काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
काश्मीर - वल्गना आणि वास्तव.
गाभा:
प्रतिक्रिया
25 Jul 2016 - 4:14 pm | श्रीगुरुजी
अनेक भाजप नेत्यांनी ही मागणी जाहीररित्या केलेली आहे. काश्मिर समस्येचे मूळ ३७० व्या कलमातच आहे. याच कलमामुळे काश्मिर हा एक 'देशांतर्गत देश' असा प्रदेश बनलेला आहे. याच कलमामुळे काश्मिरमध्ये उद्योगधंदे निर्माण होऊ शकत नाहीत. याच कलमामुळे काश्मिरींमध्ये वेगळेपणाची भावना जोपासली गेली आहे. याच कलमामुळे काश्मिर इतर राज्यांप्रमाणे भारतात समरस होऊ शकले नाही. याच कलमामुळे तिथली मुस्लिमांची लोकसंख्या अबाधित राहिली आहे. याच कलमामुळे भारतीय संसदेने मंजूर केलेले अनेक कायदे काश्मिरमध्ये लागू करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. याच कलमामुळे पाकिस्तान येथील स्थानिकांना भडकावित असतो. हे कलम काश्मिरला लागू करणे ही गंभीर घोडचूक होती. कोणत्याही मार्गाने हे कलम रद्द करणे अत्यावश्यक आहे. काश्मिरमध्ये आगडोंब कायमच असतो. त्यात नवीन काहीही नाही.
शाखेत कधीही पाऊल न ठेवलेल्यांनाच शाखेतले बौद्धिक म्हणजे बरळणे वाटणार. इथे लिहिलेल्या लेखात तुम्ही स्वत:च किती मूर्खासारखे बरळले आहात हे अनेकांनी दाखवून दिले आहे.
हे अधिकार सैन्याला असायलाच हवे. रक्तपिपासू नरभक्षक जनावरांशी सामना करायचा असेल तर तिथे सैन्याला मुक्तहस्त द्यायलाच हवा.
असले म्हणून काय फरक पडतो? Vivekananda International Foundation, या केंद्राची स्थापना डोवालांच्या निवृत्तीनंतर झालेली आहे. त्यांची पोलिस खात्यातील कारकीर्द अत्यंत चांगली होती. त्यांना काश्मिर प्रश्नात सहभागी करून घेतले आहे यात काहीच नवल नाही. Doval spent six years in Indian High Commission in Islamabad, Pakistan. He went to Kashmir in 1990 and persuaded militants (like Kuka Parray) to become counter-insurgents targeting hardline anti-India terrorists.[6] This set the way for state elections in Jammu and Kashmir in 1996.
खरं तर तुम्ही इथे जे मूर्खासारखे बरळत आहात तेच करमणूक करणारे आहे. अतिरेकी, दहशतवाद, त्यांनी अत्यंत क्रूरपणे केलेल्या निष्पापांच्या हत्या, त्यांच्यामुळे अनेकांना आलेले कायमस्वरूपी अपंगत्व इ. गोष्टींबद्दल चकार शब्द न काढता सैनिकांना शिव्या हासडायच्या ही तथाकथित मानवतावाद्यांची व निधर्मांधांची फार घाणेरडी खोड आहे.
काश्मिरमध्ये जे तरूण आंधळे झाले आहेत त्याला फक्त पॅलेट गन्स कारणीभूत नाहीत. जमावाला आणि त्यात विशेषतः लहान मुलांना सैनिकांवर दगड फेकणार्या निदर्शकांच्या जथ्यात पुढे उभे करून हे भे़कड दहशतवादी त्यांच्या मागून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड्स फेकतात. समोर पहिल्या फळीत लहान मुले असल्याने सैनिकांना गोळीबार करणे खूप अवघड असते. ग्रेनेड्स फुटल्यावर त्यात ठासून भरलेले खिळे, काचांचे तुकडे वेगाने चारी दिशांना फेकले जातात. हेच खिळे, तुकडे सैनिकांच्या अंगात घुसतात व अगदी पुढे उभे असलेल्या निदर्शकांच्या अंगात, डोळ्यात घुसतात. त्यामुळेच अनेकांच्या डोळ्याला इजा झालेली आहे. याच्यासाठी फक्त आणि फक्त निदर्शकच जबाबदार आहेत. सैनिक यासाठी अजिबात जबाबदार नाहीत. ते फक्त स्वसंरक्षण करीत आहेत.
मुळात संचारबंदी असताना या लोकांना ती मोडून रस्त्यावर यायचे कारणच काय? रस्त्यावर येऊन नुसत्या घोषणा देण्याऐवजी सैनिकांवर हल्ले कशासाठी? असे झाल्यावर सैनिकांकडून प्रत्त्युत्तर येणारच. संचारबंदी मोडून रस्त्यावर येऊन सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले केल्याची ही शिक्षा आहे. स्वतःला इजा होऊन द्यायची नसेल तर घरी बसा. नाहीतर जे होईल ते सहन करा. बुर्हान वाणी मेल्यामुळे यांच्यावर कोणता अन्याय झाला आहे? तो अतिरेकी होता. तो मरायलाच हवा होता. तो मेला म्हणून आनंद व्यक्त करायचा का दु:खाने छाती बडवून घ्यायची? या निदर्शकांचा तो कोण लागत होता?
पॅलेट गन्स वापरल्यामुळे यावेळी आतापर्यंत फक्त ४५ जणच मृत्युमुखी पडले आहेत (यात जमावाने मारलेले काही स्थानिक पोलिस सुद्धा आहेत). २०१० मध्ये सैनिकांवर असेच दगडफेकीचे प्रकार सुरू होते. तेव्हा सैन्याने पॅलेट गन्सऐवजी नेहमीच्या गन्स वापरल्या होत्या. त्यावेळी १२५ हून मृत्युमुखी पडले होते. पॅलेट गन्समुळे हाच आकडा खूप कमी झाला आहे हे सुदैव समजा.
सैन्यदल अजिबात अतिरेक करीत नसून ही स्वसंरक्षणार्थ केलेली अत्यंत सौम्य कारवाई आहे. ही कारवाई केली नसती तर आतापर्यंत जमावाने अनेक सैनिकांना मारून टाकले असते.
काश्मिरी कसे निष्पाप आहेत व भारतीय सैन्यच अत्याचारी आहे, पाकिस्तान कसा खट्याळ धाकटा भाऊ आहे, बहुसंख्य पाकड्यांना भारतीयांविषयी कसे प्रेम वाटते, भारतच काश्मिरींवर कसा अन्याय करतो ... तथाकथित मानवतावादी व निधर्मांध यांच्या अशा भ्रामक कल्पनांमुळेच हा प्रश्न आजतगायत चिघळलेला आहे.
तुम्हालाही तेच वाटंतय ना? म्हणे मी ३ वेळा काश्मिरला जाऊन आलो. लगेच तुम्ही काश्मिर प्रश्नावरचे तज्ज्ञ झालात ना!
पुन्हा एकदा अत्यंत मूर्खपणाची विधाने! स्वत:ला काय जेम्स बाँड समजता का? म्हणे मी तिथे सैन्याच्या भरवशावर नाही फिरलो. काश्मिरमधे दरवर्षी हजारो यात्रेकरू अमरनाथच्या यात्रेला जातात, अनेकजण वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातात, तिथे हजारो पर्यटक जातात. हे सर्वजण तिथे जाऊ शकतात कारण तिथे उपस्थित असलेले सैन्य. जर काश्मिरात सैन्य नसते तिथे कोणीही जाऊ शकले नसते व गेलेले जिवंत परत आले नसते.
तोंड वर करून हे सैनिकांना विचारताना लाज नाही वाटली? त्यांच्याच जीवावर पुण्यामुंबईत सुरक्षित राहता, काश्मिरमध्ये उंडारता, इथे येऊन वाटेल ते बरळता आणि त्यांनाच उलटा जाब विचारता? ते नसते तर टॅक्स द्यायला जिवंत राहिला असता का? टॅक्सच्या गप्पा मारताय? ते काय तुमच्या टॅक्सच्या जीवावर जगतात का? ते स्वतःचे काम करताहेत. बिचारे स्थानिकांचे दगड सहन करतात, स्थानिकांच्या शिव्या ऐकून घेतात, अतिरेक्यांच्या गोळ्या खातात, स्वतः घरापासून हजारो मैल दूर राहून देशाचे रक्षण करतात, तुमच्यासारख्या ढोंगी मानवतावाद्यांच्या व निधर्मांधांच्या शिव्या खातात, पाकिस्तानप्रेमींची टीका सहन करतात, अतिरेक्यांचा उमाळा असणार्यांचे शिव्याशाप सहन करतात आणि स्वतः त्यांच्याच जीवावर काश्मिरमध्ये सुरक्षित उंडारताना त्यांनाच तोंड वर करून टॅक्सच्या गप्पा सांगता? हे करताना जनाची नसली तरी मनाची तरी शरम वाटायला हवी. ते स्वतः काम करून पगार मिळवून स्वतःचे पोट भरतात. तुम्ही त्यांना पोसत नाही.
कसला डोंबलाचा वैचारिक विरोध? काहीही बरळलं म्हणजे ते काय वैचारिक लिखाण होतं का? अतिरेक्यांना सहानुभूती दाखवायची, हिंदूंना झोडपायचं, मुस्लिमांचे लांगूलचालन करायचे ही निधर्मांधांची जुनीच पद्धत आहे.
जाट आंदोलन व पटेल आंदोलन हे फुटिरतावाद्यांचे आंदोलन नव्हते. ते देश तोडून मागत नव्हते. ते निष्पापांची गोळ्या घालून व बॉम्ब फोडून हत्या करीत नव्हते. याउलट काश्मिरींचे आंदोलन आहे. त्यामुळे आंदोलन हाताळणीत फरक असणारच.
आणि धुमाकुळाचं म्हणाल तर खालील वाक्ये तुमच्याच लेखातील आहेत हे विसरलेले दिसताय.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
PDP पहिल्यापासून फुटीरतावादी आहेच. आता BJP त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे अशी आता ५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय.
नॅशनल कॉन्फरन्स बजेट आणि निधी साठी भारताबरोबर, भावनिक ऍडव्हान्टेज करिता काश्मिरीयत बरोबर आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्याकरिता पाकिस्तान बरोबर अशी सोयीस्कररित्या भूमिका घेते.
सैन्य नक्की काय करीत आहे हे प्रत्येकाला समजण्याची गरजच नाही. इस्रोतील शास्त्रज्ञ नक्की काय करतात हे आपल्यापर्यंत येतच नाही, पण त्यांचे काम उपग्रह सोडणे, अग्निबाण सोडणे यातून दिसते. सैनिकांचे तसेच आहे. काश्मिरमध्ये स्थानिकांचा उद्रेक फक्त काही विशिष्ट भागात होत आहे. संपूर्ण काश्मिरमध्ये उद्रेक होत नाही. जम्मू व लडाखमध्ये हे चित्र दिसत नाही. श्रीनगर खोर्यात सुद्द्धा काही ठराविक भागातच तो होतो कारण तिथेच फुटिरतावादी संख्येने जास्त आहेत.
काश्मिरमधील फक्त पीडीपी फुटिरतावादी नसून नॅकॉसुद्धा फुटीरतावादी आहे. जे चाललंय त्याला फक्त काश्मिरीच जबाबदार आहेत. अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबविले, फुटिरतावाद सोडून दिला, आपण शांतपणे जगून इतरांनाही शांतपणे जगून दिले, सैन्यावर व पोलिसांवर हल्ले केले नाहीत तर त्यांना काहीही त्रास होणार नाही.
25 Jul 2016 - 8:21 pm | अनुप ढेरे
हे का बरं?
25 Jul 2016 - 4:16 pm | मृत्युन्जय
सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.
वैचारिक विरोध करणे समजु शकतो. पण सोन्याबापूंसारख्या आदरास पात्र व्यक्तीबद्दल इतका दुराग्रही प्रतिसाद नक्कीच समजण्यापलीकडचा आहे. तुमच्या मनात सैनिंकांबद्दल आणि सैन्याबद्दल कमालीचा कडवटपणा आहे एवढेच यातुन सिद्ध होते. आमच्या सारख्या सामान्य माणसांसाठी सोन्याबापु सैनिक आहेत ही एक गोष्ट त्यांचा आदर करण्यासाठी पुरेशी आहे. त्या आदराचे रुपांतर अनादरात व्हावे असे अजुन त्यांच्याकडुन काही घडलेले नाही. त्यामुळे तुमचे वरील वक्तव्य खुपच जास्त खटकले.
25 Jul 2016 - 5:18 pm | नाखु
सुबुद्धी देवो (अता तरी) इतकेच म्हणणे माझ्या हातात आहे.
पुण्यात सुरक्षीत असलेला नाखु चाकरमानी
26 Jul 2016 - 5:49 pm | कहर
असे करू .. आम्हीही देतो तुम्हाला गोळ्या गणवेश आणि बूट.. आमच्या टॅक्स मधून .. जावा काश्मीर मध्ये .. जमावाला तोंड द्या आणि गुलाबाची फुले वाटून काश्मीर प्रश्न सोडवून या ... नंतर तुम्ही म्हणाल ते मान्य करू
25 Jul 2016 - 12:28 pm | गामा पैलवान
संदीप ताम्हनकर,
>> गामा पैलवान या आयडीने आफ्स्पा कायदा पाहावा ही विनंती, या अंतर्गत सैन्यबलांना मिळालेले अधिकार पाहावे.
इथे जम्मूकाश्मीरास लागू केलेल्या आफ्प्सा ची माहिती आहे :
https://en.wikipedia.org/wiki/Armed_Forces_(Special_Powers)_Act#The_Armed_Forces_.28Jammu_and_Kashmir.29_Special_Powers_Act.2C_1990
मला यात काहीही वावगं दिसंत नाही. काश्मिरात युद्ध चालू आहे. सैनिकांची किमान काळजी घेतलीच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
25 Jul 2016 - 12:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
ताम्हनकर, देव तुमचे अन ह्या देशाचेही भले करो, इतकीच काय ती सदिच्छा मी व्यक्त करू शकतो.
जय हिंद :)
25 Jul 2016 - 12:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.
वरील ठळक केलेले मत मी कधी मांडले ते जरा दाखवून दिलेत तर बरे होईल ताम्हनकर साहेब. बाकी ते मी मी सुद्धा कधी केले ते सांगाच ही विनंती करतो तुम्हाला, काश्मिरात तुम्ही गाडी घेऊन फिरलेले वर्णन हे "मी मी" मध्ये धरावे काय? ;)
25 Jul 2016 - 12:48 pm | प्रीत-मोहर
बापुसाहेब आणि गुरुजींच्या अनेक प्रतिसादांशी बाडिस
25 Jul 2016 - 12:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू नावाचे आयडी जगप्रसिद्ध सर्वद्न्य असल्याच्या थाटात व्यक्त होतायत. त्यांची गणना कशात करायची हेपण स्वतःच सांगतायत हे एक बरे.
आपणाशी (आपला अभिनिवेष अन बायस पाहूनही) आम्हाला चर्चा(?) करावी वाटली तेव्हाच आम्ही आरश्याम्होरं स्वतःच गाढवपन मान्य केलतं, बाकी सर्वज्ञ असल्याप्रमाणे कोण बोलतंय हे मी वेगळे खास सांगायची गरज उरलेली नाही, त्याविषयी आमचे कष्ट वाचवले बद्दल आभारी आहोत.
25 Jul 2016 - 2:31 pm | sश्रिकान्त
सैन्य अाणी अर्धसैन्य यातील फरक समजतॊ का आपल्याला,!
जाट,पटेल आंदॊलन आसॊ वा श्रीनगर िे तथे अर्धसैिनक बळ वापरले जाते.
25 Jul 2016 - 2:35 pm | अमितदादा
लेखक साहेब तुमी मांडलेला मुद्दा गंभीर असल्याने गुद्यावर येवू नये हि विंनंती. तुमच्या खालील मुद्याशी सहमत "कलम ३७० रद्द करा ही सुद्धा अतिराष्ट्रवाद्यांची आवडती पण अव्यवहार्य मागणी आहे. सध्याच्या भाजपा सरकारने तसे नुसते सूतोवाच करून पाहावे, मग काश्मीर मध्ये जो काही आगडोंब उसळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही." तसेच "वैचारिक विरोधकाला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करायचे." परन्तु आपण हेही लक्ष्यात घ्या कि काश्मीर मध्ये आंदोलन हे जाणीवपूर्वक हिंसक ठेवण्यात येत आहे तसेच दगड फेकी साठी लहान मुलांचा वापर करून घेण्यात येत आहे जेणेकरून जर ते जखमी जाले तर जागतिकपातळीवर भारताची बदनामी करता येयील. आफ्स्पा कायदा हा हटवण्याची गरजच आहे परंतु त्या बरोबर हे हि लक्षात घ्यायला हवे कि आर्मी आफ्स्पा शिवाय अंतर्गत सुरक्षा राखू शकत नाही, म्हणून आफ्स्पा हटविण्य आदी पोलीस बल अत्यंत सक्षम कराय हवे. तसेच राज्य सरकार हे आणखी सक्षम कराय हवे तरच तेथील लोकांचा लोकशाही आणि शांततेवर विश्वास बसेल, सध्या सगळे निर्णय भारत सरकर घेत आणि राज्य सरकार फक्त बाहुले वाटत आहे. सध्या भारत सरकार ची भूमिका स्वतःचा जाळ्यात फसलेल्या कोळ्यासारखी वाटतीय, कठोर भूमिका हि घेवू शकत नाही आणि soft भूमिका पण घेवू शकत नाही, त्याचमुळे हि धरसोड आणि गोंधळ दिसून येतोय. मार्ग कोणतेही वापरले तरी काश्मीर भारतात शांतीने राहावा हीच इच्छा .
25 Jul 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी
इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि' यावर बरेच प्रतिसाद आले आहेत. याचा मूळ संदर्भ खालील प्रतिसादात आहे.
http://www.misalpav.com/comment/856324#comment-856324
भाऊ तोरसेकर हे नाव वाचून खि खि खि किंवा ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करण्याचे प्रताधिकार खालीमुंडी पाताळधुंडी उपाख्य कै. विवेक ठाकूर उपाख्य कै. संजय क्षीरसागर यांच्याकडे आहेत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
25 Jul 2016 - 3:24 pm | संदीप डांगे
????????
25 Jul 2016 - 7:04 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
खॅ खॅ खॅ खॅ
कीव येते!!!
तो मी नव्हेच,
कसं कन्फ्यूज केलं.
.
.
खॅ खॅ खॅ खॅ
25 Jul 2016 - 5:11 pm | संदीप ताम्हनकर
https://youtu.be/ov5GmC5owLc
https://youtu.be/beaNUeyb9N4
कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा ....
दिलीप पाडगावकरांनी मिओपिया - हृस्वदृष्टिदोष असा शब्द वापरलाय.
25 Jul 2016 - 6:06 pm | प्रसाद_१९८२
तुम्ही दिलेल्या दुव्यात ते काश्मिरी जे म्हणतायत तेच
श्रीगुरुजीं त्यांच्या प्रतिसादात म्हणतायत. जर बरोजगारी काश्मिर मधून हटवायची असेल तर कलम ३७० आधी हटवायची गरज आहे.
25 Jul 2016 - 6:11 pm | अनुप ढेरे
महाराष्ट्रामध्ये MIDC नावाचा प्रकार असतो. त्या जमीनी उद्योगपतींच्या मालकीच्या असतात का सरकारच्या?
26 Jul 2016 - 9:30 am | सुबोध खरे
एम आय डी सी मध्ये जमीन मालकाच्या नावानेच असते. माझ्या भावाची अंबरनाथ येथे आहे.
25 Jul 2016 - 6:24 pm | अप्पा जोगळेकर
साहेब,
सई ताई तुमच्या कोण ?
प्रसिद्धी मिळवण्यात आपण त्यांनाही मागे टाकले म्हणून विचारले.
25 Jul 2016 - 7:10 pm | सुबोध खरे
शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून
शांत अशा पुण्यातील यंत्रणा कशी आहे याची तीन उदाहरणे
सगळीच्या च्या सगळी चक्षुर्वैसत्यं आहेत.
१९८४ साली माझ्या बाजूच्या खोलीत राहणार माझा वर्गमित्र राजेश कुमार सिंह याला वानवडीच्या कमांड रुग्णालयाच्या बाजूला श्री शरद पवार यांच्या "चमच्या"ने सुऱ्याने पोटात भोसकले. वळून पहिले असतात हा तो नव्हताच (mistaken identity). काहीही चूक नसताना हा जमिनीवर पडला. आमच्या काही मित्रांनी त्याला लगेच कमांड रुग्णालयात नेले दोन तासात त्याला शल्यक्रिया गृहात हलविले कारण अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. शल्यक्रियेसाठी आमचे अधिष्ठाता (डीन) मेजर जनरल एच सी पुरी (FRCS) स्वतः आले होते. पोटात एक लिटर च्या वर रक्त साकळले होते. केवळ तो रुग्णालयाच्या जवळ होता म्हणून वाचला. यानंतर पोलीस केस केली. हे दोन चमचे वानवडी बाजार कोंढवा परिसरात दोन तीन दिवस राजरोसपणे फिरत होते.पण ते काही पोलिसांना "सापडत" नव्हते. आणि गम्मत म्हणजे त्यांच्या वर आपल्या दयाळू राज्याच्या पोलिसांनी मनुष्यवधाचा प्रयत्न कलम लावलेच नव्हते. ए एफ एम सी चे कमांडंट लेफ़्ट. जनरल दैत्यारीनी पंचाच्या आयुक्तांना फोन करून स्वच्छ शब्दात सांगितले कि जर तुमच्याच्याने या गुंडाना पकडणे जमणार नसेल तर मी लष्करी पोलिसांना सांगतो. त्यानंतर जे काही होईल ती तुमची जबाबदारी असेल. यानंतर तीन तासात ते गुंड जेरबंद झाले राजेशकरवी त्यांची ओळख परेड झाली आणि त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर त्यांना जामीन मिळाला. ती केस १९८९ साली कोर्टात उभी राहिली तोवर "कॅप्टन" राजेश कुमार सिंह श्रीलंकेत ११ राजपुताना रायफल्स चा मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी वर तैनात होता. तीन समन्स एक महिन्याच्या अंतराने मिळाली आणि महत्त्वाचा साक्षीदार हजर न राहिल्याने एकतर्फी निकाल लागून दोघे पुराव्याअभावी सुटले. याविरुद्ध लष्कराने अपील केले तर ती केस परत १९९८ साली जिल्हा आणि सत्र न्यायालयात उभी राहिली तेंव्हा "मेजर " राजेश कुमार सिंह सियाचेन बेस कॅम्पला रुग्णालयात भूल शास्त्र तज्ज्ञ म्हणून तैनात होते.
मी राजेश ला २००० साली ज्युनियर कमांड कोर्स च्या वेळेस विचारले. तेंव्हा तो म्हणाला श्रीलंकेतून किंवा सियाचेन वरून परत येणे शक्य नव्हतेच पण मुळात केस सरकारने अशी चालवली होती कि त्यांना शिक्षा होणे शक्यच नव्हते. त्यामुळे उच्च न्यायालयात अपील करण्यात काही हशील नव्हते.
२) माझा रुम पार्टनर आणि दुसरा एक वर्गमित्र पुण्यात निलायम थिएटर मध्ये दुपारी तीनच्या सिनेमा साठी गेले असताना एका माणसाने त्यांना तिकिटे हवी आहेत का ते विचारले या दोघांचा समज असा होता कि या माणसांना सिनेमाला जायचे नाही म्हणून ते तिकीट विकत आहेत.यांनी तिकिटे घेतली आणि त्याला दोन तिकिटांचे २० रुपये दिले. त्यावर त्याने याना शिव्या दिल्या कारण तो तिकिटाचा काळा बाजार करणारा होता. शिव्या दिल्याने आमचा दुसरा वर्गमित्र गरम झाला ( तो जाट आहे). यावरीन त्यांची "बा"चा"बा"ची झाली आणि तेथे हजर असलेल्या पाचसहा काळा बाजार करणाऱ्या समाजकंटकांनी यांना मारहाण केली. त्यावेळेस तेथे हजर असलेले सध्या वेशातील दोन पोलीस गंमत पाहत उभे होते. हे दोघे संतप्त होऊन हॉस्टेल ला परत आले आणि हॉस्टेल वरून वीस जण हॉकी स्टिक्सघेऊन दहा मोटार सायकलवर परत साडेपाच च्या शो साठी आले. दहाही मोटार सायकल रस्त्यावर चालू स्थितीत चालक त्यावर बसून होते. या दहा जणांनी प्रथम त्यादोघांची बाचाबाची झाली त्यांना पकडून मारायला सुरुवात केली त्या वेळेस ते दोघे सध्या वेषातील पोलीस पुढे आले. (खाल्या मिठाला जागून). या दहा जणांपैकी एकाने त्यांना सांगितले तुम्ही मध्ये पडू नका बाहेर आमची अजून दहा माणसे आहेत. यावर ते शेपूट घालून निघून गेले. जसे जसे एका एका काळा बाजारवाल्याची पिटाई होत होती तसे तेथे रांगेत उभ्या असलेल्या जनतेने "हा" पण काळा बाजार करत होता म्हणून त्यांना पकडून दिले.आणि जनतेतील बऱ्याच लोकांनी पण त्यात हात धुवून घेतले. असे सात आठ काळा बाजारवाल्याना यथेच्छ ठोकून होईस्तोवर पोलीस आले तोवर आमचे वीसही जण हॉस्टेल वर परत आले.
दुसरया दिवशी सकाळ (आणि इंडियन एक्स्प्रेस) मध्ये बातमी आली कि लष्करी जवानांनी (?) काळा बाजार करणाऱ्या गुंडांची यथेच्छ पिटाई केली आणि पोलीसानी फक्त बघ्याची भूमिका घेतली पण सामान्य जनतेने काळा बाजार वाल्याना पकडण्यात लष्कराची मदत केली. या बातमी नंतर पोलीस जागे होऊन आमच्या हॉस्टेलवर चौकशीसाठी आले. तेंव्हा आमच्या डीन नि तुम्ही काळा बाजार वाल्याना "पकडणार" असलात तरच मी चौकशी करू देईन अन्यथा नाही अशी भूमिका घेतल्याने पोलिसांचा नाईलाज झाला.
३) महात्मा गांधी रॉड कॅम्प च्या कोंढवा बाजूला पुल्गेट पोलीस चौकी आहे तेथे तैनात असलेल्या दोन पोलिसांनी ए एस पी टी च्या जवानाच्या बायकोची छेड काढली. हा जवान बायको बरोबर रात्रीच्या सिनेमाहून सायकल वर परत येत असताना त्याला थांबवून त्याच्या बायकोला तू बुधवार पेठेत धंदा करतेस का इ. अश्लील प्रश्न विचारले. जेंव्हा या जवानाने त्याच्यावर आक्षेप घेतला तेंव्हा त्याला मारहाण केली. बायको बरोबर होती म्हणून हा काही न बोलता तिला घेऊन परत आला. तिला घरी परत सोडून तो रात्री सुभेदार साहेबांच्या घरी गेला आणि त्याने त्या पोलिसांना गोळी मारण्यासाठी बंदूक मागितली. सुभेदार साहेबाना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी हा प्रकार कमांडिंग अधिकाऱ्याच्या कानी घातला. कमांडिंग अधिकाऱ्याने सर सैनिकांना पहाटे पाच वाजता रूटमार्चची ऑर्डर काढली. सहा शक्तिमान ट्रक तयार झाले. पाच शक्तिमान सासवड च्या दिशेने रवाना झाले.आणि सहावा पुलगेट ला आला तेंव्हा ते दोन्ही पोलीस दारू पिऊन शांत झोपले होते त्यांची यथेच्छ पिटाई केली आणि तो शक्तिमान सासवड च्या दिशेने रवाना झाला.दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चौकशी केली तेंव्हा ए एस पी टी चे सर्व जवान सासवड गेल्याचे कळले.घाईने पोलीस तेथे पोहोचले तेंव्हा जावं आपल्या परेड नंतर तंबूमध्ये विश्रांती घेत होते.
मी ए एस पी टी चा एक अधिकारी रुग्ण म्हणून आला असता त्याला विचारले कि तुम्ही कायदा हातात का घेतला/ तेंव्हा तो मला म्हणाला "डॉक्टर शहरात राहून हे सर्व बोलणे ठीक आहे. हा जवान राजस्थानचा आहे. त्याच्या बायकोची छेड काढली आणि त्याने काहीही केले नाही असे त्याच्या मित्रना समजले तर त्याला ते नपुंसक समजतील हि भीती असते. यामुळे हा जेव्हा केंव्हा हातात बंदूक येईल तेंव्हा तेथे जाऊन गोळी घालण्याची शक्यता आहे.
तुम्ही पोलिसात तक्रार केली तर त्याला आणि त्याच्या बायकोला पोलीस खेटे मारायला लावतील वर बायकोला "अश्लील" असे प्रश्न विचारून लाजिरवणे करून सोडतील. केस उभी राहील तेंव्हा हा असेल मेघालय नाहीतर काश्मीर मध्ये आणि बायको असेल बिकानेर जवळच्या खेड्यात. ते दोघे येणार केंव्हा आणि त्यांना न्याय मिळणार केंव्हा आणि कसा? कारण येथे कुंपणच शेत खाते आहे. कारण येथे कुंपणच शेत खाते आहे. शिवाय लष्कराची अब्रू वेशीवर टांगली जाते-- लष्करी माणसाच्या बायकोची छेड काढली तरी लष्कर काहीच करू शकले नाही.
या परिस्थितीत तुम्हाला अधिकारी म्हणून काहि वेळेस कायदे बाह्य वर्तन करावे लागते.
या आपल्या शांत आणि सुशिक्षित पुण्याच्या चक्षुर्वैसत्यं हकीकती
दहशतवादी आणि अतिरेकी याना मानवी हक्क आहेत लष्करी जवानांना नाहीत का? याबद्दल सविस्तरपणे नंतर.
क्रमशः
25 Jul 2016 - 7:39 pm | कपिलमुनी
वर्दी कोणतीही असो आत माणसे असतात !
कहाण्या दोन्ही बाजूंनी आहेत !
पुण्यात पिंपळे सौदागरमधे १० वर्षाच्या पोरीवर दोन सैनिकानी बलात्कार केला . ( आणि कुणाच्या वडिलांकडे ५-६ ट्रक माणसे नसतात जाउन जाब विचारण्यासाठी )
बलात्कार सिव्हिलीयन पण करतात आणी सैनिक सुद्धा !
तुम्ही वर दिलेली उदाहरणे सर्वसामान्यांच्या बाबतीत सुद्धा घडली आहेत आणि घडत आहेत.
सगळे आर्मी वाले फार सभ्य असतात्त असे मुळीच नाही . तळेगावला CRPF चा कॅम्प आहे . ३० वर्षे तिथली माणसे जवळून बघतो आहे . ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कर केलेल्या माणसाला अटक करता आली नव्हती.आणी शिक्षा झाली नाही. गावात वाद झाला की ट्रक भरून माणसे आणून दंगा करणे , बाजार बंद पाडणे ही उदाहरणे खुपदा पाहिली आहेत . नगर मधे सुद्धा आर्मी वाले त्रास देतात.आर्मीवाल्यांची चक्षुर्वैसत्यं उदाहरणे सुद्धा खुप आहेत.
फक्त ते अपवाद असतात आणी या व्यतिरीक्त ते करत असलेली देश सेवा यामुळे लिहिला नव्ह्ता . फक्त
पण आपला तो बाब्या म्हणत असाल तर ते चुकीचाच आहे.
25 Jul 2016 - 7:57 pm | सुबोध खरे
मुनीवर
कायदा दोन्ही कडून हातात घेतला जातो. गरिबाला न्याय कुठेच मिळत नाही. श्रीमंत लोक न्याय विकत घेऊ शकतात.
डबक्यात दगड टाकण्याची तुमची सवय जात नाही.
फक्त लष्करी माणूस एका जागी स्थिर नसतो किंवा त्याच्या मागे राजकीय पाठबळ नसते त्यामुले त्याला न्याय मिळाला असे फार क्वचित दिसते. केवळ अस्थिरतेचे हि शिक्षा लषकरी किंवा निमलष्करी दलाना भोगावी लागते. लष्करी माणसाने केलेल्या गुन्ह्याची सुनावणी होऊन शिक्षा फार पटकन मिळते अन दिरंगाईमुळे गुन्हेगाराळ फायदा मिळत नाही. कोर्ट मार्शल या प्रकाराला सैनिक किती घाबरून असतात याची तुम्हाला कल्पना येणार नाही.
वरील उदाहरण मी केव्हा "शांत पुण्यात" लष्करी माणसाला किती न्याय मिळतो हि दुसरी बाजू दाखवण्यासाठी लिहिले आहे मग काश्मीर मध्ये जनता पूर्ण विरोधात असताना काय आणि कसा न्याय मिळेल याचा विचार होणे तितकेच आवश्यक आहे.
25 Jul 2016 - 7:47 pm | अमितदादा
डॉक्टर साहेब तुमचे अनुभव नेहमीच वाचनीय असतात. तुम्ही नाण्याची एक बाजू सांगितली दुसरी बाजू हि तुमीच सांगावी हि इच्छा. काश्मीर तसेच इशान्य भारतातील परिस्थिती भारतीय जवानांनी मोठया बलिदानाने काबूत आणली असली तरी अश्या अशांत प्रदेशात लष्कर नेहमीच साम दाम दंड भेद नीती वापरते, अश्यातून त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. काश्मीर किंवा ईशान्य भारतात जवनांकडून झालेल्या फेक एन्काऊंटर आणि स्त्रिया वरील अत्याचारात नक्कीच थोडंफार तथ्य असणार हे नाकारून चालणार नाही. आपण डोळे मिटून हे असले काय प्रकार झालेच नाहीत असे म्हणणार असू तर चर्चे मध्ये काही अर्थ नाही. नाण्याची दुसरीबाजू तुमच्याकडून किंवा सोन्याबापू कडून जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे.
25 Jul 2016 - 10:35 pm | सुबोध खरे
काश्मीर किंवा ईशान्य भारतात जवनांकडून झालेल्या फेक एन्काऊंटर आणि स्त्रिया वरील अत्याचारात नक्कीच थोडंफार तथ्य असणार हे नाकारून चालणार नाही.
अठरा वर्षापर्यंत भारतीय जनतेत राहणारा माणूस लष्करात भरती झाल्यावर सद्गुणांचा पुतळा होईल हा अपेक्षा चूक आहे. लष्करी शिस्त हि त्यांना एका मर्यादे पर्यंत काबूत ठेवू शकेल. बलात्काराच्या घटना घडल्या आहेतच. उदा. एका अतिरक्याने आपला जोडीदार मारला याच्या रागाने एका सैनिकाने त्या अतिरेक्याच्या ५० वर्षाच्या आईवर बलात्कार केला. अशा घटना घडतात त्या समर्थनीयही नाहीतच आणि अशा सैनिकांना शिक्षा हि होतातच.
परंतु आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी अरुंधती रॉयसारख्या नालायक बायका बेफाट विधाने करतात आणि त्यांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलं पत्रकार अफाट प्रसिद्धी देतात तेंव्हा संताप येतो.
फेक एन्काउंटर हा एक वेगळा विषय आहे- जवळ जवळ ९९ % केसेस मध्ये नक्की माहित आहे कि हा माणूस दहशतवादी आहे परंतु त्याला अटक केल्यास त्याच्यावर गुन्हा सिद्ध करण्यास एकही माणूस तुम्हाला साक्षीदार मिळणें शक्य नसते. अशा वेळेस त्या अतिरेक्याला संपवणे हा एकच वास्तव उपाय असतो. मग तो कायद्याच्या बाहेर असला तरीही. १९९० च्या आसपास असे बऱ्याच वेळेस घडलेले आहे. माझा एम डीचा मित्र हा उडी येथे होता. त्यांनी एका दहशतवाद्याला पकडले आणि पोलिसांना सुपूर्द केले दोन दिवसात तो जामिनावर बाहेर आला आणि त्याला पकडणाऱ्या सैनिकाला धमकी देऊन म्हणाला कि मी तुला एक महिन्यात मारतो कि नाही ते पहा. पुढच्या आठवड्यात तो चकमकीत मारला गेला
25 Jul 2016 - 10:45 pm | कैलासवासी सोन्याबापु
बरं हे अनुभव अपवाद नाही तर रुटीन आहेत!!! , कश्मीर मध्ये अजूनही भयानक प्रकार सुरु आहेत अन मला खूप इच्छा असूनही जास्त बोलता येणार नाहीये, त्यामुळे मी आपला खरे सरांना प्लस वन देतो बापडा
डॉक्टर साब,I take the liberty to assume that, At least u can understand the reasons, best known to both of us, behind me becoming a mauni baba on experience sharing. :)
उद्या ऑफ द रेकॉर्ड जमल्यास एक गंमत सांगेल एकंदरीत रागरंग पाहून (तोवर धागा न उडल्यास) :P
25 Jul 2016 - 10:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
जागा हुकली, रुटीन अनुभव म्हणजे डॉक्टर साहेब बोललेले उडी, गुरेज वगैरे चे अनुभव म्हणतोय मी, बलात्काराचे नाही :)
25 Jul 2016 - 10:47 pm | अमितदादा
प्रतिसाद आवडला खरे साहेब. काश्मीर स्वतंत्र द्या असे म्हणणाऱ्या अरुंधती रॉय सारख्या कंपू मध्ये आम्ही नाही आहोत, तसेच बळाचा वापर करून दमण करून काश्मीर विषय संपवू आस म्हणाऱ्यांचा कंपू मध्ये सुद्धा आम्ही नाही आहोत. आम्ही कूट तरी center-right विचारसरणीची आहोत. Carrot ( बातचीत सगल्याबर ) and stick ( मिलिटरी ऍक्शन ) policy चे समर्थक आहोत. झालेल्या चुका मान्य करून सगळ्यांना बरोबर घेतलं तरच हा प्रश्न सुटेल आस वाटत आणि हीच इच्छा आहे.
25 Jul 2016 - 8:08 pm | शाम भागवत
खरे साहेब,
_/\_
26 Jul 2016 - 1:56 am | चंपाबाई
लष्करी माणसाच्या बायकोची छेड काढली तरी लष्कर काहीच करू शकले नाही
सामान्य स्त्रीयांच्या रक्षणाला सामान्यानाही हे अधिकार हवेत की !
26 Jul 2016 - 9:36 am | सुबोध खरे
जिथे तिथे पिंक टाकलीच पाहिजे का?
सामान्य माणसांना हा अधिकार नाही हे तुम्हाला कुणी सांगितले.
लष्करी माणूस एखाद्या शहरात फक्त तीन वर्षासाठी येतो त्यात त्याला सरकारी घर एक वर्षासाठी मिळते. तेंव्हा तेथे त्याच्या ओळखी आणि मित्र होईपर्यंत त्याचे पुढच्या ठिकाणी पोस्टिंग होते. अशा अपरिस्थितीत तो लष्करी नेतृत्वावरच अवलंबून असतो.
"लष्करी माणसाच्या बायकोची छेड काढली तरी लष्कर काहीच करू शकले नाही असा प्रवाद येऊ नये या साठी लष्कराला काही तरी करणे भाग असते" हे पूर्ण वाक्य टाकायच्या ऐवजी अर्धवट वाक्य टाकून काडी घाण्याचा हा तुमचा प्रकार अतिशय हीन आहे.
सामान्य माणसाच्या घरावर दरोडा पडला तर ती एक बातमी असते
लष्करी ठाण्यावर अतिरेकी हल्ला झाला तर ती एक "गंभीर" बातमी असते.
यातील फरक आपल्याला कळला तर पुढे चर्चा करू.
नाहीतर तुम्ही मावा खाऊन पिंक टाकत राहा.
26 Jul 2016 - 12:48 pm | चंपाबाई
लस्करावर अतिरेकी हल्ला होणे ही वेगळी गोष्ट आहे. मान्य.
पण लश्करातील व्यक्तीच्या घरावर दरोडा पडणे वा त्याच्या बायकोचीछेडछड होणे हे प्रकार इतर जनतेच्या बाबत होणार्या त्याच गुन्ह्यांपेक्षा भिन्न मानुन लस्क्करी व्यक्तीला स्वत्;च निकाल लावायचे अधिकार का द्यावेत , हे माझ्या अल्पमतीला समजलेले नाही.
26 Jul 2016 - 12:54 pm | चंपाबाई
जागा बदलणे, बदली होणे हे सामान्य माणसाम्बाबतही होते. म्हणुन सामान्य माणसानीही स्वतःवरील अन्यायाचे त्वरीत निवारण करायला कायदे हातात घेउन मारामार्या करायच्या का ?
....
माई मोड ऑन ...
इतिहासातले राजे म्हाराजे सर्दार व आजचे हे सैन्य वगैरे म्हणुनच मला पसंत नाहीत... आम्ही देव देस धर्म व कायदे यांच्या रक्षणाला आहोत असा आव आणुन हे लोक खास स्वतःपुरते नवीन धर्म व नवीन कायदे करत असतात , असं आमच्या ह्यांचं मत !
माई मोड ऑफ...
26 Jul 2016 - 1:44 pm | गामा पैलवान
ओ बाई,
सामान्य जनता देशासाठी मरणार नसते. त्यासाठी सैनिक असतो. आणि तो मरायला सदैव सज्ज असतो तो त्याच्या घरच्यांच्या पाठींब्यावरच. घरच्यांची खुशाली बिघडली की कोणताही भारतीय सैनिक सैनिक रहात नाही.
आ.न.,
-गा.पै.
26 Jul 2016 - 3:06 pm | चंपाबाई
अरे लंड न च्या पैलवाना !
देशाचे इतर नागरिकही देशासाठीच जगतात व मरतात.. बरं , सैनिक फुकट लढत नसतात
26 Jul 2016 - 5:00 pm | गामा पैलवान
ओ बाई,
तुम्हाला दुप्पट पगार देतो, जाताय सीमेवर लढायला? मोठ्या आल्यात सैनिकाची फुकटेगिरी काढणाऱ्या !
आ.न.,
-गा.पै.
26 Jul 2016 - 6:14 pm | सुबोध खरे
"सैनिक फुकट लढत नसतात"
हितेराव उर्फ मोगा
एम बी बी एस आहात ना? मग आर्मी त भरती व्हा ना ४५ पर्यंत डॉक्टरला शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळतं. भरती व्हा एक सियाचेन ला आणि एक गुलमर्ग ला पोस्टिंग करून या आणि मग सांगा. "भरपूर पैसे" हि मिळतील.
होता का भरती? माझे मित्र आहेत आर्मी हेड क्वार्टर्स मध्ये मोठ्या पदांवर.
27 Jul 2016 - 4:32 pm | चंपाबाई
मी एम बी बी एस आहे... तुमच्याच डिग्रीबद्दल आता शंका येत आहे.
डॉकक्टरकी काय आणि सैनिकी काय हे ज्याने त्याने प्रोफेशन म्हणुन निवडलेले असते व त्याचा प्रोफेशनल ट्याक्स जो तो भरत असतो. कामाच्या मोबदल्यात पगार भत्ते पेन्शन घर इ इ जे ते ज्याला त्याला मिळत असतं.
आता असं बघा... जरा डोस्कं खाजवुन पी एस एम .. ऑक्युपेशनल हझार्ड वगैरे आठवा बघू... प्रत्येक प्रोफेशनात रिस्क असते. पेशंटची सेवा करताना सुइ लागुन एच आय व्ही होतो की नै ? गटार साफ कraayalअ उतरला व गुदमरुन मेला .. होतं की नै ?
ज्याचे त्याचे प्रोफेशनल हझार्ड ज्याने त्याने सहन करावेत ना ?
जाउ दे !
उद्या हॉटेल मेरियटमध्ये हेपाटायटिस बी वर कॉन्फ्रन्स आहे. प्रमुख पाहुणे .. अमिताभ बच्चन आहेत. ते पोटाला लागलं होतं तेंव्हा ब्लडलावलं तेंव्हा त्यामुळे त्याना हेप बी झाला असं म्हणतात.
अभिनेता कर्तव्य करत असताना लागलं तर ते ऑक्युपेशनल हझार्ड ... मग सैनिकाला लागलं तर तेही ऑक्युपेशनल हझार्डच ना ?
उगा बाकीच्यांचं डोस्कं कशाला खायचं ?
27 Jul 2016 - 5:52 pm | गामा पैलवान
ओ बाई,
किती लोकं मरतात हो आकुपेषनल हाझार्डापायी? आणि किती भारतीय सैनिक मरतात? मृत्यू नामक आकुपेषनल हाझार्ड कोणत्या प्रोफेषनात अधिकृतरीत्या उल्लेखित असतो?
हे खाली दिलेलं तत्त्व कोणता व्यवसायात पाळलं जातं?
आ.न.,
-गा.पै.
29 Jul 2016 - 9:16 pm | सुबोध खरे
सैनिक फुकट लढत नसतात

25 Jul 2016 - 9:37 pm | सुबोध खरे
माझ्या विचार आणि (अल्प) बुद्धीनुसार सैन्यबळानी अतिरेक करू नये, सैन्याने स्वतःच्या डोक्याने वागू नये, धोरण ठरवणा-यानी दिलेल्या आदेशाची संयमित अंमलबजावणी करावी.
माझा मित्र गुरेझ येथे मेडिकल ऑफिसर म्हणून तैनात असताना त्यांची पलटण गस्त घालत होती. वाटेत चालणाऱ्या एका कुटुंबाला त्यांनी थांबवले आणि त्यांची तपासणी करायची म्हणून स्त्रियांना बाजूला काढले आणि पुरुषांची तपासणी करत असताना १३ वर्षाच्या एका मुलीने बुरख्यातून स्टेनगन काढून एका सैनिकाला मारले. ताबडतोब त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याचा जोडीदार असलेल्या सैनिकाने तिला आपल्या रायफलने गोळ्या घातल्या. (कारण जी १३ वर्षांची मुलगी एका सैनिकाला गोळी घालू शकते तिच्यावर भरवसा कसा ठेवायचा) दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी आपले हुशार पत्रकार यांनी मानवी हक्काचा मोठा टाहो फोडला यामुळे त्या सैनिकाचे कोर्ट मार्शल झाले परंतु प्रत्यक्ष पुरावा समोर आल्यावर वस्तुस्थिती काय ती कळली.
यात मारल्या गेलेल्या सैनिकाला मानवी अधिकार नाहीत का?
त्याच्या जोडीदाराला मानवी अधिकार नाहीत का?
इतकी मानहानी होऊनही लष्कर तेथे काम करीत आहे परंतु आपण का आणि कशाला नोकरी करीत आहोत हे विचार तेथे किंवा सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकाच्या मनात येतातच. अशा सैनिकांना "देशभक्ती"चा "उदोउदो" करून काम करायला प्रवृत्त करावे लागते हि वस्तुस्थिती आहे. असे विचार माझ्याही मनात अनेक वेळेस आले होते हेही मी कबुल करतो.
प्रत्यक्ष परिस्थिती हि वृत्तपत्रात येते त्यापेक्षा वेगळी असते याचे अजून एक उदाहरण
नागाप्रदेशात जखामा येथे एका सैनिकावर एका स्त्रीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. त्यावर त्याचे कोर्टमार्शल झाले आणि त्यात त्याचा त्या स्त्रीबरोबर संबंध ठेवल्याचे सिद्ध झाले. परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच होती तेथे असलेल्या नागा बंडखोरांनी एका गणिकेला त्या सैनिकाकडे पाठवले. त्यांनी पैसेही ठरवले. प्रत्यक्ष शरीरसंबंध झाल्यावर त्या स्त्रीने आपल्यावर बलात्कार झाला आहे अशी तक्रार केली ताबडतोब आरामखुर्चीत विचारवंतांनी हुल्लड उठवली आणि त्या सैनिकाला अटक झाली. त्याने दिलेले पैसे तिच्याकडे मिळाले. त्याचे कोर्ट मार्शल झाले तेंव्हा वैद्यकीय पुरावा शरीरसंबंधाची पुष्टी देत होता पण जबरदस्ती केल्याचा पुरावा मात्र नव्हता. शेवटी त्या गणिकेला दरडावून विचारले तेंव्हा हि वस्तुस्थिती बाहेर आली. आणि तो सैनिक बालं बाल वाचला.
AFPSA बद्दल मी एवढेच म्हणेन कि सैनिकाला या कायद्यामुळे थोडेसे तरी संरक्षण आहे.
बाकी खुर्चीत बसून विचारवंत म्हणवणार्यांना मी एवढेच म्हणेन कि आपण दोन महिने कोणत्याही लष्करी तळावर राहून पहा आणि मग बोला. दीड दिवस काश्मीरमध्येआणि साडेतीन दिवस अरुणाचल मध्ये घालवून आपण वस्तुस्थिती समजावून घेऊ शकत नाही.
25 Jul 2016 - 9:55 pm | संदीप डांगे
अगदी खरे बोल!
25 Jul 2016 - 10:07 pm | सामान्य वाचक
आजकाल राष्ट्र विरोधी बोलणे हेच बुद्धिवादी असल्याचे एकमात्र लक्षण आहे
त्यामुळे बऱ्याच लोकांना आपली बुद्धी प्रुव्ह करायला असाच स्टँड घ्यावा लागतो
28 Jul 2016 - 11:55 am | चंपाबाई
वा वा !
सैनिक गणिकेकडे जातात.
मज्जाय बुवा !
मग हे संघवाले मोदीवाले नेहरुंवर का घसरतात म्हणे ?
28 Jul 2016 - 11:55 am | चंपाबाई
वा वा !
सैनिक गणिकेकडे जातात.
मज्जाय बुवा !
मग हे संघवाले मोदीवाले नेहरुंवर का घसरतात म्हणे ?
28 Jul 2016 - 11:59 am | संदीप डांगे
अवतार समाप्तीची वेळ झाली वाटते? =))
28 Jul 2016 - 11:33 pm | lakhu risbud
बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला हा जागो मोहन प्यारे उर्फ जामोप्या उर्फ हितेस उर्फ माईसाहेब कुरसुंदीकर उर्फ नानासाहेब नेफळे उर्फ टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उर्फ मोगा उर्फ चंपाबाई उर्फ खालमुंडी पाताळ धुंडी उर्फ असे अनेक खोटे आयडी
हा समस्त मराठी संकेतस्थळांवर गरळ ओकून काढत असतो.बायकोचा असल्याने हिंदू धर्मावर विशेष राग. दम नसल्याने दुसऱ्या मध्ययुगीन आणि बऱ्याच अंशी रानटी आणि हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या धर्माचे जीव तोडून समर्थन करत असतो. खरंच जर दम असता तर एक विधी करून खुलेआम पणे त्या धर्मात प्रवेश केला असता, पण तेवढी हिम्मत नाही मग ही अशी गरळ ओकून बायकोवर आणि तिच्या धर्मावर सूड घेतल्याचे समाधान मिळते. कारण काय ? तर माझ्या बाबतीत काही चांगले झाले नाही मग मी जिथे जेथे चांगले,मंगल दिसेल तिथे जाऊन घाण करणार.
25 Jul 2016 - 10:22 pm | सुबोध खरे
एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते.
आपल्याला नम्रपणे हेही सांगू इच्छितो कि मी लष्करातील एक राजपत्रित अधिकारी होतो आणि माझ्या पगारातून ३० % आयकर वजा होत असे. तेंव्हा आमच्या पैशावर तुम्ही "मजा करता" हा आवेश सोडून द्या.
कोणताही लष्करी अधिकारी किंवा सैनिक काश्मीरमध्ये पोस्टिंग झाली म्हणून खुश होत नाही.
सैनिकाने आपल्या छातीला स्टेनगन लावली म्हणून आपला अहं दुखावला गेला आहे असे वाटते.
मी स्वतः नौदलातील अधिकारी असून श्रीनगरला गेलो असताना तेथील छावणीत माझ्या वर्गमित्राला, माझ्या विद्यार्थ्याला आणि माझ्या गुरूंना (ब्रिगेडियर आनंद (मिस इंडिया निकिता आनंदचे वडील) भेटायला गेलो असताना माझे "लष्करी ओळखपत्र" असूनही सुरुवातीला माझ्या छातीला स्टेनगन लावली होती. जेंव्हा माझ्या मित्राशी (कर्नल जॉन) माझे फोनवर बोलणे झाले आणि त्याने मला आत सोडण्यासाठी परवानगी दिली तेंव्हा त्याच सैनिकाने मला कडक सलाम हि मारला.
मी नौदलात प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करीत असतानाही मला "चक्र" या अणुपाणबुडीत जाण्यास नकार दिला होता. उगाच अहं दुखावला म्हणून अशी विधाने करू नका अशी आपल्याला विनंती आहे.
दहशतवादी आपल्याला काही सेकंद सुद्धा देत नाहीत. लष्करातील लोकांना श्रीनगर बाजारात भाजी आणायला जाण्यासाठी सरकारी बसने जावे लागते. आणि या गाडीत चार सशस्त्र सैनिक असतात आणि आपण बाजारहाट करेपर्यंत ते गाडीची निगा राखतात . आपण आपली स्वतःची गाडी घेऊन गेलात तर छावणीत प्रवेश करण्यापूर्वी आपली गाडी गॅरेज सारखी जॅक वर चढवून संपूर्ण आतुन बाहेरून तपासली जाते कारण आपण पार्क केलेल्या गाडीला खालून स्फोटके/ बॉम्ब लावला तर लष्करी छावणीत बॉम्ब स्फोट होईल.
तेथे तैनात असणाऱ्या माझ्या मित्राने(कर्नल जॉन) आम्ही उघड्या तुरुंगात आहोत या शब्दात मला बोलून दाखविले.
अशा परिस्थितीत आपण श्रीनगरसारख्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या छावणीची हि परिस्थिती आहे तर इतर छोटी युनिट काय परिस्थितीत तेथे दिवस काढतात हे आपण पाहणे आवश्यक आहे.
इतर ठिकाणी सिमेवर तैनात असलेले सैनिक आपल्या पिछाडी बाबत निर्धास्त असतात.
काश्मीरमध्ये फुटीरता वादी आणि त्यांना आधार देणारे निधर्मांध यांच्यामुळे कायम भीती आणि चिंतेच्या छायेत वावरणाऱ्या सैनिकांची मला दया येते आणि अभिमान ही वाटतो.
25 Jul 2016 - 10:41 pm | लिओ
काश्मीर वल्गना आणि वास्तव भरपुर वाचले.
काही प्रश्न विचारावे वाटतात.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
@संदीप ताम्हनकर
तुम्हाला फक्त डेक्कन परिसलातील घटना वाचुन लिहावेसे वाटले? एक बातमी वाचली होती पुण्यात लष्करी छावणी जवळिल एका रहिवाशी इमारतीतील लोकाना लष्करातील जवान व अधिकारी याना लष्करी जागेचा वहिवाटि करु नये म्हणुन अटकाव केला. यापुढे लष्करातील जवानानी बळजबरीने त्याना बाहेर हाकलुन ( लष्करातीची ) जागा बन्दिस्त केलि ठ्ळक बाब अशी कि त्या इमारतीत एक माजी मेजर जनरल अधिकारी वास्तव करत होते. जर लष्कराने पुण्यातील सर्व ( देशातील सर्व कॅन्टोनमेन्ट मधील) लष्करी जागा बन्दिस्त केल्या व सर्व सामान्य नागरीक सुविधेसाठि कोणाला बोलवणार ( हुर्रियतला काय ??? )
एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादी मेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील
ईशान्य भारतात बन्डाळी भरपुर नियंत्रणात आहे. पंजाब व काश्मीर येथे सर्वसाधारण एकाच कालखंडात दहशदवाद सुरु झाला, आज पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला आहे. पण काश्मीर मध्ये सुरु आहे. जेव्हा पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला तेव्हा भाजप सरकारमध्ये पण नव्हते, मग पंजाबमधील दहशदवाद असा थांबला ???? काँग्रेसला उगाच दोष का देता ? , बर वाजपेयी लाहोरला गेले कारगिलबद्दल गाफिल राहिले वर त्याच मुशर्रफला आग्राला बोलवुन गळाभेट घेतली, याउपर मोदि लाहोरला जाऊन केक खाउन आले भाजपाने केलेले हे " मुस्लिम तुष्टीकरण " तुम्हाला दिसत नाहि का ( मी अपेक्षा करतो कि काश्मीर "इस्लाम / मुसलमान" पाकीस्तान नाते माहीत असावे. ) ????
काश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच.
तुम्ही डेक्कन घटना अनुभवली कि नाही माहित नाही. पण तुम्हि काश्मीर फिरलात तुम्हि दिलेल्या टॅक्सचा हिशोब एका कर्तव्यदक्ष सैनिकाला विचारले / सांगितले फार फार आभारी आहे. हाच हिशोब भ्रष्ट्राचार करणाऱ्या नेत्याला विचारुन निदान माझ्यावर तर उपकार करा.... क्षणभर मला असे वाटले की तुम्ही हुर्रियतसाठी भरपुर काही कराल. वैतागलेले भारतीय लष्कार म्हणते भरपुर काश्मीरी खातात भारतातले आणि दुवा सीमेपलीकल्यांसाठी मागतात.
तुम्ही भारतीय लष्काराला त्याच्या चुकाबद्द्ल आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन नाण्याची एक बाजु मांडली हरकत नाही . जरा शुध्दीमध्ये मला एक सांगा की तुम्ही पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल बातम्या इंटरनेट लेख यावरुन लिहिणार की प्रत्यक्ष पाकिस्तानात जाऊन अनुभवुन लिहिनार.
पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल अभ्यास करा वस्तुस्थिती लिहा आणि जर खरोखर काश्मीर फिरला असाल तर छतीठोकपणे सांगा की तुम्हि पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल काश्मीरी मुसलमानांना सांगू शकाल.
26 Jul 2016 - 4:39 am | सुधीर काळे
Kashmir problem should have been handled by Sardar Patel in 1947/48, but Nehru thought that as a Kashmiri himself, he knew better. He didn’t. He was a poetic-minded litterateur pushed into a wrong job. He foolishly agreed t make a separate constitution for J&K & allowed to have Section 370 in it. He unnecessarily took the Kashmir issue to UN & when UN gave a clear verdict in our favour asking ALL PAKISTANI MILITIA-FORMAL & THE SO-CALLED TRIBESMEN-TO VACATE KASHMIR followed by withdrawal of our own armed forces from there & hold a plebiscite, he did none of the above & allowed the issue to drag on & on.
Today, I see no other solution except withdrawing Section 370, make a uniform constitution for the whole of India including J&K and allow the courageous people from India-retired members of our armed forces, RSS, Shiv Sena, Bajarang Dal and others-populate the state with a huge population shift. They should be given huge monetary motivation to do so.
Necessary changes in the constitution should be passed. In the new constitution, Rajya Sabha should be abolished & that many additional MPs added to Lok Sabha. In other words all MPs should be elected by people directly. If the opposition parties think of their party interest over & above the national interests, Modi should dissolve the govt and seek a new mandate through a referendum exclusively on changes in constitution of India including J&K. I see no other way!
http://www.firstpost.com/politics/kashmir-unrest-exposes-bjp-pdp-govt-as...
26 Jul 2016 - 10:40 am | गॅरी ट्रुमन
काळेकाका,
तुमच्या इंचाइंचाच्या धाग्यावर काश्मीरवर अगदी मॅरॅथॉन चर्चा झाली आहे. त्यामुळे त्यात अनेकांनी मांडलेले मुद्दे परत मांडत नाही. २०१३ मध्ये मिपावर मी हा आणि हा प्रतिसाद लिहिला होता. त्यावेळी तुम्ही मिपावर फार यायचा नाहीत म्हणून हे प्रतिसाद कदाचित वाचले नसतील. तेच प्रतिसाद इथे परत देत आहे:
"काश्मीरात पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यावर तत्कालीन महासत्तांनी (अमेरिका, इंग्लंड) अगदी पहिल्यापासून पाकिस्तानला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती. त्याचे कारण स्पष्ट होते. काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता तिकडे बेस स्थापन करता आल्यास आजूबाजूच्या बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होणार्यातले होते.आणि असा बेस स्थापन करायला नेहरूंचा भारत कदापि मान्यता देणार नाही पण पाकिस्तान देईल हे न कळण्याइतके अमेरिकेचे नेते दुधखुळे नव्हते.तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन देणे क्रमप्राप्त होते.
आपल्याला २०१३ मध्ये बसून १९४७-४८ मध्ये नक्की काय घडले हे classified documents आपल्याकडे नसताना सांगता येणे कठिण आहे.तेव्हा इतर अनेक लोक तर्क करतात तसा हा माझा तर्कच समजा.काश्मीर प्रश्नावर अमेरिका भारताला समर्थन देत नाही हे समोर दिसतच होते.पाकिस्तानच्या बाजूने १९४७-४८ मध्येच अमेरिका युध्दात उतरली असती का?आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्की देता येणार नाही पण नंतरच्या काळात अनेक ठिकाणी अमेरिकेने ज्या पध्दतीने स्वत:चा स्वार्थ साधायला नाक खुपसले ते पाहता ती शक्यता अगदी ०% असे वाटत नाही.तसे झाले असते तर साध्या शब्दात सांगायचे तर आपल्याला पार्श्वभागाला पाय लावून पळ काढावा असता.अमेरिकेशी लढण्याइतके त्या काळी प्रबळ होतो का?आणि असे होण्याची शक्यता किती याची माहिती आपल्याला २०१३ मध्ये आहे त्यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरूंना जास्त असणार यात शंका नाही.
तेव्हा काय करा?जग त्यावेळी भारताला महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखत होते.तसेच युनोमध्ये आपण प्रश्न नेण्यामुळे भारत सरकारला शांतता हवी आहे ही high ground position भारताला घेता येणे शक्य झाले.तेव्हा शांतता पाहिजे असलेल्या महात्मा गांधींच्या देशाविरूध्द उघड उघड position घेणे हे अमेरिकेतल्या लोकांना विकता येणाऱ्यातली गोष्ट नव्हती (not easy to sell). सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोत नेला तो UN Charter च्या Chapter 6 अंतर्गत.या चॅप्टर अंतर्गत युनोमध्ये आणलेल्या प्रश्नांवर युनोने पास केलेले ठराव संबंधित देशांसाठी बंधनकारक नसतात.तेव्हा युनोने आपल्या बाजूने ठराव पास केल्यास तो आपला विजय आणि आपल्या विरूध्द ठराव पास केल्यास त्याला फाट्यावर मारणे या दोन्ही गोष्टी करता येण्यासारखी ही खेळी होती.नंतरच्या काळात युनोने युध्दबंदी करायचा ठराव पास करूनही त्या ठरावाला ७-८ महिने फाट्यावर मारून आपले सैन्य लढतच होते यावरून ही गोष्ट लक्षात येईलच.
आणि काश्मीर-युनोचा विषय निघालाच आहे म्हणून नंतरच्या युध्दबंदीचा विषयही निघणार म्हणून आधीच लिहितो.काळेकाकांच्या धाग्यावरील चर्चेत थत्तेचाचा, धनंजय इत्यादींचे मुद्दे परत मांडायचे टाळतो. या दुव्यावर २ जानेवारी १९४९ चा इंडिअन एक्सप्रेस बघता येईल.त्या पेपरमध्ये काश्मीरातील युध्दबंदीची बातमी आहे.त्या बातमीत एक वाक्य आहे: "it seems that Pandit Nehru took his cabinet colleagues into confidence". जर नेहरूंनी काश्मीर प्रश्नाचा विचका केला आणि सरदार पटेलांच्या हातात सुत्रे असती तर प्रश्न चुटकीसरशी सुटला असता असे म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो:काश्मीरात युध्दबंदी करायच्या निर्णयाविरूध्द सरदार पटेलांनी राजीनामा का दिला नाही?पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे प्रकार झाले का नव्हते? त्यातून काश्मीर प्रश्न म्हणजे कुठचा तरी क्षुल्लक प्रश्न नव्हता की ज्यावरून डावलले जाणे पटेलांनी फारसे गांभीर्याने घेतले नसते.तसेच शामाप्रसाद मुखर्जी सुध्दा त्यावेळी नेहरूंच्या मंत्रीमंडळात मंत्री होते.त्यांनी नंतर लियाकत अली खान-नेहरू कराराच्या विरोधात राजीनामा दिला पण काश्मीरातील युध्दबंदीच्या विरोधात राजीनामा दिला नाही.याचा अर्थ हा काश्मीरात युध्दबंदी करणे हा घुसखोरांना अजून मागे पिटाळणे शक्य नाही हे लक्षाय येऊन सर्वानुमते घेतलेला निर्णय होता.मग त्या निर्णयाचे "खलनायक" एकटे नेहरू कसे?"
"हिंदू विवेक केंद्राच्या या वेबपेजवर बीजेपी टुडे या नियतकालिकात फेब्रुबारी २००२ मध्ये प्रसिध्द झालेला लेख दिला आहे.त्या लेखात तरी असे म्हटले आहे की डिसेंबर १९४७ मध्येच नेहरूंना काश्मीरमधील युध्द पाकिस्तानात न्यायचे होते. काश्मीरात जड जाते हे लक्षात येताच १९६५ च्या युद्धात शास्त्रींनी पश्चिम पंजाबात आघाडी उघडून पाकिस्तानचे नाक दाबले होते आणि तोंड उघडायचा प्रयत्न केला होता.तो प्रकार १९४७ मध्ये करावा असे नेहरूंना वाटत होते पण तसे करण्यापासून नेहरूंना माऊंटबॅटननी परावृत्त केले आणि युनोमध्ये जायचा सल्ला दिला.नक्की कोणत्या कारणाने माऊंटबॅटनने नेहरूंना परावृत्त केले हे त्या लेखात दिलेले नाही आणि याविषयी आपल्या कल्पना लढविण्याशिवाय आपण फार काही करू शकत नाही.पण याविषयीचा माझा तर्क असा---पाकिस्तानने त्यावेळीही आपले सैनिक काश्मीरात लढत आहेत हे मान्य केले नव्हते तर दोष "Non-state actors" वर ढकलला होता. हे Non-state actors चं खटलं अगदी कसाबपर्यंत चालू आहे.तेव्हा या परिस्थितीत पाकिस्तानवर हल्ला करणे म्हणजे परिस्थिती अजून चिघळवणे आणि कदाचित एक Pandora's box उघडणे असा त्याचा अर्थ झाला असता.त्यावेळची भारतीय लष्कराची स्थिती आणि देशाचीच एकूण स्थिती लक्षात घेता अमेरिका या भानगडीत पडली असती तर ते भारताला परवडणाऱ्यातले नक्कीच नव्हते. राज्यकर्त्यांना सगळी परिस्थिती बघून हात दगडाखाली असताना कोणतेही अविचारी पाऊल उचलता येत नाही/तसे पाऊल उचलल्यास ते आत्मघाताला निमंत्रण ठरू शकते. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे असे खरोखरच झाले असते का याची माहिती आज आपल्याला आहे यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरूंना नक्कीच जास्त असणार आणि तेवढा benefit of doubt मी नेहरूंना नक्कीच देतो. आणि खरोखरच नेहरूंनी सियालकोट,लाहोर, गुजरात आणि झेलमवर हल्ले केले असते आणि त्याचे उलटे परिणाम झाले असते तर नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य धोक्यात आणले म्हणून उलटा दोषही नेहरूंच्याच माथी आला असता."
26 Jul 2016 - 11:01 am | जयंत कुलकर्णी
या सगळ्यात रशियाचा आणि चीनचा विचार केला गेलेला दिसत नाही.....
26 Jul 2016 - 2:31 pm | श्रीगुरुजी
मी त्याच प्रतिसादावर प्रदीर्घ प्रतिसाद लिहिला होता. तो पुन्हा इथे देत नाही.
संपूर्ण जग १९४५ पर्यंत दुसर्या महायुद्धात होरपळले होते. इंग्लंडचे तर युद्धाने कंबरडे मोडले होते. त्यामुळे अमेरिका किंवा इंग्लंडसारखे देश लगेच १९४८ मध्ये नवीन युद्धात उतरले असते असे वाटत नाही. जर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उतरली असती तर नक्कीच रशियाने हस्तक्षेप केला असता. काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेल्यामुळे पाकिस्तानने बळकावलेला प्रदेश कायमचा गमवावा लागला आहे. त्यात भर म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने मंजूर केलेला सार्वमताचा ठराव. याच ठरावाच्या जीवावर पाकिस्तान, काश्मिरमधील फुटिरतावादी, भारतातील पुरोगामी व निधर्मी विचारवंत इ. अजूनही सार्वमताची मागणी करीत आहे व त्यामुळे भारताला कायमच बचावात्मक भूमिका घ्यावी लागत आहे. यापेक्षाही मोठी चूक म्हणजे काश्मिरसारख्या सीमावर्ती राज्याला कायदेशीर विशेष दर्जा दिल्यामुळे हा प्रदेश उर्वरीत भारतात सामील होण्यापासून कायमच एका विशिष्ट अंतरावर राहिला. सीमावर्ती राज्यात देशांतर्गत वेगळा देश (स्टेट विदिन स्टेट) निर्माण करणे ही मोठी चूक होती हे गेल्या ६८-६९ वर्षात अनेकवेळा सिद्ध झाले आहे. भारताने आजवर याची जबर किंमत मोजली आहे व पुढेही किंमत मोजावी लागणार आहे.
26 Jul 2016 - 4:14 pm | गॅरी ट्रुमन
हा प्रतिसाद श्रीगुरूजी आणि जयंत कुलकर्णी या दोघांच्याही प्रतिसादांना आहे.
१९४५ मध्ये दुसरे महायुध्द संपल्यानंतर अमेरिकन सैन्य चीन, युरोप, फिलीपीन्स इत्यादी ठिकाणी होतेच. इटलीमध्ये अमेरिकेने सैन्य दुसरे महायुध्द झाल्यानंतर वाढविलेही होते. तसेच १९५० मध्ये नंतर कोरियन युध्दात अमेरिका मोठ्या प्रमाणावर उतरलेली होती. तेव्हा १९४८ मध्ये अमेरिकन सैन्य भारताविरूध्द येऊच शकले नसते असे नाही.
दुसर्या महायुध्दात महत्वाच्या देशांमध्ये सर्वात कमी हानी झाली होती ती अमेरिकेचीच.अमेरिकेच्या मुख्य भूमीवर एकही गोळी झाडली गेली नव्हती. जे काही थोडेफार नुकसान अमेरिकेचे झाले ते पर्ल हार्बरमध्ये (ते पण दूर हवाईमध्ये).मरण पावलेल्या सैनिकांची संख्या म्हणाल तर अमेरिकेचा नंबर त्या मानाने खालीच लागतो. सैनिक आणि सामान्य लोक मिळून रशियात तब्बल २ कोटी लोक दुसर्या महायुध्दात मरण पावले होते. त्या मानाने अमेरिकेचे नुकसान फार झालेले नव्हते. त्या मानाने रशियाच प्रचंड प्रमाणावर होरपळला होता. चीन तर त्यावेळी स्वतःच्याच यादवी युध्दात गुरफटलेला होता.
मग नेहरूंच्या युध्दबंदीच्या निर्णयाविरूध्द सरदार पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जींनी राजीनामा का दिला नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
बाकी बुबुडाविपुमाविंविषयी लिहिलेले सगळे मुद्दे मान्य.
27 Jul 2016 - 5:12 pm | श्रीगुरुजी
आलेच असते असे पण नाही. १९७१ मध्ये अमेरिकेने आपले ७ वे आरमार पाठविले होते, परंतु अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नव्हता.
त्यांनी का राजीनामा दिला नाही हे मला माहित नाही. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते व नवीन सरकारला अपशकुन करू नये हा कदाचित उद्देश असावा किंवा त्या निर्णयाचे गांभीर्य त्यावेळी तितकेसे लक्षात आले नसावे. माऊंटबॅटनच्या सल्ल्यामुळे नेहरूंनी काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला. शेख अब्दुल्लाच्या मागणीमुळे नेहरूंनी काश्मिरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणले. कलम ३७० ही तात्पुरती व्यवस्था असून कालौघात ते झिजून विस्मृतीत जाईल या नेहरूंच्या विश्वासावर त्यांचा कदाचित विश्वास बसला असावा. मला नक्की माहिती नाही.
बुबुडाविपुमाविं म्ह्णजे काय?
27 Jul 2016 - 6:05 pm | गॅरी ट्रुमन
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजी प्रार्थनासभेला जात असताना त्यांची नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली.या सभेला जायला गांधीजींना नेहमीपेक्षा ५-१० मिनिटे उशीर झाला.तो उशीर का झाला? त्याचे कारण सरदार पटेल गांधीजींना भेटायला आले होते आणि नेहरूंशी असलेल्या मतभेदांमुळे राजीनामा द्यायची इच्छा त्यांनी गांधीजींकडे व्यक्त केली होती. किंबहुना काही संदर्भांच्या मते गांधीजींनी पटेलांना राजीनामा द्यायला सांगितलेही होते.पण गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या परिस्थितीत सरदार पटेलांनी आपला राजीनामा द्यायचा विचार रहित केला.तेव्हा सांगायचा मुद्दा हा की नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असताना नव्या सरकारला अपशकुन नको म्हणून सरदार पटेलांनी काश्मीर प्रश्नावरून राजीनामा दिला नसेल हे संभवनीय नाही. कारण ३० जानेवारी १९४८ रोजी म्हणजे काश्मीरातील युध्द चालू असतानाच आणि युध्दबंदी व्हायच्या जवळपास एक वर्ष आधी राजीनाम्याचा विचार त्यांच्या मनात घोटाळत होता.
बुबुडाविपुमावि म्हणजे बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी विचारवंत. प्रत्येकवेळी इतके सगळे टाईप करायचा कंटाळा येतो म्हणून मी बुबुडाविपुमावि हा शॉर्टफॉर्म बनविला आहे.
28 Jul 2016 - 12:28 pm | सुबोध खरे
बुबुडाविपुमावि म्हणजे बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी विचारवंत
हा हा हा हा
26 Jul 2016 - 8:32 pm | अनुप ढेरे
युद्ध ऑक्टॉबर ४७ ला सुरू झालं. युद्धबंदी जानेवारी १९४९ ला झाली. सव्वा वर्ष लढून जे १/३ कश्मिर मिळालं नाही ते अजून किती लढलं असतं तर मिळालं असतं. आणि नव्या बनलेल्या कोट्यावधी लोकांच्या गरीब देशाला परवडलं असतं का हे युद्ध. आणि अजून युद्ध करून असलेलं कश्मिर गेलं असतं तर?
नेहरुंचे बाकी गुण-दोष माहिती नाहीत पण याबाबतीच त्यांची काहीच चूक नाही असं वाटतं.
26 Jul 2016 - 9:56 am | सुबोध खरे
लष्कर स्वतः युद्ध सुरु करत नाही. युद्ध कुठे आई कसे करायचे हा निर्णय सरकार करीत असते. सर्वंकष युद्ध लढणे हे लष्करासाठी जास्त सोयीचे असते. परंतु घुसखोरी आणि दंगली इ मध्ये आपल्याच लोकांनमधील फितूर शोधून मारणे हे काम खरंतर स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे आहे. त्यांच्या मदतीला लष्कराला बोलावले जाते. सहसा दंगलीमध्ये लष्कराला सर्वात शेवटी बोलावले जाते जेंव्हा दिसताक्षणी गोलो घालण्याचे आदेश दिले जातात. काश्मीर मध्ये शांतता राखायचे काम लष्कराला सरकारने दिलेले आहे. त्यात जरासुद्धा रेष ओलांडली जाणार नाही याची मानव हक्क संघटना "काळजी" घेत असतात. एक हात बांधून काम करायचे आणि वर शिव्या खायच्या हे दुर्दैवाने चालू आहे. वर दिलेल्या उदाहरणानंतर( १३ वर्षाच्या मुलीने बुरख्यातून स्टेनगन काढून सैनिकाला गोळी घातली) कोणता सैनिक एखाद्या मुलीवर/स्त्रीवर भरोसा ठेवेल? पण त्यांना स्त्रियांची तपासणी करायचे हक्क नाहीत. हेही मान्य परंतु अवेळी प्रत्येक नाक्यावर तपासणी करण्यासाठी कोणती स्त्री पोलीस मिळणार आहे? त्यांना नुसता बुरखा काढून दाखवा म्हणल्यावर इस्लामी मौलवींनी आमच्या धर्मावर घाला घातला सैन्य हिंदुत्ववादी आहे अशी हाकाटी चालू केली. ( हि १९९० ची गोष्ट आहे जेंव्हा सरकार काँग्रेसचे होते).
स्त्रीची तपासणी कशी करावी ज्यायोगे मानवी हक्काची पायमल्ली होणार नाही हे अजूनही लष्कराचे न सुटलेले कोडे आहे.
शिवाय त्यांना पोलिसांकडून मिळणारी गुप्त माहिती हि तुटपुंजी आणि बऱ्याच वेळेस दिशाभूल करणारी असते कारण खालच्या दर्जाचे अधिकारी आणि पोलीस हे दहशतवाद्यांशी सहानुभूती असलेले आहेत. आणि उच्च दर्जाचे पोलीस हे आपल्या दर्जा आणि रुतब्याला जागून आहेत ते लष्कराला सहज मदत करीत नाहीत.
एकापाठोपाठ एक वेतन आयोगांनी लष्कराची पातळी खाली आणली आहे. श्रीनगर चा पोलीस आयुक्त हा मेजर जनरल हुद्द्याचा असतो. हे पद १०० % आय ए एस अधिकाऱ्याना १४ वर्षात आणि आय पी एस अधिकाऱ्याना १६ वर्षात मिळते. तर लष्कराच्या १००० पैकी एकाच अधिकाऱ्याला ते मिळते ते सुद्धा २६ वर्षाच्या नोकरीनंतर बढती मिळत मिळत. आता प्रश्न असा येतो कि श्रीनगर मधील ब्रिगेड कमांडर( ब्रिगेडियर) ने जर सुरक्षा कमिटीची बैठक बोलावली तर श्रीनगरचा आयुक्त येत नाही कारण त्याच्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तो येणार नाही( अहं आडवा येतो)
मग महत्त्वाच्या बैठकीसाठी आर्मीच्या कोअर कमांडर( लेफ्ट. जनरल) कडून पत्र पाठवा तरच हे येणार. प्रोटोकॉल पाळण्यात हे पटाईत.
पोलिसातून सहकार्य देणाया खालचेही अधिकरी तयार नाहीत आणि वरचेही नाहीत या परिस्थितीत लष्करी अधिकारी तेथे लढत आहेत.
वर या सुडो सेक्युलर आणि मानवतावादी लोकांच्या शिव्या खायच्या.
26 Jul 2016 - 10:57 am | शाम भागवत
त्यांचे दिवस भरत आले आहेत असे वाटायला लागलेय. सर्वसामान्यांना जे दिसतेय व जाणवतय ते झाकून गोलमाल तत्वाचे फुलोरे उडवणार्यांबद्दल सर्व जगात राग उफाळून यायला लागलाय. उलट याला स्पष्ट विरोध करणारे लोकप्रीय व्हायला लागलेत. ट्रंफ लोकप्रिय होण्याचे तेच कारण असावे. ब्रेक्झिटचाही तोच संदेश असावा. मोदींच्या यशातही या लोकांबद्दल्च्या रागाचा वाटा आहे.
जो बदलतो तो टिकतो हे सत्य आहे. त्यासाठी लवचीक जीवनशैली (अनिर्बंध नव्हे तर काळानुरूप बदलणारी) लागते. शेवटी हा निर्सगाचा नियम आहे.त्याच्यापुढे कोणाचे काय चालणार आहे?
हे असे धागे ध्रुवीकरण करण्यास फार फार मदत करत असतात. सोन्याबापू व गुरूजी सुध्दा या धाग्यावर एकत्र आले आहेत. यशाचे मार्ग वेगवेगळे असूनही व भरपूर मतभेद असूनही ते एकत्र आले कारण दोघांचे देशप्रेम हे हृदयापासूनचे आहे.
जर जगातल्या निरनिराळ्या घटना पाहिल्या तर असे जाणवायला लागतय की संपूर्ण जगात ध्रुवीकरण होतय व त्याचा सोक्ष मोक्ष होऊनच ही प्रक्रिया थांबणार आहे.
26 Jul 2016 - 11:00 am | संदीप डांगे
वा!! आवडला प्रतिसाद!!!
26 Jul 2016 - 11:06 am | प्रसाद_१९८२
आज कारगील विजय दिवस.
मातृभुमीसाठी बलिदान देणार्या सर्व शहिद जवानांना अभिवादन.
26 Jul 2016 - 1:20 pm | नि३सोलपुरकर
मातृभुमीसाठी बलिदान देणार्या सर्व शहिद जवानांना अभिवादन.
26 Jul 2016 - 1:50 pm | अमितदादा
मातृभुमीसाठी लढणाऱ्या सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम ।
26 Jul 2016 - 2:54 pm | sश्रिकान्त
खरे सर, एकदम सहमत. पोलीस हे इतरांना कमी लेखतात. लकडी़ पुलावर सुद्धा तसच झाल असावे.
26 Jul 2016 - 3:30 pm | अप्पा जोगळेकर
कोणी कितीही आपटली तरी काश्मीर मधून अफ्स्पा कधी रद्द होईल असे वाटत नाही.
जर झालाच तर सैनिक सुद्धा आम्ही कशाला फुकटात हुतात्मा होऊ असा विचार करुन पोलिसांप्रमाणे गंमत पाहात बसतील. गेले काश्मीर तर गेले असे म्हणून मजा बघत बसतील आणि त्यात काही चूक आहे असेही म्हणता येणार नाही.
26 Jul 2016 - 9:16 pm | संदीप ताम्हनकर
मित्रहो, सर्वांनाच काश्मीर समस्येविषयी तळमळ आहे. मिपा मध्ये ‘मजकूर’ देणे अपेक्षित आहे याची मला कल्पना आहे. पण तरीही एक विनंती की पुढील २ व्हिडीओ आवर्जून पहा. जे लोक जास्त वाचत नाहीत त्यांच्यासाठीपण सोय होईल. साहिल अली आणि अवलोक लंगर या तरुणांनी मोठ्या-मोठ्या चॅनलना लाजवेल असे रिपोर्टींग केलंय. कुठेही न पाहिलेलं एकदम लेटेस्ट कंटेन्ट आहे.
काश्मीर - Inside A Friday Protest (Hindi and English)
Part I : - https://youtu.be/6Q1rd6jaIRY
Part II : - https://youtu.be/_K7e2GLjmHI
आता खरे दिग्गज लोकांचे महत्वपूर्ण प्रतिसाद यायला लागलेत. सुरवातीला खाल्ल्या मिठाला आणि चालू OROP ला जागणारे प्रतिसाद जरा जास्तच होते.
मूळ पोस्टच्या एवढ्या चिरफाडीनंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या पुढे दिलेल्या विधानांवर कोणाचीही काहीही प्रतिक्रिया नाही.
1. 'सैन्याला (विशेष) हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी (देशातील) उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे.'
2. 'एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.'
3. 'श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय.'
4. 'बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.'
5. 'दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.'
6. ‘५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय.’
'प्रत्यक्ष रस्त्यावर जे असते त्या सैन्याच्या बौद्धिक कुवतीसंबंधी' प्रतिक्रिया श्रीगुरुजी या आयडीची आहे, माझ्याकडून सोन्याबापू या आयडीची असा उल्लेख झालाय त्याबद्दल दिलगीर आहे.
या श्रीगुरुजी नावाच्या आयडीने, 'पोस्ट लिहिणारा मूर्ख आहे' एवढेच एका प्रतिसादात जागोजागी लिहिले आहे. श्रीगुरुजी या परमदेशाभिमानी आयडीने 'काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले .....' असा नियोगाचा मार्ग सुचवला आहे. याच श्रीगुरुजींनी 'काश्मिरींच्या डोळ्यांना झालेल्या जखमा पॅलेट गन मुळे नसून दंगेखोरांनीच फेकलेल्या ग्रेनेड मधील खिळे इत्यादींनी झाल्याचा' ही जावईशोध लावलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सैन्यावर फेकलेल्या 'खिळे आणि काचा वगैरेने ठासून भरलेल्या' या ग्रेनेड्सनी सैन्यातील एकही जवानाच्या डोळ्यांना इजा झालेली नाही. सैनिक केवळ स्व-संरक्षण करताना एवढी माणसं मारताय आणि जायबंदी करताय असंही श्रीगुरुजी उवाच.
केवळ हिंदुत्ववादी आणि संघी अजेंडा कुठेही आणि कायम रेटत राहणं किती गांभीर्याने घ्यायचं? कुठच्याही चुलीत एक संघी लाकूड घालायचच याला काय अर्थ आहे!
मागची पंचवीस वर्षे सैन्याची पूर्ण ताकद वापरूनही आणि काश्मिरींच्या दोन पिढ्या सडवूनही आज पंचवीस वर्षानंतर आझादीचा नारा आहेच. त्यामुळे सैन्य वापरून हा प्रश्न सुटू शकत नाही हे सिद्ध झालंय. केवळ आफ्स्पा कायदा नाही तर PSA (The Jammu and Kashmir Public Safety Act, 1978) कायदा देखील हटवला पाहिजे ही मागणी जोर धरतेय.
26 Jul 2016 - 9:41 pm | अनुप ढेरे
एक दुरुस्ती: माझ्या माहितीप्रमाणे पॅलेट बंदूका सैन्य वापरत नाही. स्थानिक पोलीस आणि CRPF आदी वापरतात.
बाकी चालू द्या.
26 Jul 2016 - 10:32 pm | अमितदादा
तुमची काश्मीर प्रश्न सुटावा हि तळमळ दिसून येते परंतु तुमि जे उपाय सांगत आहेत ते खूपच soft आहेत ते काश्मीर मद्ये उपयोगी पडणार नाहीत असं मज मत आहे. काश्मीर मधला असंतोष हा radical लोक , प्रो-पाकिस्तान, प्रो-फ्रीडम,आणि सरकार विषयी असंतोषी लोक यांची भेलमिसल आहे, त्यामुळं सगळ्यांना एकाच strategy उपयोगी नाही पडणार. Afspa हा ठराविक एरिया मधुन काडाय हवा परंतु त्या ठिकाणाची जबाबदारी पोलिसांना द्यावी कारण आर्मी ह्या कायद्याशीवाय काम करू शकणार नाही। Afspa च्या जागी त्याच्यापेक्षा softer ऍक्ट अनाय हवा, आणि saperatist लोकांबर चर्चा चालुकरून पाहावी। जो पर्यंत काही positive outcome येत नाही तोपर्यंत status quo ठेवावा। आणि एक नागरिक म्हणून मला हा कायदा नसता चालला पण मी एवढा गोंधलं आणि असंतोष केलाच नसता, म्हणजे असंतोष आहे म्हणून हा कायदा आणि कायदा आहे म्हणून परत असंतोष, म्हणजे ही एक cycle आहे. श्री डोवाल यांचे कार्य आणि personal intigrity हि अत्युचं दर्जाची आहे त्यामुळं त्यांच्यावर शंका घेणं चूक. आणि जेवढे आंदोलक जखमी तेवढेच जवान पण जखमी झालेत हे लक्षात घ्या. काश्मीर मधली newspaper जाणीवपूर्वक जवान आणि पोलिसांना व्हिलन ठरवतात आणि त्यांना झालेल्या हानीची आकडेवारी देत नाहीत. माजामते मोदींची startegy खूप धारसोडी ची वाटते पण हे पर्सनल ओपिनियन आहे. शेवटी एक लक्षात घ्या काश्मीर हा फक्त जमीन आणि लोक यांचा विषय राहिला नाहीये तर हा आता स्ट्रॅटेगिक गेम झाला आहे भारत, पाकिस्तान आणि possibly in future चीन मधला, म्हणून जपून पावलं उचलायला हवी.
27 Jul 2016 - 3:08 am | धनावडे
मग काश्मीर देउन टाकायचा म्हणताय का?
27 Jul 2016 - 3:56 am | अमितदादा
अजिबात नाही आणि मी हि आस कूट बोलो नाही। फक्त मिलिटरी आणि पोलिटिकल अँप्रोच वापरून प्रश्न सोडावा आस मज म्हणणं आहे। high hardness च चालणार नाही हे आपण गेल्या 30 वर्षात पाहिलं आहे। वाजपेयींना जे समजलं ते नंतरच्या सरकारनं समजलं आस दिसत नाही। मोदींनी सुरुवात चांगली केली नंतर मात्र दिशा भरकटलेली दिसते । आणि काश्मीर देऊन उपयोगाचं नाही कारण आज काश्मीर गेला तर उद्या पंजाब जाईल परवा ईशान्य भारत जाईल, हे होऊ नये असे वाटत असेल तर मिलीटरी अँप्रोच ला चर्चे ची साथ दिल्याशिवाय पर्याय नाही।
27 Jul 2016 - 6:07 am | धनावडे
हा प्रश्न तुम्हाला नाही वो ताम्हनकराना आहे
27 Jul 2016 - 9:35 am | सुबोध खरे
ताम्हनकर साहेब
वरील दोन्ही व्हिडीओ मध्ये फक्त श्रीनगर शहराच्या अंतर्भागातील काही युवक शुक्रवारी नमाज नंतर दगडफेकी करतात आणि त्यावर जम्मू आणि काश्मीर पोलीस कशी कारवाई करतात एवढाच विषय आहे. AFPSA लष्कर किंवा निमलष्करी दले याबाबत एक नव्या पैशाची हि चर्चा नाही. एवढा मोठा डोंगर पोखरून तुम्ही फक्त झुरळ बाहेर काढलं. आपला आवेश असा होता कि न भूतो न भविष्यती असा माहितीचा स्रोत आपल्या हाताला लागला आहे.
आपल्या एकंदर आवेशावरून असे दिसत आहे कि आपण जेवढा पाहिला तोच आणि तेवढाच हत्ती आहे अशी तुमची समजूत आहे. काश्मीर प्रश्न आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूप मोठा आणि खोलवर गेलेला आहे. सद्या स्थिती अशी आहे कि मोदी सरकारने पाकिस्तानचे बरेचसे आखाती मित्र देश आणि अमेरिका यांच्याबरोबर वेगवेगळे करार करून पाकिस्तानची नाकेबंदी केलेली आहे. यामुळे पाकिस्तान त्याला प्रतिक्रिया म्हणून काश्मीर मध्ये परत अंतर्गत हिंसाचार भडकावून तो प्रश्न अंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपण अपूर्ण माहितीवर बेफाट विधाने करीत आहेत ती बंद करा अशी आपल्याला विनंती आहे. मिसळपाव वर बहुश्रुत आणि विद्वान अशी अनेक मंडळी आहेत त्यामुळे कोणतेही विधान त्याच्या सकृतदर्शनी अवतारावर न घेता ते पारखूनच घेतले जाईल.
27 Jul 2016 - 6:12 pm | अमितदादा
हा प्रतिसाद तुमच्या ह्या वाक्याला आहे "सद्या स्थिती अशी आहे कि मोदी सरकारने पाकिस्तानचे बरेचसे आखाती मित्र देश आणि अमेरिका यांच्याबरोबर वेगवेगळे करार करून पाकिस्तानची नाकेबंदी केलेली आहे"
काश्मीर असंतोषानंतर अमेरिकेने जे स्टेटमेंट दिले त्यामध्ये कुठं हि काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे असा अमेरिका म्हणत नाही, चीन सहसा काश्मीर वर मत प्रदर्शित करत नव्हता परंतु आता चीन ने स्टेटमेंट जरी करून स्वतःची strategy चेंज केली आहे. OIC जी इस्लामिक देशांची संघटना आहे त्यांनी ही काश्मीर मध्ये हिंसाचार थांबवा आस बोलून पाकिस्तानची तळी उचलली आहेत. जगामध्ये अजूनसुद्धा एकही देश काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत प्रश्न आहे असं जाहीरपणे मान्य करत नाही (माझ्या वाचनातं तरी आलं नाही). ह्या गोष्टी जरी सिम्बॉलीक असल्या आणि याने ग्राउंड रिऍलिटी जरी बदलत नसली तरी त्या स्ट्रॅटेगिकली खूप महत्वपूर्ण आहेत. मोदी सरकार ने पाकिस्तान ला economically आणि politically एकाकी पाडण्यासाठी पावले उचलली पण त्याचे परिणाम दिसायला खूप काळ लोतेल. सध्यातरी पाकिस्तान काश्मीर विषयावर एकाकी नाही, अमेरिका आणि इस्लामिक राष्ट्रे double गेम खेळतायत आणि चीन पाकिस्तान पाठीमागे ठामपणे उभा आहे.
27 Jul 2016 - 6:21 pm | श्रीगुरुजी
भारत व पाकिस्तान या वादात कोणताही देश स्वतःहून भाग घेत नाही. या दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चेतूनच वाद मिटवावे असेच सर्व देशांनी अनेकवेळा सांगितले आहे. पाकिस्तानने वारंवार विनंती करूनसुद्धा अमेरिकेने या वादात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. हा द्वपक्षीय मुद्दा आहे हेही अमेरिकेने मान्य केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा काश्मिर व सार्वमत हा मुद्दा बॅकबर्नरवर टाकलेला आहे.
27 Jul 2016 - 6:31 pm | अमितदादा
तोचतर प्रॉब्लेम आहे ना गुरुजी. जर काश्मीर अंतर्गत प्रश्न नसून द्विपक्षीय प्रश्न असेल तर पाकिस्तान बर वाटाघाटी कराव्याच लागतील ना, कारण आता जस इस्राईल च्या विरोधी जागतिक मत बनत जात आहे तस भारताविषयी बनाय नको अशी माजी इच्छा आहे. कारण हि लढाई अता perception ची बनाल्यामुळं भारतालाही आपण काहीतरी चर्चा करतोय हे दाखवाय हवं भलेही मागे मिलीटरी action चालू असुदे।
28 Jul 2016 - 2:26 pm | श्रीगुरुजी
पाकिस्तान असो वा काश्मिरी, भारताने त्यांच्याशी नक्की कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे एक प्रश्नचिन्ह आहे.
भारताने काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे, काश्मिर पाकिस्तानच्या हवाली करावे, भारताने काश्मिरमधून सैन्य हटवावे इ. पाकिस्तानच्या मागण्यांवर भारताची भूमिका ठाम आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर चर्चा अशक्य आहे.
काश्मिरला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, काश्मिरला स्वायत्तता द्यावी, काश्मिरमधून सैन्य हटवावे, अॅफ्प्सा रद्द करावा, पाकव्याप्त काश्मिर व भारतातील काश्मिर इ. दोन प्रदेशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय एकमेकांच्या प्रदेशात जाता यावे इ. फुटिरतावादी काश्मिरींच्या मागण्यांवर भारताची भूमिका ठाम आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरही चर्चा अशक्य आहे.
पाकिस्तानने काश्मिरमध्ये दहशतवादी पाठविणे बंद करावे, दहशतवाद्यांना पाठिंबा व मदत देणे थांबवावे, दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, दाउद सारख्या अतिरेक्यांना भारताच्या हवाली करावे, हाफिझ सईद सारख्या अतिरेक्यांना शिक्षा ठोठवावी, काश्मिरमध्ये सार्वमताचा नाद सोडावा, काश्मिरमधील फुटिरतावाद्यांना मदत व पाठिंबा देणे थांबवावे, सीमेवरील गोळीबार थांबवावा, पाकव्याप्त काश्मिरवरील ताबा सोडावा, पाकव्याप्त काश्मिरमध्ये चीनला प्रवेश देऊ नये इ. भारताच्या मागण्यांना पाकिस्तानने कायमच नकार दिला आहे.
सर्वांच्या भूमिका अत्यंत ठाम असताना भारत पाकिस्तानशी किंवा काश्मिरींशी कोणत्या मुद्द्यांवर वाटाघाटी करणार? अशा चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु जगाला दाखविण्यासाठी चर्चेचे नाटक करावे लागते व हे नाटक व्यवस्थित सुरू आहे.
28 Jul 2016 - 3:18 pm | अमितदादा
दोन्ही देश्यांचा ह्या मागण्या आहेत हे मान्य पण त्या ठाम आहेत हे अमान्य. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मुर्शिरफ शी बॅक चॅनेल वाटाघाटी सुरु केलेल्या आणि काश्मिर प्रश्नी खूप मोठी प्रोग्रेस झालेली. पण कम नशिबाने मुर्शिरफ यांची सत्ता गेली आणि मनमोहन सिंग याचं ह्या वाटाघाटी पुढ न्यायचं धाडस झालं नाही । हि माहिती wikileaks cable नि उघडी केली आहे ती तुमि जालावर बगू शकता। त्यातील प्रमुख मुद्दे अशे होते की 1. LOC हीच पेरमेनेन्ट बॉर्डर असेल म्हणजे कोणतीही भारतीय काश्मीर भारताकडे आणि पाकिस्तानी काश्मीर पाकिस्तान कडे राहील . 2. बॉर्डर वरची आर्मी ओमी करून फ्री व्यापार आणि लोकांची movement चालू करायांची . 3. भारत आणि पाकिस्तान कोणत्याही दाहशदवादी कृत्याला डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट पाठिंबा देणार नाहीत . 4. जॉईंट मॅनेजमेंट ऑफ काश्मीर . थोडक्यात काय दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असू शकतात, चर्चे मधून खूप काही साध्य होऊ शकत.
28 Jul 2016 - 3:32 pm | अर्जुन
कारगील घडवणार्या मुशर्रफवर विश्वास ठेवणे, म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीतुन दिसून आले आहे कि, भारत फक्त अटी पाळतो व पाकिस्तान सोयीनूसार भूमिका बदलतो.
28 Jul 2016 - 3:42 pm | अमितदादा
तुमची शंका बरोबर आहे अर्जुन साहेब, पण ह्या वाटाघाटी तोंडी नसतात त्याला स्ट्रॉंग पोलिटिकल कंमिटमेंट असते, आणी त्या चर्चे मध्ये अमेरिका सुद्धा होती । आणि शेवटी भारताने केलेले सिमला करार आणि पाणी वाटपाचे करार हे अपवाद वगळता पळाले जातात । नवाज शरीफ याना जर पोलिटिकल बँकिंग आणि निर्णय घेण्याचे अधिकार असते तर त्यांनी मोदी बरोबर नक्कीच चांगली प्रगती केली असती, मोदी यांनी हे जाणले म्हणूनच सतत शरीफ याना भेटत राहिले ते । परंतु पाकिस्तान आर्मी नेहमी चर्चे मध्ये अडथळा उभा करत आली आहे ।
28 Jul 2016 - 3:33 pm | चंपाबाई
छान
28 Jul 2016 - 4:04 pm | श्रीगुरुजी
झिया उल हक व राजीव गांधी यांच्यात या मुद्द्यावर ८० च्या दशकात चर्चा झाली होती. परंतु झिया व राजीव गांधी दोघेही नजीकच्या अंतराने गेल्यामुळे त्यावर पुढे चर्चा होउ शकली नाही. ही चर्चा सुरू असतानाचा काश्मिरमध्ये थेट युद्ध करण्याच्या ऐवजी दहशतवादाच्या मार्गाने भारताला नामोहरम करून काश्मिर मिळविण्याची एक समांतर योजना झियाने सुरू केली होती. दरम्यानच्या काळात आधी बेनझीर, नंतर नवाझ शरीफ आणि नंतर मुशर्रफ यांनी झियाने सुरू केलेली दहशतवादाचीच योजना पुढे नेल्यामुळे सर्व गणितेच बदलून केली. सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा मानण्यास भारतातून फारसा विरोध होणार नाही. परंतु पाकिस्तानातून या तोडग्याला जबरदस्त विरोध होईल. काश्मिरीसुद्द्धा या तोडग्याच्या विरोधात असतील. त्यामुळे हा तोडगा प्रत्यक्षात येणार नाही. हा तोडगा अधूनमधून माध्यमात येतो, परंतु मनमोहन सिंगांच्या काळात यावर खूप प्रगती झाली होती असे वाटत नाही. जरी सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमा म्हणून मान्य केली तरी जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवित नाही तोपर्यंत या तोडग्याला अर्थ नाही.
भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापार सुरूच आहे. लोकांची आवकजावकही सुरू आहे.
भारत दहशतवाद्यांना अजिबात पाठिंबा देत नाही. पाकिस्तान मात्र उघडपणे दहशतवाद्यांना सक्रीय पाठिंबा देतो. अनेकवेळा मागणी करूनसुद्धा दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे पाकिस्तानने थांबविले नाही व भविष्यातही ते थांबणार नाही. पाकिस्तानची भूमिका ठाम असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊच शकत नाही व झाली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
हा अत्यंत अव्यवहारी तोडगा आहे. हा दोन्ही देशातील कोणालाही मान्य होणार नाही. जॉईंट मॅनेजमेंट करण्याच्या प्रदेशात पाकिस्तान पाकव्याप्त काश्मिरचा समावेश करणार नाही. भारतातील काश्मिर जॉईंटली मॅनेज करणे हे भारत कधीही मान्य करणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रदेशावर दोघांनी संयुक्तरित्या राज्य करावे हे काश्मिरी कधीही मान्य करणार नाहीत. हा तोडगा कधीही प्रत्यक्षात येणार नाही.
या प्रश्नात सर्वांच्याच ठाम भूमिका असल्याने चर्चेच्या कितीही फेर्या केल्या तरी फलनिष्पत्ती शून्य असेल. भारताची सध्याची भूमिका योग्य आहे. चर्चेचे गुर्हाळ सुरू ठेवून आपण लवचिक आहोत हे दाखवून देणे व पाकिस्तानी सैन्य व दहशतवादी यांना सैन्याच्या माध्यमातून चोख उत्तर देणे व त्याचवेळी कोणतीही पडती भूमिका न घेता दडपणाखाली अयोग्य तडजोड न करणे ही भारताची भूमिका अत्यंत योग्य आहे.
१९८० ते १९९५ या काळात पंजाबमध्ये सुद्धा फुटीरतावाद व दहशतवादाला उधाण आले होते. भारताने दहशतवाद्यांपुढे नमते न घेता व फुटिरतावाद्यांच्या मागण्या मान्य न करता दहशतवाद्यांविरूद्ध कठोर कारवाई करून दहशतवाद संपुष्टात आणला. त्यात महत्वाची भूमिका पंजाबमधील नागरिकांची होती. सुरवातीला फुटिरतावादी व दहशतवाद्यांना बर्यापैकी पाठिंबा देणार्या पंजाब्यांना काही काळाने त्यातील फोलपणा लक्षात आला व त्यांचा दहशतवाद्यांना व फुटिरतावाद्यांना असलेला पाठिंबा बंद झाल्यामुळे तिथे शांतता निर्माण होऊन तो प्रश्न सुटला. त्यानंतर दहशतवादाचे पुनरूज्जीवन करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करूनसुद्धा पंजाब शांत आहे. काश्मिरमधील नागरिकांना सुबुद्दी सुचून त्यांनी दहशतवाद्यांना व फुटिरतावाद्यांना पाठिंबा द्यायचे थांबविले तर तिथे आपोआपच शांतता प्रस्थापित होईल. चर्चा किंवा दहशतवाद्यांच्या कारवायातून किंवा फुटिरतावाद्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्याला काहीही मिळणार नाही व आपले नुकसानच होत राहील हे त्यांच्या जेव्हा लक्षात येईल तो सुदिन.
28 Jul 2016 - 4:23 pm | अमितदादा
गुरुजी आपले विचार जुळत नसले तरी तुम्ही नेहमी मुध्येसुद मांडणी करता हे आवडत । असो माझा मुद्दा ऐवडाच होता की कोणतेही मुद्दे ठाम नसतात थोडी लवचिकता असते आणि एकदा दोनी देशामद्वे पोलिटिकल कंमिटमेंट झाली की तुमाला किंवा मला मुद्दे पटतात कि नाही याचा कोणी विचार हि करणार नाही। भारत दहशतवाद नाही पण पाकिस्तान मध्ये अशांतता पसरवण्यात माहीर आहे, कराची अशांतता, बालुचिस्तान अशांतता आणि RAW यावर जालावर शोधा।
बाकी पंजाब मध्ये वरवरची शांतता आहे असं मला वाटत, अजून हि काही लोकांमध्ये खलिस्तान ला सॉफ्ट कॉर्नर आहे ( हि माजी शंका आहे चुकीची असू शकते कारण मी पंजाब मधील newspaper खालच्या कंमेन्ट वाचून हे मत बनवलं आहे ) बाकी गोल्डन टेम्पल मधून भिंगरेवाला च्या तसबिरी कोणीही कडू शकत नाही बर का । पंजाब हे मिलिटरी आणि पोलिटिकल अँप्रोच चे उत्तम उदाहरण आहे, आजच अकाली दल हे पुराणे फुटीरवादीच (सॉफ्ट) आहेत ।
बाकी माझे मुद्दे मी मांडले आहेत हे बोलून इथेच थांबतो।
28 Jul 2016 - 6:39 pm | अर्जुन
अमिदददादा,
सरकार अशी पोलिटीकल कमीटमेंट करत आहे, अशी शंका जरी आली तरी पाकिस्तान लश्क्रर नजर वक्र करते ल्गेच सरकारची भाषा बदलते. हे आपल्याला बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ(?), झरदारी या प्रत्येक पंतप्रधानाच्या वेळेस दिसून आले, त्यामुळे तो विषय सोडुन बोला. बाकी खलिस्तानसाठी पाकिस्तानने पुर्ण प्रयत्न करुन स्थानिक जनतेची पूरेशी साथ न मिळाल्यमुळेच पंजाब भारतात आहे. देशद्रोही तर स्रर्वच राज्यात आहेत, पण स्थानिक जनतेची पूरेशी साथ न मिळाल्यास ते निष्प्रभ ठरतात.
28 Jul 2016 - 6:42 pm | अमितदादा
सहमत..
28 Jul 2016 - 8:50 pm | श्रीगुरुजी
काही मुद्द्यांवरील भूमिका अजिबात लवचिक नसते व ती लवचिक नसायलाच हवी. उदाहरणार्थ अंमली पदार्थांची तस्करी करणार्यांना किंवा दहशतवादी हल्ले करणार्यांना किंवा बलात्कार्यांना कठोर शिक्षा हवीच. त्यात कोणतीही लवचिकता नसते.
हे आरोप अधूनमधून पाकिस्तान करीत असतो. परंतु त्यात तथ्य नाही. कराची व सिंध प्रांतात ८० व ९० च्या दशकात जिये सिंध ही चळवळ जोरात होती. सिंध प्रांताला वेगळ्या देशाचा दर्जा मिळावा यासाठी मुहाजिर कौमी मुव्हमेंट या संघटनेचा प्रमुख अल्ताफ हुसेन या मागणीसाठी हिंसक आंदोलन करीत होता. त्याच्या मागणीला सिंध प्रांतात बराच पाठिंबा होता. पाकिस्तान सरकार त्याच्या मागे हात धुउन लागल्यावर तो लंडनला पळाला व शेवटपर्यंत तो तिथेच राहिला. नुकतेच त्याचे निधन झाले. तो लंडनला गेल्यावर ती चळवळ थंडावली व आता ती चळवळ जवळपास संपलेली आहे.
बर्याच पूर्वी अफगाणिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूकडील पठाणांनी स्वतंत्र पख्तुनिस्तानची मागणी केली होती. पण ती मागणी फारशी पुढे रेटली गेली नाही.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागण्या अधूनमधून येत असतात. पण त्या चळवळीत फारसा दम नाही.
या सर्व चळवळींमागे भारत व रॉ आहे असा पाकिस्तान अधूनमधून आरोप करतो. परक्या देशातील कोणत्याही चळवळीला पाठिंबा देण्यासाठी व त्यात सक्रीय सहभाग देण्यासाठी स्थानिक फितुर व्हावे लागतात. पाकिस्तानात हिंदू २ % पेक्षाही कमी आहेत. त्यातले बरेच सिंध प्रांतात आहेत. उर्वरीत भागात हिंदू जवळपास नाहीतच. अशा परिस्थितीत भारताला स्थानिकांचा पाठिंबा मिळणे जवळपास अशक्य आहे. भारत पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवतो हे एक मिथ आहे.
पंजाब मध्ये फुटिरतावादाचे पुनरूज्जीवन अशक्य आहे. पाकिस्तानने तसा प्रयन्त अनेकवेळा करून पाहिलेला आहे, परंतु त्यांना कायमच अपयश आले आहे.
28 Jul 2016 - 8:56 pm | अमितदादा
असहमत प्रतिवाद करत नाही. चर्चा करणे म्हणजे दहशतवाद ला सॉफ्ट कॉर्नर न्हवे. बाकी अल्ताफ हुसेन जिवंत आहे।
28 Jul 2016 - 9:05 pm | श्रीगुरुजी
काहीतरी गोंधळ दिसतो. अल्ताफ हुसेनच्या मृत्युबद्दल उलटसुलट बातम्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=JTjzSNGePKU
http://lifewithstyless.blogspot.in/2016/03/mqms-chief-altaf-hussain-died...
28 Jul 2016 - 9:07 pm | अमितदादा
तुमच्या ह्या वाक्याला माझा प्रतिसाद "भारत पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवतो हे एक मिथ आहे."
तुम्ही innocent आहेत की ignorant हे कळत नाही. पाकिस्तान भारतात अशांतता आणि दहशतवाद पसरवत असेल तर भारताने त्यांची भाषा त्यांना शिकवायलाच हवी हे माझे मत आणि RAW चा पाकिस्तान विभाग हे काम करत आहे आणि असणार हे माझे मत ( जे तुम्ही नाकारू शकता ). बाकी कुलभूषण जाधव पाकिस्तान मध्ये व्यापारासाठी किंवा टुरिझम साठी गेलेले म्हणत असाल तर धन्य आहे । आता मी म्हणतो याला काय पुरावा नाही कारण गुप्तहेर संस्था काय रिपोर्ट छापून जालावर नाही टाकणार ।
28 Jul 2016 - 9:22 pm | श्रीगुरुजी
पुरावा नसताना कसा विश्वास ठेवायचा? नुसत्या पर्सेप्शनला किंवा विशफुल थिंकिंगला अर्थ नसतो.
28 Jul 2016 - 9:29 pm | अमितदादा
ह्या वाक्याशी पूर्ण सहमत।
27 Jul 2016 - 5:56 pm | श्रीगुरुजी
सैन्याचे विशेष हक्क सहन करायचे नसतील तर अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबवा, अतिरेक्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येउन निदर्शने करणे व पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणे थांबवा, सैन्यावर व पोलिसांवर हल्ले करणे बंद करा, आझादीच्या मागण्या बंद करा. हे सर्व बंद झाले तर तिथे मोठ्या प्रमाणात सैन्य ठेवण्याची व सैन्याला विशेषाधिकार देण्याची गरजच भासणार नाही. मुळात फक्त काश्मिरमध्येच सैन्याला विशेषाधिकार द्यायची का गरज भासली हे समजतंय का? याला तिथले नागरिकच कारणीभूत आहेत. त्यांच्याच देशद्रोही कृत्यांमुळे हे करावे लागत आहे. काश्मिरप्रमाणे राजस्थान व पंजाब राज्यांची सीमा सुद्धा पाकिस्तानला लागून आहे. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य का नाही व तिथल्या सैन्याला विशेषाधिकार का दिलेले नाहीत याचा अभ्यास केलात तर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
त्यांनी काय तुम्हाला रोजचं काम रिपोर्टिंग करायच का? तुम्ही त्यांचे वरीष्ठ आहात का? त्यांची जी काही कामगिरी असेल ती योग्य वेळी समोर येईलच. नाही समोर आली तरी फरक पडत नाही. त्यांच्यासारख्यांनी आपल्या कामात जितकी गुप्तता राखता येईल तितकी राखावी. तेच देशहिताचे आहे. त्यांची कामगिरी समजण्यासाठी इतके कासावीस झाले असाल तर माहिती अधिकारात अर्ज दाखल करून त्यांची कामगिरी विचारा किंवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून त्यांना आपल्या कामगिरीचा अहवाल जनतेसमोर ठेवण्यास सांगा.
दाखवा बरं दुसरी बाजू.
नेहमीप्रमाणेच अत्यंत हास्यास्पद विधान. सैन्याला विशेषाधिकार नसतानाच्या काळात सुद्धा पाकिस्तान दहशतवादाची पेरणी करतच होता.
या सर्व अशांततेचे मूळ कलम ३७०, काश्मिरींचे दहशतवादी व पाकिस्तान प्रेम आणि आझादीची मागणी यामध्ये आहे. जोपर्यंत काश्मिरींना सदबुद्धी येत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.
मी परदेशाभिमानी? बरे आहात ना? पोस्ट लिहिणारा मूर्ख आहे हे मूळ लेखातून व नंतरच्या प्रतिसादातून अनेकवेळा सिद्ध झालेलं आहे. वर तोंड करून सैनिकांना स्वतः भरलेल्या टीचभर टॅक्सच्या गप्पा सांगणारा शहाणा असतो का?
माझ्या आधीच्या प्रतिसादात 'काश्मिरमध्ये जे तरूण आंधळे झाले आहेत त्याला फक्त पॅलेट गन्स कारणीभूत नाहीत. 'असे लिहिले होते. ते वाचले असते व समजले असते तर "याच श्रीगुरुजींनी 'काश्मिरींच्या डोळ्यांना झालेल्या जखमा पॅलेट गन मुळे नसून दंगेखोरांनीच फेकलेल्या ग्रेनेड मधील खिळे इत्यादींनी झाल्याचा' ही जावईशोध लावलाय. " असा बाष्कळ आरोप केलाच नसता. डोळ्यांच्या जखमा पॅलेट गन्सप्रमाणे दंगलखोरांनी मागून फेकलेल्या ग्रेनेड्समुळे सुद्धा झालेल्या आहेत असे मी लिहिले होते.
सध्या सुरू असलेल्या आंदोलनात जखमीची संख्या ३००० च्या आसपास आहे. त्यात जवळपास निम्मे सैनिक व पोलिस आहेत. अनेक पोलिस व सैनिकांच्या डोळ्यांना जखमा झालेल्या असून त्यांची चित्रे आंतरजालावर अनेक ठिकाणी पहायला मिळतात. दुर्दैवाने तुमच्यासारख्या सैनिक द्वेष ठासून भरलेल्यांना फक्त काश्मिरींच्याच जखमा दिसतात. जमावाने सैनिक व पोलिसांवर केलेले हल्ले व त्यांच्या जखमा दिसत नाहीत. सैनिक जो काही प्रतिकार करीत आहेत तो फक्त स्वसंरक्षणासाठीच करीत आहेत. सुरवातीला दगडफेकीपासून सैनिक व पोलिस स्वत:ला वाचवायचा प्रयत्न करतात. नंतर जमाव अनावर झाला तर अश्रूधूर सोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करतात. तरीही जमाव शांत झाला नाही तर नाईलाजाने पॅलेट गन्सचा वापर करावा लागतो.
यात कसला आलाय हिंदुत्ववादी आणी संघी अजेंडा? सैनिक व पोलिस अनेक महिने बुर्हान वाणीसारख्या अतिरेक्याच्या मागावर होते ते काय हिंदुत्ववादी व संघाच्या आदेशावरून? त्याचा ठावठिकाणा शोधून गोळीबारात तो मेला तो काय हिंदुत्ववादी व संघाच्या सांगण्यावरून? संचारबंदी मोडून काश्मिरी रस्त्यावर उतरून पोलिस व सैनिकांवर हल्ले करतात ते काय हिंदुत्ववादी व संघाच्या सांगण्यावरून? आपण काय निरर्थक व बेताल बरळतोय हे समजतंय का?
तुमच्या डोळ्यावरच्या चष्म्याची एक काच सैनिक द्वेषाची आहे व दुसरी काच हिंदूत्ववादी/संघाच्या द्वेषाची आहे. त्यातून काय दिसणार ते स्पष्ट आहे.
जगात मुस्लिम जिथे जिथे संख्येने जास्त आहेत तिथे तिथे ते फुटिरतावादी आंदोलने करून वेगळा देश तोडून मागतात. अनेक देशांनी मुस्लिमांच्या फुटिरतावादी प्रवृत्तीचा वाईट अनुभव घेतलेला आहे. भारतात तेच सुरू आहे. काश्मिर हे एकमेव राज्य मुस्लिम बहुल राज्य आहे आणि तिथेच आझादीच्या मागण्या होतात यात काहीही आश्चर्य नाही. सैन्य वापरून कदाचित हा प्रश्न सुटणार नसेल पण सैन्य न वापरले तर काश्मिर केव्हाच पाकिस्तानच्या घशात जाईल व उर्वरीत संपूर्ण भारताला मोठा धोका निर्माण होईल. हे टाळायचे असेल तर सैन्य हवेच. काही जण अॅफ्स्पा हटवा किंवा पीएसए हटवा अशा वाटेल त्या मागण्या करतील. अशा मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणे हेच योग्य धोरण आहे. मूठभर तथाकथित मानवतावाद्यांच्या, पाकिस्तानप्रेमींच्या व निधर्मांधांच्या मागण्यांपुढे मान तुकवून हे कायदे रद्द केले तर ती मोठी घोडचूक असेल. त्यामुळे कोणतेही सरकार हे कायदे रद्द करणार नाही. हे कायदे रद्द व्हावे असे वाटत असेल तर काश्मिरींनी अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबवावे, अतिरेक्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येउन निदर्शने करणे व पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणे थांबवावे, सैन्यावर व पोलिसांवर हल्ले करणे बंद करावे व आझादीच्या मागण्या बंद करून व ३७० वे कलम रद्द करण्याची मागणी स्वतःहून करावी. असे झाले तर या कायद्यांची गरजच राहणार नाही.
28 Jul 2016 - 2:04 pm | श्रीगुरुजी
जम्मू-काश्मिरमधील सैन्याच्या उपस्थितीबद्दल गैरसमज झालेला दिसतोय. तिथे जे सैन्य तैनात आहे व सैन्याला अॅफ्स्पा सारखा विशेषाधिकार असलेला कायदा दिलेला आहे तो काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी किंवा आझादीच्या नार्यांवर उपाय काढण्यासाठी नाही. काश्मिर हे पाकिस्तान या शत्रूराष्ट्राच्या सीमेवरील राष्ट्र आहे. पाकिस्तानने आजतगायत भारताबरोबर ४ वेळा युद्ध केलेले आहे. पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादी तयार करून त्यांना शस्त्रे, एके४७, ग्रेनेड्स, राजकीय व आर्थिक पाठिंबा देऊन त्यांना निष्पाप भारतीयांचे प्राण घेण्यासाठी काश्मिरमार्गे भारतात पाठवितो. पाकिस्तानी सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी व दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी तिथे सैन्य तैनात केले आहे.
26 Jul 2016 - 11:39 pm | गामा पैलवान
संदीप ताम्हनकर,
तुम्ही दिलेल्या पहिल्या चलचित्रातला सव्वा मिनिटांचा भाग पहिला. मेलो तिच्यायला हसून हसून.
रिक्षावाला म्हणतो की जो कोणी इथे येईल तो व्हिसा घेऊन यायला पाहिजे. १९४८ साली बारामुल्लामध्ये पाकी घुसखोर कसला व्हिसा घेऊन आले होते? १५००० मुस्लीमांपैकी १२००० मारले गेले ना तेव्हा? काश्मिरात पुराचं पाणी घुसलं होतं ते कोणता व्हिसा घेऊन घुसलं होतं?
रिक्षावाला नंतर आजून एक भयाण हास्यास्पद विधान करतांना दाखवलाय. म्हणे इथे (=श्रीनगरात) सही लोकं राहतात. जुलूम करत नाहीत आणि करूही देत नाहीत. मग काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांवर हाकलून लावलं तेव्हा हे थोर लोकं काय करत होते ?
असो.
तुम्हाला जे सांगायचंय ते स्पष्टपणे स्वत:च्या शब्दांत मांडा. उगीच हा व्हिडियो पहा आणि तो लेख वाचा वगैरे कालहरण नको.
आ.न.,
-गा.पै.
27 Jul 2016 - 6:02 pm | श्रीगुरुजी
काय बिनडोक रिक्षावाला आहे? भारतातल्या भारतात व्हिसा? आपण राहतो त्या ठिकाणी भारतीयांनी व्हिसा घेऊन यावे असे वाटत असेल तर बाडबिस्तारा गुंडाळून जा पाकिस्तानला निघून.
असला एकतर्फी प्रोपागंडा प्रचार करणे हेच इथल्या निधर्मांधांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकवेळ अतिरेकी परवडले, पण हे घरचे भेदी जास्त धोकादायक आहेत.
27 Jul 2016 - 12:15 am | संदीप डांगे
कुठल्याही चुलीत तुम्हाला 'संघी' लाकूडच दिसत असेल तर त्याला काय करायचं ताम्हनकर साहेब?
तुमचे सर्व लेख, प्रतिसाद एका घटनेबद्दल सविस्तर चर्चा करतात पण मध्येच हे संघप्रकरण कुठून घुसडता? कश्मीरप्रश्नाशी संघाचा नेमका काय संबंध? कश्मीर प्रश्न संघाने निर्माण केला की चिघळवून ठेवलाय? कश्मीर प्रश्नाबाबत संघाचा नेमका रोल काय ते सांगा पाहू आधी.
उगाच तुमची संघाशी काय दुष्मनी असेल ती स्पेस्श्यल मधे काढा बाहेर. आस्फा कायदा, कश्मीरची परिस्थिती, पाकिस्तानचे कुलंगड्या, स्थानिकांचे आतंकवाद्यांना समर्थन, ह्या सर्वामागे संघच आहे असा काही निर्णय देऊन मोकळे होताय तुम्ही.
मोदी सत्तेत आले म्हणून पाकधार्जिण्या कश्मिरींना कसे सरळ करतील अशा वल्गना करणार्यांचा योग्य तो समाचार घ्या. पण सैन्य, सरकार, मोदी, आणि संघभक्त ह्यांना एकत्र करुन तुम्ही मुद्दा भरकटत नेत आहात हे लक्षात येतंय काय तुमच्या.
एका भारतीय सैनिकाला तुमच्या टिचभर टॅक्सचं गुणगान गाऊन दाखवताय, जरा मनाची लाज बाळगा. तुमच्या टिचभर ट्याक्समधे तुम्हालाच लागणार्या नागरी सेवा पुरवता पुरवता नाकी नौ येतंय. एवढीच धमक तुम्ही तुमच्या गल्लीतल्या नगरसेवकाला, मंत्र्याला दाखवून बघा. तुमच्या नखभर ट्याक्सच्या जीवावर देशाचे सैनिक विकत घेतलेले नाहीत तुम्ही एवढं लक्षात ठेवा आणि इथली असंबंद्ध बडबड थांबवा. संघावरच टिका करायची असेल तर जरा व्यवस्थित मुद्दे घेऊन करा. कोण नाही म्हणतंय. पण असले बुद्धीभेद करणारे लेख टाकणे शुद्ध देशद्रोह आहे. तुमच्यामाझ्या सर्वांसाठी शीर हातात घेऊन लढणार्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे.
सैनिक जर एवढेच बेताल असते तर तुमचा ट्याक्सचा माज त्याने नुसता दोन फटक्यात उतरवला असता. सारासारविवेकबुद्धी गमावलेल्यांच्या नादाला काय लागता म्हणून त्यानेही तुम्हाला सोडून दिलं असेल.
27 Jul 2016 - 3:16 pm | शलभ
+१
27 Jul 2016 - 4:32 pm | सामान्य वाचक
सैन्याच्या चूक नसतील असे नाही
त्याबद्दल योग्य ती शिक्षा त्यांना व्हावी म्हणून आग्रह धरणे , हे योग्य आहे
पण त्या चुकांचे अवडंबर आणि बाकी देशद्रोहींचे उदात्तीकरण हा भयानक प्रकार थांबला पाहिजे
27 Jul 2016 - 4:35 pm | अमितदादा
सहमत।
27 Jul 2016 - 4:08 pm | विनोद१८
......चंपा-माई मोड ऑण
याने हे वाक्य कोणाला उद्देशुन व काय समजुन लिहिले आहे ?? असे आमचे हे विचारत होते.
27 Jul 2016 - 6:58 pm | सुज्ञ
अरे तामण्या (.....) ..
ज्या सैनिकांच्या जीवावर या देशात निर्धास्त फिरतोस त्यांनाच कुठलेही पुरावे नसताना नावे ठेवायला तुला शरम वाटत नाही काय रे
फक्त ३ वेळा काश्मीरमध्ये फिरून आलास त्यातून तुला कसे कळाले रे की स्वतःचे घरदार सोडून फक्त काश्मिरी लोकांच्या आणि पर्यायाने देशाच्या संरक्षणासाठी आलेले आपले सैनिक तिथे अत्याचार करतात.
ज्यांच्यामुळे तू तिथे फिरू शकलास त्यांनाच निर्लज्जपणे आमच्या टेक्स वर तुम्ही जगता असे म्हणताना असा किती टेक्स भरतो रे तू ?
स्वताला हुशार समजत असशील तर काश्मिरी लोकांकडून त्रास होऊनही त्यांना संरक्षण देणाऱ्या एखाद्या सैनिकांच्या तुकडीत एक दिवस राहून बघ.
जेंव्हा अंगावर दगडं पडतील ना तेंव्हा मिसळपाव वर असले घाणेरडे लेख छापायची ताकद उरणार नाही . बाकी मोदी , संघ वगैरे च्या द्वेशातून असले घाणेरडे लिखाण केले असल्याची दाट शक्यता मला वाटत आहे जे तुझ्या फालतू आणि निर्लज्ज प्रतिसादातून दिसतेच आहे
तुझ्या लेखाची लक्तरं सगळ्यांनी पुरेपूर फाडलीच आहेत तेंव्हा असले काही लिहिण्याआधी, आणि स्वताचा मूर्खपणा जगाला उघडपणे दाखवण्याआधी थोडी अक्कल वापर .
भाषेबद्दल क्षमस्व पण तुझ्यासारख्याना हे हि कमीच . विचारांचा मुकाबला विचारांनी आणि चांगल्या भाषेत करावा हे आम्हालाही समजते पण घाणीत लोळनाऱ्या प्राण्याचा मुकाबला विचारांनी करून दाखवा असे म्हटल्यास ते शक्य नसते . हे तुझ्यासाठी खास. नाहीतर येशील पुन्हा ओरडत कि बघा भक्त वगैरे कसली भाषा वापरतात वगैरे नेहेमीचे तूणतूणे घेऊन .
तूर्तास इतकेच
28 Jul 2016 - 10:46 am | प्रसाद_१९८२
सहमत !!
28 Jul 2016 - 12:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
च्यायला हे असलं बोलून (म्हणजे असली भाषा वापरून) तुम्ही लोक्स जे मुळात न्याय्य आहे त्यालाच श्रीमुखावर डांबर फासता आहात राव, उगा ताम्हनकरांच्या हाती कोलीतरुपी मुद्दा देण्याचा हा प्रकार काही रुचला नाही, हे स्पष्ट नोंदवतो. असो
28 Jul 2016 - 5:08 pm | गणेश उमाजी पाजवे
काश्मिरी लोकांसाठी गळे काढणाऱ्या व भारतीय लष्कराला नावे ठेवणाऱ्या लोकांशी कशी चर्चा करावी.How to Deal With Pro-Pakistanis & Anti-Indian's: The Newshour Debate - (26th July 2016)https://www.youtube.com/watch?v=M8jtVBt28nU
28 Jul 2016 - 5:27 pm | गणेश उमाजी पाजवे
मेजर आर्या, बुरहान वाणी ला का मारले व ते कसे बरोबर आहे हे सांगताना.............
https://www.youtube.com/watch?v=LI9ap0G_d4E
28 Jul 2016 - 6:16 pm | गामा पैलवान
गणेश उमाजी पाजवे,
मेजर आर्य एकदम सही बोललेत! खरंतर काश्मीरवर चर्चा करतोच कशाला आपण भारतीय? चर्चा थेट पाकिस्तानवर व्हायला हवी.
आ.न.,
-गा.पै.
28 Jul 2016 - 8:06 pm | गणेश उमाजी पाजवे
दुःख या गोष्टीच वाटत कि आपलेच लोक्स आज भारतीय लष्कराविरुद्ध उभे ठाकलेत.भारताला पाकिस्तानपासू धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका या लोकांचा आहे जे स्वतःला मानवतावादी म्हणवून घेतात. आता वरच्या लिंक मध्ये ज्या बाई बोलत आहेत माहिरि सूद म्हणून त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी बुरहान वाणीला पुअर फेलो म्हणून संबोधले आहे व या एन्काउंटर ची चौकशी व्हावी कारण हे एन्काउंटर त्यांना फेक वाटते आहे.आता काय म्हणावे अशा लोकांना. अरे he is damn terrorist guys. जो माणूस AK - 47 घेऊन फिरतो, ज्याच्याजवळ ग्रेनेड्स आहेत. जो जवानांवर फायरिंग करतो त्याच्यासाठी तुम्ही गळे काढता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? वरून हे आपले सुधींद्र कुलकर्णी सर, त्यांना काश्मीर चा प्रश्न पाकिस्तानबरोबर शांततेच्या चर्चेने सुटेल असे वाटते आहे. अरे आतापर्यंत एवढ्या चर्चा झाल्या त्यातून काय निष्पन्न झाले? मी काही पाकिस्तानशी आताच्या आता युद्ध करा असे म्हणत नाहीये.पण एक भारताचा सुशिक्षित नागरिक म्हणून आज लष्कर ज्या परिस्थितीत काश्मीर मध्ये वावरतंय, आपलं संरक्षण करतंय, त्यांना आपण काही मदत करू शकत नसू तर त्यांना एक मॉरल सपोर्ट तरी देऊ शकतो ना आपण?आता या मानवतावाद्यांनी एक नवीन मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे भारतीय लष्कराने पॅलेट गन चा जो वापर केला काश्मीर मध्ये तो चुकीचा होता आपल्याला ऑफिस मध्ये गार गार थंड हवेत बसून हे लिहिताना अगदी सोप्प वाटत कि पॅलेट गन वापरणं कसं चुकीचं आहे वगैरे, पण जरा आपण कल्पना करूयात कि आपण भारतीय लष्करातले एक जवान आहोत आणि आपण आपल्या 15-20 सहकाऱ्यांसोबत 200-300 दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत, यातले काही दंगलखोर चाकू-सुरे घेऊन आपले डोळे फोडायला येत असतील तर आपण त्यांची आरती ओवाळावी का? कि त्याचा सत्कार करावा?दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुले व महिला या सगळ्या प्रकारात जखमी झालेल्या आहेत, तर या सो कोल्ड मानवतावाद्यांच्या मते हे सगळे भारतीय जवानांमुळे झालेले आहे पण मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो कि या दंगलीमध्ये लहान मुले व बायका घराबाहेर पडतीलच का? या मानवतावाद्यांना हे का कळत नाही कि आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून दंगलखोरच या मुलांचा व महिलांचा संरक्षक कवच सारखा वापर करीत आहे म्हणून. या दंगलखोरांच्या पहिल्या फळीत नेहेमी हि लहान मुले व महिला असतात व दंगलखोर त्यांच्या मागून हल्ले करीत असतात. आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.
28 Jul 2016 - 8:30 pm | श्रीगुरुजी
संपूर्ण सहमत.
खालील वाक्यांविषयी तर अजून जास्त सहमत.
___________________________________________________________________
>>> आता यात भारतीय लष्कराची चूक काय हे मला श्री. लेखकमहाशयाना विचारायचे आहे.
किती अडाणीपणाचा प्रश्न! सर्व चूक भारतीय लष्कराचीच आहे. लहान मुलांच्या आडून दगडफेक करणारे व ग्रेनेड्स फेकणारे तरूण, अतिरेकी, स्वातंत्र्याची मागणी करणारे काश्मिरी, पाकिस्तानी समर्थक इ. पूर्ण निष्पाप असून त्यांची काहीही चूक नाही.
28 Jul 2016 - 8:13 pm | आबा
लेख आवडला.
28 Jul 2016 - 8:17 pm | झेन
उद्या शुक्रवार, पुन्हा काश्मीरमध्ये तोच लाजीरवाणा खेळ होणार का ? मुलांना पुढे करून भाडोत्री संधिसाधू लोक अतिरेक्यांचे बाहुले बनणार का ? सरकार ने लष्करा ऐवजी मानव आयोग वाले आणि "थोर गळेकाढू विचारवंत" "उपेक्षितांचे अंतरंग" जाणणाऱ्या लोकांना पुढे पाठवावे. परवा पर्यंत काश्मीर प्रश्न सुटायला हरकत नाही.
30 Jul 2016 - 4:28 am | डॉ सुहास म्हात्रे
काश्मीर चे वास्तव... तथाकथित बुद्धीवादींचा संत हाफि़ज सैद याच्या मुखाने वास्तव (सत्य आणि असत्यसुद्धा)...
एका बाजूला काश्मीरमध्ये फितूरांना मदत आणि अतिरेकी पाठवत असल्याची बढाई मारत कबूली देत आहे (२८ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)...
तर दुसरीकडे आपण मानवतावादी संत असल्याचा मानभावी प्रचार पाकिस्तानी टिव्हीवर चालू आहे (२४ जुलै २०१६ ला प्रसिद्ध)...
हे दुहेरी वागणे तथाकथित मानवतावाद्यांना समजत नाही इतका त्यांच्या बुद्धीचीचा स्तर कमी आहे असे अजिबात नाही. पण, संकुचित राजकिय आणि/अथवा आर्थिक स्वार्थाने प्रेरीत कांगावा करताना त्यांना भारताच्या बर्यावाईटाची पर्वा नाही हे स्पष्ट आहे.
मुख्य म्हणजे, इतिहासात जेव्हा जेव्हा अतिरेकी विचारसरणीने बदल घडले आहेत, तेव्हा तेव्हा सर्वप्रथम कांगावाखोरांची मुंडकी उडवली गेली आहेत ("Revolution devours its own" — Le Vieux Cordelier). कारण, "असा स्वार्थाने प्रेरीत कांगावा करणारे त्यांचे सत्व आणि स्वत्व आपल्यापेक्षा अधिक बोली लावणार्या इतर कोणालाही सहज विकतील व आपल्याविरुद्ध कांगावा चालू करतील" हे वास्तव त्यांच्या बोलवत्या धन्यांना अनुभवाने पूरेपूर माहित झालेले असते; आणि सर्वसत्ताधीश झालेल्यांना त्याबाबतीत काडीचाही धोका पत्करणे ठीक वाटत नाही.
मात्र, हे सार्वकालीक सत्य संकुचित स्वार्थाच्या उन्मादात कांगावाखोर नेहमी विसरतात... हे वर्तन त्यांच्या बुद्धिची मर्यादा अधोरेखीत करते.
30 Jul 2016 - 10:29 am | चिनार
काश्मीर आणि तिथले अंतर्गत मुद्दे ह्याविषयी मला जास्त ज्ञान नाही. तज्ज्ञांची चर्चा वाचतोय.
पण या चर्चेवरून मला 'शूटआउट अट लोखंडवाला' सिनेमातला एक प्रसंग आठवला. त्या प्रसंगाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच ह्या धाग्याला उत्तर ठरू शकेल असे वाटते.
ATS ची टीम माया डोलस या सुपारी गुंडाचा एनकौंटर करते. खान (संजय दत्त) नावाचा पोलीस अधिकारी टीमचा प्रमुख असतो. या टीम विरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरु होते. या टीमचा वकील असलेला अमिताभ बच्चन शेवटच्या प्रसंगात कोर्टाला एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच या केसचा निकाल असेल असे तो सांगतो. या धाग्याला अनुसरून त्या प्रश्नाचा आशय कायम ठेऊन थोडा बदल करून तो प्रश्न खाली विचारतोय.
"आज आत्ता या क्षणी आपण सगळे आपापल्या कंपनीत / कार्यालयात/ इतर कुठल्या कामात व्यग्र आहोत . पण आपण सगळेच घराबाहेर आहोत असे समजा. घरात आपले कुटुंबीय आहेत (बायको, मुलं, आई-वडील). तेवढ्यात तुम्हाला कुठूनतरी असे कळते की तुमच्या घरातील दरवाज्याबाहेर याक्षणी एक माणूस बंदूक घेऊन उभा आहे आणि तो कुठल्याही क्षणी आतमध्ये शिरेल. तो माणूस खालील पैकी कोण असावा अशी तुम्ही प्रार्थना कराल ?
1. चोर/दरोडेखोर/ आतंकवादी
किंवा
2. पोलीस / सैनिक
30 Jul 2016 - 11:15 am | होकाका
एक अत्यंत उथळ आणि वल्गना वाटावं असं विश्लेषण.
30 Jul 2016 - 1:02 pm | होकाका
आत्ताच काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका भाषणाची आठवण झाली. सर्वांनी जरूर ऐकावं असं भाषण.
2 Aug 2016 - 1:49 pm | जेसीना
पूर्ण लेख वाचला , आणि त्यावरच्या सगळ्या प्रतीकिरिया सुद्धा वाचल्या. खूप दिवस झाले वाचतेय , मिपा मध्ये आल्यापासून मनोरंजन म्हणून इथले लेख वाचते परंतु हा लेख वाचल्यावर मनोरंजनाचा सोडा पण हसू कि रडू हेच समजत नाहीये
एका प्रतिक्रियेत एका महाशयांनी असा लिहले आहे कि काश्मिरात फिरत असताना त्यांना हुर्रियत वाल्यानी मदत केली म्हणजे ...... जोक ओफ द इयर ... हसून हसून वेडे झाले झाले....
माझे बहुसंख्य मित्र आणि मैत्रिणी मुस्लिम आहेत त्यांच्याबरोबर हा लेख आणि प्रतिक्रिया शेअर केला , त्यांनी मला काही प्रश्न उपस्थित केले ते खालील प्रमाणे , परत कधी आपण काश्मीर ला गेलात तर नक्कीच टिकडेच्या हुर्रियत वाल्याना हा प्रश्न विचारा
१. आतंकवादी अफजल गुरु च्या फाशीनंतर (तुमच्या भाषेत जनाब ) आमच्या भाषेत हरामी हाफिज सैद यांनी पाकिस्तान मधील एक ठिकाणी ( ठिकाणाचा नाव माहित नाही ) एका दिवसाचे जे उपोषण ठेवले होते त्यात हुर्रियत वाल्यांचे पुढारी सुद्धा गेले होते , म्हणजे तुमचा त्याला पाठिंबा आहे का ?
२. जर हुर्रियत वाल्याना एव्हडेच वाटते कि काश्मीर ची जनता त्यांच्या सोबत आहे तर ते निवडणुकीत सहभाग का घेत नाहीत ? त्यांना हरण्याची भीती आहे का ? जर ते जिंकून आले तर त्यांची मागणी स्पष्टपणे भारतातल्या सरकारसमोर मांडू शकतात . मोदी साहेबांचे सरकार काही जास्त वेळ टिकेल असे तर दिसत नाही नंतर जे काही डाव्या लोकांचे किंवा tolerant म्हणजे सेक्युलर लोकांचे सरकार येईल ते नक्कीच त्यांच्या बाजूने विचार करतील.
३. POK मध्ये हुर्रियत वाले काय करतात ?? तिकडच्या लोकांना का नाही स्वतंत्र काश्मीर बद्दल काही बोलत ?? तिकडच्या सरकारला घाबरता कि त्यांच्या पाठबळावर तुम्ही काश्मीर मध्ये हिंसक कारवायांना पाठीशी घालता ??
४. काश्मीर चा खूप सारा भाग चीन ने सुद्धा आपल्या घशात घालून ठेवला आहे (अकसाई चीन असाच कहितरी नाव आहे ) , मग तुम्ही म्हणजे हुर्रियत वाले तिथे काही करत नाहीत ? म्हणजे तुम्ही चीन ला पण घाबरता कि चीन चा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे ??
तुमच्या माहितीसाठी एक सांगते , तुमच्या म्हणल्याप्रमाणे काश्मीर मध्ये पावला पावलावर सैनिक आहेत , ते तुमच्या आणि आमच्या आणि तिकडच्या जनतेच्या संरक्षणासाठी आहेत . त्यांना माहित नाही कि तुम्ही महाराष्ट्र मधून आलेत कि UP कि बिहार मधून कि पाकिस्तान मधून , तुमची तपासणी करणें आणि तुम्ही त्यांना करून देणे हे आपले कर्तव्य आहे. जर समजा कोणी आतंकवादी असेल आणि ते त्याला न तपासणी करता जाऊन देतील आणि तो आतंकवादी कोणत्या न कोणत्या मार्गाने महारष्ट्रात किंवा अजून कोणत्या ठिकाणी आला आणि त्याने कोणती दहशदवादी कारवाई घडवून आणली तर पुन्हा तुम्ही आपल्या सैनिकांनाच नवा ठेवणार कि त्यांची सेक्युरिटी बरोबर नाही म्हणून हे भारतात येऊ शकले ... म्हणू जर ते तुमच्या छातीवर काय डोक्यावर सुद्धा बंदूक ठेऊन तुमची तपासणी करत असतील तर त्यांना करू द्या. उगाच जे टॅक्स भारत त्याचा मज दाखवू नका. त्या बिचार्यांना ३५००० एव्हडी रक्कम पगार म्हणून मिळते , तिथे मंत्री लोक २,००,००० आणि त्याच्या वर पगार घेतात आणि काही करत नाही ना त्यांना माज दाखवा तुमच्या टॅक्स चा . तेव्हडी हिम्मत नसेलच तुमच्यात आणि येणार पण नाही ... १००%.
राहवलं नाही म्हणून लिहला पण एखाद्या सरकारची आणि नेत्याची जेव्हडी निंदा नांदस्ती करायची असेल तेव्हडी करा , पण माझ्या देशाच्या सैनिकांबद्दल नाही ऐकून घेऊ शकत
जाता जाता एक फुकटचा सल्ला देते तुम्हाला पण आणि वाचणाऱ्या सगळ्यांनाच , आज काल स्मार्ट फोन सगळ्यांकडेच आहे आणि नेट पण सगळ्यांच्याच फोनमध्ये आहे , लतादीदी चा एक अत्यंत सुरेख गाणं आहे "ए मेरे वतन के लोगो ... जरा आंख मे भरलो पानि .... जो शाहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी .... जब तुम खेल रहे थे होली वो झेल रहे थे गोली "...... आजच डाउनलोड करा , हेडफोन लावा , फुल्ल वोल्युम ठेवा आणि ऐका . जर डोळ्यात पाणी आला तर पुन्हा एकदा मनाला विचार कि खरंच मी टॅक्स भरतोय त्याचा माज करू ... कि ते माझ्या जीवाचा रक्षण करण्यासाठी तिथे मारतात आहेत त्याचा उपकार मानू
जय हिंद
2 Aug 2016 - 2:07 pm | शाम भागवत
प्रतिसाद आवडला.
23 Sep 2016 - 1:37 pm | पाटीलभाऊ
जेसीनाजी अत्यंत जबरा..
वास्तव.. :(
हेच म्हणायचे होते...!
हे मात्र जरा खटकले
21 Sep 2016 - 10:21 am | श्रीगुरुजी
http://m.ndtv.com/blog/the-12-year-old-who-stopped-our-car-and-pelted-st...
22 Sep 2016 - 8:48 pm | श्रीगुरुजी
ताम्हनकरराव,
खालील बातमी खास तुमच्यासाठी आहे.
http://www.rediff.com/news/report/hc-refuses-to-ban-pellet-guns/20160922...
Rejecting a plea seeking ban on the use of pellet guns in controlling street protests in Kashmir Valley, the Jammu and Kashmir high court has cited the ground situation and observed that as long as there is violence by unruly mobs, use of force is inevitable.
A bench comprising Chief Justice N Paul Vasanthakumar and Justice Ali Mohammad Magrey also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns or fired them even as it directed the authorities to provide adequate medical treatment to the injured
‘This court in the writ jurisdiction without any finding rendered by the competent forum/ authority cannot decide as to whether the use of force in particular incident is excessive or not,’ the court said. The bench also declined the plea to prosecute the officers who ordered use of pellet guns and those who actually fired them.
Same cannot be considered in this petition as no finding on use of excessive force, violating the guidelines issued in SOP (Standard Operating Procedure), have been recorded by any fact-finding authority,’ it said.
23 Sep 2016 - 1:29 pm | संदीप ताम्हनकर
कोर्टासमोर जो विषय येतो तेवढ्यावरच कोर्ट निकाल देते. आपण नागरिक म्हणून साकल्याने विचार करून बोलतो. ही बातमी मी वाचल्येय. त्याआधी सरकारने स्वतःच पॅलेट गन चा जबाबदारीने आणि कमी वापर करू असे महिन्याभरापूर्वीच काबुल केले आहे ते बघावे. मॉब कंट्रोल चे इतर नवीन उपाय शोधणे चालू आहे.
माझं मूळ मुद्दा काय आहे हे आज 80 लोक मेल्यानंतर आणि तीन महिने होऊनही परिस्थिती सुधारत नाहीये हा असून त्याचे कारण लष्करी ताकदीवर अतिरेकी आणि अवास्तव भिस्त ठेवण्याच्या मानसिकतेविरुद्ध आहे.
23 Sep 2016 - 3:22 pm | श्रीगुरुजी
काश्मिरमध्ये दीर्घकाळ आंदोलन सुरू राहणे नवे नाही. २०१० मध्ये तब्बल १२० दिवस दगडफेकीचे प्रकार सुरू होते व त्यात १०० हून अधिक माणसे/सैनिक/पोलिस मृत्युमुखी पडले होते. लहान मुलांना पुढे उभे करून दगड फेकण्यासाठी पैसे दिले जात होते. यावेळीही तेच होत आहे. जोपर्यंत काश्मिरींना अक्कल येत नाही तोपर्यंत हेच सुरू राहणार.