ताज्या घडामोडी - १

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
14 Jul 2016 - 8:26 pm
गाभा: 

मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

प्रतिक्रिया

चंपाबाई's picture

29 Jul 2016 - 10:43 pm | चंपाबाई

आता इथले काउअबॉइज तुम्हाला पाकिस्तानात ढकलतील.

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2016 - 11:21 pm | श्रीगुरुजी

PUTIN ON ISIS TERROR, “I Swear if they Bomb
Russia, in Half an Hour Every Muslim Will Die

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2016 - 2:37 pm | श्रीगुरुजी

बहुचर्चित, वादग्रस्त व प्रलंबित 'वस्तू व सेवा कर' विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाने नक्की काय व किती फरक पडणार आहे खुदा जाने.

http://www.thehindu.com/news/national/with-congress-on-board-gst-bill-ma...

अमितदादा's picture

30 Jul 2016 - 2:48 pm | अमितदादा

जीएसटी संदर्भात लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेले खालील दोन लेख वाचनीय आहेत ..
http://www.loksatta.com/lekha-news/parliament-might-pass-gst-bill-in-mon...
http://www.loksatta.com/lekha-news/all-about-gst-bill-1272100/

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 7:10 pm | चंपाबाई

सागरमाला प्रोजेक्ट !

सागरमाला प्रोजेक्टची आखणी झाली बाजपेयी काळात. तेंव्हा भगवी भुतावळ गप्प होती.

मग बाजपेयी बुडले व काँग्रेस आले... त्याच प्रोजेक्टला भुतावळीने विरोध केला.... आमच्या रामाच्या सेतूला हे भोक पाडणार म्हणुन.

आता पुन्हा तोच प्रोजेक्ट . पुन्हा भाजपा. आता पुन्हा मोदीभक्त गाणी म्हणताहेत !

सेतूला भोक पाडणार नाहीत का ?

किती वेळा यू टर्न ?

अमितदादा's picture

30 Jul 2016 - 10:58 pm | अमितदादा

जरी हा धागा ताज्या घडामोडी साठी असला तरी ज्यांना कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यकथा वाचायच्या असतील त्यांच्यासाठी खालील लिंका....
http://www.thebetterindia.com/62903/kargil-hero-neikezhakuo-kenguruse/
http://www.thebetterindia.com/62995/kargil-hero-sonam-wangchuk/
http://www.thebetterindia.com/62850/kargil-hero-kambampati-nachiketa/

मितभाषी's picture

31 Jul 2016 - 12:18 am | मितभाषी

आ. न,,
शांताराम कागाळे .

चंपाबाई's picture

31 Jul 2016 - 9:37 am | चंपाबाई

ab
स्थळ : जे डब्ल्यु मेरियट हॉटेल, एअरपोर्ट रोड .... २८ जुलै २०१६ .... जागतिक हेपॅटायटिस दिन ... दिवसभर हेपॅटायटिस , त्याचे प्रकार , लक्षणे, प्रतिबंध , उपचार , त्याची किंमत , शासनाने लक्ष द्यायची गरज , इजिप्तसारख्या देशात राबवले गेलेले नॅशनल प्रॉग्रॅम इ इ इ चर्चासत्रे झडली.

संध्याकाळच्या सेशनमध्ये खास अतिथींचे आगमन झाले. त्यांनी दहा मिनिटाचे भाषण दिले. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान पोटाला इजा झाल्याने इमर्जेन्सी सर्जरी करावी लागली. त्यादरम्यान पन्नासपेक्षाही जास्त बाटल्या रक्त व प्लेटलेट्स ट्रान्स्फुज करावे लागले. त्याना त्याद्यावारे हेपॅटायटिस बी चे संक्रमण झाले. पुढे बराच काळ तो रोग सुप्तावस्थेतच राहिला. नंतर जेंव्हा त्याचे आस्तित्व समजले , तेंव्हा जवळजवळ ७० % लिव्हर , सिर्होसिस होऊन खराब झाले असल्याचे समजले.

पण माणुस १० % लिव्हर टिशुवर जगू शकतो, त्यामुळे आजही ते व्यवस्थीत आहेत.

abb

abc1

________________________________________________________________________________

दुसर्‍या दिवशी पेप्रात आले होते.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/amitabh-bachchan...

Megastar Amitabh Bachchan, who is surviving only on 25 per cent of his liver as the rest has been damaged by the deadly Hepatitis B virus, on Thursday called for higher budget spend to prevent the fatal disease.
“Hepatitis B hit me accidentally. After the accident on the sets of ‘Coolie’ (1983), I was infused with the blood of about 200 donors and 60 bottles of blood were injected into my system,” Bachchan told an event on the World Hepatitis Day here this evening.

कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यानी केले होते.

इरसाल's picture

2 Sep 2016 - 2:18 pm | इरसाल

तुम्ही घेतलेल्या पहिल्या फोटोमधे उजव्या कोपर्यात कावलेला दिसणारा उपट सुंभ कोण आहे? निदान फोटोच्या बेळेस तरी बाजुला करावा ना ???

सुबोध खरे's picture

2 Sep 2016 - 2:25 pm | सुबोध खरे

ती सेल्फी असेल तर )))--

इरसाल's picture

3 Sep 2016 - 12:06 pm | इरसाल

नाव चंपाबाई आणी सेल्फी बाप्याचा ?????????

सुबोध खरे's picture

3 Sep 2016 - 1:34 pm | सुबोध खरे

त्या चंपाबाईं नाहीत
ते भम्पकबुवा आहेत. एका ठिकाणी मी "करतो" "जातो" असे प्रतिसाद दिले आहेत.
केदार दीक्षित साहेबांच्या एका धाग्यावर आमच्या "बायकोने" पदार्थ छान केला अशी तारीफ.
आता चंपा"बाई" असतील अन त्यांची बायको असेल तर ते LGBT का काय मध्ये जातील ना?
म्हणून म्हणतो ते भंपक बुवा आहेत ( जामोप्या, हितेश, मोगा अशा अनेक डू आय डी घेऊन झाल्या).
परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.

तर्राट जोकर's picture

3 Sep 2016 - 2:08 pm | तर्राट जोकर

Hello Doctor, are you in race with MOGA of getting lower and lower every day?

lakhu risbud's picture

3 Sep 2016 - 2:30 pm | lakhu risbud

हेच "ते" सुप्रसिद्ध जामोप्या/दादा दरेकर/हीतेस

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2016 - 2:38 pm | श्रीगुरुजी

परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.

जसे मनोजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार इ.चे सुद्धा फॅन असायचे, तसा मिपावर यांचा सुद्धा फॅन क्लब आहे बरकां.

तर्राट जोकर's picture

3 Sep 2016 - 2:44 pm | तर्राट जोकर

उगी उगी...

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2016 - 2:45 pm | श्रीगुरुजी

बरं. उगी उगी तर उगी उगी.

बोका's picture

31 Jul 2016 - 11:39 am | बोका

आतिवास ताईंचे पुस्तक प्रकाशित होतेय.
आजच्या लोकसत्तेत त्यातील एक प्रकरण आले आहे.

http://www.loksatta.com/lekha-news/ativas-savita-book-on-taliban-terrorism-1276138/
...

bhaya

काल पर्रिकर पुण्यातल्या एका कार्यक्रमात म्हणटले की देशविरोधी बोलणाऱ्याना धडा शिकवायला पाहिजे तर या गोष्टीवर सुध्दा राहुल गांधीना आक्षेप, नक्की यात आक्षेप घेण्यासारख
काय आहे?

चंपाबाई's picture

31 Jul 2016 - 6:27 pm | चंपाबाई

आमीर खानच्या बायकोला हा देश सुरक्षित वाटत नव्हता, तर ते दोघे देशद्रोही ठरले.

अंबानीच्या बायकोला सुरक्षितता वाटत नव्हती, तर तिला मात्र झेड सिक्युरिटी मिळाली.

गामा पैलवान's picture

1 Aug 2016 - 12:53 am | गामा पैलवान

चंपाबाई,

शासनाकडे अर्ज केला असता तर अमीरखानच्या बायकोस पोलीस संरक्षण मिळालं असतं की.

तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अमीरखान आणि त्याची बायको देशद्रोही आहेत असं भारत शासनाचं वा न्यायालयाचं अधिकृत मत नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

1 Aug 2016 - 8:18 am | चंपाबाई

ते देशद्रोही नाहीत, असे शासनाचे वा न्यायालयाचे अधिकृत मत नाही, तर 'त्याना' धडा शिकवण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरं, समजा कुणी देशद्रोही असेलच, तर त्याला धडा शिकवायचा कायदेशीर अधिकार कुणाला आहे? बीजेपीला / पर्रिकर्राना?

तुमच्याशी वाद घालणे निर्थक आहे

अनुप ढेरे's picture

1 Aug 2016 - 12:04 pm | अनुप ढेरे

पर्रिकरांचं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे.

बोका-ए-आझम's picture

1 Aug 2016 - 12:39 pm | बोका-ए-आझम

बेजबाबदार वक्तव्य आमीरने केलंय.

देशविरोधी विधानं केली आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ देशद्रोह केला असा होत नाही. मजा म्हणजे आमीरला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि पर्रीकरांना नाही? बरं, आमीरच्या चांगल्या कामाबद्दल (पाणी फाउंडेशन) त्याचा सत्कार भाजपच्याच सरकारने केला. तेव्हा नव्हतं वाटतं असुरक्षित वातावरण?

अनुप ढेरे's picture

1 Aug 2016 - 3:05 pm | अनुप ढेरे

उच्च-पदस्थ नेत्यांकडून अशी बेजबाबदार वक्तव्य विजिलँटे हिंसेला प्रोत्साहन देत असतात. या वक्तव्याचा परिणाम म्हणून चित्रपट हिंसेने बंद पाडणे, काळे फासणे हे प्रकार होणार. याची जबाबदारी कोणाची? वर परत म्हणणार की आमिरने जे वक्तव्य केलं त्याचं काय? अमिर खानची जबाबदारी पर्रिकरांइतकीच आहे काय? बर समजा त्याने तारतम्य सोडून वक्तव्य केलं तर संरक्षण मंत्र्यांनीपण जबाबदारी सोडून बोलायचं?

पण देशात राहुन देश विरोधी बोलणाऱ्याना शिक्षा/धडा दिला पाहिजे यात चुकिच काय आहे

अनुप ढेरे's picture

1 Aug 2016 - 5:30 pm | अनुप ढेरे

धडा देणारे कोण नक्की? एवढं धोकादायक बोलला असेल अमिर खान तर करावा सरकारने खटला दाखल. रितसर कोर्टात प्रूव करावं तसं? उगाच विजिलँते लोकांना का प्रोत्साहन द्यायचं? आत्ता स्वघोषित गौ-रक्षक काय धुमाकूळ घालतायत ते दिसतं आहेच.

अमितदादा's picture

1 Aug 2016 - 6:03 pm | अमितदादा

सहमत। आमिर खान बोलला ते चूक पण जे पर्रीकर बोलले ते गरजेचं न्हवत. हिंसक गो रक्षक लोकांकडून होणाऱ्या हल्याबाबत मात्र पर्रीकर किंवा इतर मंत्री नेमकेपणानं बोलत नाहीत हे खटकत. हि लोकांवर भाजपाचा किंवा मोदींचा वचक आहे की नाही याबाबत शंका यायला लागलीय.

असं अजिबात नाही. मुळात Intolerance हे काही असंतुष्ट लोकांनी चालू केलेलं fad होतं. त्यात मुळातच विरोधाभास होता. जे लोक intolerance म्हणून आरडाओरडा करत होते (आमीरसकट) ते हे सोयीस्कररीत्या विसरले होते की जर देशात खरंच intolerance असता तर त्यांना असं स्पष्टपणे आणि उघडपणे बोलता आलं असतं का? आज जम्मू आणि काश्मीरमध्ये ' मुलींनो, सायकल चालवलीत तर सायकलसकट जाळून टाकू ' अशी पत्रकं अतिरेक्यांनी लावलेली आहेत. हा intolerance आहे, पण याबद्दल कुठल्याही स्वघोषित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याने आवाज उठवलेला नाही.
(संदर्भ: एबीपी माझा). त्यामुळे असा selective आवाज उठवणं हा दांभिकपणा आहे, आणि तो उघडकीस आणला पाहिजे. पर्रीकरांनी तो आणला. त्यात काहीही बेजबाबदारपणा नाही. जसं सरकारच्या चुकीचं माप सरकारच्या पदरात घातलंच पाहिजे तसं सरकारमधल्या एका मंत्र्यानं केलं. शिवाय आमीरचे चित्रपट वगैरे बंद पाडणं असले प्रकार पूर्वी झाले होते, नाही असं नाही. पण पर्रीकरांच्या या अशा वक्तव्यामुळे असं होईल हे speculation आहे. पी.के. वर लोकांनी टीका केली, पण तो बंद वगैरे पाडला नाही. तेव्हा intolerance असल्याचं आमीरला जाणवलं नाही. हा दांभिकपणा आहे आणि तो उघडकीला आणला पाहिजे.

अमितदादा's picture

1 Aug 2016 - 10:00 pm | अमितदादा

मुळात हा intollerance आपल्या देशात फार पूर्वीपासून ह्या ना त्या रुपात अस्तित्वात आहे हि वास्तुस्तिथी आहे, फक्त मोदी सत्तेत आल्यानंतर हे intollerance अचानक सुरु झालं हा खोटा अप्रचार आहे. मात्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदू radical लोकांची दांभिकता वाढत चालीय हि दुखरी बाजू आहे। आता याला लोक असा प्रत्यिउत्तर देतील कि मुस्लिम radical लोक काय बोलतात हे का पाहत नाही, पण आपण हे विचारत घ्यायला हवं कि मुस्लिम radical लोकामुळं त्या धर्माची हि अवस्था आहे तशी अवस्था हिंदू धर्माची होऊन द्यायची आहे का हा मूळ प्रश्न आहे. हिंदू लोकामध्ये खूप लोक tollerant आहेत पण साध्याच सरकार हे त्यांना पूरक अशी भूमिका घेताना दिसत नाही. बर फक्त एका चुकी मुळे आमिर खान देशद्रोही कसा ठरतो हे कळत नाही. कालच काश्मीर च्या मुख्यमंत्री मुफ्ती अशा बोल्या कि आतंकवादी वाणी ला सेकंड चान्स दिला असता तो जर तेथे आहे हे माहित असत तर, मग का नाही भाजप न त्याना सुनावलं किंवा पाठिंबा काडून घेतला. हे सेलेक्टिव्ह outrage नाही का. पर्रीकारांनी आमिर ऐवजी गो राक्षकाकडून होणाऱ्या हत्या बद्दल मत व्यक्त केलं असत तर बरं झालं असत कारण ते काही साधे सुधे मंत्री नाहीत मोदी सरकार मधील ज्या ठराविक लोकांबद्दल जनसामान्यांना आदर आहेत त्यातील ते एक आहेत. आमिर खान कडून चूक झाली,चुका होऊ शकतात कायदा त्याच काम करेल, आणि चुकीला माफी नसायला भारत काय दगडी चाळ नाही.

“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet,” he said.

चंपाबाई's picture

1 Aug 2016 - 11:02 pm | चंपाबाई

हा प्रतिसाद बोकाला होता. चुकून अमितच्या पोस्टखाली पडला.

शाम भागवत's picture

2 Aug 2016 - 2:13 pm | शाम भागवत

चंपाबाई पण चुकतात?
;))

याच्याशी सहमत. साक्षी महाराज, साध्वी प्राची आणि भाजपमधले इतर गणंग एकेकाळी वाट्टेल ते बडबडत होते आणि बिहारमध्ये पराभव झाल्यावर त्यांच्या वाचाळपणाला चाप बसलेला आहे. अशा लोकांचं वाचाळत्व अजिबात क्षम्य नाही पण असले वाचाळवीर प्रत्येक पक्षात आहेत. मीडिया भाजपचे वाचाळवीर असतील तर जे आकांडतांडव करते ते इतर पक्षांच्या बाबतीत करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचा भाजप सत्तेवर येण्याशी काहीही संबंध नाही. आधीही भाजप नेत्यांच्या विधानांचा विपर्यास केला गेलेला आहे.
पर्रीकरांनी आमीरच्या विधानाचा समाचार घेतला हे माझ्या मते योग्यच केलं. आमीरसाठी देशद्रोही असा शब्द त्यांनी वापरलेला नाही पण intolerance वर त्याने selective मत दिलं आणि तो दांभिकपणा होता. मुळात liberals आणि डावे हे विरोधी मतांच्या बाबतीत जितके intolerant असतात तितकं intolerant कुणीही नसतं.

अमितदादा's picture

1 Aug 2016 - 11:30 pm | अमितदादा

अमीर ची चूक होती हे मान्यच आहे. बाकी लिबरल आणि डाव्यांच्याबाबत तुमचं मत शत प्रतिशत बरोबर आहे।

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 8:30 am | चंपाबाई

स्टेटमेंट बायकोचे होते तर तिला दोष द्यायचा की आमीरला ?

अमितदादा's picture

2 Aug 2016 - 11:38 am | अमितदादा

बरोबर आहे चंपाबाई. परंतु एक वैयक्तिक संवाद सार्वजनिक करण हा आमिरचा दोष आहे। तसेच बायकोच्या आडून त्याने निशाणा साधला अस हि वाटत. आणि किरण वर हि लोकांनी टीका केली होती परंतु तिचा प्रोफेशनल आणि सार्वजनिक जीवनात वावर कमी असल्याने लोकांनी अमीर वर तोफ डागली. बाकी हे माझे वैयक्तिक मत आहे तुमचे वेगळे असू शकते.

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 12:04 pm | चंपाबाई

बायकोचे स्टेटमेंट त्याने जसेच्या तसे सांगितले.

समजा त्याची बायको बोल्ली असती ... खाविंद , हिंदुस्तान बहोत प्यारा देश है !

आणि हे स्टेटमेंट त्याने सार्वजनिक केले असते , तर तुम्ही बोलला असता की वैयक्तिक वाक्य सार्वजनिक का केले म्हणुन ?

वाक्य सार्वजनिक करताना ते भाजपा सेना पर्रिकर आठवले यांच्या आवडीनुसार करायचे का ?

गामा पैलवान's picture

2 Aug 2016 - 1:09 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

पप्पू चावलाय का तुम्हाला? काय उघड करावं आणि काय झाकून ठेवावं एव्हढंही तुम्हाला कळंत नाही!

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

2 Aug 2016 - 1:46 pm | अमितदादा

हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता.
चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे
1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल.
2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच.
चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.

अमितदादा's picture

2 Aug 2016 - 1:46 pm | अमितदादा

हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता.
चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे
1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल.
2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच.
चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 7:14 pm | चंपाबाई

टिर्रीकरानी शेपूट घातले.

आता बोलतात की मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं.

गुर्जींच्या स्टुडंटचं अजुन नावच नाय ठरलं तर ते कसला धडा शिकवणार यावर आपण का काथ्याकूट करायचा ?

मुक्त विहारि's picture

2 Aug 2016 - 8:44 pm | मुक्त विहारि

हे टिर्रीकर कोण?

ह्या आडनावाचे गृहस्थ काय करतात?

अर्थात, वरील प्रतिसाद "चंपाबाई" ह्यांनाच आहे.

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 10:55 pm | चंपाबाई

ती कविता आठवली.

आवा चालली पंढरपुरा
वेशीपासून आली घरा.

.....

टिर्री काय अन पर्री काय .... नावात काय आहे ?

लोकं नाव न घेताच धडा शिकवतात !

मुक्त विहारि's picture

3 Aug 2016 - 11:10 am | मुक्त विहारि

आम्हाला आडनांव कळले नाही.

चंपाबाई's picture

5 Aug 2016 - 8:02 am | चंपाबाई

http://newsd.in/tag/sleeping/

पर्रीकर संसदेत झोपले.

वा ! संरक्षणमंत्री !

मग राहुल गांधी त्यांना पाठीशी घालतात हे योग्य हे का?

अमितदादा's picture

2 Aug 2016 - 12:56 am | अमितदादा

राहुल गांधी ना सध्या तरी कोण गांभीर्याने घेत नाही। ते नेहमी भाजपच्या विरोधी भूमिका घेतात मग ती बरोबर असो चूक असो खरी असो खोटी असो. मला राहुल गांधींच्या बातम्याया सुद्धा वाचायचा कंटाळा येतो, बालकथा वाटतात।

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 1:12 am | संदीप डांगे

विरोधी पक्ष विरोधीच भूमिका घेणार, त्यात नवल ते काय? भाजपनेही ज्या मुद्द्यावरून कधीकाळी काँग्रेसच्या निर्णयांचा विरोध केला आहे तेच मुद्दे आता स्वतः रेटत आहेतच,

अशा तर्हेने राहुल गांधीना गंभीरतेने घेणाऱ्यांची गम्मत वाटते,

बरोबर आहे। परंतु सोनिया गांधी च्या शब्दांना असणार वलय राहुल गांधी न नाहीये हे फक्त त्यांच्या विरोधकामुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे आहे. एक उदाहारण, जीएसटी ला एकेकाळी मोदी नि ठाम विरोध केलेला पण तो राज्यांच्या अधिकाराला बाधा येते असे कारण म्हणून आता तेच हे पुढे रेटत आहेत, पण त्यांनी दिलेलं कारण पटण्यासारखं होत आणि त्याकाळी सोशल मीडिया एव्हडा ऍक्टिव्ह नव्हता। आता मात्र राहुल गांधी जीएसटी ची टॅक्स कॅप 18% ठेवून ते घटनेत टाकावी अशी निर्बुद्द मागणी करतात हा विरोध लोकांना पटत नाही, तसेच ज्यांनी हे विधेयक आणले तेच विरोध करतात हे हि पटत नाही.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी

एक उदाहारण, जीएसटी ला एकेकाळी मोदी नि ठाम विरोध केलेला पण तो राज्यांच्या अधिकाराला बाधा येते असे कारण म्हणून आता तेच हे पुढे रेटत आहेत,

दोन मुद्द्यांवर अपप्रचार सुरू आहे.

(१) जीएसटीला काँग्रेस राजवटीत फक्त मोदींनी विरोध केला होता आणि
(२) आता जीएसटी आणताना मोदींनी यू टर्न घेतला आहे.

काँग्रेस राजवटीत जीएसटीला फक्त गुजरात या भाजपशासित राज्याने विरोध केला नव्हता. त्यावेळी जीएसटीला भाजपशासित राज्यांप्रमाणेच भाजप सत्तेवर नसलेल्या किमान ५ वेगवेगळ्या राज्यांनी जीएसटीला विरोध केला होता. त्यातील ३ राज्यात काँग्रेस सत्तेवर होती व उर्वरीत २ राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर होते. जीएसटीला विरोध करणार्‍या राज्यांमध्ये गुजरातप्रमाणे हरयाना, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओरिसा अशा अनेक राज्यांचा समावेश होता.

In October 2013 also, a report in The Hindu quoted the Jammu and Kashmir Finance Minister (who also served as GST Empowered Committee Chairman) as saying this:

Most of the states…majority of the states have opposed bringing petroleum products and liquor in GST framework. They want to keep (the two items) out of GST,

मात्र त्यावेळी जीएसटीला ज्यांचा विरोध होता त्यांचा उल्लेख करताना फक्त गुजरात व मोदींचेच नाव घेणे हा शुद्ध अपप्रचार आहे.

त्यावेळी जीएसटीमधील अनेक तरतुदींना अनेक राज्यांचा विरोध होता.त्या तरतुदी म्हणजे,

1. Keeping Petroleum out of GST ambit
2. Keeping Alcohol out of GST ambit
3. Keeping Entry Tax out of GST ambit
4. Some sort of guarantee from Centre for potential revenue loss

यातील बर्‍याचशा मागण्या नवीन जीएसटी विधेयकामध्ये समाविष्ट केल्यामुळे आता हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त राज्यांनी न मागताच खालील फायदा नवीन विधेयकात दिला आहे.

The power to states of levying additional 1% tax levy, for maximum 2 years, to help augment state revenues.

त्यामुळे मोदींनी या विधेयकावर यू टर्न घेतला किंवा ज्या मोदींनी या विधेयकाला विरोध केला तेच मोदी आता हे विधेयक पुढे रेटत आहेत हा सुद्धा शुद्ध अपप्रचार आहे. बर्‍याचशा राज्यांच्या मागण्या नवीन विधेयकात समाविष्ट करून मोदींनी या विधेयकावर जवळपास सर्वसंमती घडवून आणली आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 2:28 pm | श्रीगुरुजी
अनुप ढेरे's picture

2 Aug 2016 - 7:41 pm | अनुप ढेरे

The power to states of levying additional 1% tax levy, for maximum 2 years, to help augment state revenues.

याबाबत अभ्यास वाढवा. दिशाभूल करू नका. हे कलम काढण्यात आलेलं आहे.

http://www.thehindu.com/business/cabinet-drops-1-additional-tax-from-gst...

भंकस बाबा's picture

1 Aug 2016 - 4:33 pm | भंकस बाबा

आमिर खानने अतुलनीय भारत जाहिरात करायला भारत सरकारकडून पैका घेतला होता, तेव्हा तो कधीच असं म्हनला नव्हता की ये तुमारा पैसा हराम का हाई, आपुन सिरफ ईमान की रोटी खाता हाई।
पैसे खाऊन ढेकर दिल्यावर आमिरला शहानपन सूचले

चंपाबाई's picture

1 Aug 2016 - 1:51 pm | चंपाबाई

रन फॉर रिओ च्या कार्यक्रमात पण पंतप्रधानांनी प्रचारकी मोडमध्येच राहिले.

बिटरगावच्या क्रीकेट टुर्लामेंटच्या बक्षीस समारंभातपण विरोधकांचे डिपॉझिट जप्तं होइल वगैरे बोललं जातं .. तसंच हे पण..

प्रसाद_१९८२'s picture

1 Aug 2016 - 2:55 pm | प्रसाद_१९८२

विदर्भावरुन विधीमंडळात विवाद, शिवसेनेने राजदंड उचलला !

मुख्यमंत्रीसाहेब, जोक नको, 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्र घडलाय : राणे

'106 हुतात्म्यांचा पुळका आज कॉंग्रेसला आलेला पाहून, कॉंग्रेसची खरच किव वाटली. संयुक्त महाराष्ट्र आदोंलन कर्त्यांवर बेछूट गोळ्या चालविण्याचे आदेश पोलीसांना देणारा तात्कालिन मुख्यमंत्री कॉंग्रेजचाच होता हे राणे आज विसरलेले दिसतायत.

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

विधानपरीषदेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे तावातावाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध करीत होते. मागील वर्षीचे त्यांचे बॉस पवार असे म्हणाले होते की विदर्भातील नागरिकांची जी मागणी असेल (वेगळा विदर्भ किंवा संयुक्त महाराष्ट्र) त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल. पवारांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मागील वर्षी आपण काय बोललो होतो ते आता विसरून गेले आहेत.

चंपाबाई's picture

1 Aug 2016 - 3:48 pm | चंपाबाई

हुतात्मे मुम्बै म्हाराष्ट्रात रहावी म्हणुन झाले होते ना ? त्यांच्या हौतात्म्याचा आणि वेगळ्या विदर्भाचा काय संबंध ?

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2016 - 6:20 pm | श्रीगुरुजी

गुन्हेगारांचा कळवळा येणा-या निधर्मांधांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

http://m.maharashtratimes.com/nation/sohrabuddin-encounter-supreme-court...

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Aug 2016 - 6:41 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

स्वयंघोषित गोरक्षकांनी जो उच्छाद मांडलाय त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते मांडा.

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2016 - 8:06 pm | श्रीगुरुजी

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा

http://indianexpress.com/article/opinion/web-edits/anandiben-patel-resig...

कपिलमुनी's picture

2 Aug 2016 - 10:41 am | कपिलमुनी

गोरक्षक संघटनांचे अत्याचार ,काश्मीरमधे उसळलेला दंगा
यावर चकार शब्द न काढणारे मा.पंप्र यांना मौनी मोदी अशी पदवी द्यावी

अमितदादा's picture

2 Aug 2016 - 11:40 am | अमितदादा

बाकी मला मोदी यांनी मनमोहन सिंग यांना मौनमोहन सिंग म्हणलेल आठवतंय.

मुंबई: मोडकसागर ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठाणे जिल्हयातील ४४ गावांना धोका... वाडा येथील तहसीलदारांचा अतिदक्षतेचा इशारा...
महाराष्ट्र टाइम्स

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 2:55 pm | श्रीगुरुजी

काही महिन्यांपूर्वी कोणत्या तरी विद्यापीठाने 'मुलींनी जीन्स, गुडघ्याच्या वर असणारे स्कर्ट्स घालू नये' असा काही तरी आदेश काढला होता. तो आदेश निघाल्याक्षणी माध्यमातून व वृत्तपत्रातून जोरदार टीका सुरू झाली. नेहमीप्रमाणे या मुद्द्यांवर हिंदु संघटनांना झोडपण्यात आले. पुरोगामी व निधर्मी विचारवंत (म्हणजेच निधर्मांध) यात आघाडीवर होते. मोदी सत्तेवर आल्यापासून भारतात फॅसिझम व असहिष्णुता वाढत आहे यावर या सर्वांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती.

आता दोन दिवसांपूर्वीच 'Kashmiri outfit threatens to burn girls alive for driving two-wheelers ' अशी धमकी देणारी पोस्टर्स काश्मिरमध्ये सर्वत्र लावलेली आहेत.

Srinagar: An organisation styling itself Sangbaaz Association Jammu and Kashmir, Azad Kashmir has issued a chilling warning to girls in the Valley: do not dare to drive a scooty.

According to a report in dna, this 'stone-pelters' association in Kashmir has put up posters in Lal Chowk, threatening to immolate girls if they ride a Scooty (to mean two-wheelers) in the Valley. "We request all girls, please do not use Scooty. If we see a girl riding Scooty, we will burn the Scooty as well as the girl (sic)", reads the posters, using a mix of English and Urdu.

Posters of Hizb-ul-Mujahideen (HuM) and Lashkar-e-Taiba (LeT) also have surfaced in south Kashmir. They ask people to continue agitation till freedom and urge women not to venture out of their homes, and government employees not to go to work.

The stone-throwers association has also named some shopkeepers and banks and asked them to shut down immediately or face consequences. They have also ordered mosques to sing songs of freedom and jihad and to offer prayers, says the report.

भारतातील निधर्मांधांनी या मुद्द्यावर अजूनपर्यत तोंड उघडलेले दिसत नाही. कोणी पुरस्कार देखील परत केलेले दिसत नाही. त्यांची दातखिळ बसलेली दिसत आहे. अर्थात अहिंदूंच्या अन्यायी व पुराणमतवादी आदेशांवर सोयिस्कर मौन पाळणे व हिंदूंच्या बाबतीत बेंबीच्या देठापासून किंचाळणे हीच पुरोगामित्वाची व निधर्मतेची व्याख्या असल्याने त्यांच्या मौनाचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.

http://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/310716/kashmiri-ou...

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 3:17 pm | संदीप डांगे

मग तुम्ही का गप्प बसलात, त्यांच्या किंचाळण्याची वाट बघत? की तुम्हाला फक्त पुरोगामी व निधर्मवाद्यांविरोधातच बेंबीच्या देठापासून किंचाळण्यात स्वारस्य आहे?

हा प्रकार लैच डोक्यात जातो राव. ते एक्स्ट्रीमिस्ट काही बोंबलले की हे लिबटार्ड्सकडे बोट दाखवणार आणि किंचाळणार, "बघा बघा आता कसे मौन धरुन बसलेत", काय चाललंय काय हे नेहमी नेहमी???

पुरोगामी कोणा विरोधात बोलतात, नै बोलत ह्याच्या नोट्स काढत बसणे ह्याशिवाय हिंदू-एक्स्ट्रीमिस्टची भलामण करणार्‍यांना दुसरं काय येतं?

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी

बातमी वाचल्यावर लगेच तिथे या धमकीच्या विरोधात किंचाळलो होतोच. गप्प बसून राहणे हे निधर्मांधांचं गुणवैशिष्टय. आमचं नाही.

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 7:02 pm | संदीप डांगे

ओके, आम्हाला नई बॉ ऐकू आले तुम्ही किंचाळलात ते?

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 7:18 pm | चंपाबाई

ते सूक्ष्मावस्थेत जाउन किंचाळतात... ०.४ डेसिबलच्या खाली.

ती किंकाळी ऐकु याय्ला तपस्या करावी लागते.

शाम भागवत's picture

2 Aug 2016 - 7:54 pm | शाम भागवत

सूक्ष्मावस्थेत किंचाळणे?

काय भन्नाट शब्दप्रयोग करता हो.

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 10:39 pm | श्रीगुरुजी

असं झालं होय.

गामा पैलवान's picture

2 Aug 2016 - 9:11 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

हिंदू-एक्स्ट्रीमिस्ट म्हनजेम्हणजे काय हो?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

2 Aug 2016 - 9:11 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

हिंदू-एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे काय हो?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 9:32 pm | संदीप डांगे

Extremist म्हणजे काय ते कळत असेल तर कळेल ☺

याकडे लक्ष वेधू इच्छितो. आणि लिबटार्ड्स हे सिलेक्टिव्हच वागतात. म्हणून तर त्यांची विश्वासार्हता ढासळलेली आहे. बाकी हिंदू एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द ऐकून मजा वाटली. वाळवंटात मृगजळ शोधणं आणि हिंदू एक्स्ट्रीमिस्ट शोधणं यात काहीही फरक नाही. दोन्हीही अस्तित्वात नसलेल्या गोष्टी आहेत.

बोलबोलेरो's picture

3 Aug 2016 - 12:37 pm | बोलबोलेरो

+1

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 3:28 pm | चंपाबाई

संघाच्या काश्मिर शाखेला सांगावे.

बोलबोलेरो's picture

3 Aug 2016 - 12:34 pm | बोलबोलेरो

+1

संदीप डांगे,

अहो, एक्स्ट्रीमिस्टचा अर्थ मला माहितीये. पण हिंदू-एक्स्ट्रीमिस्ट हा पदार्थ कुठे मिळतो ते माहीत नाही. भारत शासनानं जंग जंग पछाडूनही सापडला नाही. तुम्हाला सापडला का?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 10:41 pm | संदीप डांगे

भारत शासनाला तर दाऊद पण सापडला नाही अजून... ;))

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 11:07 pm | श्रीगुरुजी

म्हणजे दाऊदप्रमाणे हिंदू एक्स्ट्रिमिस्ट सुद्धा पाकिस्तान मध्ये लपलेय की काय?

चंपाबाई's picture

2 Aug 2016 - 11:20 pm | चंपाबाई

जगभर दुसरे देश असण्याचं भाग्य मुस्लिम ख्रिस्चनांचं ... तॅ सव्वाशे देशात आहेत.... तुमचे सगळे हितेच ... एकाच देशात

उदाहरणार्थ पाकिस्तान, सीरिया, इराक, लेबेनॉन, सोमालिया, इजिप्त, नायजेरिया, बांग्लादेश, येमन इत्यादी..अर्धे तर मुस्लिम देश आधीच खंगलेत आणि उरलेले त्या मार्गावर आहेत। त्यापेक्षा आपला एक भारत बरा कि म्हणायचा।
बाकी साहेब विरोध करा की द्वेष काय म्हणुनी करता, झोप लागती ना नीट.

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 2:39 am | चंपाबाई

तुमच्या नजरेला सगळे खंगलेलेच दिसतात काय हो ?

रुपयाच्या कैकपट असलेले वाळवंटी व युरोपियन नाणी दिसायची बंद झाली का ?

खंगलेले हिंदु असलेलेही देश आहेत... लंका नेपाळ म्यानमार ... कमळाच्या भाजलेल्या बिया विकून पोट भरणारी दरिद्री मुले असणारा कंबोडिया ....

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2016 - 10:42 pm | श्रीगुरुजी

सोपं आहे. जो जो हिंदूंंच्या बाजूने बोलतो, तो हिंदू एक्सट्रिमिस्ट असतो.

कपिलमुनी's picture

3 Aug 2016 - 12:51 am | कपिलमुनी

गोरक्षणाच्या नावाखाली माणसांना अमानुष मारणारे हिंदू एक्सट्रिमिस्ट आहेत

पटलं तर पुढचा उदाहरण सांगतो

अनुप ढेरे's picture

3 Aug 2016 - 10:39 am | अनुप ढेरे

गौ रक्षक दिसत नाहीत काय? बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे माहिती नाहीत काय? हे हिंदू एक्ष्ट्रिमिस्ट नाहीत तर कोण आहेत?

'बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे'
हेच ते. हवे तेच ऐकणे.
नुकताच आलेला गुन्हा संशोधन खात्याचा अहवाल यांच्या गावीही नसतो. मूळ मुद्दा बीफ नसून, गायीची चोरी हा असावा. तू नळी वर गाय चोरीचे कितीतरी विडिओ आहेत. जिज्ञासूंनी पाहावेत.
यांना 2002 दिसतं, पण गोध्रा नाही.
वाणी दिसतो, पण लाख पंडित नाही.
हिंदू एक्सट्रिमिस्ट दिसतो, पण जगभर चाललेला हिंसाचार आणि भारतातील हिंसाचार यातील साम्य आणि त्याची सहज कळू शकणारी कारणे दिसत नाहीत. कारण त्याला धर्म नसतो.
झोपलेल्याला उठवला जाऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसा उठवणार?
शुद्ध लांगुलचालन देशाला कुठे नेणार आहे?
पुरोगामी लोकांना, आर्मीच्या जवानांसमोर ढाल म्हणून उभे केले, म्हणजे सगळे तत्वज्ञान एकदमच कळेल.

viraj thale's picture

3 Aug 2016 - 12:54 pm | viraj thale

वाह

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 1:59 pm | संदीप डांगे

या, तुमचीच कमतरता व्हती...

मुद्दा मुलीना दुचाकी चालवण्याच्या फतव्याबद्दल आहे, तुम्ही गोध्रा, पंडित, आर्मी काय काय घेऊन येताय!☺

तुम्हाला जगभर चाललेला हिंसाचार दिसतो, बुडाखाली काय जळतं तेवढं दिसत नाही...

असो..

अनुप ढेरे's picture

3 Aug 2016 - 2:04 pm | अनुप ढेरे

गायीची चोरी हा असावा.

छान. दलितांना फटके देणारेपण याच कारणाने देत असतील राईट? लांगूलचालन म्हणे.

हिंदू एक्सट्रिमिस्ट दिसतो

दिसणारच! कारण हिंदुस्थानातच रहातो मी. सिरियातल्या/टर्कीतल्या दहशतवादाशी काय देणं घेणं माझं? मला माझ्या परिसराचीच काळजी असणार. अरबस्तानात कोणीतरी जास्तं धर्मांध दंगा करत आहे म्हणून माझ्या देशात जे लोक धर्माच्या आधारावर हिंसा सुरू करत आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं?

झोपलेल्याला उठवला जाऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसा उठवणार?

हेच तुम्हाला लागू आहे.

पुरोगामी लोकांना, आर्मीच्या जवानांसमोर ढाल म्हणून उभे केले, म्हणजे सगळे तत्वज्ञान एकदमच कळेल.

आर्मीचा काय संबंध इथे? आणि गौरक्षक किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक कुठे सीमेवर लाढायला जातात?

बोलबोलेरो's picture

3 Aug 2016 - 5:30 pm | बोलबोलेरो

माझ्या देशात जे लोक धर्माच्या आधारावर हिंसा सुरू करत आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं?

नकाच करू, फक्त सगळ्यांकडे बघा. आपणच म्हणतो कि मोदी आल्यापासून हिंदू एक्सट्रीमीसम वाढला. योगी, भोगी यांची बडबड वाढली. तसेच हेदेखील. पण मोदी येण्याआधीपासून चालू असलेला धार्मिक हिंसाचार का दिसू नये तुम्हाला. तेव्हा दहशतवादाला धर्म एक नसतो? एक्सट्रॅमिस्ट फक्त हिंदूच असतो का?

गौरक्षक किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक

मी गौरक्षक अथवा समर्थक नाही. एखादी दुभती गाय अथवा वासरू पळवून नेल्यास, त्याच्या मालकाचे नुकसान होणार आहेच ना? जी गुरे खाटीकखान्यात मारण्यासाठीच नेली जात आहेत,( वांझ असल्याने )त्याबद्दल आक्षेप नाही.

सीमेवर लाढायला जातात?

मी हे बुर्हाण वाणी समर्थक लोकांवर पेलेट गनच्या वापराबद्दल पुरोगामी जे बोलतात, त्या संदर्भात बोललो.

हे सारे एकत्रित पणे लिहिण्याचे कारण, या साऱ्या घटनात एक नियोजित रणनीती आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे.

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 6:12 pm | चंपाबाई

जी गुरे खाटीकखान्यात मारण्यासाठीच नेली जात आहेत,( वांझ असल्याने )त्याबद्दल आक्षेप नाही

शेतकरी दुभत्या गायी जाणुन्बुजुन मरायला देतात की काय ? नव्या कायद्याने सगळ्याच गोहत्यावर बंदी आहे

बोलबोलेरो's picture

4 Aug 2016 - 10:34 am | बोलबोलेरो

राज्यातले इतके सगळे कत्तलखाने काय बंद झाले कि काय? नाही ना? चालू आहेतच ना?

संदीप डांगे's picture

4 Aug 2016 - 10:49 am | संदीप डांगे

हा हा हा! कत्तलखाने!

चंपाबाई's picture

4 Aug 2016 - 11:10 am | चंपाबाई

कत्तलखाने फक्त गायीसाठीच असतात का ?

बाकीच्या प्राण्यात देव रहात नसल्याने ते कापले तर चालतात.

नकाच करू, फक्त सगळ्यांकडे बघा. आपणच म्हणतो कि मोदी आल्यापासून हिंदू एक्सट्रीमीसम वाढला. योगी, भोगी यांची बडबड वाढली. तसेच हेदेखील. पण मोदी येण्याआधीपासून चालू असलेला धार्मिक हिंसाचार का दिसू नये तुम्हाला. तेव्हा दहशतवादाला धर्म एक नसतो? एक्सट्रॅमिस्ट फक्त हिंदूच असतो का?

धार्मिक हिंसाचार चालू आहे हे तरी मान्य केलत हे थोडकं नाही. आधी चालू होता हिंसाचार म्हणून आता बोलायचं नाही हे काय लॉजिक आहे? का दर वेळेला बोलताना इंझमाम जशी सुरुवात करायचा ''बिस्मिल्ला उल रहमान रहीम, बॉयज प्लेड वेल" तसं "धार्मिक हिंसाचार अरबस्तानात चालू आहे, काँग्रेच्या राज्यात होता, आज गौरक्षकांनी उच्छाद मांडलेला आहे" असं बोलायचं? जे चूक आहे त्याला चूक न म्हणता आधीही हे होतं म आता चूक म्हणू नका ही कसली आर्ग्युमेंट?

मी हे बुर्हाण वाणी समर्थक लोकांवर पेलेट गनच्या वापराबद्दल पुरोगामी जे बोलतात, त्या संदर्भात बोललो.

अजिबात नाही. वरील चर्चेत वाणीचं नाव कोणी घेतलं? वाणी निर्दोष बिचारा आहे हे कोण म्हणालं? विषय नसताना उगाच सैनिकांची नावं घेऊन आपला भांडखोर/घातक अजेंडा पुढे करणं याला काय म्हणायचं? हे सैनिकांच्या नावावर आपली पोळी भाजणं आहे. एकदा सैनिक हा शब्द पुढे केला की भावनिक मुद्दा सुरू करून लॉजिकल चर्चा होणार नाही हे बघायचं हाच अजेंडा असतो यामागे.

संदीप डांगे's picture

2 Aug 2016 - 10:44 pm | संदीप डांगे

गपै, ते हिंदूंच्याच बाबतीत "बेंबीच्या देठापासून किंचाळणारे" तुम्हाला सापडलेत का?

गामा पैलवान's picture

3 Aug 2016 - 2:48 am | गामा पैलवान

हो.
आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 12:46 pm | चंपाबाई

भाजप गुजरातेत लोकप्रियता गमवत आहे... आजचा पेपर

म्हणतातच ना कि एक चित्र / फोटो निशब्द अस्तो पण एक पुर्ण कहाणि सांगुन जातो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

गोळ्या घालून ठार करायला हवी ही कीड!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 9:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

सॉरी हल्लीच झालेल्या काही वैयक्तिक नुकसानासंबंधित गोष्टी आठवल्या, त्या इथे अश्या प्रकारे बाहेर पडायला नको होत्या, पण काय करणार आम्हीपण माणसेच आहोत. :( :'(

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2016 - 2:14 pm | श्रीगुरुजी

काश्मीर मधील सद्यपरीस्थिती दर्शवणारा दुर्दैवी फोटो

हा फोटो तो मुलगा खेळत असताना घेतलेला फोटो आहे. तो मुलगा काही सैनिकांवर दगड मारत नाहीय्ये. असल्या फोटोला गांभीर्याने घेण्याची गरज नाही व या फोटोवरून काश्मीरमधील सद्यस्थिती दिसते वगैरे गैरसमजूत करून घ्यायची गरज नाही. या फोटोतला एक सैनिक घाबरल्याचा अभिनय करतोय तर दुसरा मागे हात बांधून निवांत उभा आहे.

हाच फोटो दुसर्‍या कोनातून बघा आणि हसणारे सैनिक बघा.

अजून एक

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 11:44 am | सुबोध खरे

बापूसाहेब
हे खालचे दोन्ही फोटो न पाह्तासुद्धा मी एक गोष्ट विचारेन
या मुलाचे वय किती असेल? ४-५ वर्षे ?
अशा मुलाला संरक्षक दलांच्या जवानांवर गलोलीने दगड मारावे हे स्वतःच्या डोक्यात येईल का?
मग अशा बाल्काला "कीड" म्हणावे असे तुम्हाला का वाट्ले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 1:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्या फोटो खालची दुसरी कॉमेंट वाचा, काही गोपनीय गोष्टी मी इथे बोलू शकत नाही, हे ध्यानी घेऊनही जर आपल्याला विषय ताणण्यात रस असेल तर माझा निरुपाय आहे डॉक्टर,

रच्याकने, कॉमेंट क्र 2 मधील दिलगिरी आपण वाचलेली दिसत नाही, असो, हल्लीच मिळालेल्या ज्ञानामृतानुसार
People believe what they want to believe

:)

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 1:37 pm | संदीप डांगे

सांगून टाका बापू, बात निकली तो दूर तक जाने दो, :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 2:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही, त्रिवार नाही, मी एक शपथ घेतलेली आहे, ती निभवायची आहे, रिटायरमेंट पर्यंत नाही मरेपर्यंत, हे पित्त पोटात घेऊनच मी लाकडाच्या राशीवर जाणार आहे, ह्याचा ज्याला जो अर्थ काढायचा तो काढो, मी पहिले इमान माझ्या देशाला अन दुसरे माझ्या फोर्सला वाहिलेले आहे. :)

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 2:20 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
काश्मीरची परिस्थिती किती वाईट आहे हे मलाही माहिती आहे ? माझ्या हाताखाली माझ्या बरोबर काम केलेला क्षकिरण तंत्रज्ञ याला ११ वर्षाच्या मुलीने बुरख्यातून पिस्तुल काढून गोळी मारली. तेंव्हा तेथे काम करणाऱ्या इतर सैनिकांची मनोवृत्ती काय आहे हे मी बऱ्यापैकी जाणून आहे.
म्हणूनच हा प्रश्न मी उपस्थित केला.
डांगे अण्णांची भाषा वापरायची असती तर चार वर्षाच्या मुलाला कीड म्हणता याचा अर्थ तुमची विचारसरणी किडकी आहे किंवा तुमचा मेन्दु सडला आहे असे म्हणालो असतो.
सक्रुत दर्शनि ते बरोबर वाटते पण ते तसे नाही हे मीही जाणतो.
तुम्ही माफी मागितली तरी विचारसरणी समजून येतेच अशाही टिप्पणी येतात.
हे मी अनुभवलेले आहे. परंतु माझी पातळी मी सहसा खाली येऊ दिली नव्हती.
आपलीही भाषा संयत आणि विनम्र होती त्यात अलिकड़े झालेला बदल काही पटला नव्हता.
पटत असेल तर पहा अन्यथा सोडून द्या आणि माफ करा
मज पामरासी काय थोरपण
पायींची वहाण पायी बरी .

viraj thale's picture

3 Aug 2016 - 1:31 pm | viraj thale

रायगडमध्ये मोठी दुर्घटना, सावित्री नदीला
आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा
ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, 2 एसटी बससह
छोटी वाहनं बुडाली, 22 जण बुडाल्याची
भीती .

गामा पैलवान's picture

3 Aug 2016 - 1:35 pm | गामा पैलवान

महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघाताची बातमी : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=PABBTA

http://www.esakal.com/eSakal/Photogallery/1/5332701034005429346_Mid.jpg

पुलाची पाहणीबिह्णी करायची काही पद्धत आहे का?

-गा.पै.

viraj thale's picture

3 Aug 2016 - 2:10 pm | viraj thale

पुलाची पाहणी मे महीन्यात करण्यात आलेली होती ,त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुल व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता .

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 4:04 pm | चंपाबाई

शेजारीच काँग्रेसकाळात बांधलेला नवा पूल आहे.

जुन्या पुलाची तपासणी नव्या सरकारच्या काळात मे २०१६ ला झालीहोती व पूल वापरण्यायोग्य आहे असे सर्टिफिकेट दिले होते.

तरीही मोदीभक्त लोक ६० वर्षात काँग्रेसने दुर्लक्ष केले म्हणुन पूल पडला असे कोकलत आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Aug 2016 - 4:53 pm | श्री गावसेना प्रमुख

चम्पा बाइ कसल्या आजाराने पिडित आहे रे तु ,नाही डोक्यावर पडल्यासारखे काय लिहितो ना तु म्हणुन चवकशी करतोय.

गो हत्या विधेयकच मुळात अपूर्ण आणि अर्धवट असून यात सामान्य शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही. गो पालक हे बहुसंख्य हिंदू शेतकरीच आहेत, इथं दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना त्यांचा कुटुंबीयांचा सांभाळ करण मुश्किल होत असताना हि भेकड आणि म्हातारी जनावरे कुणी सांभाळायची, मग किती तरी शेतकरी आशा गाई सोडून देतात किंवा बेकायदेशीर रित्या विकून टाकतात. जालावर ह्या संदर्भात बातम्या उपलब्द आहेत, तसेच ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या लोकांना यातील वस्थूस्थिती कळू शकेल. महाराष्ट्र सरकारने गाई साठी आश्रम खोलनार म्हणून जाहीर केलेलं, कुठे आहेत आश्रम? का 2,3 आश्रम स्थापन केले की काम झालं. शेतीची किंवा पशुपालनाची काही हि जाणीव नसणाऱ्या लोकांचे हे खेळ आहेत. या गो रक्षकानी कधीही गाई च्या शेणाला किंवा मुताला हात लावला नसेल आणि जर ऐवडाच प्रेम असेल तर लोकांचे जीव घेण्यापेक्षा का नाहीत हे ग्रामीण भागात जाऊन म्हाताऱ्या गाई पाळत. म्हातारी गाई खाटीकास विकणे जरी क्रूर वाटत असले तरी त्यास पर्याय नाही आजच्या परिस्थितीत शेतकरी हेच करू शकतो, बाकी ज्यांना प्रेम असेल त्यांनी शेतकऱ्याकडून गाई घेऊन सांभाळ करावा.
बर एकवेळ गाई बद्दल चे प्रेम समजू शकतो पण गो वंश बंदी कायदा कशा साठी? म्हातारे बैल यांचं काय करायचं याचा सरकार ने विचार केला नाही. मध्यंतरी आस ऐकलेलं कि फडवणीस यांनी एक गाई आणून वर्षा वर बांधली होती आणि 4 दिवस नाटक करून ती तिथून हलवली. बर गो रक्षकांना गाई ची वाहतूक दिसते पण त्या गाई खाटीकास विकणारे हिंदू शेतकरीच आहेत हे कोण लक्षात घेत नाही. सरकार आणि गो रक्षकांनी हि भेकड जनावरे पाळावीत आणि हिंदू धर्म वाचवावा हि विनंती.

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 2:07 pm | संदीप डांगे

अमितदादा, ह्यावर बारीक चर्चा झालेली आहे इकडे, तेव्हा फ्याक्टस समोर सो कॉल्ड गौरक्षकांचं पितळ उघडं पडतं असा अनुभव आहे...

अमितदादा's picture

3 Aug 2016 - 2:12 pm | अमितदादा

ठीक आहे मला माहित नव्हतं. धन्यवाद डांगे साहेब .मग ह्या धाग्यावर मी चर्चा थांबवतो.

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 2:16 pm | संदीप डांगे

चर्चा थांबवा असे सुचवायचे नव्हते हो,

जेव्हा जेव्हा गौरक्षक डोके बाहेर काढतील तेव्हा तेव्हा चर्चा झालीच पाहिजे... शहरी भिडू उगाच सॉफ्ट कॉर्नर ठेऊन असतात ते बदलले पाहिजेच
..

अमितदादा's picture

3 Aug 2016 - 6:34 pm | अमितदादा

+1

अर्धवटराव's picture

4 Aug 2016 - 2:56 am | अर्धवटराव

.

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 2:21 pm | संदीप डांगे

नाशिकमध्ये काल नारोशंकर मंदिराची घंटा बुडाली... बुजुर्गांच्या मते ही भयंकर पूर परिस्थिती आहे...

हवामान खाते किमान २४ तासाचे तरी परफेक्ट भाकीत करू शकते असे वाचले होते, जलसंधारण आणि हवामान खात्यात समन्वय नसल्याने ही वेळ आज नाशिककरांवर आली, अन्यथा २४ तास आधीच थोडे थोडे पाणी सोडता येणे शक्य होते...

गामा पैलवान's picture

3 Aug 2016 - 7:19 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

>> शेजारीच काँग्रेसकाळात बांधलेला नवा पूल आहे.

हे बरोबर बोललात पहा. ब्रिटीश म्हणजेच काँग्रेस.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

4 Aug 2016 - 5:29 pm | चंपाबाई

म्हणुन तर तुम्ही लंडनात बsun ब्रिटिशांची सेवा करताय.

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 8:16 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

अहो, तुम्हाला कितीदा सांगितलंय की मी हिंदुहितासाठी इंग्लंडमध्ये आलोय ते. सारखं कसं विसरता तुम्ही.

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 12:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात हिंदू असल्याचा विलक्षण गर्व आहे, अन त्याचे कुठलेही हित व्हावे म्हणून मी तुम्हाला ठेकेदारी/मुखत्यारपत्र दिलेले नाहीये, त्यामुळे , जरा हिशेबात बोला, वैयक्तिक द्रव्यलोभाला हिंदूहित वगैरे मुलामे देण्याचे कारण नाही, अर्थात द्रव्यलोभ वाईट नसतो, किंवा चांगल्या जीवनाची आस सुद्धा वाईट नसते, फक्त ते मान्य करायचा दम लागतो, तो छपरी फॅनटीक लोकांत नसतो.

सारांश :- लंब्याचवड्या फेकायच्या असल्या तर फेका, त्याच्यासाठी धर्म वेठीस धरायचे कारण नाही

गामा पैलवान's picture

4 Sep 2016 - 12:56 am | गामा पैलवान

सोन्याबापु,

हिशोबात बोलायचा नियम तुम्हालाही लागू पडतो ना? चंपाबाई आणि मी काय ते बघून घेऊ. तुम्ही माझ्या हेतूंची काळजी करू नये. तसंही पाहता तुम्हाला काय माहीत की मी द्रव्यलोभापायीच इथे इंग्लंडमध्ये असतो म्हणून? जी गोष्ट अस्तित्वात नाही ती का म्हणून मान्य करावी मी?

हां, मी छपरी फ्यान्याटिक आहे आणि माझ्या अंगात जराही दम नाही. या बाबी मान्य करायला मला आजिबात लाज वाटंत नाही. तसंही पाहता तुमच्या मते मी निर्लज्ज आहेच.

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 8:04 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही अन ती चंपी मेलात तरी मला शष्प फरक पडत नाही, तुम्ही हिंदू धर्माचे नाव घेतले अन खास त्याच्या हिता करता वगैरे लंडनला तंबू ठोकल्याचे काहीतरी बडबडला आहात, मी त्यासंबंधी हिशेब म्हणतो आहे, तुम्हाला धर्महीतकरता पदवी मी (स्वतः एक हिंदू म्हणून) दिलेली नाही, त्या संबंधात पुन्हा एकदा सांगतोय, हिशेबात राहा!!

बापू,कंट्रोल करा हो. कशाला असे बोलताय?

वाद असेल तर प्रतिसाद देऊ नका पण असे काहितरी कशाला?

आतिवास's picture

9 Sep 2016 - 10:31 am | आतिवास

सोन्याबापू,
हल्ली तुमचे अनेक प्रतिसाद पाहता चिंता वाटते.
काळजी घ्या.
वैयक्तिक झाले आहे मी, असं वाटल्यास कृपया माफ करा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Sep 2016 - 12:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

@मोदक अँड सविता ताई,

बरोबर आहे तुमचे! जरा संयम परत मिळवायला हवाय खरा. :/

गामा पैलवान's picture

4 Sep 2016 - 11:53 am | गामा पैलवान

सोन्याबापु,

१.
>> तुम्ही अन ती चंपी मेलात तरी मला शष्प फरक पडत नाही,

मी मेल्याने तुम्हाला फरक पडणार नसेल तर मला हिशेबात ठेवण्याविषयी आपण इतके आग्रही का?

२.
>> तुम्ही हिंदू धर्माचे नाव घेतले अन खास त्याच्या हिता करता वगैरे लंडनला तंबू ठोकल्याचे काहीतरी
>> बडबडला आहात,

तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी हिंदूधर्माचं नाव कुठेही घेतलं नाहीये. धर्मरक्षण हा पार वेगळा प्रांत आहे. हिंदू धर्म आणि हिंदू लोकं या माझ्या दृष्टीने दोन वेगळ्या बाबी आहेत. तुम्ही ज्याला भारतीय म्हणता त्यास मी हिंदू म्हणतो.

शिवाय, जरी इंग्लंडमध्ये तंबू ठोकून बसण्यामागे हिंदूधर्महित गृहीत धरलं तरी त्यात गैर ते काय?

३.
>> तुम्हाला धर्महीतकरता पदवी मी (स्वतः एक हिंदू म्हणून) दिलेली नाही, त्या संबंधात पुन्हा एकदा सांगतोय,
>> हिशेबात राहा!!

न मागितलेली पदवी न दिल्याबद्दल आपले नाभार! असंच हिशोबात रहायचं असतं का हो? म्हंजे, ही हिशोबाची भानगड तुम्ही सुरू केलीये. म्हणून तुम्हालाच विचारून घेतोय.

बाकी, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे.

असो.

एकंदरीत तुमच्या प्रतिमाचौकटीत मी बसत नसल्याने तुमची चिडचिड झालेली दिसते आहे. नागरी आणि सैनिकी चौकटी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. उर्वरित अर्थ जाणून घेण्यास तुम्ही समर्थ आहात.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

3 Aug 2016 - 7:26 pm | गामा पैलवान

अनुप ढेरे,

१.
>> गौ रक्षक दिसत नाहीत काय?

उना येथे दलितांना झालेल्या मारहाणीचा गोरक्षणाशी काडीमात्र संबंध नाही.

२.
>> बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे माहिती नाहीत काय? हे हिंदू एक्ष्ट्रिमिस्ट नाहीत तर कोण आहेत?

अखलाखची हत्या बीफवरून झालेली नाही. त्याने राहुल नावाच्या युवकावर प्राणघातक आक्रमण केलं होतं. त्याचा बदला म्हणून अखलाख अल्लास प्यारा करण्यात आला.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

3 Aug 2016 - 8:08 pm | चंपाबाई

मग केस बीफ बाबत का आहे ?

राहूल हल्ल्याबाबत एफ आय आर वगैरे आहेत का ?

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 2:30 am | गामा पैलवान

चंपाबाई,

कोण म्हणतो केस बीफबद्दल आहे? जो म्हणतो त्यालाच जाऊन विचारा. उ.प्र. पोलिसांच्या मते बीफची केस कधीच नव्हती.

आ.न.,
-गा.पै.

चंपाबाई's picture

4 Aug 2016 - 5:43 am | चंपाबाई

बीफची केस नव्हती तर घरातले अन्न चेकिंगला का दिले ? एकदा बीफ नाही व एकदा बीफ आहे , असे दोन भिन्न रिपोर्ट का आलेत ?

राहुलला धमकी दिली त्याची पोलिस केस आहे का ?

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 1:20 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

राहुल यादवचं वासरू हरवलं होतं. ते अखलकने चोरून कापलं या संशयावरून दोघांची वादावादी झाली. त्यात अखलकने राहुलवर प्राणघातक आक्रमण केलं. म्हणून जमावाने अखलकला जन्नतवासी केलं.

बीफचा संबंध आलाच कुठे? अगदी पोलिसांनी अन्नाची चाचणी घेऊन ते बीफ असल्याचं प्रमाणपत्र दिलं, तरीही या केसचा बीफशी संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

बोलबोलेरो's picture

4 Aug 2016 - 10:48 am | बोलबोलेरो

जे चूक आहे त्याला चूक न म्हणता आधीही हे होतं म आता चूक म्हणू नका ही कसली आर्ग्युमेंट?

चुकीला चूक म्हणायला कोणाची परवानगी नको. पण, चुका फक्त बहू संख्याकांच्या शोधून काढून साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार जो चालू आहे, तो मान्य होणार नाहीच.
एखाद्या मूर्खाची बाष्कळ बडबड, आणि एखाद्या हत्यारबंद माणसाने नियोतीपणे केलेली हिंसा यात फरक आहे. भाजपचे वाचाळवीर जसे आहेत, तसेच इतरही अनेक आहेत, प्रतेय्क पक्षात आहेत.
परंतु , देशाविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारणारे कोण आहेत हे आपण जाणतोच.
वर मी विचारले कि पुरोगामी, दहशतवादासाठी सामाजिक मागासलेपणाचे कारण देताना, त्यात सामाजिक पुढारलेले लोकही सापडू लागल्यानंतर, 'आमचा अभ्यास कमी पडला, यामागे काही वेगळे कारण आहे', अशी प्रांजळ कबुली का देताना दिसत नाहीत? त्यावर कोणीही बोलले नाही.
असो. ताजे उदाहरण घ्यावे, तृप्ती देसाई बाईंनी 5-6 देवळात हवेतसे वागून घेतले, प्रवेश मिळाला, कायदा झाला. पण तृप्ती देसाईंचा आवेश, आणि त्यावर चालणारी पुरोगामी समर्थने हाजीअलीशी मुद्दा अडकलयनंतर बंद पडली, हा केवळ योगायोग मानावा काय?
अजून एक, चर्चा चालू असताना, कोण बोलते आहे यावर घसरून गौरक्षक, समर्थक वैगेरे व्यक्तिगत पातळीवर विशेषणे लावून हल्ले करण्याची गरज नाही. मुद्द्यावर आधारित चर्चा होउ शकते, जर विचारलेल्या शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला तर.
परंतु, रिवाजाप्रमाणे कोणीही मला पडलेल्या पुरोगामी प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. असो.

एखाद्या मूर्खाची बाष्कळ बडबड,

गुजरातेत जे झालं, उ.प्र. मध्ये जे झालं, झारखंडात जे झालं, कर्नाटकात जे झालं ही केवळ बाष्कळ बडबड नाही. प्रत्यक्ष, टीमने, केलेली हिंसा आहे.

रिवाजाप्रमाणे कोणीही मला पडलेल्या पुरोगामी प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. असो.

तुम्हाला केवळ 'त्यांना का नाही सांगत' हाच प्रश्न पडलाय. पण मुद्दा तो नाहीच. असो.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 12:41 pm | श्रीगुरुजी

ताजे उदाहरण घ्यावे, तृप्ती देसाई बाईंनी 5-6 देवळात हवेतसे वागून घेतले, प्रवेश मिळाला, कायदा झाला. पण तृप्ती देसाईंचा आवेश, आणि त्यावर चालणारी पुरोगामी समर्थने हाजीअलीशी मुद्दा अडकलयनंतर बंद पडली, हा केवळ योगायोग मानावा काय?

फेब्रुवारी २०१७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणुक आहे. तृप्ती बाईंनी २०१२ ची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. आता २०१७ मध्ये पुन्हा संधी आहे.

याच तृप्ती बाईंनी ५-६ दिवसांपूर्वी एका तरूणाला भर चौकात चपलेने मारहाण केली होती.

http://www.loksatta.com/pune-news/youth-beaten-up-by-trupti-desai-1274545/

या प्रकरणात या वकील बाईंनी स्वतःच्या हातात कायदा घेऊन मारहाण केली असली तरी ही सेक्युलर व पुरोगामी मारहाण असल्याने याचा माध्यमातून फारसा गवगवा झाला नाही. हीच मारहाण एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्याने केली असती तर एव्हाना सर्व वाहिन्यांवरून यावर जोरदार चर्चासत्रे होऊन त्यात भारतातील हिंदुत्ववाद्यांच्या वाढत्या फॅसिझमबद्दल, कायदा हातात घेण्याच्या प्रवॄत्तीबद्दल व असहिष्णुतेबद्दल निधर्मांधांनी गंभीर चिंता व्यक्त केली असती.

बोलबोलेरो's picture

4 Aug 2016 - 2:10 pm | बोलबोलेरो

+1

चंपाबाई's picture

4 Aug 2016 - 5:04 pm | चंपाबाई

तुमचे हिंदुत्ववादी लोक निष्पाप घोड्यालाही ठार मारतात.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी

गुजरातमध्ये पटेल व इतर उच्चवर्णियांना आर्थिक आधारावर राखीव जागा देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यापूर्वी जाट, मराठा, मुस्लिम इ. घटकांना राखीव जागा देण्याचे वेगवेगळ्या राज्यांचे निर्णय देखील स्थानिक उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. राखीव जागांसाठी हिंसक आंदोलन करून फक्त मालमत्तेची नासधूस होते व त्यात काही जणांचे प्राण जातात व एवढे करून राखीव जागा मिळत नाहीत हे अनेकवेळा दिसून आले आहे. तरी सुद्धा निव्वळ राजकीय स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरून दंगली करूस, नासधूस करून समाजात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न थांबतील असे वाटत नाही.

गुजरातमधील उच्चवर्णियांचे आरक्षण रद्द

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, स्वामी नित्यानंद यांच्यावर टाकलेला बलात्काराचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. बातमी : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/08/blog-post_638.html

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2016 - 8:28 pm | श्रीगुरुजी

सनातन प्रभातच्या प्रचारकी वृत्तावर विश्वास ठेवणे शक्य नाही. हीच बातमी इतर माध्यमातून (इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, मटा, लोकसत्ता, सकाळ, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या इ.) आली असेल तर त्याचा संदर्भ द्यावा.

गामा पैलवान's picture

5 Aug 2016 - 12:41 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

बातमी खरी की खोटी हे बघायचं का वृत्तपत्राची भूमिका बघायची? त्यातूनही तुम्ही सनातन प्रभातमधली बातमी वाचली असेल तर तिच्यात लिहिलंय की इतर वृत्तपत्रांनी ही बातमी दाबून ठेवली आहे. विश्वासार्हता नामक काही चीज अस्तित्वात आहे का नाही?

आ.न.,
-गा.पै.