समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
18 Mar 2016 - 8:20 pm
गाभा: 

गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :)

हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते. काही वेळेस तर ती श्रध्दास्थानापेक्षाही दहशतवाद्यांना शिक्षा दिलेल्या कशा चुकीच्या होत्या, ते कसे बापडे होते असे सांगत सर्वोच्च न्यायालयावर पण अप्रत्यक्ष टिका होती. अनेकांना ती आवडली नव्हती हे वेळोवेळी आलेल्या विविध सामाजिक माध्यमांतील प्रतिक्रीयातून स्पष्ट होत होते. तरी देखील वृत्तपत्रे आणि टिव्ही माध्यमांना त्यांच्या भावनांपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचे वाटले. व्यक्तीस्वातंत्र्य महत्वाचेच आहे आणि सत्याला धरून जर समाजोपयोगी टिका असली तर ती नेहमीच करावी अशा मताचा मी आहे. म्हणूनच, येथे एक स्पष्ट करू इच्छीतो की जी टिका ही सत्याला धरून असेल, तर्क-"सुसंगत" असेल ती कुणावरही केली असली तरी योग्यच आहे. वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम करणे हे नुसते पोटभरू संपादक नसल्याचे लक्षण आहे, ते समाजातील एका प्रमुख घटकाचे जिवंतपणाचे लक्षण आहे.

आज हे सगळे लिहायचे कारण म्हणजे, १७ मार्चच्या लोकसत्तेत आलेला "असंतांचे संत" हा मदर तेरेसा - पोप/कॅथलीक संस्थेवर टिका करणारा अग्रलेख लिहीला गेला. अर्थात हा अग्रलेख देखील "सेक्युलरी समतोल" वृत्तीने लिहीला होता. म्हणजे असे की सुरवातीसच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांना फटकावले होते, अशोकाचा बुद्ध धर्मप्रसार आणि सौदी अरेबियातील वहाबी धर्म वगैरे सर्वांना आणले होते. पण मूळ विषय होता, मदर तेरेसांना बहाल केले जाणारे संतपद आणि प्रामुख्याने टिका होती, ती कॅथलीक संस्थेवर आणि त्यांचा रोख राज्यविस्तारावर कसा असतो या संदर्भात. संतपद देताना चमत्कार कसे बघितले जातात या संदर्भात, वगैरे, वगैरे...

ज्यांना सध्याच्या लोकसत्तेच्या अग्रलेखांचा रोख माहीत आहे, त्यांना (सेक्युलरी समतोलपणा असला तरी) सुखद आश्चर्य वाटले... वास्तवीक आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. जे लिहीले होते ते बुद्धीवादी होते आणि ज्यांच्या बुद्धीवादाचा कमीजास्त प्रभाव आहे अशा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवळकरांचे जे काही परखड विचार मदर तेरेसांबाबत होते त्याचेच ते थोडेफार प्रतिबिंब होते, असे कुठेतरी वाटले. (अर्थात ती कॉपी नव्हती हे देखील खरेच ध्यानात ठेवावेत).

पण जो चमत्कार कुठल्याही संतपदाला पोचलेल्या व्यक्तीला उभ्या हयातीत जमला नसता, तो या निमित्ताने झाला! १७ मार्चच्या अग्रलेखावर १८ मार्चला लोकसत्तेच्या छापिल आणि ऑनलाईन आवृत्तीत, "असंतांचे संत - क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक" अशी लोकसत्तेच्या वतीने नाही तर संपादकाच्या वतीने माफी मागितली गेली. अग्रलेख तात्काळ अप्रकाशीत केला गेला.

२४ तासाच्या आत, बिगरसरकारी, बिनचेहर्‍याच्या, बिन (जाहीर) आवाजाच्या कुठल्यातरी अज्ञात शक्तीने एका वृत्तसंपदाकचे व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला.

माझ्याकडे आकडेवारी नाही पण माझ्यालेखी सुसंगत तर्क आहे: लोकसत्ता हे मराठी वाचकांचे पत्रक. आजपर्यंत त्यात अनेकदा बहुसंख्यांकांच्या भावना दुखावणारे लिहून आले आहे आणि त्यावर अनेकांनी टिका देखील केली आहे. त्यामुळे हा लेख मागे घेण्याचे कारण बहुसंख्य असणे जरा अवघड वाटते. बहाई आणि बुद्ध धर्माचा उल्लेख आला असला तरी तो संदर्भापुरताच, पक्षि: टिका करणारा उल्लेख नाही. फक्त, त्यांच्याबद्दल पण लिहीले आहे असे for the record ठेवायला म्हणून आलेला आहे. म्हणजे त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न नाही. मग एकूण टक्केवारीच्या किती जण हे कॅथलीक आहेत जे मराठी आहेत आणि जे लोकसत्ता वाचतात आणि ज्यांनी तो अग्रलेख वाचल्याने त्यांच्या भावना दुखावल्या? लोकसत्तेच्या अग्रलेखांमधील प्रत्येक विचाराशी मी सहमत असेनच असे नाही, पण भाषा आणि माहितीसाठी ते नक्कीच चांगले असतात. तरी देखील असे वाटते की या अग्रलेखांना लोकसत्तावाचक मराठी समाज ही एक अपरीहार्य मर्यादा आहे. तरी देखील जर तात्काळ माफी मागावी लागत असेल तर खरेच धक्कादायक आहे.

वास्तवीक जे झाले ते दुर्दैवी आहे... एक टिकात्मक अग्रलेख मागे घ्यावा लागला म्हणून नाही, मदर तेरेसा अथवा कॅथलीक्स वरील टिका होती म्हणून तर अजिबातच नाही. तर या प्रकरणात जो काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला गेला आहे, त्यासंदर्भात हे अधिक वाटले.

कधी काळी समर्थ रामदासांनी, "समर्थाचीया सेवका वक्र पाहे..." असे म्हणले होते. अर्थात या घटनेत समर्थ कोण आहे, तसेच कोणी त्याच्या सेवकाकडे वक्र पाहीले हे स्पष्ट झालेच आहे. पण या निमित्ताने ज्यांना रामदासी वाड्मय आवडते, ज्याचा ते अभ्यास करतात, त्यांनी त्याचाच उपयोग करून, आपल्याला अभ्यास-साधनेतून आलेल्या विद्वत्तेच्या देणगीचे आत्मपरीक्षण करावे नाहीतर..

"जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे"

असे म्हणायची वेळ येऊ शकते.

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

18 Mar 2016 - 8:35 pm | आजानुकर्ण

लोकसत्ता आणि कुबेर यांनी अग्रलेख मागे घेेऊन अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह पाऊल उचलले आहे. धर्मांध लोकांना अशा कृतीमुळे निश्चितच बळ मिळेल आणि भावना दुखावण्याची जोरदार साथ येईल.

ऋषिकेश's picture

25 Mar 2016 - 11:00 am | ऋषिकेश

+१
खरेतर अग्रलेख मागे घेण्यापेक्षा कुबेरांनी राजीनामा द्यायला हवा होता.

अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि लोकसत्ता यांच्याकडुन हे असे अघटित कसे घडले ? नक्की कुणाच्या भावना दुखावल्या ?

बाकी लोकसत्ते मधील मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतरणाचा उद्देश- मोहन भागवत ही बातमी वाचल्यावर अनेकांना पोट शूळ उद्भवल्याचे समजले आहे ! ;)

जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

मदनबाण's picture

18 Mar 2016 - 9:04 pm | मदनबाण

जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ?
संदर्भ मिळाला ! तो देखील लोकसत्ते मधलाच !
धर्मा म्हणू नये आपुला
आज जगात सर्वात वेगाने वाढणारा कोणता धर्मगट असेल तर तो पेंटाकोस्टल ख्रिश्चन हा आहे. जास्तीत जास्त अन्य धर्मीयांना ख्रिस्ताच्या पायाशी आणून त्यांचे धर्मातर घडवणे हे या पंथाचे जीवितकार्य आहे. या पंथीयांच्या मागे राजसत्ता नसती तर तिचा इतका प्रसार झाला असता काय? समाजसेवेसाठी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या मदर तेरेसा या अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीचेही धर्मातर करीत, हा इतिहास आहे.
लोकसत्ता यांनी हा लेख देखील काढुन टाकुन टाकावे ! कशाला डेटा हवा असा भावना दुखावणारा "डेटा" त्यांच्या संकेस्थळावर ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

विकास's picture

18 Mar 2016 - 10:16 pm | विकास

मदर तेरेसांबद्दल आपण मांडलेले मुद्दे मी आधी देखील विविध विचारांच्या लोकांकडून वाचले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सहमत असलो तरी हे लिहीताना माझा उद्देश किंचीत वेगळा होता...

येथे एका संपादकाचे हात इतके बांधण्यासारखे काय झाले आहे? आणि हो या संपादकाचे अनेक विचार हे मला दिशाभूल करणारे वाटले आहेत, तरी देखील हेच मत आहे. अग्रलेखात देशाचे तुकडे करण्याची भाषा नव्हती की कुठल्याही धर्माच्या सामान्य जनांवर अत्याचार होईल अशा पध्दतीची प्रक्षोभक भाषा नव्हती.

तरी देखील, ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. येथे मराठी ऐवजी इतर कुठल्या भाषेतले असते तरी असेच मत असते पण येथे मराठीत झाल्याने आपण सगळे ते वाचू शकतो आणि त्या अर्थाने लोकसत्तेचा संबंध आहे. आणि हो , असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते.

मदनबाण's picture

19 Mar 2016 - 9:40 am | मदनबाण

विकासराव आपल्या लेखनाचा उद्देश अर्थातच समजला आहे... जबरदस्तीने शेपुट घालायला लावणे असे म्हणता येईल !

ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही.
खरयं... यावरुन मुस्कटदाबी कोणत्या थरापर्यंत गेली आहे आणि जाऊ शकते याचे उदाहरणच लोकसत्ताने त्यांच्या वाचकांना सप्रमाण घालुन दिले आहे ! एक वाचक म्हणून या झालेल्या घटनेचा मी निशेध व्यक्त करतो.

असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते.
१०० % सहमत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

नितिन थत्ते's picture

21 Mar 2016 - 6:51 am | नितिन थत्ते

एक्स्प्रेस समूहाने पूर्वी व्ही पी सिंग पंतप्रधान असताना अरूण शौरींची तातडीने उचलबांगडी केली होती.

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2016 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

लोकसत्तेने या अग्रलेखासठी माफी मागणे अतिशय चुकीचे आहे.

अवांतर - मिपाकर राजघराणं यांचा संबंधीत विषयावरचा हा लेख वाचनीय आहे - दयाळू मदर तेरेसा.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2016 - 9:04 pm | श्री गावसेना प्रमुख

लोकमत ह्या लेखातील पिग्गी बँक वरती जे उर्दूत लिहिलेलं आहे त्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या म्हणून mim च्या लोकांनी लोकमत जळगाव कार्यालयावर हल्ला केल्यानंतर ह्यांनी सपशेल लोटांगण घातलं ना।भावना फक्त ह्यांना असतात हिंदूंना नसतात हे नेहमी अधोरेखित होत राहत।

विकास's picture

18 Mar 2016 - 10:24 pm | विकास

ज्या गुंडागर्दीला लोकमतला (कधीकाळी महानगरला ) तोंड द्यावे लागले, ती भले कोणी ठरवून केली असली तरी झुंडशाहीतली एक प्रतिक्रीया होती. अर्थात हे त्याचे समर्थन अथवा त्याचा बचाव करण्यासाठीचा मुद्दा नाही.

इथे, माझ्या अनुभवाप्रमाणे आणि जे काही ऐकले-वाचले आहे, त्यावरून मराठी ख्रिस्तीधर्मिय समाज हा बर्‍यापैकी शांत आहे. मग तो महाराष्ट्रातला असो अथवा गोव्यातला. त्यांच्यातल्या काहींचे जरी काही धर्मांतराचे चाळे चालले असतील तरी ते मर्यादीत असावे आणि तो मुद्दा वेगळा आहे, वेगळ्यापद्धतीने (कायद्याने) हाताळता येईल. त्यामुळे त्या लोकांच्या भावना इतक्या टोकाला जाऊन दुखावल्या असतील असे वाटत नाही. मग या अग्रलेखानंतर एक विरोधी प्रतिक्रीया मराठी ख्रिस्ती समाजातून दिसली नाही आणि तरी देखील २४ तासात माफी मागून अग्रलेख अप्रकाशीत करावा लागतो? याच्या मागे नक्की कर्ताकरविता आहे तरी कोण?

म्हणून म्हणले लोकमत वरील हल्ला आणि लोकसत्ता संपादकाची कुठेही आवाज न करता, गोंधळ न करता, एखाद्या surgical strike सारखी केलेली मुस्कटदाबी जास्त गंभीर वाटते.

अजया's picture

18 Mar 2016 - 9:07 pm | अजया

कुबेर यांचे हात बांधले गेलेले दिसतात.शिवाय त्यांनाच वैयक्तिक माफीनामा द्यायला लावलेला दिसतोय.नेहमी काही चुकीचे असल्यास वृत्तपत्राकडून माफी मागितली जाते.इथे मी लिहिले आहे!

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Mar 2016 - 9:10 pm | श्री गावसेना प्रमुख

लोकमत

माझ्याकडे छापील लोकसत्ता येतो.त्यात हा माघारनामा दिसला नाही.
जरा लिँक द्या..

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2016 - 10:03 pm | श्रीरंग_जोशी

छापील आवृत्तीवरून घेतलेला हा फोटो चेपूवरून साभार....

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

18 Mar 2016 - 9:31 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

"सेक्युलरी समतोलपणा" अलिकडे फार फोफावलाय.

रामपुरी's picture

18 Mar 2016 - 10:57 pm | रामपुरी

सहिष्णूता सहिष्णुता म्हणतात ती हीच

याबद्दल ही एक लिंक आहे. लिहिणारे धर्मगुरूच आहेत,त्यामुळे तथ्य आहे असं मानायला हरकत नाही.
http://m.dummies.com/how-to/content/saints-for-dummies-cheat-sheet.html

म्हणजे जोपर्यंत पोप म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही संत नाही. शिवाय संत अशी पदवी ही मृत्यूनंतरच मिळणार. लोकांनी स्वयंस्फूर्तीने तुम्हाला संतत्व बहाल केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि कुणीही केलेल्या कामात जर धर्मप्रसार हा मुद्दा नसेल, तर पोप त्याचा विचार संतत्वासाठी का करेल? कारण जर तसं असतं तर फक्त कॅथाॅलिक पंथीयांचाच विचार झाला नसता. एखादा हिंदू किंवा मुस्लिमही सेंट अमुक किंवा सेंट तमुक म्हणून गणला गेला असता. पण तसं होत नाही. एका हाडा-मांसाच्या माणसात लोकांना संतत्व देण्याची बुद्धी असते आणि त्याची निवड कोण करतात - तर इतर हाडा-मांसाची माणसेच. पण ती एखाद्याला संतत्व देऊ शकत नाहीत. असं हे चमत्कारिक त्रांगडं आहे!

अर्धवटराव's picture

18 Mar 2016 - 11:33 pm | अर्धवटराव

"लोकसत्ता: संपादकीयाची संतपदाशी प्रांजळ भेट" असं काहिसं शीर्षक हवं :प

ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे प्रोसेस समजू शकतो. प्रिंट आवृत्तीत तो होता ना लेख? मला पाहिल्यासारखा वाटतोय पण जुन्या अंकात असणारच. अशा बाबतीत (जर ऑनलाइन आवृत्ती नसलीच असती) तर संपादकांचे धोरण काय राहिले असते?
आमचे विचार चुकीचे की माझे विचार चुकीचे म्हणले गेले असते?

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2016 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

ऑनलाइन आवृत्तीच्या बाबतीत मिपावरचा पंख लागणे हा वाक्प्रचार वापरता येईल ;-) .

इतरांच्या लेखाला पंख लागू दे रे. इथे संपादकीयच उडवलेय.
लै भारी शब्द हाय पण ऑलरेडी दुश्मन्या वाढल्यात त्यात भर नको. ;)

श्रीरंग_जोशी's picture

19 Mar 2016 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

दोस्तो का दोस्त, दुश्मनो का दुश्मन...
अभ्या द हिरो :-)

एक वेळ चुकीची आकडेवारी किंवा तथ्य छापले गेले तर त्याविषयी चुक झाली म्हणून माफी मागणे समजू शकतो.
इथे तार्किक विचार आहेत ते एकदा मांडले की मांडले. अशा प्रकारे परत घेण्याने ते गायब होत नसतात उलट अधिक वेगाने पसरतात.

विकास's picture

19 Mar 2016 - 12:25 am | विकास

आधी लाथ मारायची मग नमस्कार केल्यासारखे हात पुढेमागे करायचे! ;)

तरी देखील तेव्हढे सोपे नसावे इथे.

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 12:31 am | अभ्या..

निदान शार्ले हेब्दोच्या हल्ल्यानंतरच्या डेरिंगवरचा जुनालेख आधी मागे घेऊन मग हे केले असते तर चालले असते.

आनन्दा's picture

19 Mar 2016 - 1:20 pm | आनन्दा

अर्थस्य पुत्रो दासः

नाखु's picture

21 Mar 2016 - 8:35 am | नाखु

पुणे छापील आवृत्तीत तसा माफी खुलासा आणि लेख मागे घेतल्याचे निवेदन आहे (वल्लींना सांगून त्याचा फटु उद्या टाकतो).

च्या मारी असहिष्णुताची व्याख्या एकदा मिपा विचारवंत धुरीणांनी करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावी ही मिपा वाचकांतर्फे जाहीर विनंती.

दा विन्ची's picture

19 Mar 2016 - 11:44 am | दा विन्ची

गिरीश कुबेर यांनी अतिशय अनाकलनीय पाऊल उचलले. एवढा कोणता दबाव आहे कळायला मार्ग नाही. लोकसत्ता सारख्या आघाडीच्या वर्तमानपत्राला अशोभनीय आहे हे सारे.

हा फारच धक्कदायक प्रकार आहे.. विकास सर तुमची अडचण नसेल तर हा तुमचा लेख कायअप्पा वर टाकावा म्हणतो.. लोकसत्तच्या संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे राहिलेच पाहिजे..

बाकी चिमणराव, सर्वज्ञानी आणि विदूषकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.. ते परवाच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढत होते.

तेच पळाले त्यांचा मागे काय उभा रहायचा

आनन्दा's picture

19 Mar 2016 - 2:58 pm | आनन्दा

किमान पुढच्या वेळी तरी त्यांनी शेपुट घालू नये म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा हो. आता झाले ते झाले. पण याविरुद्ध जनमताचा रेटा उभा करणे आवश्यक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2016 - 3:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

19 Mar 2016 - 6:03 pm | विकास

धन्यवाद, माझी काहीच हरकत नाही कायअप्प्पा वर टाकण्यासाठी.

मी आधी देखील म्हणले तसे, हा मुद्दा कुणाबद्दचा लेख मागे घेतला अथवा लिहीणार्‍या व्यक्तीविषयी नाही. कारण त्या संपादक महाशयांचे एकांगी विचार पटत नाहीत. मला मराठी ख्रिस्ती समाजाबद्दल बर्‍यापैकी खात्री आहे, की ते असे नाहीत. (चूक असलो तर चूक म्हणेन पण तुर्तास पॉझिटीव्ह गृहीतक म्हणा हवे तर).

कुबेरांचे आणि एक्सप्रेस व्यवस्थापनाचे कशासाठी जमत नसेल तर तो देखील त्यांचा अंतर्गत मामला होतो. त्यामुळे हे कुबेर या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून देखील नाही. हा गंभिर प्रश्न अशा करता आहे कारण बोलवता धनी पूर्ण गप्प बसला आहे. आज कुबेरांचे झाले त्यावर जर आवाज केला नाही तर यांचा धीर आणि माज अजूनच वाढेल...

आनन्दा's picture

19 Mar 2016 - 1:19 pm | आनन्दा

जाताजाता- कालच कायअप्प वर वाचलेला विनोद -

मदर तेरेसांचे दोन चमत्कार ज्यामुळे त्यांना संतपद दिले गेले -
१. ब्राझीलमध्ये एका महिलेचा कर्करोग बरा केला.
२. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे कळू नये म्हणून त्यांना आंधळे आणि बहिरे केले.

आनन्दा's picture

19 Mar 2016 - 3:05 pm | आनन्दा

आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो
आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही
वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी."
चला निर्धार करा !
माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.

प्रदीप साळुंखे's picture

19 Mar 2016 - 3:22 pm | प्रदीप साळुंखे

SAY NO TO लोकसत्ता.

हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे -

नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे.

प्रदीप साळुंखे's picture

19 Mar 2016 - 3:31 pm | प्रदीप साळुंखे

आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो

माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आपण झुगारून काय उपयोग?
कारण असल्या गोष्टींची माध्यमांना फिकीर नाही,त्यांना सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवे असते.आणि त्यातच ते धन्यता मानतात.
लोकमतचीही याआधी घाबरगुंडी उडाली होती.
माध्यमांची ही बायस भूमिका सर्वातीत आहेच.डरपोक आहेत साले!

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 5:55 pm | श्रीगुरुजी

अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून केवळ २४ तासात माफी मागून अग्रलेख मागे घेणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केवळ २४ तासात गिरीश कुबेरांचे विचार बदलले असणे शक्य नाही. गिरीश कुबेरांवर कोणाचा तरी जबरदस्त दबाव आला असावा. माध्यमांवर दडपण आणले जात आहे हा निधर्मांधांचा आरोप एका अर्थी खरा ठरला आहे. मात्र हिंदू वगळता इतर धर्मियांबद्दल लिहिल्याबद्दल हा दबाव आणला असावा. असाच अग्रलेख हिंदू धर्मातील एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल लिहिला असता तर तो मागे घेण्याची गरज पडली नसती. हा अग्रलेख मागे घेतल्याबद्दल अपेक्षेप्रमाणे एकाही निधर्मांधाने अजूनपर्यंत चकार शब्दानेही विरोध केला नाही.

गिरीश कुबेर लवकरच लोकसत्तातून बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर काढले तर आश्चर्य वाटणार नाही.

ज्यांना हा अग्रलेख वाचायला मिळाला नसेल त्यांच्यासाठी तो खालील पानावर उपलब्ध आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10153959678189454&set=a.10153762...

नितिन थत्ते's picture

20 Mar 2016 - 9:41 pm | नितिन थत्ते

अग्रलेखाचा मुख्य विषय ख्रिश्चन संताविषयी होता. परंतु लोकसत्ता वाचणारे मराठी ख्रिश्चन ही संख्या इतकी कमी असावी की त्यांच्या मागणीपुढे मान तुकवण्याची लोकसत्ताला धंद्याच्या दृष्टीने काहीच गरज नसावी असे धागाकर्ते सुचवतायत.

त्याअर्थी पूर्वी इंदिरा गांधी म्हणत असत त्याप्रमाणे हा "परकीय हात" असावा असं दिसतंय.

Loksatta
हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो काधुन इथे देत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

लोकसत्ता {संपादकांचे} यांचे अभिव्यक्ति स्वातंत्र नष्ट झाले आहे,ही घटना साधी नसुन या मागचे गूढ उकलले गेले पाहिजे. ही वाचकांशी केलेली प्रतारणा तर आहेच, तसेच हिंदू समाजाच्या भावनांना काडीची किंमत नसुन इतर धर्मा बद्धल सत्य कथन केल्यास दडपशाही केली जाईल हे अधोरेखित करणारे धोरण स्पष्ट झाले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

विकास's picture

19 Mar 2016 - 7:45 pm | विकास

खालील बोलके चित्र सामाजिक माध्यमातून...

A tell of two editorial

अगम्य's picture

20 Mar 2016 - 12:43 am | अगम्य

प्रतिक्रिया द्यायला शब्दच सुचत नाहीत. लेखात "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" लिहिले आहे. त्याचाच अनुभव घेतल्यासारखे वाटतेय.

विकास's picture

20 Mar 2016 - 1:22 am | विकास

आता दिसतयं का?

अगम्य's picture

21 Mar 2016 - 9:21 am | अगम्य

आता दिसतयं.
धन्यवाद.

लोकसत्ताच्या व्यवस्थापनाचा निषेध. संपादकीय प्रसिद्ध करण्यापूर्वी कोणीतरी वाचून बघत असतील ना की थेट प्रसिद्ध करतात?

राही's picture

19 Mar 2016 - 10:31 pm | राही

खरे कारण अगदीच वेगळे असावे. एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत.

विकास's picture

20 Mar 2016 - 1:32 am | विकास

मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत.

मायबोलीतील लेखाबद्दल सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की कुठले प्रतिसाद म्हणत आहात ते माहीत नाही. पण मी असे गृहीत धरतो की आपण अग्रलेखातील शेवटच्या परीच्छेदात जे काही बालाजी तांब्यांचे नाव(च) आणि अप्रत्यक्षपणे नाव न घेता केलेला असारामबापूंचा कथीत उल्लेख म्हणत असाल, तर ते काही तार्कीक वाटत नाही. सर्वप्रथम बालाजी तांब्यांना बुवा-बाबांच्या स्टाईलचे फॉलोअर्स आहेत असे वाटत नाही. असारामबापूंकडे गणंग बरेच असले तरी जस जसे त्यांचे जेल मधले राहाणे वाढत आहे त्याबरोबर त्यांचे फॉलोअर्स पण गप्प होऊ लागले असावेत. शिवाय असारामबापूंचे मराठी फॉलोअर्स किती असू शकतील? बरं या दोघांवरही अनेकदा अनेक ठिकाणी टिका झालेली असेल. मला वाटते दोघांवर विनोद देखील भरपूर झालेले आहेत.

या सर्वामुळे लोकसत्तासंपादक तात्काळ अग्रलेख मागे घेतील असे वाटत नाही... तुम्हाला तसे वाटत नाही का? का इतर कुठल्यातरी प्रतिक्रीयेस आपण सूचक म्हणत आहात?

एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली.
कुठल्या क्षेत्रात आणि काय खळबळ माजली आहे? आता उत्सुकता वाढली आहे.

निशांत_खाडे's picture

20 Mar 2016 - 1:33 am | निशांत_खाडे

दुवा असेल तर डकवा...

राही's picture

20 Mar 2016 - 2:08 pm | राही

सीतामाई आणि लक्ष्मणाचे उल्लेख आसारामबापूंना लागू होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आसारामबापूंना फारसे अनुयायी नाहीतच. उलट दुसर्‍या बापूंची अनुयायी संख्या डोळे विस्फारवणारी आहे. आणि..

मितभाषी's picture

20 Mar 2016 - 2:13 pm | मितभाषी

अच्छा नळाला पाणी सोडणारे बाप्पू का =))

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 2:28 pm | तर्राट जोकर

राम राम राम राम राम राम राम राम
राम राम राम राम राम राम राम राम
राम राम राम राम राम राम राम राम
राम राम राम राम राम राम राम राम

विकास's picture

20 Mar 2016 - 5:25 pm | विकास

शेवटच्या परीच्छेदातले उल्लेख केवळ बालाजी असा स्पष्ट म्हणजे नाव घेऊन आहे. पण या दुसर्‍या बापूंचे नाव तरी आलेले नाही. अशा वेळेस वृत्तपत्रांना इतकी टिका करण्याची परवानगी असते. अर्थात कोर्टात काही होऊ शकणार नाही असे मला वाटते...

पण ते जाउंदेत, माझी उत्सुकता उगाच ताणली गेली आहे... :) कोण आहे हा नवाराम? :) जर इथे लिहीणे योग्य वाटत नसेल तर खरड केलीत तरी चालेल...

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 6:34 pm | तर्राट जोकर

मिशिवाल्या बापूंची पांढरा शर्ट, काळी प्यांट.
बलात्कारासाठी मंत्र दिला कसा झ्यांग झ्यांग.
दर गुरुवारी लागते बघा बांद्र्यामधी रांग
भक्त भरती वह्या लिहुन फक्त रामनाम.

भावना दुकावतील काय हो मिपानी रुद्ध झालेल्या सदस्यांच्या?

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Mar 2016 - 6:37 pm | श्री गावसेना प्रमुख

अनिरुद्ध बापू ?

विकास's picture

20 Mar 2016 - 7:03 pm | विकास

अग्रलेखात "लैंगिक शोषण करणारे कोणी बाबाबापू" असे म्हणले आहे. त्याला धरून कोण असू शकतील ते समजावे लागतील. मी कुठल्याच बाबाबापूंचा समर्थक अथवा भक्त नाही. तसेच मधल्याकाळात लक्ष जावे अशा त्यांच्याबद्दल बातम्या देखील दिसलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ होत आहे.

तरी देखील मुळ मुद्यासंदर्भात: जर अप्रत्यक्ष उल्लेख असला तर त्यामुळे संपूर्ण अग्रलेख काढायला लावण्याइतका कायदेशीर प्रश्न तयार झालेला नाही. शिवाय लॉजिकली, असल्या बुवाबाबांचे भगतगण शांतपणे असे करतील अशातले नाहीत. त्यामुळे ही शक्यता वाटत नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Mar 2016 - 8:58 pm | श्री गावसेना प्रमुख

विकासराव संपादकीय थोडेसे चुकलेले वाटते,त्यांच्या लिखाणानुसार स्वतःला राम धाकल्या बंधुस लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढवलेल्या स्वतःच्या पत्नीस सीता ठरवत भक्तांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणारे बाबा बापू असे जे म्हटले आहे ,माझ्या मते ते दोघे बाबा दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात।। एक म्हणजे अनिरुद्ध बापू आणि दुसरे आसाराम बापू।। काय आहे आपण ठरलो कुबेरांच्या बुद्धी व वयापेक्षा लहान ,पण तोरसेकर ह्यांच्यानुसार कुबेराना स्वतःच्या बुद्धी बद्दल जास्तच घमंड आहे।त्यामुळें ते जे काही लिहितात ते त्यांना अंतिम सत्य वाटते

गामा पैलवान's picture

20 Mar 2016 - 3:29 pm | गामा पैलवान

विकास,

>> ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील
>> एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही.

मलाही पटलं नाही. तातडीने माफी मागून लेख मागे घ्यावा इतका काही तो स्फोटक वगैरे नाहीये. त्यामुळे गिरीश कुबेरांचा बोलविता धनी वेगळाच असणार. कशावरून मोदीकाका नसतील? त्यांनी बरोबर डाव साधलेला दिसतोय. गोयनका कुटुंब आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते ते असल्या दबावांना भीक घालणारे वाटतात का?

माझ्या अंदाजाप्रमाणे मोदीकाकांनी बरोब्बर नेम साधलाय. बघूया आता असहिष्णुतेच्या नावाने कोणकोण पुरस्कार परत करताहेत ते. जरी बदनामी झाली तरी चर्चची होणार. हे सगळं करूनही मोदीकाका नामानिराळेच राहणार. शिवाय गिरीश कुबेर आणि गोयनका यांचाही फायदाच फायदा आहे. मस्त गेम खेळलाय.

आ.न.,
-गा.पै.

विशेष : सदर लेख आजूनही लोकसत्तावर उपलब्ध आहे : http://epaper.loksatta.com/c/9207507. मग तर शंका अधिकच बळावतेय.

विकास's picture

20 Mar 2016 - 5:41 pm | विकास

खरेच आहे... आत्ता ज्या पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याच्या पाईकांनी "हाताची घडी, तोंडावर बोट" ठेवले आहे ते बघून अहोआश्चर्यंम् असे म्हणावे लागत आहे!

काय गंमत आहे, कन्हैय्या आणि उमरच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरून बोंब झाली, पण येथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरून कोणी कुबेरांच्या बाजूने उभे राहीलेले दिसले नाही. थट्टा अथवा कुचेष्टा नाही, पण ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे आणि ती देखील स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रात झाली आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Mar 2016 - 9:16 pm | श्री गावसेना प्रमुख

हेच पळाले ह्यांच्यामागे कोण उभे राहील विकासराव

अगम्य's picture

21 Mar 2016 - 9:46 am | अगम्य

खरे आहे.
जर बरखा दत्त ला विचारले तर ती साळसूद पणे म्हणेल की कुबेरांना jenuinely वाईट वाटले आणि त्यांनी voluntareely लेख मागे घेतला. ह्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेलीच नाही. कुठे आहे त्यांना कुणी धमकावल्याचा पुरावा? उलट असे लिहून सुद्धा कुणी ख्रिश्चन संघटनेने मोर्चा, मोडतोड असे काही केले नाही हा ख्रिश्चनांच्या सहिष्णुतेचा पुरावाच आहे. भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. उदाहरणार्थ असे ऐकले की मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले.

मदनबाण's picture

21 Mar 2016 - 10:32 am | मदनबाण

भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते.
अगदी...

मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले.
जसा पोशाखात बदलाव केला तसा आता मोडस ओपरेंडी मध्ये सुद्धा बदल केला गेला पाहिजे ! जसे गळ्यात क्रॉस घालण्याचे फॅड गुपचुप आणले गेले तसेच ओम सुद्धा व्हावे ही इच्छा. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 10:49 am | तर्राट जोकर

उत्तम प्रतिसाद.

नितिन थत्ते's picture

20 Mar 2016 - 5:46 pm | नितिन थत्ते

ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.

मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.

बरोबर आहे. फक्त पाऊणे चारशे वर्षांपूवी गॅलिलीओ वर पण असाच दबाव आला होता.

विकास's picture

20 Mar 2016 - 7:09 pm | विकास

ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही.

तसे म्हणा हवे तर. पण माझ्या लेखी कुठल्याच संताकडून हा दबाव आलेला असण्याची शक्यता नाही. पण खेद वाटण्यासारखे एकच आहे की जे लोकं कन्हैय्याच्या आचरटपणाला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणत सांभाळत होते ते सगळे इतके (खर्‍याअर्थाने)बुद्धीवादी कुबेरांच्या बाबतीत पाठींबा देण्यासाठी पुढे कसे आले नाहीत?

यातकुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे...

मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.

ती मुस्कटदाबी देखील अशीच कुठलाच जाहीर निषेध न करता झाली होती का?

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 7:24 pm | तर्राट जोकर

हे प्रकरण वेगळं आहे. कुठेही विरोध स्पष्ट आणि जाहीर नसतांना संपादकाने मी असा उल्लेख करुन लेख मागे घेणे विचित्र शंकांना जन्म देणारे आहे. ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा कसा काढणार?

विकास's picture

20 Mar 2016 - 7:31 pm | विकास

ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने ....

Namaskar

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 7:50 pm | तर्राट जोकर

ओ साहेब, स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय?

विकास's picture

20 Mar 2016 - 8:41 pm | विकास

स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय?

म्हणजे "संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल..." मध्ये स्वखुशी दिसत असली तर ती आत्महत्येच्या वेळेस लिहीलेल्या कुठल्याही पत्रात दिसली पाहीजे, नाही का? विशेष करून जेंव्हा आत्महत्या करणारी व्यक्ती, "I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this." असे म्हणते, तेंव्हा इतरांना दोषी ठरवणे योग्य असते असे म्हणायचे आहे का?

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 9:29 pm | तर्राट जोकर

माहित होतं तुम्ही हाच मुद्दा काढाल. पण आता आपण मूळ मुद्द्यावर राहुयात का? संपादकांनी कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या ते तर काही लिहिले नाही. तसे कोणी वाचक दिसतही नाहीत. कुठे काही विरोध प्रकटला नाही. संपादकिय मागे घेण्यामागचं कारण कुठेही स्पष्ट नसतांना स्वखुशीने केलेली आत्महत्या आहे असेच म्हणावे लागेल. ह्यात तुम्ही वेमुला केस घुसडू नका. अवांतरासाठी आम्ही बदनाम आहोत. आम्हालाच बदनाम राहु द्या. जगात आत्महत्या करणारा वेमुला पहिला इसम नाही.

का का? तुम्ही वारीस पठाणच्या वेळेस दुष्काळ काढलात ते बरोबर, आणि यांनी इथे रोहित वेमुला काढला ते चूक काय?

असो.. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या नाहेत असे ठरवून आलो होतो खरे तर, पण अनवधानाने प्रतिसाद टाइप झाल्यावर लक्षात आले.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 1:52 pm | तर्राट जोकर

चालेल ना वेमुला काढा, कन्हया काढा, गांधी, कोणीही कुठेही काहीही काढा, स्वातंत्र्य आहे. पण विषयांतर करतो म्हनून फक्त माझं नाव बदनाम करु नका म्हणजे झालं.

बाकी वारीस पठाणच्या निलंबनासाठी जे विधानसभासदस्य एकत्र आले त्यांना जनतेच्या तातडीच्या कामांसाठी असेच एकत्र यायला का जमत नाही असा तो प्रश्न होता, पण तुम्हाला मला टार्गेटच करायचं असेल तर कुठलंही कारण पुरतं.

आनन्दा's picture

21 Mar 2016 - 3:52 pm | आनन्दा

बाकी सगळे जाऊद्या, मात्र गिरीश कुबेरांनी स्वखुशीने आत्मह्त्या केली आहे, ही मात्र खूपच भावले. जे काही झाले त्याला "आत्महत्या" यापेक्षा समर्पक उपमा असूच शकत नाही.

मला असे वाटते की आपण १ दिवस लोकसत्ता न घेऊन काही फरक पडणार नाही, तर पुढचा पूर्ण महिना लोकसत्ता न घेऊन गिरीश कुबेरांना पाठिंबा दिला पाहिजे.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 4:13 pm | तर्राट जोकर

आम्ही तर कैक वर्षे झाले बंद केलाय. आता कसा पाठिंबा द्यावा? ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2016 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे...

१००० टक्के

हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.

मितभाषी's picture

20 Mar 2016 - 9:42 pm | मितभाषी

तुम्ही आनंद यादवांबद्दल म्हणताय का

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 4:56 am | hmangeshrao

प्रभावशाली व्यक्तीचा धर्म देव इतरानी फॉलो करणे यात गैर काहीच नाही... पेशवाईचा नगारा वाजत होता ता काळात पेसवे पुजतात म्हणुन गणेशभक्त वाढले व अश्टविनायकांचे प्रस्थ वाढले.

.....

मुसुलमान फार वैट ! इथे येऊन ते दिल्लीत राजे झाले.

ख्रिस्चन फार वैट ! इथे येउन अनाथालये व कुश्टरोगी आश्र्म काढले व नोबेल मिळवले.

( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . )

.
...

पैशाचं मिंधेपण ! हं ! ते तर सगळीकडेच असते.

एक कुठले तरी कुडमुडे पारितोषिक वाघाकडुन घेताना एक बटाटा बोलला होता ... ही लोकशाही आहे की ठोकशाही ?

वाघाने पंजा उगार्ताच बटाट्याने शब्द गिळले होते ना ?

........

तसेही कुष्ठरोग आश्रम आता टीबी एड्समध्ये कन्वर्त होत चाललेत कारण कुष्ठर्ग्ण आता कमी होत चाललेत.

त्यामुळे हिंदु संघटनानीही आता टीबी एड्सचे आस्रम खोलावेत व २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.

विकास's picture

21 Mar 2016 - 6:33 am | विकास

मिसळपाव.कॉम वर आपले स्वागत आहे.

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 8:09 am | hmangeshrao

कोदलानीबैना सध्या तसेही काही काम नाही.

त्याना एखादा आश्रम काढुन दिल्यास त्यांचे , रुग्नांचे व हिंदु धर्माचे भले होइइल.

२०५० चे नोबेल घेण्यास शुभेच्छा !

मितभाषी's picture

21 Mar 2016 - 12:34 pm | मितभाषी

बटाटा कोण?

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 5:48 pm | hmangeshrao

बाळासाहेबांच्यआ हस्ते पुलना एक पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारुन लगेच पुलं बोलले होते के हे सरकार लोकशाही आह की ठोकशाहीचे ?

ठाकरेनी फटकारले होते ... आमच्यचकडुन पुरस्कार घेउन आम्हालाच बोलता का ?

मृत्युन्जय's picture

21 Mar 2016 - 5:53 pm | मृत्युन्जय

पुलंना बटाटा म्हणाण्यामागे काही कारण?

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 6:34 pm | hmangeshrao

सिम्बोलिक हो ..

बाघोबा आणि बटाट्याची चाळ

नावे लिहिणे टाळायचे होते म्हणुन लिहिले होत्व.

पण घटना व त्या बातम्या जगजाहिर आहेत म्हणुन नावे लिहिण्यात काही प्रॉब्लेम नसावा

अर्धवटराव's picture

21 Mar 2016 - 7:57 am | अर्धवटराव

तर सदर प्रकरण 'असहिष्णुता' कॅटॅगरीत मोडत नाहि, त्यामुळे त्याचा निषेध वगैरे करण्याचं काहि कारण नाहि. हायबर्नेटमोड मधे वावरणार्‍या मिपाकरांना चार शब्द वकिली थाटात भिरकावयाला मिळाले. काहिंनी मुख्य मुद्दे बाजुला फेकत आपले जुनेच दळण कांडण उकरुन काढले. काहि नवसदस्यांनी आपण जुनेच असल्याचे पुरावे दिले... एव्हढी उपलब्धी काहि कमि नाहि.

मिपाचे मुक्तपीठही होण्यास आणखी वेग मिळाला हे नोंदवायचे विसरलात का? ;)

(ह घ्या)

मदनबाण's picture

21 Mar 2016 - 8:53 am | मदनबाण

ख्या.ख्या. ख्या...खि क्क. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

अनुप ढेरे's picture

21 Mar 2016 - 10:18 am | अनुप ढेरे

ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक ग्रुपने त्यांच्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती धर्माची यथेच्छ टवाळी केली होती. आरडाओरडा झाला. सुरुवातीला माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका घेतली त्यांनी. पण नंतर काय झालं माहिती नाही. दोन दिवसांनी मुंबैच्या एका चर्च अधिकार्‍याची प्रतेक्ष भेट घेऊन माफी मागितली. त्याचा फोटोदेखील प्रसिद्ध झाला.

मृत्युन्जय's picture

21 Mar 2016 - 11:48 am | मृत्युन्जय

या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध होतातः

१. देशातली असहिष्णूता वाढत चालली आहे आणि त्यासाठी सध्याचे सरकार अथवा हिंदु जनता जबाबदार आहे असा जो कांगावा केला जात आहे तो धादांत खोटा आहे..

२. सहिष्णुता फक्त हिंदुंमध्येच असली पाहिजे. इतर धर्मीयांना हा नियम लागू नाही,

३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे थोतांड मांडणारे प्रेस्टिट्युट्स सिलेक्टिव्ह गोष्टींकडे बरोबर काणा डोळा करतात.

४. भावना फक्त हिंदोतेर लोकांना आहे. हिंदु लोकांना कुठल्याही धार्मिक / सामाजिक भावना अथवा जाणीवा असता कामा नये.

५. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदुंविषयी गरळ ओ़कण्यासाठी आहे.

६. हिंदु वगळता इतर सर्व धर्मांमध्ये चमत्कार होतात. हिंदु धर्मातील अश्या गोष्टींवर मात्र जळाजळीत टीका केली जाइल.

७. कोणीही यावे आणि हिंदुंना मारुन जावे. एक्खाद्या राजकीय पक्षाने त्याविरुद्ध आवाज उठवला की ते "अतिरेकी " आणि असहिष्णू ठरावेत. इतर धर्मीयांचा चुकांवर कुणी बोट ठेवले तर काय होते ते दिसलेच.

८. गिरीश कुबेर पक्के दुतोंडी आणी ढोंगी आहेत. त्याची शिरजोरी फक्त सात्विक संताप येणार्‍या लोकांविरुद्धच. असे कोणी नरडे दाबले की *गणाला पाय लावुन पळत सुटतात.

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 11:50 am | बाळ सप्रे

"असंतांचे संत" एक उत्तम लेख होता. तो मागे घेण्याचे पाउल निश्चितच पळपुटेपणाचे वाटले.

त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. कमाल आहे!!

विकास's picture

21 Mar 2016 - 4:02 pm | विकास

त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला..

त्यात मी, अग्रलेखात अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल पण लिहीले आहे. पण कदाचीत तुम्हाला ते दिसले नसावे. असो.

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 4:57 pm | बाळ सप्रे

अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल

इतर धर्मांचा उल्लेख अनावश्यक अजिबात नव्हता..

राजसत्तेला लोंबकळणारी धर्मांची दुकानदारी असा विषय असल्याने सर्व धर्मांना सारखेच फटकारणे योग्यच होते या निमित्ताने..

बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

विकास's picture

21 Mar 2016 - 5:08 pm | विकास

बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

"हिंदूविरोध" हा तुम्हाला दिसला. मला नाही. नाहीतर वहाबीबद्दल लिहीले नसते आणि लिहीलेले तुम्हाला दिसले असते.

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 5:26 pm | बाळ सप्रे

हिंदूविरोध या प्रकरणात नाही म्हणत आहे.. इतर बर्‍याच ठि़काणच्या आक्षेपाबद्दल आहे ते..

बाकी मला वहाबी न दिसण्याचा काही प्रश्नच नाही.. मला कुठल्याही धर्माविषयी अजिबात आत्मीयता नाही.. सर्व धर्म थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी..

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 5:10 pm | तर्राट जोकर

बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

>> अचूक पकडलंय सप्रेसाहेब. उदा. 'होळीला पाणी वाचवा' म्हणणे, प्लास्टरऑफपॅरिसच्या गणपतीला विरोध, दिवाळीचे फटाकेविरोध, इत्यादी, हे हिंदूसणांविरुद्धचे कारस्थान आहे असे म्हटले जाते. ;-)

विकास's picture

21 Mar 2016 - 5:13 pm | विकास

तसं नाही काही... पण स्वतः काय करावे हे पहाण्याऐवजी इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! उगाच कशाला असहीष्णुता वाढवायची! बरोब्बर की नाही?

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 5:16 pm | तर्राट जोकर

सीपीयु ह्यांग झाला माझा. जरा विस्कळीत करुन सांगा काय म्हनायचे आहे ते.

विकास's picture

21 Mar 2016 - 5:22 pm | विकास

इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!

अजूनही समजले नसेल तर मी माझे हे गीतापठण थांबवतो.

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 5:34 pm | बाळ सप्रे

इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!

जे खटकतय ते सांगणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला नव्हे. कोणी पाणी वाचवण्यासाठी कींवा नदी प्रदूषण थांबवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमावर किंवा गणपती विसर्जनावर हल्ला वगैरे केल्याचे ऐकिवात नाही .. आवाहन करण्यात काही चूक नाही. ज्यांना पटेल त्यांनी करावं , नाही ते करतातच आहे आपापल्या मनासारखं ..

असो.. खूप अवांतर व्हायला लागलय ..

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 5:35 pm | तर्राट जोकर

नाही ते समजले हो. पण माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ही गीता सांगावी वाटली ते कळले नाही. ह्यातले इतर कोण आहेत ते स्पष्ट केलेत तर मजसारख्याला समजेल तरी.

बाकी, मिसळपाव चर्चांमधे उच्च अलंकारिक भाषेत एखाद्यास गाढव म्हणणे सर्वसंमत असावे. तेच आम्ही सरळ सरळ म्हटले की लोक पिसाळतात. ;-)

गामा पैलवान's picture

21 Mar 2016 - 12:25 pm | गामा पैलवान

एच्चमंगेशराव,

१.
>> ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . )

अगदी बरोबर बोललात पहा. आता हिंदू जागा होऊ लागलाय. नेमकं तेच तुमचं दुखणं आहे. वेलकम टू मिपा.

२.
>> २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.

जगाचे उकिरडे फुंकून पारितोषिकं मिळवायची वेळ अजूनतरी हिंदूंवर आलेली नाहीये. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही असेल ते. तरीपण तुमच्या सल्ल्याबद्दल आभार.

आ.न.,
-गा.पै.

जाताजाता : एच्चमंगेशराव हे बटाट्याच्या पुस्तकातलं नाव घेतांना तुम्हाला अजिबात लाज वाटली नसेल.

जागे होताय ? व्हा !

उत्तिष्ठितजाग्रत प्राप्य नोबेल सत्वरं .

पैसा's picture

21 Mar 2016 - 6:10 pm | पैसा

जामोप्या?

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 6:20 pm | तर्राट जोकर

और का?

बाकी ह्या व्यक्तीचे इतके आयडी आले आणि ब्यान झाले. काय करतो काय हा असे ब्यान होण्यासारखे?

बास क्या !

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 5:38 pm | बाळ सप्रे

माघार जरी चुकीचं पाउल असलं तरी त्यानिमित्ताने हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहोचला हे मात्र चांगलं झालं !!

विकास's picture

21 Mar 2016 - 6:26 pm | विकास

सहमत.

त्याच बरोबर, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज उठवणारे एकंदरीतच गप्प बसलेले पाहून आश्चर्य वाटले नाही.

बाळ सप्रे's picture

21 Mar 2016 - 6:40 pm | बाळ सप्रे

चॅनलवर उहापोह झाला नाही वा ट्वीटरवर ट्रेंड झालं नाही म्हणजे सगळ्यांना ही माघार घेणं पटलयं असा सोयीस्कर निष्कर्ष काढायचीही गरज नाही.. :-)

आजानुकर्ण's picture

21 Mar 2016 - 7:36 pm | आजानुकर्ण

, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज

विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. या वेळी केतकर आठवले. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. कुबेर यांची मात्र या सर्व प्रसंगात चांगलीच शोभा झाली आहे.

विकास's picture

21 Mar 2016 - 8:50 pm | विकास

विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे.

पूर्ण सहमत. आपण निषेध केलात याचे चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. वास्तवीक, लेख लिहीताना हा मुद्दा डोक्यात पण नव्हता. मात्र काही प्रतिसाद ज्या पद्धतीने येऊ लागले त्यामुळे असे नक्कीच वाटू लागले. असो.

अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही.

खरे आहे. या वरून मला विनोद मेहतांची आठवण झाली. त्यांनी The Independent म्हणून एक नियतकालीक चालू केले होते. ज्या प्रमाणे आठवते त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल होते. टाईम्स ला वगैरे सहज हरवू शकले असते. ते मुंबईतच चालू झाले होते, सुरवातीस ते मोफत वाटायचे आणि नंतर ते मुंबईतच बंद पडले..

या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातील तमाम पक्ष एकत्र येऊन विरोधात बोलले होते. मला वाटते पवार मुख्यमंत्री असावेत तेंव्हा पण ते पण अर्थातच यावर आक्षेप घेण्यात पुढे होते. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आला. त्याचे काय झाले ते आठवत नाही. पण त्यांनी, "जर-तर"च्या भाषेत मोघम माफी मागितली होती. म्हणजे आत्ता कसे, "वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...." असे स्पष्ट म्हणले आहे. त्याउलट, तेंव्हा "जर वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल..." अशा अर्थाची माफी (म्हणजे, मी चुकलो वगैरे नाही) मागितली होती.

तसेच अंतुलेंचे प्रकरण जेंव्हा बाहेर आले तेंव्हा, "अंतुलेंच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असा रविवारचा दृष्टीक्षेप लिहून माधव गडकरींनी हक्कभंग प्रस्ताव ओढवून घेतला होता. अर्थात पुढे काय झाले ते आठवत नाही. पण गडकरींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात तरी नाही.

पण या दोन्ही गोष्टी राजकीय होत्या...

वर चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर यांचा एक मदर तेरेसांवर ताशेरे ओढणारा लेख वाचल्याचे आठवते. त्यात, त्यांची एक आठवण देखील होती...(मी आता आठवणीतून लिहीत आहे) एकदा ते आणि मदर तेरेसा एकाच विमानात एकाच लाईन (रो मध्ये) बसले होते. संपुर्ण विमानातले सगळे जण या बाईंच्या पाया पाडून गेले. तळवळकरांना त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांचे काम प्रामाणिक वाटत नव्हते. शिवाय असले नमस्कार करण्यात इंटरेस्ट नसल्याने, ते करायला गेले नाहीत. थोड्यावेळाने फ्लाईट अटेंडंटकडून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. मदर तेरेसांनी त्यात "गॉड ब्लेस यू" अथवा तत्सम आशिर्वादपर संदेश दिला होता. अर्थातच त्यात गर्भितपणे, "तू मला नमस्कार करायला आला नाहीस" अशा अर्थाचे निरीक्षण देखील केले होते असे तळवळकरांच्य लक्षात आले. वास्तवीक त्यांचा हा लेख वाचेपर्यंत इतर कुठल्याही तत्कालीन व्यक्तीप्रमाणे, मदर तेरेसांबद्दल माझे मत निगेटीव्ह नव्हते. पण तळवळकर म्हणतात म्हणल्यावर लक्ष गेले आणि नंतर कधीकाळी न्यूयॉर्क टाईम्समधे देखील तसेच नकारात्मक लेख वाचल्यावर खात्री पटली... असो.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2016 - 10:45 pm | श्रीगुरुजी

या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.

अमेरिकन पत्रकार सेमूर हर्श (Seymour Hersh) यांनी १९८३ मध्ये The Price of Power: Kissinger in the Nixon White House हे एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या सुरवातीच्या काळात सीआयचे हस्तक होते असा आरोप केला होता. हर्श यांचा असा आरोप होता की जॉन्सन व निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असण्याच्या काळात मोरारजी देसाईंनी भारताचे परराष्ट्र धोरण व स्थानिक धोरणाची महत्त्वाची माहिती सीआयएला २०००० डॉलर्स (तत्कालीन ३.४० लाख रूपये) च्या बदल्यात दिली होती. त्यामुळे मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श विरूद्ध अमेरिकन न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. मोराराजी देसाई हेच मंत्रीमंडळातील हेर होते हे सेमूर हर्श यांना सिद्ध करता आले नाही. परंतु त्या आरोपामुळे मोरारजींची बदनामी झाली आहे हे मोरारजींच्या वकीलाला सिद्ध करता आले नाही व त्यामुळे तो खटला मोरारजी देसाई हरले.

नतर १९८९ च्या उत्तरार्धात टाईम्स गटाच्या द इंडिपेंडंट या नवीन इंग्लिश दैनिकात पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन विनोद मेहतांनी असा आरोप केला होता की सेमूर हर्श यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला केंद्रीय मंत्रीमंडळातील सीआयए चा हेर हे मोरारजी देसाई नसून यशवंतराव चव्हाण होते. हा आरोप प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मुंबईत व इतरत्र मोर्चे निघाले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी विनोद मेहतांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत व शेवटी त्यांना माफी मागून आरोप मागे घ्यावे लागले. काही काळातच हे दैनिकही बंद झाले.

शलभ's picture

21 Mar 2016 - 5:41 pm | शलभ

१०० झाले. अभिनंदन.

होबासराव's picture

21 Mar 2016 - 7:39 pm | होबासराव

अह्हा हितेश दरेकर उर्फ मग्गा वापिस आयेला हय... काय जंत बर झालेत का?

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 11:20 pm | hmangeshrao

अख्ख्या देशालाच जंत झालेत.

२०१४ पासुन

अख्ख्या देशालाच जंत झालेत.
२०१४ पासुन

संपादक सुट्टीवर गेलेत वाट्ट...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne

hmangeshrao's picture

22 Mar 2016 - 10:00 am | hmangeshrao

आमचे एक डी एच ओ ( म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ... म्हाणजे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रातील डोक्टरांचे बॉस , ते स्वतः माळकरी होते.) आम्हाला सतत सांगायचे...

भारत ही संतांची व जंतांची भूमी आहे.

( पेशंटला ताप , खोकला , डायरिया , अ‍ॅनेमिया , भूक नसणे , व्हिट्यामिन कमतरता , अ‍ॅलर्जी .... काहीही असले तरी जंताना विसरू नका. )

बोका-ए-आझम's picture

22 Mar 2016 - 11:32 pm | बोका-ए-आझम

तुम्हीही याच देशात राहता, बरोबर?

होबासराव's picture

23 Mar 2016 - 2:07 pm | होबासराव

कुठे घाणित दगड मारताय... इग्नोर मारो.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Mar 2016 - 9:42 am | श्री गावसेना प्रमुख

उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका करणाऱ्यांना मोदींचा काही पर्याय दिसतो आहे का,म्हणजे कोणती पार्टी हि मोदींपेक्षा चांगला कारभार देऊ शकेल,मुसळमान आणि बाकीचे सर्व वेमुला किंवा कन्हैय्या पंथाचे अल्पसंख्याक हे न भिता राहू शकतील,आर्थिक प्रगती हि सुसाट होईल,भ्रष्टाचार होणार नाही,पुरस्कार वापसी हि होणार नाही (आता ह्या उपटसुभं लेखकाना त्यांचे खाऊ सरकार असल्यावर पुरस्कार वापसी ची गरज काय)fti च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही,jnu ला हिंदुस्थान मुर्दाबाद वैगरे घोषणा दिल्या म्हणून कोर्ट कचेरीचे भय राहणार नाही, ओवेसी ला भारत माता कि जय म्हणायची गरज भासणार नाही,हिकडे राणे पुत्राला मराठ्यांचा नेता म्हणून स्थापित होता येईल,भुजबळ बाहेर येतील,तिकडे मालदा मधल्या निर्दोष मुस्लिमांना पोलिसांवर हल्ला करण्याचे भय राहणार नाही।तिस्ता ,पाटकर ह्या फोर्ड चा पैसा विना भय घेऊ शकतील,ग्रीन पीस हि संघटना पर्यावरण हाणीचे प्रकल्पाला विदेशी पैशाने विरोध करू शकतील।केजरिवाल ,सरदेसाई ,बरखा ह्यांना मोदींच्या नावाने कंठशोष करायची गरज भासणार नाही,है कोई

इरसाल's picture

22 Mar 2016 - 12:15 pm | इरसाल

आज बोले तो कन्हैया मिलनेकु जा रा उस्से !
सबका प्यारा, राजदुलारा......अपना ही......पैचानो ??????

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 12:30 pm | मितभाषी

बहुतेक लोकांना मोदीचाय व्हीजनबद्दल शंका नसावी.
हे वाचाळवीर, भक्त, मनुवादी यांच्यामुळे जातीय तेढ वाढत आहे.

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 12:32 pm | मितभाषी

*मोदीच्या असे वाचावे.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2016 - 2:18 pm | श्रीगुरुजी

विचारस्वातंत्र्याच्या दडपशाहीचे अजून एक जुने उदाहरण आहे. पण ही दडपशाही पुरोगामी विचारवंत समजल्या जाणार्‍यांनीच केली असल्याने त्याला दडपशाही म्हणता येणार नाही.

१९८८ किंवा १९८९ मध्ये 'माणूस' नावाच्या साप्ताहिकात (त्यावेळी संपादक कोण होते ते आठवत नाही) बाळ गांगल यांनी 'महात्मा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज' अशा शीर्षकाचा एक टीकात्मक लेख लिहिला होता. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रचंड वादळ उठले. ब्राह्मण संपादक असलेल्या सदाशिव पेठेतून प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकात ब्राह्मण लेखकाने बहुजन समाजाच्या नेत्यांवर लिहिलेल्या टीकात्मक लेखाने एकदम जातीयवादी धुरळा उडाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. विधानसभेत या लेखावर चर्चा होऊन कडक टीका करण्यात आली. पुण्यातील तत्कालीन महापौर (बहुतेक काकडे असावेत) आपल्या गाडीतून ४-५ जणांना घेऊन साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा वगैरे फोडल्याचे वृत्तपत्रातून आले होते. नंतर पुढे काय झाले ते आठवत नाही. माणूस साप्ताहिक नंतर केव्हा तरी बंद झाल्याचे आठवते.

छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा हे एक कारण वापरले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात "तुम्ही इतर मागासवर्गियांना राखीव जागा देणार्‍या मंडल आयोगाला विरोध केला, महात्मा फुल्यांची बदनामी करणार्‍या बाळ गांगल यांना पाठीशी घातले" असे आरोप इतर आरोपांबरोबर केले होते.

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 9:32 pm | मितभाषी

महात्मा फुले नी पुण्यात वर्तमानपत्र काढल्यास प्रेस जाळून टाकू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. म्हणून त्यांनी ते काम मुंबईतुन करावे लागले. हे सोयीस्करपणे विसरले जाते.