विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे +अधिक - उणे

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
11 Mar 2016 - 12:43 am
गाभा: 

इतर चर्चांच्या ओघात विजय मल्ल्या निघून गेले, ते कुठेतरी गेलेत त्यांनी नको म्हटले तरी दोन पिढ्यांना ऐश करता येईल एवढा पैसा आहे आणि त्यांचा पैसा त्यांनी कसा खर्च करावा ही त्यांची मर्जी. हि धागा चर्चा काढण्या मागे त्यांच्यावर व्यक्तिगत टिका करणे हा उद्देश नाही- कुणाला ती तशी करण्यात रस असेल तर त्यासही ना नाही - पण मी अलिकडे मॅनेजमेंट हा विषय चघळतो आहे तेव्हा विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे + - अधिक उणे हा चर्चा विषया आहे. विजय मल्ल्यांना ठळक बातमीतील हेड लाईन पलिकडे मी कधी वाचले नाही म्हणून विजय मल्ल्यांच्या व्यवसायांच नेमकं काय झाल ? हे जाणून घेण्यास आवडेल पण धागा लेखचर्चेचा मुख्य रोख विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे + - अधिक उणे या अनुषंगाने अधिक माहिती चर्चेसाठी धागा अभ्यासू मिपाकरांच्या प्रतिसादांसाठी.

चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

11 Mar 2016 - 2:03 am | अर्धवटराव

अगदी डोळ्यात भरण्याजोगं.

सुनील's picture

11 Mar 2016 - 8:18 am | सुनील

थोडी वाट पहा. याचेही समर्थन करणारे प्रतिसाद येतील!!!

(श्रीविद्यार्थी) सुनील

छ्या, काहीतरीच तुमचं अर्धवटराव!

हे काय महत्वाचं आहे का? अहो जेएनयु मधे देशद्रोहाचं केवढं मोठ कुभांड रचतातेह देशद्रोही विद्यार्थी... किती विद्यार्थी म्हणून काय विचारताय? एकच आहे पण तोच एकटा देशाचे तुकडे तुकडे करणार आहे.

त्यामुळे धर्म, देश हे महत्वाचे! सरकार, गृहमंत्री, राजनाथ सिंह हे एका देश-बचाव ह्या देशभक्तीपर मोहिमेत गुंतले आहेत.

मल्ल्या वैग्रे काय त्यापुढे? त्याने थोडीच आजादीच्या घोषणा दिल्या? त्याने त्याची आजादी करून घेतली. त्याने घोषणा दिल्या नाहीत हे यशच आहे की!

- (देशद्रोही) सोकाजी

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 8:29 am | बोका-ए-आझम

असं एक मित्र म्हणायचा. मल्ल्यांनी त्यांचे पैसे विमानसेवेसारख्या प्रचंड खर्चिक व्यवसायात टाकले. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी (पक्षी: बिझनेसेस) केले. त्यामुळे त्यांनी जेवढं लक्ष विमानसेवेकडे द्यायला हवं होतं तेवढं दिलं गेलं नाही आणि अधोगतीला सुरूवात झाली. मला स्वतःला असं वाटतं की मल्ल्यांनी त्यांच्या विमानसेवेचं नाव किंगफिशर ठेवल्यामुळे इतर विमान कंपन्यांनी किंगफिशरची प्राॅडक्ट्स आपल्या ग्राहकांना देणं बंद केलं. हा एक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत बंद झाल्यामुळे मल्ल्यांच्या विमानसेवेचे बारा वाजले आणि हा गाॅड आॅफ गुड टाईम्स परागंदा झाला. जाणकारांचा अभिप्राय जाणण्यासाठी उत्सुक.

माहितगार's picture

11 Mar 2016 - 8:36 am | माहितगार

इतर विमान कंपन्यांनी किंगफिशरची प्राॅडक्ट्स आपल्या ग्राहकांना देणं बंद केलं. हा एक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत बंद झाल्यामुळे मल्ल्यांच्या विमानसेवेचे बारा वाजले

बोका, आपण व्यवस्थापन तंत्राची चिकित्सा करत आहोत, आपले हे लॉजीक लक्षात आले नाही, नेमके काय म्हणू इच्छिता आहात ?

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 9:00 am | बोका-ए-आझम

ही कंपनी इतर एअरलाईन्सची स्पर्धक असल्यामुळे तिच्याच brand name ने मिळणारी products बाकीच्या एअरलाईन्सनी आपल्या ग्राहकांना देणं बंद केलं. देशांतर्गत प्रवासात कोणतीही भारतीय एअरलाईन मद्य देत नाही. आंतरराष्ट्रीय प्रवासात आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स आणि भारतीय खाजगी एअरलाईन्स alcoholic beverages देतात. किंगफिशर बीअरचा खप या मार्गाने भरपूर होत होता. पण एअरलाईनचं नावही किंगफिशर असल्यामुळे या एअरलाईन्सनी किंगफिशरची alcoholic आणि इतर products देणं थांबवलं आणि त्यामुळे हा उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला असावा असं माझं म्हणणं आहे. पण त्यासाठी माझ्याकडे काही विदा नाही. त्यामुळे जाणकार अधिक सांगू शकतील असं मी म्हणालो.

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 9:35 am | बेकार तरुण

बोकाजी
तुमच म्हणणं बरोबर असलं, तरि विमानातील बीअर वीक्रीचा वाटा त्यांच्या टोटल बीअर सेल्स च्या २% पण नसेल.
भारतात त्यांचा (किंगफिशर बीअर) चा मार्केट शेअर ४२% हुन अधीक आहे, सो विमानातील विक्री त्यांच्यासाठी फारसा मटेरीयल सोर्स ओफ रेव्हेन्यु असेल असं वाटत नाही.

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 10:59 am | बोका-ए-आझम

मिनरल वाॅटरही होतं, विशेषतः देशांतर्गत प्रवासात. शिवाय मला वाटतं मार्स हाॅस्पिटॅलिटीच्या (ज्यांच्या सहकार्याने सचिन तेंडुलकरचं ' तेंडुलकर्स ' चालू झालं होतं) भागीदारीत किंगफिशरने एअरलाईन्स केटरिंगमध्येही उडी घेतली होती. पण स्वतःची एअरलाईन चालू केल्यावर इतर एअरलाईन्सनी किंगफिशरबरोबरचा टाय अप रद्द केला.
रच्याकने सुप्रसिद्ध ब्रँड गुरु अल रीज (Al Ries) यांनी ब्रँडिंगच्या अनुषंगाने काही प्रसिद्ध ब्रँड्सच्या अपयशाचा उहापोह केला होता. उदाहरणार्थ न्यूझीलंडमधली किवी एअरलाईन्स नावाची कंपनी बंद होण्याचं एक कारण म्हणजे किवी हा पक्षी उडत नाही. त्यामुळे ते ब्रँड म्हणून कधीच प्रस्थापित होऊ शकले नाहीत.
तेच तर्कशास्त्र किंगफिशरलाही लागू पडतं कारण किंगफिशर किंवा खंड्या हा पक्षी उडण्यासाठी कधीच प्रसिद्ध नसतो. तो सूर मारून पाण्यातला मासा पकडतो म्हणून प्रसिद्ध आहे. In other words, त्याची प्रसिद्धी ही ऊर्ध्वगामी हालचालीसाठी नाही, अधोगामी हालचालीसाठी आहे. शिवाय दारू आणि एखादं वाहन यांचा तसाही व्यस्त संबंध आहे. रीजच्या मते ग्राहकांच्या मनात ही सगळी associations येतातच आणि त्याचा त्यांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होतो.
रीज हा brand extension म्हणजे एकच brand विविध products साठी वापरण्याच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने किंगफिशरचा अध:पात हा स्वाभाविक म्हणावा लागेल.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 11:10 am | गॅरी ट्रुमन

उदाहरणार्थ न्यूझीलंडमधली किवी एअरलाईन्स नावाची कंपनी बंद होण्याचं एक कारण म्हणजे किवी हा पक्षी उडत नाही.

हे न्यू झीलंडमध्ये झाले हे समजू शकतो.पण भारतात किती लोकांना (अगदी विमानातून प्रवास करणार्‍या म्हणजे त्यातल्या त्यात उच्च-मध्यमवर्गीयांना) किंगफिशर हा मुळात पक्षी आहे आणि तो उडू शकत नाही हे माहित असेल? मला वाटते की हल्लीच्या शाळेतील मुलांना मारूती म्हणजे नुसती गाड्यांची कंपनी नसून रामायणातील एक व्यक्तीरेखा आहे हे पण माहित नसेल!!

अमेरिकेत डेल्टा एअरलाईन्स आहे. डेल्टा हे पण उडणारे काही नसून एक ग्रीक अक्षर आहे. ऑरेंज एअरलाईन्स, सिल्व्हर एअरलाईन्स अशाही नावाच्या एअरलाईन्स आहेतच की.

एकच brand विविध products साठी वापरण्याच्या पूर्ण विरोधात आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने किंगफिशरचा अध:पात हा स्वाभाविक म्हणावा लागेल.

थोडक्यात किंगफिशरमध्ये स्ट्रॅटेजिक फिट नव्हती म्हणून पतन झाले हे समजण्यासारखे आहे. तरीही दुसर्‍या बाजूने विचार केला तर किंगफिशर म्हणजे थोडी हाय-एंड दारू आणि किंगफिशर एअरलाईन्स म्हणजे हाय-एंड विमानसेवा असे काहीसे पोझिशनिंग करायचाही मल्ल्याचा प्रयत्न असू शकेल.

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 11:19 am | बोका-ए-आझम

किंगफिशरचा लोगो तर किंगफिशर पक्षीच होता ना? तोही चोच खालच्या दिशेने ठेवून सूर मारणारा? त्यामुळे लोकांना किंगफिशर हा पक्षी आहे हे माहित नसेल हे पटत नाही. पोझिशनिंग चुकले आणि स्ट्रॅटेजिक फिट नव्हते याच्याशी पूर्ण सहमत. ना धड लो काॅस्ट, ना धड हाय एंड अशी त्रिशंकू अवस्था असल्यामुळे किंगफिशर कधीच जेट किंवा इंडिगोची बरोबरी करु शकले नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 12:04 pm | गॅरी ट्रुमन

किंगफिशरचा लोगो तर किंगफिशर पक्षीच होता ना? तोही चोच खालच्या दिशेने ठेवून सूर मारणारा? त्यामुळे लोकांना किंगफिशर हा पक्षी आहे हे माहित नसेल हे पटत नाही.

किंगफिशर हा पक्षी आहे हे लोकांना माहित होते हे जरी मान्य केले तरी त्यामुळे लोक किंगफिशरपासून दूर गेले असतील हे पटले नाही.

इतर काही एअरलाईन कंपन्यांचे लोगो बघू:

१. जपान एअरलाईन्स

Japan

हा लोगो पक्ष्याचा आहे पण तो पक्षी उडत आहे असे काही या लोगोवरून वाटत नाही.

२. अमेरिकन एअरलाईन्स
American
अमेरिकन एअरलाईन्सचा लोगो गेल्या काही दशकांमध्ये कसा बदलला आहे हे या चित्रात बघता येईल.

३. क्वांटास
क्वांटासचा लोगो तर चक्क कांगारू आहे आणि कांगारू उडत नाही.

Qantas

सांगायचा मुद्दा हा की किंगफिशर हा दारूचा ब्रँड आणि तोच ब्रँड लोकांनी एअरलाईनबरोबर रिलेट केला नाही हे समजू शकते. पण तो चोच खाली ठेऊन सूर मारणारा पक्षी आहे म्हणून लोक किंगफिशरपासून दूर गेले हे समजले नाही. अगदी २०११ मध्येही किंगफिशर ही जेटखालोखाल मोठी दुसर्‍या क्रमांकाची एअरलाईन कंपनी होती (२३-२४% मार्केट शेअरवाली).

रचाकने, काही वर्षांनी इंडिगोची अवस्थाही थोडीफार तशीच झाली तरी आश्चर्य वाटणार नाही.

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2016 - 12:12 pm | श्रीरंग_जोशी

रचाकने, काही वर्षांनी इंडिगोची अवस्थाही थोडीफार तशीच झाली तरी आश्चर्य वाटणार नाही.

काय सांगता. इंडिगोने प्रवास करण्याचा अतिशय उत्तम अनुभव आहे मला. इंडिगो एअरलाइन्सने सातत्याने प्रगती केल्याचे वाचले आहे. इतर स्पर्धक कंपन्या अडखळत असताना इंडिगोने केलेली घोडदौड बरेचदा तज्ञांच्या लेखांमधून कौतुकाने उल्लेखली जाते.

तुम्हाला हा अंदाज का व्यक्त करावासा वाटला हे जाणण्यास उत्सूक.

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 12:21 pm | गॅरी ट्रुमन

तुम्हाला हा अंदाज का व्यक्त करावासा वाटला हे जाणण्यास उत्सूक.

याविषयी व्य.नि त बोलू.

काही वर्षांपूर्वी किंगफिशरचाही असाच उत्तम अनुभव इतर अनेकांप्रमाणे मलाही आला होता.पण नंतर व्हायचे ते झालेच.

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 12:46 pm | बेकार तरुण

श्रीरंगजी - इंडिगो बद्दल संबंधीत नाही पण एकुणच एअरलाईन धंद्या विषयी
१. हा धंदा प्रचंड खर्चिक आहे, अतिशय डीप पॉ़केट्स असल्याशिवाय ह्या धंद्यात उतरणारे कमी. कारण ह्यात सुरवातीचे भांडवल तसेच रोजचा खर्च हे दोन्ही भयंकर जास्ती असतात.

२. ह्यात ओपरेटिंग लेव्हलचे स्टॅटिजीक डीसीजन मेकिंग अतिशय महत्वाचे असते (ते कुठल्याहि धंद्यात असतेच, पण त्यातील काही मुद्दे एअरलाईनला तारू अथवा मारू शकतात) -
जसे की भारतात मुंबई दिल्ली हा सगळ्यात बिझी रूट आहे, म्हणजे एअरलाईनच्या दृष्टीने भरपूर तिकिटे विकली जाणार, पण ही दोन्ही एअरपोर्टस सगळ्यात बिझी पण आहेत, म्हणजे खर्चहि वाढणार.मग मुंबई दिल्ली रूट ठेवावा का नाही, ठेवल्यास कोणत्या वेळी आणी किती फेर्‍या ठेवाव्यात (दुपारी २ ला मुंबईला पोचणारे विमान आणी सकाळी ९ ला पोचणारे विमान यात प्रवासी संख्या फारकत खूपच असते). तसच प्रत्येक एअरपोर्टवर टर्न अराउंड टाईम किती आहे वगैरे पण खर्चास कारणीभूत असते. मला किंफी ची सेवा आणी त्यांचे रूट्स वगैरे बद्दल नक्की माहिती नाही, पण साधारण पणे त्यांची विमाने भारतात सगळ्यात महाग रूट्सवरच असायची एवढं आठवत आहे.

३. जेव्हा किंगफिशर ने सुरुवात केली, तेव्हा भारतात नवीन एअरलाईन्सचा पूर आला होता. आंतरजाल सेवा सहज उपलब्ध झाल्या असल्याने तिकीट किंमतीची तुलना करुन तिकीट काढण्यावर कल होता. त्यातच किंफी ने स्वतःला प्रीमीयम सर्व्हिस प्रोव्ह्याडर म्हणुन प्रॉजेक्ट केले होते, त्यातच तेव्हा तेलाच्या किंमतीहि कमी होत नव्हत्या.
त्यामुळे किंगफिशर च्या प्रीमीयम सर्व्हिस साठी ५० -६०% जास्ती किंमत द्यायला रेग्युलर ट्रॅव्हलर्स तयार नसायचे. त्यामुळे ईतर एअरलाईन च्याच किंमतीस किंवा थोड्याच फरकाने किंफी ला तिकीटे विकावी किंवा कमी प्रवासी घेउन विमान उडवावे हे पर्याय किंफी पुढे राहिले.
म्हणजे एकीकडे कुठलाच खर्च कमी होण्यासारखा नाही आणि तिकीट किंमती मात्र कमी होतच आहेत. अश्या परिस्थीतीत एकच पर्याय उरतो म्हणजे व्हॉल्युम वाढव, पण किंमती केल्याशिवाय तोहि सहज वाढणार नाही !
अश्या परिस्थीतीमुळेडेक्कन खरेदी चा निर्णय घेतला गेला असावा. त्यातहि मल्ल्यानी (बहुतेक ईगो इश्युजमुळे) डेक्कन ला जी रक्कम दिली खरेदीकरता ती खूपच जास्ती होती.
अश्या अनेक अनेक चुकांचे एकत्रीकरण होत होत आजची वेळ किंफीवर आलेली आहे. (मी मला ज्या मुख्य वाटल्या त्याच दिल्या आहेत, अश्या अनेक चुका असतील ह्याची खात्री आहे).

सतीश कुडतरकर's picture

11 Mar 2016 - 1:03 pm | सतीश कुडतरकर

एक महत्वाचा इनकम सोर्स दुर्लक्षिण्यात आला होता, कार्गो!

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 1:03 pm | बोका-ए-आझम

जी काही थोडीफार माहिती मला आहे त्यानुसार किंगफिशरचं hub बंगलोरला होतं आणि प्रामुख्याने दक्षिण भारतातले routes त्यांनी चालवले होते. मला नक्की वर्ष आठवत नाही पण कदाचित २००७-८ च्या सुमारास त्यांनी आणि जेट एअरवेज यांनी छुपी हातमिळवणी किंवा cartelization केल्याचा आरोप तत्कालीन नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. ही हातमिळवणी मोडून काढण्यासाठी इंडियन एअरलाईन्सने सरसकट आपले दर उतरवले होते. गॅरीभाऊ, काही माहिती असेल याबद्दल तर सांगा प्लीज!

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 2:01 pm | गॅरी ट्रुमन

२००७-८ च्या सुमारास त्यांनी आणि जेट एअरवेज यांनी छुपी हातमिळवणी किंवा cartelization केल्याचा आरोप तत्कालीन नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. ही हातमिळवणी मोडून काढण्यासाठी इंडियन एअरलाईन्सने सरसकट आपले दर उतरवले होते.

नाही. याविषयी मला काहीच माहिती नाही. तरी हा प्रकार रोचक वाटत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 2:22 am | श्रीरंग_जोशी

तपशीलवार प्रतिसादासाठी धन्यवाद. तुमचे मुद्दे पटत आहेत.

भारतातच काय अमेरिकेतही गेली अनेक वर्षे मोठ्या एअरलाइन्स तोट्यात चालत होत्या. तगून राहण्यासाठी गेली काही वर्षे मर्जर्स अ‍ॅन्ड अ‍ॅक्विझिशनचा मार्ग चोखाळला जात आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या पालक कंपनीने ४ वर्षांपूर्वी बॅन्करप्टसी पिटिशन दाखल केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून क्रुड ऑइलचे भाव पडू लागल्यामुळे २०१५ मध्ये सर्व मोठ्या एअरलाइन्सना अनेक वर्षांनी नफा मिळाला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतल्या तीन मोठ्या एअरलाइन्सला (अमेरिकन, डेल्टा, युनायटेड) आखातातल्या एमिरेट्स, इतिहाद व कतार एअरवेजकडून तीव्र स्पर्धा होत आहे. डेल्टाला परत नफ्यात आणण्याचे श्रेय ज्याला दिले जाते (त्यांचा सिइओ) रिचर्ड अ‍ॅन्डरसनने गल्फमधल्या एअरलाइन्सविरुद्ध केलेले विधान बरेच गाजले.

मी स्वतः किंगफिशरने एकदाच प्रवास केला. अमेरिकेतून भारतात येताना पहाटेची बेंगलुरू मुंबई फ्लाइट होती. विमानात १५ही प्रवासी नव्हते. त्या फ्लाइटमध्ये मिळालेला नाश्ता उत्कृष्ट होता. चमचेसुद्धा युझ अ‍ॅन्ड थ्रो ऐवजी एकदम महागडे वाटतील असे होते.

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 12:52 pm | बोका-ए-आझम

हे factors ग्राहकांच्या मनात association बनवतात आणि त्याचा त्यांच्या निर्णयावर परिणाम होतोच. कांगारु जरी उडत नसला तरी उडी मारतो, गतिमान असतो आणि आॅस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. Qantas हे Queensland and Northern Territories Aviation Services चं संक्षिप्त रुप आहे. ती आॅस्ट्रेलियाची ध्वजधारी किंवा flag carrier airline असल्यामुळे कांगारु हा लोगो समर्पक आहे. तुमच्याच शब्दांत सांगायचं तर strategic fit आहे.

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 11:17 am | बेकार तरुण

बोकाजी,
मी फक्त म्हणत आहे की ईतर विमानात किंगफिशर ब्रँडेड सर्व प्रॉडक्ट्स बंद झाल्याने त्या कंपनीस काही फारसा फरक पडलेला नाही. कारण त्यांचे मुख्य मार्केट ईतर विमानात दिली जाणारी प्रॉडक्ट्स हे कधीच नव्हत. तसच विमानात बंद केल्याने रोजच्या विक्रीस (जमीनीवरील) काही परिणामहि झाला नाहीये.

बाकी प्रॉडक्ट ब्रँडिंग वगैरे च्या द्रुष्टिकोनाने मुद्दे बरोबर असतीलहि, मला त्यातला शून्य ज्ञान आहे.

पण मूळतः विमानसेवा हा ईतका थकेला बिझिनेस आहे, की त्यात १० पैकी ७ लोकांना अपयशच येतेझा(१० पैकी ७ ला विदा नाही, हे एक जनरल विधान आहे).

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 11:21 am | बोका-ए-आझम

मी विदा नाही हे म्हटलं होतंच. असो.

प्रदीप's picture

21 Mar 2016 - 3:07 pm | प्रदीप

ब्रँडचे नाव व लोगो ह्यांविषयी बोका-ए-आझम ह्यांचे मत पटत नाही. गॅरीने म्हटल्याप्रमाणे किती भारतीय (अगदी नियमित विमानप्रवास करणारेही) ह्याविषयी विचार करत असतील? खरे तर ग्राहक, सेवा कशी आहे ह्याचा विशेष विचार करतात. माझेच उदाहरण देतो. आमच्या येथून भारतात डायरेक्ट जाण्यासाठी एकेकाळी उपलब्ध असलेल्या चार पर्यायांत किंगफिशर अतिशय वरच्या दर्जाची सेवा देत असे- अगदी कॅटल - क्लासमध्येही! तेव्हा ह्या प्रवासासाठी सर्वप्रथम नाव डोळ्यांसमोर येई, ते किंगफिशरचे! पण तेव्हाच ही सेवा तोट्यात आहे वगैरे कुणकुण कानावर येत असे. इतर जान्यामान्या विमानसेवा कंपन्यांनी प्लॅस्टिक्चे काटे, चमचे वापरावयास सुरूवात करून दशकापेक्षाही काळ लोटल्यावर जेव्हा ह्या विमानसेवेत चक्क स्टीलचे काटे- चमचे समोर येत, तेव्हा हे असे किती दिवस चालू राहू शकेल, ह्याविषयी शंका मनात नेहमीच येत असे.

आपले कोअर क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांत संचार करतांना त्या विषयातील तज्ञ मंडळी व्यवस्थापनांत असणे जरूरी आहे, इतकेच नव्हे, त्यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांना (किमान) काही विवक्षीत काळ स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेऊ देणे अतिशय आवश्यक आहे. हे मल्या ह्यांनी कितपत केले होते, ह्याविषयी माहिती नाही.

अजून एक मुद्दा-- तेलाच्या हेजिंगमध्ये त्यांनी मार खाल्ला असावा का?

गॅरी ट्रुमन's picture

11 Mar 2016 - 11:01 am | गॅरी ट्रुमन

विमानातील विक्री त्यांच्यासाठी फारसा मटेरीयल सोर्स ओफ रेव्हेन्यु असेल असं वाटत नाही.

सहमत आहे. किंगफिशर एअरलाईन सुरू केल्यामुळे हा फरक पडला असेल असे वाटत नाही.

http://content.icicidirect.com/mailimages/IDirect_UnitedBreweries_IC.pdf वर डिसेंबर २०१४ मधील यु.बी.एच.एल चा इक्विटी रिसर्च रिपोर्ट आहे. त्यातील एक्झिबिट १८ (पान ११) वर विविध कंपन्यांच्या मार्केट शेअरमध्ये २००७-०८ पासून कसे बदल होत गेले हे दिले आहे. युनायटेड चा मार्केट शेअर कायमच ५०% पेक्षा जास्त आहे-- अगदी किंगफिशर एअरलाईनच्या चांगल्या दिवसातही (२००७-०९)

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2016 - 8:45 am | प्राची अश्विनी

कुठल्याशा बँकेकडून पाचशे डॉलरचं कर्ज घेऊन मोफत गाडी पर्किंग मिळवणारा हाच होता असे वाचले. खरे खोटे मल्ल्याच जाणे.

माहितगार's picture

11 Mar 2016 - 12:11 pm | माहितगार

पार्कींग खर्च वाचवण्याची हि चातुर्य कथा इतरही व्यक्तिंच्या नावाने वाचल्याचे अल्पसे आठवते

कंजूस's picture

11 Mar 2016 - 8:46 am | कंजूस

त्यांच्या कंपन्या या त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या ( १०० टक्के मालकी) असतील तर चर्चा करता येईल.केवळ दोन टक्के त्यांचे बाकी पब्लिक लिमिटेड ,इतरांचे शेअर्स असतील तर मी म्हणेन त्यांनी बनवलं ,तुमचे बोर्ड ओफ डिरे काय माशा मारत होतं का?

आनन्दा's picture

11 Mar 2016 - 10:11 am | आनन्दा

तसेही भारतात आणि जगभरात इमानसेवांची परिस्थिती तशी फारशी ठीक नाही.. तीव्र स्पर्धा आणि मेंटेनन्स मध्ये त्यांचे कंबरडे मोडलेले आहे. अश्या परिस्थितीत स्वस्तात / काही काळ तोट्यात विमान कंपनी चालवण्याचा मल्ल्या यांचा निर्णया चुकला असावा बहुतेक.
त्यांना बहुधा असे वाटले असेल की भविष्यकाळात आअपली मोनॉपॉली बनेल. कदाचित अजून ५ वर्षांनी ती बनली पण असती, पण पैसा कमी पडला.

किंगफिशर एअरलाईनची सुरुवात चांगली होती पण..
१)तोट्यात असलेल्या डेक्कन एअरवेज ची खरेदी
(उद्देश- प्रिमीयम सोबत लोकॉस्ट सेवा देणे.शेअर बाजारात नोंद होण्यासाठी पळ्वाट मिळणे)
२)या सोबत इतर लोकॉस्ट एअरलाईनशी स्पर्धा करताना तिकीटाचे दर कमी आणी ओपरेटींग कॉस्ट जास्त..
३) तेलाच्या भावात वाढ..

परिणाम किंगफिशर गाळात गेली.
===============================================
आता बँकानी दिलेली कर्ज वसुल होतील का ??
उत्तर - होय.कारण कर्जा पोटी असलेली गहाणवटची किंमत सद्य बाजार भावानुसार बरी आहे..
पण त्यात बरीच कायदेशीर आणी नैतीक इच्छाशक्ती दाखवावी लागेल.

(प्रतिसाद वरवरचा आहे.बा़की जाणकार माहिती देतीलच)

बेकार तरुण's picture

11 Mar 2016 - 10:40 am | बेकार तरुण

बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि, अनेकांचे चुकतात. पण त्याचा गजबजा होण्यास मल्ल्यांचे माध्यम (मीडिया) प्रेम आणी प्रसिद्धीचा सोस अंगलटी आला आहे असे माझे मत आहे. त्यांनी जे तथाकथीत गफले केले आहेत ते त्यांनी एकट्याने किंवा पहिल्यांदी नक्कीच केलेले नाहीत. पण मीडीया ला कोलीत मिळालं ! १० दिवस त्याच पोळ्या भाजतील आता.

किंगफिशर एअरलाईन्स चे थकीत कर्ज रू. ९,०००/- कोटी आहेत. त्या पुढे जे पी ग्रुप (६०,००० कोटी) आणी भुषण स्टील (४०,००० कोटी) फारच मोठे आहेत. पण गौर (जे पी ग्रुप वाले) आणी सिंगल? (भुषण) अतिशय सुमडीत राहुन मीडीया अन पब्लिक आय पासुन दूर राहतात.

माहितगार's picture

11 Mar 2016 - 12:22 pm | माहितगार

बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि, अनेकांचे चुकतात. पण त्याचा गजबजा होण्यास मल्ल्यांचे माध्यम (मीडिया) प्रेम आणी प्रसिद्धीचा सोस अंगलटी आला आहे असे माझे मत आहे.

ट्रायल बाय मिडीया बद्दल विजय मल्य्या ट्विक्रार करत असल्याची बातमी आहे. आणि या ट्रायल बाय मिडीयाला विजय मल्ल्या अंशतः तुम्ही म्हणता तसे स्वतःही जबाबदार असणार.

बिझनेस डिसीजन एका व्यावसायिकाचा चुकणे एक वेळ समजता येते, बँकर्स तेही १७ बँकर्सचा बँकींग बद्दलचा बिझनेस डिसीजन गडबडतो ? ब्रँडच्या गुडवील तारण दाखवून लोन अ‍ॅप्रुव्ह केले असे वाचले खरेखोटे काळाच्या ओघात कळेलच.

पण बँकांच्या बाजूने बघीतले तर डेब्ट रिकव्हरी करताची कारवाई होण्याची स्थिती येण्यास विजय मल्याचे व्यावसायिक निर्णय अंशतःतरी कारणीभूत असावेत.

बोका-ए-आझम's picture

11 Mar 2016 - 3:01 pm | बोका-ए-आझम

_/\_. याच न्यायाने कुणी मिपावर तक्रार नोंदवली तर काय म्हणावे ब्रे?

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2016 - 10:50 am | श्रीरंग_जोशी

किंगफीशर एअरलाइन्सच्या शेवटच्या काळात जालावर बर्‍याच तज्ञ मंडळींचे लेख येत होते. त्यातल्या मुद्द्यांपैकी मला स्पष्ट आठवत असलेला मुद्दा म्हणजे. कंपनी अडचणीत येऊ लागल्यावर कंपनीचा सिइओ सोडून गेला. नवा सिइओ शोधण्याऐवजी मल्ल्या स्वतःच सर्व म्हत्वाचे निर्णय घेत असे व धोरणे ठरवत असे.

मल्ल्या कितीही यशस्वी अन अनुभवी उद्योजक असला तरी एअरलाइन क्षेत्रातल्या स्पेशलिस्ट सिइओची उणीव बरीच महागात पडली. बाकी मल्ल्यामुळेच सुरुवातीपासून अंथरुण न पाहता पाय पसरण्याचे धोरण किंगफिशर एअरलाइन्सने राबवले जे खूपच महागात पडले.

माझा अनुभव - सत्यम बुडू लागल्यावर मी काही महिने अगोदर घेतलेले त्या कंपनीचे शेअर मातीमोल झाले होते. त्या दिवसात मी धोका पत्करुन पुन्हा सत्यमचे शेअर्स खरेदी केले. दीड वर्ष थांबल्यावर नव्या शेअर्सने अगोदरच्या शेअर्सचा तोटा भरून काढला.

किंगफिशर एअरलाइन्सच्या शेवटच्या काही महिन्यांत कंपनी बंद पडत आहे असे दिसत असताना काही लोक अशा पुड्या सोडत होते की अनेक राष्ट्रीयीकृत बँकानी मोठी कर्जे किंगफिशरला दिली आहेत. कंपनी दिवाळखोरीत गेल्यास बँकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या बँका व केंद्र सरकार किंगफिशरला बेल आउट पॅकेज देईल. हा तर्क पटल्यामुळे व सत्यमचा अनुभव पाठिशी असल्यामुळे मी माझ्या वडिलांना किंगफिशरचे शेअर्स खरेदी करायला लावले. प्रत्यक्षात असे काहीही न घडता कंपनी बंद पडली. ते शेअर्स एक पंचमांश भावात विकावे लागले :-( . आणखी काही आठवडे थांबलो असतो तर तेवढेही पैसे मिळाले नसते.

माहितगार's picture

11 Mar 2016 - 12:30 pm | माहितगार

किंगफीशर एअरलाइन्सच्या शेवटच्या काळात जालावर बर्‍याच तज्ञ मंडळींचे लेख येत होते. त्यातल्या मुद्द्यांपैकी मला स्पष्ट आठवत असलेला मुद्दा म्हणजे. कंपनी अडचणीत येऊ लागल्यावर कंपनीचा सिइओ सोडून गेला. नवा सिइओ शोधण्याऐवजी मल्ल्या स्वतःच सर्व म्हत्वाचे निर्णय घेत असे व धोरणे ठरवत असे.

बुडत्या नौकेला चांगला नावाडी मिळवणेही कठीण होत असावे ?

माझा अनुभव - सत्यम बुडू लागल्यावर मी काही महिने अगोदर घेतलेले त्या कंपनीचे शेअर मातीमोल झाले होते. त्या दिवसात मी धोका पत्करुन पुन्हा सत्यमचे शेअर्स खरेदी केले. दीड वर्ष थांबल्यावर नव्या शेअर्सने अगोदरच्या शेअर्सचा तोटा भरून काढला.

किंगफिशर एअरलाइन्सच्या शेवटच्या काही महिन्यांत कंपनी बंद पडत आहे असे दिसत असताना काही लोक अशा पुड्या सोडत होते की अनेक राष्ट्रीयीकृत बँकानी मोठी कर्जे किंगफिशरला दिली आहेत. कंपनी दिवाळखोरीत गेल्यास बँकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या बँका व केंद्र सरकार किंगफिशरला बेल आउट पॅकेज देईल.

व्यवसाय बुडण्याच्या पद्धतीत अल्प साधर्म्य असले तरी व्यवसायांच्या स्वरुपात फरक असावा असे वाटते का ?

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 2:24 am | श्रीरंग_जोशी

व्यवसाय बुडण्याच्या पद्धतीत अल्प साधर्म्य असले तरी व्यवसायांच्या स्वरुपात फरक असावा असे वाटते का ?

कृपया तपशीलात लिहाल का?

The All India Bank Employees Association (AIBEA), the largest union in the banking sector, has come up with a list of top loan defaulters in the country comprising corporates, politicians and even Padma awardees.
As per the list, the bad loan of top 406 accounts of the public sector banks (PSBs) amount to Rs 70,300 crore. There has been a phenomenal rise in the non-performing assets (NPAs) with the figure in September 2013 standing at Rs 2.36 lakh crore against Rs 39,000 crore in March 2008
.

संपूर्ण बातमी इथे.

अधिकृत माहीती

यात त्यावेळच्या केंद्रातील मंत्र्याचाही स्पष्ट उल्लेख आहे.(कदाचित डिसेंबर २०१३ मध्ये जनसामन्यांचे पैसे बुडविणे व बँकाना गोत्यात आणणे हे असहिश्णु नसावे.

हे ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ शिरते एका कंपनीत यशस्वी झाल्यावर कुणास ठाऊक.
बर ब्रुअरीज अन दारु धंदा काय इतका सॅचुरेट नव्हता की किंगफिशरची मोनपली नव्हती. तिथे वाढायला भरपूर चान्स होता.
काही टाटा गोदरेज रिलायन्स वाले बर्‍याच उद्योगात त्यांनी डेव्हलप केलेली मॅनेजमेंट स्टाइल यशस्वीरिता अ‍ॅप्लाय करतात म्हणून ते सार्‍यानाच जमेल असे नाही.
ह्या क्षेत्रातले मला जास्त ज्ञान नाहीये पण डोळ्यासमोर आजकाल ग्रुप ऑफ कंपनीजची इतकी हास्यास्पद उदाहरणे दिसताहेत की बस्स. कारखाना असतोच, बँक उभी होते, जोडीला अन रिझर्व्ह बँकेतून जराशी सूट मिळण्यासाठी पतसंस्था, एक पेट्रोल पंप, वाहतूकसंस्था, मॉल/बाजार, मुद्रणालय, जमिनी आणि घरे. प्रत्येक ठिकाणी तो लोगो अन एकमेकाची मिलीभगत.
होउ द्या ना एखादे स्वतंत्र ब्रँडिंग, होउद्यात माणसे स्वतंत्र उद्योजक, पण नाही.
आता फक्त जनरल स्टोअर्स, कॅन्टीन अन पिठाची गिरणी वर ग्रुप ऑफ कंपनीज बघायचे राह्यलेय.

सतीश कुडतरकर's picture

11 Mar 2016 - 12:10 pm | सतीश कुडतरकर

मुख्य कंपनीतला आपला नफा कमी दाखवण्यासाठी अशी कंपनीची पिलावळ सुरु करत असतील का? दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीचा तोटा पालक कंपनी 'सोसत' असते. आताच डोंबिवलीमधील रिलायन्स फ्रेश ची दुकान बंद झाली आहेत, जी कधीच धावत नव्हती आणि कंपनीला हि ती चालवून धावावीत अशी अपेक्षाच नव्हती अस त्यांच्या एकंदर कारभारावरून जाणवत होत.

रिलायन्सचे बंद पडलेले पंप, फ्रेश, डिजीस्टोर्स पाहता जागा अडवून ठेवायचा धंदाय की काय अशी शंका येते. ;)

माहितगार's picture

11 Mar 2016 - 12:49 pm | माहितगार

ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ शिरते

एखाद्या व्यावसायिकाने स्वप्न बाळगण्यात तत्वतः गैर नसावे, काही मोठ्या अस्थापना अंशतः टॅक्सेशनमुळेही लुटूपुटू ग्रुप ऑफ कंपनी चालू करत असतील, काही वेळा व्यवसायाशी संबंधीतच अजून एखादा व्यवसाय चालू केला जसे की मिनरल वॉटरचा व्यवसाय चालू केला तर एक छोटूकशी कंपनी वेगळी काढली जाते, व्यवसायाशी संबंधीतच अजून एखादा व्यवसाय चालू करण्यात व्यावसायिक जोखीम असते पण कमी असते, पण सर्वस्वी वेगळ्या व्यवसायात जाताना डायव्हर्सीफीकेशन करताना व्यावसायिक जोखीम कैकपटींनी वाढत असावी. व्यवस्थापन सल्लागार सहसा कोअर बिझनेसला चिटकून रहाण्याचा आणि डाव्हर्सीफीकेशनच्या जोखीमी टाळण्याचा सल्ला देत असतात विजय मल्ल्या असो का अंबानी असोत यांचे व्यवस्थापन विषयातील हे प्राथमिक ज्ञानही असावे पण तरीही थोड्याशा कालावधीत स्पेअर दिसत असलेला पैसा फिरवून काँग्लोमरेट वाढवण्याचे आकर्षण सुटत नाही का हात लावू त्याचे सोनेच होते हा खोटा विश्वास अंगाशी येतो का काही बँकर्स सहज फशी पडताहेत तर हात धूण्याचाच उद्देश असतो काय माहीत नाही. पण मुख्य व्यवसायातून आलेल्या सर्ववजावटीकरून आलेल्या निव्वळ नफ्या पलिकडे वेगळ्या व्यवसायात गुंतवणूकी सहसा टाळावयास हव्यात. पण हव्यास अंगलट येत रहातात.

सतीश कुडतरकर's picture

11 Mar 2016 - 12:04 pm | सतीश कुडतरकर

कालचीच बातमी कोपऱ्यात छापून आली होती, सेबीला रिलायन्सच्या इनसायडर ट्रेडींगचे काहीच पुरावे मिळाले नाहीत. :-)))

सेबीला रिलायन्सच्या इनसायडर ट्रेडींगचे काहीच पुरावे मिळाले नाहीत. :-)))

ते कधीच मिळणार नाहीत.

राघवेंद्र's picture

17 Mar 2016 - 2:22 am | राघवेंद्र

धन्स. पण तरिही लोक जुन्या धाग्यावर प्रतिसाद देत आहेत

मल्या शेठ नी आयपील नावाची एक सोन्याची अंडे देणारी कोंबडी पाळली होते.
त्या कोंबडीला त्यानी इतके खाऊपिऊ घातले की तिने अंडी देणेच थांबवले.
किंगफिशरच्या "आय पी एल " मधली गुंतवणूक आनि त्याचे रीटर्न्स याबद्दल कोणीच बोलत नाही.

निशांत_खाडे's picture

19 Mar 2016 - 8:43 pm | निशांत_खाडे

किंगफिशर एयरलाइन्स (१०००० कोटी तोट्यात) आणि एयरइंडिया (३०००० कोटी तोट्यात) यांच्यात फक्त एकच फरक आहे, किंगफिशर ने बँकाचा पैसा डूबवला आणि एयरइंडिया ने सामान्य माणसांच्या करातून आलेला पैसा.
(मोहनदास पै, माजी मुख्य आर्थिक अधिकारी, इन्फोसिस)
http://www.business-standard.com/article/pti-stories/why-is-nobody-talki...

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 9:29 pm | तर्राट जोकर

बँकांचा पैसा हाही सामान्य माणसांचाच पैसा. बँकेची मालकी नसते पैशावर. बँकेची मालकी सेवेसाठी आकारलेल्या शुल्कावर.

निशांत_खाडे's picture

20 Mar 2016 - 1:25 am | निशांत_खाडे

तेवढं माहिती आहे ओ. पण ते पै साहेब जे काय म्हणाले ते डकवले फक्त येथे. पटतंय का नाही ते सांगा फक्त.

क.लो.अ.,
('Don't kill the messenger' वाला) निशांत

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 11:12 am | तर्राट जोकर

का पटत नाही हेच सांगितले की ;-) थेट मेसेज विदाउट मेसेन्जर.

१. किंगफिशर एअरलाईन्स चे थकीत कर्ज रू. ९,०००/- कोटी आहेत. त्या पुढे जे पी ग्रुप (६०,००० कोटी) आणी भुषण स्टील (४०,००० कोटी) फारच मोठे आहेत. पण गौर (जे पी ग्रुप वाले) आणी सिंगल? (भुषण) अतिशय सुमडीत राहुन मीडीया अन पब्लिक आय पासुन दूर राहतात.

म्हणजे कॅलेंडर काढणे जास्त मोठा गुन्हा आहे

२. किंगफिशर एयरलाइन्स (१०००० कोटी तोट्यात) आणि एयरइंडिया (३०००० कोटी तोट्यात) यांच्यात फक्त एकच फरक आहे, किंगफिशर ने बँकाचा पैसा डूबवला आणि एयरइंडिया ने सामान्य माणसांच्या करातून आलेला पैसा.
(मोहनदास पै, माजी मुख्य आर्थिक अधिकारी, इन्फोसिस)

मग आता एयर इंडियाच्या मॅनेजमेंट चे काय करणार मिडीया ?

वरच्या १ आणि २ ह्या बातम्या वर्तमान पत्रात ( नेहमीच्या ) अजिबात नाहीत. त्या फक्त मिपावर मिळाल्या.