ज्युडायिक परंपरेतील चातुर्यकथा, व्यक्तिपूजा आणि छळगंड

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Mar 2016 - 12:11 am
गाभा: 

ज्यू, ख्रिश्चन, आणि इस्लाम मधील मुर्तीपुजेचे खंडन करणारी एक प्रभावी चातुर्य कथानक माहित आहे ?

ज्याचा छळ होतो त्याला सहानुभूती मिळते हौतात्म्य प्राप्त होते, हुतात्म्यांची पुढे व्यक्तिपूजा होते, त्या व्यक्तिचा हुतात्म्याचा छळ झाला म्हणून त्याने केलेली कृती केलेला विचार बोललेला अथवा लिहिलेला शब्द सुयोग्य आहे असे ठरवण्यासाठी पुरेसे समजले जाऊ शकते.

अशा हुतात्म्यांच्या व्यक्तिपुजेमुळे त्यांच्या कृती अथवा शब्द या साशंकीत वाटल्या तरी प्रश्न उपस्थित करणे कठीण होऊन जाते. सर्वसाधारणपणे या गोष्टी सर्वच व्यक्ति, समुह, समुदायातून घडतात, केवळ घडतात असे नाही अगदी सामुहीकस्तरावर आणि तेही शतकोंशतके स्मृती स्वरुपात जपल्या जाताना आणि छळ केलेल्यांच्या पुढील पिढ्यांकडून अनेक शतकानंतरही बदलास्वरुप छळकरुन घेण्याची इर्षाही बाळगून असू शकतात किंवा स्वतः केलेल्या छळाचे अपकृतींचे समर्थनार्थ वापरल्या जाताना दिसतात. यात खर्‍या खोट्या मिथकांची गोष्टीस्वरुपांतून घडवलेल्या मानसिक असुरक्षीततेची आणि अविश्वासाची जोड बर्‍याचदा असते.

आपल्याकडे मागील पिढ्यांवर प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूच्या सारख्या अनेक मिथकांचा प्रभाव होता. चित्रपटातला हिरो जास्त हिरो वाटून हवा असेल तर दिग्दर्शक व्ह्लिनला अधिक व्हिलन म्हणून रंगवतो. तसे या मिथकांमध्ये व्हिलन -व्हिलन असेल तर- चांगलाच क्रुर रंगवण्याकडे कल असतो. मिथकांची गंमत अशी असते की मिथक मालिकेची माहिती असेल तरच त्याचा सुप्त प्रभाव पडतो ते माहित नसेल तर प्रभाव पडण्याचा प्रश्न येत नाही.

मिथकांमधील अनेक कथा या चातुर्य कथा म्हणूनसुद्धा प्रभाव पाडत असतात. मोठ्या भावाशी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याची शर्यत लागल्यानंतर आईला प्रदक्षिणा घालणारा गणपतीचे त्याने दाखवलेल्या बुद्धी चातुर्र्यामुळे कौतुक होते मग खरोखरच्या पृथ्वीची प्रदक्षिणा कुणि पूर्ण केली हे बेमालुम पणे श्रोत्याच्या कल्पनेआड जाते. इथे गणेशाचे बुद्धी चातुर्य नाकारायचे नाही. या चातुर्यकथेची सकारात्मक बाजू यात कुठे कुणी कुणाचा छळ केलेला नाही.

ज्युडायिक परंपरेतील -ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, - धर्मांमधला एक पितामह अब्राहमाच्या बर्‍याच मिथक कथा आहेत. त्यातील एक मिथक कथा त्याच्या बालपणातील अथवा तारुण्यातील चातुर्या बद्दल आहे. या कथेत बाल अब्राहमाच्या वडलांचा मुर्तीपुजकांसाठी मुर्ती बनवून देण्याचा/विकण्याचा व्यवसाय का काहीसे असते. त्याचे वडील त्यांनी बनवलेल्या सर्व मुर्ती त्याच्याकडे सोपवून परगावी का कुठेसे जातात. आता ह्या बाल/तरुण अब्राहमाचा मुर्तीपुजेवर विश्वास नसतो. पुढे दोनेक व्हर्शन्स आहेत,

व्हर्शन १ तो सर्वात मोठी मुर्ती शिल्लक ठेऊन इतर मुर्त्या फोडून टाकतो, इतर लोक/ वडील मुर्तीकुठे आहेत हे विचारतात तेव्हा तो मोठ्या मुर्तीने(मोठ्या मुर्तीतील देवाने) छोट्या मुर्तींना फोडून टाकल्याचे सांगतो. इतर लोक असे कसे शक्य आहे असे विचारतात तेव्हा तो म्हणतो मग मुर्तींमध्ये इश्वर असणेही शक्य नाही असे उत्तर देतो.

व्हर्शन २ सर्वच मुर्त्या फोडून टाकतो, इतर लोक/ वडील मुर्तीकुठे आहेत हे विचारतात तेव्हा सर्व मुर्त्यांनी एकमेकांना फोडून टाकले म्हणून सांगतो. इतर लोक असे कसे शक्य आहे असे विचारतात तेव्हा तो म्हणतो मग मुर्तींमध्ये इश्वर असणेही शक्य नाही असे उत्तर देतो.

क्वचीत कथा इथेच थांबवली जाते आणि लोक खजील होऊन निघून गेले म्हणून सांगितले जाते, पण वस्तुतः पूर्ण कथेत बहुधा त्याचे पिताच वरीष्ठांकडे त्याची तक्रार करतात आणि मग वरीष्ठ इतरांच्या मदतीने क्रुर छळ करतात कुठलाही हिरो (दैवीकृपेने) क्रुर छळातून वाचतो तसे बाल/तरुण अब्राहमसुद्धा त्या कृर छळातून वाचतो.

मुर्तीपुजेस रॅशनलाईज करु पहाणारे बरेच भारतीय, एकदा एका राजाकडे एक सत्पुरुष गेले, राजाने मुर्तीत श्रद्धा असण्या बद्दल साशंकता व्यक्त केली, सत्पुरुषाने राजाच्या वडीलांची तस्वीर मागवून घेऊन प्रताडीत केली. अशी स्टोरी देतात. आता अब्राहमाचे वरचे कथानक आणि हे रॅशनलायझेशन पुन्हा वाचा. आता तुम्ही काय म्हणणार विश्वास अथवा श्रद्धा ठेवली म्हणजे त्यात इश्वर असतोच असे नाही. हा निष्कर्ष निघाला की तुमच्यासाठी कोणती कथा जिंकली अब्राहमाची का सत्पुरुषाची ? आता तुम्ही अब्राहमाच्या कथा ऐकलेल्या मुर्तीपूजा न करणार्‍या व्यक्तीला सांगा आपल्या सर्वांचे पुर्वज परंपरेने मुर्तीपुजा करतच होते म्हणजे मुर्तीत इश्वर असल्याबद्दल विश्वास ठेवला पाहीजे, मुर्तीपुजेचा आदर ठेवला पाहीजे. काय म्हणेल तो ? हे दोन तर्क कच्चे पडले ?? आता अद्वैती प्रभावातील लोक जेव्हा कबुली देतात परमात्मा एकच आणि निर्गुण आणि निराकार असतो' आणि मुर्तीपुजा ही केवळ पहिली पायरी आहे. अब्राहमीक पंथाची व्यक्ती काहीच न करता दुसर्‍या निर्गुण निराकार भक्तीच्या पायरीवर आधीच पोहोचली असेल तर मागे का जायचे ?

एकुण कायतर सगुणपुजेचे उपरोक्त रॅशनलचा विरुद्धबाजूकडून तर्क स्विकारला जाण्याचा फायदा मिळतच नाही उलटपक्षी आपण मुर्तीपुजकांप्रमाणे अंधश्रद्ध नसल्याचा अहंभाव येतो. उलटपक्षी अब्राहमच्या उपरोक्त मिथकातून मुर्तीभंजनाचे अप्रत्यक्ष समर्थनच केले जात नाही तर त्याचा मुर्तीपुजकांकडून छळ झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल मनात हौतात्मिक सहानुभूती विराजमान असते आणि मुर्तीपुजकांबद्दल आकस निर्माण होऊ शकतो. सोबतीला धर्मग्रंथाची सगुण प्रतिक पुजा नाकारणारी वचने असतात. निर्गुण निराकार पुजकांना तुम्हीसुद्धा अंधश्रद्ध नाही का हा खडा सवाल केवळ निरीश्वरवादीच विचारु शकतात. आता निरीश्वरवाद्यांना आणि मुर्तीपुजकांना एकाच तागडीत मोजून सैतान म्हणजे इश्वराचे शत्रु ठरवले तर तर्कसुसंगत उत्तर देण्याची गरज संपवता येते. भक्तांच्या उत्पातमुल्यामुळे बहुतांश निरीश्वरवादी आपापला निरीश्वरवाद व्यक्तिगत पातळीवर जपतात. व्यक्तिगत पातळीवर कोण निरीश्वरवादी आहे हे ठरवणे कठीण असते त्यामुळे जो पर्यंत धर्मसंस्थेशी सरळ पंगा घेतला जात नाही तो पर्यंत निरीश्वरवादी सुखरुप असतात. मुर्तीपुजकांचे तसे होत नाही त्यांच्या मुर्ती आणि त्यांच्या श्रद्धा त्यांचे विश्वास सरळ सरळ डिस्प्ले होत असतात. आणि तत्वज्ञानींचे तर्कसुसंगत समर्थन मिळवणे मुर्तीपुजकांना कठीण जात असावे.

अब्राहमाची कथा बहुतांश मुर्ती पुजकांना माहितही नसते कुणाला अपवदाने कळली तरी त्या मिथकाची मुर्तीपुजकांकडून तर्कसुसंग्त चिकित्सा झाल्याचे फारसे पाहण्यात येत नाही. वस्तुतः अब्राहमीक कथेबद्दल तर्कसुसंगत शंका विचारण्यास जागा असतील का ? कथेच्या शेवटी दैवी चमत्काराचे वर्णन येते आणि अप्रत्यक्षपणे एका अंधश्रद्धेचे समर्थन असण्याची शक्यता साफ विसरली जात असेल का ? मुख्य म्हणजे वस्तु दुसर्‍याच्या मालकीची, त्या वस्तु बद्दल त्याचे काय विश्वास आणि श्रद्धा असाव्यात हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न. या कथेत सगळ्यात मोठ हनन होत ते म्हणजे व्यक्तिस्वांतंत्र्याचे, श्रद्धा विशीष्ट स्वरुपातच असली पाहिजे आणि ती माझ्याच/ आमच्याच तर्काशी मिळती जुळती असली पाहीजे हा दुराग्रह. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आधी स्वतः इतरांना त्यांच्या श्रद्धेवरुन जाच करावयाचा आणि त्याला आलेल्या प्रत्यूत्तरातून झालेल्या छळाकडेच बोट दाखवायचे आपण कुणाचातरी त्यांच्या व्यक्तिगत श्रद्धेवरुन जाच केला होता हे या कथेत कुठेच सांगीतले जात नाही आणि हि बाजू श्रोत्यांच्याही बेमालुम कल्पने आड होते.
मुर्तीत इश्वर नसतो हे इतरांच्या मुर्ती भंजनाचे समर्थन होऊ शकत नसावे. इश्वराने मुर्तीपुजकांना (आणि इतरांनाही) केव्हा कुठे कसे प्रसन्न व्हावे हा इश्वराचा प्रश्न आहे. मुर्ती भंजन होत असताना त्या मुर्तीत रहायचे का नाही आणि मुर्ती भंजकाला पृथ्वीवर अडचणीत आणायचे का मरणोपरांत न्याय करावयाचा हि इश्वराची मर्जी. म्हणजे मुर्ती भंजक एका अर्थाने इश्वराचे स्वांतत्र्य कमी करत नसतात किंवा कसे अशी शंका घेण्यास जागा असावी. काही मिथकांची एक गंमत बाजू म्हणजे मुर्ती अथवा मुर्तीच्या आत किंवा मुर्ती बनवणार्‍याच्या आत सैतान असतो आणि हा सैतान निराकार इश्वराचा शत्रु असतो. आता त्यांच्याच तर्कानुसार जर एखादी मुर्ती किंवा व्यक्तीच्या आत जाण्याची क्षमता जर खुद्द इश्वराकडे नाही ती सैतानाकडे कशी येईल ? (अवांतर आणखी एक मुद्दा पृथ्वीवरील मानवी जिवनालाच कैक लाख वर्षे झाली आणि क्षणार्धात काहीही करु शकणार्‍या सर्वशक्ती संपन्न इश्वराला एवढ्या लाखोवर्षात सैतानचे भूत बंदीस्त करण्याची क्षमता नसेल असे बहुतेक इश्वरवादी म्हणू धजणार नाहीत) असो. काही झाले तरीही मुर्तीपुजकांमुळे मुर्ती पुजा न करणार्‍यांना त्रास न होऊ न देण्या इतपत चमत्कार क्षमता इश्वरात अशी अथवा तशीही विराजीत असेल तर मुर्ती पुजा न करणार्‍यांनी मुर्तीपुजकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात ढवळा ढवळ का करावी ?

एकदा का सगुण प्रतिक पुजेच्या भंजनाचे प्रमाणपत्र देणार्‍या श्रद्धा धर्मसंस्थेकडून मिळाल्या की झाले या न्यायाने असंख्य व्यक्तिंच्या व्यक्तिगत श्रद्धा नाकारण्याची मालिकाच पुढील काळात दिसते असे नाही तर त्या सोबतच अनेक छोट्या मोठ्या संस्कृतींची आपापली सांस्कृतीक विवीधता होलीअर दॅन दाऊ म्हणजे आम्ही तुमच्या पेक्षा पवित्र या न्यायाने नाकारली गेलेली दिसते. जिथे स्थानिक संस्कृतीत विषमता आहेत अथवा अंधश्रद्धांना विचहंटींगसारखे अघोरी रुप आहे तेथे अंंधश्रद्धांना लगाम घातलाच पाहीजे.

मुर्तींची पुजा होणे त्यांच्या अंधश्रद्धा जपल्या जाण्याचे त्यांचे स्वांतत्र्य अबसोलुय्ट नाही पण होताहोईतो स्विकारणे याचे प्रथमदर्शनी मह्त्व वाटत नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पोषक विवीधतेचा आदरकरणारी संस्कृती उभारताना कलेचा संस्कृतींचा आणि अभिव्यक्ती सन्मानाच्या दृष्टीने 'एकम सत विप्र बहुधा वदंती' हि भूमिका सर्वांनी का घेऊ नये ?

साहनाजींच्या अलिकडील धागा लेखातून 'एल्स्ट यांच्या या लेखाची' माहिती झाली जिज्ञासूंनी तो नक्कीच वाचावा मुख्य म्हणजे आपापला सांस्कृतीक वारसा जपण्याचा अधिकार आणि महत्वाचे वर्णन एल्स्टने अप्रतिम केले आहे ते नक्किच लक्षात घ्यावे.

* हे सुद्धा पहा मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस

चुभूदेघे.

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

25 Mar 2016 - 9:30 am | सामान्य वाचक

मूर्ती मध्ये देव असतो का नाही
यापेक्षा ती मूर्ती पुजाणाऱ्या माणसाच्या मनात श्रद्धा असते का नाही
याच्या उत्तराने पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळते