होमोसेक्स्युअलिटी -

महेंद्र's picture
महेंद्र in काथ्याकूट
29 Jan 2009 - 10:53 am
गाभा: 

सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअलिटी -
हिंदुस्थान टाइम्स मधला एक लेख आहे रुथ वनिता आणि सलिम किडवई ह्यांच्या पुस्तकावर. ह्या दोघांनी लिहिलेल्या पुस्तकाचे- सेम सेक्स लव्ह इन ईंडिया पुस्तकाचे स्वैर परिक्षण आहे .

मनाला बोचणारा एक उल्लेख आहे ह्या पेपर मधे . अगदी लेखाच्या सुरुवातिलाच, माथेफिरु विश्व हिंदु परिषदेच्या लोकांना हे पुस्तक आवडणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे .
त्या लेखामधे ह्या पुस्तकाचा सारांशदिला आहे. मुळ पुस्तक ४ भागात विभागले आहे.. पुस्तकाची जे काही लिहिलं आहे ते अगदी अफाट मुढतेचा अर्क आहे. हे वाचुन धक्काच बसला.
डिटेल्स इथे वाचा...
http://kayvatelte.wordpress.com/

हिंदु धर्मियांना गृहित धरुन इतर धर्मिय हिंदु धर्माची चेष्टा करतात.. आणि भारतिय न्याय व्यवस्था पण त्याला' कलेची अभिव्यक्ती' म्हणते.. कितपत योग्य आहे??

प्रतिक्रिया

धनंजय's picture

29 Jan 2009 - 11:30 am | धनंजय

हे पुस्तक बरेच जुने आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे.

"हिंदुंना नाउमेद करण्यासाठी" असे तुम्ही म्हणता तसे मला काही वाटले नाही.

वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये लैंगिक व्यवहाराचा स्पष्ट आणि उघड-उघड उल्लेख कधी शृंगारिक तर कधी रूपक म्हणून खूपदा सापडतो. (खरे तर सगळ्याच देशांतल्या पुराणांत आणि मिथकांत सापडतो.) आजवर त्यातून उमेदच मिळत होती, नाउमेद कोणालाच वाटत नव्हती. त्यामुळे त्यापैकी उतारे हिंदूंना (किंवा दुसर्‍या कुठल्या जमातीला) नाउमेद कसे करू शकतील, हे समजत नाही.

अशा प्रकारचे विवेचन मिसळपावावर पुष्कळदा आले आहे. मध्ये "भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा"वर चर्चा झाली (बरे तेव्हा कोणी राजवाड्यांना "हिंदूंना नाउमेद करणारा स्यूडो सेक्युलर" म्हटले नाही - मला स्यूडो सेक्युलरांची यादी माहीत नाही - तेही त्यातलेच का?)

ज्योतिर्लिंगांची स्थाने शिववीर्य पडल्याच्या ठिकाणी आहेत, असे म्हटल्यामुळे नाउमेद होणार्‍यांचा धर्म बराच डळमळीत असला पाहिजे. (वीर्य शब्दाने कसेनुसे वाटते त्या लोकांना व्हिक्टोरियनांनी बेमालूम बाटवल्यासारखे वाटते.) कार्तिकेयाला जन्म घालणारे शिववीर्य अग्नीच्या सुपूर्त केले ही कथा आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक असावी, त्यात लाज वाटण्यासारखे, किंवा नाउमेद होण्यासारखे काय आहे?

माझे स्वतःचे पोलिटिकल व्ह्युज एक्स्ट्रीम राईटीस्ट आहेत . तेंव्हा, अशा स्युडो सेक्युलर लिखाणाची मला ऍलर्जी आहे. आणि मी ह्याचा जाहीर धिक्कार करतो.. आणि पुन्हा एकदा ह्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करतो.

अच्छा, अच्छा. मग ठीक आहे. (म्हणजे बंदी ठीक नाही, तुमचे म्हणणे समजले.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jan 2009 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदु धर्मियांना गृहित धरुन इतर धर्मिय हिंदु धर्माची चेष्टा करतात.. आणि भारतिय न्याय व्यवस्था पण त्याला' कलेची अभिव्यक्ती' म्हणते.. कितपत योग्य आहे??

  • हिंदू धर्म म्हणजे नक्की काय, त्यात शृंगारिक आणि लैंगिक व्यवहारासंबंधी काय लिहिलं आहे याबद्दल थोडी माहिती (मेकॉलेकृत नव्हे, मूळ हिंदू धर्म) दिली असतीत तर विचार करून प्रतिक्रिया देणे सोपे झाले असते. आत्ता मूळ माहिती (पक्षी: हिंदू धर्मात अभिप्रेत असणारा शृंगारिक आणि लैंगिक व्यवहार) नसल्यामुळे प्रतिक्रिया राखून ठेवत आहे.
  • हिंदू धर्म आणि भारतीय न्यायव्यवस्था यांचा भारताच्या घटनेप्रमाणे काहीही संबंध नसावा कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.

धनंजय यांची प्रतिक्रिया खरंच आवडली.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 11:35 am | नितिन थत्ते

=)) =)) =))

तुम्ही जो दुवा दिला आहे त्यावर तर असे लिहिले आहे की बाबर वगैरे मुस्लिम राज्यकर्ते होमो होते. त्याचबरोबर हिंदु पुराणातील काही दाखले दिले आहेत.

मग फक्त हिंदु धर्मियांना गृहित धरुन इतर धर्मिय हिंदु धर्माची चेष्टा करतात असे म्हणण्याचे कारण काय?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सहज's picture

29 Jan 2009 - 11:39 am | सहज

>सेम सेक्स लव्ह इन इंडिया..होमोसेक्स्युअल भारत…

नक्की काय म्हणायचे आहे?

सेम सेक्स लव्ह इन इंडिया = होमोसेक्स्युअल भारत. हा अर्थ काढणे किंवा भाषांतर योग्य आहे का?

असल्यास कसे ते सांगा अन्यथा कृपया शिर्षक बदला. एक्स्ट्रीम राईटीस्ट कडून धोका संभवतो.

दशानन's picture

29 Jan 2009 - 11:44 am | दशानन

खरं तर मला हे काय भानगड आहे मराठीत लिहले असून सुध्दा कळाले नाही :(

* बुध्दि झाली भ्रष्ट वाटतं !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

विनायक प्रभू's picture

29 Jan 2009 - 11:46 am | विनायक प्रभू

होमो ओरीयंटेशन चा धर्माशी संबंध नाही. जगातील सर्व पुरुषांना हे ओरियंटेशन असण्याची शकयता असते. फक्त वन तू टेन स्केल वर २ च्या खाली असेल तर जाणवत नाही. आवडत नाही.

महेंद्र's picture

29 Jan 2009 - 12:09 pm | महेंद्र

शिर्शक बरोबर तर वाटतंय.. तरिही तुम्हाला दुसरे काही सुचत असेल तर जरुर सांगा, मि बदलायला तयार आहे.
केवळ हिंदु देवतांवरच अशा गोष्टी लिहिण्याची हिम्मत कशी काय होते लोकांची?
अशाच प्रकारचे कॉमेंट्स पैगंबरावर करण्याची हिम्मत झाली असती कां ह्यांची?
धनंजय.. तुमची कॉमेंट वाचली.. माझा आ़क्षेप हा केवळ हिंदु देव -देवतांवर केलेल्या आरोपांवर आहे.
बाबर, किंवा खिलजी हे प्रोफेट नाहित, त्यामुळे त्यांच्यावरच्या कॉमेंट्सला अर्थ नाही.

वेदामधे सापडणारा उल्लेख अगदी शब्दशहा घ्यायचा की त्याचा गुढार्थ मनी धरायचा? श्री ज्ञानेश्वरीवर गुढार्थ दिपिका लिहिण्यात आलीआहे . त्यात .. द्न्यानेश्वरीचा भावार्थ आणि लोउकिकार्थाने घेतलेला अर्थ व्यवस्थित पणे नमुद करण्यात आला आहे.
म्हणुन केवळ एखादा ठराविक परिच्चेद घेउन त्यावर एक्स्पर्ट कॉमेंट्स म्हणुन लिहिलेले पुस्तक.... कितपत ग्राह्य धरायचे??

दुसरी गोष्ट.. लेखकाला, हिंदु देव देवता हे अशा लैंगिक संबंधात होते, हे दाखवुन लेखकाने काय साधले?

इथे मुद्दा हा नाही की होमोसेक्सयुअलीटी बरोबर की चुक... इथे मुद्दा हा आहे की ज्या तर्हेने हा मुद्दा पुढे रेटण्यात आला आहे ती पध्दत आणि हिंदु देवतांवरच्या कॉमेंट्स.. ( होमोसेक्स्युअलीटीला ग्लोरिफाय करण्यासाठी) योग्य वाटत नाही..

मित्रांनो, मी जरी एक्स्ट्रिम राइटिस्ट असलो तरिही, रामसेनेने केलेल्या कृत्याचा मी धिक्कारच केला होता. एखादी आय डियॉलॉजी फॉलो करणं म्हणजे माझा ब्लाईंड फेथ नाही...

सखाराम_गटणे™'s picture

29 Jan 2009 - 12:03 pm | सखाराम_गटणे™

होमो सेक्सुअल असने म्हणजे खुप मोठे पाप असल्या सारखे लोक बोलतात. ती सुदधा माणसेच आहेत.

आम्हाघरीधन's picture

29 Jan 2009 - 12:32 pm | आम्हाघरीधन

बहुदा त्यान्चा(टोपिक निर्मात्याचा तसेच सम्बन्धीत पुस्तक लेखकाचा ) काही प्रमाणात गैरसमज झालेला आहे असे वाटते.
गैरसमज टोपिक निर्मात्याचा
'सेम सेक्स लव्ह इन इंडिया = होमोसेक्स्युअल भारत' असे म्हणने चुकिचे आहे.

गैरसमज सम्बन्धीत पुस्तक लेखकाचा
गझनी, बाबर आणी अल्लाउद्दीन खिलजी हे तिघेही मु़ळ भारतीय नाहीत. परन्तु त्यान्नी जो काही प्रकार येथे येवुन केला त्याबद्दल भारताशी केवळ स्थान म्हणुन सम्बन्ध जोडणे यात किती मतीतार्थ आहे हे स्पष्ट होत नाही.

'शंकर हा एक बायसेक्स्युअल होता असेही विधान इथे आहे' याला कुठल्याही वात्रट किन्वा पुचाट पुराण ग्रन्थाचा आधार नाही. मुळात पुराणे ही केवळ काल्पनिक कथा आहेत त्यात कितपत तथ्य आहे हे मानणे धाडसाचे ठरेल.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

अवलिया's picture

29 Jan 2009 - 1:39 pm | अवलिया

हिंदु धर्मियांना गृहित धरुन इतर धर्मिय हिंदु धर्माची चेष्टा करतात..

हिंदू धर्म? .... हा कोणता बुवा नवीन धर्म..?
जरा माहिती द्या बरे या धर्माची? ग्रंथ कोणते? तत्व काय? वगैरे!!
म्हणजे जे काही लिहिले आहे ते त्यानुसार आहे की विपरीत, याचा विचार करता येईल.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jan 2009 - 8:58 pm | llपुण्याचे पेशवेll

महेंद्रराव,
अंमळ हलकेच घ्या हो. असले लेखन बरेच चालते. आणि आपण लई भारी संशोधक असल्याचे भासविण्यासाठी असले सवंग निष्कर्ष काढणेही भाग असते. 'जे जे मिळते ते ते सर्व वाचावे' आणि आपल्याला हवे तसे वागावे. जमल्यास गेंड्याची कातडी घेऊन ठेवणे. मी आताच आफ्रिकेतून मागवली आहे. :)

(मॅटर, अँटीमॅटर अशा वैज्ञानिक अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवणारा)
पुण्याचे पेशवे
Since 1984

टिम्बु's picture

31 Jan 2009 - 5:41 pm | टिम्बु

हिन्दु धर्म अशा सन्शोधनाने काही बदलत नाही.

आम्हि आपुले लिम्बुटिम्बु.

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 5:50 pm | महेंद्र

त्या अशोक राव कवी ची लायकी काय? आणि त्याने असा कुठला दाडगा अभ्यास केलाय की त्याने अशा प्रकारे कॉमेंट्स कराव्या.
आणि त्याला माहिती होतं , की गदारोळ उठणार म्हणुन.. विहप चे लोक ओरडा करणार हे त्याने पहिलेच लिहुन टाकलं..
खरंय म्हणा, नाहितर त्याचं ऐकणार कोण? नाही कां?