माहिती

श्रेया's picture
श्रेया in काथ्याकूट
15 Jan 2009 - 5:08 pm
गाभा: 

मला पुस्तक वाचन्यासाठी त्यांची नावे व लेखकाचे नाव द्या

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Jan 2009 - 5:14 pm | अवलिया

अदर साईड ऑफ मिडनाईट.

पुस्तकाचे नावच पुरेसे आहे.....छान आहे. वाचा

(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक पाचलग's picture

15 Jan 2009 - 7:50 pm | विनायक पाचलग

नेवतीची अक्षरे-संदीप खरे
बराक ओबामा-संजय आवटे
हे काही नवीन लिखाण

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

मिंटी's picture

16 Jan 2009 - 10:02 am | मिंटी

नेवतीची अक्षरे-संदीप खरे

विनायक संदिप खरेच्या या पुस्तकाचं नाव नेणिवेची अक्षरे असं आहे.
असो.
अजुन वाचण्यासारखी पुस्तकं म्हणजे
७० दिवस - पण या पुस्तकाच्या लेखकांचं नाव आत्ता लक्षात नाही.

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 10:11 am | विनायक पाचलग

गडबडीत टाइपले होते
असो छान आहे पुस्तक वाचुन संपले आहे
त्याचा व्हिडिओ ही आहे पाहिजे असल्युआस लिंक देतो

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

मिंटी's picture

16 Jan 2009 - 10:29 am | मिंटी

माफी कसली मागतोस रे....
जाऊ देत सोड.... तुझ्याकडे त्याचा विडियो आहे ना मग मला त्याची लिंक दे ना....प्लिज :)

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 11:02 am | विनायक पाचलग

http://www.youtube.com/watch?v=YG15gntAfB4
http://www.youtube.com/watch?v=dqLBWaZjeHU&feature=related
http://www.youtube.com/watch?v=yU0JrHwJktM&feature=related
पाहा आणि उत्तर द्या
खरडवही वापरा अतिअवांतर होत चालले आहे

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

सुचेल तसं's picture

16 Jan 2009 - 3:55 pm | सुचेल तसं

७० दिवस: ह्याचा अनुवाद रविंद्र गुर्जरांनी केला आहे.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2009 - 8:03 pm | परिकथेतील राजकुमार

१) चांदोबा
२) चंपक
३) ठकठक
४) चाचा चौधरी
५) नागराज
६) पिंकी
ह्या वाचनाची गोडी लागत आहे असे वाटले की मग :-
१)कुमार
२) फास्टर फेणे
३) गोट्या
४) बोक्या सातबंडे

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अवलिया's picture

15 Jan 2009 - 11:19 pm | अवलिया

याच्या आधी अक्षर ओळख, अंकलिपी, गमभन असे वाचा म्हणजे एकदम जड जाणार नाही.

(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सोनम's picture

15 Jan 2009 - 8:31 pm | सोनम

१.त्या तिघी : अशोक गोडबोले
२.भंगलेले देऊळ : ग.त्र्यं.माडखोलकर
३.मृगनयना : ग.त्र्यं.माडखोलकर
४.स्वप्नातील कळ्यानो : भारती मेहता
५. हंटर : मनोहर दातार
६.गुलाबपाणी : डॉ.आशा सावदेकर.

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 8:36 pm | छोटा डॉन

थक्क झालो राव नव्या व वाचनीय पुस्तकांची यादी वाचुन ...

अक्षरशः ह्यातले एकही पुस्तक वाचले, चाळले नाही अजुन.
छे, फारच बॅकलॉग राहिला आहे बॉ आमचा ...

एक विनंती :
नुसती पुस्तकाम्ची नावे देण्याऐवजी त्याबद्दल थोडे संक्षेपाने लिहता आल्यास चांगले होईल.
तेवढीच आम्हाला मदत होईल नवे पुस्तक विकत घेताना ..!

------
छोटा डॉन

सोनम's picture

15 Jan 2009 - 8:44 pm | सोनम

नुसती पुस्तकाम्ची नावे देण्याऐवजी त्याबद्दल थोडे संक्षेपाने लिहता आल्यास चांगले होईल

अहो मग ह्या प्रतिक्रिया थोड्या लांबलचक नाही ना होणार का.?

तेवढीच आम्हाला मदत होईल नवे पुस्तक विकत घेताना ..!
कल्पना चांगली आहे आम्ही अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करु (फक्त मी आणि बाकीच्याचे माहित नाही)

विनायक पाचलग's picture

15 Jan 2009 - 9:00 pm | विनायक पाचलग

लिहिणारच आहे
माझी दोन्ही पुस्तके कालच वाचुन झाली
आणि हो का थांबलोय हे सांगायला नको
आपला
(लेख टाकु को दा)विनायक

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 9:10 pm | छोटा डॉन

>>अहो मग ह्या प्रतिक्रिया थोड्या लांबलचक नाही ना होणार का.?
भल्यामोठ्या प्रतिक्रीयांना मिपाकर कधीपासुन घाबरायला लागले ?
आम्ही वेगळे काय करतो ...

जर अर्थपुर्ण आणि उपयुक्त "मोठ्ठी प्रतिक्रीया" असेल तर कोणीही बोलणार नाही.
मेगाबाईट्सच्या काळजीत माहितीचा ओघ थांबवु नका ..!

( बाकी जर कोणी वैतागलेच तर त्याला भल्यामोठ्ठ्या खरडी / व्यनी टाकुन जेरीस आणायची जबाबदारी आमची )

------
छोटा डॉन

आनंदयात्री's picture

16 Jan 2009 - 2:16 pm | आनंदयात्री

व्यनी आला नाही अजुन !!

मिंटी's picture

16 Jan 2009 - 2:23 pm | मिंटी

+१ असंच म्हणते..... ;)

पुस्तकाची माहिती
१. कलकी (पत्नीच्या खुनाचा शोध घेणारी अदभुत रम्य कादंबरी)
स्वामी विज्ञानानंद
किंमत :- १२५/-
सारांश :- प्रथमा ह्या महिलाचा खुन होता आणि त्याचा आरोप तिच्या पती(विश्वनाथ) ह्याच्यावर घेतात.आणि त्यानंतर सुरु होते विश्वनाथची कहाणी.आपल्या पत्नीचा खुन करणार्या व्यक्तीच्या शोधासाठी त्याने केलेले प्रयत्न.
पुढे काय होते? त्याला न्याय मिळतो का?त्याने सूड घेतला का? ही रोमहर्षक कहाणी स्वामी विज्ञानानंद याच्या गूढ रम्य तरीही ज्ञानरंजक शैलीत लिहिली आहे.

२.अर्धीमुर्धी कहाणी (इंदिरा गोस्वामी)
अनुवाद :-अर्चना मिरजकर
किंमत :- १६०/-
सारांश :- सत्तावीस वर्षाच्या या जीवनाच्या तुकड्यात या संवेदनाशील लेखिकेने काय काय अनुभवले आहे! वडिलांचा मृत्यू,त्यानंतर केलेला आत्महत्येचा असफल प्रयत्न्,वैवाहिक जीवनाचा प्रारंभही न करता पुसून टाकलेले पहिले लग्न्,नंतरचा प्रेमविवाह्,जेमतेम दोन वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर पतीचा झालेला अपघाती मृत्यू,नैराश्येचा सुन्न अनुभव्,वृदांवनातील वास्तव्,तेथील अगतिक विधवाच्या हलाखीचे मनाला सटपटून टाकणारे सहानुभवी निरीक्षण्...अनेकविध भावक्षुब्ध अनुभव.
अवघ्या सत्तावीस वर्षाच्या जीवनानुभवात जीवनाच्या अनेक पैलूना आंतरिक संवेद्यतेने स्पर्श करणारी ही अर्धीमुर्धी कहाणी..

३.द अल्केमिस्ट (पाउलो कोएलो)
अनुवाद :- नितीन कोत्तापल्ले.
किंमत :- १३०/-
सारांश :- 'द अल्केमिस्ट'हे वैश्विक पातळीवर गाजलेले एक बहुचर्चित पुस्तक आहे.ही कथा आपणास आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करुन देते.प्रतिके आणि शकुन लक्षात घेऊन स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसे राहावे याचे मार्गदर्शन करणारी ही रंजक अशी बोधपूर्ण कथा आहे.

टारझन's picture

15 Jan 2009 - 9:05 pm | टारझन

आहो पुस्तकं विकत घेऊन काय वाचता आहात ?
हे पहा ... पुर्ण फुक्कट आहे ... मजा करा लेको ...

लेखक .. डिस्क्रिप्शन आणि बरंच काही .. ऑटोमॅटिक कळेल :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2009 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'केतकी पिवळी पडली', प्राध्यापक वाळींब्यांचं! आपल्या मिपाचे एक मान्यवर सभासद या पुस्तकाचं परीक्षणही टाकू शकतील.

(ह. घ्या हे वे. सां. न ल.)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

क्लिंटन's picture

15 Jan 2009 - 10:47 pm | क्लिंटन

नाही हो ’केतकी पिवळी पडली’ ओळिंब्यांनी नाही तर त.त.कुडचेडकरांनी लिहिले आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अनामिक's picture

15 Jan 2009 - 11:24 pm | अनामिक

सहमत

(आमच्या ह्या प्रतिक्रियेवर आधीच कुणाचे कॉपी राईट्स असतील तर त्यांनी खुश्शाल कोर्टात जावे)

अनामिक

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 11:25 pm | छोटा डॉन

>>सहमत ...
???
कमाल आहे बॉ.
असो.

( माझा पुढचा प्रतिसाद पहावा कॄपया आणि कॄपया ह्.घ्या. )

------
छोटा डॉन

अनामिक's picture

15 Jan 2009 - 11:28 pm | अनामिक

डॉनराव.. तुझा प्रतिसाद पाहिला आणि लक्षात आलं... आता मला माझा प्रतिसाद बदलताही येत नाहिये. असो, मला माझं कॉपी राईटवालं वाक्य टाकायची घाई झाली होती...

अनामिक

अवलिया's picture

15 Jan 2009 - 11:29 pm | अवलिया

अति घाई संकटात नेई

(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

रम्या's picture

16 Jan 2009 - 3:19 pm | रम्या

अति घाई संकटात नेई
"अती घाई मसणात नेई" इति मकरंद अनासपुरे कुठल्याशा शिनेमात!
आम्ही येथे पडीक असतो!

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 11:30 pm | छोटा डॉन

ठीक आहे बॉस, चलता है...!
बाकी आम्हालासुद्धा तुमचे "कॉपीराईतचे वाक्य" लै आवडले पण काय करणार, त्याचा कॉपीराईट असल्यास काय घ्या ?

असो. आता बास.
ह्यापुढचे अवांतर "उचीत" ठरणार नाही.

------
छोटा डॉन

छोटा डॉन's picture

15 Jan 2009 - 11:24 pm | छोटा डॉन

>>नाही हो ’केतकी पिवळी पडली’ ओळिंब्यांनी नाही तर त.त.कुडचेडकरांनी लिहिले आहे.

सॉरी मास्टर, हे पुस्तक "त्.त. कुडचेडकरांनी" लिहलेले नसुन "स. तं. कुडचेडकरांनी" लिहलेले आहे असे आम्हाला आठवते.
असो. त्याचे काही विषेश नाही.

बाकी आमच्या म्हणण्यानुसार माणसाने जर "जीवनोन्नतीचे सहा सोपान! " ह्याची गरजेपेक्षा जास्त पारायणे केली की तपशिलात अशा ढोबळ चुका घडतात.
असो. त्याचेही जास्त काही विषेश नाही.
( कृपया ह्.घ्या. बरे )

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jan 2009 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चुका दाखवणार्‍या लोकांचे आभार. मला वाटत होतंच ते पुस्तक वाळींब्यांचं नाही, पण हाताशी संदर्भ नसल्यामुळे शोध घेता आला नाही. असो.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या बौद्धिक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवाद नाही.

मृगनयनी's picture

16 Jan 2009 - 10:22 am | मृगनयनी

बाकी आमच्या म्हणण्यानुसार माणसाने जर "जीवनोन्नतीचे सहा सोपान! " ह्याची गरजेपेक्षा जास्त पारायणे केली की तपशिलात अशा ढोबळ चुका घडतात

=)) =)) =)) डॉन जी,
""जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का? :-?

अवान्तर : चहासारख्या उत्तेजक पेयांपासुन दूर राहण्यासाठी कोणत्या व्यसनमुक्ती केन्द्रात नाव नोन्दवावं लागेल ?

:-?

:)

आनंदयात्री's picture

16 Jan 2009 - 2:15 pm | आनंदयात्री

>>""जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का?

हे कसे काय रे डॉन्या ??

मृगनयनी's picture

16 Jan 2009 - 2:28 pm | मृगनयनी

जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का?

आनंद जी, "केतकी पिवळी पडली", "जीवनोन्नतीचे सहा सोपान", "जीवनातील समरप्रसंग", "चान्दीच्या वाटीतुन नातवाचे पेढे", "चहा वगैरे उत्तेजक पेये" इ. शब्दसंपदा असलेली पुलं ची एक व्यक्तिरेखा आपणास बहुधा विस्मृत झालेली असावी.

असो.
प्रस्तुत व्यक्तिरेखा जेव्हा "जीवनोन्नतीचे सहा सोपान!" हे शब्द उच्चारते, तेव्हा ---- खिशातुन एकदम १०-१२ गोट्या खाली पडल्या की काय, असे वाटते.

:)

आनंदयात्री's picture

16 Jan 2009 - 2:31 pm | आनंदयात्री

ती व्यक्तीरेखा कशी विसरणार मृगनयनीजी !

असो .. प्रश्न डॉनास होता ;)

सखाराम_गटणे™'s picture

16 Jan 2009 - 2:39 pm | सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jan 2009 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपावर अशा प्रकारची चर्चा झाली होती. थोड्या वेगळ्या, चाकोरीबाहेरच्या पुस्तकांबद्दल इथे आणि इथे वाचा.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

विसोबा खेचर's picture

17 Jan 2009 - 1:20 am | विसोबा खेचर

अवांतराकरता कृपया खवचा वापर करा..