खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी... रोजच्या बोलीभाषेतील आणि काही अलंकारिक असे शब्द घेऊन तो अशी काही शब्दांची सरमिसळ करतो कि बस...ऐकणाऱ्याला धुंदी चढावी...मराठी भाषेत इतकी सुरेख गाणी आणि तीही तरुण पिढीला आवडणारी फक्त आणि फक्त संदिपच लिहू शकतो.
सरीवर सर् नंतर संदीपची गाणी ऐकणे हा एकच छंद जडला...त्याची जवळपास सर्व गाणी माझ्या संग्रहात ठेवली... तस बघायला गेल तर तोही आमच्या सारखा रुक्ष अभ्यासातला (संदीप इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे...माझाही पहिला विश्वास बसला नव्हता), तरीदेखील तो इतक्या मनाला भेदून टाकणाऱ्या कविता लिहितो...हॅटस ऑफ!!!!
“दिवस असे कि” अल्बम ऐकल्यावर वाटल कि अरेरे किती रुक्ष आणि वास्तव कविता आहेत... पण त्याचा “सांग सख्या रे” ऐकला आणि वाटल बस आता काही ऐकूच नये... त्या वेळी नुकताच सुरु झालेला कार्यक्रम “आयुष्यावर बोलू काही” फक्त तिकीट परवडत नाही या कारणाने तो मित्रांसोबत बघायचा राहिला...नंतर तो यथावकाश आम्ही दोघांनी बघितला तो भाग आणि त्याची गोडी वेगळीच...पण त्यानंतर संदीपची गाणी हा एक स्वतंत्र विषय कोणीही अभ्यासासाठी घेऊ शकत अस मला मनापासून वाटतं...
अगदी सुरुवातीला “सकाळ” पेपर मध्ये त्याचा अगदी एक छोटंसं मनोगत आल होत. त्यात त्याने त्याची आणि सोनीया(संदीपची बायको) यांची भेट कशी झाली याच सविस्तर वर्णन केलय...तो सांगतो कि “काळोख्या अंधारात लख्ख सोनेरी उन पडाव तशी अवचित ती सामोरी आली...” अगदी अप्रतिम वर्णन!!! ती एक मानसशास्त्राची विद्यार्थिनी... कदाचित त्यामुळेच त्याचं एवढ ट्युनिंग असेल...त्याने तिला काहीही नसताना प्रपोझ केल त्याविषयी तो सांगतो “ फाटका शर्ट घालून मी तिला विचारणारा वेगळाच..आणि काहीही पुढचा मागचा विचार न करता मला होकार देणारी तीही आगळीच”. मला वाटत कि सोनिया एवढी भाग्यवान मुलगी फक्त तीच कारण या सर्व गाण्यांपैकी ९९% गाणी तो बहुतेक सोनीया साठीच लिहीत असेल...
त्याची “मौनाची भाषांतरे, नेणीवेची अक्षरे” हि पुस्तके संग्रहात असण मस्ट...त्याचा नवीन कार्यक्रम आहे “कधीतरी वेड्यागत वागायला हवे”...
संदीप म्हटल कि सलील हे नाव ओघाने येताच त्याच्या अप्रतिम कवितांना अतिशय मोलाची साथ दिलेली आहे सलीलने... त्या दोघांच ट्युनिंग बघाव “आयुष्यावर बोलू काही” कार्यक्रमात...फक्त नजरेने ते एकमेकांची भाषा ओळखू शकतात...दोघांचाही सेन्स ऑफ हुमर जबरदस्त आहे...पण तेवढाच हसवताना कधी “दमलेल्या बाबाची कहाणी” हे गाण चालू होत आणि अगदी पाषाणहृदयी माणूसहि आतून हलून जातो...शब्दांची इतकी ताकद फक्त त्या जादुगाराकडेच आहे... तोच मग वातावरण गंभीर केल्याची नैतीक जबाबदारी घेत थोडस हलक फुलक गाणं घेतो...
“दमलेल्या बाबाची कहाणी किंवा दूरदेशी गेला बाबा” हि गाणी ऐकवून लहानांपासून मोठ्यापर्यंत रडवणारा हि तोच.... तर कधी “कितीक हळवे कितीक सुंदर, लागते अनाम ओढ श्वासांना, वेड लागलं” सारखी गाणी ऐकवून मनात मोरपीस फिरवणाराहि तोच....
संदीपच्या विषयी जितकी वाटत ते सर्व तर काही मी लिहू शकत नाही तरी जाता जाता त्याच्याच भाषेत त्याच्याविषयी थोडस –
“ ये दिवानो कि बाते है इनको लब पर लाये कौन,
इतना गहरा जाये कौन खुदको यु उलझाये कौन”
प्रतिक्रिया
14 Apr 2016 - 3:24 pm | रघुनाथ.केरकर
मला खुपद वाटतं की सन्दीप ची सगळी जुनी गाणी त्यानी परत रेकॉर्ड करावी....
नव्याने गावीत
सन्दीप चा फ़्यान
14 Apr 2016 - 3:39 pm | चांदणे संदीप
छान लिहील आहे, पण खूपच कमी लिहील असल्यासारख वाटल. असो.
संदीप खरे यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला तो २०१४ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, सासवडला.
त्यांच्या या ओळींनी मला फारच प्रभावित केले आहे...
ती एक ओळच या हातून कधी लिहिली जातीये, कोण जाणे!
Sandy
14 Apr 2016 - 6:08 pm | उगा काहितरीच
नशीबवान आहात. रच्याकने लेख पण सुंदर आहे. सलिल -संदीप जोडी म्हणजे क्या केहने ! अप्रतिम !!
14 Apr 2016 - 4:35 pm | चंद्रनील मुल्हेरकर
छान ,संदीपच्या कविता आवडतात.ही धरा दासी तयांची व सरीवर सर विशेष आवडीच्या
14 Apr 2016 - 6:43 pm | चौथा कोनाडा
सुंदर लिहिलेय अनुप !
संदिपच्याच आवाजातील "दिवस असे की " मधलं "eएवढंच ना, एकटेच जगु" या रचनेने कित्येक "एकट्या" क्षणी प्रचंड सोबत केलीय.
अनुप अजुन लेख येवु देत कवितेवर, सुरेख लिखाण आहे.
14 Apr 2016 - 7:03 pm | उल्का
छान लिहिला आहे लेख. आवडला.
14 Apr 2016 - 9:59 pm | विवेक ठाकूर
त्याच्या नुकत्याच बहरु लागलेल्या काळात, त्याच्या या ओळींच्या अर्थावरनं :
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून,
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
फोनवर गप्पा सुरु झाल्या. जवळजवळ अर्धा तास बोललो. तो काय वाचतो, त्याच्या कविता अंगभूत गेयता कशा घेऊन येतात, त्याच्या शब्द संयोजनाजी कमाल, मराठी कवितेत त्यानं निर्माण केलेलं स्वतंत्र स्थान, त्याचा जगण्याचा अंदाज़, ग्रेसची नजा़कत, गदिमांची प्रासादिकता....मजा आली. त्यात ओशो हा दोघांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे मैफिल आणखीच रंगली.
15 Apr 2016 - 1:26 am | रातराणी
मेघ नसता वीज नसता त्याच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेले तेव्हा त्याच्यावर प्रेम करता याव म्हणून पुन्हा जन्म घ्यावासा वाटलेलं ;)
जगात कुणाचा हेवा वाटत असेल तर संदीपच्या बायकोचा :)
15 Apr 2016 - 6:57 pm | पैसा
छान लिहिलंय
15 Apr 2016 - 8:15 pm | शलभ
+१
18 Apr 2016 - 9:23 am | अनुप देशमुख
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार! खरं तर पहिला प्रयत्न असल्याने थोड्या शंका होत्या. पण प्रोत्साहनामुळे आता निवांत लिहु शकेन.
18 Apr 2016 - 11:17 am | मिसळलेला काव्यप्रेमी
संदीपदा मुळेच मी उगाच या कविता प्रकारात लुडबुड करायला लागलो. त्यांच्या कविता वाचून ऐकूनच कसं लिहायच याचा माझ्या बुद्धीला थोडाफार अंदाज आला. त्यांना माझ्या कविता दाखवल्या होत्या. त्यांना म्हणालो अभिप्राय नको मला. फक्त काय लिहीलय तेवढ वाचून बघा. मला बरं वाटाव म्हणून माझ्या सुमार लिखाणाच थोड कौतुकही केल त्यांनी. पण मी ते फार मनावर घेतल नाही.
फक्त एक पॉझीटिव्ह एनेर्जी मिळाली. तेवढ पुरेस होत माझ्यासाठी. अजुनही कधीकधी फोनवर बोलतो मी त्यांच्याशी. बर वाटत.
त्यांची 'तुटले' रचना ऐकून भारावलो होतो. असो.
18 Apr 2016 - 11:24 am | स्पा
दोघेही अता रास डोक्यात जातात
22 Apr 2016 - 10:34 am | क्रेझी
संदीप खरे ह्यांचं एक अॅप पण आलं आहे, त्यात त्यांच्या आवाजातल्या कविता ऐकायची संधी मिळू शकते अर्थात थोडे पैसे भरून.
25 Sep 2016 - 12:53 am | अनुप देशमुख
पूर्ण माहिती देऊ शकता का. मजा येईल!