अशा श्रृंगापत्तीत तो आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
21 Aug 2016 - 9:52 am
गाभा: 

सुबोध खरेंचा "श्रृंगापत्ती" हा लेख वाचल्यावर मला एक प्रश्न पडला की,स्त्रीबरोबर शारिरीक संबध झाल्यावर पुरूष आपलं काम करून नामानिराळा व्हावा असं निसर्गाने उद्देशपूर्वक केलं आहे का?
निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

प्रतिक्रिया

वाल्मिक's picture

21 Aug 2016 - 12:44 pm | वाल्मिक

उलटे पण होत
काही वेळा मुली मुलांना पटवायचा प्रयत्न करतात ,नकार दिला कि बदनामी करतात

गामा पैलवान's picture

21 Aug 2016 - 2:09 pm | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर साधारणत: हो आहे. हो अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा. बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं. मात्र तो पूर्णपणे नामानिराळा राहू नये म्हणून लग्नसंस्था अस्तित्वात आली आहे.

आ.न.,
-गा.पै.

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Aug 2016 - 8:15 am | श्रीकृष्ण सामंत

गामा पैलवानजी,
आपण म्हणता,
"हो, अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा.बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं."
पण माझा प्रश्न आहे की,
"का वेगळा व्ह्यायला हवा?"
स्त्रीला निसर्गाने त्या उपक्रमात शेवट पर्यंत जखडून ठेवलं आहे.पुरषाला मात्र त्या उपक्रमात पश्चात कसलीच जबाबदारी निसर्गाने दिलेली नाही.निसर्ग, लग्नसंस्था ओळखत नाही.तो पुरूषाला "नर" च समजतो.असं का? त्याला "काम झाल्यावर वेगळं व्हायला" निसर्गाचा उद्देश वेगळाच असावा असं मला वाटतं.
तो उद्देश काय बरं असावा?

नगरीनिरंजन's picture

22 Aug 2016 - 8:19 am | नगरीनिरंजन

तुम्हाला खरंच वाटतं कोणत्यातरी उद्देशाने सृष्टी व माणसांना बनवलं गेलंय?

हे म्हणजे शब्दांचा किस काढणं झालं.

उद्देश नका म्हणू, कार्यकारण भाव म्हणा...असं काय आहे ज्याने ही व्यवस्था चालू राहू शकली एवढंच त्यांना म्हणायचं असावं.

श्रीकृष्ण सामंत's picture

23 Aug 2016 - 7:55 am | श्रीकृष्ण सामंत

मला उद्देश हा शब्द--प्रयोजन, हेतू,कारण, इरादा, उद्दिष्ट
म्हणजेच,
एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार असं म्हणायचं होतं.
ह्यातला तुम्हाला आपल्याला योग्य तो शब्दार्थ कृपया समजावा.

संदीप डांगे's picture

22 Aug 2016 - 11:27 am | संदीप डांगे

प्रजोत्पादनच्या शक्यता वाढवणे इतकाच उद्देश आहे, एका स्त्रीपासून एकवेळ एकच मूल मिळते, अशाने प्रजातीच्या टिकून राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. काही प्रजातींमध्ये लाखो अंडी घातली जातात, काहींमध्ये वर्षाला एखादे अपत्य होते, अशावेळेस नराच्या कार्यपद्धतीकडे जीवनशैलीकडे बघितले तर उद्देश लक्षात येईल,

तर मनुष्प्रजातीत एकाच नराने अनेक स्त्रियांशी समागम करणे नैसर्गिक आहे, व स्त्रीने अनेकांशी संबंध ठेवणे हेदेखील, पण हजारो वर्षात हे सर्व बदलले आहे, ते का व कसे याबद्दल मागे प्रतिसाद दिला होता, आता मोबाईलवरून एवढे टंकू शकत नाही, नंतर लिहितो,

श्रीकृष्ण सामंत's picture

23 Aug 2016 - 8:03 am | श्रीकृष्ण सामंत

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
मलाही ह्या दृष्टीने म्हणायचं आहे

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 11:57 am | सुबोध खरे

मातृत्व खात्रीचे असते
पितृत्वाची खात्री देता येत नाही.
मानवी स्त्री हि महिन्याला साधारण एकच बीजांड निर्मिती करते. ( इतर प्राण्यांमध्ये ६-७ बीजांडे निर्माण होतात म्हणून मानवी मादीला एका वेळेस १ अपत्य होते आणि कुत्रे मांजर इ प्राण्यात ५-६ पिल्ले होतात).
वय वर्षे १५ ते ४५ या पुनरुत्पादनाच्या काळ गृहीत धरला तर ३० वर्षे X १२ महिने म्हणजे ३६० बीजांडे तयार होतात. यात पाच अपत्ये धरली तर पाच वर्षे कमी होतात म्हणजे एक स्त्रीच्या पुनरुत्पादनाच्या आयुष्यात ३०० बीजांडे तयार होतात त्यापैकी ५ अपत्ये जन्माला येतात.
म्हणजे दर ६० बीजांडांपैकी एक बीजांडातून पुनरुत्पत्ती होते. या बीजांड निर्मितीच्या काळात(OVULATION) बीजांड फुकट जाऊ नये म्हणून स्त्रीची कामवासना अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते आणि या काळात स्त्री तिच्या नैसर्गिक उर्मीच्या पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे (लग्नाआधी) गरोदर होण्याची शक्यता असूनही स्त्रिया फशी पडतात. (भाद्रपदात कुत्र्यांच्या माद्या कामोत्सुक होतात तसेच). या मुळे स्त्रीची( मादीची) कामवासना एका विशिष्ट काळात नरापेक्षा कितीतरी जास्त असते पण इतर वेळेस ती बरीच कमी असते.
पुरुषाच्या वीर्यामध्ये एका मिली मध्ये ४ कोटी शुक्राणू असतात. आणि एका वेळेस अडीच मिली वीर्य तयार होते गृहीत धरले तर एक उत्सर्जनात १० कोटी शुक्राणू तयार होतात. स्त्रीला महिन्यात एकदाच बीजांड निर्मिती होते. त्यावेळी समागम झाला तरच अपत्य संभव असतो. अन्यथा नाही
महिन्यात २५ वेळा जरी पुरुषाने वीर्य उत्सर्जन केले (२५० कोटी शुक्राणू) तरी अपत्य निर्मितीची कोणतीही खात्री नसते.
शुक्राणूंच्या अपव्ययाची(वेस्टेज) सीमाच नाही
असे असल्याने नराची नैसर्गिक उर्मी(INSTINCT) म्हणजे शक्य असेल तितक्या माद्यांशी समागम करायचा आणि शक्य असेल तितक्या वेळेस म्हणजे काही अपत्ये तरी जन्मास येतील आणि आपले वंश सातत्य राहील.यास्तव पुरुषाची कामवासना हि स्त्री पेक्षा सरासरीने जास्त असते
या कारणामुळे पुरुष हा फार उशिरापर्यंत "म्हातारा( प्रजननास अक्षम)" होत नाही.
पण मानवी बालकाचे लहानपण १८ वर्षे हे प्राणी जमातीत सर्वात लांब असते. एवढा काळ एखादी स्त्री मुलाची वाढ करत राहणे हि स्त्रीवर असलेली फार मोठी जबाबदारी आहे आणि हि पार पाडण्यासाठी तिला पुरुषाची मदत मिळाली तर बालकाच्या वाढीसाठी ते उत्तम असते.
यामुळे निसर्गाने मानवी स्त्रीला अमर्याद संभोग क्षमता दिली आहे( केवळ पुनरुत्पा दनाच्या काळात नव्हे)
म्हणून असे म्हटले जाते
पुरुष संभोगासाठी प्रेम करतो आणि
स्त्री प्रेमासाठी संभोग करते.
यामुळेच पुरुष कोणत्याही स्त्रीशी( वेश्या, मोलकरीण यात आर्थिक किंवा सामाजिक पातळीचा अंतर्भाव आहे कोणत्याही स्त्रीला कमी लेखण्याचा हेतू नाही) संभोग करू शकतो कारण त्यात प्रेम नसते
परंतु स्त्री हि लुंग्या सुंग्या बरोबर सहजासहजी संभोग करणार नाही.
क्रमशः

श्रीकृष्ण सामंत's picture

23 Aug 2016 - 8:09 am | श्रीकृष्ण सामंत

ह्या विषयावरचं आपलं निरीक्षण,परिक्षण,अभ्यास मानलं पाहिजे बुबा!

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 10:21 am | सुबोध खरे

मातृत्व खात्रीचे असते पुढे --
प्राण्यांमध्ये सुद्धा नर कोणत्याही (आणि कितीही) मादीबरोबर संग करतो. पण मादी मात्र सर्वात सशक्त नराबरोबर संबंध ठेवते कारण तिला आपल्या प्रजनन क्षमतेची खात्री असते आणि सर्वात सशक्त नराची गुणसूत्रे आपल्या भावी पिढीत यावी अशी तिची इच्छा असते.
म्हणूनच प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनाच्या काळात नरांमध्ये "प्राणघातक" लढाया होतात. आपले वंश सातत्य टिकवण्याची "उर्मी" (instinct) इतकी प्रबळ असते कि नर मृत्यू ची पण भीती बाळगत नाही.
आफ्रिकेतील ओकाव्हॅन्गो भूशिरातील एका सिंहांच्या टोळीने रानडुक्करांच्या शिकारीत निपुणता मिळवली होती त्यामुळे तेथे जन्मास येणाऱ्या प्रत्येक रानडुकरांच्या नराची एकच उर्मी असे. वयात आले कि जमेल तितक्या माद्यांशी संग करायचा आणि जमेल तितकी जास्त पिल्ले जन्माला घालायची कारण पुढच्या मोसमापर्यंत त्यांना स्वतःला जिवंत राहण्याची खात्री नसे मग पिल्लांच्या संगोपनात भाग घेणे तर अशक्यच.
मानवी मनाची ठेवण पण अशीच आहे. जुन्या काळात सशक्त पुरुष जमेल तितक्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगत असे. या काळात स्त्रीचा दुसर्या पुरुषाशी संबंध येणार नाही याची काळजी घेत म्हणजे होणारी संतती हि आपलीच असेल आणि आपले वंश सातत्य कायम राहील. एकदा एक स्त्री गरोदर राहिली कि तो दुसऱ्या स्त्रीशी संग करायच्या प्रयत्नात असे. याचे कारण बाल मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते कि बरीच मुले झाली तर त्यातील काही मुले जिवंत राहून वंश सातत्य टिकून राहील. आजही आदिम जमातीत उदा. नागा, कुकी इ मध्ये टोळी प्रमुखाला १०-२० बायका असतात आणि डझनांनी मुले असतात. एक टोकाचे चीन मधील उदाहरण. http://www.dailymail.co.uk/news/article-2051433/Ziona-Chan-39-wives-94-c...
अर्थात विसाव्या शतकात हीच आदिम मनोवृत्ती टिकून होती पण बाल मृत्यू आणि अपमृत्युचे प्रमाण खूप कमी झाले (म्हणून लोकसंख्येचा स्फोट झाला) यास्तव एक पत्नी व्रत यासारखे कायदे आले.
एक पत्नी कायदा हा पुरुषांच्या नैसर्गिक "उर्मी"च्या विरुद्ध आहे परंतु स्त्रीच्या आणि बालकाच्या संगोपनाच्या दृष्टीने आणि एकंदर समाजाच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त आहे.

ब़जरबट्टू's picture

23 Aug 2016 - 12:00 pm | ब़जरबट्टू

प्रतिसाद आवडला.

चौकटराजा's picture

22 Aug 2016 - 12:07 pm | चौकटराजा

लहान मूल व निसर्ग हे अबोध पणे काम करीत असतात. त्यांच्या लीलेत उद्देश असा काही नसतो. आपण बोधपणे व भ्रमिष्ट पणे त्यातून अर्थ काढीत असतो. निसर्ग जर खरेच कोणाला भेटला तर तो विचारेल" काय हो मानुष साहेब , जड चैतन्य
सुकृत विकृत स्त्री पुरूष हे काय गौडबंगाल आहे मला जरा समजावून सांगाल काय ?"

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 1:48 pm | महासंग्राम

माई मोड ऑन

"अरे बाळकृष्णा, आमचे हे म्हणायचे निसर्गाचा अपमान करू नै, निसर्गाने उद्देशपूर्वक केलं असतं."

माई मोड ऑफ

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 1:56 pm | अभ्या..

बाळकृष्णा कोण माई?

नाखु's picture

22 Aug 2016 - 2:15 pm | नाखु

अभ्या ते वरच्या कृष्णाला(धाग्याचे जनक) म्हणत असतेत , ज्याचा बाळ सध्या बाळाचा बाप आहे.

खुलाश्या नाखु

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 2:28 pm | महासंग्राम

मामोऑ

"अरे तो वरचा तिनोळी धागा काढणारा रे, कार्ट्या... किती रे समजून सांगावयाचे तुला. तरी आमचे हे तुला सांगत होते शाळेत जात जा. पण तू असला लब्बाड कसला ऐकतोस त्यांच"

मामोऑ

अभ्या भौ कृहघेणे

कंजूस's picture

22 Aug 2016 - 3:40 pm | कंजूस

ही हंडी विनोदी आहे ना रे कालियाफोरनियाच्या किसना?

आजानुकर्ण's picture

23 Aug 2016 - 8:02 am | आजानुकर्ण

निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील?

मला वाटतं पुढेमागे एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी मनुष्याच्या निर्मितीचा उद्देश असावा. अन्यथा शेपूट नसलेल्या दोन पायाच्या प्राण्याच्या अस्तित्वाचे दुसरे काही कारण असावे असे वाटत नाही.

आजानुकर्ण (उगाडूगू, बुर्केना फासो)

मंदार कात्रे's picture

23 Aug 2016 - 11:08 am | मंदार कात्रे

अतिशय समतोल आणि वास्तवदर्‍षी प्रतिसाद

अनेक आभार