की अपराध काय तेही लिहावे.

घाटावरचे भट's picture

1 Feb 2009 - 10:42 am | घाटावरचे भट

आता एखादी व्यक्ती बघितल्यावर होतं असं कधी कधी. मारावीशी वाटते कानाखाली. त्यात आश्चर्यकारक ते काय बॉ?

मुक्तसुनीत's picture

1 Feb 2009 - 11:14 am | मुक्तसुनीत

आश्चर्य इतकेच की ज्यांना मारावीशी वाटते ती आहेत गाणे सादर करणारी छोटी छोटी मुले. मी आजवर त्यांच्याबद्दल कौतुकच ऐकले. जे काही आजवर थोडेसे त्यांना पाहिले त्यानुसार ते त्या कौतुकास पात्र आहेत असेच मज अल्पमतीस वाटले होते. कुणाला कानाखाली वाजवावीशी वाटणे याला ज्याप्रमाणे कसलाच धरबंध नाही त्याचप्रमाणे आमच्यासारख्यांच्या आश्चर्यालाही नाहीच. तर असे कानाखाली वाटण्यामागे काही कारणीमीमांसा आहे किंवा कसे हे आपले जाणून घ्यावेसे वाटले खरे. (आजकाल आश्चर्य वाटण्याचीही पंचाईत :) )

घाटावरचे भट's picture

1 Feb 2009 - 11:25 am | घाटावरचे भट

अहो पुलंनीच 'नारायण' मधे म्हटलंय....
"या सगळ्या लोकांमधे एक ८-९ वर्षांची एक ज्यादा चुणचुणीत मुलगी असते. तिचं उगाच आपलं पुढे पुढे करून अस्सं अस्सं वगैरे चाललेलं असतं. एक मारावी थोतरीत कार्टीला असं वाटत असतं. 'पण अय्या हुश्शार आहे नाही' वगैरे म्हणावं लागतं, काय करणार?"

आता त्यातल्या १-२ पोरांना पाहून महामहीम टारझनरावांना असं वाटलं तर तो त्यांचा दोष नसावा असं मी मानतो. त्यामुळे मला तरी आश्चर्यचकित वगैरे व्ह्यायला झालं नाही. असो.

मुक्तसुनीत's picture

1 Feb 2009 - 11:32 am | मुक्तसुनीत

कुणाचा गुणदोष आहे वगैरे न्यायदान करण्याचा संबंधच नाही. मला कुतुहलापोटी जे वाटले ते विचारले.

बाकी पुलंच्या व्यक्तिचरित्रातल्या वाक्याचे प्रयोजन समजले नाही. "नारायण" ही व्यक्तिरेखा असे म्हणते - असे पुलंनी लिहिले आहे म्हणून - वास्तवातल्या मुलांबद्दल असे म्हणणे योग्य आहे , तसे करण्यात कुणाचा "दोष नसावा" हे मानणे सुद्धा , थोडे रोचकच. असो.

घाटावरचे भट's picture

1 Feb 2009 - 11:39 am | घाटावरचे भट

वर उद्धृत केलेल्या वाक्यांबद्दल बोलायचं झालं तर ही वाक्ये नारायणाच्या तोंडी नाहीयेत. मुलगी बघायला येणे या प्रसंगाचे जेनेरिक वर्णन यात पुलंनी केलेलं आहे. म्हणजे हा अनुभव बर्‍याचदा येणारा असावा असा निष्कर्ष मी काढला. जर सर्वसाधारण अनुभवानुसार उगाच पुढे पुढे करणार्‍या कार्ट्यांना कोणाला कानाखाली वाजवावीशी वाटली, तर टारझनरावांना असे वाटणे अनैसर्गिक अथवा आश्चर्यकारक नसावे असे मला वाटते. मुलांच्या कलागुणांचा अथवा त्यांच्या कौशल्याचा इथे काहीच संबंध नाही. हा मुद्दा केवळ मानवी स्वभावाशी संबंधित आहे.

टारझन's picture

1 Feb 2009 - 12:10 pm | टारझन

आरा बाबो .. आरे भटा .. इकडं लक्ष खेचल्याबद्दल लै धण्यवाद रे बाबा ..
ओ मुक्तसुणित राव ... आहो भलतेच काय हो समज करून घेतलेत ? आहो खरंच हो तसं काही णाहीये ..
काही काही चेहरे पाहिले की उगाच फट्टी द्यावीशी वाट्टे .. आणि परममित्र भटू म्हणतो तसं पुलंच्या एका कथेत त्यांणी देखिल तसा उल्लेख केलाय .. ती छोटीशी गाणारी मुलं कौतुकास पात्र असतील णो डाऊट .. पण जे वाटलं ते पटकन प्रांजळ पणे सांगुन बसलो .. बाकी काही कारण वगैरे णाही .. भटा आरे भावणा को समजल्याबद्दल लै आभार ..
आणि मुक्तसुणित राव .. तुम्हीच आमच्याबद्दल असे समज करून घेतल्यावर कसं हो होणार आमचं ?
घाबरू णका , आमच्यास सायलेंट व्हॉयलंस आहे.. तो असा पोरासोरांवर स्वप्णातही णिघणार णाही .
परवाच्च आई बरोबर भाजी मंडई मधे गेलेलो, तिथे एक लै लुकडा सुकडा (सुशिक्षित दिसणारा) तरूण एका बाईचं गंठण(का मंगळसुत्र का गळ्यातला अलंकार जे असेल ते) चोरताना पकडला गेला .. अक्षरशः २ मिनीटार पब्लिकने त्याला इतका सुजवला की काय सांगू .. डोळा आता पडतो की काय ? असं वाटत होतं .. छोटी पोरं पण हात साफ करून गेली. ते सगळं कळायच्या आत होऊन पण गेलं .. पब्लिकने मार कमी की काय म्हणून .. त्याचे कपडे पण काढून घेतले .. अंडरवेयर वर ठेवला .. त्यावेळेस ते कपडे मीच त्याला परत करून दिले , त्याला कडेला बसवून पाणी पण पाजलं .. आई ने नंतर ओढून नेलं म्हणून .. णाही तर हॉस्पिटलात पोचवण्याचा देखिल विचार होता. ..

कृपया टारझण विषयी कोणतेही गैरसमज असु णयेत , आपला लोभ कायम असून द्या.

अवांतर : ऑनेस्टली मला ते सिंगिंग रिऍलिटी शो आज्जिबात आवडत णाहीत .. तिथे निसताच्च ड्रामा असतो असं माझं वैयक्तिक मत आहे .. अवधुत गुप्ते आणि वैशाली सामंत हे इतकं कौतुक करतात इतकं कौतुक करतात की बाबा रे ... ही पोरं एवढी परफेक्ट आहेत तर तुम्हाला त्यांचं जजमेंट करण्याचा अधिकार आहे काय ?
ते इंडियण ऑइल*, सारेगमा ,व्हॉईस ऑफ इंडिया असले ही महा फडतूस कार्यक्रम आहेतंच. .. ते इंडियण ऑईल वाले कुठे भेटले णा .. .. असो

त्यापेक्षा बुगी-वुगी(सोनी), लिटिल चॅंप्स(कलर्स), लाफ्टर चॅलेंज -१ (फक्त १) , फियर फॅक्टर , ३० सेकंड्स टू फेम असले प्रोग्राम्स लाख पटीने बरे आहेत.

- (नेहमी गैरसमजला गेलेला) टारझन

कोलबेर's picture

1 Feb 2009 - 10:53 pm | कोलबेर

उगाच पुढे पुढे करणार्‍या कार्ट्यांना कोणाला कानाखाली वाजवावीशी वाटली, तर टारझनरावांना असे वाटणे अनैसर्गिक अथवा आश्चर्यकारक नसावे असे मला वाटते.

उगाच पुढे पुढे करणे म्हणजे काय हो भटोबा?

ही मुले कसलीही प्रतिभा नसताना उगाच पुढं पुढं करत आहेत असं तुम्हाला खरंच वाटत का?

घाटावरचे भट's picture

2 Feb 2009 - 4:04 am | घाटावरचे भट

इथे हे फारच अवांतर होत चाललंय. पुढील चर्चेसाठी तुम्हाला खरड टाकली आहे.

कोलबेर's picture

1 Feb 2009 - 10:48 pm | कोलबेर

मुक्तसुनित ह्यांच्याशी सहमत आहे. मलाही सखेद आश्चर्य वाटले.

भटोबा,

ही पाचही मुले अतीशय प्रतिभावान आहेत आणि हे आता संपुर्ण महाराष्ट्राने मान्य केलेले आहे.

पुलंच्या लिखाणात आलेला संदर्भ हा तद्दन आगाऊ आईबापाने लाडावलेल्या कार्ट्यांविषयी आहे. आणि त्यामुळे तो तिथे खटकत नाही.

पण इथे ह्या अतीशय प्रतिभावान लहान मुलांविषयी उगीचच कानाखाली मारण्याची इच्छा होणे हे काही रुचण्यासारखे नाही.

कशिद's picture

1 Feb 2009 - 11:14 am | कशिद

कार्तिकी सगळ्यात छान अणि प्रफोमांस ने गाते ...प्रथमेश पण चा काय बोलू सुंदर गाठो हा मुलगा

स्वानन्द's picture

1 Feb 2009 - 12:12 pm | स्वानन्द

>>मला आर्या आवडते. तिचे उच्चार क्लिन आहेत. प्रथमेश ची गाणी डाउन्लोड करुन ऐका. त्याच्या 'स' च्या उच्चारात प्रॉब्लेम आहे. स्पष्ट नाही तो 'स'!

मी प्रथमेश ची गाणी डाऊन्लोड करून ऐकली आहे. मला तरी त्याचा 'स' स्वच्छ आणि स्पष्ट वाटला.

--मुग्धानन्द

अविनाशकुलकर्णी's picture

1 Feb 2009 - 10:14 pm | अविनाशकुलकर्णी

आरया अफलातुन पण नाकात गाते..पण आवाज खुप चढतो तिचा..प्रथमेश तर छानच गातो..पण लातुरकर.राउत बाजि मारणार....

रेवती's picture

1 Feb 2009 - 11:52 pm | रेवती

रोहीत राऊत व कार्तिकी हे छान गातात. मुलांना बरेच दिवसात साधं जीवन जगायला बहुधा मिळालं नसावं, त्यातून इतकी प्रसिद्धी....
सगळीकडून वा! वा! झाल्यावर कधीकधी रोहीत व कार्तिकी जरा ज्यास्त बोलून जातात किंवा त्यांची एक्सप्रेशन्स नको ती असतात ,
त्यांच्या पालकांनी येथे लक्ष घालून ह्या सवयी कमी करायला हव्यात.
ते करतीलही. आत्ता सगळे जण जरा भांबावल्यासारखे झाले असतील इतक्या प्रसिद्धीमुळे.
त्यांच्यात गुणवत्ता आहे यात शंका नाही. लहान वयात ते सगळेजण कष्टही करत आहेत.
(दुसरोंके साथ बातां : आमच्याकडे बसल्या बैठकीला होमवर्क पुर्ण झलं तरी आम्हाला आनंद होतो.)

रेवती