लग्न..एक लोक कथा..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 10:48 pm

लग्न..एक लोक कथा..
.......................................
एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले....
व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते..
घरात म्हातारी आजी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार? त्यांतून परमुलुख..त्या मुळे आजी ला तुला प्रवास झेपणार नाही..वय झाले असे सांगून घरी ठेवण्याचे ठरते..
घरात एक किशोर वयीन नात असते तिचे आजी वर खूप प्रेम असते..
तिच्या सारे लक्षात येते..ती आजी ला पोत्यात लपवते .व व-हाडा संगे बरोबर घेते...
व-हाड वेशी पर्यंत येते...मुलीकडचे लोक्स स्वागता साठी /सीमांत पूजन साठी हजर असतात.....
नवरा देवाला मेव्हण्या असतात व त्या खूप नटखट व चतुर असतात....
व त्या मुलाकडच्या व-हाडी मंडळींना म्हणतात..आपले स्वागत आहे पण आमची एक अट आहे..आमच्या गावात बरेच लग्नाचे आड आहेत..तुमच्या गावात पण लग्नाळू विहिरी आहेत..तेव्हा आमच्या गावातल्या आडा शी तुमच्या गावच्या विहिरी बरोबर लग्न लावून द्या ..व गावात सन्मानाने प्रवेश करा..
ही चमत्कारिक अट ऐकून मुला कडची मंडळी भांबावून जातात..काय करावे त्यांना उमजत नाही
मात्र मुली कडची मंडळी त्यांची मजा बघत हसत असतात..
हे पाहताच नात हळूच आजी कडे जाते व तिला सारा प्रकार सांगते..आजी ऐकते व नातेस कान मंत्र देते..
नात समोर येते अन मुली कडच्या मंडळीस सांगते..
आम्हाला तुम ची अट मान्य आहे..मात्र प्रथे प्रमाणे आपल्या गावच्या आडांना आपण आमच्या गावच्या वेशी पर्यंत वाजत गाजत आणा..आम्ही आमच्या गावच्या विहिरी चे लग्न आपल्या गावा च्या आडा बरोबर लावून देऊ...
हे ऐकताच मुली कडची मंडळी हार मानतात..व मनोमन उमजतात मुला कडची मंडळी पण तुल्यबळ आहेत व मुलाचे सन्मानाने आगत स्वागत होते..
मुला कडची मंडळी नाती च्या बुद्धी चे कौतुक करतात.तेव्हा हे सारे आजी न सांगितले असे सांगते..
सारे जण आजी ला नाती ने आणले या बद्दल नाती वर खूश होतात..
चातुर्य..व्यवहार ज्ञान हे अनेक उन्हाळे पावसाळे सोसल्यावर येते...वय व अनुभवा ची ती देणगी असते

जीवनमान

प्रतिक्रिया

एस's picture

8 Aug 2016 - 11:10 pm | एस

वा. कथा आवडली.

नीलमोहर's picture

8 Aug 2016 - 11:17 pm | नीलमोहर

छान आहे कथा

स्रुजा's picture

8 Aug 2016 - 11:53 pm | स्रुजा

किती छान कथा आहे ! आवडली..

सूड's picture

9 Aug 2016 - 12:06 am | सूड

बरी आहे.

खटपट्या's picture

9 Aug 2016 - 12:13 am | खटपट्या

आवल्डी

जयन्त बा शिम्पि's picture

9 Aug 2016 - 5:56 am | जयन्त बा शिम्पि

खुपच छान कथा , अनुभवा सारखा गुरु नाही. जुनं ते सोनं च म्हणावं ! !

रातराणी's picture

9 Aug 2016 - 6:59 am | रातराणी

आजी ऑलवेज रॉक्स!

विप्लव's picture

9 Aug 2016 - 8:45 am | विप्लव

छानच कथा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Aug 2016 - 8:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त कथा.

नाखु's picture

9 Aug 2016 - 9:08 am | नाखु

प्रस्तुत आजी आणि कुठे दिसेनात मोजी !

बुवासाठी श्रावणी चारोळी.

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2016 - 11:34 am | ज्योति अळवणी

आवडली...

जगप्रवासी's picture

9 Aug 2016 - 1:21 pm | जगप्रवासी

हीच कथा लहानपणी बिरबलाची वाचली आहे

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 1:32 pm | मुक्त विहारि

आवडली.

सिरुसेरि's picture

9 Aug 2016 - 4:06 pm | सिरुसेरि

+१ . दादी हो तो ऐसी .

पगला गजोधर's picture

9 Aug 2016 - 4:49 pm | पगला गजोधर

एक शंका ...
या आजीबाईंचं टोपण नाव बिरबल होतं का ?

युफोरिक's picture

9 Aug 2016 - 5:04 pm | युफोरिक

beautiful tale :)