गाभा:
आमची 5 वर्षांची मुलगी प्रचंड हट्टी आहे.
ती कुठल५ही गोष्ट इतकी ताणते की शेवटी माझा संयम सुटतो आणि त्याची परिणिती तिला फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते.
तिला म्हणे मी रागावते आणि फटके देते याची भीती वाटते. हे असं बोलून ती तिच्या बाबाची आणि आज्जीची सहानुभूती मिळवते,आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे होते
मला वाटते की माझी मुलगी भयंकर नाटकी आहे. तिला खरचं भीती वाटत असती तर तिनी ताणण्याची पुनुरावृत्ती नसती केली.
१. मी नक्की काय करावं की ज्यांनी मुलीचा हट्टीपणा कमी होईल?
२. माझ्या तिच्याशी वागण्यात काय बदल करु? (नवरा आणि सासूबाईंना फार काही सांगून फायदा नाही.)
प्रतिक्रिया
7 Aug 2016 - 10:01 am | कैलासवासी सोन्याबापु
फारच जास्त वैयक्तिक होतंय काय? बाळीचे वय ५च आहे हे आपण विसरला आहात काय?
7 Aug 2016 - 10:03 am | अभ्या..
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर पोरीने घरात दंगा केला तर काय बिघडलं?
असो, छोटीला एखादा काका असल्यास त्याकडे हे प्रकरण सोपवावे.
अशाच एका हट्टीचा काकाय मी. :)
7 Aug 2016 - 10:42 am | नीलमोहर
आमच्याकडे तर बाळपणापासून अजिबात हट्टी नसलेली कमालीची समजूतदार पिल्लू आहे, तिला सांगावं लागतं
जा जरा दंगा मस्ती कर, तिच्यासाठी काही घ्यायला गेलं तरी नको म्हणते, मग आम्हीच काहीबाही आणून लाड करतो तिचे,
अशा समंजस मुलीलाही तिचा काका अजून शिस्त लावत असतो, शिकवत असतो,
तिला आतापासून भगवद्गीता, इन्कयक्लोपीडिया, शैक्षणिक पुस्तके, बुद्धीला चालना देणारे वेगवेगळे खेळ आणत असतो.
व्यायाम, अभ्यास व्यवस्थित करायला लावतो.
मुलांच्या बाबतीत प्रमाणात लाड आणि प्रमाणात शिस्त असं धोरण लहानपणापासून ठेवलेलं चांगलं असतं.
अति लाडवून उपयोग नसतो, फार कडक शिस्तीत ठेवूनही.
7 Aug 2016 - 11:32 am | संजय पाटिल
आमच्याकडे तर बाळपणापासून अजिबात हट्टी नसलेली कमालीची समजूतदार पिल्लू आहे, तिला सांगावं लागतं
जा जरा दंगा मस्ती कर, तिच्यासाठी काही घ्यायला गेलं तरी नको म्हणते>>>>>
सुदैवी आहात...
7 Aug 2016 - 10:05 am | विवेकपटाईत
१. तिची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा तिला कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. ती आपसूक शांत होईल.
२. तिने मागितलेली आवाक्यात असलेली वस्तू नंतर काही दिवसांनी तिला आणून द्या.
३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत नाही.
१०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी होईल.
१००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ. ने हाच वापरला होता. आज माझी मुले (मुलगी आणि मुलगा) मोठे झालेले आहे. पण ताटात कधी एक कण टाकत नाही. मला कधीच त्यांच्यावर हात उगरायची गरज पडली नाही.
7 Aug 2016 - 10:13 am | स्पा
आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या पालकांमध्ये तुम्ही एक वेगळे पालक दिसलात.
फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))
7 Aug 2016 - 10:25 am | विवेकपटाईत
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याच्या बापाने त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती.
अवांतर आज घरात दिंड वडे व सोबतीला कैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंचमी आहे).
7 Aug 2016 - 11:56 am | आनंदी गोपाळ
धिंडवडे चा उगम दिंड वडे वरून असावा का?
7 Aug 2016 - 12:04 pm | शाम भागवत
धाग्याचे धिंडवडे घालायचा विचार आहे काय?
:))
;))
7 Aug 2016 - 10:15 am | अमितसांगली
खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते...
7 Aug 2016 - 10:19 am | किसन शिंदे
हट्ट, लाड आता करून घेणार नाही मग कधी करणार? पण योग्य त्या पद्धतीने हा विषय हाताळलात तर वाढत्या वयाबरोबर हट्टीपणा जाईल कदाचित, पण तसं नाही झालं तर प्रचंड म्हणजे प्रचंड हट्टी बनतात मुलं, त्याचबरोबर आई किंवा वडीलांबद्दल(जो जास्त रागावतो किंवा मारतो) द्वेषाची भावना मनात वाढत राहते.
7 Aug 2016 - 10:20 am | देशपांडे विनायक
आधी स्वतःकडे तर पहा
@ माझा संयम सुटतो आणि त्याची परिणिती तिला फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते.
तुमचा संयम तुम्ही न सोडता सुटत नाही
फटके मारणे तुमच्या हातात आहे ते बंद करत नाही
वाईट वाटणे आवडत नसूनही त्याची निर्मिती करणे बंद करत नाही
हट्टीपणा तुमचा वारसा म्हणून तर तुम्ही तिला दिला नाही ?
7 Aug 2016 - 10:24 am | किसन शिंदे
देशपांडे काकांशी सहमत!
7 Aug 2016 - 10:44 am | मुक्त विहारि
घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.)
"तुम्ही आणि तुमची मुले" लेखक श्री.अविनाश भोमे.
7 Aug 2016 - 10:51 am | तिमा
एकांगी उपदेश करणे सोपे आहे. पण मुलांना शिस्त लावायची असेल तर सगळ्या वडिलधार्यांची एकजूट पाहिजे. नाहीतर आईने रागवल्यावर आजी/आजोबा/बाबा यांच्याकडे अभय मिळते, हे कळले की मुले जास्त हट्टी होतात.मारणे चुकीचे आहे पण हट्ट केल्यावर सगळ्यांनी समजावणीचा एकच सूर लावला पाहिजे.
7 Aug 2016 - 11:19 am | माम्लेदारचा पन्खा
लहान आहे ती...थोडी दंगामस्ती करणारच.....हेच वय असतं !
7 Aug 2016 - 11:28 am | शाम भागवत
हट्टीपणा कमी करायचा असाही मार्ग..
भाऊ आजोबा, डेंजर आजोबा (जोपासनापर्व - ७)
अवांतरः
भाऊ तोरसेकर?
खीक...
;-))
7 Aug 2016 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>१. मी नक्की काय करावं की ज्यांनी मुलीचा हट्टीपणा कमी होईल?
स्वतःवर कंट्रोल ठेवा.
-दिलीप बिरुटे
7 Aug 2016 - 2:23 pm | उडन खटोला
मुलांना काही सृजनशील गोष्टी करायला द्याव्यात.
मुलांना घरात कोण कमांडिंग आहे ते बरोबर समजतं. कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ते ओळखतात. त्यामुळे मूल माझं ऐकत नसेल तर वाईट वाटून न घेता ज्या 'सोनारा'चं ऐकतात त्याला सकारण सांगावं आणि त्याला मुलाचे कान टोचू द्यावेत.
'सोनार'च आपलं ऐकत नसेल तर मात्र आत्मपरिक्षणाची गरज आहे ;)
7 Aug 2016 - 2:28 pm | कंजूस
काही मन गुंतवणाय्रा गोष्टी शोधा.
7 Aug 2016 - 2:30 pm | मितभाषी
तुमचा हट्ट सोडा आधि . मुलगी तुमच्यावर गेलेली दिसते.
7 Aug 2016 - 2:34 pm | आदूबाळ
काहीही करा, पण मारू नका लेकराला.
(किंवा मोठं झाल्यावर लेकराने कानाखाली जाळ काढल्यास वाईट वाटून घेऊ नका.)
7 Aug 2016 - 3:45 pm | स्पा
लोल हे लाॅजिक वाचून आवराच आता
7 Aug 2016 - 4:25 pm | आदूबाळ
सरळ लॉजिक आहे.
सबळ पार्टीच्या अपेक्षेप्रमाणे निर्बळ पार्टी वागली नाही म्हणून सबळ पार्टीने निर्बळ पार्टीला मारलं.
आजची सबळ पार्टी उद्या तुलनेने निर्बळ झाली, तर याच लॉजिकप्रमाणे चार रट्टे खायची तयारीही ठेवली पाहिजे. तेव्हा संस्कार, संस्कृती वगैरे कांगावा करायचं काम नाय.
7 Aug 2016 - 4:40 pm | उडन खटोला
आबा, शारीरिक क्षमता एवढाच विषय नाही हे का तुम्हाला सांगायला हवं? संस्कार नक्की च कमी पडलेले असतात. त्याहून जास्त स्वतःचा आचार.
7 Aug 2016 - 5:08 pm | आदूबाळ
अर्थातच. आणि तुम्ही म्हणताय तसं त्याची बीजं पालकांच्या मारकुटेपणातच असतात.
पण लहान मुलांना मारू नये हे समजण्याची बुद्धी ज्यांना नसते त्यांनी "उद्या हे आपल्यावर उलटू शकतं" या भीतीपोटी मारणं थांबवलं तरी मोठा विजय आहे. Bullies are cowards.
7 Aug 2016 - 3:02 pm | मी-सौरभ
तुमच्या लेकीचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं बरोबर जातो? मला असं वाटतं की ती तिची ऊर्जा कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे.
पूर्णतः अननुभवी
सौरभ
7 Aug 2016 - 3:19 pm | दिपुडी
मुलीच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणू नका.भले तिचा तिला त्रास होउदे थोडा.माझ्या मुलीचा गरम भांड्याला हात लावयला खुप आवड़ायचे (कदाचित ती भांडी पकडिने धरली असतील म्हणून असेल ) वैतागुन एकदा मी तिला खुशाल हात लाऊ दिला कुकरला.खुप वाईट वाटले पण शेवटी औषध कडूच् असते या म्हणी प्रमाणे आता एकदहि सांगावे लागत नही की हात लाउ नको म्हणून ...अनुभवातून तिला स्वत:ला शाहणपण येउदे.प्रत्येक गोष्ट आपण सांगू तीच अणि तशाच प्रकारे मुले अमलात आणतील अशी खुप कमी मुले असतात
आणखी एक म्हणजे एखादी गोष्ट नहि द्यायची मुलीला तर कोणीच नाही द्यायची..ना आई ना बाबा ना आजी आजोबा.हा आता याबाबत मात्र तुम्हाला तुमच्या घरच्यांशीच् बोलावे लागेल
8 Aug 2016 - 2:03 pm | रेवती
आमच्याकडेही असेच होते. मुलगा अगदी लहान असताना मी त्याला सारखे कडेवर घ्यावे असा हट्ट असायचा. स्वयंपाक करताना तसे करणे धोकादायक असल्याने मी त्यास कडेवर घेत नसे. त्यातूनही खूप हट्ट केल्यावर कडेवर घेतले तर पाय हलवत हळूच कढईला मारायचा. अनेकदा सांगितले पण उपयोग नव्हता. एकदा कढई कोमट असतानाच पाय मारू दिला. त्यानंतर एकदाही सांगावे लागले नाही.
7 Aug 2016 - 3:22 pm | दिपुडी
नुसते फटके देऊन मुले हळू हळू निगरगट्ट होतात त्यांच्याशी त्यांच्या कलाने घेऊन बोला
7 Aug 2016 - 3:28 pm | दिपुडी
आता शेवटचे
हट्टीपणा करते म्हणजे एझ्याक्ट काय करते कोणत्या विशेष बाबतीत की कसे वगैरे ते विस्तृत संगितलेत तर बरे होईल
7 Aug 2016 - 3:52 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
फटके देणे चालू ठेवा,मनुष्याला फक्त माराची भीती असते,जर तिचे हट्ट पुरवत गेलात तर पुढे हा हट्टीपणा ब्रेनमध्ये कायमचा कोरला जातो आयुष्यभरासाठी.तेव्हा की फटकींग ,पण चाईल्ड ॲब्युज होऊ देऊ नका
7 Aug 2016 - 4:03 pm | झेन
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का.
तिला एका भावंडाची गरज आहे.
7 Aug 2016 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) च्यायला, कोणाचं काय तर, कोणाचं काय.
अवघड होत चाललं मिपा.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2016 - 4:46 pm | ब़जरबट्टू
जबरा.. हे करायलाच पाहिजे काकू तुम्ही..
गांधारीला असा त्रास झालाच नाही, कारण पोरंच एका दुस-याला सांभाळून घ्यायची.. :)
त्यामानाने, जेष्ठ कुंतीपुत्राला ती 3 पट्टी खेळायची सवय कशी लागली कोण जाणे.
7 Aug 2016 - 5:18 pm | अनुप ढेरे
स्वतःच्याच कानाखाली मारून घ्या लहान पोराला मारण्यापेक्षा.
8 Aug 2016 - 12:36 pm | रायनची आई
मी समजू शकते..कधी कधी आपण कितीही ठरवले तरी रागाच्या भरात फटका दिला जातोच. तुम्ही मुलीबरोबर ठरवून क्वालिटी टाईम घालवा.मी माझ्या साडेचार वर्षाच्या मुलासाठी ३-४ इन्ग्लिश व मराठी गोष्टिची पुस्तके आणली आहेत. आणि रोज रात्री झोपताना त्याला त्यातली एक गोष्ट वाचून दाखवते.आता त्यालाच इतकी आवड लागली आहे की रोज रात्री तो गोष्ट एकल्याशिवाय झोपतच नाही.अशीच कोणतीही Activity मुलीबरोबर तुम्हीपण सुरु करा.
9 Aug 2016 - 7:40 pm | संदीप डांगे
तुम्ही मुलीबरोबर ठरवून क्वालिटी टाईम घालवा
= भाषा खतरनाक आहे! !!!
8 Aug 2016 - 11:05 pm | कवितानागेश
आधी घरातल्या इतरांना धाकात घ्या. ते तुमचे गपचूप ऐकतायत हे पाहिल्यावर मुलगी पण नरम पडेल!
9 Aug 2016 - 3:08 pm | चैतू
http://m.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=4074
9 Aug 2016 - 5:49 pm | जोशी पुण्यात दन्गा
9 Aug 2016 - 5:50 pm | जोशी पुण्यात दन्गा
9 Aug 2016 - 6:19 pm | जोशी पुण्यात दन्गा
9 Aug 2016 - 6:20 pm | जोशी पुण्यात दन्गा
9 Aug 2016 - 6:27 pm | मुक्त विहारि
चक्क ४ वेळा धन्यवाद...
11 Aug 2016 - 11:37 am | नाखु
प्रतिध्वनी आहे (ईको). मिपावर असे प्रतिधवनी अधून मधून येत राहतात...
मिपा गोल्घुम्मट बिजापूरवाला नाखु
10 Aug 2016 - 10:18 am | ५० फक्त
मुलगी एकच आहे की ४ आहेत...
11 Aug 2016 - 9:17 am | असंका
मुलांनी हट्टी का नसावं?