हिमालय, रॉली आणि मी ....

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
11 Aug 2016 - 1:42 pm

फार पूर्वी ठरवलं होतं की बाकी कुठेही कितीही उंडारलो तरी हिमालयात मात्र पन्नाशी ओलांड्यावरच जायचं. हिमालय म्हणजे विरक्ती आल्यावर जायचे ठिकाण अशी माझी काहीशी समजूत होती. पण एक दिवस हा पूर्वग्रह बाजूला सारून ६ वर्षांपूर्वी एकटाच कुमाऊं ला गेलो आणि माझ्या डोक्यातली जळमटं धूवून निघाली. त्यानंतर दरवर्षी मला हिमालय बोलावत राहिला आणि मी पण न चुकता जात राहिलो. इतका.. की त्यानंतर माझी आजवर दक्षिणेत एकही मोहीम झाली नाही. सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जी मैत्री टिकते ती कायम राहते असे कुठेशी ऐकले होते. आमची मैत्रीही त्याच वाटेवर आहे.

जास्त सहवास झाला की व्यक्तीचे विविध पैलू समजू लागतात तसेच हिमालयाबद्दलही झाले. मला वरवर वाटला तसा काही तो फक्त विरक्त भाव घेऊन पद्मासन घालून बसलेला नाही. त्याचा मूड सतत बदलत असतो आणि तो सांभाळून घेतला तर मग मात्र त्याच्यासारखा मित्र नाही. वयाने बराच मोठा असल्यामुळे नमतं घेण्यात कधी कमीपणा वाटून घेऊ नये. त्याला त्याचा मान दिला की मग मात्र मैफल मस्त जमून येते. या माझ्या मित्राला मी आता ओळखायला लागलो आणि त्याच्याशी थोडा बिनधास्त वागू म्हणालो तेव्हा एकदा मला चांगलाच धडा मिळाला आणि मी जमिनीवर आलो. पण तेवढाच. कारण त्यानेही माझा हात पिरगाळून मला फक्त जाणीव करून दिली आणि मग मात्र एखाद्या मोठ्या भावासारखे सांभाळून घेतले.

दिल्ली हून लेह ला जाणारे विमान भल्या पहाटे निघाले की बहुतेक प्रवासी पेंगलेले असतात. पण मी मात्र खिडकीची जागा पकडून खाली मित्राची वाट बघत असतो. थोड्याच वेळात हिमालय ढगांची गोधडी पांघरून अस्ताव्यस्त पसरलेला दिसायला लागतो. त्याचीही झोप इतक्या सकाळी कदाचित पूर्ण झालेली नसते. गोधडीतून एखादा हात पाय बाहेर यावा तशी त्याची काही शिखरं बाहेर डोकावत असतात. यावेळी त्याचे पोर्ट्रेट काढायला कुठलाही कॅमेरा आणि लेन्स असमर्थ असतो. हळूहळू विमान पुढे सरकत असते आणि हिमालय आणि त्याच्या कुशीतली छोटी छोटी गावं जांभया देत जागी होत असतात.

28818966891_6207baca31_z.jpg

28287528634_a7eb6e6e7d_z.jpg

डिसेंबर महिन्यात पर्यटकांची फारशी लुडबूड नसल्यामुळे मी नेहमी त्याच वेळी माझ्या या मित्राला भेटायला गेलो आहे. पण गेल्या वर्षी पोटा-पाण्याच्या खटाटोपात ही भेट काही झाली नाही. आता परत डिसेंबरपर्यंत वाट बघणे काही माझ्याच्याने शक्य होणार नव्हते म्हणून न राहवून जूनमध्येच एक दिवस मी निघालो.

यावेळी लेहमध्ये मला एक मस्त गोरीगोमटी मैत्रीण मिळाली . फक्त वरलिया रंगाला भुलल्यामुळे मला ती आवडली नव्हती तर थोड्याच संवादानंतर एखाद्याशी आपली वेव्हलेंग्थ जुळावी तसे आमचे सूत जुळले. ही मैत्रीण म्हणजे पांढरीशुभ्र रॉयल एनफिल्ड. हिचा स्वभाव मात्र मला पूर्णपणे ठाऊक नव्हता. त्यामुळे मी तिला दोन दिवस लेह जवळच फिरायला घेऊन गेलो आणि तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या. (भलत्यावेळी ब्रेकअप ची रिस्क मला परवडणार नव्हती आणि माझा मित्र पण या भानगडीत पडणार नाही हे मी जाणून होतो).

दोन वेगळ्या जातकुळी असलेल्या त्सेमो नामगयाल आणि माथो मोनॅस्टरी. लेह च्या वातावरणाशी आणि रॉलीशी जुळवून घेण्यासाठी उत्तम.

28894102695_1ff34e70e5_z.jpg

28789675152_9d18a7f9da_z.jpg

हिमालयाचा एकंदर मूड पाहून मला सर्व आखणी करायची होती. लेह ते तुर्तुक हा प्रवास काही थोडा थोडका नाही. बऱ्याच ठिकाणी तर मी, हिमालय आणि माझी रॉली (रॉयल एनफिल्ड ला मी प्रेमाने रॉली म्हणायला लागलो) यांच्याशिवाय कोणीच असणार नाही. तेव्हा भरपूर भूकलाडू आणि तहानलाडू मी रॉली च्या सॅडलबॅग मध्ये भरले. लेह - खारडुंग ला - नुब्रा- तुर्तुक असा माझा मार्ग उत्तुंग हिमशिखरं, नद्या , वाळवंट, अनेक रंगीबेरंगी छटा असलेले डोंगर यामधून बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ने बांधलेल्या अफलातून, घाटदार रस्त्यांवरून जाणार होता.

सकाळी सकाळी हॉटेलातून हिमालयाकडे बघितले तर त्याचा मूड काही चांगला वाटला नाही. काल संध्याकाळी बिअर पिता पिता गप्पा मारल्या तेव्हा तर एकदम मस्त होता. एकदम काय बरे झाले. पण हे असेच आहे. त्याचे मूड स्विन्ग्स भल्या भल्याना पण अजून कळले नाहीत. मी मात्र आपला जुना मित्र आहे, वेळेवर घेऊ बघून म्हणून रॉली च्या पाठीवर थाप मारली आणि सकाळची थंड, स्वच्छ हवा फुफ्फुसात भरत खारडुंग-ला च्या दिशेने कूच केले. हा प्रवास मात्र मला एक मोठा धडा शिकवणार आहे हे तेव्हा तरी माझ्या ध्यानी-मनी नव्हते.

मी जसा जसा हिमालयाच्या खांद्यावर चढायला लागलो तसा तसा त्याचाही पारा आणखी वर चढला (मूड चा , तापमानाचा नव्हे) आणि अचानक हिमवर्षाव सुरु झाला. रॉली हेलकावे खायला लागली आणि नंतर बर्फात रुसून बसली. आसपासचा सर्व आसमंत पांढराशुभ्र झाला आणि पंधरा-वीस फुटांपलीकडलेही दिसेनासे झाले.

पण कुठूनसे लष्करातले दोघेजण देवासारखे आले आणि त्यांच्या बंकर मध्ये काही काळ त्यांनी मला आसरा दिला.

काही तासांनी मी परत हिमालयाशी संवाद साधायचा प्रयत्न केला पण आज त्याचे भयंकर काहीतरी बिनसले होते आणि पलीकडच्या खारडुंग गावापर्यंत (साधारण सायंकाळचे सहा वाजेपर्यंत) हिमालयाने मला कधी बर्फ, कधी गारा, कधी पाऊस तर कधी सोसाट्याचा वारा असे सतत बडवून काढले. हात, नाक, ओठ आणि दोनही मांड्या यातल्या जाणिवा संपल्या होत्या आणि अशातच आशेचा किरण म्हणून एक बरा निवारा गवसला. गरम गरम "थेंथुक" (तिबेटी सूप आणि नूडल्स) खाऊन गरम दुलईमध्ये बसल्यावर मी स्वतःला आणि रॉलीला उगाच नसत्या संकटात टाकल्याबद्दल मनोमन सॉरी म्हणून टाकले.

28830870151_0197b39cdc_z.jpg

दुसऱ्या दिवशी मात्र आम्हा तिघांचाही मूड चांगला झाला आणि यापुढच्या प्रवासात आमची मैफल झकास जमून आली. प्रवासात ऐकायला मोबाईलवर मस्त गाणी होती पण तो बेत मी रद्द केला. हिमालय आणि रॉली चा रिदम असा काही जमला की त्यापुढे बाकी कुठलेही संगीत फिके वाटावे. माझा पुढचा संपूर्ण प्रवास हिमालय आणि रॉलीने अनुभवसंपन्न बनवला.

नुब्रा व्हॅली आणि शॅयोक नदी ....

नुब्रा व्हॅली .... सॅल्यूट टू बी.आर.ओ !!!

हुंडर येथील थंड वाळवंट

तुर्तुक चा रस्ता .... एकीकडे शॅयोक नदी सतत सोबत करते.

रस्ता दिसतोय ???

तुर्तुक, बाल्टिस्तान. इथून पाकव्याप्त बाल्टिस्तानातील हिमशिखरं दिसतात.
28894146335_fe90c44158_z.jpg

माझी लाडकी रॉली....

आणि मी.........

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

11 Aug 2016 - 1:49 pm | महासंग्राम

फोटो जबरा आलेत ....

पाटीलभाऊ's picture

11 Aug 2016 - 1:52 pm | पाटीलभाऊ

वर्णन सुंदर..पण फोटो दिसत नाहियेत :(

पाटीलभाऊ's picture

11 Aug 2016 - 3:20 pm | पाटीलभाऊ

मोबाईलवरुन बघितले तेव्हा फोटो दिसले.
एकच शब्द..अप्रतिम
शेवटचा फोटो तर झकास..!

किसन शिंदे's picture

11 Aug 2016 - 1:54 pm | किसन शिंदे

किल्लेदार नाव बघूनच मोठ्या अपेक्षेने धागा उघडलाय. आता निवांत फोटो बघतो सगळे.

खेडूत's picture

11 Aug 2016 - 1:57 pm | खेडूत

अतिशय सुंदर!
आता एकदा ब्याग भरून हिमालयात जायलाच हवे! त्यामुळे तिथे जाण्यास उत्सुकांची वाढती प्रतिक्षा यादी तरी कमी होईल..
जमल्यास अन्तरे, खर्च, संपर्क पत्ते, घ्यायची काळजी वगैरे येऊदेत.

सुरेख फोटो! आता निवांत वाचते.

फोटो पाहूनच खपल्या गेले आहे __/\__

फोटो आणि मध्येच तुमची वाचकांशी संवाद साधणारी वाक्य यांचा सुरेख मेळ जमलाय.
लेख अर्थातच नाव बघून उघडला होता त्यामुळे निराशा होण्याचा प्रश्नच नाही.

नि३सोलपुरकर's picture

11 Aug 2016 - 2:30 pm | नि३सोलपुरकर

राजे ...राजे काय फोटो आले आहेत ,एकसे एक .

__/\__.

मोदक's picture

11 Aug 2016 - 3:46 pm | मोदक

__/\__

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 11:43 am | संदीप डांगे

+१००००

महासंग्राम's picture

11 Aug 2016 - 2:49 pm | महासंग्राम

बाकी तुम्ही आमच्या श्रीकांत शिंपींचे दूरचे नातलग दिसता एकटे फिरताय आणि फोटू बी झकास

पद्मावति's picture

11 Aug 2016 - 2:56 pm | पद्मावति

आहा!!! खूप सुंदर वर्णन आणि फोटो पाहून तर mesmerize व्हायला होतंय. रस्त्यांचे फोटो पाहून वाटतंय की फरहान अख्तरच्या लक्ष्य चे टायटल सॉँग इथेच चित्रीकरीत झाले असावे.

प्रमोद देर्देकर's picture

11 Aug 2016 - 3:02 pm | प्रमोद देर्देकर

क्लास फट्टु . शेवटचा तर जबरा. अजुन एक धागा नुसत्या फोटोंचा येवु दे.

कंजूस's picture

11 Aug 2016 - 3:02 pm | कंजूस

भार्री फोटो.

सविता००१'s picture

11 Aug 2016 - 3:09 pm | सविता००१

कसले कातिक फोटो आहेत...
मी कध्धी गेले नाही अजून हिमालयाकडे. पण हे असले फोटो पाहून वाटतंय शिफ्ट व्हावं तिकडेच.
भारी.. भारीच्च
अप्रतिम

शेवटचा फोटो मस्तच.. पुभाप्र...

वा.. काय जबरदस्त फोटो आहेत. दिल हिमालय हिमालय हो गया.

एस's picture

11 Aug 2016 - 4:32 pm | एस

वाह!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2016 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम फोटो ! आणि त्यांना साजेसे प्रवासवर्णन !

पुभाप्र.

जब्बरदस्त टरीप हो किल्लेदार. वन मॅन शो केलाच म्हणायचा की.
रॉली एक लंबर, फोटो तर काय सांगावे म्हाराजा. डोळे निवले निळाईने.

प्रवासात ऐकायला मोबाईलवर मस्त गाणी होती पण तो बेत मी रद्द केला. हिमालय आणि रॉली चा रिदम असा काही जमला की त्यापुढे बाकी कुठलेही संगीत फिके वाटावे.

अगदी बरोबर बोललात..

पहिल्यापासून त्या रिदमची अशी सवय लागली आहे की माझ्या रॉलीवर बसल्यानंतर हेडफोनमध्ये गाणी लावावीच लागत नाहीत..!!

कपिलमुनी's picture

14 Aug 2016 - 3:46 pm | कपिलमुनी

रॉलीवर बसल्यानंतर हेडफोनमध्ये गाणी ऐकू येत नसावीत

किल्लेदार's picture

14 Aug 2016 - 7:59 pm | किल्लेदार

हॅहॅहॅ. तेही खरेच आहे. रॉली च्या बडबडीपुढे बाकी काही ऐकू येणे थोडे अशक्यच आहे :P

संत घोडेकर's picture

11 Aug 2016 - 8:12 pm | संत घोडेकर

अफलातून फोटो आणि वर्णन,
बाकी हिमालयाचे फोटो कितीहीवेळा पाहिले तरी नव्याने पाहिल्यासारखे दिसतात.

Jack_Bauer's picture

11 Aug 2016 - 11:06 pm | Jack_Bauer

फारच सुरेख फोटो आहेत आणि वर्णनही.

खटपट्या's picture

11 Aug 2016 - 11:24 pm | खटपट्या

फोटो आणि वर्णन - ज ब र द स्त ह ...

पहाटवारा's picture

12 Aug 2016 - 3:57 am | पहाटवारा

मस्त फोटोज आणी साजेसे प्रवासवर्णन .. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडले कि बाकी ठिकाणी जाऊन पण तसे समाधान मिळत नाही ! कितेक हिमशिखरे पाहिली असतील हिमालयाच्या व्यतिरिक्त पण तिथे जो एक प्रकारचा अनुभव, समाधान मिळते ते वेगळेच आहे ..
-पहाटवारा

मराठमोळा's picture

12 Aug 2016 - 4:33 am | मराठमोळा

केवळ अप्रतिम. _/\_
फक्त ईकडे फिरायचं म्हणजे बराच वेळ आणी भरपूर पैसा खर्च होतो. :( अर्थात तो नक्कीच वसूल होतो, पण मर्यादा येतात.

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2016 - 4:40 am | पिलीयन रायडर

शप्पथ सांगते पहिल्या फोटो पर्यंत शिस्तीत वाचलं. नंतर काहीही वाचलेलं नाही..

काय फोटो.. काय फोटो!!!!!!!!!!!!!

मंजूताई's picture

12 Aug 2016 - 5:21 am | मंजूताई

पाहूनच जाणलं.. डोळ्याच पारण फिटणार... केवळ अप्रतिम... वर्णनही सुरेख ...

बाबा योगिराज's picture

12 Aug 2016 - 8:28 am | बाबा योगिराज

अल जब्रा, अल खट्रा. एक लंबर फटू हायेत बगा.

लेख आवड्यास वो मालक.

अरिंजय's picture

12 Aug 2016 - 8:32 am | अरिंजय

सुंदर वर्णन, अप्रतिम छायाचित्रे.
हिमालय साद घालतो आहे.

उडन खटोला's picture

12 Aug 2016 - 8:58 am | उडन खटोला

आहहह!
कातिल वर्णन, कातिल फोटो. खूप च सुरेख.

सतिश गावडे's picture

12 Aug 2016 - 9:09 am | सतिश गावडे

वाह... सुंदर !!

नीलमोहर's picture

12 Aug 2016 - 11:04 am | नीलमोहर

अफाट सुंदर आहे सगळंच..

आदूबाळ's picture

12 Aug 2016 - 12:16 pm | आदूबाळ

वाह! हा भाग 1 आहे ना?

किल्लेदार's picture

14 Aug 2016 - 10:22 am | किल्लेदार

असं आत्तातरी वाटतंय :). दुसरा भाग लिहायची स्फूर्ती लवकरच होईल अशी आशा आहे.

मार्गी's picture

12 Aug 2016 - 1:01 pm | मार्गी

अतिशय जबराट!!!

gogglya's picture

12 Aug 2016 - 3:49 pm | gogglya

आपल्या क्यामेरा आणी लेन्सेस बद्दल जास्त महिती मिळेल का ?

किल्लेदार's picture

12 Aug 2016 - 4:46 pm | किल्लेदार

माझ्याकडे जुना कॅनन ४५० आणि कॅनन १००० कॅमेरे आहेत. १८-५५ आणि ५५-२५० च्या लेन्सेस.
दोनही कॅमेरांमधे भरपूर फंगस असल्यामुळे फ्रेम घेताना बऱ्याच मर्यादा येतात.

मोहनराव's picture

12 Aug 2016 - 5:30 pm | मोहनराव

कातील फोटो!!

सुबोध खरे's picture

12 Aug 2016 - 7:35 pm | सुबोध खरे

सुंदर वर्णन, अप्रतिम छायाचित्रे.

सरनौबत's picture

12 Aug 2016 - 7:56 pm | सरनौबत

'लेह'पुरुष किल्लेदार! अप्रतिम लेख आणि सुंदर फोटो!

सुमीत भातखंडे's picture

12 Aug 2016 - 8:05 pm | सुमीत भातखंडे

अशक्य फोटो आहेत!

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 11:59 am | कैलासवासी सोन्याबापु

आहाहाहा काय वर्णन काय फोटोज!!!.

तुषार काळभोर's picture

13 Aug 2016 - 12:18 pm | तुषार काळभोर

हिमालयाची अन् खोर्‍याची भव्यता दिसतेय प्रत्येक फोटोत.

(अन् एकटे फिरल्याबद्दल
d

चतुरंग's picture

14 Aug 2016 - 11:28 am | चतुरंग

खरं सांगू? फोटो जसजसे बघत गेलो तसे मिपावर नसून नॅशनल जिओग्राफिक मासिक बघतो आहोत असेच वाटत होते. तुमचे छायाचित्रण कौशल्य निर्विवाद उच्च दर्जाचे आहे आणि हिमालयाच्या गारुडामुळे ते अधिकच खुलून आले असणार यात शंका नाही. __/\__
पुढ्च्या भागाची वाट बघतोय!

शैलेन्द्र's picture

14 Aug 2016 - 12:05 pm | शैलेन्द्र

भन्नाट, एकचं शब्द

मदनबाण's picture

14 Aug 2016 - 5:44 pm | मदनबाण

केवळ अप्रतिम ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho

दिपस्वराज's picture

15 Aug 2016 - 4:28 pm | दिपस्वराज

मिपा वरील पहीला मुजरा *_/\_*
किल्लेदाराना....

स्वीट टॉकर's picture

15 Aug 2016 - 7:15 pm | स्वीट टॉकर

ग्रुपबरोबर न जाता अशा ठिकाणी मोटरसायकलनी जायला धैर्य तर हवंच, कौशल्य देखील! ब्राव्हो !!

फोटो जबरदस्त आलेत. तुमच्याबरोबर आम्हालाही नेऊन आणलंत.

विखि's picture

15 Aug 2016 - 9:12 pm | विखि

येवढे भारी फोटु येउ शकतात माहीत न्हवत. सगळ्यात पहीला फोटु थ्रीडी असल्यागत वाटतय.

रातराणी's picture

16 Aug 2016 - 10:01 am | रातराणी

क ह र !!

पैसा's picture

3 Sep 2016 - 10:11 am | पैसा

_/\_

Deepak Bhagat's picture

11 Sep 2016 - 9:44 pm | Deepak Bhagat

Photos are very great. which is the best time to visit Leh? Is it possible to visit leh by car? people do fascinate with Bullet may be people expressed it that way.
Great trip. I also want to experience this heven.

फोटोग्राफर243's picture

3 Jan 2017 - 9:55 am | फोटोग्राफर243

अप्रतिम

किल्लेदार's picture

30 Jan 2017 - 7:47 am | किल्लेदार

:)

वेल्लाभट's picture

3 Jan 2017 - 4:43 pm | वेल्लाभट

याड लागलं ना भाई फोटो बघून ! ! ! !काय्च्या काय.
वर्णनही उत्तमच्च्च

किल्लेदार's picture

30 Jan 2017 - 7:40 am | किल्लेदार

:)

किल्लेदार's picture

30 Jan 2017 - 7:40 am | किल्लेदार

:)

खूप दिवसांनी परत बघीतला धागा.. परत तोच भुलवणारा अनुभव! :-)

किल्लेदार's picture

10 Nov 2017 - 5:48 pm | किल्लेदार

नविन लेख लवकरच येइल !!!

गोंधळी's picture

11 Nov 2017 - 10:51 am | गोंधळी

beautiful,fantastic,mind blowing,awesome,amazing......
फोतो बघुन सगळ्या feelings एकाच वेळी आल्या.

किल्लेदार's picture

13 Nov 2017 - 9:38 pm | किल्लेदार

हा हा