जगावं की मरावं हा एकंच सवाल आहे !!
कुणी मिसळ देता का मिसळ ? हो मिसळ... मामलेदाराची चालेल... फडतरेची चालेल..वैद्याची चालेल.. प्रभांची पण चालेल. एका मिसळप्रेमीला तुफानाला कुणी मिसळ देतं का ?मिसळ... एक तुफान … कांद्या वाचून …. तर्री वाचून …. मिसळेच्या मायेवाचून …देवाच्या मिसळी वाचून … गावा गावातून हॉटेलात हिंडते आहे …
मिसळ चापताना जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे … कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..तर्रीवाली मिसळ..असा तवंग हवा तेलाचा तर्री वर....पावाच्या लाद्या हव्या.लिंबाच्या फोडी हव्यात...ग्लास भर ताक हवं.....पहिल्या घासात ठसका हवा..मिसळ..हो मिसळ .....कुणी मिसळ देता का रे ??? मिसळ ?..
मिसळ सम्राट..
निवृत्त मामलेदार मामा नाटेकर मिसळकर
(नाट्य लिबर्टी)
प्रतिक्रिया
21 Apr 2016 - 5:34 pm | प्रसाद गोडबोले
फारच सुरेख :)
21 Apr 2016 - 7:10 pm | आदूबाळ
अकुपीडियातल्या "मिसळ" आणि "नटसम्राट" या एंट्र्या एकत्र झाल्या की काय!
22 Apr 2016 - 5:15 am | एस
हां बसा तिकडं त्या टेबलावं.
22 Apr 2016 - 7:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका, तुम्ही कुठे आहात ? काय तरी चांगलं लेखन, कथा घेऊन या.
-दिलीप बिरुटे
22 Apr 2016 - 10:28 am | विजय पुरोहित
हेच म्हणतो. कुठे गायब झालेत अ.कु. बरेच दिवस?