पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
14 Mar 2016 - 2:57 pm

।। जय शिवराय ।।

मित्र मैत्रिणीनो

येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.

कट्ट्यावर:

१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट

कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया.
आपला
शांतीप्रिय
भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.

हे ठिकाणसद्भावना

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

14 Mar 2016 - 3:00 pm | अभ्या..

१, २, ४ ,५ हितंच करु की.
३ आणि ६ आमचे आम्ही सवडीने आवडीने करु. ;)

बाकी स्टार्टिंगला लिव्हलेले जय शिवराय आवडले बर्का आपल्याला.
जय भवानी जय शिवराय.

मी येतोय. मात्र पुणे कट्ट्यात अल्पोपहार नसून जेवण असतं भो.

कपिलमुनी's picture

14 Mar 2016 - 3:03 pm | कपिलमुनी

पाताळेश्वर म्हणला की तुम्ही बाय डिफॉल्ट असता :))

प्रचेतस's picture

14 Mar 2016 - 3:06 pm | प्रचेतस

होय.
सोयीची जागा आहे. :)

पाताळेश्वराच्या नामकरणाचा बोर्ड घ्यावा काय करायला?
वल्लेश्वर अथवा प्रचेतेश्वर

बाबा योगिराज's picture

15 Mar 2016 - 12:50 am | बाबा योगिराज

लोगो मध्ये एक दर्पणा होऊन जौ द्या.....

;-)

नाखु's picture

14 Mar 2016 - 3:11 pm | नाखु

सोयीची जागा आहे. :)

सोयीच्या जागी आठवणींची असं वाचलं आणि ........

बाकी अभ्या बोर्ड करताना आम्ची कुठेही शाखा नाही, असे नाही ,असे नक्की नाही, असे समजू नका. हे लिहिणे.

अभ्या..'s picture

14 Mar 2016 - 3:13 pm | अभ्या..

अक्षरे वाढली, पैशे वाढले.

नाखु's picture

14 Mar 2016 - 3:16 pm | नाखु

कधी आधीचे नाही बुडवले तेव्हा आत्ताचे.....

-
1. आधार कार्ड
2. मतदान ओळखपत्र
3. ड्राइविंग लैसेंस
4. शाळा सोडल्याचा दाखला
5. राशन कार्ड
6. रहीवासी दाखला
7. 7/12 उतारा
8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.

** ;)

महासंग्राम's picture

14 Mar 2016 - 3:39 pm | महासंग्राम

ते कशाला कट्टा करायचा आहे RTO चे तपासणी शिबीर नाही

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 3:50 pm | भाऊंचे भाऊ

;) हे वाचाकी राव

महासंग्राम's picture

14 Mar 2016 - 3:57 pm | महासंग्राम

भाऊ आमच्या नावाप्रमाणेच स्मायली पण गुप्त हाये मला वाटलं तुम्ही पाहिली असेल

अन तुमच्या गुप्त स्मायल्या वाचायची आमच्याकडून अपेक्षा ? इ नाय चोल्बे.

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2016 - 3:46 pm | चौथा कोनाडा

अहो, भाभासाहेब, ब्लडग्रुप वैद्यकिय प्रमाणपत्र अन विजय मल्ल्यायांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत असे कोणत्याही नॅशनलाईझ बॅंके चे प्रमाण पत्र हे राहिलेच की !

हौ द्या कट्ट्याच्या धाग्यात धुराळा!

चर्चेचा तिसरा धागा निघाला की कळवतो.

प्रचेतस's picture

14 Mar 2016 - 6:22 pm | प्रचेतस

तिसरा कशास निघेल? त्यांनी अगदी वेळ, तारीख, ठिकाण अगदी सुस्पष्ट लिहिलंय. इतर चर्चेस वावच नाही. मी तर येणारचे.

असं कसं असं कसं? पुण्यातला कट्टा आणि एका धाग्यात ठरणार?
=))

किमान ३ धागे तरी पाहिजेत.

अगदी, एका धाग्यात ठरेल तो कट्टाच काय!! कटट्याचे काही खरे नाही, आमच्या वेळी असं नव्हतं बरं!!

प्रचेतस's picture

15 Mar 2016 - 2:13 pm | प्रचेतस

शांतिप्रिय यांना आपला फुल सपोर्ट आहे.
एकाच धाग्यात कट्टा करणार बघा.

गप्रांव!! ते पाताळेश्वर सांगितलेनीत म्हणून, नायतर तू कसला येतोयेस!!

अभ्या..'s picture

15 Mar 2016 - 2:51 pm | अभ्या..

हा ना. सासवड हडपसर असले कायतरी सांगायला पाह्यजे होते. वल्ल्या कीती उड्या मारत असता बघितले असते.

कपिलमुनी's picture

15 Mar 2016 - 3:38 pm | कपिलमुनी

सासवड सध्या फेमस आहे. लौकरच सिंहगड रोड ते सासवड मेट्रो सुरू करावी अशी मागणी आहे.
तर मुख्यमंत्र्यांनी सासवड लाच विमानतळ होणार असून त्याचे नाव दु दु विमानतळ ठेवणार आहे असे कळवले आहे.

नाही नाही, त्याचं नाव 'पुचुपुचुदुग्धओढनाथपांडुब्बा विमानतळ' असं आहे.

सूडराव, मरतंय आज...

बॅटमॅन's picture

16 Mar 2016 - 4:37 pm | बॅटमॅन

अरारारारारा =)) =)) =)) =)) =)) =))

प्रचेतस's picture

16 Mar 2016 - 4:40 pm | प्रचेतस

तू येतोयेस ना ब्याट्या?

इल्ले. तेव्हा औटॉफस्टेषण जाणे आहे.

प्रचेतस's picture

16 Mar 2016 - 4:44 pm | प्रचेतस

मिरजेला का?

नै जरा नातलगांकडे जाणे आहे.

प्रचेतस's picture

16 Mar 2016 - 4:49 pm | प्रचेतस

हाहा.

नाखु's picture

16 Mar 2016 - 4:41 pm | नाखु

नाही, कट्ट्याला येणारेस का ते बोल ?

तुषार काळभोर's picture

15 Mar 2016 - 4:29 pm | तुषार काळभोर

तिकडं सासवडचं चांगावटेश्वर अन् कर्‍हेश्वर आहे की त्यांच्या सोईसाठी!

अभ्या..'s picture

15 Mar 2016 - 4:49 pm | अभ्या..

पीपीडिओपी येरपोर्ट. ;)
हाय का कोन पीपीडीओपी
हाय का कोन पीपीडीओपी
.
(अध्यक्षः अ.पु.सा.ह.टमटम चालक मालक संघटना)

शान्तिप्रिय's picture

14 Mar 2016 - 3:36 pm | शान्तिप्रिय

ठीक आहे जेवण करु.

कलंत्री's picture

14 Mar 2016 - 4:04 pm | कलंत्री

२० मार्चच्या कट्ट्याला शुभेच्छा. मिपाच्या सभासदांशी चर्चा / गप्पा / मतभिन्नता या सगळ्यात एक आगळी वेगळी मजा असते.

येणार.....

२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा

बाबऊ!

शान्तिप्रिय's picture

14 Mar 2016 - 6:58 pm | शान्तिप्रिय

कट्टा होणारच. ठरलेल्या वेळी , ठरलेल्या दिवशि ठरलेल्या ठिकाणी.

रमेश भिडे's picture

15 Mar 2016 - 3:31 am | रमेश भिडे

इतक्या कॉन्फिडेन्टली तर राहुलजी पण नाही बोलत....

उगा काहितरीच's picture

14 Mar 2016 - 11:03 pm | उगा काहितरीच

मी पण येईल . बोला कोण कोण येतंय ?

श्रीरंग_जोशी's picture

14 Mar 2016 - 11:05 pm | श्रीरंग_जोशी

कट्ट्याला शुभेच्छा!!

सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

बाबा योगिराज's picture

15 Mar 2016 - 12:55 am | बाबा योगिराज

आमचा पास.

कट्टयास किलोभर शुभेच्छा. भरपूर फटू, अन सविस्तर वृत्तांत येऊ द्या.

रेवती's picture

15 Mar 2016 - 4:16 am | रेवती

ऑफ बीत
काळीज गलबलले की हो! ;) (आम्हाला येता येणार नसल्याने चुका काढण्याचा क्षीण प्रयत्न, बाकी कै नै!)

जुइ's picture

15 Mar 2016 - 5:34 am | जुइ

कट्टयाला शुभेच्छा!!

एकाच धाग्यात आटोपल्याने मजा नाही आली.निदान जागेवरून सूचना, वेळ वगैरे वर दोन धागे काढायला स्कोप अजूनही आहे ;)
कट्टयाला शुभेच्छा!

जरा थांबा....

अज्जून २ धागे येतीलच.

"जागेवरून सूचना" ह्याबद्दल एक धागा

आणि

"वेळ" ह्या बाबतीत मात्र नक्कीच यायला पाहिजे.

(हे पुणेकर तसे वेळेच्या बाबतीत पक्के हां. सकाळी ९ची वेळ दिली की. दुपारी १२-१ पर्यंत जमतात.)

यशोधरा's picture

15 Mar 2016 - 9:17 am | यशोधरा

उणेकरांनाच अधिक उत्साह! =))

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 10:51 am | मुक्त विहारि

साहजिकच आहे....

केंद्रशासनाचे परीघावर लक्ष हे हवेच.

यशोधरा's picture

15 Mar 2016 - 10:56 am | यशोधरा

हो तर, म्हणूनच पुणेकर उणेकरांवर लक्ष ठेवून असतात.

यांबूकर, डोंबूकर आणि झालच तर पिंचिकर, सिगकर (सिंहगडकर) पुणेकरांच्या कट्ट्याच्या धाग्यावर लक्ष ठेवून असतात.

असली पुणेकर दुपारी १ ते ४ झोपतो.त्याला सुखाची झोप मिळावी म्हणून दुकाने पण बंद ठेवली जातात.

तसेच, पुणे कट्ट्याचे किमान ३ धागे निघाले तरच नीट आयोजन होते.

एका धाग्यात कट्ट्याचे आयोजन, हे पुणेकरांना जमले तर उत्तम.म्हणजे पुणेकर आता उणेकरांसारखेच आयोजन करायला लागले, असे म्हणता येईल.

तोडा फोडा नीती वापरून बघताय काय? वापरा, जमायचे नाय आणि उपयोग पण नाय.काय? =))

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 4:37 pm | मुक्त विहारि

अजिबात नाही....

पुण्यात कट्टा असेल तर....पिंपरी-चिंचवडकर नाराज.

सिंहगडरोडला कट्टा ठेवला तर, पुणेकर नाराज.

पिंपरी-चिंचवडला कट्टा ठेवला तर, सिंहगडरोडवाले नाराज.

ते हडपसरला राहणारे, एक्का काका मात्र पुणे परीसरातील बर्‍याच कट्ट्यांना हजेरी लावू शकतात.

असो,

पिंपरी-चिंचवडवाल्यांनी, हे पुणेकर, कट्ट्याला येत नाहीत, म्हणूनच वेगळी "मनपा" स्थापन केली असावी, असा संशय आहे.

आता ह्याच न्यायाने बहूदा, सिहगड मनपा, कोथरूड मनपा, हडपसर मनपा पण स्थापन झाल्या तर नवल नाही.

यशोधरा's picture

15 Mar 2016 - 5:20 pm | यशोधरा

मुवि, इनो घ्या ब्वॉ.

प्रचेतस's picture

15 Mar 2016 - 5:24 pm | प्रचेतस

अगदी.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 7:17 pm | मुक्त विहारि

कट्ट्याला हजर राहता येत नाही ही खंत....

ती काढून टाकयाला इनो पेक्षा डोंबूत अज्जून एखादा कट्टा करणे योग्य.

तुम्ही या तर आमच्या पुण्याला, जंगी कट्टा करू की!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Mar 2016 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पायजे तर कटिंग पण पाजु. खारी पिंचिकर आणतीलचं.

यशोधरा's picture

15 Mar 2016 - 8:57 pm | यशोधरा

हो, हो पण मग चहा पिऊनच्या पिऊन पुणेकर चहा पाजत नाहीत, असे म्हणायचे नै हां! =))

मुक्त विहारि's picture

16 Mar 2016 - 10:38 am | मुक्त विहारि

तेंव्हा एक जोरदार "चहा-पार्टी" नक्कीच साजरी करू.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2016 - 10:40 am | मुक्त विहारि

कशाला?

त्यापेक्षा आम्हीच तिखट-मिठाचे चिरोटे घेवून येतो की.

मस्त चिरोटे खाऊ, चहा पिवू आणि वल्ली बरोबर पाताळेश्र्वरची लेणी बघू.

बोका-ए-आझम's picture

16 Mar 2016 - 11:45 am | बोका-ए-आझम

या निमित्ताने एक डोंबिवली-कळवा-ठाणे-पनवेल-मुंबई-नवी मुंबई असा कट्टा होऊन जाऊ दे. नंदी पॅलेस त्याचसाठी बांधलंय ना जगन्नाथ पाटलांनी!

अजया's picture

16 Mar 2016 - 11:50 am | अजया

जोरदार अनुमोदन.
खूप दिवस झाले डोंबोली कट्टा करुन.

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 11:10 am | भाऊंचे भाऊ

तुम्ही येणार असाल तर मलाही अपिअर वायला आवडेल...

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 3:47 pm | मुक्त विहारि

महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने येवू शकणार नाही.

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 4:38 pm | भाऊंचे भाऊ

आपला ही पास. या कट्याला यायला जमणार नाही :(

मजा करा मिपाक्रान्नो. मस्त फोटो येउदेत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Mar 2016 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कट्ट्याला शुभेच्छा.

शान्तिप्रिय's picture

15 Mar 2016 - 11:45 am | शान्तिप्रिय

पुणे कट्टा
पाच दिवस बाकी!

नमस़्कार्,मडळी मी नविनच आहे .तर आलो तर चालेल का?फी किति असेल.

नमस़्कार्,मडळी मी नविनच आहे .तर आलो तर चालेल का?फी किति असेल.

शान्तिप्रिय's picture

15 Mar 2016 - 12:32 pm | शान्तिप्रिय

नक्कीच या.
फी कसली?
फी बी काहि नाहि.
वाट पाहातोय आपली.

Vasant Chavan's picture

15 Mar 2016 - 2:04 pm | Vasant Chavan

धन्यवाद

Vasant Chavan's picture

15 Mar 2016 - 2:03 pm | Vasant Chavan

आभारी आहे.मी नक्की येणार ..

रांग लावून फी देणारे मिपाकर डोळ्यासमोर आले =)))

हे खरे आहे बर का.

शान्तिप्रिय's picture

15 Mar 2016 - 2:33 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद प्रचेतस!
हा कट्टा यशस्वी करुयाच!

चांदणे संदीप's picture

15 Mar 2016 - 2:42 pm | चांदणे संदीप

कट्टा होईल हो.... पण फी मिसलीत! :(

अत्रन्गि पाउस's picture

15 Mar 2016 - 2:46 pm | अत्रन्गि पाउस

एकदम धस्स झाले ....
पण मग आल इज वेSSSSSल हे जाणवले ...

प्रसाद को's picture

15 Mar 2016 - 4:17 pm | प्रसाद को

सादर प्रणाम,

वा...मी नक्की येणार ..

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 5:00 pm | मुक्त विहारि

१. सर्वांचा संक्षिप्त परिचय ===> किती वेळ? कारण एक्का काका आणि प्रचेतस ह्यांचीच संक्षिप्त माहिती दोन-दोन तास चालते.

२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ====> ??????????? ह्यावर तर धाग्यांवर धागे निघतात आणि तरी पण अज्जुन काही एकमत होत नाही.ही चर्चा बरीच वेळखाऊ असल्याने, तुम्ही पुढील कार्यक्रम करण्याची शक्यता फारच कमी.

तरीही त्या शंका विचारून घेतो.

३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ====> इथे नक्की काय खाणार? पाणीपुरी (कुठल्या गाडीवर?), भेळपूरी (कुठल्या गाडीवर?), पावभाजी कुठल्या हॉटेलांत, ह्या अशा मार्मिक चर्चा करता-करता दुसरा दिवस उजाडेल.

४. पुण्यातील ऑफ बीट ठीकाणांबद्दल चर्चा ====> ही खाता खाता करायचीच गोष्ट आहे.कारण पुणेकर अशा ठिकाणांबद्दल फक्त चर्चाच करतो.

५. अनौपचारिक गप्पा =====> २ मराठी माणसे भेटली की त्या होताततच.

६. बालगंधर्व कलादालनास भेट. =======> कशासाठी?

आम्हा उणेकरांच्या शंकाच फार.

पैसा's picture

15 Mar 2016 - 5:12 pm | पैसा

=))

हल्लीच्या फ्याशनीनुसार तो शब्द "ऑफ बीत" असा आहे.

नाखु's picture

15 Mar 2016 - 6:17 pm | नाखु

आधी फक्त संशय होता मुवींना विजुभाऊ भेटले असतील (इतक्यातच आणि पार्टी पण दिली असावी) अता खात्रीच पटली आहे.

पुण्यातल्या+कोल्हापुरच्या+(घारापुरी) मुंबईच्या कट्ट्यालाही हजर राहणारा सख्खा पुणेकर शेजारी.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 7:19 pm | मुक्त विहारि

तुम्ही हजर असणारच....

पण पार हडपसर पासून डॉ. म्हात्रे येतात.

पण पुण्यातले मिपाकर जवळपास जायला तयार होत नाहीत, ह्याचे कौतूक वाटते.

शान्तिप्रिय's picture

15 Mar 2016 - 5:14 pm | शान्तिप्रिय

मुद्द्याचं बोलुया
जे मिपाकर येणार आहेत त्यांनी त्यांची हरकत नसल्यास आपला भ्रमणध्वनि व नाव (मिपावरील नाव ) माझ्या
भ्रमणध्वनिवर लघुसंदेश करुन कळवावा.

अभ्या..'s picture

15 Mar 2016 - 5:16 pm | अभ्या..

हायला,

मालकानी घेतलं काय नाव शान्तिप्रिय म्हणून. ;)

मुक्त विहारि's picture

15 Mar 2016 - 7:14 pm | मुक्त विहारि

पुणे कट्ट्याच्या धाग्याबाबत आमचे अवलोकन फार वेगळे आहे....

कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

टवाळ कार्टा's picture

16 Mar 2016 - 12:09 am | टवाळ कार्टा

झाला का रे मोकळा आता =))