मराठी कथालेखक यांनी सदाहरित धाग्यावर विचारणा केल्याप्रमाणे येथे थिटा मेडीटेशन बाबत माझे स्वतःचे काही अनुभव आणि काही वस्तुस्थिती तसेच माहिती नमूद करत आहे. याबाबत सर्वप्रथम नोंद घ्यावी की आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचे मत व मार्गदर्शन नक्कीच घ्यावे. तसेच अशा प्रकारची मेडिटेशन्स गर्भवती स्त्रिया, 25 वर्षांखालील व्यक्ती यांनी करु नये अशीही माहिती मला याबाबतची आंतरजालीय माहिती वाचताना मिळालेली आहे.
माझी माहिती वैयक्तिक अनुभवांवर तसेच आंतरजालीय माहितीवर आधारीत आहे आणि कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ उत्सुकतेपोटी मी हे थिटा मेडिटेशन केलेले आहे. मला स्वतःला यातून कोणताही त्रास झाला नाही की वाईट अनुभव आला नाही. उलट अतिशय रिफ्रेशिंग करणारे अनुभव आले. याबाबत आंजावर देखील अनेक लोकांनी निर्वाळा दिलेला आहे की हे प्रयोग पूर्ण सुरक्षित आहेत तरी पण आपण असले प्रयोग वैद्यकीय सल्ल्याशिवाय करु नयेत असे स्पष्ट नमूद करतो.
एकूण 10 ते 12 दिवस फक्त मी हे मेडीटेशन केलेले आहे. परंतु मला पारंपारिक हिंदु पद्धतीचीच उपासना आवडत असल्याने पुढे माझा यातील रस कमी झाला व सध्या तरी मी हे प्रयोग बंद केलेले आहेत. (मला व्यक्तिशः ईश्वराच्या सगुण साकार रुपाची उपासना हीच आवडते).
एकूण जितक्यावेळा हे थिटा मेडिटेशन मी केले त्यापैकी साधारण 70 ते 80 टक्के वेळाच मी गहन निद्रावस्थेचा अनुभव घेतला. म्हणजे success rate 100 टक्के नसावा. याला निद्रावस्था पण म्हणता येत नाही. आतून तुम्ही जागृत असता असा अनुभव येतो पण विचारप्रक्रिया पूर्ण थांबलेली असते. हे शब्दांत सांगता येत नाही नक्कीच. ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे.
तर असो, आंतरजालावर मोठ्या प्रमाणात brainwave entrainment उपलब्ध आहे. यामध्ये मेंदूच्या अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व थिटा या मूलभूत लहरी कर्णमधुर संगीताच्या माध्यमातून तुमच्या कानांद्वारे मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात आणि अपेक्षित परिणाम साधला जातो.
बीटा – 13 ते 40 हर्ट्स
अल्फा – 8 ते 12 हर्ट्स
थिटा – 3 ते 8 हर्ट्स
डेल्टा – 0.5 ते 3 हर्ट्स
या पेक्षा अधिक किंवा कमी फ्रिक्वेन्सीच्या तरंगलांबी मेंदु निर्माण करतो. पण त्याबाबत अद्याप फारसे संशोधन झालेले नाहीये. तसेच पुरेशी माहिती देखील उपलब्ध नाही. गॅमा तरंगलांबी तशा प्रसिद्धच आहेत. पण मी त्यांचा फारसा उत्सुकतेने अभ्यास केलेला नाहीये. त्यामुळे लिहू शकत नाही.
तर यातील बीटा तरंगलांबी म्हणजे आपली नैसर्गिक जाणीव जागृतीची अवस्था. याच अवस्थेत आपले दैनंदिन कामकाज आपण पार पाडतो. (Beta is a ‘fast’ activity, present when we are alert, attentive, engaged in problem solving, judgment, decision making, and engaged in focused mental activity.)
बीटाच्या खालोखाल येतो अल्फा. येथे मेंदू रिलॅक्स होऊ लागतो. एखादे सुंदर दृश्य पाहिल्याने, संगीत ऐकल्याने आपल्याला जो एकदम शांततेचा अनुभव येतो तो हाच.
याखाली थिटा तरंगलांबी. येथे अगदी गहन निद्रावस्थेत गेल्यासारखे अनुभव येतात. तुमची स्वची जाणीव देखील गायब होते. काळाची जाणीव सुद्धा या अवस्थेत होत नाही.
डेल्टा तरंगलांबी अतिशय सूक्ष्म activity आहे. हा प्रयोग मी मुद्दामच केलेला नाही. कारण तितका आत्मविश्वास नव्हता. पण ही अगदी unconscious अवस्था आहे. अतिशय उच्चावस्थेला गेलेले योगी, साधु, झेन उपासक यांचे मेंदू या तरंगलांबीत कार्य करताना आढळतात. पण त्यासाठी हे लोक आयुष्य खर्ची घालतात. आपणांस विज्ञानामुळे ही सुविधा काही मिनिटांत उपलब्ध होते आहे.
यातील प्रत्येक तरंगलांबीसाठी वेगवेगळे स्वतंत्र संगीत उपलब्ध आहे. वरकरणी एखादे relaxing music वाजत असते. परंतु त्याच्या आत भुंग भुंग असा एक आवाज येत असतो. त्याच या तरंगलांबी. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळ्या प्रकारे function करीत असतो. त्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळ्या तरंगलांबीची आवश्यकता असेल. ते संबंधित डॉक्टरच ठरवू शकतील.
हे संगीत ऐकण्यासाठी अर्थातच चांगल्या दर्जाचा मोबाईल आणि हेडफोन आवश्यक आहेत. काही ट्रॅक्ससाठी हेडफोन आवश्यक नसतात. ज्या संगीतात binaural beats वापरलेले आहेत ते बहुदा हेडफोननेच ऐकावे लागतात. Binaural beats म्हणजे प्रत्येक कानाला स्वतंत्रपणे वेगवेगळ्या तरंगलांबीचे ध्वनी ऐकवले जातात. त्यांच्यामध्ये जो फरक असतो त्या तरंगलांबीचा एक नवाच ध्वनी मेंदू स्वतःच भासमान निर्माण करतो. अर्थात यात इतके डीप जाण्याची गरज नाही. याविषयी अधिक माहिती खाली मिळेलः
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
संगीत ऐकताना आवाज शक्यतो 70 टक्के वरच ठेवावा हे स्वानुभवावरुन सुचवतो. यापेक्षा जास्त आवाज ठेवला तर त्या भुंग भुंग आवाजाचा त्रास होऊ लागतो. या लहरींना आपला मेंदू frequency following response देतो. म्हणजेच ज्या लहरी संगीताच्या अवगुंठनातून पुरविल्या जातात त्या लहरींमध्ये तो स्वतः काम करु लागतो.
कानांत हेडफोन लावून सरळ गादीवर मस्त निवांत आडवे पडायचे. कोणत्याही परिस्थितीत सदरचे संगीत ड्रायव्हींग करताना, अवजड मशीन्स हाताळताना किंबहुना कोणतेच व्यावहारिक काम करताना ऐकावयाचे नाही. मला तर हे संगीत संध्याकाळी ऑफिसवरुन दमून भागून घरी परत आले की मगच ऐकावे हेच योग्य वाटते. कारण सकाळी सकाळी तुम्ही थिटा मेडीटेशन ऐकलेत आणि मेंदू अगदी relax अवस्थेत गेला तर तुमच्या दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होऊ शकेल असे मला तरी वाटते. कारण एक सामान्य जीव म्हणून जगण्यासाठी आपणांस बीटा लहरी अतिशय आवश्यक आहेतच. जेव्हां साधुत्वाकडेच वाटचाल करावयाची असेल तर थिटा आणि डेल्टा हे पर्याय आहेत.
या सर्व प्रक्रियेत शरीर अजिबात हलवायचे नाही. थोड्या देखील हालचालीने ध्यान भंग होऊ शकते. त्या दृष्टीने आधीच तयारी करावी. घरातील व्यक्तींना देखील कल्पना द्यावी. सर्व टी.व्ही., मोबाईल, रेडिओ बंद करावेत. या अवस्थेत छोटेसे जरी आवाज आले तरी फार धसका बसल्यासारखा होतो. म्हणून विशेष काळजी घ्यावी. माशा, मच्छर असतील तर त्यांचा बंदोबस्त अगोदरच करावा लागेल. नियमित जप करणा-यांना हा अनुभव असेलच की अशा वेळीस उगाचच इकडे तिकडे खाजवणे, खोकला येणे, मुंग्या येणे असे प्रकार शरीर करु लागते. त्यावेळीस शांत राहणे व पुन्हा संगीत ऐकण्याकडे ध्यान देणे आवश्यक असते. तुम्हाला केवळ ऐकण्यापलिकडे काहीच करावयाचे नाही. आणि ऐकण्याकडे लक्ष नाहीच गेले तरी कान त्यांचे काम करतच आहेत हे लक्षात ठेवावे.
खाली मला जो सर्वात उत्तम व्हीडीओ वाटला त्याची लिंक देत आहे. व्हीडीओ थेट ऐकणे योग्य नाही ठरणार. कारण अशी मेडीटेशन्स दीर्घ काळ चालतात त्यामुळे मध्येच बॅटरी बंद पडून रंगाचा भंग होऊ शकतो. सरळ मोबाईलवर mp3 डाऊनलोड करणे व ऐकणे सर्वात बेस्ट.
Ho’ponopono ही एक प्राचीन हवाईयन उपासना पद्धती आहे. यामध्ये आपण खालील 4 मंत्र सतत स्वतःशीच repeat करत राहतो. यामागे हेतु असा की, आपल्या आयुष्यात जी काही दुःखे, वाईट परिस्थिती आपणच आपल्या विचारांद्वारे, कर्मांद्वारे निर्माण करतो त्यांचे निरसन व्हावे. याविषयी अधिक माहिती इथे मिळेलः
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=5&cad=rj...
I love you
I am sorry
Please forgive me
Thank You
मराठी कथालेखक यांनी विचारल्याप्रमाणे lucid dreaming काय? तर हे मेडिटेशन करताना या 10 – 12 दिवसांत मला माझी स्वप्ने कमालीची live, vivid आणि colorful होत असल्याची जाणीव झाली. Lucid dreaming हा वेगळा विषय आहे. परंतु असे का झाले हे मला सांगता येत नाही. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
प्रतिक्रिया
18 Apr 2016 - 1:23 pm | स्पा
ओके
18 Apr 2016 - 1:26 pm | गॅरी शोमन
पण त्यासाठी हे लोक आयुष्य खर्ची घालतात. आपणांस विज्ञानामुळे ही सुविधा काही मिनिटांत उपलब्ध होते आहे.
ज्यांना पचनाचे प्रॉब्लेमस आहेत, जे कायम हाय ब्लड प्रेशर रोगी आहेत, ज्यांची मानसीक आवस्था छोट्याश्या स्टीम्युलीने बिघडते अश्यांना सुध्दा केवळ संगीत ऐकल्याने डेल्टा ब्रेन वेव्हज मधे जाणे शक्य आहे ? शक्य असलेच तर किती काळ ?
मला शंका आहे.
18 Apr 2016 - 1:29 pm | विजय पुरोहित
अहो हे केवळ संगीत ऐकवले जात नाही. तर संगीताच्या माध्यमातून त्या त्या तरंगलहरी तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात. आणि हे सर्व शुद्ध विज्ञान आहे.
मला स्वतःला हाय बी.पी. चा त्रास असून देखील कुठलाही त्रास झाला नाही. पण अशा व्यक्तिंनी तज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.
18 Apr 2016 - 1:31 pm | विजय पुरोहित
यातील प्रत्येक ट्रॅक असा डिझाईन केलेला असतो की सुरुवात बीटा तरंगलहरींपासून (जी आपली सामान्य तरंगलांबी आहे) होऊन मग हळूहळू लोवर बीटा, मग अल्फा, मग थिटा, मग लोवर थिटा आणि मग डेल्टा आणि ट्रॅक संपतेव्ळीस याच्या बरोब्बर उलट असा प्रवास तुमचा घडवला जातो. यातील थि टा आणि डेल्टा हा काळ सर्वाधिक relaxation चा असतो.
18 Apr 2016 - 1:47 pm | पैसा
हा शवासन आणि शांत करणार्या संगीताचा परिणाम असू शकेल. निव्वळ कुतुहलासाठी ही सगळी माहिती आवडली. पण खरं सांगायचं भावातीत ध्यान किंवा त्यावर आधारित सिद्ध समाधी योग यातून पुरेसे रिलॅक्सेशन आणि विचाररहित अवस्था येते. हे मी १९९३ पासून नियमित करते आणि दुसरे काही शिकावे असे कधी वाटले नाही.
18 Apr 2016 - 3:58 pm | विजय पुरोहित
हा शवासन आणि शांत करणार्या संगीताचा परिणाम असू शकेल.
नाही पैसाताई. यातील विशिष्ट तरंगलांबीच्या लहरी हाच मुख्य परीणाम करणारा घटक आहे. याबाबत वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातूनच डेल्टा व थिटा तसेच अन्य तरंगलहरींचे महत्व, त्यांचे परीणाम इ. सर्व शास्त्रीय पद्धतीने अभ्यासण्यात आलेले आहे.
आपला मेंदू याला frequency following response देतो. म्हणजे ज्या ब्रेनवेव्हज त्याला कानांच्या माध्यमातून ऐकवल्या जात आहेत त्याच वेव्हजवर तो स्थिर होतो. आणि मग आपल्याला विचारर्हित, अस्तित्वरहित अशी थिटा किंवा डेल्टा अवस्था प्राप्त होते.
18 Apr 2016 - 6:40 pm | आनन्दा
बाकी तुम्ही ते भुंग भुंग म्हणताय त्यात मला भ्रामरीशी साधर्म्य वाटतेय..
18 Apr 2016 - 2:13 pm | उगा काहितरीच
ओक्के... !
18 Apr 2016 - 3:17 pm | DEADPOOL
मस्त लेख!
करून बघायला आवडेल!
18 Apr 2016 - 2:20 pm | सस्नेह
तुम्ही मेडीटेशनमध्ये काय अनुभव आले ते लिहिलेले नाही. तसेच यामुळे काही फायदा झाला का , तुम्हाला दैनंदिन व्यवहारात किंवा मनस्थितीत काही फरक वाटला का ? ते ऐकण्याची जिज्ञासा आहे.
या क्लिप्स किती वेळाच्या असतात ? आणि भारतीय पद्धतीच्या ध्यानापेक्षा यातून काही अधिक फायदे आहेत का ?
18 Apr 2016 - 3:46 pm | विजय पुरोहित
मुख्य म्हणजे माझा सर्वात महत्वाचा अनुभव मी वरती नमूद केलेलाच आहे की एक विचाररहित, गाढ निद्रेसारखी अवस्था प्राप्त होते. सर्व ध्यानपद्धतींचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की विचाररहित अवस्था प्राप्त व्हावी. त्या दृष्टीने तर या पद्धती अतिशय उपयुक्त आहेत. या १०-१२ दिवसांत आलेले काही अनुभवः
१) मेडीटेशन करताना मी केवळ एका शुद्ध अस्तित्व रुपाने शिल्लक आहे असे जाणवत होते. शरीराची जाणीव नष्ट झाली. काळाची जाणीव पण तीव्र अनुभवांत नष्ट होते.
२) मेडिटेशन करुन उठल्यावर अतिशय आनंददायक तणावरहित अवस्था अनुभवास येणे.
३) झोपेची क्वालिटी सुधारणे. याच सुमारास Lucid dreaming चे अनुभव येऊ लागले.
या क्लिप्स ४५ मिनिटे ते दीड तास असू शकतात. मी वर यूट्यूबवर शेयर केलेली क्लिप ४५ मिनिटांची आहे. Lucid dreaming साठी जे ट्रॅक उपलब्ध आहेत ते ६ तास ते ८ तास पर्यंत असतात. पण मी ते अजून ट्राय केलेले नाहीत.
भारतीय पद्धतीच्या ध्यानापेक्षा यातून काही अधिक फायदे आहेत का ?
यानंतर १०-१२ दिवसांत माझी उत्सुकता कमी होऊन मी पारंपारिक जपपद्धतीकडे वळलो. त्याचे कारण म्हणजे तुमची जशी नैसर्गिक आवड असेल तसेच मार्ग तुम्ही शोधत जाणार. मला मुळात हिंदू सगुण साकार ईश्वर ही कल्पना जास्त भावते. त्यामुळे मी पारंपारीक पद्धतीनेच जप करतो. यात केवळ ही पद्धत वैज्ञानिक असल्याने कमी वेळात, कमी कष्टांत फळे देणारी आहे.
18 Apr 2016 - 3:55 pm | मराठी कथालेखक
माझ्या विनंतीमुळे आपण ह्या रंजक विषयावर धागा लिहलात याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
युट्युबवर अनेक प्रकारचे Binaural beats उपलब्ध आहेत अगदी केस वाढावण्याचे वा वजन घटवण्याचे देखील.आपले त्याबद्दल काय मत आहे ?
18 Apr 2016 - 3:59 pm | विजय पुरोहित
युट्युबवर अनेक प्रकारचे Binaural beats उपलब्ध आहेत अगदी केस वाढावण्याचे वा वजन घटवण्याचे देखील.
नाही. त्याबाबत माझा काही अभ्यास नाही.
18 Apr 2016 - 4:26 pm | हर_हुन्नरी
रोचक..ध्वनी आणि आपण ...यातला फार गहिरा संबंध आणि एका अर्थाने रहस्यमय देखील...
18 Apr 2016 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
पण मला एका प्रश्र्ण पडला आहे की ह्या संगीताचा वाजवणार्या वादकंवर कसा काय परिणाम होता नसावा?
म्हणजे जर ४५ मिनिटांचे संगीत ऐकताना विचार विरहित अवस्था प्राप्त होत असेल तर तशा प्रकारचे संगीत वाजवताना वादक त्या आवस्थेत कसे पोचत नसतील? आणि जर ते तसे पोचत असतील तर मग संगीत कसे सुरु रहाते?
पैजारबुवा
18 Apr 2016 - 4:49 pm | विजय पुरोहित
नाही पैजारबुवा. या ब्रेनवेव्हज म्हणजे आपणांस ऐकू येणारे ते साधे संगीत नव्हे. आपल्या मेंदुतील वेगवेगळ्या भागांशी संपर्क ठेवताना विशिष्ट वेळी मेंदू ज्या फ्रिक्वेन्सी वापरतो त्याच या फ्रिक्वेन्सी होत.
अशा प्रकारच्या sound tracks मध्ये केवळ वरवर एक रिलॅक्सिंग आणि कर्णमधुर असे शांत संगीत वाजत असते, जे सामान्य वादकच वाजवत असतात. परंतु याच्या आवरणाखाली, हलक्याशा आवाजात, अल्फा, बीटा, डेल्टा किंवा थिटा या फ्रिक्वेन्सी वेगळ्याच विशिष्ट साधनांनी निर्माण केल्या जातात व कानांद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात. त्या वाजवण्याशी सामान्य संगीत वाद्य वादकांचा संबंध नाही.
प्रयोगशालेत ट्यूनिंग फोर्क असतो. तो कशावर तरी आपटून वाजवला तर जसा आवाज येतो तसाच साधारण आवाज येतो.
18 Apr 2016 - 5:40 pm | मदनबाण
यासाठीचे असलेले अॅन्ड्रॉइड अॅप मी इथे दिले आहे.
मी प्रदिर्घ अनुभव घेतल्या शिवाय यावरच्या अनुभवावर अधिक भाष्य करणार नाही,परंतू आत्ता पर्यंतचा थिटा व्हेव्ह्जचा अनुभव चांगला वाटला आहे असे मात्र नमुद करु इच्छितो.
थिटा व्हेव्ह्जवर अधिक इकडे :- https://www.transparentcorp.com/research/theta-brain-waves.php
अगदी १५ मिनिटे तानपुरा ऐकला तरी उत्त्म अनुभव मिळतो,अर्थातच इतर कुठलाही आवाज / ध्वनी टाळुनच मेडिटेशनचा अभ्यास केला पाहिजे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Genius
18 Apr 2016 - 7:51 pm | सुबोध खरे
http://earthvision.info/meditatingbrain.html
सर्व तर्हेच्या प्रार्थना/ उपासना आणि मेंदूच्या लहरी आणि त्याचे फायदे याबद्दल एक शास्त्रीय लेख आहे.जिज्ञासूनी वाचून पाहावा.
बाकी या अशा तर्हेच्या "उपासनेचे" फायदे अवकाश/ अंतराळवीर जेथे दिवस आणि रात्र एकच असतात( एकीकडे सूर्य तळपत असतो आणि बाकी सगळीकडे तारे चमकत असतात) आणि अणु पाणबुडीतील नौसैनिक महिनोन्महिने पाण्याखाली असतात ( जेथे पूर्ण वेळ २४ तास अंधारच असतो) तेथे मेंदूला दिवस रात्र हे दिनचक्रच( circadian rythm) बिघडलेलं असते. येथे २४ तास jet lag ची अवस्था असते. या लोकांना मनः शांती आणि तणावरहित अवस्था आणण्यासाठी वापरले जातात. एरो स्पेस आणि मरीन मेडिसिनच्या प्रारंभिक अभ्यासात या विषयाला स्पर्श केला होता. त्यावर आधारित अतिशय तोकड्या ज्ञानावर मी हे लिहित आहे. लोकांनी पुढे जाण्या आधी तज्ञ व्यक्तींचाच सल्ला घ्यावा.
वैयक्तिक रित्या मला असे वाटते कि फक्त थिटा लहरीचे संगीत ऐकणे हे आपल्या ताणतणावाला दूर करण्यासाठी फास्ट फूड सारखे आहे त्या ऐवजी मुळापासून ध्यान, धारणा,विपश्शना किंवा उपासना यांचा उपयोग केला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. अर्थात यात माझी माहितीपुर्णपणे ऐकीव आहे म्हणून ती खात्रीलायक असेल याची मी खात्री देत नाही.
19 Apr 2016 - 11:38 am | विजय पुरोहित
धन्यवाद डॉक्टरसाहेब. दुवा अगदी उत्तम आहे. वाचून पाहीनच.
लोकांनी पुढे जाण्या आधी तज्ञ व्यक्तींचाच सल्ला घ्यावा.
अगदी सहमत.
फक्त थिटा लहरीचे संगीत ऐकणे हे आपल्या ताणतणावाला दूर करण्यासाठी फास्ट फूड सारखे आहे त्या ऐवजी मुळापासून ध्यान, धारणा,विपश्शना किंवा उपासना यांचा उपयोग केला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. अगदी समर्पक बोललात. मला पण तसेच वाटते.
18 Apr 2016 - 8:15 pm | उगा काहितरीच
हं मघाशी घाईत होतो त्यामुळे वरवर वाचला होता लेख ... आता रोचक वाटतोय. काही प्रश्न आहेत.
१)
18 Apr 2016 - 8:23 pm | उगा काहितरीच
बहुतेक क्लोझींग टॕग मधे गडबड झाली मोबाईलवरून टंकत असल्यामुळे . संपादक महोदय कृपया लक्ष द्या. तसदीबद्दल क्षमस्व! आगाऊ धन्यवाद .
19 Apr 2016 - 12:02 pm | विजय पुरोहित
डॉक्टरांचे मत घेऊन(च) करण्याऐवढा सिरीएस प्रकार आहे का हा ? डॉक्टर नेमकं काय तपासून उत्तर देऊ शकतील ? उ.का. याबाबत आंतरजालावर मी ब-यापैकी वाचन केलेले आहे. पण अनेक ठिकाणी मला अनुभवी व्यक्तिंनी देखील डॉक्टरी सल्ला व देखरेख याखालीच असले प्रयोग करावेत अशी सूचना आढळून आली. अशा परिस्थितीत मला ही तशीच सूचना देणे भाग आहे. तसेच थोडा विचार केला तर यात मेंदू या अगदी महत्वाच्या अवयवाला त्याच्या नैसर्गिक तरंगलहरींच्या विरोधात जाऊन जाणून बुजुन वेगळ्या तरंगलहरींवर काम करायला लावणे म्हणजे थोडे रिस्की प्रकरण वाटतेच की!
डॉकटर यामध्ये तुमचा electroenciphalogram काढून तुम्हांला आवश्यक तरंगलहरी कुठल्या आहेत? अल्फा की बीटा की डेल्टा की थिटा की गॅमा? हे ठरवू शकतात.
२) एवढी १००% परिस्थिती निर्माण करणे साहजिकच अवघड आहे. पण तरीही ८०-९०% परिस्थिती अनुकूल असेल तर करावे का ? (उदा रात्री केवळ पंख्याचा आवाज असल्यास ?) हरकत नाही. १०० टक्के तर नाही च जमणार कुणालाही.
३) माझी झोप अगदी सावध आहे. कुणी जराही धक्का लावला तरी जाग येते. झोप लागण्यास बराच कालावधी लागतो. मला या प्रकाराचा फायदा होईल काय?
मला देखील झोपेची क्वालिटी सुधारल्याचा अनुभव आला आहे. तुम्हांला जर झोप अपुरी झाली असेल तर या मेडीटेशनने त्या झोपेची कमतरता भरुन निघते. वरती खरे साहेबांनी पण यावरती छान विश्लेषण केलेले आहे.
४)extreme conditions मधे माणूस उठलाच नाही वगैरे काही गोष्टी घडल्याचा इतिहास आहे का ?
असं माझ्या वाचनात तरी कुठे आलेले नाही. जर अशीच भीति फार वाटत असेल तर प्रथम अल्फा मेडीटेशनपासून सुरुवात करावी. अल्फा मेडीटेशनचे पण अनेक व्हीडीओ युट्यूब्वर उपलब्ध आहेत.
५) खबरदारी म्हणून अमुक अमुक वेळानंतर मला उठव असं कुणाला सांगून ठेवावं का ?
सांगायला काही हरकत नाही. पण असं काही होणार नाही. वरती मी म्हटल्याप्रमाणे अशा कुठल्याही चांगल्या क्वालीटीच्या ट्रॅकची सुरुवात प्रथम बीटा, मग अल्फा, मग थिटा व मग गरज असेल तर डेल्टा अशी होते आणि ट्रॅक संपताना डेल्टानंतर मग थिटा मग अल्फा मग बीटा अशी क्रमाक्रमाने होते. यामुळे मेंदूवर ताण येत नाही. तसेच फक्त थिटा व डेल्टा या कालावधीतच तुम्ही जाणीवेच्या पलिकडे जाता. पुन्हा अल्फा व बीटा क्षेत्रात तुम्ही जाणीवेवर परत येताच.
19 Apr 2016 - 12:35 pm | प्रसाद१९७१
फक्त बीटा च करुन बघायचे असेल तर आधी डॉक्टरी सल्या ची गरज नसावी अशी माझी समजुन झाली आहे ती बरोबर आहे का?
18 Apr 2016 - 9:51 pm | चित्रगुप्त
हे एक नवीनच कळले. लेखातील दुव्यांमधील संगीत अद्याप ऐकले नाही, पण नक्की ऐकणार.
हल्लीच्या बहुतेक व्यावसायिक डॉक्टरांना औषध देणे यापलिकडे कश्यात रस आणि वेळ नसतो. त्यामुळे याविषयी 'तज्ञ' असा डॉक्टर हुडकणे दुरापास्तच.
25 Apr 2016 - 8:21 pm | राघव
हे नवीनच कळले..
करून बघायला पाहिजे. :-)
19 Apr 2016 - 12:53 pm | अनंत छंदी
एक विचित्र शंका आहे, एका कानाने बहिर्या माणसाला याचा लाभ घेता येणार नाही का?
19 Apr 2016 - 1:33 pm | सुबोध खरे
नाही येणार
कारण डावी आणि उजवीकडील ध्वनी लहरी यांची बेरीज आणि वजाबाकी होऊन या लहरी तयार होतात.(constructive and destructive interference)
19 Apr 2016 - 2:55 pm | अनंत छंदी
धन्यवाद डॉक्टर!
19 Apr 2016 - 8:28 pm | विजय पुरोहित
डाॅ. साहेबांनी योग्य तो खुलासा केलेला आहेच. पण अजून एक सांगतो की हेडफोन न वापरता देखील ऐकण्याचे असले ट्रॅक्स उपलब्ध आहेत व ते ही तितकेच परीणामकारक आहेत. असे ट्रॅक्स केवळ एक कान कार्यरत असलेल्या व्यक्तींना चालू शकतील असे मला वाटते.
19 Apr 2016 - 8:28 pm | विजय पुरोहित
डाॅ. साहेबांनी योग्य तो खुलासा केलेला आहेच. पण अजून एक सांगतो की हेडफोन न वापरता देखील ऐकण्याचे असले ट्रॅक्स उपलब्ध आहेत व ते ही तितकेच परीणामकारक आहेत. असे ट्रॅक्स केवळ एक कान कार्यरत असलेल्या व्यक्तींना चालू शकतील असे मला वाटते.
19 Apr 2016 - 3:36 pm | आनन्दा
ऐकावे ते नवलच.. वारकरी संप्रदायामध्ये डाव्या कानाने मृदुंग आणि उजव्या कानाने टाळ ऐकावे असे म्हणतात.. किंवा उलटे असेल.. त्याचे मूळ पण ह्याच्यात असेल काय?
19 Apr 2016 - 6:46 pm | शाम भागवत
नमस्कार पुरोहित साहेब,
हे सर्व अनुभव जपाने येऊ शकतात.
नामस्मरणाच्या मार्गात ध्यानाच्या अगोदर तंद्रा नावाची अवस्था असते. (आपण तंद्री म्हणतो तशाच प्रकारची थोडीशी)
ही तंद्रा अवस्था येण्याची सुरवात झालीय पण आली नाहीय्ये अशा स्थितीत असेच होते. अगदी सूक्ष्मसा आवाज अथवा अगदी हलकासा स्पर्श पण त्रासदायक वाटतो. मला वाटते तुम्हाला 'दचकणे' असे म्हणावयाचे असावे.
19 Apr 2016 - 8:29 pm | विजय पुरोहित
सहमत भागवत साहेब. दचकणे हाच शब्द बरोबर आहे. :)
20 Apr 2016 - 7:29 pm | मदनबाण
@विजय पुरोहित
पण अजून एक सांगतो की हेडफोन न वापरता देखील ऐकण्याचे असले ट्रॅक्स उपलब्ध आहेत व ते ही तितकेच परीणामकारक आहेत.
तुम्ही ज्या बद्धल म्हणत आहात ते isochronic tones आहेत ज्यात पल्सेटिंग टोन्सचा वापर होतो. { पण हेडफोन्स वापरल्यास अधिक उत्तम }
binaural beats मध्ये मेंदुच्या फ्रिक्वेन्सी रिसपॉन्स प्रोसेसचा वापर होतो, हा दोन टोन्स मधला मुख्य फरक आहे.
काहींना नुसती फ्रिक्वेन्सी ऐकणे रुचत नाही तर काहींना नुसते संगीत ट्रॅक्स ऐकणे पसंत नसते. मी माझ्यासाठी वेगळी पद्धत वापरतो त्याची रेसेपी खाली देत आहे. ;)
साहित्य :- १} उत्त्म हेडफोन्स / इयरफोन्स
२ } Brain Waves - Binaural Beats
याच्या मी बनवलेल्या माझ्यासाठीचे कस्टम प्रिसेट्स :-
अल्फा :-
प्युअर अल्फा
L = 55 Hz ; R = 65 Hz
अल्फा १०.५
L = 100 Hz ; R = 110.5Hz
थिटा :-
प्युअर थिटा
L = 55 Hz ; R = 50 Hz
थिटा ५.५
L = 65 Hz ; R = 59.5 Hz
डेल्टा :-
प्युअर डेल्टा
L = 56 Hz ; R = 55.5 Hz
डेल्टा ड्राईव्ह
L = 72.5 Hz ; R = 75.0 Hz
गामा ४०
L = 315.0 Hz ; R = 355.0 Hz
३} Gnaural for Android FREE
यात काही डिफॉल्ट प्रिसेट्स आहेत त्यातले मी Babbling brook सिलेक्ट करतो आणि व्हॉइस टॅब मधला फक्त Water: Clear हा पर्याय सिलेक्टेड ठेवुन इतर २ अनचेक करतो. लुप १५ / २० / ३० / ४५ / ६० { हवा तसा } ठेवतो.
४} Noise Wall - Block Noise
यात व्हाईट / पिंक / ब्राउन / रेड असे नॉइस ऑप्शन आहेत. { मी शक्यतो पिंक किंवा ब्राउन वापरतो.}
कॄती :-
सकाळी ऐकणार असाल तर Brain Waves - Binaural Beats थिटा १५ मिनीटे + अल्फा ३० मिनीटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
संध्याकाळी / रात्री कणार असाल तर Brain Waves - Binaural Beats अल्फा १५ मिनीटे + थिटा १५ मिनीटे + डेल्टा ३० मिनिटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
वरील दोन्ही पद्धतीत दरवेळी Brain Waves - Binaural Beats वेळेनुसार अल्फा थिटा आणि डेल्टा फ्रिक्वेन्सी मॅन्युअली सेट कराव्या लागतील.
कॄती पद्धत दुसरी :-
Brain Waves - Binaural Beats अल्फा ४५ मिनीटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
Brain Waves - Binaural Beats थिटा ४५ मिनीटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
किंवा
Brain Waves - Binaural Beats डेल्टा ४५ मिनीटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
गामा रेसेपी :- Brain Waves - Binaural Beats गामा ४५ मिनीटे + Gnaural { वरती दिलेल्या सेटींग्स सकट } + ब्राउन किंवा पिंक नॉइस आवडी नुसार हव्या त्या प्रमाणात निवडावा.
वरती गामा ४० दिली आहे, ती ४० का ? यासाठी जालावर खोदकाम करावे.
वरील पाकॄ आपल्या तब्येतीला झेपेल तेव्हढीच करुन पहावी ! ;) कानाचे १२ वाजतील एव्हढा आवाज ठेवु नये,शक्यतो सौम्य आणि ऐकायला येइल इतपतच ठेवावा. ड्रायव्हिंग करताना, महत्वाची कामे करताना ही पाकॄ चाखु नये ! ;)
वरती डॉकनी मेडिटेशना सल्ला आणि दुवा दिला आहे तो अनमोल आहे हे वेगळे न सांगावे. परंतु त्यांच्या फास्ट फुडला मात्र मी फास्ट ट्रॅक म्हणण्याचे धारिष्ट्य करत आहे, त्या बद्धल आधीच माफी मागतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुकुरुकुकुरुकुकुरुकु कुक... ;) :- Kick 2
21 Apr 2016 - 5:26 pm | मराठी कथालेखक
गॅमा ऐकताना डोळे मिटणे गरजेचे आहे का ?
गॅमाचा आपणास नेमका कसा उपयोग झाला/होतो ?
20 Apr 2016 - 8:28 pm | एक एकटा एकटाच
मस्त लेख
21 Apr 2016 - 9:26 pm | मार्गी
चांगली माहिती देणारा लेख!
22 Apr 2016 - 12:38 am | अर्धवटराव
म्हणजे इअरफोन कानातुन काढायचा आणि तसच झोपी जायचं.
कि मेडीटेशननंतर काहि काळ जागं राहाणं आवष्यक असतं ?
22 Apr 2016 - 5:35 am | मदनबाण
@मराठी कथालेखक
गॅमा ऐकताना डोळे मिटणे गरजेचे आहे का ?
कुठ्ल्याही मेडेटेशन प्रोसेस मध्ये असे केल्यास उत्तमच !
गॅमाचा आपणास नेमका कसा उपयोग झाला/होतो ?
मी अजुन जास्त गामा चा वापर केलेला नाहीये,त्यामुळे माझा यावर अधिक अनुभव नाही.
तुमच्यासाठी काही संदर्भ देतो :-
The proposed answer lies in a wave that, originating in the thalamus, sweeps the brain from front to back, 40 times per second, drawing different neuronal circuits into synch with the precept, and thereby bringing the precept into the attentional foreground.
Gamma wave
The Benefits of Gamma Brainwaves
http://www.40hz.net/sitename.html
@अर्धवटराव
रात्री अगदी झोपण्यापुर्वी हे मेडीटेशन करता येतं का?
हो,सध्या मी जे माझ्यावरच प्रयोग करतो आहे त्यात असे देखील करतो.
म्हणजे इअरफोन कानातुन काढायचा आणि तसच झोपी जायचं.
कि मेडीटेशननंतर काहि काळ जागं राहाणं आवष्यक असतं ?
ह्म्म्,कुठलेही मेडिटेशन नैसर्गिक झोपेला रिप्ल्सेस करु शकत नाही,नैसर्गिक झोप हवीच.गाढ झोपेने मेंदुला सगळ्यात जास्त फायदा मिळतो. { गाढ झोप म्हणजे रोज झोपतो ती नसुन, जी झोप लागल्यावर आणि नंतर उठल्यावर आपण सगळ्यात जास्त फ्रेश फिल करतो ती. }
मला तर इअरफोन लावुन झोप देखील लागते,अगदी मधेच उठलो तर ते मग काढुन टाकतो.
एक दुवा :- गाढ झोपेमुळे मानवी स्मृतीत वाढ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कदी ते हस बोल वे , न ज़िन्द साड्डी रोल वे... :- Love Aaj Kal
22 Apr 2016 - 7:40 am | अर्धवटराव
आता प्रयोग करुन बघता येईल.
22 Apr 2016 - 12:18 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
22 Apr 2016 - 8:53 am | अजय देशपांडे
छान लेख प्रयोग करून पाहतो
22 Apr 2016 - 9:33 am | रातराणी
असेच म्हणते. :)
28 Apr 2016 - 8:33 pm | मदनबाण
@ निमो
अहंकार { इगो } आणि मेंदू यांचे एक वेगळे कनेक्शन आणि एक झेन साधुच्या अहंकाराचा परिणाम वरिल इडियोय ऐकावयास मिळेल तेव्हा जमल्यास पहाणे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyan