१०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे...

समी's picture
समी in काथ्याकूट
7 May 2016 - 4:37 pm
गाभा: 

माझी १०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे.... सीट नंबरहि आठवत नाहिय... काय करावे डुप्लीकेट मिळवण्यासाठि. आणि किती लवकर मिळू शकेल?

कृपया कोणाला माहित असल्यास सांगा.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 May 2016 - 4:49 pm | कपिलमुनी

म्हणजे कोर्टापासून बोर्डापर्यंत सगळे शोधतात पण तुम्हाला दाखवावी लागत नाही.

( ह घ्या)

:)

असच आहे पण आता काय करावे?

श्री गावसेना प्रमुख's picture

7 May 2016 - 4:52 pm | श्री गावसेना प्रमुख

नविन परीक्षा द्यावी म्हणजे कसे शोधण्याचा त्रासहि वाचेल आणि नविन अभ्यास केल्याने मार्कही वाढतील

कपिलमुनी's picture

7 May 2016 - 4:54 pm | कपिलमुनी

शाळेत चौकशी करा, दरवर्षीचा निकालपत्रक असते

उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय का?
असल्यास त्यावरून त्यांच्याकडे नक्कल प्रत मिळण्यासाठी अर्ज करावा.

खटासि खट's picture

7 May 2016 - 4:58 pm | खटासि खट

जाऊद्या आठवी , दहावीच्या मार्क लिस्ट्स , बीए, एमए च्या मिळतात डिग्र्या आजकाल

विवेक ठाकूर's picture

7 May 2016 - 4:58 pm | विवेक ठाकूर

मुक्तविद्यापिठात केवळ जन्मतारखेच्या दाखल्यावर अ‍ॅडमिशन मिळते. डायरेक्ट डिग्री घ्या.

समी's picture

7 May 2016 - 4:59 pm | समी

:))

उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि परीक्शा मंडळ (बोर्ड)आठवतेय.... पण साधारण किती दिवसात / महिन्यात मिळू शकेल?

विवेक ठाकूर's picture

7 May 2016 - 5:05 pm | विवेक ठाकूर

स्वतःच्या वयावरुन वर्ष आठवत नसेल तर सुरळीत पुढे गेलेल्या मित्रांच्या वयावरुन अंदाज बांधा.

परिक्षा मंडळात अर्ज आणी लागणारे शुल्क भरल्यावर 7 दिवसात नक्कल मिळते.
पण परिक्षेचे वर्ष आणी आसन क्र. माहिती हवा.

वरील माहिती साठी शाळेल भेट द्या.
आणी आल्यावर 'माझी शाळा' असा निबंध मिपावर लिहा.;)

लालगरूड's picture

7 May 2016 - 5:47 pm | लालगरूड

आधी FIR करा मग बोर्डात अर्ज करा पुण्यात.

संजय पाटिल's picture

7 May 2016 - 6:07 pm | संजय पाटिल

मिपा हळू हळू google आणि wikipedia बनत चाललय...

जेपी's picture

7 May 2016 - 6:20 pm | जेपी

दंगा बाजुला-
असे धागे संपादकांनी
'सदाहरित धागे -मनातील प्रश्न...'
सदरात स्वत: टाकायला हवेत..

तर्राट जोकर's picture

7 May 2016 - 7:23 pm | तर्राट जोकर

हे म्हणाय्चं होतं, आजकाल एकोळीचे पेव फुटलंय.

कपिलमुनी's picture

8 May 2016 - 12:49 am | कपिलमुनी

यासाठी एकोळी संपादक असे नवीन पद निर्माण करुन ज्पीची नेमणूक करावी आणि मराठवाड्याचा संपादकीय अनुशेष भरुन काढावा

नाखु's picture

11 May 2016 - 11:03 am | नाखु

प्रतिक्त्र्या सुद्दा एकोळीच द्याव्यात की काय ?
तसेच एकोळीण्म्तर चारोळी आरोळी या साठी वेगळा काव्य विभाग असेल काय?

तूर्त इतकेच बाकी चिमणला भेटून पुढील यादी देऊ.

आडगावची पत्रेवाला नाखुस

खटपट्या's picture

7 May 2016 - 11:26 pm | खटपट्या

ज्या बोर्डामधून परीक्षा दील्यात तीथे संपर्क साधल्यास काम होइल. मुंबई बोर्ड असल्यास कलीना ऑफीसमधे जावे.

शाळा, पास झालेले वर्ष हे माहीत असेलच. बहुतेक वेगळा चार्ज द्यावा लागेल. फार जुने असल्यास त्याच डीजाइनमधे मिळणार नाही. प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेचे जे सद्याचे डीजाइन असेल त्यामधे परत छापून मिळेल.

१०-१२ बोर्डाच्या गुणपत्रिका तिथे नाही मिळणार. मुंबई बोर्ड असेल तर वाशीला जावं लागेल. हरवल्याचा FIR करुन त्याची copy घेऊन वाशीच्या office मध्ये जा. हाॅल टिकिट असलं तर फारच उत्तम. एखादी photocopy शिल्लक असली तर ती कदाचित दाखवावी लागेल.

बाकी कुठले धागे कुठे टाकावेत याबद्दल संपादक आणि मालक सोडून इतरांनाच (काही अपवाद सोडल्यास) जास्त चोंबडेपणा करायचा आहे आणि एखाद्याला मदत हवी असल्यास उद्धट उत्तरं द्यायची आहेत हे बघून मजा वाटली. विशेषतः अध्यात्मात प्रगती केलेल्या स्वाभिमानशून्य लोकांचे प्रतिसाद बघून तर फारच. यालाच आॅरगॅझम म्हणत असावेत अध्यात्मात ;)

वैभव जाधव's picture

8 May 2016 - 1:12 am | वैभव जाधव

बोका सेठ आप भी स्कोर सेटलिंग ?

वाण की गुण?

कवितानागेश's picture

8 May 2016 - 4:24 am | कवितानागेश

स्टे ट बोर्डाची असल्यास ,
http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp

चांदणे संदीप's picture

8 May 2016 - 11:10 am | चांदणे संदीप

पुणे बोर्डातून काढलेली. त्यावेळी FIR ची गरज नव्हती पडली. एक किचकट फॉर्म आणि १५० रू. एवढ्यात काम झालेले आठवतेय!

Sandy

समी's picture

11 May 2016 - 10:45 am | समी

सगळ्यांचे आभार....

विवेकपटाईत's picture

12 May 2016 - 9:41 pm | विवेकपटाईत

गमंत म्हणून लिहितो आहे १०वि १२वि ची duplicate marksheet मिळाल्या नन्तर श्रीमान सत्यवादी आदमी कडून एकदा सत्यापित करवून घ्याल.