http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5028796491016038209&Se...
ही दैनीक सकाळ मधली आजची बातमी पहा.
याबातमीचा रोख असा आहे की कंत्राटदाराच्या बेपर्वा वागण्याने भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड करांच्या तोंडचे पाणी पळाले. कंत्राटदार नदीवर पुल बांधताना भराव घालतो कारण त्या शिवाय पिलर्स उभे करणे शक्य नसते. म्हणजे संबधीत खाते असा बांध घालायची परवानगी देते हे ही उघड आहे. अश्या बंधार्या खालुन पाणी वाहुन जाणे अपेक्षीत असते. यासाठी किती व्यासाचे पाईप घालावेत व त्याची संख्या किती असावी हे एक साधे गणीत आहे. हे इतके सोपे आहे की इंजिनीयरींग च्या कोणत्याही शाखेचा विद्यार्थीच काय ज्याला अंक गणीत समजते असा नागरीक हे करु शकतो.
पिंपरी चिंचवडच्या पुरवणीत फोटो सुध्दा आला आहे. ज्यात पाईप तर दाखवले आहेत पण त्याचा व्यास आणि संख्या चुकल्याने हा प्रश्न निर्माण झाला होता हे उघड आहे. हे पाईप काय व्यासाचे असावे आणि किती असावेत हे कंत्राटदाराला परवानगी देताना सांगीतले नसावे किंवा गणित चुकले असावे. अन्यथा काँट्रेक्टर बंधारा घालतो हे महानगर पालिकेला माहित नसावे हे म्हणणे हास्यास्पद आहे.
दै. सकाळच्या बातमीची ही खासीयत आहे. ते बात्मी तर देतात पण त्याच्या मुळाशी जाऊन पाठपुरावा करत नाहीत. नागरिकांना हा प्रश्न पडला की सोमवारी पाणी पुरवठा का खंडीत झाला ? त्याचे उत्तर मिळाले बास झाले. परंतु संबधीत अधिकारी जबाबदार असेल तर त्याची खातेनिहाय चौकशी का होऊ नये. खरच परवानगी न देता काँट्रेक्टर ने बंधारा बांधला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.
हा पाठपुरावा न करता सिटी इंजीनईयरने कशी तातडीने कारवाई केली याकडे दै. सकाळच्या बातमीचा रोख आहे.
दै. सकाळ - दै लोकसत्ता किंवा दै. महाराष्ट्र टाईम्स प्रमाणे पाठपुरावा करत नाहीत. याची कारणे सुध्दा उघड आहे. त्यांच्या विचारसरणीच्या लोकांची सत्ता महानगरपालिकेत आहे. अधिकारी, राज्यकर्ते आणि काँट्रेकटर्स यांचे संगनमत अनेक वर्षे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत आहे.
मागे एकदा माननीय मारुती भापकर यांनी कंत्राटदारांना दिलेल्या जास्तीच्या रकमेचे प्रकरण बाहेर काढले. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. ह्याचा पाठपुरावा कोणी करत नाही. मारुती भापकरांना मात्र नगरसेवक पद मिळु नये यासाठी सत्ताधारी आणि त्यांचे सहयोगी एकत्र येऊन निवडणुकीत जाती- पातीचे राजकारण करतात. उद्देश इतकाच की जनरल बॉडी मध्ये हे विषय कोणी काढु नये.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका, राज्यकर्ते नंगानाच करत आहेत. हया निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. ह्याच बरोबर दै. सकाळ सुध्दा खोटी पत्रकारिता करते हेही नागरिकांनी समजुन घेतले पाहिजे.
प्रतिक्रिया
19 Apr 2016 - 1:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
सकाळ काय लायकीचा पेपर आहे आणि तो कोण चालवते वगैरे उघडच आहे.पण त्यात छोटया जाहिराती मात्र छान उपयोगी असतात. मी तर फक्त तेच पान वाचतो. पुण्यात नवख्या माणसाला सेटल व्हायला फार उपयोगी पडते.
शिवाय काही पुरवण्या सुद्धा वाचनीय असतात (ती डॉ.बातां ची सोडुन बर्का)
अवांतर- तुम्ही बी.जे.पी. वाले का हो? नाही म्हणजे निवडणुक,जातीपातीचे राजकारण, नंगानाच वगैरे बोलताय म्हणुन वाटले.
19 Apr 2016 - 2:08 pm | नितीनचंद्र
पिंपरी - चिंचवड मनपाची प्रत्येक कृती ही निवडणुका, मतांची गणिते आणि काँट्रेक्टर्स चे हीत पाहुन केली जाते. मागे एकदा महानगरपालिकेचा रोड नुतनीकरण माझ्या सोसायटीच्या जवळ अर्धवट सोडुन देण्यात आला. संबधीत काँट्रेक्टरला विचारणा केली असता इकडे भाजप वाले रहातात म्हणुन त्याचे डांबरीकरण केले नाही असे उत्तर त्याने दिले. जसे काही भाजप समर्थक टॅक्स भरत नाहीत.
भाजप नगरसेवकांची तक्रार आहे की ते ज्या समितीचे सदस्य असतात एकतर त्यांना बोलु दिले जात नाही किंवा मिटींग असल्याची सुचना मुद्दाम उशीरा पाठवली जाते.
26 Apr 2016 - 9:17 am | नमकिन
वचक नाहीं सरकारचा नौकरशाही व कंत्राटदारावर.
कायदे व नियम हे पाळणा-या सर्वसामान्य जनतेसाठी.
इथून पुढे भाजपवाले रहातात"- हे उमगले कारण इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्र, विभागवार कुणाला किती मते पडली हे आयते समजते.