रमेश पाटील* ( नाव बदललेले आहे) हा एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा तो मनसोक्त उपभोग घेते. त्यात त्याच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका सुरेश * बरोबर त्याचे धागे जुळले. त्यांचे लग्न करायचे ठरावे व कोर्टात पण हजर झाले पण सेकशन 377 रद्दबातल झाले आणि रमेश ची विचारधारा बदलली . त्याला चांगला पगार असणारी मुलगी हवी होती. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. .
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रमेश ने सुरेश ला तिला सांगितले. अर्थात लग्न तहकूब झाले .
रमेश माझ्या सेक्सओलॉजिस्ट मित्राकडे गेला तिथे तिने रीतसर हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्या.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि चेहऱ्याकडे वळून पहिले तर "रमेश " . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रमेश ने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
रमेशच्या (घरजावई ) दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
प्रतिक्रिया
21 Aug 2016 - 1:47 am | तर्राट जोकर
अर्रे काय फाल्तुपणा चाललाय?
21 Aug 2016 - 11:08 am | दा विन्ची
साथीचा रोग आलाय मिसळपाव वर.
21 Aug 2016 - 11:27 am | माम्लेदारचा पन्खा
श्रुंगेरियाचा विषाणू पसरलाय तोही एका डॉक्टरसाहेबांमुळे....
धन्य हो प्रभू !
20 Sep 2016 - 5:26 pm | वाल्मिक
सहमत
20 Sep 2016 - 5:31 pm | अमु१२३
sodun दया हा धागा आता .. जुना झाला ...
21 Aug 2016 - 2:47 pm | वाल्मिक
शतकी धागा होऊ द्या