गाभा:
धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना ज्यांना मान्य आहे ,हे ज्यांच स्वप्नं आहे अशा लोकांनी धर्मनिरपेक्ष भारत आणि तिरंगा याबद्दल भूमिका स्पष्ट करण आवश्यक आहे..काय आहे की १५ आँगस्ट आणि २६ जानेवारीला यांच राष्ट्र प्रेम उफाळून वर येत ..एरवी मनावर धर्माच राज्य असत...दुपट्टी भूमिका ह्याला म्हणतात.ती बहूतांश लोकांच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे.
प्रतिक्रिया
15 Aug 2016 - 2:49 am | गामा पैलवान
फुंटी,
नाही स्पष्ट करत जा.
काठीला घोंगडं लावू द्या की रं,
मला बी पेडगावास घेऊन जा की !
तुम्ही पेडगावास चाललात मग आम्ही का नको?
आ.न.,
-गा.पै.
15 Aug 2016 - 7:46 am | कैलासवासी सोन्याबापु
फुंटी ह्यांच्याशी सहमत!
काय ते स्पष्ट झालेच पाहिजे भो
15 Aug 2016 - 8:05 am | लालगरूड
माझं असं मत आहे की सरकार माणसाला जात विचारतेच कशाला.फक्त धर्म भारतीय म्हणून दिले पाहिजे दाखल्यावर
15 Aug 2016 - 9:38 am | अमितदादा
सर्वांना स्वातंत्रदिवासाच्या शुभेच्या. माझं अस मत हे कि ज्याप्रमाणे भगवा हा तिरंग्याचा भाग आहे त्याचप्रमाणे हिंदुत्व हे भारतीयत्वाचं एक अंग आहे. भारतीयत्वापुढे हिंदुत्व हि संकल्पना तोकडी आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे शासकीय सेवेत, ध्येय धोरणात धर्माला नसलेलं स्थान असा मी घेतो, मात्र आज कोणत्याही शासकीय कार्यालयात शाळा महाविद्यालयात देव देवतांचे फोटो दिसतात, सण साजरे होतात, इतर धर्मांची सुद्धा किती तरी उदाहरणे देता येतील ज्यामध्ये धर्म शासकीय धोरणे प्रभावित करतो. ह्या गोष्टी हे अधोरेखित करतात की भारत हा पुस्तकी धर्मनिरपेक्ष आणि खरा हिंदू डोमिनेटेड राष्ट्र आहे. मात्र हिंदू धर्माच्या (rss च्या नव्हे) असलेल्या सहनशीलतेमुळे आतापर्यंत भारतीयत्व ह्या संकल्पनेला धक्का लागला नाही. भरतीयत्वाचं उगम मात्र हिंदुत्व ह्याच संकल्पनेतून झाला असावा असा माझं मत आहे.बाकी माझी हिंदुत्वची संकल्पना हि हिंदुत्ववादी संघातानापेक्षा वेगळी आहे हे नक्की.
15 Aug 2016 - 11:46 am | संदीप डांगे
थोडं झैरातीचे पाप माथी घेतो, पण अवश्य वाचा,
याचं मराठी अनुवाद लौकरच टाकणार आहे मिपावर...
http://sandeepdange.blogspot.in/2014/04/blog-post.html?m=1
15 Aug 2016 - 12:40 pm | अमितदादा
लेख वाचला आवडला, याच लेखाचं विस्तारित आणि सर्व बाजू मांडणारे रूप मिपा वर घेऊन या हि विनंती.
बाकी आमचं हिंदुत्व कस आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय. आमच्या गावातील बहुतांश जातीचे लोक हे वारकरी, पूर्ण वर्ष शेतात कष्ट करणे आणि पावसाळ्यात वारीला जाणे हा त्यांचा कार्यक्रम. आयोध्यात राम मंदिर बांधले कि नाही, गाई देव कि पशुधन, आसाराम बापू दोषी कि निर्दोषी, घर वापसी हवी कि नको, देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हिंदू भारतात खतारे मे आहेत की नाही, धर्मगुरू हवेत कि नको, हे असले टिपिकल हिंदुत्व वाद्यांना पडणारे प्रश्न त्याना पडत नाहीत किंबहुना त्याची त्यांना गरज हि वाटत नाहीत. बाकी वारकरी संप्रदायात सगळे अलबेल आहे असे नाही काही सामाजिक प्रश्न सोडवायचे बाकी आहेत पण सुधारणेची त्यांची तयारी आहे, धार्मिक प्रश्नाबाबत ते बहुतांश समाधानी दिसतात.
15 Aug 2016 - 11:11 pm | अर्धवटराव
अरे आजचा दिवस तरी थोडा बरा विचार करायचा...