"जेनेरिक" औषध एक कूट प्रश्न

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
17 Apr 2016 - 11:00 am
गाभा: 

अधुनिक युगात अनेक बाबतीत संशोधन झाल्याने माणसाचे आयुष्य एका बाजूने सुखावह आणि तरीही त्याच बरोबर दीर्घकाळ टिकणार्‍या विकारांनी ग्रस्त झालेले दिसते. मधुमेह,रक्तदाब, संधिवात, थायऱोईडविकार ई नी मुळे आयुष्यभर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यासाठी जवळ जवळ एका व्यक्तीला दर महिन्यास १२०० ते २००० रूपये इतका खर्च येतो. इतका खर्च माणूस
जेवणावरही करीत नाही. सबब आता जेनेरिक औषधे लोकानी घ्यावी अशी जागृती काही संस्था करीत आहेत.

जेनेरिक औषध म्हणजे बायो इक्वीव्हलंट औषध( घ्यायची पद्धत, डोस, मुख्य पदार्थ तोच व उद्देश ही तोच हा निकष )- ज्यात मूळ संशीधकाचे घ्यावयाच्या ऱोयल्टीचे हक्काची मुदत संपल्याने इतर उत्पादक त्याची कॉपी कायदेशीर रित्या करू शकतात.साहजिकच ही औषधे स्वस्त असतात. शिवलेली कोरी करकरीत पॅन्ट जर फूटपाथवर १२० रूपयाना मिळाली तर आपल्याला तीत काहीतरी " न्युन" आहे असे वाटू लागते. तोच नियम जेनेरिक ना लागू आहे. ही औषधे विश्वास बसू नये इतक्या कमी किमतीला मिळत असल्याने त्याच्या उपयुक्तेते बद्द्ल संभम निर्माण झालेला दिसतो. त्यात ब्रॅन्डेड औषधांचे निर्माते व वैद्यकीय व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने ते खुशीने जेनेरिक औषधांचे नाव पर्याय म्हणून लिहून देत नाहीत. व असे नाव प्रिस्क्रिप्शन मधे नसल्याने जेनेरिक औषधांचे व्यापारी ते विकत देत नाहीत असे समजते.

आत सामान्य लोकानी करावे काय? रस्त्यावरची १२० रूपयाची पॅन्ट घेण्यात एक तर धोका काही नाही व त्यास काही कायदेशीर बंधने ही नाहीत. सबब तिथे सब ठीक असते पण जेनेरिक चा विषय तसा नाही.

एकूण या विषयावर आपला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काय अनुभव आहे ? तसेच एक रोगी म्हणून कोणी याची काही
चाचणी घेऊन अनुभव ग्रथित केला आहे काय ? मिपकारानी या विषयावर प्रकाश टाकावा. आता महाराष्ट्रात जेनेरिक औषध विक्रीचे जाळे निर्माण होणार आहे म्हणे .

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

17 Apr 2016 - 11:23 am | साधा मुलगा

खरं सांगायचं तर लोकांना आणि केमिस्टना जेनेरिक औषधे म्हणजे काय याचा अर्थ कळलेला दिसत नाही. साध्या भाषेत सांगायचं तर तर सूट्ट दूध म्हणजे जेनेरिक आणि गोकुळ, वारणा अथवा इतर कुठल्याही कंपनीचा ब्रँड असलेले म्हणजे ब्रँडेड. ही झाली शास्त्रशुद्ध मार्केटिंग व्याख्या. भारतातली बहुतांश अगदी ९९% ही ब्रँडेड आहेत ज्याला ब्रँडेड-जेनेरिक असेही म्हणतात. थोडक्यात परासितामोल टॅब हि झाली जेनेरिक आणि crocin झाली ब्रँडेड. मी तरी अजून पर्यंत सुट्ट्या दुधासारखे ब्रँड शिवाय असलेली परासितामोल टॅब पाहिलेली नाही.
आणि जे काही जेनेरिकच्या नवे मिळत आहे ती सुद्धा एका लहान कंपनीची ब्रँडेड औषधे आहेत. फक्त ती स्वस्तात मिळतात म्हणून ती जेनेरिक म्हणून खपवली जातात. यात काही धोके आहेत पण नीट काळजी घेतल्यास पेशंटचा फायदा आहे. आत्ता मोबाईल वर लिहित आहे नंतर सविस्तर लिहीन.

आमच्या येथेहि असे दुकान सुरु झाले आहे पण शंका असलेने गेलो नाहि. चर्चा वाचण्यास उत्सुक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2016 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रत्येक आधुनिक वैद्यकीय औषधाच्या आवरणावर त्यात कोणती औषधी व पुरक द्रव्ये आहेत हे लिहिण्याची सक्ती आहे. ही नावे त्या द्रव्यांची औषधशास्त्रिय (फार्मॅकॉलॉजिकल) नावे असतात. ही लहान अक्षरांत आणि त्यांच्या मात्रेसह (ग्रॅम, मिलिग्रॅम, मायक्रोग्रॅम, युनिट्स, इ) लिहिलेली असतात.

औषधाचे ते बनवणार्‍या (त्या औषधाचे संशोधन केलेल्या अथवा ते औषध बनवण्याचे/विकण्याचे हक्क असलेल्या) कंपनीने जे नाव ठेवले आहे ते ब्रँडेड नेम. ब्रँडेड नाव हक्कदार कंपनी सोडून इतरांना वापरायला मनाई असते. हे नाव आवरणावर सर्वात मोठ्या आकारात लिहिले जाते. ब्रँडेड औषधांच्या किंमती जास्त असतात व त्यांची अनेक कारणे सांगितली जातात... उदा: बनवण्याची जास्त सुरक्षित प्रणाली, जास्त धोकाविरोधक वितरणव्यवस्था, संशोधन खर्च, ब्रँडचा प्रिमियन, इ. जोपर्यंत कंपनीचा पेटंटहक्क अबाधित आहे तोपर्यंत हे औषध इतर कंपन्यांना मुक्तपणे बनवता आणि/अथवा विकता येत नाही.

औषधांचे पेटंटहक्क साधारणपणे २० वर्षे चालतात व नंतर त्यात काही बदल न झाल्यास ते संपतात. त्यानंतर अन्य कोणतीही औषध कंपनी ते औषध मूळ कंपनीच्या परवानगीशिवाय नवीन नावाने बनवू आणि/अथवा विकू शकते. अर्थातच मूळ औषधी द्रव्यांची औषधशास्त्रिय नावे तीच राहतात, केवळ मोठ्या अक्षरातले नाव बदलते, किंवा नवीन कंपनी मूळ औषधशास्त्रिय (फार्मॅकॉलॉजिकल) नावाने ते औषध विकू शकते, हे झाले जेनेरिक नेम/औषध.

जर खात्रीने (भेसळ असलेली, बनावट, वगैरे प्रकार टाळून) औषधे मिळत असतील तर समान औषधशास्त्रिय (फार्मॅकॉलॉजिकल) नाव व समान मात्रा असलेल्या औषधांच्या परिणामांत फरक असत नाही, मग ते ब्रँडेड असो की जेनेरिक.

१mg हे अ‍ॅप डाउनलोड करा. त्यात ब्रँडनेम किंवा जेनेरिक नेम टाकले तर त्याचे भारतात मिळणारे ब्रँडेड व जेनेरिक पर्याय अधिकृत किंमतींसह मिळतील.

धोक्याची सूचना:
नावातील एका कॅरॅक्टरच्या फरकाने मूळ औषधापासून संपूर्ण वेगळे औषधी पर्याय मिळू शकतात, तेव्हा वैद्यकीय व्यवसायीकाच्या सल्ल्याशिवाय पर्यायी औषध निवडणे धोक्याचे ठरू शकते. सावधान !

बर्याचदा स्वस्तात मिळणारी जेनेरिक औषधे अजिबात काम करत नाहीत असे निरीक्षण आहे.उदा.
Amoxycillin Clavulinic acid असा सर्च घेऊन बघा.जेनेरिक औषधांची भरपूर रेंज मिळेल.किंमतीत प्रचंड फरक आहे त्यांच्या आणि ब्रँडेड augmentin duo, moxclav इ गोळ्या.पण दोन ब्रँडेड गोळ्यांच्या डोसमध्ये पटापट इंफेक्शन कमी होताना दिसते तेच स्वस्तातल्या गोळ्यांनी होत नाही.त्यामुळे मी माझ्यासाठी जी पटकन परिणाम करते तो गोळीचा ब्रॅंड निवडते.माझ्या पेशंटना बरं होणं महत्त्वाचे आहे.स्वस्त औषधं देत राहून कोणाचे इंफेक्शन वाढते का बघत राहण्याचा खेळ मी करु शकत नाही.
जेव्हा परिणामकारक पण स्वस्त औषधं उपलब्ध होतील तेव्हाच मी अशा गोळ्यांचा स्विकार करु शकेन.नुसते स्वस्तला काही अर्थ नाही.
मी कोणतीही भेटवस्तू/ स्किम कोणत्याही मेडिकल कंपनीकडून न घेणारी माझ्या एरिआतली बर्यापैकी यशस्वी डाॅक्टर आहे.असली प्रलोभने मोठ्या कंपन्यांपेक्षा स्वस्त औषधवाल्या कंपन्या दाखवतात हा अनुभव आहे.माझ्या दोनशे स्ट्रिप विका आणि सोन्याचे नाणे घ्या असे सांगत आलेल्याला नुकतंच लेक्चर देऊन हाकललंय!या प्रलोभनांना बळी पडणारे जास्त करुन इतर पॅथी जिपी असतात असे खेदाने आणि अठरा वर्ष निरीक्षणाच्या जोरावर लिहित आहे!

विजय पुरोहित's picture

18 Apr 2016 - 10:48 am | विजय पुरोहित

अजया ताई हाच अनुभव ओमेझ डी या गोळीबाबत आलेला आहे. ओमेझ डी ही बाजारातील अगदी प्रसिद्ध ब्रँडेड अँटासिड आहे. ओव्हर दी काऊंटर पण मिळते. पण याच कंटेंटची म्हणजे omeprazole + domperidone बनवलेली अन्य औषधे घेतली तर विशेष उपाय होत नाही. असा माझा तरी अनुभव.

अभ्या..'s picture

18 Apr 2016 - 1:40 pm | अभ्या..

अल्केमची ओमी डी आहे की. जेनेरिक असली म्हणून काय झाले.

साधा मुलगा's picture

19 Apr 2016 - 12:09 am | साधा मुलगा

अभिजित साहेब, जेव्हा तुम्ही अल्केम ची ओमी डी म्हणता तेव्हा तो एक ब्रांड झाला ,जेनेरिक नाही, इथे ओमी डी ची किंमत कितीही कमी असुदे त्याचा संबंध नाही.जर अल्केम किंवा अन्य कोणती कंपनी ब्रांड न लावता opeprazole +domperidone असा कॉम्बो विकत असेल तर ते जेनेरिक झाले. असे जेनेरिक विकणारा chemist मी तरी कुठेही पहिले नाहीये. जेनेरिक आणि branded यातला फरक लक्षात घ्या.

ओह्ह. जेनेरिकचा फंडा असाय होय. ब्रँडेड्/अन ब्रँडेड
अ‍ॅक्चुअली मला असे वाटायचे की एखादे ड्र्ग एक कंपनी रिसर्च करते आणि बाजारात आणते. नंतर त्याचे हक्क संपले की त्याच कंटेंटचे ड्रग दुसर्‍या नावाने दुसरी कंपनी कमी भावात काढते (कारण तिला रिसर्चला खर्च आलेला नसतो म्हणून) ह्या कमी किमतीच्या औशधांना जेनेरिक म्हणत असावेत असा माझा समज होता.
अनब्रँडेड म्हणले तर मग डायरेक्ट मोठी पॅकेजिंग (१०० टॅब्ज, २० व्हायल्स) असेच विकावे लागेल. नुसत्या कंटेंटने ड्र्ग्ज विकताना मी तरी पाहिले नाही. मग जेनेरिक ड्रग्ज कंटेंटने हुडकायचे कसे? त्या अ‍ॅपवर कसे येते नाव?
बादवे. ओमी डी ही जेनेरिक आहे असे मला केमिस्टने सांगितले. मला काय कळत नाही ह्या फिल्डमधले पण इतकी गोष्ट कळली की स्टोअरमध्ये त्याची प्रिंट प्राईस ७ रु. पर टॅब आहे. कधी एखादा केमिस्ट ५ रु. ने हिसोब करतो. माझ्या एक डिस्ट्रीब्युटर मित्राने ह्याच्या दोन स्ट्रीप १०/१० च्या फक्त ३० रु.. मध्ये दिलेल्या. तेंव्हा जरा कन्फुजन होते.
सोलापुरात एका राजकीय नेत्याच्या नावाने जेनेरिक स्टोअर्स चालू केलेले आहे. ;)

साधा मुलगा's picture

19 Apr 2016 - 8:02 pm | साधा मुलगा

म्हणूनच मी सुरुवातीला बोललो कि लोकांना आणि chemist ना जेनेरिक आणि ब्रान्देद मधला फरक कळला नाहीये, यासाठीच मी सुट्ट दुधाचे उदाहरण दिले. मी जी व्याख्या बोललो ती पुस्तकी अथवा मार्केटिंग व्याख्या आहे.
chemist च्या दृष्टीने जे स्वस्त आणि मार्गीन जास्त म्हणजे जेनेरिक असा समज आहे आणि त्याला ते बिनदिक्कतपणे जेनेरीकच म्हणतात. जो चुकीचा समाज आहे.

अ‍ॅक्चुअली मला असे वाटायचे की एखादे ड्र्ग एक कंपनी रिसर्च करते आणि बाजारात आणते. नंतर त्याचे हक्क संपले की त्याच कंटेंटचे ड्रग दुसर्‍या नावाने दुसरी कंपनी कमी भावात काढते (कारण तिला रिसर्चला खर्च आलेला नसतो म्हणून) ह्या कमी किमतीच्या औशधांना जेनेरिक म्हणत असावेत असा माझा समज होता.

या प्रकाराला ‘ME TOO’ brand असे म्हणतात. आणि भारतातील ९९% brands हे या प्रकारात मोडतात.
त्यामुळे omez D काय किंवा ओमी डी काय हे दोन्ही ME TOO brands च आहेत.
डिस्ट्रीब्युटरने स्वस्तात देणे समजू शकते कारण त्याला तशी scheme मिळाली असेल पण असे परस्पर डिस्ट्रीब्युटर कडून खरेदीसुद्धा कायदेशीर नाही! ;)

चौकटराजा's picture

17 Apr 2016 - 1:16 pm | चौकटराजा

प्रलोभने मोठ्या कंपन्यांपेक्षा स्वस्त औषधवाल्या कंपन्या दाखवतात हा अनुभव आहे. हा आपला अनुभव महत्वाचा आहे. बर्याच वेळा असे वाटते की डॉ ना मिळालेल्या गिफ्ट मुळे डॉ महाग औषधे सुचवितात. आपण सुचविलेले ब्रॅण्डेड चे प्राधान्य तर दंतवैद्यकात तर अधिक महत्वाचे आहे. धन्यवाद !

चौकटराजा's picture

17 Apr 2016 - 1:46 pm | चौकटराजा

acetaminophen, Paracetamol , व Panadol, यात काय फरक आहे ? मग ही तीन नावे का ?

mugdhagode's picture

17 Apr 2016 - 4:22 pm | mugdhagode

एकाच माणसाला दोन नावे असु शकतात.

असिटामिनोफेन , पारासिटेमोल एकाचीच्दोन नावे.

एच आय व्ही चे औषध झिडोवुडिन.. याचे अझिडोथायमिडिन असेही नाव आहे.

नाखु's picture

18 Apr 2016 - 9:32 am | नाखु

एका आय्डीला किती नावे असू शकतात?

चौरा काका अवांतराबद्दल क्षमस्व पण जेनेरीक आय्डींनाही हे धरोण असावे काय म्हणून शंका?

शंकायन नाखु

तुमचा प्रश्न कळला. यात धोका वगैरे काही नाही.हाथी कमिटीनी सुरुवातीला ७६ जेनेरिक औषधाची यादी जाहीर केलेली आता वाढली आहेत.दुकानात उदा० काउंटरवर "पॅरसिटमोल ५००मिग्याम मागितले तर पॅरसिटमोल असलेली आणि लिहिलेली कोणत्याही कंपनीची गोळी मिळते परंतू "क्रोसिन ५००मिग्राम चिठीशिवाय मिळणार नाही.चिठी असली की दुकानदार क्रोसिनच देईल ,जेनेरिक ड्रग पॅरसिटमोल असलेली दुसय्रा कंपनीची गोळी देऊ शकत नाही.टॅक्स लावून पावतीही देईल.

मी पुण्यातील एका प्रथितयश न्युरोलोजिस््ट कडून ट्रिटमेंट घेत आहे.माझी औषधहि आयुष्यभर चालणारी आहेत.पण डाॅनी त्यांना जेनरीक औषधांचा डोस कसा द्यायचा याची माहिती नसल्याच सांगितलय.

रॉजरमूर's picture

17 Apr 2016 - 11:22 pm | रॉजरमूर

बिनधास्त वापरा .
हे मी अनुभव घेतल्यानंतरच सांगतोय .
मधुमेहासाठी महागड्या गोळ्यांचे prescription लिहून दिले होते डॉक्टरांनी
पण अपेक्षित परिणाम साध्य होत नव्हता .
६ महिन्यानंतर जेनेरिक औषधे घ्यायला सुरुवात केली दोन ते अडीच महिन्यात फरक दिसला,
आता साखर नियंत्रणात आहे .
आता घरातील सर्व जण तसेच आमचे काही मित्र पण जेनेरिक औषध वापरतो अजूनपर्यंत कोणी मला काही फरक पडला नाही वगैरे अशी तक्रार केलेली नाही .
त्यामुळे सर्वप्रथम महाग ते चांगले किंवा सर्वोत्तम हे गृहीतक मनातून काढून टाका .

त्यात ब्रॅन्डेड औषधांचे निर्माते व वैद्यकीय व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने ते खुशीने जेनेरिक औषधांचे नाव पर्याय म्हणून लिहून देत नाहीत.

हे दुर्दैवाने खरय यात कुठलीही अतिशोयक्ती नाही.

जेनेरिक औषधे म्हणजे निदान अजून तरी कुटिरोद्योग बनलेला नाही घराघरात तयार व्हायला .
तेही प्रमाणितच असतात . वर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1mg app डाउनलोड करून घ्या मी ही तेच वापरतो . आपल्याला लिहून दिलेल्या औषधाचे नाव टाकले की समोर उपलब्ध औषधे त्यांच्या प्रमाणासहीत दिसतात त्यावर क्लिक केल्यास औषधाचे composition आणि किंमत दिसते . त्यावरून आपल्याला हवे असलेले पर्याय निवडायचे.
अर्थात शोध हा salt composition ने घ्यावा म्हणजे अचूक औषधांची लिस्ट आपल्यासमोर येते व पुन्हा एकदा आपल्याला दिलेल्या औषधाचे व जेनेरिक पर्यायाचे salt composition आणि प्रमाण पडताळून बघावे त्यामुळे डॉक्टर म्हणतात तसे character mistake झाल्यास अन्य औषध समोर येणार नाही .
त्यामुळे आपल्याला निवड करणे सुलभ होते आणि निरर्थक शंकेला जागाही रहात नाही .
अनेक नावाजलेल्या कंपन्या पण जेनेरिक औषधे बनवितात त्यामुळे पर्याय निवडताना शक्यतो याचाही विचार करा अगदीच Bottom Price घेण्याची गरज नाही तरीसुद्धा काही औषधात आपले ५० ते ७० % निश्चितच वाचू शकतात .

नाखु's picture

18 Apr 2016 - 9:34 am | नाखु

औषध विक्री केंद्रे कुठे आहेत, पिंची भागात ?

चौकटराजा's picture

18 Apr 2016 - 9:49 am | चौकटराजा

आकुर्डी विट्ठल मन्दिराजवळ एक दुकान नव्यानेच चालू झाले आहे. पण त्यांचे धोरण प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध नाही असे आहे. तरीही चौकशी करून पहा.

बाकी अवांतर असे की औषधांचा व मूळ उत्पाद्नन खर्च व विक्री किंमत यात फारच फरक असतो. संदर्भ म्हणून रोश विरूद्ध
अ‍ॅडम्स हे पुस्तक मिळाले तर वाचून पहावे. त्यात सरकारी माणसे व कंपन्या यांच्या साटेलोट्याची खरी हकिगत आहे.

रॉजरमूर's picture

18 Apr 2016 - 7:54 pm | रॉजरमूर

पिंपरी -चिंचवड भागातील प्रत्यक्ष माहिती नाही पण ह्या मेडिकल स्टोर्स यादीतील आपल्या जवळपासची स्टोर्स शोधून तिथे चौकशी करून बघा . अनेकदा हे retailars आपण मागितलेले औषध त्यांच्याकडे हजर नसलं तर दुसऱ्या दिवशी ते मागवून देतात हा अनुभव आहे.

नमकिन's picture

18 Apr 2016 - 10:26 am | नमकिन

https://m.youtube.com/watch?v=pg5IhqEa1rU
हा भाग याच विषयक्षेत्राचा होता. याच भागात कथित
राजू बालकाचा करुण अंत ही कहानी पाहुन मन हेलावून जाते. अजुन किती निष्पाप राजूंचा बळी घेणार आहोत?
एखाद्या उत्तम योजनेचा पाठपुरावा करण्याऐवजी ऊगीच प्रश्नचिन्ह लावून सामान्य जनतेला संभ्रमित करण्याचा खेळ तज्ञांनीच पुढाकार घेऊन बंद केला पाहिजे

गॅरी शोमन's picture

18 Apr 2016 - 10:43 am | गॅरी शोमन

मी आता ५० वर्षे उलटलेला आहे. माझ्या लहानपणी डॉक्टर कडे जाणे ही लक्झरी होती. मग घरात काही औषधे ठेवलेली असायची जी आजही बाजारात उपलब्ध आहेत.

आजार - सामान्य ताप (अ‍ॅलोपथी औषध पॅरासिटामॉल ) पर्याय - आयुर्वेदीक - त्रिभुवन किर्ती

या प्रकारची काही सामान्य पर्यायी औषधे सुध्दा अत्यंत गुणकारी असतात.

साधारण पोट बिघडणे - भुक न लागणे यावर मी रात्री झोपताना ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पितो तीन दिवसात पोट नॉर्मल होते.

कधी कधी भुक मंदावते यावर नक्स वोमीका म्हणुन अत्यंत गुणकारी होमीओपॅथी औषध आहे.

हे सर्व लिहीण्याचा उद्देश असा की खर्च कमी करणे हाच उद्देश असेल तर त्यावर अनेक पर्याय आहेत जे गुणकारी आहेत. यावर एक पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. लेखक श्री गर्दे यांचे धन्वंतरी तुमच्या घरी http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b29395&lang=marathi

हे पुस्तक उपयोगी आहे. तसेच " आपले आरोग्य आपल्या हातात" http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4887335419715090108 हे देवेंद्र वोरा यांचे पुस्तक मुळातच रोग का निर्माण होतात आणि अ‍ॅक्युप्रेशरने रोग कसे बरे करावे याबाबत उपयुक्त आहे.

याच पुस्तकातला सायटीका उपचार इतका चमत्कारीक आहे की तो केल्यास त्याचे निदान आणि उपचाराने काही तासातच आराम पडतो.

सस्नेह's picture

18 Apr 2016 - 11:36 am | सस्नेह

जेनेरिक औषधे ही फक्त अ‍ॅलोपॅथीचीच असतात का ? हल्ली आयुर्वेदिक औषधेपण खूपच महाग आहेत. यांनाही जेनेरिक असतील तर बरं होईल.
बाकी आयुष्यभर औषधे घेण्यापेक्षा आहार आणि आयुर्वेद यांच्या सहाय्याने दुखणी आटोक्यात ठेवता येतील.
माझा स्वत:चा अनुभव.
गेल्या वर्षी अपचन, डिसेंट्री इ. त्रास सतत ८-१० महिने होत होता. दहा तरी डॉक्टर झाले. सोनोग्राफी, कलोनोस्कोपी इ. सर्व टेस्टस केल्या. (खर्च एकूण रु. १००००/-) कुठेही दोष नाही. औषधे बदलून बदलून शिवाय इतकी हेवी डोस दिली की त्याचीच रिअ‍ॅक्शन येऊ लागली. होमिओपथीचा काही प्रमाणात फायदा झाला. पण दुखण्याचे मूळ कुणालाच सांगता येईना.
शेवटी मनानेच दिनचर्येचा अभ्यास करून एक निर्णय घेतला. पाण्याचे प्रमाण वाढवणे. पूर्वी मी रात्रीच्या जेवणानंतर बाथरुमला जावे लगते म्हणून पाणी कमी पीत असे. ते आता रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत किमान अर्धा लिटर पाणी आणि दिवसभरात किमान तीन लिटर पाणी असे सुरु केले आणि आश्चर्य म्हणजे दुखणे मुळासकट गायब ! सगळी औषधे आता बंद आहेत आणि पचन, पोट अगदी नॉर्मल झाले आहे.
दुसरा अनुभव असाच. चारेक वर्षापूर्वी दोन्हो कानांच्या आत खाज/आग होत असे आणि काही प्रमाणात पेन्स. ENT स्पेशालीस्ट २-३ झाले, औषधे ढीगभर झाली. कानाची तपासणी झाली. कान स्वच्छ, दोष काहीच नाही. पण दुखणे आहे तिथेच.
शेवटी आईने सल्ला दिला. झोपताना कानात चार थेंब एरंडेल तेल घालून बघ. तसे केल्यावर महिनाभरात कानाची खाज आग थांबली आणि तीनेक महिन्यांनी पेन्सही थांबल्या. पण अजूनही आठ-पंधरा दिवसातून एकदा तरी तेल घालते. नाही तर पुन्हा कानाची तक्रार सुरु होते.
असेच सायनसचे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात सायनस होतो आणि उन्हाळाभर राहतो. सर्दीच्या आणि अँटिबायोटिक्स टोपलीभर गोळ्या गिळूनही सर्दी आहे तशीच. एकदा काय मनात आलं, काय की, रोज एका लिंबाचा रस घ्यायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे आठ दिवसात सर्दी गायब.
म्हणून सल्ला असा, की जेनेरिक किंवा एकूणच औषधाने बरी न होणारी दुखणी या कसोटीवर लावून बघावीत.

सायनससाठी प्राणायाम आणि योगाची काही तंत्र जरुर शिकून घ्यावी.
रोजचा प्राणायाम करणे हा अनेक त्रासांवरचा एक रामबाण उपाय आहे.त्यासाठी कितीही बिझी असलो तरी वेळ काढणे आणि तज्ञ व्यक्तीकडून शिकून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सोनुली's picture

19 Apr 2016 - 12:38 am | सोनुली

प्राणायाम करण्याचे विविध प्रकार आहेत. अम्लपित्त असता किंवा उच्च रक्तदाब असता काही प्राणायाम मार्गदर्शन घेऊन करावे.

सुबोध खरे's picture

18 Apr 2016 - 12:47 pm | सुबोध खरे

साधा मुलगा यांनी म्हटल्याप्रमाणे "सूट्ट दूध म्हणजे जेनेरिक आणि गोकुळ, वारणा अथवा इतर कुठल्याही कंपनीचा ब्रँड असलेले म्हणजे ब्रँडेड."
हि अतिशय उत्तम तुलना आहे. आपल्या शेजारचा गवळी उत्तम भेसळ विरहीत दुध पुरवत असेल तर ते वारणा किंवा गोकुळच्या दुधापेक्षाही चांगले आणि स्वस्त असू शकते.
येथे प्रश्न येतो त्याच्या प्रमाणीकरणाचा( standardization). हे दुध "पाणी" घातलेले आहे कि "युरिया आणि डीटर्जंट" नेच तयार केलेले नकली दुध आहे हे ठरविण्याचे.
असाच प्रश्न औषधांचा आहे.
जेनेरिक औषधे हा सर्व महाग औषधावर चा अंतिम उपाय आहे असे काही जण कंठशोष करून सांगत असतात आणि डॉक्टर लोक कसे हरामखोर आहेत आणि त्यांना त्यातून "मलिदा" उपटायचा असतो असे उच्चरवाने सांगत असतात.
आपले फ्यामिली डॉक्टर जेंव्हा आपल्याला ब्रँडेड.औषधे लिहून देतात तेंव्हा त्याच्या गुणवत्ते बद्दल साधारणपणे त्यांना त्यात खात्री असते. आमच्या वडिलांना जेंव्हा केमिस्टने मधुमेहाची जेनेरिक औषधे देऊ केली जी ४८ रुपयाऐवजी १६ रुपयाला होती. ती औषधे पाहून मला त्याबद्दल खात्री वाटत नव्हती. यामुळे मी वडिलांना ती औषधे घेऊ नका असे सरळ सांगितले. कारण आठवड्याला ३२ रुपये किंवा वर्षाला १६०० रुपये वाचविण्यापेक्षा वडिलांची रक्तातील साखर नीट राहणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. हिच परिस्थिती इतर रुग्णांच्या बाबतीत कोणीही डॉक्टर करेल. औषध महाग असेना का पण गुणवत्तापूर्ण असले पाहिजे असेच कोणीही डॉक्टर म्हणेल कारण शेवटी रुग्णाच्या प्रकृतीची नैतिक जबाबदारी हि औषध कंपन्यांची किंवा केमिस्टची नसून डॉक्टरचीच असते.
आता हाच प्रश्न डॉक्टर आणि रुग्ण यात असतो. डॉक्टरला दर्जा बद्दल खात्री वाटत नसेल तर तो रुग्णाला कसा सांगणार कि हि औषधे घे. त्यातून त्याचा गुण आला नाही कि रुग्ण डॉक्टरवर खापर फोडायला तयार. यात डॉक्टरची दुविधा अशी असते कि आपले निदान चुकले कि रुग्णाने औषध बरोबर घेतले नाही कि औषध मुळातच कुचकामी होते? सर्दीपडशा बाबत गोष्ट वेगळी आहे. उच्च रक्तदाब एक आठवड्यात नियंत्रणात आला नाही आणि रुग्णाला पक्षाघाताचा झटका आला तर त्याची जबाबदारी कुणावर टाकणार? अशा बाबतीत डॉक्टर धोका कुणासाठी आणि का घेतील.
मी आजकाल काही डॉक्टर आपल्या प्रिस्क्रिप्शनवर तळटीप लिहिताना आढळतात कि लिहीन दिलेल्या औषध्धाव्यातिरिक्त दुसरे औषध घ्यायचे असेल तर रुग्णाने स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावे. त्याच्या गुणाबाबत डॉक्टर खात्री कशी देणार.
जर २५ % औषधे बनावट असतील तर प्रत्येक चौथ्या रुग्णाची जबाबदारी डॉक्टरने का घ्यावी?
http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...
बनावट औषधाच्या निर्मिती आणि व्यापाराला सदोष मनुष्यवधाचा कायदा सरसकट लागू करून त्याच्या वरील खटले जलदगती न्यायालयात चालवून निकाल दिले तरच हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो.
याचा अर्थ मुळीच असा नाही कि जेनेरिक औषधे वाईट आहेत. ब्रँडेड औषधांना येणारा विपणनाचा खर्च आणि ब्रँडची किंमत शेवटी ग्राहकांकडूनच वसूल केली जाते.उदा. डॉमिनोचा पिझ्झा पाचशे ते साडे सातशे रुपयाला येतो त्यात प्रत्यक्ष कच्चा माल ५० रुपयांपेक्षाही कमी असतो.
हि किंमत जेनेरीक औषधात नक्कीच वाचून सरसकट पणे औषधे ४० % किमतीत( किंवा कमी सुद्धा) मिळू शकतील.
आम्ही आमच्या दवाखान्यात रुग्णांना जी औषधे देतो ती जेनेरीकच असतात आणि ती आमच्या खात्रीची असतात. परन्तु केमिस्ट वर सरसकट विश्वास ठेवणे कठीण आहे. (याची कारणे काय आहेत यासाठी वेगळे असे बरेच धागे काढावे लागतील)
शिवाय हे ग्राहकांना खरंच हवं आहे का हा हि एक प्रश्न आहे. दहा वर्षापूर्वी मी स्वतः हा प्रयत्न केला होता कि ल्युपिन रेड्डी अशा प्रथितयश कंपन्यांचीच जेनेरिक औषधे विकत घेऊन रुग्णांना देत होतो. उदा रोक्सिथ्रो हे औषध रैनबैकसी या कंपनीचे ७२ रुपयाला १० गोळ्या होत्या तेच त्या कंपनीचेच जेनेरिक औषध ३९ रुपयांना होते. हे औषध रुग्णांना याच किमतीला दिले असतान रुग्णांना वाटे कि यात डॉक्टरचा काही तरी नफा आहे. रुग्ण ७२ रुपये देऊन रोक्सिथ्रो हे औषध केमिस्ट कडून घेणे पसंत करीत. या अनुभवानंतर असलेली औषधे रुग्णांना देऊन त्यांना लिहून देणे पसंत करीत आहोत.
जेनेरीक औषधे ज्या ठिकाणी उत्पादित केली जातात तेथे अतिशय काटेकोर असे दर्जाचे निकष पाळले जातात का हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. कुणीही उठावे. चार पैसे चारून सरकारकडून परवाना मिळवावा. घाऊक प्रमाणात औषधे विकत घेऊन यंत्राद्वारे औषध निर्मिती करावी आणि बाजारात विकावी हि आजची परिस्थिती आहे. मग हे औषध प्रमाणित दर्जाचे आहे का? याची तपासणी करण्याची आपल्या सरकारकडे पुरेशी यंत्रणाच नाही अशा परिस्थितीत सगळा दोष डॉक्टरांनी का घ्यावा. सगळेच डॉक्टर धुतल्या तांदूळासारखे आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही.
Regulatory issues
The regulatory agency, Office of Drug Controller General of India, admits it is ill-equipped to handle the extent of vigilance required to comb a vast country with just 35 drug inspectors at the central level and 1,100 in the states. The All India Drugs Control Officers’ Confederation (AIDCOC), a representative body of drug inspectors, estimates that India needs at least 4,500 additional drug inspectors to monitor 15,000 drug manufacturing units and more than half a million retail outlets. The drug control regime is “crippled,” says Ravi Uday Bhaskar, AIDCOC secretary general. “There is inadequate manpower, infrastructure and auxiliary staff. This issue of upgradation has been in a limbo for 25 years now,” he says, but bristles at the notion that drug inspectors, sometimes suspected of being part of the problem, are also to blame for the spread of counterfeit drugs.
http://www.livemint.com/Companies/DKFwlkzPv02MPyiZxUGqDN/Fake-drug-indus...
हा दुवा मुळापासून वाचा.
सगळेच डॉक्टर धुतल्या तांदूळासारखे आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही.डॉक्टर कम्पन्याकडून या ना त्या स्वरुपात काही तरी घेतात आणि मग त्यांची औषधे जास्त लिहून देतात हीही वस्तुस्थिती आहे. परंतु हीच परिस्थिती उद्या जेनेरीक औषधात होणार नाही असे मुळीच म्हणता येणार नाही. आजही केमिस्ट जर "मूळ" औषधाचे नाव लिहून दिले असता त्याला ज्यात सर्वात जास्त नफा मिळेल तेच औषध रुग्णाला सरसकट देतात हा माझा गेल्या १० वर्षाचा अनुभव आहे. यामुळे आम्ही सिप्ला किंवा एफ डी सी ( इलेकट्राल) या कंपन्यांची औषधे लिहून देण्याची काळजी घेतो.
"आमची" औषधे लिहून द्या असे सांगणारे बरेच औषध कंपन्यांचे विक्रेते आम्हाला "गळाला" लावण्याचा प्रयत्न करीत असतात. हेहि नमूद करू इच्छितो. जसे बहुसंख्य अर्थसल्लागार, विमा विक्रेते, दुकानदार ग्राहकांच्या फायद्यापेक्षा "त्यांच्या स्वतःच्या" फायद्याची उत्पादनेच विकताना आढळतात तशीच हि परिस्थिती आहे.
अर्थव्यवस्थेच्या बाजारीकरणाचे हे दुष्परिणाम आहेतच. परंतु कम्युनिस्ट देशात( रशिया किंवा चीन) सरकारी कंपन्या औषध निर्मिती करीत असताना कुणाचाच नफा नसल्याने औषधांची टंचाई, भिकार/ सदोष गुणवत्ता यांची तेथे बजबजपुरी होती आणि या कम्युनिस्ट देशांमध्ये( क्युबाचा अपवाद वगळता) आरोग्य विभागांची स्थिती दयनीयच होती .

चौकटराजा's picture

18 Apr 2016 - 2:04 pm | चौकटराजा

कोणतेही डॉ आजच्या काळात पद्धतशीर पणे आपण दिलेले औषध व त्याचा झालेला उपयोग याची पद्धतशीर माहिती साठवून एखाद्या कंपनीचे औषध रुग्णासाठी निवडतात असे वाटत नाही तर कंपनीच्या लोकानी पुढे ठेवलेल्या रिपोर्ट वरून ते औषध ठरवत असावेत किवा आय एस आय सारख्य्या त्रयस्थाकडुन शिफारस घेत असतील अशी आय एस आय वा क्रिसिलिसारखी संस्था औषध क्षेत्रात आहे किं वा कसे ?

सुबोध खरे's picture

18 Apr 2016 - 8:26 pm | सुबोध खरे

एम बी बी एस च्या अभ्यासक्रमात औषध शास्त्र ( pharmacology) हा विषय दीड वर्षे "४०० गुणांसाठी" अभ्यासाला असतो त्यात उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची इत्यंभूत माहिती शिकाऊ डॉक्टरने करून घ्यायची असते. यानंतर एखादा नवीनच औषधाचा वर्ग संशोधित झाला तर त्याची माहिती बर्याचशा वैद्यकीय नियतकालिकात येत असतेच. त्यामुळे कंपनीचे प्रतिनिधी येतात तेंव्हा त्यांना फक्त या औषधात कोणकोणती औषधे आहेत एवढे विचारले तर त्याचा उपयोग कसा करायचा सहज समजून येते. उदा आपल्या मोबाइल मध्ये RAM किती प्रोसेसरचा वेग किती आणी त्याची साठवण क्षमता किती हे वाचले तरीही आपल्याला मोबाईलची लायकी काय ते समजून येते असाच हा प्रकार आहे. एकाच क्षमतेच मिडिया टेकच्या प्रोसेसर पेक्षा क्वालकॉमचा प्रोसेसर जास्त वेगाने चालतो हे त्यात माझ्या सारख्या अल्प ज्ञान असलेल्या व्यक्तीलाहि चांगले माहित असते.
तेंव्हा आपण जे म्हणत आहात "कोणतेही डॉ आजच्या काळात पद्धतशीर पणे आपण दिलेले औषध व त्याचा झालेला उपयोग याची पद्धतशीर माहिती साठवून एखाद्या कंपनीचे औषध रुग्णासाठी निवडतात असे वाटत नाही तर कंपनीच्या लोकानी पुढे ठेवलेल्या रिपोर्ट वरून ते औषध ठरवत असावेत" हे पूर्णपणे चुकीचे आहे." निदान मी पाहिलेले सर्वच चांगले डॉक्टर औषधाच्या बाटलीवर त्याचे घटक कायाहेत ते व्यवस्थित पाहून घेतात. हि माहिती कतरीसराय बिहार येथून बी एस सी पास झालेल्या कंपनीच्या माणसाच्या महितीवर कोणीही डॉक्टर अवलंबून राहत नाही हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. झोला छाप डॉक्टर बद्दल काय बोलणार?

चौकटराजा's picture

18 Apr 2016 - 9:04 pm | चौकटराजा

खरे तर माझ्या सारखा पेशंट देखील आजकाल ब्रॅन्डेड औषधा च्या नावाबरोबर कॅल्शियम॑ चानल ब्लोकर, सल्फोनील युरिया , बायग्वायनाईड, ए सी इ एनहिबीटर ,डाय युरेटिक, वाईड स्पेक्ट्रम अन्टीबायोटिक, व्ह्स्स्को डायलेटर ,अशा संज्ञाचा अर्थ समजून घेऊन औषध घेतो. तेंव्हा डॉक्ट्र हे जेनेरिक नावाविषयी त्याच्या साईड इफेक्टविषयी नियतकालिकातून वाचत असणार याबद्द्ल शंका नाहीच. शंका अशी आहे ही अ कंपनीचे औषध हे जास्त परिणामकारक ठरले वा ब कंपनीचे औषध मी रूग्णाला बंद केले अशी काही आकडेवारी डोक्टर प्रयोगाअन्ती ठेवत नसावेत असा माझा अंदाज आहे. मेटफोर्मिन हे साखर नियंत्रित करते यात शंका नाहीच ते अ कंपनीचे ऊच्च व फ कम्पन्चीचे दुय्यम हे कसे ठरविले जाते असा माझा सवाल आहे. पूर्वी आपल्याकडे ए ग्रेड रेस्टारंट व बी ग्रेड रेस्टारन्ट असे किवा शेअर बाजारात अ वर्गीय कम्पन्या ब वर्गीय कम्पन्या असे काही ग्रेडेशन औषध कंपन्याच्या बाबतीत प्रसारित होते काय ?

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 10:03 am | सुबोध खरे

राजा साहेब
औषधे प्रमाणित असण्यासाठी त्यांचे मानदंड आखून दिलेले आहेत. आपलेच उदाहरण म्हणजे मेटफॉरमिन हे द्रव्य. कसे आणि किती शुद्ध असावे हे IP (Indian Pharmacopoea) या औषधाचे मानक असणारी सूची प्रमाणे असायला हवे. https://en.wikipedia.org/wiki/Indian_Pharmacopoeia_Commission
किंवा BP (ब्रिटीश फार्माकोपिया)/ USP(यु एस फार्माकोपिया) या मानक पुस्तकांप्रमाणे असावे लागते. या पुस्तकांमध्ये त्यात असणारे मेटफॉरमिन कमीत कमी किती टक्के( उदा ९९.९४%) क्लोराईड (जास्तीत जास्त) किती, सोडियम किती, राख किती ई सर्व स्पष्टपणे लिहिलेले असते. हे मेटफोर्मीन आपल्याला बाजारात घाऊक मध्ये मिळू शकते.एकदा हे द्रव्य वरील मानकाप्रमाणे असले कि त्याची गोळी बनवल्यावर त्यात ५०० मि ग्राम मेटफोर्मिन शिवाय LACTOSE किती इतर द्रव्ये किती हे सर्व याच मानकात लिहिलेले असते. आपण त्या फार्माकोपियामध्ये TABLET METFORMIN IP. असे पाहू शकता. आता हि सर्व औषधे प्रमाणित आहेत यात एका कंपनीचे चांगले आणी दुसर्या कंपनीचे वाईट असा प्रश्न येत नाही जोवर त्या कंपन्या वरील मानकाप्रमाणेच औषधे निर्मिती करीत आहेत. पण मुळात हे औषध एखाद्या जैन फार्म ने बनविले आहे कि सिप्ला ने. यात फरक असा येतो कि जैन फार्मा कंपनी जुनी औषध निर्मिती यंत्रे जुन्या बाजारात विकत घेतात ती एखाद्या टीनपाट औद्योगिक वसाहतीत उभारली जातात. तेथे निर्जंतुकच काय पण धूळ आणी धूर भरलेल्या वातावरणात त्याची निर्मिती होते. त्याला आकर्षक वेष्टन लावून जेनेरिक म्हणून विकले जाते. हि सर्व प्रक्रिया चार पैसे चारून सरकार दरबारी "सुरळीत" करून घेतली जाते. म्हणून अशा कंपन्यांच्या बाटलीत झुरळ मिळाले किंवा डोळ्याच्या ड्रोप मध्ये मुंग्या सापडल्या सारख्या तक्रारी येतात उद्या समजा माझ्या सारख्या डॉक्टरने तक्रार केली आणी एखाद्या प्रामाणिक सरकारी अधिकार्याने हि कंपनी सील केली तर पुढचे दार जैन फार्म म्हणून सील असते आणी मागील दाराने "वर्धमान" फार्म म्हणून काम बिनबोभाटपणे चालू असते. जोवर यावर नियंत्रण येत नाही तोवर माझ्यासारखे डॉक्टर जेनेरिक औषधाबाबत साशंकच राहणार.
मोठ्या कंपन्या आपल्या किर्तीबद्दल अत्यंत जागरूक असतात त्यामुळे ते असल्या धंद्यात "सहसा" पडत नाहीत. त्यामुळे त्यावर जास्त भरोसा ठेवता येतो. अमूलच्या दुध बद्दल जशी खात्री वाटते तशी यशोदा किंवा तत्सम डेअरी बद्दल वाटत नाही असाच हा प्रकार आहे. ते दुध चांगले असेलही. कदाचित अमुल्पेक्षा जास्त चांगले असू शकेल पण त्याच्या प्रमाणीकरणाबद्दल शंका राहते.

असंका's picture

19 Apr 2016 - 1:48 pm | असंका

... धन्यवाद या सगळ्या इन्साइटबद्दल..!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Apr 2016 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

+ १००० %

यामुळेच तत्वतः जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधांच्या परिणामकतेत फरक असू नये असे अपेक्षित असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात, औषधांच्या निर्मिती आणि / अथवा वितरण यांच्यावर देखरेख करणार्‍या व्यवस्थेबद्दल संशय घेण्याजोगी परिस्थिती असल्यानेच केवळ, जेनेरिक औषधांच्या नावाखाली रुग्णाच्या हातात नक्की काय (खरे/खोटे औषध किंवा आवरणावर लिहिल्याप्रमाणे योग्य/अयोग्य मात्रा) मिळेल हे खात्रीने सांगता येणार नाही.

सद्याची ही दुरावस्था दूर केली गेली तरच जेनेरिक औषधे रुग्णांना वरदान ठरतील, तोपर्यंत तो एक स्वस्त पण खात्री नसलेला उपाय असल्याची शंका कायमच राहील. :(

प्रसाद भागवत's picture

19 Apr 2016 - 8:41 pm | प्रसाद भागवत

डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ, अजया, सुबोध खरे साहेब .आपनंआ सर्वांचेच आभार. अतिशय अभ्यासपुर्ण प्रतिसादानी धाग्याची पातळी उंचीवर नेल्याकरिता...

चर्चेदरम्यान औषधांची गुणवत्ता (जैन, वर्धमान ई.) हा मुद्दा पाहुन मला अलिकडॅच अमेरिकन औषध प्रशासनाने आपल्या बहुतेक सर्वच नामांकित कंपन्यांना बजावलेल्या नोटिसा आणि त्यातील आक्षेप याकडॅ आपले लक्ष वेधावयाचे आहे. (डॉ. रेड्डीज ला पाठविलेली नोटीस मी स्वतः वाचली आहे.) त्यातील दाखविलेल्या त्रुटी अतिशय गंभीर स्वरुपाच्या आहेत. ही जर वस्तुस्थिती असेलच तर मग त्यांच्यात आणि 'मुंबई मार्केट' अऔषधांत फरक तो काय ??

प्रसाद भागवत's picture

19 Apr 2016 - 8:42 pm | प्रसाद भागवत

डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ, अजया, सुबोध खरे साहेब .आपनंआ सर्वांचेच आभार. अतिशय अभ्यासपुर्ण प्रतिसादानी धाग्याची पातळी उंचीवर नेल्याकरिता...

चर्चेदरम्यान औषधांची गुणवत्ता (जैन, वर्धमान ई.) हा मुद्दा पाहुन मला अलिकडॅच अमेरिकन औषध प्रशासनाने आपल्या बहुतेक सर्वच नामांकित कंपन्यांना बजावलेल्या नोटिसा आणि त्यातील आक्षेप याकडॅ आपले लक्ष वेधावयाचे आहे. (डॉ. रेड्डीज ला पाठविलेली नोटीस मी स्वतः वाचली आहे.) त्यातील दाखविलेल्या त्रुटी अतिशय गंभीर स्वरुपाच्या आहेत. ही जर वस्तुस्थिती असेलच तर मग त्यांच्यात आणि 'मुंबई मार्केट' अऔषधांत फरक तो काय ??

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 8:56 pm | सुबोध खरे

http://www.raps.org/Regulatory-Focus/News/2015/11/09/23562/FDA-Form-483s...
भागवत साहेब
हा एक दुवा वाचून घ्या. हि सर्व आपल्याकडे "चलता है" या दृष्टीकोनातून येणारी मनोवृत्तीचा परिणाम आहे.
मी या सर्व कंपन्यांचे "फोर्म ४८३" बद्दलचे रिपोर्ट वाचत असतो. काहींच्या बाबतीत हे गंभीर आहेत उदा RANBAXY. आणी इतरांच्या बाबतीत ते सहज सुधारण्य़ासारखे आहेत. ते पाहूनच मी या कंपन्यांचे समभाग घ्यायचे कि नाही हे ठरवतो.

प्रसाद भागवत's picture

19 Apr 2016 - 9:31 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद डॉ.साहेब.... मग एकुणात फार्मा सेक्टर फंडात पैसे लावावे की नाही??..असो . विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.

आयुर्वेदीक औषधे जेनरीक आहेत ना त्याला काष्ठाऔषधे असे म्हणतात. या साठी वैद्य अप्पाशास्त्री साठे यांचे काष्ठाऔषधे हे पुस्तक पहावे ज्यात रोग आणि आयुर्वेदीक औषधे जी स्वतः बनवता येतील याबाबत लिहले आहे.

ही औषधे बनवणे जरा वेळ खर्च करणारे आहे पण गुणाला ही औषधे कुठेही कमी नाहीत.

भस्म किंवा आसवे ह्या सारखी औषधे घरी बनवता येत नाहीत पण चुर्ण किंवा काढे घरी बनवता येतात.

अर्थात भस्म, आसवे ही रसायने स्वरुपातली औषधे फारच गुणकारी असतात. अशी गरज नसल्यास अनेक औषधे घरी बनविता येतात.

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2016 - 9:54 pm | आनंदी गोपाळ

काष्ठौषधी व भस्म, आसव इ. मधील फरक अजिब्बात ठाउक नसताना आपण आयुर्वेदाबद्दल भाष्य करीत आहात, असे नोंदवितो.

मी ४ "आयुर्वेदिक" पुस्तकं मंडईच्या बाजूला पार्किंगलॉट समोर रद्दीचं दुकान आहे, तिथं विकत घेतली, अन वाचलीत. पैकी ३ फारच प्राचीन दिसणारी होती, असं केलं, म्हणजे माझा आयुर्वेदाचा "अभ्यास" झाला असं होत नाही.

असो.

(गुड क्वालिटी) जनरिक वि. (गुड क्वालिटी, व मिनिमम किंमतवाल्या, पण तरीही तुलनेने महाग) ब्रँडेडबद्दल थोडं अधिक थोड्यावेळाने लिहितो. थोडा वेगळा कन्सेप्ट आहे.

अजया's picture

18 Apr 2016 - 9:59 pm | अजया

:)

उत्तरे लिहिण्यात अर्थ नाही. ;)

आजही केमिस्ट जर "मूळ" औषधाचे नाव लिहून दिले असता त्याला ज्यात सर्वात जास्त नफा मिळेल तेच औषध रुग्णाला सरसकट देतात हा माझा गेल्या १० वर्षाचा अनुभव आहे.

हे आवडले. आपण अजूनही (गेली दहा वर्षे) प्रिस्क्राईब करता हे वाचून बरे वाटले.

***

तर, जनरिक व एकंदरितच औषधांबाबत.

दवाखान्यात गेल्यावर, समोर काउंटरवर बसलेला जो/जी असते त्या/तिला बहुतेक लोक, 'रिसेप्शनिस्ट' न म्हणता 'कंपाउंडर' असे म्हणतात. याचं खरं कारण म्हणजे पूर्वी (म्हणजे ४०एक वर्षांपूर्वी) डॉक्टर जे औषध लिहून देत, त्या औषधाला 'कंपाउंड' करून, म्हणजेच बनवून, ते 'डिस्पेन्स' करण्याचे काम हा कंपाउंडर नामक प्राणी करीत असे.

म्हणजे उदा. खोकल्याचे औषध Mist. Expectorant 30ml TDS असे मी "लिहून" दिले, तर पेशंटने आणलेल्या (बहुतेकदा दारूच्या) बाटलीत ते औषध बनवून भरून देऊन (यातला बहुतेकदा मह्त्वाचा घटक liquorice liquid extract उर्फ ज्येष्ठमधाचा अर्क असे) त्या बाटलीला षट्कोनी कागदी "डोस लेबल" चिकटवून, हा एक डोस दिवसातून तीन वेळा घ्या, असे सांगत पेशंटच्या हातात देत असे.

ही खरी जनरिक औषधे असत, व बहुतेकदा, या औषधांचेच पैसे डॉक्टर घेत असत. "कन्सल्टींग" (इन्सल्टिंग) फी नामक परकार अस्तित्वात नसे. वैद्यकिय सल्ला फुकटच अस्तो असेच गृहितक असे.

इथून मॉडर्न मेडिसीन जसे पुढे येत गेले, तशी औषधे अधिकाधिक "काँप्लेक्स" बनत गेली, अधिकाधिक किचकट आजारांवर उपचार करता येऊ लागले, व "कंपाऊंडिंग" क्लिष्ट झाल्याने, फार्मा कंपन्या उदयास येवू लागल्या.

मला एक मॉडर्न मेडिसीनचा डॉक्टर म्हणून नेहेमीच मी "लिहितो" त्या औषधाच्या "फार्‍म्याकॉलॉजी"बद्दल ज्ञान असणे आवश्यक असते. हे ज्ञान म्हणजे, उदा. मी किती मिलिग्राम शुद्ध प्यारॅसिटामॉल खाल्ले, तर किती माझ्या आतड्यांतून शोषले जाणे अभिप्रेत आहे, पैकी सध्याचा ताप उतरण्यासाठी या सुमारे ४५ किलो वजनाच्या स्त्री जातीच्या मनुष्यास किती मिलिग्राम पॅरॅसिटामॉल आवश्यक असेल, याशिवाय, या व्यक्तीस पूर्वीपासून असलेल्या "पित्तप्रकृतीमुळे" (अ‍ॅसिड पेप्टिक डिसीज) किती अ‍ॅसिडिटि होईल व त्यासाठी मी सोबत कोणते औषध किती कसे वै. द्यायला हवे, सोबत तिच्या किडन्या डायबेटीसमुळे ड्यामेज आहेत, वा दारू पिऊन लिवर खराब आहे, की इतर काही असेल तर मग त्या ५०० मिलिग्राम प्यारासिटामॉल गोळीचा निचरा शरीरातून होताना, तिची/त्याची अन पर्यायाने माझ्या पेशंटची काय वाट लागू शकेल याचे ज्ञान असणे अभिप्रेत आहे.

हे ज्ञान मी माझ्याकडे येणार्‍या "एम. आर." अर्थात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (मेंटली रिटार्डेड नव्हे. हे लोक त्यांच्या "मार्केटिंग"वाल्यांनी "सांगितलेली" "डीटेलींग" करत असतात. सपोजेडली भारी मार्केटींग स्किल वाली ही मुलं कीव यावी अशी 'आमची "अ‍ॅक्टीविटी" आहे' म्हणत लाच द्यायचा प्रयत्न करीत असतात. दया येते. वेगळा विषय..) कडून मिळवणे अभिप्रेत नाही.

*मुद्दा क्र. १*

हे ज्ञान मला अ‍ॅज अ मेडिकल प्रॅक्टिशनर, (मी एम्बीबीएस पास झाल्यानंतर सुमारे साडेतीन चार-शे तरी नवी औषधे 'उत्पन्न' झाली असावीत. मला 'शाळेत' शिकवल्यानंतरचे ज्ञान,) माझ्या देशाच्या एफ.डी.ए. उर्फ फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅथॉरिटीने बुलेटीन पाठवून देणे अभिप्रेत आहे.

हे आजपर्यंत फक्त आणि फक्त मेडीकल फ्रॅटर्निटी आपल्या कॉन्फरन्सेसद्वारे एकमेकांना सांगतात. ही जबाबदारी फार्मा कंपन्यांचीही नाही. ही फक्त व फक्त एफडीएची आहे.

आ़अपर्यंत निभावली गेलेली नाही.
***

पुढे, पुढच्या प्रतिसादात.

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 11:11 pm | तर्राट जोकर

जबरदस्त प्रतिसाद, आ.गो.साहेब.

अत्रन्गि पाउस's picture

19 Apr 2016 - 11:40 am | अत्रन्गि पाउस

+1

अन्या दातार's picture

20 Apr 2016 - 1:55 pm | अन्या दातार

दवाखान्यात गेल्यावर, समोर काउंटरवर बसलेला जो/जी असते त्या/तिला बहुतेक लोक, 'रिसेप्शनिस्ट' न म्हणता 'कंपाउंडर' असे म्हणतात. याचं खरं कारण म्हणजे पूर्वी (म्हणजे ४०एक वर्षांपूर्वी) डॉक्टर जे औषध लिहून देत, त्या औषधाला 'कंपाउंड' करून, म्हणजेच बनवून, ते 'डिस्पेन्स' करण्याचे काम हा कंपाउंडर नामक प्राणी करीत असे.

मला लहानपणापासून आत्ता हे वाचेपर्यंत असे वाटत होते की कम्पाऊंडर नामक मनुक्ष डॉक्टरची रुम व पेशंट एरियाच्या मधोमध (कम्पाऊंडवर) बसतो म्हणून त्याला कम्पाऊंडर म्हणतात. =)) =)) =))

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2016 - 11:20 pm | आनंदी गोपाळ

बिकासूल नावाची फैजर कंपनीची क्याप्सूल सुमारे २६ रुप्यांना २० गोळ्या या भावात उपलब्ध आहे. सुमारे सव्वा रुपयाना एक क्यापसूल.

याच प्रकारच्या गोळ्या, हीच कंटेंट वाल्या, ६-७ रुपयांना १ या भावात मिळतात.

फैजर ही एक अत्यंत रेप्युटेड ब्रँडेड कंपनी आहे.

किंवा रोश ही रेप्युटेड कंपनी अ जीवनसत्वांची गोळी ९ रुपयांना १० या भावात विकते.

ही उदाहरणे यासाठी घेतलीत, कारण व्हिटॅमिन्सचा बाजार महागडा व सर्वाधिक नफा देणारा आहे.

तर.

हे असे का होते?

आता, बिकासुल खाऊन पाहिली तर लक्षात येईल, की या गोळीला एक उग्र वास आहे. हिची चव घाणेरडी आहे. हिच्यात जिलेटिन वापरलेले आहे. ही खाल्यानंतर योग्य मात्रेत व्हिटॅमिन्स तर मिळतात, पण बराच वेळ करपट ढेकर येतात.

मला ढेकर यायला नकोत. रिसर्च प्लस इम्प्लिमेंटेशन = १ रुपया.
मला उग्र वास नको. पुन्हा तेच. १ रुपया.
मला गोड चव हवी. पुन्हा...
मला जिलेटिन नको. मी "शुद्ध शाकाहारी" आहे ;) रिसर्च प्लस इम्प्लिमेंटेशन = २ रुपये.
जनरिक विरुद्ध ब्रँडेडची किंमत वाढली का भाऊ?

***

लाईफसेव्हिंग अ‍ॅस्पिरिनची गोळी २ पैशात मिळते. त्याने अ‍ॅसिडिटी होते. पोटात रक्तस्त्राव होऊ शकतो.

मग जठराऐवजी आतड्यात गेल्यानंतरच वितळेल अशी गोळी बनवण्याची रिसर्च प्लस टेक्नॉलीजी खर्च = ६ रुपयांना एक गोळी...

जनरिक विरुद्ध ब्रँडेडची किंमत वाढली का भाऊ?

***

इथे सरकारी हस्तक्षेप कामी येतो.

अमुक औषध "लाईफसेव्हींग" डिक्लेअर करून सरकार या कंपन्यांना ते औषध स्वस्तात विकायला भाग पाडू शकते. त्या मोबदल्यात कंपनीस इतर औषधांत नफा कमवायची मुभा द्यावीच लागते.

हे केले नाही, तर कंपनी तुमचे भले करण्याकरता चालवणारे देवदूत जन्माला आलेले नाहीत. जे आहेत, ते सैतानदूत ते औषध बनवणे बंद करतात. उदा. डेक्सामिथासोन सोबत प्रतिजैविक काँबो असणारे आयड्रॉप १० रुपयांत मिळतात. हेच प्रेडनिसोलोन काँबो केले, की ४० अन लोटेप्रेडनॉल कॉम्बो केले की ११० रुपयांत ५ मिलि मिळतात.

आजकाल, बर्‍या कंपनीचे चाम्गले काँबो मिळवणे कठीण आहे.

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2016 - 11:44 pm | आनंदी गोपाळ

याव्यतिरिक्त किम्मत वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे औषधासोबत वापरलेले प्रिझर्वेटिव.

अनेकदा प्रिझर्वेटिवमुळे साईड इफेक्ट येतात. ते येवू नयेत म्हणून वापरलेले पर्याय अत्यंत महाग असतात.

काही औषधे, उदा. झायलोकेन व झायलोकार्ड. पैकी "कार्ड" वालं १० पट महाग आहे, कारण त्याचं शेल्फ लाइफ १ दशांश पेक्षा कमी आहे. एक्सपायर औषधे कंपनीला परत जातात.= गळ्यात पडतात. हे पैसे कोण व कुठून काढणार?

अजूनही या क्षणी न आठवणारी कारणे/मुद्दे असावेत. आठवलेत तर लिहीन.

साधा मुलगा's picture

18 Apr 2016 - 11:47 pm | साधा मुलगा

अश्याच आशयाचे पुढे लिहिणार होतो आपण माझे श्रम वाचवलेत या बाबत आभार.
पण तुम्ही दिलेली उदाहरणे जेनेरिक vs branded अशी न होता जेनेरिक आणि sustained release , modified release अथवा enteric coated वगैरेची उदाहरणे आहेत, ज्यामध्ये कंपन्या आपल्याकडे काहीतरी वेगळे आहे किंवा उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा आपला ब्रांड चांगला आहे दाखवण्यासाठी केलेली सोय आहे. ज्यात कधी कधी खरोखरीच फायदा होता पण कधीतरी उगाच बनवल्यासारखे वाटते. NLEM च्या अंतर्गत बर्याच drug molecule आणि combination यांना price कंट्रोल मध्ये आणले होते.

रुस्तम's picture

19 Apr 2016 - 1:51 pm | रुस्तम

sustained release , modified release अथवा enteric coated आता हे काय नवीन.

हे जर इस्कटून सांगाल का?

आनंदी गोपाळ's picture

19 Apr 2016 - 10:58 pm | आनंदी गोपाळ

सस्टेन्ड रिलिज म्हणजे तुम्ही एकदा गोळी घेतलीत तर नॉर्मली सगळे औषध तात्काळ पचनमार्गातून रक्तात शोषले जाते. ते बहुतेकदा ४-६ तासांत वापरले व नष्ट केले जाते. यामुळे दिवसातून ४ वेळा ती गोळी घ्यावी लागते. याऐवजी, त्यातले घटक पदार्थ, एकदम तुमच्या आतड्यात शोषले न जाता, हळू हळू विरघळणार्‍या 'ग्रॅन्युल्स'मधे बांधून घालत, पुढले २४तास रक्तात मिसळले जातील अशी व्य्वस्था केली, तर त्याला 'सस्टेन्ड' रिलीज असे म्हणतात.

मॉडिफाईड रिलीज म्हणजे वर लिहिलंय तसं. तोंडाचा "पीएच" थोडा अल्कलाईन असतो. जठर अ‍ॅसिडिक. आतडी परत अल्कलाईन.

यानुसार अ‍ॅसिडिटी वाढवणारी औषधे फक्त अल्कलाईन वातावरणात, अर्थात आतड्यांतच विरघळतील. याला म्हणायचं 'एंटेरिक' कोटेड. अर्थात आतड्यात वितळेल असे कोटिंग असलेली गोळी.

किंवा जिभेखाली वितळून डायरेक्ट गालफडातल्या तंबाखूतून निकोटिन कसं रक्तात भिनतं? तशी भिनणारी औषधे, याला म्हणायचं मॉडीफाईड रिलीज.

रुस्तम's picture

19 Apr 2016 - 11:27 pm | रुस्तम

धन्यवाद डॉ साहेब

आनंदी गोपाळ's picture

19 Apr 2016 - 10:51 pm | आनंदी गोपाळ

पण तुम्ही दिलेली उदाहरणे जेनेरिक vs branded अशी न होता जेनेरिक आणि sustained release , modified release अथवा enteric coated वगैरेची उदाहरणे आहेत,

रोश ची व्हिटॅमिन ए, पूर्वी अरूविट अश्या ट्रेडनेमने मिळत असे. आजकाल जनरिक विटॅमिन ए नावाने मिळते, पण गोळी तीच, छान कॅडबरी जेम्स चवीची, चघळून खायची, व लहान मुलांना आवडेल अशी असते. हे 'खरे' जनरिक ब्रँडचे उदाहरण आहे.

कंपन्या पळवाट काढतातच. (देवदूत आजकाल जन्माला येत नाहीत. बिझिनेसमनच जन्मतात, व धंदा करता येणे हा सद्गुण समजला जातो. नैका?)

कोणत्याही औषधासोबत डेक्सामिथासोन कॉम्बो केलं की ते किंमत कंट्रोलमधे जातं म्हणून त्याला बीएके फ्री, अर्थात वेगळे प्रिझर्वेटिव वापरून ९९ रुपयांत विकतात.

साधा मुलगा's picture

18 Apr 2016 - 11:26 pm | साधा मुलगा

@ डॉ. म्हात्रे उत्तम शास्त्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत सांगितली आहेत !
@ डॉ. अजया

मी कोणतीही भेटवस्तू/ स्किम कोणत्याही मेडिकल कंपनीकडून न घेणारी माझ्या एरिआतली बर्यापैकी यशस्वी डाॅक्टर आहे.असली प्रलोभने मोठ्या कंपन्यांपेक्षा स्वस्त औषधवाल्या कंपन्या दाखवतात हा अनुभव आहे.माझ्या दोनशे स्ट्रिप विका आणि सोन्याचे नाणे घ्या असे सांगत आलेल्याला नुकतंच लेक्चर देऊन हाकललंय!या प्रलोभनांना बळी पडणारे जास्त करुन इतर पॅथी जिपी असतात असे खेदाने आणि अठरा वर्ष निरीक्षणाच्या जोरावर लिहित आहे!

आपल्याला अनुमोदन आणि आपले अभिनंदनही ! असे डॉ. मिळणे कठीण आहे.
@ डॉ. खरे
आपला प्रतिसाद नेहमी प्रमाणे मुद्देसूद आणि माहितीपूर्ण , आपला अनुभव नमूद करण्यासारखा आहे.
@ रॉजर मूर साहेब
कृपा करून स्वताहून असले चाळे करू नका. नीट डॉ. कडून माहिती घेऊन मगच काय तो brand बदला.
तसेच एखादा माहिती नसलेला brand तुम्ही chemist ला सांगितला आणि चुकीने/ अनावधानाने त्याने दुसराच brand दिला ज्यात पूर्णपणे वेगळे औषध आहे तर मात्र हे धोक्याचे आहे.
बर्याच वेळी दोन brand चे सारखे नाव असते पण दोन पूर्णपणे वेगळी औषधे असतात त्यामुळे हि जोखीम पत्करू नका. अशा औषधांना SALA म्हणजे sound alike look alike औषधे म्हणतात.
डॉक्टरांनी जर जेनेरिक औषध लिहिले नसेल तर pharmacist /chemistला brand substitute करण्यास कायद्याने मनाई आहे. जर लिहून दिलेला brand हा उपलब्ध नसल्यास डॉक्टरांशी संवाद साधून दुसरा पर्यायी brand देणे (डॉक्टरांच्या संमतीने ) असे PCI म्हणजेच Pharmacy Council of India च्या guidelines मध्ये सांगितले आहे. पण हे कुठेही पाळले जाते असे दिसत नाही.
१mg हे app खरोखर चांगले आहे. ९५% तरी त्यातली माहिती खरी असते, भारतभरच्या brands ची माहितिचा data base बनवणे खरी तर खूप मोठी गोष्ट आहे.
पण , यातही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर याच १ mg app जी एक online pharmacy आहे जिथे तुम्ही तुमचे prescription पाठवलेत तर ते लोक तुम्हाला prescribe केलेल्या brand शिवाय दुसरे कोठलेही brands देणार नाही, एवढाच नव्हे कायद्याने ते तसं करू शकत नाहीत. त्यांच्या FAQ मध्ये लिहिले आहे कि जर तुम्हाला स्वस्तातले brands हवे असतील तर तसे तुमच्या डॉक्टरना लिहायची विनंती करा असे त्यांचे सांगणे आहे. तरच ते तुम्हाला असा brand substitute करून स्वस्तातील औषधे देतील.म्हणजे हि रिस्क ते सुद्धा घेत नाहीत. असो, online pharmacy हा एक वेगळा विषय आहे त्यावर वेगळा एक धागा आणि चर्चा होऊ शकते.
नुसते drug molecule चे salt माहित झाले आणि त्याचे brands स्वस्तात मिळतात म्हणून वाटेल ते प्रयोग करू नयेत. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते त्यानुसार डॉक्टर मंडळी औषधाची मात्रा (स्ट्रेंग्थ) बदलून औषध देत असतात त्यांच्या अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर. तसेच ते औषध कधी घ्यायचे किती वेळा घ्यायचे, जेवल्यानंतर अथवा आधी असे बरच घटक औषधाच्या effect वर परिणाम करतात. त्यामुळे सेल्फ medication कृपा करून टाळा . नाहीतर सर्व chemist हे डॉक्टर झाले असते. तुम्हाला जर स्वस्तात औषधे हवी असतील तर सरळ तुमच्या डॉक्टरांना सांगून स्वस्तातले brand लिहायची विनंती करा.
जेनेरिक औषधांचा प्रसार व्हावा या हेतूने सरकारने जनौषधी दुकाने काढण्याचा प्रस्ताव केला होता आणि अमलातही आणला होता. पण ती योजना सफल झाली नाही आणि होताना दिसत नाहीये.राजस्थान आणि तामिळनाडू मध्ये काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे ऐकतो आहे.
जेनेरिक औषधांची खऱ्या अर्थाने गरज हि सर्व सिविल हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे. जिथे गरिबांना चांगल्या दर्जाची औषधे स्वस्त आणि माफक दरात उपलब्ध होतील. मात्र याची SUPPLY CHAIN,inventory आणि storage याची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे नाहीतर औषधांचा तुटवडा होणे, औषधे expire होणे असे प्रकार होऊ शकतात आणि तेथेही भ्रष्टाचार बोक्ळू शकतो.
आणखी बराच काही लिहिण्यासारखे आहे तूर्तास एवढेच.

आनंदी गोपाळ's picture

18 Apr 2016 - 11:32 pm | आनंदी गोपाळ

किंवा बालगंधर्व जसे प्रेक्षकांना मायबाप म्हणत तसे, माझ्या रुग्णांनाच "मायबापहो" म्हणत, नम्रपणे सांगू इच्छितो,

की या सगळ्या (व याही पुढच्यामागच्या, सोशल फोरमवर लिहिता न येण्या जोग्या) बाबी ठाऊक असल्याने,

प्लीज लक्षात घ्या, की तुमचे डॉक्टर तुम्हाला मुद्दाम महाग औषध लिहून देत नाहीत.

जे औषध महाग असूनही, लिहिले जाते, त्यापाठी माझा अनुभव असतो, व तुमच्या तब्येतीचा माझा अभ्यास. याशिवाय एक "लॉकेट अन पॉकेट" थ्येरी आहे.

आमचे जोग मास्तर, स्त्री रुग्णाचे "लॉकेट" अर्थात मंगळसूत्र व पुरुषाचे पॉ़केट उर्फ खिसा जोखून पहा, व नंतर त्याला.तिला प्रवडेल असे औषध लिहा, असे साम्गत असत. हे मी आजही विसरलो नाही, अन माझे विद्यार्थीही हे विसरणार नाहीत याची खात्री मला आहे...

बाकी आपण सूज्ञ आहातच.

धागा जेनेरिक वि ब्रान्डेड औषधे आहे.थोडे वाचन करणारे आमच्यासारखे कीस पाडतात परंतू प्रत्यक्ष व्यवहारात घराघरात हा प्रश्न उपस्थित होतच नाही कारण रुग्ण आणि त्याची जबाबदारी ज्यावर पडली आहे तो नातेवाईक निर्णय घेतो .तो फारतर डॅाक्टर बदलेल एखादे वेळेस परंतू तो उपाय सारखासारखा करणे परवडणारे नसते.शिवाय डॅाक्टरला अमुक औषधेच दे हे सांगणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.एकतर त्याने दिलेली औषधे घेणे अथवा डॅाक्टर बदलणे दोनच पर्याय असतात.

नमकिन's picture

19 Apr 2016 - 8:36 am | नमकिन

अन्न व औषध प्रशासन ही सरकारी संस्था औषध निर्माण कारखाने यांची सुविधा, सामग्री इ वेळोवेळी तपासणी करुन परवाने देते. त्यामुळे फक्त नामचीन तेवढेच श्रेष्ठ व दर्जा असे नसते. हा बोगस औषधि विषय वेगळा. बरं ब्रँडेड चा दर्जा पण हेच FDA वाले प्रमाणित करतात. एखादा जाहिरातीत कमी पडतो/करतो याचा दर्जाशी संबंध लावणे अन्यायपूर्ण ठरेल.
खरंतर केमिस्ट वा त्याची शिखर संस्था बोगस औषधि लोकांपर्यंत येण्यापासुन रोखू शकतील.
अवांतर- दूधाशी तुलना विसंगत.

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 10:10 am | सुबोध खरे

Regulatory issues
The regulatory agency, Office of Drug Controller General of India, admits it is ill-equipped to handle the extent of vigilance required to comb a vast country with just 35 drug inspectors at the central level and 1,100 in the states. The All India Drugs Control Officers’ Confederation (AIDCOC), a representative body of drug inspectors, estimates that India needs at least 4,500 additional drug inspectors to monitor 15,000 drug manufacturing units and more than half a million retail outlets. The drug control regime is “crippled,” says Ravi Uday Bhaskar, AIDCOC secretary general. “There is inadequate manpower, infrastructure and auxiliary staff. This issue of upgradation has been in a limbo for 25 years now,” he says, but bristles at the notion that drug inspectors, sometimes suspected of being part of the problem, are also to blame for the spread of counterfeit drugs.
http://www.livemint.com/Companies/DKFwlkzPv02MPyiZxUGqDN/Fake-drug-indus...
नम्कीन साहेब
वर लिहिलेले आणी त्याचा दुवा एकदा वाचून घ्या. आपल्याकडे आर टी ओ आणी वाहतूक पोलीस जितक्या कडकपणे कायद्याची अंमलबजावणी करतात तितक्याच "कडकपणे" आपले औषध निरीक्षक कामे करतात. तेंव्हा त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल गैरसमज नको.
दुर्दैवाने जेनेरिक औषधे कुठे आणी कशी उत्पादित केली जातात याची डॉक्टरना माहिती मिळणे फार कठीण आहे. उत्तराखंड मध्ये PAONTA साहेब किंवा मध्य प्रदेशात रतलाम/ पिथमपूर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणे कसे शक्य आहे? त्यामुळे ती उत्तम असली तरी त्याबद्दल सर्वसामान्य डॉक्टर कशी खात्री देणार?
वर लिहल्याप्रमाणे २५ % औषधे बनवत असतील तर डॉक्टर आपल्या रुग्णाला काय आणी कशी खात्री देणार?

प्रसाद१९७१'s picture

19 Apr 2016 - 10:51 am | प्रसाद१९७१

औषधांचा दर्जा चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी , कंपन्या औषधे अमेरीकेला निर्यात करतात हा पॅरॅमिटर वापरला तर चालेल का? कारण अमेरीकी एफडीए च्या नोटीसा चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांना आलेल्या वाचनात येते. म्हणजे भारत सरकार नाही तरी अमेरीकी एफडीए प्लँट, मशिनरी, स्वच्छता या कडे लक्ष ठेवून असते असे म्हणायला हरकत नाही.

पण शंका अशी रहाते की, ह्याच कंपन्या अमेरीकेत निर्यात करणारी औषधे आणि देशात विकाय ची औषधे एकाच प्लँट मधे तयार करतात का?

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 11:47 am | सुबोध खरे

अमेरिकन एफ डी ए हे कारखाने अत्यंत काटेकोरपणे तपासते आणी त्यात जराही तृटी आढळली तर त्याची नोटीस कंपनीला मिळते. म्हणजे केवळ छप्पर एका कोपर्यात गळत होते म्हणून का प्रथितयश कंपनीला एका कारखान्यातील औषधे छप्पर गळती थांबून एफ डी ए चे निरीक्षक परत सर्व ठीक आहे याचे प्रमाणपत्र देईपर्यंत अमेरिकेत पाठवण्याची बंदी घातली.
आणी एफ डी ए चे निरीक्षक अजिबात पैसे घेत नाहीत. कारण तसे जर तिथल्या माणसांच्या ध्यानात आले तर त्यांच्या( निरीक्षक) विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला भरला जाईल.
अमेरिकेचे ACRREDITATION होताना त्यांची ZERO TOLERANCE वृत्ती पाहिली आहे. तीच मी माझ्या दवाखान्यात लागू करण्याचे ध्येय ठेवले आहे.
परंतु आपल्या कंपन्या असे कारखाने फक्त "निर्यातीसाठी" तयार केलेल्या औषधांसाठी वापरतात आणी भारतात अशा गळक्या छपराचे कारखाने "चालून" जातात.
सब चलता है! एडजष्ट कर लो भाई!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Apr 2016 - 11:50 am | कैलासवासी सोन्याबापु

बरेच दिवस अगोदर राजस्थान मधल्या चित्तौड़गढ़ जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अन शिक्षणाने डॉक्टर असलेल्या डॉ.समित शर्मा, आय.ए.एस ह्यांनी चित्तौड़गढ़ जिल्ह्यात "स्वस्त धान्य दुकान" प्रमाणे "स्वस्त औषधे दुकान" हा प्रायोगिक प्रकल्प सार्वजानिक वितरण प्रणाली वापरून केल्याचे वाचले होते, ह्या योजने अंतर्गत सरकारी स्वस्त औषध दुकान स्थापित करुन त्या अंतर्गत जनतेला जेनेरिक औषधे अतिशय स्वल्प दरात उपलब्ध करुन दिली गेली होती, माझ्या माहीती नुसार आता ही योजना राजस्थानच्या १० जिल्ह्यात कार्यान्वित असुन राजस्थान मेडिकल सर्विसेज थ्रू त्यांचे वितरण होते असे ऐकले आहे, डॉक्टर समित शर्मा, आय.ए.एस हे आता ह्या उपक्रमाचे मेडिकल डायरेक्टर असल्याचे समजते आहे. ह्यावर कोणी अधिक प्रकाश टाकू शकेल काय? म्हणजे जेनेरिक औषधांची उपयुक्तता किंवा त्यांचे सरकारी चॅनल मधुन वितरण वगैरे वर??

*माहीती वाचीव आहे

नितीनचंद्र's picture

19 Apr 2016 - 12:21 pm | नितीनचंद्र

डॉक्टर साहेब,

आपली माफी मागुन पण आपली लॉकेट आणि पॉकेट ही मनोवृत्ती म्हणजे ज्याचे पॉकेट मोठे दिसेल त्याचे ऑपरेशन करा. जरा लहान असेल तर औषधाने बरे होईल असा सल्ल देऊन औषध द्या तर पेशंट खाका बगला वर करणारा असेल तर माफ करा मी जरा बिझी आहे असे म्हणुन पळ काढण्यासारखे आहे.

मग ती रुग्ण सेवा याची शपथ आणि मनोवृत्ती याचा ताळमेळ लागत नाही.

एखाद्याने कष्टाने पैसे कमवले असतील आणि पाकीट मोठे आहे म्हणुन विनाकारण महागडी औषधे द्यायची का ?

मृत्युन्जय's picture

19 Apr 2016 - 12:56 pm | मृत्युन्जय

मला वाटते तुम्ही चुकीचा अर्थ काढलात. त्यांचे म्हणणे थोडे वेगळे दिसते. त्यांच्या प्रतिसादावरुन असे म्हणायचे असावे की जर एखादा खर्च करु शकत असेल तर त्याला थोडी जास्त महागडी औषधे लिहुन देता येतील (जी अजुन जास्त परिणामकारक असु शकतील) पण एखादा जर गरीब माणूस असेल तर त्याला या महागड्या औषधां ऐवजी थोडी कमी परिणामकारक पण स्वत्स्त औषधे लिहुन देता येतील. समजा आहाराबद्द्ल उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीमंतांना व्हिटामिन बी १२ साठी मटण, मासे खायला सांगता एइल तर गरिबांना रोज रात्री ग्लासभर दूध प्या / दही खा असे कमी खर्चिक उपाय सांगता येतील असे त्यांचे म्हणणे असावे

असंका's picture

19 Apr 2016 - 3:00 pm | असंका

+१

डॉक्टरांच्या म्हणण्याचा असा अर्थ मुळीच नाही. रुग्णाची आर्थिक बाजू लक्षात घेऊन थोडं तारतम्य बाळगून औषध योजना करावी एवढाच विचार होता.

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 8:06 pm | सुबोध खरे

नितीन साहेब
आपण काळा चष्मा लावला कि जग काळं दिसतं.
आनंदी गोपाळ साहेब यांनी लिहिले ले शब्द असे आहेत :"जे औषध महाग असूनही, लिहिले जाते, त्यापाठी "माझा अनुभव" असतो, व तुमच्या तब्येतीचा माझा अभ्यास.
याशिवाय एक "लॉकेट अन पॉकेट" थ्येरी आहे.
आमचे जोग मास्तर, स्त्री रुग्णाचे "लॉकेट" अर्थात मंगळसूत्र व पुरुषाचे पॉ़केट उर्फ खिसा जोखून पहा, व नंतर त्याला/तिला परवडेल असे औषध लिहा"

एखाद्या गरीब रुग्णाला तुम्ही आवश्यक म्हणून एखादे महाग औषध लिहून दिले तरी त्याला ते परवडत नसेल तर तो ते औषध पूर्ण दिवस घेत नाही. यामुळे आजार पूर्ण बरा होत नाही. उदा. भारतात क्षय रोगाची नवी औषधे( रिफ़म्पिसिन) सुरुवातीला अतिशय महाग होती १९८४ साली मी एम बी बी एस करीत असताना रोजच्या औषधांचा खर्च ५० रुपये होता.जो बहुसंख्य निम्न मध्यम वर्ग आणि निम्न वर्गाच्या आवाक्याच्या बाहेर होता. हि औषध योजना ६ महिने चालत असे. या उलट जुनी औषध योजना स्ट्रेप्तोमायसीन इंजेक्शन तीन महिने( किंमत अडीच रुपये) आणि आयसोनियाझाइड आणि थायासिटाझोन पुढे १६ महिने किमत ४० पैसे रोज. म्हणजे पहिले तीन महिने ३ रुपये रोज आणि नंतर १६ महिने ४० पैसे रोज असा खर्च होता.
तेंव्हा कोणत्या रुग्णाला रिफ़म्पिसिनचा कोर्स द्यायचा आणि कोणाला जुना हे रुग्णाच्या खिशाकडे पाहून ठरत असे. तुम्ही एखाद्या मजुराला (ज्याची मजुरी १६ रुपये रोज आहे) रिफ़म्पिसिनचा कोर्स लिहून दिला कि तो केमिस्ट कडे जात असे दहा दिवसाची औषधे घेण्यासाठी पैसेच नात मग तो चिठी टाकून देत असे आणि झाडपाल्याची औषधे करीत असे.
आजही स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रीला नॉर्मल केमो थेरेपी द्यायची किंमत १०-१२ हजार रुपये येते पण ज्यांचा कर्करोग HER + आहे त्याना अजून चांगला गुण येण्यासाठी हरसेपटीन ची ८ इंजेक्शने( रुपये ५०-६०००० एका इंजेक्षनचे -- २०१४ मधील स्थिती) द्यायची तर ४-५ लाखाच्या वर खर्च येतो. त्यांचा रोग पूर्ण बरा होण्याची शक्यता या इंजेक्शन मुळे ९५ टक्क्याच्या वर जाते. मग अशा वेळेस डॉक्टर काय करेल? खिसा पाहूनच उपचार लिहील कि सब घोडे बारा टक्के? रुग्णाने परवडत नाही म्हणून दोन इंजेक्शन देऊन औषध बंद केले तर कर्करोग बरा तर होत नाहीच पण त्या औषधाला RESISTANT होतो.
आज परिस्थिती अशी आहे कि सर्वाना सर्व औषधांचा खर्च परवडत नाही. नवीन येणारी औषधे आयात केलेली असल्याने भयंकर महाग असतात.
मग प्राप्त परिस्थितीत असलेल्यापैकी सर्वोत्तम औषध रुग्णाच्या खिशाला परवडणारी द्यावी लागते. महाग दिली तर डॉक्टरला त्यातून "कट" मिळतो आणी स्वस्त दिली तर उपचार "व्यवस्थित" केला नाही असा प्रवाद कानावर येतो. असो.

स्वीट टॉकर's picture

19 Apr 2016 - 3:49 pm | स्वीट टॉकर

अतिशय महत्वाच्या विषयाबद्दलचा धागा, त्यावर आपल्यातल्या जाणकार मंडळींनी दिलेली प्रामाणिक स्पष्टीकरणे, आणि कुठल्याही प्रकारची टिंगल, राग वगैरे नसलेली चर्चा.
वा. धागा असावा तर असा!
आम्हाला खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. चालू द्या!

चौकटराजा's picture

19 Apr 2016 - 4:10 pm | चौकटराजा

डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ, अजया, सुबोध खरे साहेब ई चे आभार. मला यात सर्वात महत्वाचा मुद्दा अस वाटला की रासायनिक नाव जरी एक असले तरी, दोन्ही कम्पन्या जैन किम्वा वर्धमान फार्मसी नसल्या तरीही काही आणखी लाभदायक
गोष्टी देणारी गोळी महाग असू शकते. उदा. डायरेक्ट आतड्यात विरघळणारी गोळी.हा लाभ जर आपणास नको असेल तर
आपणच पर्यायी गोळ्यांचा अभ्यास करून स्वस्त गोळी ( अर्थात जैन व वर्धमानची नसलेली) डॉ कडे मागणे हितावह आहे. त्यासाठी रूग्णाने काही वाचन करणे अपेक्शित आहे. एवढे करून जर महिन्याला साठ वा शंभर रूपयेच जर वाचणार असतील. तर फार विचार करणे युक्त नाही. तरीही जर जेनेरिक गोळी घेऊन पाहून उदा. मेटफोर्मिन साखर नियंत्रित झाल्याचे दिसत असेल तर वेगळा विचार करणे गरजेचे ठरेल.आजचा वैद्यकीय व्यवसाय हा विश्व्बास गमावत चाललेला आहे हे मात्र नक्की.

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 6:13 pm | सुबोध खरे

चौरा साहेब
"काही आणखी लाभदायक
गोष्टी देणारी गोळी महाग असू शकते. उदा. डायरेक्ट आतड्यात विरघळणारी गोळी.हा लाभ जर आपणास नको असेल तर
आपणच पर्यायी गोळ्यांचा अभ्यास करून स्वस्त गोळी ( अर्थात जैन व वर्धमानची नसलेली) डॉ कडे मागणे हितावह आहे."

आपले हे गृहीतक चुकीचे आहे. आतड्यात विरघळणारी गोळी हा लाभ नसून ती आवश्यकता आहे. ऊदा. अमिबिक डीसेंट्री साठी दिली जाणारी टीनिडाझोल औषध असलेली गोळी. टिनीडाझोल हे औषध जठरातील आम्लामध्ये विघटन पावते त्यामुळे ते आतड्यात पोहोचे पर्यंत त्यातील बहुतेक द्रव्य नष्ट होते. यासाठी ती गोळी एण्टेरिक कोटेड म्हणजे आम्लात न विरघळणारया पदार्थाचे आवरण चढवलेली असते. तेंव्हा ती स्वस्त किंवा महाग हा विचार तेथे येत नाही. याचा दुसरा भाग असा आहे कि आयब्यूप्रोफेन किंवा तत्सम गोळ्या जठराच्या अंतर्भागाला दाह करू शकतात. म्हणजे या गोळ्या तील द्रव्य जरी आम्लामुले नष्ट होत नसले तरी असा जठराचा दाह होऊ नये म्हणून त्या एण्टेरिक कोटेड केलेल्या असतात. या वेळेस त्या गोळ्या महाग असु शकतात. ज्या रुग्णाला आम्लपित्त आहे अशा रुग्णाला देताना डॉक्टर महाग असेल तरीही अशी गोळी देतात. या ऐवजी तेच द्रव्य असलेली स्वस्त गोळी आपण घेतली तर आपल्याला जठराचा दाह होऊ शकतो. दारू पिऊन हान्गओव्हर मुले होणार्या डोकेदुखी साठी अशी एण्टेरिक कोटेड नसलेली गोळी घेतली तर आपल्याला डोकेदुखी पासून मुक्तता मिळते पण पोटात जळजळ उलटी असा त्रास होऊ शकतो. आपल्याकडे दुर्दैवाने मित्राने जालीम उपाय म्हणून सुचवल्याने अशी औषधे घेणारे शेकड्यांनी मिळतील.
तेंव्हा केवळ APPवर तेच द्रव्य असलेली गोळी घेणे इतके साधें नि सरळ नाही.
एवढे करून जर महिन्याला साठ वा शंभर रूपयेच जर वाचणार असतील. तर फार विचार करणे युक्त नाही.
तरीही जर जेनेरिक गोळी घेऊन पाहून उदा. मेटफोर्मिन साखर नियंत्रित झाल्याचे दिसत असेल तर वेगळा विचार करणे गरजेचे ठरेल
दुर्दैवाने माणसाला स्वतःच्या शरीराची किंमत फुकट मिळत असल्याने फारशी नाही हि बाब मला इथे अधोरेखित करावीशी वाटते. जी मोटार गाडी ३ ते ३.५ लाखाला आपण विकत घेता आणी ती दर सहा ते आठ वर्षांनी बदलली जाते. तिचा विमा दर वर्षी १२०००/- असतो. म्हणजे महिन्याला १०००/- रुपये. तेथे माणूस पैसे भरायला पुढे मागे पाहत नाही परंतु स्वतःचे शरीर जे तुम्हाला "आयुष्यभर" बदलता येणार नाही त्याच्यासाठी मात्र महिना हजार रुपये खर्च करायची "एकाही" माणसाची तयारी मला आजपर्यंतच्या अनुभवात दिसली नाही.
ज्यांना बायपास सारखी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली किंवा ज्यांनी मृत्यू समोर उभा ठाकलेला प्रत्यक्ष पहिला असेच लोक फक्त औषधावरील खर्च बाबत तक्रार करताना कमी आढळतात.

चौकटराजा's picture

19 Apr 2016 - 7:25 pm | चौकटराजा

जी आय टी मधील गोळीचे गन्तव्य स्थान व फक्त तेथीलच रासायनिक प्रक्रियेला आयसोलेट करणे हा भाग कधी वाचनात आला नव्हता ." सुबोध" केल्याबाद्द्ल सॉल्ल्लिट धन्यवाद !

बाकी पैशापेक्षा एक्दाच मिळाणारे शरीर महत्वाचे. हा धागा अशासाठीच काढला की पर्याय सर्वार्थाने खरेच पर्याय आहे किवा कसे ? .

चौकटराजा's picture

19 Apr 2016 - 7:42 pm | चौकटराजा

गोळ्या व कॅप्शूल असा प्रकार ठरवताना काही वरील प्रमाणे गोळीच्या गमन मार्गाचा काही विचार असतो का ?

सुबोध खरे's picture

19 Apr 2016 - 8:11 pm | सुबोध खरे

नक्कीच असतो. जी द्रव्ये वातावरणाच्या / हवेच्या/ आर्द्रतेच्या किंवा प्रकाशाच्या संपर्कात येऊन विघटन पावतात. ती सध्या गोळीच्या स्वरूपात( क्रोसिन अनासीन सारखी पांढरी) देता येत नाहीत. शिवाय "अत्यंत कडू" असलेली औषधे सुद्धा गोळीच्या स्वरुपात देत नाहीत. मग एकतर फिल्म कोटेड स्वरुपात किंवा कॅपसूलमध्ये घालून दिली जातात.

चौकटराजा's picture

19 Apr 2016 - 8:19 pm | चौकटराजा

इ सी म्हण्जे एन्टेरिक कोटेड पहिल्यांदा १८८४ मधे जन्माला आले. पण जठरापुढे टिकले नाही. मग शेलॅक वापरण्यात आले. ते बरेच काळ चालू होते.

मी-सौरभ's picture

19 Apr 2016 - 6:32 pm | मी-सौरभ

खुप दिवस झाले अशी निर्भेळ चर्चा वाचुन.

माझी शंका, जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे बारीक सारीक तक्रारी घेऊन जातो आणि ते ४-५ गोळ्या ५ दिवस घेऊन परत दाखवायला सांगतात आणि आपण नेहेमीप्रमाने बरे वाटु लागले की औषधे आणि डॉक्टर दोन्हीला रजा देऊन कामाला लागतो. बर्‍याच वेळेला अश्या केसेस मधे तो आजार परत ऊद्भवत नाही. तर हे करणे किती बरोबर आहे.

साधा मुलगा's picture

19 Apr 2016 - 7:34 pm | साधा मुलगा

असे करणे योग्य नाही. डॉक्टरांनी सांगितलेला course हा पूर्णपणे follow करा.
उगाच मध्ये सोडू नका, अन्यथा जर का डॉक्टरांनी तश्या सूचना दिल्या असतील तरच.
कारण यात जर का antibiotics असतील तर मग bacteria मध्ये resistance तयार होतो. मग काही दिवसांनी त्या औषधाचा effect होत नाही. Antibiotics च्या अश्या अनिर्बंध वापरामुळे बरीच antibiotics इतिहासजमा झाली आहेत आणि काही होण्याच्या मार्गावर आहेत. काही वेळा दिलेला course अर्धवट सोडल्याने relapse अथवा आजार उलटतो. हे TB सारख्या रोगामध्ये ठळकपणे जाणवते. बर्याच रुग्णांनी अशी अर्धवट औषध घेतल्याने MDR (Multi drug resistance) TB म्हणजे दोन किंवा अधिक औषधानाही दाद न देणारा TB निर्माण झाला आहे.

हा आमच्या डेंटिस्ट्रीमधला नेहमीचा तापदायक अनुभव आहे.लोक दुखणे थांबले की गोळ्या बंद करतात.
Antibiotics दिली असताना ती पेशंटचा इंफेक्शनचा प्रकार, त्याच्या इंफेक्शनची तीव्रता, त्याचे वजन,वय यानुसार त्याला त्यातला किती डोस उपलब्ध होईल त्याप्रमाणे गोळ्या लिहुन दिलेल्या असतात.दोन गोळ्यांनी इंफेक्शन सूज कमी झाली की लोक त्या बंद करुन पुढच्या वापरासाठी ठेवतात! असे सांगतातही! तुमच्या मागच्या दोन गोळ्यात 'बरा' झालो त्यातल्या उरलेल्या आहेत.याचा अर्थ तुम्ही प्रमाणात औषधाचा डोस घेतलेला नाहीये.परत इंफेक्शन होईल तेव्हा चतुर बॅक्टेरियाची पुढची पिढी त्या गोळ्यांना दाद देणार नाही.म्हणजेच रेझिस्टन्स येणार! पुढच्या वेळी आपण त्या गोळीने बरे होणार नाही आहात!
म्हणूनच प्रमाणित डोसचे महत्त्व असते.त्याप्रमाणे घ्यावेच.

याच विषयाशी समांतर गोष्ट जाणवते.ती म्हणजे साध्या साध्या इंफेक्शनला मोठी प्रतिजैविके वापरणे.यात आमचे व्यवसाय बांधवही मागे नाहीत ही शरमेची गोष्ट आहे.जे साध्या माॅक्सच्या गोळीने काम होणार त्यासाठी पुढच्या पायरीचे प्रतिजैविक निष्कारण वापरल्याने अॅटिबायाॅटिक रेझिस्टंट आजाराला आमचा हातभार लागू शकतो.यावर अनेकदा व्याख्याने घेऊन तज्ञ कळवळून धोका सांगत आहेत.पण उगाचच ofloxacine इ antibiotics जी ड्रग रेझिस्टंट टिबीच्या ट्रीटमेंट ला उपयोगी पडू शकतील ती देऊन रेझिस्टंसला खतपाणी घातले जाते आहे :(

चौकटराजा's picture

20 Apr 2016 - 2:21 pm | चौकटराजा

माझे तरी असे निरिक्षण आहे की बरेचसे डॉ पायरी पायरीनेच अ‍ॅन्टी बायोटिक देतात. आता बर्याच लोकाना "कोर्स" पूर्ण करायला घरातील इतर नातेवाईक लक्ष ठेवून भाग पाडतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2016 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही नशीबवान आहात... कारण तुम्ही स्वतः चौकस आहात आणि तुमच्या वरच्या विधानावरून तुमचे डॉक्टर्सही शास्त्रिय विचाराने वागणारे आहेत असे दिसते.

मात्र, वाढत्या जाणकारीमुळे, अँटिबायोटिक्स गरजेपेक्षा कमी प्रमाणात आणि / किंवा कमी दिवसांसाठी घेण्याचे प्रमाण घटत असले तरीही अजूनही त्याचे जगभरातले प्रमाण ल़क्षणियरित्या जास्त आहे.

याची मुख्य कारणे अशी...

अ) रुग्णांमधले आणि नॉन-मॉडर्न वैद्यकीय व्यावसायीकांमधले अश्या अँटिबायोटिक्सच्या गैरव्यवहाराने होणार्‍या दुष्परिणामांबद्दलचे (रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होणे, इ) अज्ञान

आ) "काहीही करून झटकन उतार पडला पाहिजे, तरच डॉक्टर चांगला", अशी रुग्णांमधे असलेली अज्ञानमूलक समज आणि तिला बळी पडून सुरुवातीपासूनच उच्च दर्जाची अँटिबायोटिक्स (जी केवळ जुनाट / रेझिस्टंट / प्रखर इन्फेक्शन्ससाठी राखीव ठेवावी अशी पद्धत आहे) वापरणारे डॉक्टर्स,

इ) औषधांवर होणारा खर्च परवडत नाही म्हणून रुग्णाने औषधे कमी प्रमाणात घेणे अथवा पूर्णपणे बंद करणे, हे केवळ विकसनशील देशांतच नव्हे तर युएसए सारख्या अग्रगण्य समजल्या जाणार्‍या देशांमधीलही एक मोठी समस्या आहे.

जर या समस्येमधे खोलवर अंतर्ज्ञान (इन्साईट) हवे असेल तर एका मनस्वी व्यावसायीकाने चालवलेल्या डोळे उघडणार्‍या प्रकल्पावर सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत आलेला खालील दुव्यावरचा लेख वाचावा...
http://www.newyorker.com/magazine/2011/01/24/the-hot-spotters

महत्वाचे मुद्दे :

१. सद्या अशी अवस्था आली आहे की नवीन अँटिबायोटिक्सच्या शोधांचा वेग, नवीन रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार होण्याच्या वेगापेक्षा धोकादायकरित्या कमी आहे. हे असेच चालू राहीले तर "या इन्फेक्शनला उपयोगी अँटिबायोटिक आस्तित्वात नाही, केवळ देवाची प्रार्थना करा" असा सल्ला देण्याची वेळ दशक-दीडदशकात येऊ शकेल !

२. प्रमाणापेक्षा कमी वेळ / मात्रेने औषध घेण्याने, वाचलेल्या खर्चापेक्षा कित्त्येक पट्टींनी अधिक खर्च भविष्यात होतो... आणि न भरून येणारी शारिरीक हानी होऊ शकते तेही अलाहिदा. :(

मी-सौरभ's picture

20 Apr 2016 - 3:09 pm | मी-सौरभ

मनःपुर्वक धन्यवाद..

mugdhagode's picture

21 Apr 2016 - 6:45 am | mugdhagode

नवीन अँटीबायोटिक तयार होत नाहीत कारण त्यात फार्मा कंपन्याना रस राहिलेला नाही... एका पेशंटला किती दिवस अँटिबायोटिक देणार ? आअठ - पंधरा दिवस.

त्यापेक्षा बीपी , डायबेटिस , ओबेसिटी , इ वर औshhadh दिले की जन्मभर गिर्‍हाइक ते घेणारच. त्यामुळे सगळे रिसर्च अशा आजारांवरच सुरु आहेत.

उल्का's picture

19 Apr 2016 - 9:51 pm | उल्का

मिपा डॉक्टर्सचे माहितीबद्द्ल मनापासून आभार.

प्रियाजी's picture

20 Apr 2016 - 3:26 pm | प्रियाजी

अतिशय उत्तम धागा. वा. खू. साठविली आहे. मिपावरील सर्व वैद्यकांचे मनापासून आभार. मनातील अनेक शंकांचे आपोआप निरसन होत आहे.