गाभा:
साखरेचे निरनिराळ्या प्रकारचे पाक असतात
१]साखरेचा घट्ट पाक
२]साखरेचा कच्चा पाक
३]साखरेचा पक्का पाक
४]साखरेचा एकतारी पाक
५]साखरेचा पाक
६]साखरेचा दोन तारी पाक
या सर्व पाकात नेमका काय फरक असतो?.
हे निरनिराळे पाक कुठे वापरले जातात?
हे पाक कसे केले जातात? [क्रुति]
पाक बिघडतो म्हणजे नेमके काय होते?
साखरेचा एक तारी व दोन तारी पाक असतात त्या प्रमाणे आणखिन किति तारी पाक असतात??
मी.पा. मान्यवर यावर काहि माहिति देवु शकतिल का?
प्रतिक्रिया
28 Jan 2009 - 10:15 am | माझी दुनिया
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
बरं झालं हा विषय काढलात ते. मलाही पाकाचे प्रकार हवेच आहेत. पाक बिघडल्याने अनेक पदार्थ बिघडवले आहेत. मिपाच्या जाणकार सुगरणी याविषयी काही माहिती देऊ शकतील काय ?
28 Jan 2009 - 4:49 pm | स्वाती राजेश
साखरेचा पाक हा वेगवेगळ्या पदार्थासाठी वेगवेगळा करतात....
१.साखरेचा पाक म्हणजे ३ वाट्या साखर आणि २ वाट्या पाणी घेऊन उकळी आणायची हा पाक गुलाबजाम(खव्याचे), सुधारस साठी वापरतात. तसेच जर गुलाबजाम मिल्कपावडरचे केले तर २ वाट्या साखर आणि १ वाटी पाणी घेऊन पाक करावा.
याला कच्चा पाक सुद्धा म्हणतात.
२.साखरेचा एक/दोन तारी पाक म्हणजे २ वाट्या पाणी १ वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. उकळी आली की गॅस मंद करावा. २ मिनिटे चांगले उकल्यावर, दोन बोटाच्या चिमटीत धरून पाहावा.पाक बोटाला चिकट लागतो आणि आणि तारा दिसतात..यावरुन एक तारी व दोन तारी ओळखावा. हा पाक रवाबेसन लाडू,मोतीचूर लाडू,राघवदास लाडू, जिलेबी (एकतारी), पाकातल्या पुर्या (दोनतारी).
याला पक्का पाक सुद्धा म्हणतात याचा साखरभात करताना सुद्धा उपयोग होतो.
३.गोळीबंद (पक्का) पाक म्हणजे ३ वाट्या साखर आणि १ वाटी पाणी उकळणे, वाटीत थंड पाणी घेऊन त्यात झार्याने एक थेंब पाक टाकणे त्याची लगेच गोळी होते. मग गॅस बंद करणे. याचा उपयोग पाकतले चिरोटे, शंकरपाळ्या करण्यासाठी होतो.
ही मला असलेली माहिती.....जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.:)
28 Jan 2009 - 9:17 pm | शंकरराव
साखरेचा एक/दोन तारी पाक म्हणजे २ वाट्या पाणी १ वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. ??? :-)
हा नवीन पाक प्रकार म्हणायचा काय ? पाणीपाक
28 Jan 2009 - 5:16 pm | किट्टु
स्वाती,
तुम्ही इतकी छान माहीती दिल्याबद्द्ल धन्यवाद!!! :)
--किट्टु
28 Jan 2009 - 5:21 pm | सुनील
मधुमेह असणार्यांनी कोणत्या प्रकारचा साखरेचा पाक वापरावा?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jan 2009 - 4:55 pm | कवटी
मधुमेह असणार्यांनी कोणत्या प्रकारचा साखरेचा पाक वापरावा?
बिनतारी पाक.
कृती: २ वाटी पाण्यात १ वाटी शुगरफ्री गोळ्या घाला. आणि त्याच्या शेजारी पद्मासनात बसून १७२०४८३५६९ वेळा "पक पक पकाक" म्हणा की झाला पाक तय्यार. फारच झटपट आणि सोप्पी पाकपाकृ आहे ही.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
28 Jan 2009 - 5:24 pm | शंकरराव
गुळाचा पाक करता येतो का ?
28 Jan 2009 - 5:59 pm | स्वाती राजेश
गुळाचा पाक सुद्धा करतात.
तो गुळाची पोळी, तिळाची वडी, तिळाचे लाडू करताना वापरतात.
तसेच डिंकाचे लाडू करताना, गुळ किसून घेण्यापेक्षा, गुळाचा तूप व १ चमचा पाणी घालून पक्का पाक तयार केला तरी चालतो.
28 Jan 2009 - 6:04 pm | स्वाती राजेश
हा पाक कधी पर्यंत उकळायचा, याची टेस्ट कशी करायची ती पुढे दिली आहे....
बेसिक कृती काय? हे सगळयांना माहित आहे हे गृहीत धरून माहिती लिहिली आहे...:)
बाकी जाणकारांनी आपली मते लिहावीत...उदा.पाणीपाक..?
29 Jan 2009 - 1:16 am | प्रभाकर पेठकर
साखर पाण्यात विरघळवली की साखरेचा पाक तयार होतो.
साखरेच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यावे. (उदा. २ वाट्या साखर १ वाटी पाणी.)
ह्या मिश्रणाला उष्णता दिल्याने साखर विरघळण्याची प्रक्रिया जलद होते.
१) साखरेला उष्णता दिल्यावर साखर विरघळते आणि तयार होतो तो 'कच्चा पाक'. वड्यांसाठी वापरतात.
२) ह्याच मिश्रणाला म्हणजे 'कच्च्या पाकाला',जसजशी अधिक उष्णता देत जावे तसतसे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाक दाट होत जातो. असा पाक अंगठा आणि तर्जनी ह्यामध्ये धरून बोटे अलग केल्यावर एकच तार आली तर तो 'एकतारी पाक' म्हणतात.
३) 'एकतारी' पाकास अजून आटवून '२ तारी किंवा ३ तारी पाक' तयार होतो. ह्याला 'पक्का पाक' म्हणतात. हा लाडवांसाठी वापरतात.
४) पक्क्या पाकास अजून उष्णता दिली असता त्यातील बहुतांश पाणी आटून जाते. अशी निव्वळ द्रवीभूत साखर म्हणजे 'गोळीबंद' किंवा 'गोटीबंद' पाक. ह्याचा एक थेंब पाण्यात टाकला असता टणक गोळी तयार होते. असा पाक चिक्की साठी वापरतात.
ह्यापुढेही मंद विस्तवावर पाक ढवळत राहिल्यास साखरेचे पुन्हा स्फटीक (क्रिस्टलायझेशन) तयार होतात. त्याला 'भूरी साखर' म्हणतात. ती काही पेढ्यांना, मिठायांना आवरण देण्यासाठी (कोटींग) वापरतात.
घट्ट पाकाला तीव्र उष्णतेवर ढवळत राहिल्यास साखर जळू लागून आधी तपकिरी नंतर काळा द्राव तयार होतो त्याला 'शुगर कॅरेमल' (मराठी नांव माहीत नाही) म्हणतात. ते कस्टर्ड किंवा इतर परकिय गोड पदार्थात वापरतात. कोकाकोला आणि पेप्सीतही वापरतात.
29 Jan 2009 - 11:07 am | माझी दुनिया
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
ये हुई ना बात ! जेणो काम तेणो थाय, बिजा करे सो गोता खाय !
29 Jan 2009 - 12:44 pm | नितिन थत्ते
चांगली माहिती.
पाक आणखी आटवल्यास लिमलेटच्या गोळीप्रमाणे गोळी बनते काय?
साखरफुटाणे व हलवा करायला कशा प्रकारचा पाक करतात?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
29 Jan 2009 - 1:34 am | शंकरराव
पाणीपाक
बाकी जाणकारांनी आपली मते लिहावीत...उदा.पाणीपाक..?
ठीक आहे तर..
पाणीपाक
क्रुती: २ वाट्या पाणी १ वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवावा(उकळत ठेवावा) शेगडी शेजारी साखरेची बरणी उघडी ठेवावी.
किमान दोन उकळ्या फुट्ल्यावर मंद उष्णतेवर ५ मिनटे जाउ द्यावे .. पणीपाक तयार ;-)
29 Jan 2009 - 6:37 am | धनंजय
मी साखरेचा पाक फार क्वचित करतो. (गोडघाशा असल्यामुळे गोडाचे पदार्थ न शिजवण्यात माझ्या तब्येतीचे भले आहे.)
मी साखरेच्या वाटीस वाटी भरून पाणी घेत असे, आणि "किती" वेळ लागतो म्हणून मनातल्या मनात तक्रार करीत असे. आता तुमच्या मार्गदर्शनामुळे पुढच्या साखरभातासाठी माझे इंधन भरपूर वाचेल!
अवांतर : साखरेच्या पाकात, इतकेच काय साध्या अननसाच्या रसातही भात चांगला शिजत नाही. भात साध्या पाण्यात अर्धा शिजवून मग पाक, फळाचा रस वगैरे गोड पदार्थ घालावेत.
29 Jan 2009 - 2:51 pm | महेंद्र
केरमल म्हणजे साखर असते होय जळकी.... माहित नव्हतं..
आमच्या इथे मुंबैला बेलार्ड पिअर ला ब्रिटानियामधे कारमेल कस्टर्ड मस्त मिळतं.. सोबत चिकन बेरी पुलाव आणि बॉम्बे डक...
क्या बात है...
लेकीन भिडू, अपुन तो अभी डाय्टींग करेला हय.. क्या करनेका, खालिफुकट याद करनेका खानेकी चिजोंको...
29 Jan 2009 - 3:01 pm | शंकरराव
डाय्टींग ला पाणीपाक चे वावडे नाही
सर्व रुतूत चालतो
नो साईड इफेक्ट
ओन्ली विथ
पाणीपाक