गाभा:
घरी DEN चे HD केबल आहे. पण त्याच्या बकाल सर्विसने जेरीला आलोय. आता डिश एन्टेना लावावा म्हणतोय. मग टाटा स्काय की व्हिडीओकोन की डिश टीव्ही अश्या गोंधळात पडलोय. कुठली कंपनी चांगली सर्विस देते?
प्रोग्रॅम रेकोर्डिंग ची सुविधा असणे ही पूर्व अट आहे. आणि HD channels असणे देखील.
मराठी मध्ये झी, ABP; इंग्रजी मध्ये Star world, Star Movies, HBO, Movies Now, बातम्यांसाठी इंग्रजी आणि हिंदी NDTV असावेत ही अपेक्षा आहे.
जाणकार आणि अनुभवी मिपाकर मदत करू शकतील काय?
प्रतिक्रिया
9 May 2016 - 6:42 pm | प्रचेतस
व्हिडियोकोन डी२एच चा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे. जास्तीत जास्त च्यानल्स कमीत कमी किंमतीत मिळतात. सुस्पष्ट चित्र आणि आवाजाची गुणवत्ता आहे.
वेगवेगळी च्यानेल प्याकेजेस आहेत शिवाय हवे ते च्यानेल्स a la carte पद्धतीने देखील निवडता येतात.
9 May 2016 - 6:46 pm | उगा काहितरीच
संपादक मंडळाला विनंती सदर धागा सदाहरीत धाग्यामधे हलवावा.
माझ्या घरी डीश टिव्ही आहे. ४-५ वर्षांपासून पण hd चा अनुभव नाही.
9 May 2016 - 7:41 pm | तुषार काळभोर
दुसर्या का तिसर्या भागात. कुणीतरी शोधून द्या रे
9 May 2016 - 7:44 pm | Anand More
निर्गुणी भजनानंतर मी इथे पण धागा काढण्यात दुसरा आलो की काय?
9 May 2016 - 6:49 pm | मराठी कथालेखक
Airtel चा Universal Remote हा प्रकार फार आवडला. TV च्या remote ची फारशी गरज पडतच नाही.
पण थोड्याशा पावसातही Airtel चे signals गडबडतात. त्याबाबतीत Tata Sky चा performance चांगला वाटला , अगदी मुसळधार पावसातच फक्त सिग्नल मिळत नाही.
9 May 2016 - 6:57 pm | मृत्युन्जय
पावसात सगळ्यांचेच सिग्नल गडबडतात. टाटा स्काय अपवाद नाही. :)
9 May 2016 - 10:33 pm | स्रुजा
+ १
एअरटेल चांगलं आहे पण एखादं नवीन चॅनल / प्रमोशन आधी टाटा स्काय वर उपलब्ध होतं असा अनुभव आहे. त्या मानाने एअरटेल ला वेळ लागतो.
10 May 2016 - 11:29 am | मराठी कथालेखक
माझा अनुभव असा आहे की टाटा स्काय खूप मुसळधार पावसात गंडते, एअरटेलला थोडा जोराचा वाराही पुरतो. पुन्हा एकदा टेक्निशियनला बोलावून बघेन काही करु शकतो का ते.
बाकी एयरटेलचा Remote च्या प्रेमात पडलोय टीवी रिमोटचा एक अगदी खास फिचर पण एयरटेल रिमोटला शिकवला (ट्रान्सफर केला) आणी टीवी रिमोट कपाटात ठेवून दिला
11 Jul 2016 - 12:13 pm | त्रिवेणी
टाटाचा ही रिमोट युनिव्हर्सल करता येतो.त्या न्यायाने सर्व रिमोट युनिव्हर्सल करता येत असतील.
9 May 2016 - 7:05 pm | चौकटराजा
कोणताही घेतला तरी फक्त २ टक्के चानल चांगली आहेत.इंग्रेजी सिनेमा चानलचा सगळा रंग उडाला आहे. हॉलिवूड ही थकत चालले आहे.
9 May 2016 - 7:07 pm | अनन्न्या
तुम्ही ज्या भागात राहता तेथे कोणत्या नेटवर्कची सर्विस चांगली आहे ते पहा. काही भागात डीश टीव्ही प्रभावी आहे तर काही भागात टाटास्काय. मी कस्टमरला टाटास्काय सजेस्ट करते कारण आमच्याकडे ती सर्विस चांगली आहे, एच डी पण.हल्ली या कंपन्या एकत्र येऊन एकाचवेळी पॅकेज किंमत ठरवतात, न विचारता नविन चॅनल्स चालू करतात, त्याबाबतीत जागरूक राहणे आवश्यक असते. येणारे मेसेज न वाचता डीलिट करू नका. कस्टमर केअर फोन करून योग्य माहिती मिळवा, फोन करायचा कंटाळा करून स्वतःचे नुकसान होते. आपण न पाहता नेटवर्क बंद झाले की अस्वस्थ होऊन लगेच रीचार्ज करून टाकतो.
टाटास्काय १८७०/- एक महिना फ्री. २७०/- चे पॅकेज फ्री. डीश टीव्ही सेम.
१६००/- + रीचार्ज ( पॅकेज कॉस्ट प्रमाणे)
9 May 2016 - 7:49 pm | स्वच्छंदी_मनोज
माझ्यामते टाटा स्काय ह्या सगळ्यात उत्तम आहे. उत्तम कस्टमर केअर, चांगले पॅकेज, अगदी ४के पर्यंतचे सेट टॉप बॉक्स, टाटा स्काय प्लस मध्ये रेकॉर्डींग आणी मोबाईल वॉचींग सुविधा आणी इतर बरेच.
(त्यामुळे माझ्या पर्सनल अनुभवानुसार टाटा स्काय बेस्ट)
9 May 2016 - 7:57 pm | चित्रगुप्त
जाणकार आणि अनुभवी मिपाकर म्हणून सांगतो, कोणतेही कनेक्शन न घेता आहे तो टीव्ही विकून/देऊन टाका, जीवन जास्त आनंदमय, मंगल आणि सृजनशील होईल.
9 May 2016 - 8:03 pm | राघवेंद्र
+१
9 May 2016 - 8:05 pm | Anand More
हा हा हा …. म्हणजे माझ्याकडचे चित्र देखील गुप्त करण्याचा विचार आहे तुमचा
9 May 2016 - 9:20 pm | मुक्त विहारि
प्रचंड सहमत...
टी.व्ही. म्हनजे टाइम किलिंग मशीन.
9 May 2016 - 9:37 pm | जेपी
माज्याकडे आहे dish tv
महिना 260 बेसीक पॅक..बाकी ala carte घ्याचे..
धुवांधार पाऊस पडला की बंद पडतो..
कष्टमर केअर वाले रोज फोन करतात..पॅक अपग्रेड करा म्हणुन..
पायजे असल्यास कळवा निम्या किमतीत देऊन टाकीन.
9 May 2016 - 9:40 pm | मुक्त विहारि
माझ्या कडे पण गेले वर्ष भर कुठल्यातरी कंपनीची डिश पडून आहे.
आजकाल हॉट-स्टार, यु ट्युब आणि टोरँट मुळे ही डिश पडूनच आहे.
11 May 2016 - 9:05 am | मंदार कात्रे
टाटा स्काय वाले भय्ये पण रोज फोन करून डोकेदुखी देत होते , एकदा दम भरला जोरात आणि संगितले की आता consumer court ला complaint टाकतोय म्हणून ...
आजतागायत परत फोन आलेला नाही .
9 May 2016 - 10:28 pm | कंजूस
मनोरंजनाचं साधन आहे जेवढे पैसे ओताल तेवढी मजा वाढतच जाते.
10 May 2016 - 10:46 am | सतिश पाटील
मला तर बुवा रात्री स्वीट डिश आवडते.
टीवी सहसा पाहत नाही.
10 May 2016 - 11:30 am | सुमीत भातखंडे
टाटा स्काय चा अनुभव चांगला आहे.
एकंदरीत स्वानुभव आणि मित्रमंडळींकडून जे ऐकलय त्यावरून टाटा स्कायची ग्राहक सेवा जास्त उजवी आहे असं वाटतं.
10 May 2016 - 11:38 am | मृत्युन्जय
डी टी एच सेक्टर मध्ये ६ पर्याय आहेतः
१. टाटा स्काय
२. डिश टीव्ही
३. व्हिडीओकोन
४. एयरटेल
५. सन
६. रिलायन्स.
सन आणी रिलायन्स फार कुठे दिसत नाहित. टाटा, डिश आणी व्हिडीयोकोनची स्पर्धा आहे खरे सांगायचे तर. व्हिडीयोकोनचा सबस्क्रायबर बेस वेगाने वाढत आहे इतरांच्या मानाने. सगळ्यात अद्ययावत प्लॅटफॉर्म देखील माझ्या मते त्यांचाच आहे. सर्व्हिस चांगली आहे. पॅकेजेस सगळ्यांची थोड्याफार फरकाने सारखीच असतात. क्वालिटीत फार फरक पडणार नाही. पण व्यक्तिशः मला टाटा आणी व्हिडीओकोन इतरांपेक्षा उजवे वाटतात. मात्र बाकीचेही फार वाईट नसावेत.
व्हिडीयोकोन चे अॅड ऑन पॅकेजेस चांगले आहेत. डीटुएच सिनेमा या अॅड ऑन चॅनलवर (महिना ६० रुपये) साधारण २-३ महिने जुने चित्रपट सतत दाखवतात (एका आठवड्याला एक). तसेच किड्स साठी एक पॅकेज आहे. ज्यात नर्सरी र्हाइम्स आणि स्टोरिज चे २ वेगळे चॅनल्स येतात (रु. २५ प्र.मा.). एकुणात मला डी टु एच सर्वात चांगले वाटले.
10 May 2016 - 2:07 pm | शलभ
आमच्याकडे पण विडिओकॉन D2H आहे. बाकी मुद्दे वर आलेच आहेत. अजून एक मुख्य मुद्दा. वाईट हवामानात खूप कमी वेळ बंद पडते जे मित्रांकडे बाकी सर्विसेस ला खूप जास्त वेळ बंद पडते.
10 May 2016 - 12:46 pm | घाटी फ्लेमिंगो
चेपूवर आणि कायअप्पावर फुकट मनोरन्जन होत असतना कशाला ह्वाय इडीयट बॉक्स...!?
11 May 2016 - 8:10 am | नितिन थत्ते
डिश टीव्हीचा गेले तीन वर्षांचा अनुभव आहे.
एरवी काही अडचण येत नाही. पण घेतलेल्या पॅकमधील चॅनेल मनमानी पद्धतीने काढले / अॅडवले जातात. म्हणजे तुम्ही अमुक एक चॅनेल हवा म्हणून विशिष्ट पॅक घ्याल, पण नंतर तो चॅनेल दिसेनासा होईल. तुम्ही तक्रार केल्यावर तो चॅनेल आता त्या पॅकमध्ये नाही असं तुम्हाला सांगण्यात येईल.
तसेच तुम्हाला या पॅकवरून त्या पॅकवर मायग्रेट केले जाईल (तुम्हाला न विचारताच). तुम्ही जो पॅक घेतला होता तो आता अस्तित्वातच नाही असे तुम्हाला कळेल.
हवे ते चॅनेल अ-ला-कार्टे घेतले तर खूप महाग पडतात.
क्रिकेट मॅच पाहण्याचा शौक असेल तर डीटीएच पेक्षा केबलवाला चांगला.
हा डिश टीव्हीचा अनुभव असला तरी बहुधा टाटा स्काय आणि एअरटेल यांचाही इतरांना तसाच अनुभव असेल.
18 Jul 2016 - 4:01 pm | बोलबोलेरो
डिश टीव्हीवाले शुद्ध मराठीत "चोर" आहेत.
1. तुम्ही घेतलेला पॅक कधी बंद होईल किंवा झालेला असेल, हे सांगता येत नाही.
2. घेतलेल्या पॅक मधील कोणते चॅनेल कधी चालू अथवा बंद होतील हेही नक्की नाही.
3. एकाच पॅक मध्ये वेगवेगळ्या जोडण्यांवर वेगवेगळी चॅनेल दिसू शकतात.
4. pick by channel घेतल्यास कमीत कमी तीन महिने वापराचे पैसे भरावे लागतात.
5. त्याशिवाय ऍक्टिव्हेशन शुल्क वेगळे, कसेही करून महिना 250 पेक्षा जास्त शुल्क घेतातच ते.
6. नवीन व जुना कोणत्याही पॅक मध्ये नक्की कोणते चॅनेल दिसणार याची जंत्री दिली जातच नाही. तुम्ही कायम साशंक.
7. इन्व्हॉईस किंवा बिल कधीही मिळत नाही.
टाटा स्काय घ्या, एकदम स्वछ आणि पारदर्शक कारभार.
डिश टीव्हीला वैतागून सेट टॉप बॉक्स फोडून टाकावा , या विचाराप्रत आलेला
बोलबोलेरो
11 May 2016 - 8:22 am | मदनबाण
टाटा स्कायचा अनुभव चांगला आहे,तक्रार नोंदवल्यास पटकन मदत मिळाल्याचा अनुभव आहे. त्यांच सेटटॉपबॉक्स मात्रं एक नंबरच मंद आहे, २-३ वेळा बटन दाबले तरच हिरवा -लाल-हिरवा असा खेळ करुनच ते चालु होते { माझे हे टिनपाट डबडे २-४ वेळा बदलुन देखील या त्याच्या सुस्तीत बदल नाही.} बाकी एचडी चॅनल्स महाग होत चालले आहेत, त्यामुळे पुढच्या वेळी अॅन्यूअल पॅक रिचार्ज करणार नाही अशा विचारात आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ, धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM RE
11 May 2016 - 8:55 am | मंदार कात्रे
मी पूर्वी डिश टीव्ही चा कस्टमर होतो. दोन वर्षापूर्वी टाटा स्काय घेतले. डिश टीव्ही वर बरेच चॅनेल फ्री पॅक मध्ये आहेत जे दूरदर्शन च्या फ्री डिश वर देखील मोफत दिसतात . पण हेच चॅनल टाटा वर पेड आहेत . बाकी टाटा चा अनुभव बारा आहे. मी सध्या बाकी सगळी झेंगट बंद करून 99/-बेस पॅक + 26/- मराठी पॅक चालू ठेवला आहे . त्यामुळे 125/- महिना रेंट मध्ये फ्री चॅनल अधिक मराठी चॅनेल दिसतात . याचे कारण नेट व युट्यूब मुळे टीव्ही पाहण्याची वेळच येत नाही फारशी... !
सिग्नल बाबत महत्त्वाचे म्हणजे उपग्रह. इस्रो चे इन्सॅट / GSAT उपग्रहांचे सिग्नल्स भारतीय उपखंडात चांगले मिळतात . दूरदर्शन /टाटा / व्हीडिओcon इस्रो चे उपग्रह वापरतात ,तर डिश टीव्ही एनएसएस-6 हा परदेशी उपग्रह आहे . सन /रिलायन्स/एयरटेल देखील परदेशी /चायनीज उपग्रहाची सेवा घेतात . त्यामुळे सिग्नल स्ट्रेन्थ मध्ये फरक पडतो .
11 May 2016 - 10:31 am | मुक्त विहारि
सेम हियर....
गेले २-३ वर्षे आमचा टी.व्ही. धूळ खात पडलेला आहे.
५००/- महिन्यात नेट मिळत असेल तर ह्या मूर्ख खोक्याचा तसा काहीच उपयोग नाही.
हॉट-स्टार, यु-ट्युब, टोरंट हे क्रिकेट, मालिका आणि सिनेमे, हवे ते, आपल्या वेळेनुसार आणि प्रत्येकाची आवड-निवड जपत देत असतील तर टी.व्ही. कशाला बघायचा?
11 May 2016 - 12:01 pm | वगिश
मी एअरटेल 4जी नेट वापरत आहे. केबल वा डीशनाही घरात..
2300 रूपये महीना आणि 40gb डाटा आहे. 2 mbps actual download speed मिळतो.
आपण कोणत्या प्रकारचे नेट वापरत आहात?
10 Jul 2016 - 8:28 pm | कंजूस
आता सर्वच( जुन्या ) कंपन्या सटेलाइट बदलून नवीन mpeg4 वर अपग्रेड करत आहेत शिवाय अधिक ट्रान्सपोंन्डर भाड्याने घेत आहेत.सिग्नल स्ट्रेन्थसाठी डिश नीट फिरवून ९५-९८%वर लावावी.इतर भाषिक ग्राहक त्यांचे चानेल्स दाखवणारी डिश घेतात.सरकारी डिटिएच ( फ्री डिश) माझ्याकडे दहा वर्षे विनातक्रार चालू आहे.त्यातले सर्वच चानेल्स डिशटिव्ही दाखवत नाही.झी २४तासही आहे.
9 Jul 2016 - 1:45 pm | सॅगी
आनंद सर,
कोणत्या कंपनीची डिश घेतली ते सांगा की...
किती चार्जेस भरावे लागले? काही ऑफर वगैरे मिळाली का?
या महिन्याअखेरीस टाटा स्काय घ्यायचा विचार करतोय. टाटा स्काय वापरणार्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.
10 Jul 2016 - 4:55 pm | कंजूस
टाटास्काय वापरली सहा वर्षे.नंतर गुंडाळून माळ्यावर ठेवलीय.डिशटिव्हीचा रेकॅार्डिंग डबा घेतला हजार रुपयात दोन वर्षांपूर्वी.पेनड्राइवमध्ये रेकॅार्ड होतात प्रोग्राम.कोणतीही डिश घ्या पण रेकॅार्डिंग हवेच.
10 Jul 2016 - 5:41 pm | सॅगी
धन्यवाद कंजूस सर, रेकॉर्डींग वाले सेट टॉप बॉक्स बघतो आता..
18 Jul 2016 - 2:44 pm | Anand More
नाही हो .. अजून DEN वरच अडकलोय .. आता पुढच्या वर्षी एप्रिल च्या आसपास ठरवीन
18 Jul 2016 - 7:11 pm | मुक्त विहारि
ह्याचा अर्थ अद्यापही त्यावाचून तुमचे काही अडत नाही.
"एखाद्या गोष्टी वाचून आपले काम अडत नसेल, तर उगीच त्या गोष्टीच्या मागे लागू नये." इति बाबांची प्रवचने, "डू अँड डोंट" , खंड ७ वा समास ७७७.
19 Jul 2016 - 5:55 pm | मी-सौरभ
माझ्या घरी डेनचा डब्बाच आहे आणि तो व्यवस्थित चालतो.
आता सगळ्या चॅनेल चे जुने कार्यक्रम त्यांच्या अॅप वर ऊपलब्ध आहेत मग रेकॉर्ड काय करणार?
10 Jul 2016 - 2:18 pm | मितभाषी
एरटेल रिमोट काय भानगड आहे?
18 Jul 2016 - 5:10 pm | महेश_कुलकर्णी
नमस्कार आनंदजी,
आपणास कदाचित आवडणार नाही पण माझे मत आहे की आपण सगळ्यात महागडी सेवा देणार डीश घेणे.
फायदे:
१. आपल्या गरजा आपण नक्की करू शकतो व तेवढेच च्यानेल घेतो.
२. उगाच आहेत वाहिन्या म्हणून बघत बसावे असे होत नाही.
एकदा टीव्ही बघण्याला आकृष्ट करणाऱ्या गोष्टी कमी झाल्या कि आपोआप टीव्ही बघणे कमी होते व हळू हळू त्याचे सकारात्मक फायदे दिसु लागले की टीव्ही पाहणे आपोआपच बंद होते.
त्यानंतर मिळणारा आनंद पराकोटीचा आहे.. भरपूर रिकामा वेळ मिळतो जो आणखी काही चांगल्या गोष्टीसाठी वापरता येवू शकतो.
धन्यवाद,
महेश रा. कुलकर्णी