आप की आखों में कुछ
मेहेके हुएसे राज हैं
आप से भी खूबसूरत
आप के अंदाज हैं !
काय म्हणावं यार ह्या गाण्याबद्दल ! रेखाला सुरेख म्हणावं , कि विनोद मेहराला ! चित्रीकरणाची तारीफ करावी , की आर डी सारख्या संगीतकाराची ! किशोरच्या सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ ,उमद्या तरीही भाऊक अशा अस्सल मर्दानी आवाजाची तारीफ करावी कि लता बाईंच्या स्वर्गीय पण लाडिक (तशी त्यांची अशी लाडिक गाणी कमी आहेत) आवाजाची ! दिग्दर्शक माणिक चटर्जी हे नाव फार ऐकिवात नाही ,परंतु त्याने ह्या गाण्याला वातावरणाचा इफेक्ट मात्र अतिशय सुंदर साधलाय !
आणि आता बोलूच का ?................ तर गीत कार गुलजार आहेत !
काही म्हणा , पण ह्या गाण्यात भट्टी काहीतरी अफलातूनच जमून आलीये यार ! सुरुवात करतानाच समोर येतो अतिशय भाऊक असा चेहरा लाभलेला विनोद मेहरा, त्यानी परिधान केलेला पांढरा शुभ्र नेहरू शर्ट. समोर कोण ? तर रेखा. गच्चीवर (बहुधा) खाली बसलेली रेखा आणि तिच्या नेत्रांची तारीफ करणारा विनोद मेहरा. लाजेने अजूनच सुंदर दिसणारी रेखा. मागचा परिसर , गाणं शूट करताना साधलेली वेळ , हलक्या वाऱ्याने उडणारे केस , आरडी नी सतारीचा , सरोदचा माफक परंतु सुरेख वापर केलाय या गाण्यात. अतिशय सुरेख असा ठेका. हा ठेका खय्याम साहेबांच्या जवळचा वाटतो नाही ? खय्याम नी ह्या ठेक्याचा खूप वापर केलाय.असो. मुद्दा... “आप की आखों...”
लब हिले तो मोगरे के
फूल खिलते हैं कहीं
आप की आंखो में क्या
साहिल भी मिलते हैं कहीं
आप की खामोशीया ही
आप की आवाज हैं
शेवटच्या दोन ओळी म्हणजे कहर ! रेखाच्या सौंदर्यावर फिदा न होणारा आमच्या काळी सापडणं अवघडच बरं का ! साडी , मोठ्ठं कुंकू हे रेखा आणि शबानाला अगदी शोभून दिसायचं-म्हणजे दिसतं. अशीच गोड शबाना “स्वामी” त दिसलीये. पुन्हा “आप की आंखो वर” ...
पहिल्या कडव्याच्या अगदी शेवटी ,खरं म्हणजे कडवं संपल्यावरच लता बाई अवतरतात. हा सिनेमा १९७८ चा आहे (घर). एव्हाना लता बाईंचा आवाज थोडा जाड , प्रगल्भ जाणवतो. ह्याच काळातल्या त्यांच्या गाण्यांना एक वेगळीच धार आहे. ह्या वेळी रेखाची साडी क्र.२ काळ्या ठिपक्यांची पांढरी साडी. मोठ्ठं कुंकू आहेच. विनोद मेहरा पाठमोरा आहे, पण “आप से भी खूबसूरत आप के अंदाज हैं !” असं ती म्हणत असताना , त्याचा बेदरकार धूर सोडण्याचा “अंदाज” पाहण्यासारखा आहे. आणि रेखाही तो धूर अगदी सहज बिनदिक्कत – अगदी तोंडावर असूनसुद्धा झेलते !
दुसरं कडवं अर्थात रेखा- म्हणजे लता बाईंचं. ह्याचं शुटींग पुन्हा गच्चीवरच. पण रात्रीची वेळ साधलीये. रेखाची साडी क्र.३ – लाल-काळी-पांढरी अशी काहीतरी मिक्स साडी आहे. सुरेख. त्यापूर्वी एक लटका , जरा romantic असा प्रसंग देखील गाण्याची लज्जत वाढवतोच.
आपकी बातों मे फिर
कोई शरारत तो नहीं
बेवजाह तारीफ करना
आपकी आदत तो नहीं
आपकी बदमाशियोंके
ये नये अंदाज हैं
यातल्या “ आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज हैं” ह्या ओळींना लता बाई अश्शा काही हसल्या आहेत ना... बस्स ! इतक्या अल्लड तशा त्या कमी गातात. शेवटी त्यांनी एक छानशी तानही घेतलीच आहे. छोटीशी. नजाकत वाढवणारी.
जियो ... आरडी , लताबाई, किशोरदा, गुलजार साहब !
प्रतिक्रिया
6 May 2016 - 1:42 am | वीणा३
बाकी लेख छान , फक्त शबाना आझमी "गोड" :D . मला ती कायम सर्दी झाल्यासारखी वाटते :)
6 May 2016 - 10:17 pm | १००मित्र
सर्दी झाल्यासारखी ...! भारी !
तसा सुनील दत्त मला गालांत गुलाबजाम ठेवल्यासारखा वाटतो.
6 May 2016 - 3:25 am | फेरफटका
"“ आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज हैं” ह्या ओळींना लता बाई अश्शा काही हसल्या आहेत ना" - ह्या विषयी एक किस्सा असा आहे की गुलझार रेकॉर्डिंग च्या वेळी अस्वस्थ होते की त्यांनी गाण्यात 'बदमाशिंया' असा त्यांना त्या वेळी 'बोल्ड' वाटलेला शब्द वापरलाय. त्यामुळे ते सारखं तो शब्द बदलू असं म्हणत होते (कारण लता मंगेशकर शब्दांच्या बाबतीत खुप पर्टिक्युलर होती). त्यामुळे गुलझार थोडे apologetic झाले होते. लता च्या म्हणण्याप्रमाणे रेकॉर्डिंग च्या वेळी तिला गुलझार ची उडालेली धांदल आठवून हसू आलं आणी ते हसणं त्यांनी गाण्यात तसच ठेवलं.
6 May 2016 - 10:19 pm | १००मित्र
गुलजार तसे नवीन (लता बाईंच्या मानाने) असणार तेव्हा, पण छान संदर्भ !
6 May 2016 - 10:06 am | पथिक
मस्त!!
6 May 2016 - 10:25 am | उल्का
अतिशय आवडतं गाणं. मस्त लिहिलंय. आता दिवसभर मनात रेंगाळत गुणगुणत राहणार हे नक्की! :)
6 May 2016 - 10:20 pm | १००मित्र
कायमच फ्रेश करणारी गाणी असतात ना...
त्यांपैकीच एक !
6 May 2016 - 12:06 pm | पुंबा
आप की आंखो में क्या
साहिल भी मिलते हैं कहीं
या ओळींनंतर रेखा जी लाजते त्याला खरंच तोड नाही. हे गाणं अतिशय आवडतं. आपल्या रसग्रहनामुळे पहावंसं वाटतंय.. पाहतोच
6 May 2016 - 10:21 pm | १००मित्र
धन्यवाद !
6 May 2016 - 2:26 pm | मराठी_माणूस
अजुन एक वैशिष्ठ म्हणजे कांचाभाईनी वाजवलेला मादल
6 May 2016 - 5:07 pm | महासंग्राम
मादल म्हणजे काय ???
6 May 2016 - 5:26 pm | मराठी_माणूस
एक र्हीदम चे वाद्य
6 May 2016 - 10:23 pm | १००मित्र
विडिओ मधल्या एखाद्या पार्ट मध्ये सांगू शकाल कुठे वाजतं ते ?
ज्ञानात तेवढीच भर !
आधीच आभार !
8 May 2016 - 3:58 pm | मराठी_माणूस
माफ करा , माझा थोडा गोंधळ झाला. हे वाद्य "तेरे बिना जिया जाए ना" मधे वाजवले आहे.
9 May 2016 - 8:32 am | १००मित्र
अहो मऱ्हाटी मानुस,
सांगूनच टाका हि राव , तेरे बिना मध्ये कुठे आहे ते,
प्लीज.
6 May 2016 - 10:19 pm | शान्तिप्रिय
मस्त लिहिलय!
6 May 2016 - 10:23 pm | यशोधरा
अतिशय आवडते गाणे. धन्यवाद. प्रासभाऊंची आठवण झाली, त्यांनीही गाण्यांवर/ गायकांवर असेच सुरेख लिहिले आहे.
7 May 2016 - 11:19 am | उगा काहितरीच
गाणं छान आहे. अभिनय वगैरे पण सुंदर आहे.पण... तो सिगरेट वाला प्रसंग मला अज्जिबात आवडला नाही. तसे कपडे(म्हणजे व्यवस्थित साडी, मोठं कुंकू) घालणारी स्त्री आजच्या काळातही नवऱ्याला सिगरेट तोंडावर फुकू देणार नाही. मग त्या काळात तर प्रश्नच नाही. असो!
7 May 2016 - 5:53 pm | फेरफटका
मुद्दा मान्य आहे. पण मला असं वाटतं की चाळीस-एक वर्षापूर्वी पेक्षा सिगरेट विषयी हल्ली अवेअरनेस जास्त वाढलाय.
तो सीन बघताना मलासुद्धा चमत्कारिक वाटलं होतं.
7 May 2016 - 9:52 pm | उगा काहितरीच
असं असेल तर मग आपला ४० वर्षांपूर्वी मी नव्हतोच ! ;-)
7 May 2016 - 1:15 pm | बोका-ए-आझम
हे गाणं तर सुंदर आहेच पण बाकीचीही गाणी छान आहेत. ' आजकल पांव जमींपर ',' तेरे बिना जिया जाये ना ' ही पण खूप गाजलेली आहेत पण दोन तुलनेने अप्रसिद्ध गाणी पण अप्रतिम आहेत - बोतल से एक बात चली है हे रफी आणि आशा यांचं एक धमाल पार्टी साँग. यात आशाबाईंनी जे याॅडलिंग केलंय ते मस्त आहे आणि दुसरं (माझं वैयक्तिक आवडतं) फिर वही रात है - किशोरकुमारने हे इतक्या आश्वासक आवाजात गायलेलं आहे की त्याला तोडच नाही. पत्नीवर एवढी भयानक आपत्ती आलेली असतानाही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या पतीचा आवाज म्हणून तो अगदी पुरेपूर शोभतो.
7 May 2016 - 9:21 pm | चांदणे संदीप
कधीही आणि कितीही वेळा ऐकली तरी अवीट आणि सदाबहार अशी गाणी आहेत या चित्रपटात! :)
Sandy
9 May 2016 - 8:27 am | १००मित्र
किशोर कुमार म्हणजे तर आवाजाचा लहेजा , मूड बदलणारा बादशहाच. ह्याच गाण्याप्रमाणे (फिर वहीं) "दिल ऐसा किसीने" मध्ये त्याने खास खर्जात आवाज लावलाय. purely गंभीर , दु:ख भरलेली गाणी.
सत्ते पे सत्ता मधलं "प्यार हमें" ला सुद्धा हाच खर्ज आहे; पण मूड वेगळा जाणवतो; हि फक्त गायक-किशोर कुमारचीच कमाल !
Hats Off !
आणि हो. समरसते बद्दल बोका ए आझम ... आपले आभार !
7 May 2016 - 5:46 pm | अजया
सर्वच गाणी अतिशय आवडती.
8 May 2016 - 8:13 am | कोंबडी प्रेमी
लता किशोर गुलजार रेखा आणि हे गाणे
8 May 2016 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलंय, अजुन खुप लिहा असंच. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
9 May 2016 - 8:30 am | १००मित्र
धन्यवाद.
हुरूप वाढविणारी प्रतिक्रिया.
आपली तर आहेच ,पण प्रत्येकाची.
न पटणाऱ्या मुद्द्यांसकट !
9 May 2016 - 11:11 am | नाखु
काल रवीवार विशेष मध्ये रात्री बेला के फूल मध्ये ही सारी गाणे लागली आणि मिपा द्रष्टे असल्याचा पुन्हा प्रत्यय आला.
मिपा विविध भारती प्रेक्षक-क्ष्रोता नाखुस