काही चित्रे

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in कलादालन
29 Jan 2009 - 12:18 pm

माझ्या १० वर्षाच्या लेकाने काढलेली ही काही चित्रे. त्याच्या आणखी काही कलाकृती तुम्ही इथे पाहू शकता

कला

प्रतिक्रिया

सहज's picture

29 Jan 2009 - 12:21 pm | सहज

श्रेयस खूप छान चित्रे काढतो.

मनस्वी's picture

29 Jan 2009 - 12:32 pm | मनस्वी

ही चित्रे १० वर्षाच्या मुलाने काढली आहेत असे वाटत नाही.
डिटेलिंग पकडण्याची कला अवगत आहे. उदा. शेवटच्या चित्रातील फांदी.
अभिनंदन.

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

29 Jan 2009 - 12:35 pm | मधु मलुष्टे ज्य...

शाब्बास श्रेयस. मस्त आहेत चित्र ! :)

लहानपणी छत्रपती शिवाजी, सावरकर, चार्ली चाप्लिन, कार्टुन्स, डाकु रामसिंग(काल्पनिक) यांची चित्रे काढुन ठेवली होती. ती वही कुठे गेली ते कळाले नाही. आठवण आली की हळहळतं.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

वाहीदा's picture

29 Jan 2009 - 1:40 pm | वाहीदा

पेंसील चे शेडींग वर्क छान जमले आहे !
~ वाहीदा

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 3:32 pm | शंकरराव

हर नजर ने बयां किया अंदाज अपना
जिस नजर से देखा हमने उसकी तरफ..

शंकरगालिब

फारच सुंदर रेखा चित्रे हो आवडले :-)

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2009 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर

कलेची जाण कौतुकास्पद आहे. ही रेखाचित्रे जपून ठेवा. पुढे मोठ्ठा चित्रकार झाल्यावर, बाळाचे पाळण्यातील पाय पाहायला जास्त मजा येईल. (आणि अभिमानही वाटेल.)

अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

प्रमोद देव's picture

29 Jan 2009 - 3:25 pm | प्रमोद देव

उत्तम चित्रकला.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते हे असे. मोठेपणी नक्की नाव काढेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jan 2009 - 3:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर आहेत चित्रं आणि एका चित्रावर देवनागरीत स्वाक्षरी केली आहे तेही आवडलं.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

माझी दुनिया's picture

29 Jan 2009 - 3:47 pm | माझी दुनिया

सगळ्यांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद :-)
माझी दुनिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2009 - 3:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर चित्रं काढली आहेत !

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 3:52 pm | विसोबा खेचर

आम्ही आमच्या परिने मुखपृष्ठावर दाद द्यायचा प्रय्त्न केला आहे! :)

पोराचं खरंच कौतुक आहे..!

आपला,
(कलाप्रेमी) तात्या.

माझी दुनिया's picture

29 Jan 2009 - 4:07 pm | माझी दुनिया

या प्रोत्साहनाबद्दल तात्यांचे विशेष आभार :-)
माझी दुनिया

शाल्मली's picture

29 Jan 2009 - 3:54 pm | शाल्मली

श्रेयसने फारच छान चित्रे काढली आहेत.
ही १० वर्षाच्या मुलाने काढलेली चित्रे आहेत यावर खरंच विश्वास बसत नाही!!
दुसरे चित्र विशेष करून आवडले.
त्याचे अभिनंदन आणि पुढील चित्रकलेसाठी शुभेच्छा !!

--शाल्मली.

चतुरंग's picture

29 Jan 2009 - 8:36 pm | चतुरंग

बारकावे टिपणारी नजर आणि कागदावर उतरवणारा हात दोन्ही आहे.
सतत सराव चालू रहाण्यासाठी श्रेयसला शुभेच्छा!
त्याला हळूहळू उत्तम ड्रॉईंगपेपर आणि चारकोल ह्या रेखाटन माध्यमांकडे वळवता आले तर पहा.

चतुरंग

मदनबाण's picture

29 Jan 2009 - 9:41 pm | मदनबाण

श्रेयसने खुपच सुंदर चित्रे काढली आहेत.... :)

१)गुलाबाचे फुल अत्यंत सुंदर काढले आहे..
२)चिऊ ताईचे पंख आणि घरटे मस्तच..
३)उत्त्तम रंग संगती..तळ्यातले प्रतिबिंब तर लय भारी..
४)तळ्यात उभ्या असलेल्या पक्षाचे पाण्याच्या आतील पाय आणि पाण्यावर उमटलेले तरंग्..व्वा.
५)पोपटाची जोडी..चोच आणि पायाने धरलेली फांदी..एकदम डिटेल मंदी...
मुलगा १० वर्षाचा आहे !!!...च्यामारी त्याचा वयात असताना मी काढलेली चित्रे लय दिव्य होती...मी काढलेली माणसे पोलियो रुग्ण वाटत्..कारण हात पाय धड काढताच येत नव्हते !!!
श्रेयस चे अभिनंदन.... :)

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

संदीप चित्रे's picture

29 Jan 2009 - 10:09 pm | संदीप चित्रे

चित्रकलेतलं काही कळत नाही पण दहा वर्षाच्या श्रेयसची चित्रं त्याच्या वयाच्या मानाने खूपच सुरेख आहेत एवढं समजलं :)
त्याला खूप शुभेच्छा.
------
श्रेयसच्या चित्रांचा ब्लॉगही आवडला ... त्याला जरूर सांगा.....जमेल तेव्हा ब्लॉगवर जाऊन कॉमेंट टाकीन.
------
(अवांतर -- श्रेयसचं 'मराठी'ही त्याच्या चित्रांसारखंच उत्तम आहे :) )

लिखाळ's picture

29 Jan 2009 - 10:37 pm | लिखाळ

सर्व चित्रे छान आहेत. शेवटचे पोपटाच्या जोडीचे तर फारच उत्तम..
श्रेयसचे अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा !
-- लिखाळ.

प्राजु's picture

29 Jan 2009 - 11:40 pm | प्राजु

विलक्षण जादू आहे त्याच्या हातामध्ये...
सुरेख चित्रे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विद्युलता's picture

30 Jan 2009 - 12:12 am | विद्युलता

:)SHREYAS IS GREAT
HOW HE DEVELOPED HIS HAND?
IS HE GOING FOR COACHING?
PLEASE GIVE DETAILS

माझी दुनिया's picture

30 Jan 2009 - 1:44 pm | माझी दुनिया

अजूनतरी कोणत्याही प्रकारचे चित्रकलेचे खास शिक्षण त्याला मिळालेले नाही. जे काही आहे ते उपजतच आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी. नाहीतर माझ्यासारख्या चित्रकलेतल्या औरंगजेबाच्या पोटी हे असे रत्न का निपजावे ! 8>

सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रियांबद्दल पुनश्च आभार
माझी दुनिया

चतुरंग's picture

31 Jan 2009 - 11:17 pm | चतुरंग

नाहीतर माझ्यासारख्या चित्रकलेतल्या औरंगजेबाच्या पोटी हे असे रत्न का निपजावे !

ह्यालाच उत्क्रांती असे म्हणतात का? :) (ह.घ्या.)

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2009 - 12:17 am | पिवळा डांबिस

आवडली!
त्यातही तो बगळा/करकोचा खूपच आवडला...
जियो!

शितल's picture

30 Jan 2009 - 12:42 am | शितल

सुंदर चित्रे काढली आहेत :)
त्याच्यातील कलाकाराला सलाम. :)

दशानन's picture

30 Jan 2009 - 10:32 am | दशानन

शितल शी १००% सहमत.

सुंदर चित्रे काढली आहेत
त्याच्यातील कलाकाराला सलाम

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

श्रेयस, तु देवाची विशेश कलाक्रुती आहेस. देवाचे विशेश आशिर्वाद तुझ्यावर आहेत. आणि म्ह णुन च अशी सुन्दर चित्रे तुझी ल हान -ल हान बोटे रेखाट्तात. आणि आमच्या नेत्रांना ही चित्रे बघण्याचे सुख देतात..त्याब्द ल
तुझे धन्यवाद !

आणि

तुला मनापासुन खुप खुप शुभेच्या!

धनंजय's picture

30 Jan 2009 - 3:52 am | धनंजय

सुंदर आहेतच, पण रंगसंगती खूपच चांगली जमली आहे.

ढ's picture

30 Jan 2009 - 11:18 am |

श्रेयस,
लगे रहो!!

दिपोटी's picture

30 Jan 2009 - 2:29 pm | दिपोटी

बहोतही खूब ! उत्तम !!

- दिपोटी

सुरेख चित्रे आहेत. तुला मनापासुन खुप शुभेच्चा.