चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

गरिब चिमणा's picture
गरिब चिमणा in काथ्याकूट
18 Mar 2016 - 1:13 am
गाभा: 

चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

18 Mar 2016 - 1:17 am | उगा काहितरीच

कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.

याची गरज नव्हती . धागा उडवण्याजोगं काहीच नाहीए की धाग्यात. मिपाकर संसदीय भाषेतच चर्चा करतात हो.
बाकी , चर्चा वाचण्यास उत्सुकच आहे.

अगदी ज्यु लोकांपासून मंगोलिअन लोकांपर्यंत कोणत्याच वंशाचा मूळपुरुष सापडलेला नाही.डिएनए परीक्षा केल्यास बय्राच पुराव्यानंतर मूळ स्थान शोधता येवू शकते.चारपाच हजार वर्षांपुर्वीचे मानवी अवशेष त्यासाठी लागतात. ते मिळणं कठीण.बाकी वरच्या ठेवणीत स्थित्यंतरं होतच असतात.
सत्तरच्या काळात टाइम्स ग्रुपच्या इलस्टेटिड वीकली'चे संपादकपद खुशवंत सिंगने स्विकारल्यावर पहिल्यांदाच एक चित्पावन ब्राह्मण विशेषांक काढला होता.त्यानंतर वीकलीचा खप धडाधड दहापटीने वाढला आणि खु०सिंगची निवड खरी ठरली..अंक अर्थातच संग्राह्य ठरला होता याची आठवण झाली.why are chitpawan bramhins becoming ugly- हा लेख ही त्यात होता.तिरळेपणा,दात पुढे ही लक्षणे यावर एक आढावा होता.

उपयोजक's picture

19 Mar 2016 - 8:42 am | उपयोजक

हा अंक मी पाहिला होता. तो आंजावर कुठे मिळे,आणि हाअंक खुप जुना असल्याने धागाकर्त्याला जी माहिती हवी आहे ती यात नाही त्यांचे सणवार प्रथा प्रसिध्द व्यक्ती एवढिच माहिती त्यात आहे

उपयोजक's picture

19 Mar 2016 - 8:42 am | उपयोजक

हा अंक मी पाहिला होता. तो आंजावर कुठे मिळे,आणि हाअंक खुप जुना असल्याने धागाकर्त्याला जी माहिती हवी आहे ती यात नाही त्यांचे सणवार प्रथा प्रसिध्द व्यक्ती एवढिच माहिती त्यात आहे

चलत मुसाफिर's picture

18 Mar 2016 - 7:33 am | चलत मुसाफिर

ब्राह्मणांच्या अनेक पोटजाती भारतात आढळतात. फक्त चित्पावन वेगळे कसे काय?

गोरा वर्ण, घारे डोळे, उंची ही शारीरिक वैशिष्टये कर्नाटकातील कोडवा, उत्तरेतील पंजाबी हिंदू, काश्मिरी पंडित, जाट या समूहातही कमीजास्त प्रमाणात आढळतात. बुद्धिमत्ता, नीतिमत्ता हे व्यक्तिगत गुण आहेत. ती काही एखाद्या वंशाची मक्तेदारी नाही. बुद्धिमान/ चारित्र्यवान अब्राह्मण असतात तसेच मठ्ठ/ अनैतिक ब्राह्मणही असतात.

नाखु's picture

18 Mar 2016 - 7:57 am | नाखु

चिमणा नावालाच गरीब आहे आणि मोठा गाजलेला खारपुंगव आहे.

तेव्हा "सपट लोशन" ची जाहीरात नक्की चालू राहील.

गॅलरी प्रेक्षक बाकडा ७
अभ्या ते शेंगाचं पा़कीट दे आणि वप्याले जागा धर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2016 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे

मोठा गाजलेला खारपुंगव आहे

=)) =)) =))

चलत मुसाफिर's picture

19 Mar 2016 - 11:46 pm | चलत मुसाफिर

येऊ द्या अजून शेंगा!

साहना's picture

18 Mar 2016 - 9:11 am | साहना

बुद्धिमत्ता, चारित्र्य इत्यादीवर कुणाचीही मक्तेदारी नसली तरी बहुतेक अंशी हे सर्व गुण वाशिंक असतात (सुमारे ५०%, पहा Blank Slate लेखक : Steven Pinker). जातीवार बुध्यांक चाचणी झाली नसेल तरी बुध्यांक वंशा वंशा प्रमाणे अतिशय बदलत जाते आणि भारतीय जाती जनुकीय दृष्ट्या वंशा प्रमाणेच आहेत.

माहितगार's picture

18 Mar 2016 - 10:49 am | माहितगार

साहनाजींचे वेगवेगळ्या धाग्यातील काही प्रतिसाद एकत्र करुन वेगळा धागा निघु शकेल. काळाच्या ओघात वेगळ्या धाग्यातून उहापोह करुयात.

२०० BC मध्ये बेने जू लोक आपला जीव वाचवून इराण मधून पळून गेले. त्यांची बोट कोकण किनार्या जवळ बुडाली आणि फक्त ७ लोक वाचले. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारून चित्पावन जातीचा पाया रचला. अर्थांत बेने जू हे मुलांत मालिश वाले होते. हे लोक संस्कृत वगैरे शिकून हिंदू मधील सर्वांत उच्च शिक्षित ब्राम्हणाचा दर्जा प्राप्त करतील कि नाही ह्या बद्दल संशोधकांना शंका आहे.

काहीच्या मते परशुरामांना १२ विदेशी लोक मृत अवस्थेंत कोकण किनार्यावर सापडले. त्यांनी ह्या लोकांना जिवंत करून चित्पावन ब्राम्हणाचा दर्जा दिला.

जनुकीय अभ्यासाने हे सिद्ध झाले आहे कि चित्पावन ब्राह्मण इराण प्रदेशांतील काही जमातीशी साधर्म्य ठेवून आहेत.

ह्या सर्व अख्याहीका असून शास्त्रीय आधार ० आहे.

भारतातील जाती मध्ये genetic साम्य आहे. द्विज आणि अद्वीज जाती genetic दृष्ट्या एक मेकां पासून अत्यंत वेगळ्या आहेत हे सिद्ध झालेले आहे.

सुनील's picture

18 Mar 2016 - 9:35 am | सुनील

ह्या सर्व अख्याहीका असून शास्त्रीय आधार ० आहे

हे वाक्य सुरुवातीला टाकले असतेत तर, पुढील प्रतिसाद वाचायचे कष्ट वाचले असते!!

माहितगार's picture

18 Mar 2016 - 1:14 pm | माहितगार

भारतातील जाती मध्ये genetic साम्य आहे. द्विज आणि अद्वीज जाती genetic दृष्ट्या एक मेकां पासून अत्यंत वेगळ्या आहेत हे सिद्ध झालेले आहे.

sandarbha hava

आपण माझ्या साठी "शिंच्या" हा शब्द प्रयोग केला आहे. मराठीचे ज्ञान जुजबी असल्याने कृपया ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करावा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Mar 2016 - 8:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे " शिंदळीच्या" या शब्दाचे लघुरुप आहे. आणि ते एका शिवीप्रमाणे वापरतात. :)

बाकी कोण कोणास म्हणाले वगैरे तुम्ही पाहुन घ्या.

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 9:26 am | नाना स्कॉच

पहिल्या प्रतिसादात आपण म्हणता

जातीवार बुध्यांक चाचणी झाली नसेल तरी बुध्यांक वंशा वंशा प्रमाणे अतिशय बदलत जाते.

दुसऱ्या प्रतिक्रियेत आपण म्हणता

भारतातील जाती मध्ये genetic साम्य आहे. द्विज आणि अद्वीज जाती genetic दृष्ट्या एक मेकां पासून अत्यंत वेगळ्या आहेत हे सिद्ध झालेले आहे.

**************************************************

दोन्ही मधे आपणांस कंट्राडिक्शन जाणवत नाहीये का?? बरं दूसरे विधान तुम्ही ठाम मानत असाल तर त्या संबंधी झालेल्या रिसर्चचा विदा दिल्यास बरे पडेल आम्हाला अभ्यास वाढवायला. कसे??

द्विज अद्विज जाती वेगळ्या म्हणजे कश्या वेगळ्या आहेत एकमेकांपासुन म्हणे ?? तुम्ही म्हणता जनुकीय दृष्ट्या द्विज अद्विज वेगळे असतात तर हा फरक नेमका कुठल्या जनुकांत आहे? ती जनुके कुठले ट्रेट्स डिफाइन करतात, ह्या ट्रेट्स चे प्रजेंस अन एब्सेंस हे "वॉटर टाइट कंपार्टमेंटलाइज" झालेले आहेत की दोन्ही कडले काही तथाकथित स्पेशल ट्रेट्स अपवाद का असेना एकमेकांत आढळून आले आहेत?

ह्यावर काहीतरी ठोस सांगावे / विदा द्यावेत ही विनंती

कळकळीची विनंती :- मिपावरील डॉक्टर्स अन बायोटेक जेनेटिक्स मधील एक्सपर्ट्स ने आपली मते आवर्जून नोंदवावीत ही विनंती, ह्या विषयावर निरपेक्ष अन वैज्ञानिक माहीती आवश्यक आहे असे वाटते

हो मी लिहिताना चूक केली. माझा अर्थ होता कि

People of each caste are genetically different from people of other caste. Gentic clusters have one to one mapping between castes.

मुळ पेपर मी वाचला नाही ह्या पेपर चे secondary presentation मी पहिले होते. शोधून शोधून हे लिंक सापडले जे मूळ पेपर discuss करत आहे . आपण ते वाचू शकता: https://manasataramgini.wordpress.com/2005/12/20/socio-genetic-stratific...

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 10:58 am | नाना स्कॉच

आपण दिलेली लिंक बघितली, त्यात मला काही आक्षेप आहेत ते खालील प्रमाणे

1. ही कुठल्याही जनुकीय अनुसंधान करणाऱ्या वैज्ञानिकाची किंवा संस्थेची वेबसाइट नसुन एक ब्लॉग उर्फ़ अनुदिनी आहे. बरं लिहिणाऱ्याचे नाव वगैरे मुद्दे सोडता येतील, पण लेखाच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर वजा सूचना आहे ती म्हणजे "मुळ पेपर मधील (सेनगुप्ता ह्यांचा पेपर) नुष्कर्ष अन मेथोडोलॉजी गोलमोल असल्यामुळे आम्ही परत एकदा त्याचे पृथक्करण करतो आहोत, मुळात भूमिका इथुनच संदिग्ध व्हायला सुरुवात होते पण तो मुद्दाही बाजूला ठेवुयात आपण, पुढे, ह्या ब्लॉगच्या अबाउट मी मधे हा ब्लॉग कोण्या एकाच्या मालकीचा नसुन , त्यावर प्रकाशित मतांशी ब्लॉग मालक (नावगाव काहीच कळले नाही) सहमत असेलच असे नाही थोडक्यात वंगाळ काही होता जबाबदारी त्याची नाही हे प्रथम दिसले. आता होतंय कसं की मुद्दे (लेखातले) चुक का बरोबर हा तांत्रिक भाग बाजुलाच राहतो. त्या आधी ब्लॉग ची वैलिडिटी काय हाच प्रश्न प्रथमतः डोक्यात येतो. एक असा ब्लॉग ज्याचे मालक कोण ते माहीती नाही, त्यावर लेखकाने (खास त्या लेखाच्या) सेनगुप्ता ह्यांच्या पेपर मधे काय गोलमोल होते ते सांगितले नाही, फ़क्त ते गोलमोल असुन आम्ही त्याचे पुनःपृथक्करण करतोय असे जाहीर केले आहे, बरं ते किंवा लेखात पुढे ओघाने येणारी आकडेवारी ह्याची जबाबदारी खुद्द ब्लॉग मालक घेणार नाही म्हणतात. त्यामुळे मला दुर्दैवाने हा विदा मान्य नसल्याचे म्हणावे वाटते आहे.

क्षमस्व, पण जर कुठे आधिकारिक विदा मिळाला तर द्यावा ही नम्र विनंती, कारण मुद्दा नाजुक आहे, विदा अन शब्द जपून वापरणे गरजेचे आहे असे वाटते.

रच्याकने

People of each caste are genetically different from people of other caste. Gentic clusters have one to one mapping between castes.

प्रत्येक जातीचे जेनेटिक क्लस्टर वन ऑन वन मॅप होतात म्हणजे काय होते??? जात्यंतर्गत वन ऑन वन मॅपींग होते का? असल्यास जेनेटिक रीडनडन्सी कड़े तो अंगुलीनिर्देश आहे का?? ही रीडनडन्सी साइक्लिक असते की एब्सट्रेक्ट?? ह्याचा अर्थ जर अंतर्जातीय लग्न झाले तर होणाऱ्या संतती मधे ते वन ऑन वन मॅपींग तुटेल , रीडनडन्सी ब्रेक होईल अन ती संतती आई वडिलांच्या इंडिपेंडेंट जीनपूलच्या क्लबिंग मुळे अजुन रोबस्ट, सशक्त जीन्सची धनी होईल ?? की त्याच्या उलटे होईल, आपणांस काय वाटते??

मुळात हा विषय खुप नाजुक आहे म्हणून मी प्रश्नांवर प्रश्न फैरी झाड़तोय ! कारण मला विषयाबाबत जास्त गती नाही, आपल्याशी चर्चा करता येऊ शकेल ह्या आशेने लिहितोय, पर्सनली घेऊ नयेत ही विनंती वेगळी सांगणे न लगे __/\__

साहना's picture

19 Mar 2016 - 1:17 am | साहना

मला ह्या विषयांत आपल्याप्रमाणे गती नाही. वरील लिंक मूळ पेपर चे संदर्भ देत असल्याने मी ते लिंक टाकले. मूळ पेपरचे विश्लेषण कालावाई वेंकट ह्या लेखकाने present केले होते आणि त्या वेळी मी तिथे होतो. कालावाई वेंकट ह्यांनी आपल्या पुस्तकांत जास्त बारकाईने विषयाचे विश्लेषण केले आहे. (What Every Hindu Must Know About Christianity). कालावाई Twitter वगैरे वर active असून आपल्या प्रश्नाची उत्तरे कदाचित तो देवू शकेल, त्याला हाय विषयाचा खोलांत अभ्यास आहे.

मुळ पेपर सापडला वाचन करुन नन्तर लेख लिहेन

http://genome.cshlp.org/content/13/10/2277.full.pdf+html

नाना स्कॉच's picture

19 Mar 2016 - 8:55 am | नाना स्कॉच

नक्कीच वाचायला आवडेल :) शुभेच्छा !

sagarpdy's picture

18 Mar 2016 - 10:18 am | sagarpdy

जेनेटिक्स - आर्यन
http://archaeologyonline.net/artifacts/genetics-aryan-debate

काही पूरक माहिती. याप्रमाणे तरी "आधीच निष्कर्ष न ठरवता" केलेल्या जनुकीय अभ्यासानुसार आर्य-द्रविड, श्रेष्ठ-कनिष्ठ जाती यांत फार फरक दिसून येत नाही आणि या आर्य-चित्पावन या बहुतकरून "थेअरी" पलीकडे काही नाहीत.

प्रमोद देर्देकर's picture

18 Mar 2016 - 9:33 am | प्रमोद देर्देकर

अरे चिमणा (मोगा) उगी कशाला गरळ ओकतोयंस नी हिंदुंच्या कोणत्यही जातीविषयी तुला का एवढी काळजी तरी पण इत्यंभुत माहीती हिती साठी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही साईट बघ किंवा सहज सुचलं म्हणुन ही अनुदिनी वाच. तुर्तास एवढं पुरे आहे.

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 11:08 am | नाना स्कॉच

त्याच जातीच्या वेबसाइटवर अन त्याच जातीच्या माणसाने लिहिलेली अनुदिनी ह्यात विज्ञान नसेल असा माझा दावा नाही, मात्र त्यात (असलेच) तर विज्ञान, श्रद्धा, पुराणकथा, वैयक्तिक बायस, आवडीनिवडी ह्याचे कॉकटेल असण्याची शक्यता जास्त आहे!

(अर्थात चिमणा ह्यांना डोज़ म्हणून ते ठीक आहेच!) :P

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2016 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख

सध्या ब्रिगेडींची मजा आहे बुवा

चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही

दिवेआगरच्या ताम्रपटात षडंगवि 'घैसास' ह्या चित्पावनाचा उल्लेख आला आहे. हा ताम्रपट १० /११ व्या शतकातील आहे. षडंगवि म्हणजे ६ विद्यांचा जाणकार.

हेमंत लाटकर's picture

18 Mar 2016 - 9:57 am | हेमंत लाटकर

कुठे तरी एेकले होते ही इंग्रजांची करामत आहे.

कपिलमुनी's picture

18 Mar 2016 - 10:27 am | कपिलमुनी

रुपकुंडा मधील हाडांचे डीएनए चित्पावनी आहे
संदर्भ :http://www.misalpav.com/node/28816

१२०० वर्षापूर्वी चित्पावन होते म्हणे.

आदूबाळ's picture

18 Mar 2016 - 12:34 pm | आदूबाळ

मुनिवर, याची लिंक देता का प्लीज? अविश्वास म्हणून नव्हे, पण रुपकुंड प्रकरणावर शक्य तितकी माहिती साठवून ठेवत असतो.

डेक्कन कॉलेजमधल्या दोन संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार ते डीएनए "दक्षिण महाराष्ट्रातल्या एका जातीचं" आहे अशा अर्थाची शेवटची बातमी संग्रही आहे. ते चित्पावन डीएनए आहे ही बातमी दिलीत तर एक वर्तुळ पूर्ण होईल. (माझ्या डोक्यात.)

कपिलमुनी's picture

18 Mar 2016 - 7:15 pm | कपिलमुनी

मी ही माहिती त्या धाग्यातच वाचली आहे.
प्रत्यक्ष जर्नलची किंवा डॉक्युमेंटरीची लिंक नाही.
स्पार्टाकस यांचाकडे मिळेल
" त्यांचे लिखाण संदर्भावर आधारीत असते"

आदूबाळ's picture

18 Mar 2016 - 7:49 pm | आदूबाळ

" त्यांचे लिखाण संदर्भावर आधारीत असते"

आय नो, आय नो ;)

उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रुपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सागांडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन सॅंपल्सचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[६][७]

यातल्या [६] नंबरावर हे दिसलं " . " आणि [७] नंबरावर " Template error: argument शीर्षक is required. "

संदर्भ नाहीत.

ते मोगा नाही आहेत हो. नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि आहेत. हे घ्या.
http://www.aisiakshare.com/node/4967
ह्या गरीब चिमण्याचे मुळ कळाले.

आनन्दा's picture

18 Mar 2016 - 11:43 am | आनन्दा

हा प्रतिसाद उडवण्यात यावा अशी संपादकांना विनंती.

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 12:01 pm | टवाळ कार्टा

का बुआ????

आनन्दा's picture

18 Mar 2016 - 8:00 pm | आनन्दा

डु आयडी हा डु आयडी आहे असे कळले की सगळी मजा निघून जाते. म्हणून तो उडवावा अशी विनंती केली.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 5:19 pm | श्रीगुरुजी

ते मोगा नाही आहेत हो. नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि आहेत. हे घ्या.
http://www.aisiakshare.com/node/4967
ह्या गरीब चिमण्याचे मुळ कळाले.

नानांचा कॉलेजात असताना एखाद्या गोर्‍या, घार्‍या चित्पावन मुलीवर क्रश असावा. त्यांनी धाडस करून प्रपोज केल्यावर तिने झिडकारले असावे. त्या रागातून हा धागा निघालेला दिसतोय.

गरिब चिमणा's picture

18 Mar 2016 - 5:29 pm | गरिब चिमणा

तसं गुरुजी तुमच्यापुढे सांगायला काय हरकत नाही, पण होता आमचाही असा क्रश,आणि झिडकार्ले वगैरे काही नाही आम्हाला .उलट छान मैत्री जमली तिच्याशी.

गरिब चिमणा's picture

18 Mar 2016 - 5:34 pm | गरिब चिमणा

आणि तिची मुले आता मला मामा म्हणतात तेव्हा लक्ष लक्ष इंगळ्या डसतात काळजाला तो भाग वेगळा,असु देत ,हळवा कोपरा आहे आमच्या मनाचा, जास्त उघड करत नाही आणि तसाही त्याचा हा धागा काढण्याशी काही संबंध नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 6:46 pm | श्रीगुरुजी

असू दे नानासाहेब. भावना समजल्या. आता माईंनाच चित्पावन समजून गोड करून घ्या आणि कालिजातल्या त्या चित्पावन ताईला राखीपौर्णिमा आणि भाऊबीजेला घसघशीत ओवाळणी द्यायला विसरू नका. भाचे मंडळींचेही भरपूर लाड, कोडकौतुक करा.

viraj thale's picture

18 Mar 2016 - 11:03 am | viraj thale

नवे संकेतस्थळ

शरद's picture

18 Mar 2016 - 11:36 am | शरद

येथे आपणास काही माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/18439
शरद

पैसा's picture

18 Mar 2016 - 11:39 am | पैसा

Homo sapiens

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

Homo sapiens sapiens

करेक्ट! आमचे गावडे सर म्हणतात तसे हे सारे जातीय अस्मिता वगैरे सारे फोल आहे, आपण सारे मुळचे अफ्रिकन आहोत !

आम्ही तर म्हणतो , आपण सारे अमीबीयन आहोत किंव्वा त्याही पुढे जाऊन हायड्रोकार्बन आहोत :)

पैसा's picture

18 Mar 2016 - 12:04 pm | पैसा

=))

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 12:22 pm | तर्राट जोकर

हायड्रोकार्बन.... ठ्ठो!

__/\__

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 3:29 pm | टवाळ कार्टा

अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही मिळूंदे....कमीच वाटतो =))

sagarpdy's picture

18 Mar 2016 - 3:51 pm | sagarpdy

ठ्ठो!

__/\__

सूड's picture

18 Mar 2016 - 4:04 pm | सूड

__/\__

=))

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 4:24 pm | प्रसाद गोडबोले

कोणता ?

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 7:44 pm | टवाळ कार्टा

हा जेनुईन प्रश्न का खवचटपणा??? पोपशास्त्र्यांकडून अश्या घोर अज्ञानाची अपेक्षा नव्हती

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 7:57 pm | प्रसाद गोडबोले

जेनुईन प्रश्न आहे हो .

रामदास's picture

19 Mar 2016 - 7:48 am | रामदास

हायड्रोकार्बन म्हटलं तरी चर्चा करणारे करणार ते असे
"मी किटोन वंशातला आहे .
तुम्ही ?
अल्डीहाईड का ?
आमचं ऑक्सीडाइज्ड अल्कोहलवाल्यांशी जमत नाही .
ते उत्तरेकडले पर क्लोरो वगैरे तर फारच वेगळ्या जाती आहेत."

सुबोध खरे's picture

19 Mar 2016 - 10:39 am | सुबोध खरे

काजल (KAJAL) आणि काजोल(KAJOL) मध्ये फरक काय?
काजल (KAJAL) अल्डीहाईड आहे
आणी
काजोल(KAJOL) अल्कोहोल आहे.
हा जोक आठवला

अजया's picture

18 Mar 2016 - 12:31 pm | अजया

=)))))

सुबोध खरे's picture

18 Mar 2016 - 1:23 pm | सुबोध खरे

मानव वंश शास्त्राच्या अभ्यासातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी एन ए ची तपासणी कशी आणी का करतात याचा एक खुलासा.
पुरुषाच्या प्रत्येक पेशीत एक X आणी एक Y हे गुणसूत्र असते. आणी प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक पेशीत दोन X गुणसूत्र असतात.
यापैकी पुरुषाचे Y गुणसूत्र हे फक्त बापाकडून येते आणी ते त्याच्या बापाला त्याच्या बापाकडूनच येते. आईकडे Y गुणसूत्र नसल्याने आईकडून ते येण्याची शक्यता नाहीच. म्हणजेच पिढ्या न पिढ्या Y गुणसूत्र अबाधित अवस्थेत मुलाकडे आणी मुलाच्या मुलाकडे आणी मुलाच्या मुलाच्या मुलाकडे असे संक्रमित होत जाते. Y गुणसूत्राचे X किंवा इतर गुण सुत्राशी अदलाबदल होण्याचाही संभव नसल्यामुळे हे UNADULTRATED (भेसळ विरहीत) पुढच्या पिढीतील पुरुषाकडे जाते.
X गुणसूत्र पुरुषाला त्याच्या आईकडून मिळते, आणी आईला ते गुणसूत्र तिच्या आई आणी वडील अशा दोघांकडून मिळते.वडिलांना ते त्यांच्या आईकडून मिळते तर तिच्या आईला परत ते तिच्या आई वडिलांकडून मिळते. म्हणजे X किंवा इतर गुणसूत्रांच्या उगम कडे अजून अजून फाटे फुटत जातात आणी त्याच उगम शोधणे अशक्य होत जाते.
यात होणारा बदल म्हणजे फक्त उत्परिवर्तन(MUTATION) याचा दर ०. ०१ % असा असतो( हा आकडा मला नक्की आठवत नाहीये) म्हणजे साधारण १०० पिढ्या नंतर त्यात काही बदल होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या अवशेषाचे जेंव्हा पृथक्करण केले जाते तेंव्हा त्यातील पुरुषाच्या पेशींच्या केंद्राचा बाहेरील उर्जाकेंद्रातील( MITOCHONDRIA) डी एन ए मधील Y गुणसुत्राचा अभ्यास केला जातो. जेंव्हा दोन जातींचा किंवा जमातींचा अभ्यास करतात तेंव्हा या Y गुण सूत्राचा अभ्यास करून त्यातील साम्य किंवा फरक विषद केला जातो.
चित्पावन माणसांची Y गुणसूत्रे यांची तुलना केली तेंव्हा त्यांचा पोर्तुगीज किंवा स्पानिश किंवा इंग्रजांशी कोणताही संबंध आढळलेला नाही. केवळ चिखल फेकीसाठी काही लोकांनी चित्पावन हे "वरील" लोकांची अनौरस संतती आहे अशी अवि उठवली होती ते साफ खोटे ठरून आले आहे. चित्पावन लोकांची गुणसूत्रे बेने इस्रायली या ज्यू लोकांशी मिळती जुळती असल्याची आढळून आली आहेत. त्याहुनही जास्त म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मधील इस्टोनिया, लाटव्हिया लीथुआनिया या बाल्टिक देशांच्या लोकांशी बरेच जास्त मिळते जुळते आढळले. त्यामुळे आजच्या चित्पावनांचे वंशज त्या देशातून भ्रमण करीत भारतात पोहोचले असा एक मतप्रवाह आहे.
http://www.liquisearch.com/chitpavan/origin/dna_analysis
CHITPAVANISM- DR JAY DIXIT.
http://www.rootsforreal.com/dna_en.php

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Mar 2016 - 1:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुर्ण प्रतिसाद दोनदा वाचला. योग्य प्रकारे शास्त्रिय भाषेत विवरण केले आहे. लिंक वाचुन बघतो आता.
बाकी कुठली एक जात, धर्म वा पंथात जन्माला आला म्हणुन त्याचा बुद्धिमत्तेशी किंवा उच्च नीच स्थानाशी संबंध जोडणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण वाटते.

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 3:34 pm | टवाळ कार्टा

म्हणून मुलांना वंशाचा दिवा म्हणतात काय? :)

हो म्हणजे मला पण हे वाचून जाम गंमत वाटली... मुलगा खरेच वंश चालवतो म्हणायचे.

कपिलमुनी's picture

19 Mar 2016 - 8:07 am | कपिलमुनी

हे डीएनए वगैरे पूर्वजांना अगोदरच ठाउक होता तर

टनाटन जोरात

सुबोध खरे's picture

18 Mar 2016 - 1:24 pm | सुबोध खरे

वंशज नव्हे पूर्वज
क्षमस्व

अद्द्या's picture

18 Mar 2016 - 3:20 pm | अद्द्या

मुळात एक तर कुठली जात / धर्म कुठून आला आणि कुठे बुडाला याने काय फरक पडतो ? त्यातल्या त्यात या धाग्याचा विषय . डि-ग्रेड सारख्या लोकांची ३ रुपयांची पिवळी पुस्तके वाटणे या पेक्षा जास्त काहीच महत्व नाही.

चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
>>

कोण कसा दिसतो याने काय फरक पडतो ?

* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?

अभ्यास वाढवा

*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
असेल ७-८-९-१०-११-१२ हजार वर्ष पूर्वी . who cares ,

* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???

जात ठरवणाऱ्या लोकांना मासे खायला आवडायचे, या लोकांनी सुरमई आणि शिंपले करून घातले, त्यामुळे असं सगळं झालं बघा

जात ठरवणाऱ्या लोकांना मासे खायला आवडायचे, या लोकांनी सुरमई आणि शिंपले करून घातले, त्यामुळे असं सगळं झालं बघा

=))

वाईट!!

अभ्या..'s picture

18 Mar 2016 - 4:19 pm | अभ्या..

जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे?

हे कधी ठरले??

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 4:23 pm | प्रसाद गोडबोले

अय्य सोलापुर , थंड घे ;) =))

अभ्या..'s picture

18 Mar 2016 - 5:37 pm | अभ्या..

राह्यलं.
.राम समर्थ.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

शिवाय नमः

प्रचेतस's picture

18 Mar 2016 - 6:46 pm | प्रचेतस

पंढरीनाथ महाराज की जय.

नाखु's picture

21 Mar 2016 - 9:05 am | नाखु

जगदगुरु कुंथुनाथाय नमो नमः!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Mar 2016 - 10:43 am | अत्रुप्त आत्मा

हुरर्रर्रर्रर्रर्रर्र !

अद्द्या's picture

18 Mar 2016 - 4:25 pm | अद्द्या

आयला .

परवा तर मटन खाताना ठरलं न रे .

अजया's picture

18 Mar 2016 - 4:26 pm | अजया

=)))

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2016 - 4:26 pm | श्री गावसेना प्रमुख

अभिराम दीक्षित ह्यांच्या ब्लॉग वर त्यांनी असे लिहिले आहे कि सर्व मानवांची आई एकच आहे,त्यासाठी त्यांनीRef : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins हा संदर्भ दिला आहे,http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post_17.html?m=1 हि त्यांच्या ब्लॉग ची लिंक ।जाणकारांनी ह्यावर त्यांचं मत द्यावं

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2016 - 6:58 pm | श्रीरंग_जोशी

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती हा लेख डॉ दिक्षितांनी (मिपावरचे राजघराणं) मिपावरही प्रकाशित केला आहे.

धाग्याचे शीर्षक पाहून याच लेखाची आठवण झाली होती.

अवांतर - चित्पावन म्हणजे कोण हे मला मिपावरच कळले. माझ्या नातेवाईकांमध्ये अन मित्रांमध्ये अनेक कोकणस्थ ब्राह्मण आहेत. त्या सर्वांच्या तोंडून चित्पावन हा शब्द कधीच ऐकला नव्हता.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2016 - 8:25 pm | श्री गावसेना प्रमुख

धन्यवाद ,पण गरीब चिमणा ह्यांच्या नानासाहेब नेफळे ह्या आजोबांनी तो लेख वाचलेला असूनही ह्यांना हा प्रश्न का पडावा। कि त्यांच्या सारखा ह्यांनीही त्या लेखाच्या चित्रांच्या कंगव्याने भांग पाडला।

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2016 - 8:26 pm | अत्रुप्त आत्मा

@विज्ञानाच्या चष्म्यातून जाती >> सदर लेखाचा मी अनेक टनाटनी लोकांना प्रतिवाद करायला दिला होता. अजूनही देत असतो. आणि अर्थातच यापुढेही देईन. पण कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2016 - 8:40 pm | प्रसाद गोडबोले

पण कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.

हो ना , आम्हीही सुधारित सत्यनारायण पुजा कित्येक पुरोगामी लोकांना ऐकवली पण ती करुन घ्यायला कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2016 - 6:29 am | अत्रुप्त आत्मा

तुमच्याकडे आधी कुणी येणच शक्य नाही!

हेमंत लाटकर's picture

18 Mar 2016 - 6:09 pm | हेमंत लाटकर

प्रत्येकजण आम्ही जात-पात मानत नाहीत म्हणतात. पण मुलीच्या दुसर्या जातीतील मुलाशी लग्न करण्यास सगळेच विरोध करतात.

या वाक्यात शेप्रेट धाग्याचे पोटेन्शियल आहे काका!

होबासराव's picture

18 Mar 2016 - 7:00 pm | होबासराव

कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.
एक तर चिमणा त्यातहि गरिब....बाबु कायले कोब्रा शि खेटे घेउन राह्यला ऑ ! ह.घ्या. ;)

उपयोजक's picture

19 Mar 2016 - 2:00 pm | उपयोजक

कालनिर्णय चा २००४ सालचा दिवाळी अंक पहा.त्यात बरीच माहिती आहे.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 3:14 pm | तर्राट जोकर

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

>> माणसासारखी माणसे आहेत हो.

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2016 - 6:53 pm | प्रसाद गोडबोले

अररर ,

तजो , तुमच्या कडून असल्या प्रतिसादाची अपेक्सा नव्हती , चित्पावन म्हणजे गोडसेचे भाऊबंध असे काही तरी म्हणा राव =))))

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 7:05 pm | सतिश गावडे

त्यांना काय म्हणायचे आहे त्यांनी स्पष्ट लिहीले असूनही त्यांनी न म्हटलेले वाक्य तुम्ही बळेच त्यांच्या माथी लावू पाहत आहात.

आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने त्यांच्या स्पष्ट मताकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मिपावरील प्रतिमेच्या अनुषंगाने असे लिहीणे योग्य नव्हे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2016 - 7:20 pm | प्रसाद गोडबोले

आपणास मुद्दा कळलेला नाही

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 7:26 pm | सतिश गावडे

कुंथा अता निरर्थक!

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2016 - 7:34 pm | प्रसाद गोडबोले

तो तुमचा समज आहे .

नाखु's picture

21 Mar 2016 - 9:09 am | नाखु

दोघांनी मध्येच विंम्बळ्डन चालू केल्याने मूळ कुस्तीवजा फ्री श्टाईल कडे दुर्लक्ष्य होऊन धाग्याचा टीआरपी कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही.

अखिल मिपा धुराळी धागे वाचक साहक निवारक्,निचारक्,रेचक आणि वेचक महासंघ

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 7:08 pm | सतिश गावडे

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?
उत्तरः माणसे.

चौकटराजा's picture

19 Mar 2016 - 7:23 pm | चौकटराजा

आमचा इतिहासातील रस १८५७ चे पाठीमागे जात नसल्याने 'माणसे' हे उत्तर सर्वात उत्त्तम !

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?
उत्तरः माणसे.

प्रश्न : असे उत्तर कोण नेमके देते?
उत्तर : हुशार माणसे.

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 7:24 pm | सतिश गावडे

>> हुशार माणसे
होय. म्हणून तर माणसाने स्वतःला "होमो सॅपियन्स" हे नाव ठेऊन घेतले.

चौकटराजा's picture

19 Mar 2016 - 7:25 pm | चौकटराजा

सर ही पदवी काय उगाच मिळाली आहे का ?

मिपावर असे धागे आल्यावर..
जे झाडाच्या शेंड्यावर जाऊन पॉपकॉर्न खातात ते चित्पावन,
जे झाडाच्या डाव्या फांदीवर बसतात ते देशस्थ,उजवीकडे सारस्वत बसतात.
जे खाली राहुन झाड तोडतात ते कोकणस्थ..

सतिश गावडे's picture

19 Mar 2016 - 7:37 pm | सतिश गावडे

तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे रे जेपी.

नाखु's picture

21 Mar 2016 - 9:11 am | नाखु

गावडे सर जेप्याला न्युनगंड यायला आणखी एक कारण झालं तुमच्यामुळे.

खरोखरच फालतू धागा. मात्र पोप्कॉर्ण वाल्यांसाठी सुवर्णसंधी.
चित्पावन कोण होते, ते इराणी असतील नाही तर, घाना किंवा युगांडाचे असतील, आम्हाला काय त्याचे?
उद्यापासून प्रत्येक जातीवर एक एक काथ्याकुट करायचा का? जाववार एक वेगळा विभाग काढायचा?
शुद्ध भंकस.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2016 - 9:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो असं कसं. दुसर्‍या जातीचं नावं काढलं तर अ‍ॅट्रोसिटी लागेल ना. मग दगडं मारायला दुसरी टार्गेटं कोणं मगं मोगाखान सरांना.

माहितगार's picture

21 Mar 2016 - 10:15 am | माहितगार

ऐसिवरील चर्चेचा उपयूक्त गोषवारा

सदस्य बॅटमनरावांनी देशस्थ, कोकणस्थ, मराठा आणि धनगर या महाराष्ट्रातील चार प्रमुख जातींच्या जेनेटिक्सबद्दल रोचक विवेचन असलेला खालील पेपर पहाण्यास सुचवले.

देशस्थ, कोकणस्थ, मराठा आणि धनगर या महाराष्ट्रातील चार प्रमुख जातींच्या जेनेटिक्सबद्दल रोचक विवेचन असलेला हा पेपर पहावा असे सुचवतो.

http://genomebiology.biomedcentral.com/articles/10.1186/gb-2005-6-8-p10

तिथे दिलेला परिच्छेदः

Results

The generated genomic data was compared with putative parental populations- Central Asians, West Asians and Europeans using AMOVA, PC plot, and admixture estimates. Overall, disparate uniparental ancestries, and l.1% GST value for biparental markers among four studied caste populations linked well with their exchequer demographic histories. Marathi-speaking ancient Desasth-brahmin shows substantial admixture from Central Asian males but Paleolithic maternal component support their Scytho-Dravidian origin. Chitpavan-brahmin demonstrates younger maternal component and substantial paternal gene flow from West Asia, thus giving credence to their recent Irano-Scythian ancestry from Mediterranean or Turkey, which correlated well with European-looking features of this caste. This also explains their untraceable ethno-history before 1000 years, brahminization event and later amalgamation by Maratha. The widespread Palaeolithic mtDNA haplogroups in Maratha and Dhangar highlight their shared Proto-Asian ancestries. Maratha males harboured Anatolianderived J2 lineage corroborating the blending of farming communities. Dhangar heterogeneity is ascribable to predominantly South-Asian males and West-Eurasian females.

Conclusions

The genomic data-sets of this study provide ample genomic evidences of diverse origins of four ranked castes and synchronization of caste stratification with asymmetrical gene flows from Indo-European migration during Upper Paleolithic, Neolithic, and later dates. However, subsequent gene flows among these castes living in geographical proximity, have diminished significant genetic differentiation as indicated by AMOVA and structure.

धनगर जातीच्या उगमस्थानाबद्दलचे निरीक्षणही रोचक आहे. इति बॅटमनराव

डॉ. इरावती कर्वे यांचा दाखला देऊन सदस्या प्रियदर्शिनी कर्वे या प्रतिसादात वेगळी रोचक माहिती देतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणस्थ ब्राम्हणांच्या जेनेटिक मुळासंबंधीचे दिलेल्या संशोधनातले वर्णन पहाता कदाचित खालील आख्यायिका कोकणस्थांच्या तुलनेने अलिकडे कोकणात येण्याचे आणि तरीही ब्राम्हण वर्णात स्थान मिळवण्याचे स्पष्टीकरण देईल.

कोकणाचा कारभार पुलयोमी राजाच्या मेव्हण्याकडे होता, आणि तेव्हा तिथे निबिड अरण्य आणि मासेमारी करून उपजीवीका करणारे कोळी याखेरीज काहीच नव्हते. या मेव्हण्याने तिथे यज्ञ करायचे ठरवले, आणि त्यासाठी त्याने ठिकठिकाणी यज्ञकामासाठी ब्राम्हण आल्यास त्यांना जमिनी इनाम मिळतील असे निरोप पाठवले. जवळच्या देशावरच्या ब्राम्हणांना कदाचित खडतर भौगोलिक परिस्थितीची कल्पना असल्यामुळे यामध्ये रस वाटला नसावा, पण दूर राजस्थानातल्या काही ब्राम्हणांनी हे आमंत्रण स्वीकारले.

या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन - म्हणजे आजचे चिपळूण. यज्ञानंतर इनाम मिळालेल्या जमिनींवर हे ब्राम्हण स्थायिक झाले, आणि त्यांचे नाव अपभ्रंशाने चितपावन पडले. याचा पावन चित्त असण्या नसण्याशी काहीच संबंध नाही. मात्र चितपावन ब्राम्हण हे मुख्यतः कोकणात शेतीवाडी करत होते, केवळ देवाधर्माची कामे नाही, ह्याचे स्पष्टीकरणही यातून मिऴू शकते.

त्यावर मी उपस्थित केलेल्या शंका
प्रियदर्शिनी कर्वे यांनी दिलेली पुलयोमीची आख्यायिका इतर आख्यायिकांपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटते पण तसे असेल तर चितपावन ब्राह्मण आडनावांमध्ये; एक्सक्लुजीवली राजस्थानी ब्राह्मणी आडनावांशी पुरेसे साम्य असलेली काही ना काही आडनावे आढळावयास हवीत शिवाय डिएनए सुद्धा जुळावयास हवीत.

या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन

समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश: Beach) म्हणतात, तेव्हा चिपळूण मधिल पळूण हे पुळणचा अपभ्रंश असण्याची शक्यता असू शकते का ? महाराष्ट्रातील गावांच्या नावाच्या डाटाबेस मध्ये गणपतीपुळे , भंडारपुळे (रत्नागिरी) , पुळास (कुडाळ-सिंधुदुर्ग) हि कोकणातील गावे दिसतात. (अर्थात 'पुळ' हा उपसर्ग अथवा प्रत्ययघेऊन देशावर अगदी गडचिरोली पर्यंत ग्रामनामे आहेत हेही खरे)

मोल्सवर्थाची चिपोळणा, चिपुळणा, चिपोळा (p. 284) [ cipōḷaṇā, cipuḷaṇā, cipōḷā ] m A tribe of Bráhmans or an individual of it. Called also चित्तपावन & कोंकणस्थ. आणि A tribe of Bráhmans or an individual of it: called also कोंकणस्थ & चिपोळणा ह्या नोंदी कर्वेंनी मांडलेल्या थेअरीस अंशतः दुजोरा देतात.

पण

चिपळूण चे नाव आधी चितपोलन होते यास स्वतंत्र दुजोरा उपलब्ध नसल्यास तो केवळ कयास ठरतो शिवाय 'चितपोलन' मध्ये चित हा उपसर्ग कुठून आला हा प्रश्न शिल्लक राहतो खासकरुन 'चित' हा उपसर्ग असलेली चिता, चितळ प्राणिवाचक शब्दांमुळे उर्वरीत महाराष्ट्रात बरीच गावे दिसतात पण कोकणात 'चित' हा उपसर्ग असलेले एकही गाव डाटाबेस मध्ये दिसले नाही. त्यामुळे 'चित' या शब्दाचा उलगडा अद्यापी बाकी रहात असावा किंवा कसे

चित्पावनींचे स्थलांतर खूप अलिकडचे असण्यातली एक मोठी अडचण त्यांची चित्पावनी बोली असू शकेल का ? चित्पावनी बोलींचे मला सर्व शब्द माहित नाहीत पण ऐसि आणि मिपावरील धाग्यातून जेवढा शब्द संग्रह पुढे आला तो प्राकृताशी जवळचाच दिसतो सर्वसामान्य मराठी माणसाला न समजणारे शब्द त्यात फार कमी दिसतात, चेड, बोड्यो, सां, विन्चां, पेख हे शब्द जरा वेगळे वाटतात त्यातील काही कानडी किंवा तुळू असतील ते वगळावे लागतील, स्किथीअन संबंध दाखवायचा तर किमान पक्षी पर्शीअन, सिंधी किंवा पंजाबी या पैकी एका भाषेचा काही प्रमाणातरी प्रभाव चित्पावनी बोलीवर मिळावयास हवा तसा प्रभाव आढळत नसेल तर त्यांचे कोकणात येणे बरेच बरेच मागे जाईल.

स्थलांतर अलिकडील असेल तर चे एक उदाहरण मराठी विकिपीडियावर पहाण्यात आले ते म्हणजे टाकणकार समाजाची वाघ्ररी बोलीतील हे खूळ वाचावे मग आधीच्या भाषेचे प्रभाव कसे शिल्लक राहतात ते दिसते.

तसे प्रभाव जेवढे कमी दिसतील तेवढे स्थलांतर जुने असा अर्थ होऊ शकेल किंवा कसे.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 10:46 am | तर्राट जोकर

पकावू धाग्यातही हिरेमाणके मिळतात. खुप छान प्रतिसाद!

सुनील's picture

21 Mar 2016 - 10:53 am | सुनील

समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश: Beach) म्हणतात, तेव्हा चिपळूण मधिल पळूण हे पुळणचा अपभ्रंश असण्याची शक्यता असू शकते का ?

शक्यता कमी. कारण चिपळूण हे गाव समुद्रकिनारी नाही, बरेच आत आहे. त्यामुळे तिथे पुळण असण्याची शक्यता नाही.

माहितगार's picture

21 Mar 2016 - 11:00 am | माहितगार

माझ्या तर्कातील उणीव दर्शवण्यासाठी आभार. ऐसिअक्षरेचर्चेत कुणाचे या मुद्द्याकडे लक्ष गेले नसेल. एनीवे तसे असेल तर 'चितपोलन'ची केस जरा स्ट्राँग होते. अर्थात अजूनही 'चितपोलन'मधील 'चित' चा उगम शोधणे बाकी असावे.

प्रत्ययात अथवा उपसर्गात पोलन शब्द येणारी गावे भारतात इतरत्र मिळतात का पहावे लागेल. भारतभराचा डाटाबेस लगेच शोधणे शक्य होणार नाही पण सवडीने करतओ