मंडळी आपण सर्व मिपाकर येथे अतिशय प्रामाणीकपणे लिखाण करतो.
काहिवेळा इथले लिखान दुसर्या संस्थळावर प्रकाशित करतो. इतर कोणाचे लिखाण इथे प्रकाशित केले तर त्याखाली मूळ लेखकाचे नाव लिहायला विसरत नाही. आपण सर्वजण हे असे करतो कारन आपण सर्वजण सभ्य आहोत.
मात्र गेले काही दिवस एक विचित्र गोष्ट अनुभवास येत आहे. मिपावरील काही लेखनांचे इतरत्र प्रकाशन होत आहे.
यात त्या लेखकाची परवानगी तर जाऊद्या पण साधे लेखकाचे नाव देखील दिले जात नाही.
व्हॉट्सअॅपवर मी परवा तात्या अभ्यंकरांच्या रौषनी बद्दल एक लेख वाचला. तसेच छो डॉन ने पुणेरी आयपील च्या अटी तर आंतरजालावर व्हायरल झाल्या होत्या.
आपल्या मित्रांचे लिखाण लोक एकमेकाना फॉर्वर्ड करतात हे कौतुकास्पद आहे मात्र ते तसे करताना मूळ लेखकाचे नाव दिले जात नाही हा संतापजनक प्रकार आहे.
अशा वांङ्मय चोरीला आळा घालणे कठीण आहे. टेक्नीकली मिपा संपादकीय मंडळाने यावर काही विचार केला तर हे जमू शकेल. ( उदा : कॉपी पेस्ट डिसेबल करणे वगैरे)
तोपर्यन्त तरी अशा चोरांना आळा कसा घलाता येईल यावर कोणीतरी काही सुचवा.
तुम्हाला एखादा असा लेख आढळला तर तो ज्याने पाठवला त्याला मूळ लेखकाचे नाव सांगा तसेच आपणही असा लेख फॉर्वर्ड करताना मूळ लेखकाचे नाव त्या खाली अॅड करून पाठवूया.
या चोरांचे काय करायचे?
गाभा:
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 4:47 pm | जव्हेरगंज
www.bedhundlahari.com
येथेही बरेच चोरीचे लेख आहेत !!
4 Mar 2016 - 7:29 pm | जव्हेरगंज
ही एक माझी कथा तिकडे चोरली आहे !
www.bedhundlahari.com/literature-read?story-vetole
अजून भरपूर आहे !
5 Mar 2016 - 7:53 pm | आनन्दा
तुमचे नाव तर आहे खाली. तरी देखील तुमची परवानगी घ्यायला हवी होती हे मात्र खरे..
4 Mar 2016 - 5:10 pm | सस्नेह
औघड आहे !
याला आळा घालणे कठीण आहे. कॉपीराईट अॅक्टचा काही उपयोग होईल ?
4 Mar 2016 - 5:27 pm | जेपी
तात्यांची रौशनी सिरीज एका ठिकाणी चोरली आहे.रामदास काकांच्या कविता दुसरीकडे पाहिल्या आहेत..छोट्या मोठ्या लेखन चोर्या चलतच राहतात..
4 Mar 2016 - 6:17 pm | मी-सौरभ
बघुया एखादा तंत्रज्ञ काही ऊपाय काढतो का ते?
चोप्य्पस्ते बंद करणे हा तेवढा सोपा ऊपाय वाटत नाही.
4 Mar 2016 - 6:30 pm | कपिलमुनी
जालावरची कोणतीही गोष्ट सेफ नाही.
फोटो , लेख ईतर काही. एकदा जालावर आले की ते कोणीही सहज कॉपी करू शकतो.
5 Mar 2016 - 2:01 pm | सतिश गावडे
चोप्य्पस्ते बंद करणे हे तांत्रिकदृष्टया तितकेसे अवघड नसावे. ड्रुपलचे Copy Prevention मोडयुल उपलब्ध आहे त्यासाठी.
वाङ्मयचौर्याचा "चोप्य्पस्ते" हा अतिशय सोपा मार्ग असला तरी एकमेव मार्ग नाही.
सहमत. वरील Copy Prevention मोडयुलच्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे:
7 Mar 2016 - 4:03 pm | बॅटमॅन
गावडे सर, ते राईटक्लिक प्रिव्हेंट केले तरी स्क्रीनशॉट घेण्यापासून कुणाचीच सुटका नाय बगा.
7 Mar 2016 - 4:18 pm | बाळ सप्रे
चोप्यपस्ते बंद करणे इथे लिखाण करणार्यांना जास्त त्रासदायक ठरेल.
4 Mar 2016 - 7:36 pm | भाऊंचे भाऊ
प्रत्येक चोरिवर कारवाई करता येइल पण त्या कोर्ट कचेरिसाठी वेळ अन पैसा कुठून आणनार ? मोठे खेळाडु दमले पायरसीपुढे तिथे तुम्ही आम्ही किती खर्च करणार ?
4 Mar 2016 - 7:51 pm | विवेकपटाईत
माझ्या काही लेख/ गोष्टी चोरी झाल्या होत्या. काहींचे ई मेल शोधून जाब विचारला. काहींनी माफी हि मागितली. काहींनी नाव खाली दिले, काहींनी कुठलेच औदार्य दाखविले नाही. काय करणार.
ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची
http://www.misalpav.com/node/31899
या लेखात काहींची नावे दिली आहे.
4 Mar 2016 - 8:16 pm | प्रणवजोशी
अपुर्व ओकची कविता पण अशीच सगळीकडे पसरली हौती
4 Mar 2016 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी
धाग्यात व्यक्त केलेल्या काळजीशी सहमत.
याने फारसा फरक पडत नाही. वेब पेज सेव्ह करून सगळा मजकूर सहजपणे मिळवता येतो.
मागे मिपाकर गणेशाने अशाच एका धाग्यावर पूर्वी व्यक्त केलेले विचार आठवतात.
शब्द थोडे फार वेगळे असतील पण विचार हाच होता.
5 Mar 2016 - 2:15 pm | श्री गावसेना प्रमुख
सभासदा शिवाय लेख वाचायला परवानगी नसावी आणि सर्व सभासदांचे वैयक्तिक व्हेरिफिकेशन केल्या शिवाय अकाउंट क्रिएट करू नये,अशाने डुप्लिकेट id हि सहज बॅन होतील,आणि जे हि लेख आहेत ते सर्व jpg (इमेज)फॉरमॅट मध्ये प्रकाशित व्हावेत ।
5 Mar 2016 - 7:06 pm | उपयोजक
बंदीपेक्षा प्रबोधन जास्त चांगला परिणाम करते.
5 Mar 2016 - 9:10 pm | भीमराव
या चोरट्यांच्या मायला,!!!! कॉलेज मधे असतानाची गोष्ट आहे, खुप सारी नरसाळी पोरं पोरी नेटवरनं ढापलेल्या कविता द्याची म्यागझीनात छापायला, तवा आमी संपादक मंडळात विद्यार्थी संपादक हुतो, तर लय वैताग याचा कॉपी आयटम न खर्या अभिव्यक्ती शोधायला. १सो१ कॉपी बहाद्दर भेटायचे, आमी मरायचो कि पहिल्या ३ मदी बसावं आपलं म्यागझीन आन हे खुशाल चोर्या करायचे आन आनुन द्याचे
7 Mar 2016 - 3:52 pm | विजुभाऊ
www.bedhundlahari.com/
ही लिंक चालत नाहिय्ये.
पण अशा चोरीसाठी काय करावे हे कळत नाही.
जालावर लिखाण बंद करावे तर ते शक्य नाही.
7 Mar 2016 - 4:13 pm | तर्राट जोकर
शक्य तितक्या संस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध करावे. एकट-दुकट संस्थळावर लिहित राहल्यास लेखनकंडू शमतो पण अनेक संस्थळावर सातत्याने लिहित राहल्यास दोन फायदे होतात. एक, आपसूक पोहोच वाढते. चोराला प्रसिद्धीसाठी प्लेटफॉर्म मिळत नाही. सर्व संस्थलांवर नेहमी एकाच, खर्या नावाने लिहावे. तुमचे टोपणनाव कोणीही माझेच आहे म्हणून खपवू शकतो.
चोर विनाकष्टाच्या प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्या गरजेस आपले साहित्य उपयोगी पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच जिथे जिथे व्यापक जनसमुदाय आहे अशा सर्व संस्थळावर प्रसिद्धी करणे. थोडे कष्टाचे आहे पण नंतर येणारी उद्विग्नता टाळता येते, रसिकांचे प्रेमही मिळते, त्या प्रेमापोटी संरक्षणही. ज्यांनी वाचलंय ते अशी चोरी पटकन पकडतात.
7 Mar 2016 - 4:15 pm | तर्राट जोकर
बाकी तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीही होण्यासारखे दिसत नाही.