सोसायटीबाबत तार्किक , कायदेशीर सल्ला हवा --

मन१'s picture
मन१ in काथ्याकूट
3 Mar 2016 - 10:10 pm
गाभा: 

अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात.
जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो.
एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं.
पण अचानक एक इमेल आलाय.
"मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा.
मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ????
हा इ मेल :-
(मला जरा इ मेलचा सूरही खटकला. पण तो अवांतर होइल मुद्दा.)
Dear Members,

There has been repeated incidents of very serious nature due to Bachelors/Singles/Spinsters occupying flats on rental basis in our society.

As such, the managing committee have decided to restrict renting/subletting flats to only families(having max. 4 members) and not to bachelors/singles/spinsters.

This is effective from 01April2016.

Please follow the guidelines to rent a flat/shop given below;

1. Do not rent or sub-let flats to bachelors/spinsters

2. Flat owners must submit the required documents from tenants and request permission of managing committee before confirming to tenant to move and occupy your flat on rental basis
3. Tenants to carry police NOC, lease agreement & photo , vehicle registration certificate as applicable while moving to flat in Ozone Springs Society

4. Flat owners are responsible for any incident due to tenants not respecting society rules causing nuisance to society’s peaceful and happy living.

Please note that:

If any clarification or question, the members are requested to present it in Special General Body meeting on 5Mar2016 by permission of Chairperson.

हे सगळं कायदेशीर आहे ?
ह्याबाबत्तीत कायदा काय म्हणतो ?
आणि ह्यात सरावलेले वकील कुणास ठाउक आहेत का ?
किम्वा सोसायटीच्या बाय लॉज् चा नेमका कुनाचा अभ्यास/अनुभव आहे का ?
.
.
नम्र विनंती १--
बॅचलर्सनी राहणे चूक्च आहे; ते गोंधळच घाल्तात ; किंवा अजिबात घलत नाहित; वगैरे मुद्दे सध्या इथे नकोत.
तुमची जी काही मतं असतील; ती सगळी मान्य आहेत; त्यांचा आदरही आहे.
ह्या धाग्याचा उद्देश कायदेशीर मार्ग , उपाय शोधणे हा आहे.
बाकी सामाजिक मुद्दे नेहमीच डिबेटेबल असतात; आणि मिपासारख्या जिंदादिल स्थळावर शतकी धागेही निघत राहतात
त्यावर. तर विनंती हीच की तो मुद्दा इथे नको.
.
.
नम्र विनंती २--
ह्या प्रकाराचा थेट माझ्याशी संबंध नाहिये. मी सपत्नीक स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो . मी भाडेकरुही नाही आणि अविवाहितही नाही.
.
.
मला एक बातमी सापडली ह्यासंबंधित :-
http://www.punemirror.in/pune/cover-story/Housing-societies-must-mingle-...

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे सोसायटीला भरपूर अधिकार असतात.
पुण्यात मी सदस्य असलेल्या सोसायटीनेही काही नकारात्मक अनुभवांनंतर अविवाहित तरुणांना भाड्याने फ्लॅट्समध्ये राहू देण्यास प्रतिबंध केला आहे.

केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतलेल्या व परदेशात राहणार्‍या एक दोन सदस्यांनी कुरकुर करून पाहिली पण बहुमतापुढे त्यांचे काही चालले नाही.

मी लहानपणापासून हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिलो आहे. गुंतवणुक म्हणून फ्लॅट घेणार्‍यांमुळे बरेचदा कायमस्वरुपी त्या सोसायटीत राहणार्‍यांना बरेच त्रास होतात कारण भाडेकरू सोसायटीमधले नियम पाळणे व सौजन्यपूर्वक वागणे टाळतात.

बाकी कायमस्वरुपी राहून त्रास देणारेदेखील काही सदस्य असतात. त्यांच्याबाबत असे काही करता येत नाही.

सोसायटीचे शुल्क तीन वर्षे थकवल्याने पोलिसांना कल्पना देवून नळाची जोडणी कापल्याच्या घटनेचा मी साक्षीदार आहे.

मैत्र's picture

3 Mar 2016 - 10:41 pm | मैत्र

असोसिएशन किंवा ऑफिस बेअरर्सने ठराव करून नियम केला ए जी एम मध्ये तर असा नियम करता येतो.
केस पाहिली आहे आणि त्याविरोधात गदारोळ होऊनही, कायदेशीर रीत्या कोणी त्याला आव्हान देऊ शकले नाही.

खालच्या लिंक ची काही मदत होऊ शकते का पहा..

--
www.misalpav.com/node/31307

उगा काहितरीच's picture

3 Mar 2016 - 11:12 pm | उगा काहितरीच

कायदेशीर तर माहित नाही, पण तार्किक दृष्ट्या चूक वाटते. नुकताच फ्लॅट शिफ्ट केलाय. (रेंटने) तेव्हा असे बरेचसे अनुभव आलेत. बॅचलर म्हटलं की नाहीच म्हणतात . अगदी ७०% ते ८०% नाही म्हणतात . फ्लॅटसाठी बायको कुठून आणावी ? अन् काय फॕमिलीवाले त्रास नाही का देऊ शकत ?

माझ्या उमेदवारीच्या काळात एका शहरात पगार पुरेसा असूनही घर भाड्याने मिळाले नाही तेव्हा काही महीने टिनाच्या खोलीत काढावे लागले- आणि खरोखर या कारणासाठी लग्न करण्याची निकड निर्माण झाली- याची आठवण आली :)

ब़जरबट्टू's picture

4 Mar 2016 - 9:48 am | ब़जरबट्टू

टिना कोण ? मज्जाच राव :) :)

पुढची ओळ वाचून विचारताहात टीना कोण म्हणून. औघड आहे बाबा. ;)

तर्राट जोकर's picture

5 Mar 2016 - 6:45 pm | तर्राट जोकर

तसे वाचूनही तो घेतलेला अर्थ मजेदार होतोय की. माहितगारजी हलके घ्या.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:28 pm | श्रीरंग_जोशी

अकरा वर्षांपूर्वी एजंटच्या मदतीशिवाय पुण्यात भाड्याचे घर मिळवताना ही अडचण आली नाही याबाबत मी व माझा धाकटा भाऊ नशिबवान म्हणायचो.

काही अविवाहितांच्या वर्तनामुळे बहुतांश अविवाहितांना अशा अडवणुकीला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते :-( .

यमगर्निकर's picture

5 Mar 2016 - 12:34 pm | यमगर्निकर

आम्हि पुण्यात बचलर म्हणून मित्र मित्र राहायचो त्यावेळि आम्हाला हा प्रोब्लेम कितितरि वेळा फेस करावा लागला, पण ज्यावेळि लिव्ह इन मध्ये रहायचो त्यावेळि सुद्धा ह्या सोसायटिवाल्यांच्या पोटात पोट्शुळ उटायचाच. पण विमाननगर, बाणेर, पाषाण ला राहताना हा त्रास झाला नाहि.

नाखु's picture

5 Mar 2016 - 2:17 pm | नाखु

याच्याबाबत माहीती जरा.

लाभारथी/इच्छुकांना काही टीपा तरी मिळतील.

अवांतर आम्च्या विनंतीचं</a>मनावर घेतले नाहीत तुम्ही

माहितगार's picture

3 Mar 2016 - 11:13 pm | माहितगार

ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र विश्व आहे ज्या बद्दल मला नेमकी माहिती नाही.

चर्चेच्या सुरवातीस अपार्टमेंट आणि सोसायटी दोन्ही बहुधा वेगवेगळे प्रकार आहेत या दोन्हीत गल्लत करणे श्रेयस्कर नाही. माझ्या समजुतीनुसार अपार्टमेंट मध्ये फ्लॅटची मालकी फ्लॅट ओनर कडे असते त्यामुळे त्यास अधिक स्वातंत्र्य असावे.

को.ऑप.सोसायटीच्या बाबतीत अधिकृत मालक सहसा सोसायटी असते तुम्ही केवळ मेंबर-शेअर होल्डर असता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारतीय घटना, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांच्या चौकटीत राहून सोसायट्यांना त्यांच्या नियमावली राबवण्याचे अधिक स्वातंत्र्य असावे.

चुकभूल देणे घेणे

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहिती व अनुभवांनुसार नव्या अपार्टमेंट काँप्लेक्स मध्ये बहुतांश सदस्य राहायला आले की सोसायटी बनवली जाते. त्याशिवाय कारभार कसा चालणार?

एकदा सोसायटी बनली की प्रत्येकाचा फ्लॅट सोडून इतर कॉमन जागांची मालकी सोसायटीकडे असते. याच कारणामुळे कार पार्कींगची जागा बिल्डरने विकणे हे बेकायदेशीर समजले जाते.

माहितगार's picture

3 Mar 2016 - 11:30 pm | माहितगार

अपार्टमेंट आणि सोसायटी हे दोन्ही उल्लेख आपण एक सारखे करत असलो तरी कायद्यासाठी आणि उपरोक्त धागालेख विषयासाठी महत्वपूर्णपणे भिन्न बाबी असाव्यात इतर जाणकारांनी यावर अधिक माहिती द्यावी.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:35 pm | श्रीरंग_जोशी

या ठिकाणी धागाकर्ता सोसायटीबाबतच बोलत आहे असे शीर्षकावरून वाटते.
मजकुरात त्यांनी फ्लॅट या शब्दाऐवजी अमेरिकेत वापरला जाणारा अपार्टमेंट हा शब्द वापरला आहे.

होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही कायद्याची बाजू समजून घेताना होता होई तो टर्मीनॉलॉजीचे घोटाळे टाळणे श्रेयस्कर.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या या विचाराशी सहमत.

बादवे फ्लॅटला मराठी प्रतिशब्द 'गाळा' असा आहे.

बरेचदा काही सदस्यांमुळे संपूर्ण सोसायटीच गाळात जाण्याची वेळ येते ;-) .

माहितगार's picture

3 Mar 2016 - 11:51 pm | माहितगार

=))

खटपट्या's picture

4 Mar 2016 - 1:39 am | खटपट्या

रच्याकने, फ्लॅटला मराठीत सदनिका शब्द आहे असे ऐकले होते..

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 1:46 am | श्रीरंग_जोशी

गाळा अन सदनिका हे दोन्ही शब्द फ्लॅट साठी वापरले जातात.
सदनिका हा अधिक पुस्तकी शब्द आहे जो वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये अधिक वाचायला मिळतो.

गाळा हा प्रत्यक्ष व्यवहारातला शब्द आहे. मी मराठीतून लिहिलेल्या खरेदीखतात गाळा शब्द वाचला आहे.

सतिश गावडे's picture

4 Mar 2016 - 9:29 am | सतिश गावडे

मी गाळा हा शब्द इमारतीमधील व्यवसायाच्या हेतूने बनवलेल्या मोकळ्या जागेस वापरलेला ऐकला आहे. बर्‍याच इमारतींमध्ये तळमजल्यावर रस्त्याच्या दिशेला असणार्‍या बाजूस असे व्यावसायिकांचे "गाळे" असतात. सदनिका हा शब्द निवासी बांधकामासाठी वापरला जातो.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 9:45 am | श्रीरंग_जोशी

दुकानांच्या जागांसाठीही गाळा शब्द वापरला जातो.

फ्लॅट्ससाठी खरेदीखतात वापरला गेलेला मी पाहिला आहे.

कंजूस's picture

6 Mar 2016 - 5:45 pm | कंजूस

रामभरोसे निवास appartment owners' association असं काही करार नोंदणी करून बँकेत खातं उघडता येतं.परंतू अमुक गोष्ट करण्यासाठी ,ठराव वगैरे लादता येत नाही.
मेंबर्स - सोसायटी यांना हक्क आणि जबाबदाय्रा दोन्ही असतात हे अगदी थोडक्यात सांगितलं.

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 11:23 pm | सतिश गावडे

हे मागच्या पाच सहा वर्षातील खुळ आहे. बॅचलर भाडेकरूंचा त्रास होऊ शकतो. मात्र तसा त्रास प्रत्येक भाडेकरूमुळे होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे.

खेडेगावांतून, छोटया शहरांतून शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात किंवा नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुला-मुलींनी राहायचे कुठे मग? प्रत्येकाने शिक्षण संपल्या संपल्या मोठया शहरात स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून?

"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे.

याची दुसरी बाजू घरमालकाचीही आहे. एखाद्यास आपले घर भाडेकराराने द्यावयाचे असल्यास त्याला सक्तीने कुटुंब भाडेकरू पहावा लागेल. आणि हा सहकुटुंब राहणारा भाडेकरू त्रास सोसायटीस त्रास देणार नाही कशावरून.

मार्मिक गोडसे's picture

4 Mar 2016 - 12:06 am | मार्मिक गोडसे

"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे.

अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. अविवाहीताला जर कायदेशीरपणे सोसायटीत घर घेता येऊ शकते तर अविवाहीत भाडेकरूही कायदेशीरपणे सोसाययटीत राहू शकतो.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 3:44 am | तर्राट जोकर

काही शहरांमधे बॅचलर मुला-मुलींसाठी खाजगी लोकांचे स्पेशल हॉस्टेल असतात. पण जेवढ्या प्रमाणात हवं तेव्हढं नाही. मुंबईत ही समस्या एवढी जाणवत नाही. मुंबैच्या केंद्रापासून कॉस्मोपॉलिटन राहणी जसजशी ओसरत जाते तसतसे नियम बदलत जातात.

मार्मिक गोडसे's picture

3 Mar 2016 - 11:42 pm | मार्मिक गोडसे

कोणतीही सोसायटी जात्,धर्म,लिंग व वय (बॅचलर) बघून भाडेकरूला नाकारु शकत नाही. निवार्‍यासाठी भारतीय कायद्यानुसार बॅचलरसाठी वेगळा कायदा नाही, भाडेकराराचे रजिस्ट्रेशनकरून स्थानिक पोलिस स्टेशनला भाडेकरुची माहीती देऊनही जर सोसायटीच्या जनरल मिटिंगमध्ये बॅचरलविरोधी ठराव पास केला तर त्या ठरावाला आव्हान देता येते.

उगा काहितरीच's picture

4 Mar 2016 - 12:02 am | उगा काहितरीच

ओक्के! असं आहे तर . धन्यवाद माहितीबद्दल. रच्याकने समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 12:05 am | श्रीरंग_जोशी

बरोबर आहे परंतु पटो न पटो काही सामाजिक अटी पाळाव्या लागतात...

मार्मिक गोडसे's picture

4 Mar 2016 - 5:53 pm | मार्मिक गोडसे

समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?

अर्थात.

फ्लॅटचे मालक सोसायटी नसून तुम्ही आहात, त्यामुळे तेथे कोणालाही कायदेशीर करार करून भाड्याने देण्याचा हक्क तुम्हालाच आहे, फक्त त्या जागेचा अनैतिक व व्यावसायीक वापर करता येणार नाही. सोसायटी फक्त फ्लॅट मालकाकडून सेवाशुल्काच्या १०% बिन भोगवटा शुल्क घेऊ शकते.

भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो.

भाडेकरूला निवार्‍याची गरज व घाई असते तर मालकाला पैशाची(भाड्याची). कायदेशीर प्रक्रियेत वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत असल्यामुळे शक्यतो अशा भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे सोसायटी असे नियम करायला धजावतात.

@ मार्मिक
१) कदाचित डिस्क्रीमिनेटरी ठराव पास करता येणार नाही, पण सोसायटीत एखाद्याला मेंबर म्हणून कोणतेही कारण न देता नाकारण्याचा सोसायटीला अधिकार असतो का ?

२) निगेटीव्ह डिस्क्रीमिनेशन बहुधा करता येणार नाही पण अफर्मेटीव्ह डिस्क्रीमिनेशन करणे शक्य होऊ शकते का ? की त्या मिरर न्युज मध्ये म्हटल्या प्रमाणे एखादी सोसायटी -फ्लॅटची काळजी घेतली जावी आणि स्त्रीयांवर अन्याय होऊ नये अथवा विवाहीत कुतूंबातील लहान मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून - प्रत्येक फ्लॅटमध्ये एकतरी स्त्री आणि एकतरी मूल असले पाहीजे असा नियम बनवू शकते का ?

३) फ्लॅट अजिबात रेंटवरच न देण्यासंबंधी नियम पारीत करु शकते का ?

४) सोसायटी फ्लॅट रेंटवर द्यायचा असेल तर डिपॉझीटची मोठी अमाउंट मागून अमुक तमूक त्रास झाल्यास डिपॉझीट फोरफीट करु शकते का ? जसे की रात्री १० नंतर मोठा आवाज केला, सोसायटीच्या प्रांगणात धूम्रपान केले, गुटखा थुंकला इत्यादी तत्सम.

५) सोसायटी गेस्ट्सना कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारु शकते का ?

अभ्या..'s picture

4 Mar 2016 - 12:08 am | अभ्या..

बाब्बोउ.
तरीच सोलापूरात बहुतांशी अपार्ट्मेंटस स्कीम कमर्शिअली चालत नाहीत. इतके सोपस्कार करण्यापेक्षा लोक सरळ प्लॉट घेतात अन स्वतः घर बांधून मोकळे होतात. थोड्या थोड्या आहेत अपार्टमेंट पण इतका काटेकोरपणा नाही जपला जात.
बाकी घर भाड्याने देताना बॅचलरना प्रॉब्लेम इथे पण होतो. करतो कायतरी जुगाड ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Mar 2016 - 7:23 am | कैलासवासी सोन्याबापु

कायदेशीर दृष्ट्या अन एथिकली बरोबर आहे गोडसे सर,

पण प्रॅक्टिकल वेगळेच चालते, उदा मुंबई मधल्या कट्टर प्योर वेज सोसाइटी

कायदेशीर बाबींची चर्चा चालू आहेच तर, अशा अविवाहीत भाडेकरुंमुळे सोसायटी मधील लोकांना त्रास होत असल्यास सोसायटी कशा प्रकारे कारवाई करू शकते?(अर्थात लेखात सांगितलेला ऊपाय न योजता)
त्रासांची उदा.
- साध्या तसेच सोलर द्वारे मिळणारऱ्या पाण्याचा अपव्यय/अतिरिक्त वापर
- ओला / सुका कचरा व्यवस्थापनासंबंधी सूचनांचे पालन न करणे.
- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे
इ. थोडक्यात (बहुतेक तरी) फौजदारी गुन्हे नाहीत तर सोसायटी च्या नियमांचे पालन न करुन उपद्रव करणे.

सतिश गावडे's picture

4 Mar 2016 - 9:33 am | सतिश गावडे

- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे

याविरुद्ध पोलिसात तक्रार करता येते. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही.

सण, उत्सव, धार्मिक पुजा यासाठी ध्वनीवर्धक ही अत्यावश्यक बाब झाली आहे. लोकांना कळणार कसे त्याशिवाय. शिवाय लोकांना वाढत्या आवाजाचीही नशा चढत असावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे

निवासी संस्था साधारणपणे दोन प्रकारच्या असतात :

१. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक युनिट (गाळा, फ्लॅट, जमिनीसह रो हाऊस, इ) ची मालकी ज्याच्या नावे खरेदीखत झाले आहे त्याची असते व तो त्या युनिटचा स्वतःच्या मताप्रमाणे कायदेशीर वापर (विक्री, भाड्याने देणे, इ) करू शकतो. सुरक्षा, शांतता, कायदा, युनिट्शी संलग्न देखभाल खर्च भरणे, इत्यादीचा भंग झाला नाही तर कोणतीही बंधने घालणारी कृती करण्याचा हक्क असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांना नसतो.

२. कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी : यात सोसायटीच्या सर्व इमारती (युनिट + सार्वजनिक जागा) व जमीन यांची मालकी सोसायटीची असते आणि ज्यांच्या नावे युनिटचे खरेदीखत झाले आहे व सोसायटीने ज्याला त्या युनिटचे शेअर सर्टीफिकेट दिले आहे त्याला त्या आणि तेवढ्याच जागेचा "वापर" करण्याचा अधिकार असतो... हे अधिकार साधारणपणे सोसायटीचा शुन्य भाडे भरणार्‍या भाडेकरूइतकेच असतात. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना राज्य सरकारचे मान्यताप्राप्त "MODEL BYE–LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY" आपल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आणि त्या बायलॉजमधे फरक झाल्यास नंतर दरवेळेस त्यापुढच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे बंधनकारक आहे. या मॉडेल बायलॉजच्या परिघात सर्वसाधारण सभेत बहुमताच्या म़ंजूरीने अधिक नियम करता येतात आणि ते सर्व सभासदांवर बंधनकारक असतात.

हे पाहिले असता :

लेखातला मुद्दा क्र १ : सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी मिटिंग) जर हा नियम बहुमताने मान्य झाला असेल तर तो सर्व सभासदांवर लागू होतो.

लेखातले इतर मुद्दे (क्र २ ते ४) : हे सर्व सद्य कायद्याप्रमाणे आवश्यक आहेत. म्हणून, ते सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे हा उपचार असतो... नाही केले तरी ते लागू असतातच.

मार्मिक गोडसे's picture

4 Mar 2016 - 12:21 am | मार्मिक गोडसे

@ माहीतगार,
१,२,३,५ चे ठराव जन.मिटींगमध्ये पास करू शकते, सोसायटी बाय लॉज मध्ये सुधारणा करू शकते फक्त हे सुधारीत बाय लॉज रजिस्टारकडून नियमीत करून घ्यावे लागतात.

४ च्या बाबतीत सोसायटी मेंटेनंसच्या १० % पेक्षा अधीक चार्ज करू शकत नाही.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 2:11 am | तर्राट जोकर

विचित्र आहे राव. ब्याचलरांनी काय तंबू ठोकून रस्त्यावर कॅम्पफायर करावं काय? असो. सोसायटीच्या बहुमतापुढे काहीच कायदेशीर मार्ग नाही. बॅचलर ठेवणे बेकायदेशीर नसलं तरी सोसायटीने नियम केला तर त्याला आव्हान नाही. सोसायटी कोणतीही कारणे न देता असे नियम बनवू व राबवू शकते. मेजॉरिटी विन्स. फक्त कितीही थकबाकी असली तरी सोसायटी पाण्याचं कनेक्शन तोडु शकत नाही असे ऐकले आहे. जोशीसाहेब म्हणतायत ते काहीतरी खास केस असावी.

समांतर किस्सा: मी बॅचलर असतांना एकदा भाड्याने खोली द्यायची आहे असे ऐकुन गेलो तर एका सरकारी क्वार्टर मिळालेल्या कर्मचार्‍याच्या घरी. म्हणे दोघांची राहण्याची सोय आहे. कुठे? तर वन बीएचकेच्या त्या छोटेखानी सरकारी फ्लॅटातल्या बेडरूममधे, इतर कुटुंबीय हॉल आणी किचनचा वापर करणार. प्रसाधनगृहांचा वापर एकत्रच. हॉलमधे एक १७-१८ वर्षांची सुंदर कन्या केशभूषा करत होती. तीची माता आम्हा २१-२२ वर्षांच्या तरुणांना बेलाशक घर दाखवत सुविधा सांगत होती. मी म्हणलो मित्रा, लवकर चल बाबा इथून आधी. कशाला विषाची परिक्षा. काही कमी जास्त झालं तर पहिला आपला जीव जाईल. चवकशी नंतर होईल. मुलगी तर टांगती तलवार आहेच पण हे असे राहणे बेकायदेशीर आणि भयंकर आहे. कधी आईवडील आपल्याला भेटायला आले तर झालेच शुभमंगल (वेगळ्या संदर्भात)

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 3:00 am | श्रीरंग_जोशी

काही शहरात पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असतो. त्याचे शुल्क ते घरावर आकारल्या जाणार्‍या करातून वसूल करतात. उदा. पुणे.

काही शहरात पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे केला जातो. तिथे वीजेच्या मीटरसारखेच पाण्याचे मीटर असते. जेवढे पाणी वापरले जाईल त्याप्रमाणात बील येते. उदा. अमरावती.

मी वर लिहिलेले उदाहरण अमरावतीचे होते. सोसायटीचा मुख्य खर्च पाण्याचे कॉमन बील व ते पम्पिंग हाउसचे वीजेचे बील यात जात असे. बर्‍याच सदस्यांनी सोसायटीचे शुल्क थकवले असल्याने सोसायटीचेच पाण्याचे कनेक्शन म. जी. प्र. ने तोडले होते. बीलाच्या मुळ रकमेत दंड व व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात जोडली गेली होती.

ज्या सदस्याने लेखी व तोंडी विनंत्यांना केराची टोपली अडीच वर्षाहून अधिक काळ दाखवली त्याचे पाण्याचे कनेक्शन सोसायटीने नोटीस देऊन व पोलिसांना आगाऊ सूचना देऊन तोडले. त्यानंतर त्या सदस्याने त्याच दिवशी तीन वर्षांचे शुल्क व दंडाची रक्कम सोसायटीकडे भरली.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 3:17 am | तर्राट जोकर

ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) आमच्या विंगमधे चार लोकांनी गेले चार वर्षे मेन्टेनन्स दिलाच नाहीये. जवळपास लाखाच्या घरात आहे प्रत्येकाचं आउटस्टँडींग. त्यांचं पाणी तोडावं असं काही सदस्यांचं मत होतं, पण असं करता येत नाही असे काही लोक म्हणाले. सहा विंगच्या सोसायटीत आमच्याच विंगमधे असे महान लोक एकत्र गोळा झालेत. कधी पाणी नस्तं, कधी लिफ्ट खराब करुन ठेवतात. बाजुच्याच विंगला चोविस तास पाणी,आम्हाला अर्धा तास. लई वैताग राव. बिल्डर लोक मोळी बांधुन देतेत. आपल्याला इथं कोन शेजारी कसा असनार त्याचा चॉइस नसतो. त्याचा राग बिचार्‍या बॅचलरवर काढतात की काय देव जाणे.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 3:30 am | श्रीरंग_जोशी

तुमची समस्या चांगलीच समजू शकतो कारण अपवाद सोडता जिथेही राहिलो आहे तिथे या प्रकारच्या समस्या कमी अधिक प्रमाणात पाहिल्या आहेत.

बॅचलर्सला भाड्याने फ्लॅट देण्याबाबत सोसायटीकडून प्रतिबंध करणे याबाबत मी दोन्ही बाजू समजू शकतो कारण मी दोन्ही प्रकारे सोसायट्यांमध्ये राहिलो आहे.

माझ्या सध्याच्या सोसायटीने अनेक वाईट अनुभवांतून गेल्यावरच बॅचलर्सना प्रतिबंधाचा हा नियम बनवला.

कारण एकदा सुट दिली की कोण कशा प्रकारच्या लोकांना आणून ठेवेल त्याची शाश्वती नसते. अनेक लोकांचे दोन-तीन फ्लॅट्स असतात अन स्वतः ते परदेशात राहत असतात. जास्तीत जास्त भाडे व त्यायोगे कमिशन मिळवण्यासाठी एजंट कुणालाही भाडेकरू म्हणून आणतात. इतर कुटूंबाना काय त्रास होत असेल याबाबत मालकांना काही घेणे देणे नसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 10:33 am | डॉ सुहास म्हात्रे

मेंटेनन्स चार्जेस न भरणार्‍या सदनिकाधारकचे पाणी तोडता येते. ते कायदेशीरपणे करण्यासाठी प्रोसिजर जरा लांबडे आहे...

१. सर्वसाधारण सभेत किती कालावधीसाठी चार्जेस दिले नाहीत म्हणजे कारवाईस योग्य डिफॉल्ट होईल त्यासंबंधी नियम पास करून घ्या. (उदा. आमच्या सोसायटीत चार तिमाह्यांचे चार्जेस दिलेल्या मुदतीत न भरल्यास डिफॉल्ट होईल असा नियम आहे.) डिफॉल्टरचे पाणी तोडण्याची कारवाई करण्याचे हक्क मॅनेजिंग कमिटीला आहेत असा उल्लेख त्या नियमात स्पष्टपणे हवा.

२. चुकार सभासदाला निवडलेल्या व्यवस्थापनाकरवी (इलेक्टेड सोसायटी मॅनेजिंग कमिटी) दर महिन्याला एक अश्या तीन नोटीसा पाठवा.

३. न मानल्यास अजून एक नोटीस वकिलातर्फे पाठवा व त्याची प्रत सर्व परिस्थिती वर्णन केलेल्या कव्हर लेटरसह तुमच्या विभागाच्या "कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिशनरला" पाठवा व पावती घ्या. असे एक महिन्याच्या अंतराने तीनदा करा. त्यानंतर कमीशनर पाणी तोडण्याची परवानगी देईल अथवा ते प्रकरण सक्षम त्याच्या विभागातील अधिकार्‍याकडे वर्ग करेल व तो पाणी तोडण्याची कारवाई करेल.

वरचे प्रोसिजर पाळल्यास कायदा सोसायटी आणि व्यवस्थापनाच्या बाजूने असेल.

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 2:58 pm | तर्राट जोकर

माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस वेळखाऊ असल्याने बहुतेक सेक्रेटरी टाळाटाळ करत असावा. आता रिनोवेशन आणि अपग्रेडेशनचं चाललंय. आता ज्या मीटींगा होतील त्यात सोक्षमोक्षच लावून टाकता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे पाणी तोडण्याअगोदर (किंवा नोटीस देण्याअगोदर) त्या सभासदाच्या सदनिकेच्या पाणी पुरवठा करणार्‍या नळाला स्वतंत्र व्हॉल्व्ह आहे याची खात्री करून घ्या आणि नसल्यास तो बसवा. नाहीतर एका तिरक्या सभासदाचे पाणी तोडताना अनेक चांगल्या सभासदांची गैरसोय होईल ;) :)

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 3:18 pm | तर्राट जोकर

हो ना ;-) तसं शक्य नाही कारण सेपरेट वोल्व नाहीत. काहीतरी दुसरं नाक दाबावं लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2016 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच प्रोसिजर वापरून सभासदाचे सदनिकेमधून इव्हिक्शन करण्याची नोटीस कमिशनरकडून आणणे. ते प्रकरण जरा गंभीर असल्याने पहिल्या पायरीपासून कोऑप सोसा च्या कामात अनुभव असलेलया वकिलाचा सल्ला घेणे योग्य होईल. सभासद सोसायटीचा सदस्य म्हणून सदनिका वापरत असत असतो, सदनिकेचा पूर्ण मालक नसतो. हे पाऊल सहसा उचलले जात नाही, पण कायद्याप्रमाणे, प्रत्येक सदस्य (एका अर्थाने) सोसायटीचा टेनंट असल्याने, चुकार सदस्यांबाबत ही कारवाई शक्य आहे.

असोशिएशन ऑफ अपार्टमेंत ओनर्समधे सदस्य त्याच्या सदनिकेचा/रो हाऊसचा मालक असतो, त्यामुळे हा पर्याय उपलब्ध नसतो.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 1:04 am | तर्राट जोकर

असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप सोसायटी हे दोन मूलभूत फरक सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद. मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.

मार्मिक गोडसे's picture

7 Mar 2016 - 11:12 am | मार्मिक गोडसे

मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.

को.ऑ.सोसायटी सदनीका मालकाला बॅचलर भाडेकरू ठेवण्यास मज्जाव करू शकते का? हे कायदेशीर आहे का?असे धागालेखकाने विचारले. प्रश्न को.ऑ.सो. संदर्भात असल्यामुळे मी ही त्याच संदर्भाने माहीती दिली. असो. ऑफ ओनर्स मध्ये हा प्रश्नच उपस्थीत झाला नसता.

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 10:14 pm | तर्राट जोकर

अहो तुमच्या माहिती बद्दल काही वाद नाही. मलाच हे दोन प्रकार आज कळले.

समजा असे बॅचलर सापडले तर त्यांवर काय कारवाई करार? हाताला धरून तर बाहेर काढता येणार नाही.मग स्टे ओर्डरयेईल त्याची .किंवा केस टाकावी लागेल सोसायटी कोर्टात .थांबा २५ वर्षं.मध्ये वकील श्रीमंत होणार.पोलीस केस करता येत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Mar 2016 - 7:26 am | कैलासवासी सोन्याबापु

हां विषय दुखती नस आहे! आमचे बोलणे ऑब्जेक्टिव राहणार नाही तस्मात् आमचा पास :(

मन१'s picture

4 Mar 2016 - 9:09 am | मन१

सगळ्यांचे आभार.
प्रत्येकाने काही महत्वाचे मुद्दे सांगितलेत; तेही अगदि नेमके, टेक्निकली बरोबर असे.
त्याबद्दल विशेष आभार.
@सुहास म्हात्रे आणि इतर --
धाग्यातलं कथन संदिग्ध वआटू शकतं. त्याबद्दल सॉरी.
मी उल्लेख करत असलेली सोसायटी ही हल्लीच्या नॉर्मल पुणे-मुंबै मध्ये ज्या सोसायट्या असतात; तशीच सोसायटॅए आहे. म्हणजे म्हात्रेंच्या प्रतिसादातली दुसर्‍या प्रकारची --कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी.
.
.
आता म्याच रंगात आलेली आहे . कारणे --
सोसायटी मध्ये एकच बिल्डिम्ग आहे बारा मजली. सोसायटी आताच बनली आहे. ( मागचा वर्शभर बिल्डरकडे असते ना सुरुवातीचे एक दोन वर्शे, तशी होती बिल्डिंग )
सोसायटी ऐन चौकात आहे. दोन रस्ते छेदतात तिथे.
त्यामुळे तळमजल्यावर कमर्शिअल दुकाने जोरात सुरु आहेत. मिठाई, पिज्झ्झा हट, हेअर ट्रान्सप्लांट सेंटर असे सगळे तळमजला व पहिल्या मजल्यावर आहे. तळ मजल्यावर कमर्शिअलवाल्याने आपले दुकान भाड्याने दिले आहे. तिथे आता दारुचे दुकान होणार आहे. सोसायटीवाले त्या दुकानाच्या मालकाकडे भेटायला गेले की तुम्ही दारुचे दुकान कशाला उघडता; आम्ही ऑल्मोस्ट तितक्याच भाड्यात तिथे मेडिकल वगैरे उघडू. तुम्हाला भाडयच्या रकमेत नुकसान सोसावे नाही लागणार. )सोसायटीवाल्यांपैकी एक्जण मेडिकल स्टोर वाला आहे, दुसरा अजून एक सोनार्/सराफ/ज्वेलर्सवाला आहे.)
मालक म्हटला "हुडुत्त. दारुचे दुकान उघडायला ज्याला भाड्याने दिलय तो माझा दोस्तय. कमिटमेण्ट झालेली आहे. दुकान आता उघडणरच." हे बोलणारी; दुकान दारुसाठी भाड्याने देणारी व्यक्ती स्वतः हल्ली जे समाजवसेवक असतात ना अण्णा, भाउ, तात्या वगैरे... ते फ्लेक्स बोर्डावर रुबाबात झळकताना दिसतात; "वाढदिवसाच्या शुभेच्चा " वगैरेंमध्ये; त्यांच्यापैकी आहे. स्थानिकांपैकी.

त्यांनी दिलेल्या उत्तराने आणि एकूणच त्यांच्याबद्दलच्या निस्सिम आदरापोटी सोसायटीवाले काही बोलू शकले नाहित. गुप्चूप परत आले.
.
.
.
हा झाला कथेचा पूर्वार्ध. हे दोन चार महिन्यांपूर्वी घडलं. आणि काल परवापासून हे भाडेकरु - बॅचलरचं प्रकरण उभं राहिलं.
.
.
आता गंमत अशी की ह्याच थोर समाजसेवकांचे एकट्याचे तीन की चार फ्लॅट आहेत. तेही त्यांनी भाड्यानं दिलेत. त्यापैकी फक्त एकात विवाहित भाडेकरु आहेत. बाकी सगळ्यात अविवाहित भाडेकरु.
ह्याशिवाय इतर लोक ज्यांचे एकेक फ्लॅट आहेत; त्यांनीही आपले फ्लॅट भाड्याने दिलेत. बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत. आणि ते आदरणीय समाजसेवक म्हणाले आहेत की नियम वगैरे करणआर्‍अयंना ते प्रेमानं समजावणार आहेत मीटिंगमध्ये म्हणून.
मागच्या वेळी त्यांनी दुकानाबद्दल सम्जावलं होतं आख्ख्या सोसायटीला. ते एकटे व्हर्सेस सर्व सोसायती होती तेव्हा. आता तर सोसायटी मधीलच तीन चार इतर फ्लॅटची मालकमंडळीही त्यांचय सोबत असणारेत मदतीला. तर सगळ्म अगदि शांततापूर्ण आणि प्रेममय वातावरण आहे. त्याच वातावरणात चर्चा होणारे.
.
.
पुन्हा परतून अधिक लिहितो.

बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत.

सोसायटीमध्ये सुरुवातीला केवळ बॅचलर मुलांना जागा भाड्याने देऊ नये असा सूर होता. पण एक जागा दोघा परप्रांतीय मुलीना भाड्याने दिलेली होती. या मुली कधीही रात्री-अपरात्री (२ वाजल्यानंतर) वेगवेगळ्या मित्रमंडळीना घेऊन येत बहुधा पार्टी करायला. चौकीदाराने या मित्रमंडळीना आत येण्यास मज्जाव केल्यास चौकीदारांशी हुज्जत घालीत (उच्च स्वरात), शेवटी मालकांशी बोलून १ महिन्याची नोटीस देऊन त्यांची पाठवणी केली. तेव्हापासून 'बॅचलर मंडळी नको रे बाबा!' असा सूर आहे.

याखेरीज असेच पार्टीचे अनुभव अन्य नातेवाईकांनी आपल्या घरी पेईंग गेस्ट/भाडेकरू ठेवलेल्या मुलींबद्दल देखील आढळले. त्यामुळे मुले जास्तीत जास्त तर दारू पिउन गोंधळ करतील, मुलीं काय धंदे सुरु करतील याचा काही नेम नाही - अशीही विचारसरणी आढळते.

याचीच दुसरी बाजू कि ऑफिसातील काही मैत्रीणीना अशा कारणास्तव जागा मिळणे दुरापास्त झाले (आहे/होते). 'आता बहुतेक जागेसाठी लग्न करावे लागणार!' असे उद्गार स्त्रीवर्गाकडून ऐकू येतात कधीमधी.

बॅचलर या शब्दा ऐवजी कित्येक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खाणारे, ठराविक धर्मिय, ठराविक भाषिक हे शब्द असतात. तर सकाळ मधील काही अ‍ॅड्स पाहिल्या तर ठराविक जातीच्या कुटुंबालाच फ्लॅट भाड्याने देणे आहे अशाही अ‍ॅड्स असतात. :(
हे मला/आपल्याला कितीही गैर वाटत असलं तरी 'जिसकी लाठी उसकी भैंस' हे तत्त्व बाजारात अनेकदा निरुपायाने मान्य करावे लागते.

नाखु's picture

4 Mar 2016 - 9:50 am | नाखु

स्वतःला गेली १३ वर्षे स्वतःची सदनिका भाड्याने दिल्याचे अनुभव येन प्रकारे.

पहिल्याच वर्षी (साल २००२ ते २००३) मेहुण्यांच्या मित्राला दिला (घर जास्तीत जास्त अस्वच्छ आणि तोड्फोड युक्त ठेवावे याचा आदर्श वस्तुपाठ ठेऊन २००४ च्या सुरुवातीला घर ताब्यात घेतले.भाडेकरू शिक्षण अभियंता आणि कुटुंबासहीत

दुसराही अभियंता टाटा मोटर्स मध्ये मित्राचे मित्राच्या ओळखीने आला होता (मागाहून कळाले तो जगन्मित्र सदनिका भाडेव्य्वहारात दलाली (एजंट) होता पण उघड सांगत नसे किमान घरमालकाम्ना तरी) या इसमाने कुटूम्बसहीत राहून घर ठीक ठाक ठेवले पण अगदी सुस्थीततली नोकरी असूनही भाड्याचे बाबत पाठपुरावा केल्याशिवाय आगावू भाडे दिले नाही.सन २००४ ते २००६

२००६ नंतर रीतसर एजंटला सांगून भाडेकरू ठेवावा लागला कारण मी राहत असलेल्या घराकडे लक्श्य देणे आणि (मुलगा लहान त्यामुळे सुमारे ७-८ किमी अंतरावरील सदनिका दाखवणे ई गोष्टी करू शकत नव्हतो)शिवाय नोकरी बदलामुळे चिंचवड ते शिक्रापुर असा पिट्टा पडत होता.

सदरहू एजंटने आणलेला भाडेकरू बद्दल एक स्वतंत्र कथा होईल. सुरवातीला एजंट्ने सांगीतले की ही स्त्री पुण्यात नोकरी असल्याने (८ वर्ष्याचे )मुलाबरोबर पुण्यात राहायला जागा शोधते आहे.बाकी घरातील सदस्य (पती वगैरे) नाशीकला असतात.त्या नुसार जिथे कुटुंबे जास्त आहेत अश्याच संकुलात सदनिका हवी आहे.

रीतसर करारनामा करूनच सदनिका भाड्याने देण्याचा माझा रिवाज असल्याने मीही करारनामा केला (दुर्दैवाने फक्त नोटरी केला,पण निबंधकाकडे नोंदणी असणारा केला नाही) आणि पुढचे ११ महिने मीच तणावाखाली काढले.

महिन्यातून (किमान ३-४ वेळातरी) वेळी अवेळी फोन करून शुल्लक तक्रारी. उदा घरातील ट्युब लागत नाही पासून तर फक्त बाथरूम मधल्याच नळाला पाणी हळू येते इथपर्यंत. शिवाय फोन झाला की लगेच तासाभरात संकुलाचे चेअरमन कडे जाऊन तक्रार पाढा करणे सुरि केले.

पुढे त्याची हद्द झाली आणि मीच (आयुष्यात पहिल्यांदाच) भाडेकरूला करार संपण्यापुर्वी काढण्याचा निर्णय घेतला.

वेळ सायंकाळी ८.०० ते ८.३० मी दवाखान्यात सौ.ला त्रास होतोय म्हणून आलेलो. न्म्बर यायची वाट पहात.
"मी तुअम्च्या घाणेरड्या फ्लॅट्मध्ये कसं राह्यच" मला उच्च शिक्षीत भाडेकरूचा फोन.
"मी काय झालं ते नीट आणि शांतपणे सांगा" शक्य तितक्या हळू आवाजात
"ते काही नाही, तुम्ही आधी इथे या सगळी टॉयलेट घाण बाहेर्पर्यंत येतेय. मी कामावरून आले तर हाच प्रकार निस्तरायचा का मी तुअम्ची तक्रार चेअर्मनक्डे करीन...."उच्च शिक्षीत भाडेकरू

माझ्ह्या त्रासीक चेहर्याने सौला माहीत पडले हा भाडेकरूचाच फोन आहे म्हणून मग रीतसर दवाखान्याचे काम झाल्यानंतर (अजित जोशी,पिंपरी) रात्री १० वाजता तिकडे वरात.
मी सौ ला तू येऊ नकोस सांगत होतो पण त्या बांईंचा तोंडाळपणा माहीत असल्याने मीही येते असे म्हटल्याने आम्ही दोघे गेलो.

म्ग नेहमीचे तुअम्चे फ्लॅटकडे लक्श्य नाही मी चांगला शोधत होते पण तुम्हाला गरज आहे असे एजंटने सांगीतले ईईई सुरू झाले.

संडासात पाणी टाकले की थांबून राहात होते आणि अगदी हळू हळू जात होते.

उद्या प्लंबर घेऊन येतो आणि बघतो असे साम्गून घरी आलो तरी किमान दोन-तीनदा फोन करून आणखी त्रास दिलाच बाईंनी.
दुसर्या दिवशी प्लंबरला घेऊन सक्काळी (बाई कामावर जायच्या आधी पोहोचलो) प्लंबर नको म्हणत असताना मी रजा टाकली.(प्लंबर अगदी विश्वासू माणुस असल्याने आणि माझ्याकडे किमान ५-७ वर्षे काम करीत असल्याने. "मी करीन तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणत होता")

३-४ तासाच्या अथक प्रयत्नांनतर टोयलेटचा बाहेरील जोड आणि भींतीतला जोड यांच्या मश्ये (प्ल्बीगच्या भाषेत न्हाणी ट्रॅप का काही म्हणतात त्या ईंग्राजी वाय शेपच्या) कडक गोलाकार वस्तू निघाली.

तो भरीव रबरी बॉल होता आणि त्याच भाडेकरूच्या मुलाकडून खेळताना पडला होता (त्याने तसे आईला सांगीतलेही होते आणि आईने चाणाक्षपणे आम्च्या पासून दडवून ठेब्वले होते) शेवट पर्यंत तो आम्च्या कडून नसेल तर आधीच असेल असे भाडेकरू बाईने अगदी ओरडून मग (साग्रसंगीत)रडून ही सांगीतले.

सोसायटी सदस्य (जास्तच) स्त्री दाक्षीण्यशील असल्याने मी ही फार विषय वाढवला नाही आणि करारा आधीच खाली करण्याचा निरणय पक्का केला.
नंतर सुमारे ८-१० महिने अक्षरशः रिकामा ठेवला.

सुदैवाने पुढे माजी कंपनीतील सहाकार्याने (अविवाहीत असलेल्या) मागीतला त्याला दोन वर्षे राहिल्यानंतर त्याच्याच चुलत भावाने २-३ वर्षे राहिला तो ही अविवाहीत (दोघाम्ची ही लग्ने राहायला आल्याण्म्तर किमान वर्षभराने झाली, आणि उच्च शिक्षण्ही इथेच केले) आता दोघेही स्वतःचे घरात रहायला गेलेही.

तस्मात अविवाहीत लोकांकडून मलातरी कसला त्रास झाला नाही. पण आमच्याच संकुलात एका सदनिकेतील मुलांनी दारू प्यायल्यांनतर बर्यापैकी राडा केल्याचे कळाले ( म्हाणून उडदामाजी काळे गोरे असतातच)

नंतच्या दक्षीण भाषीक कुटुंब असलेल्या भाडेकरू कडूनही काहीहे त्रास नाही सगळे व्य्वव्हार चोख आणि रीतर नोंदणी केलेल्या करारनाम्यानुसार) सुमारे दोन वर्षे राहिला तदनंतर स्वतःचे घरात रहायला गेलाही.
(अता तर संकुल अध्यक्षांच्या पत्नीच नवीन भाडेकरूला सांगतात की या सदनिकेत राहणार्या प्रत्येकाचे स्वत्:चे घर होतेच होते. खखो देव्/भाडेकरू/अध्यक्षीण बाइच जाणे)

प्रतीसाद जास्तच लांबला पण कुठलेही सरसकटीकरण होऊ नये म्हणून हा प्रतीसाद प्रपंच

या नियमापाठीमागे "आजकालच्या तरुणांनी (मुले / मुली) जास्त काळ अविवाहित राहु नये . लवकरात लवकर दोनाचे चार हात करुन संसाराचा सारीपाट मांडावा " असा या घरमालकांचा सुप्त शुभमंगल हेतु असु शकतो . जुन्या काळातील माणसे खरोखर हुशार होती / असतात . त्यामुळे त्यांचीही बाजु समजुन घ्यावी.

चौकटराजा's picture

4 Mar 2016 - 10:03 am | चौकटराजा

सोसायटीमधे नक्की कशाची परवानगी आहे व नक्की कशाची नाही या संबंधी

१) भारत देशातील सोसायटीत सर्वीच्च शब्द हा राज्यघटनेचा आहे. सबब आपण तिचा शोध घेऊन अभ्यास केल्यास बॅचलर ठेवणे कसे शक्य आहे वा नाही. याचा शोध घ्यावा. जाती जातीत फरक करणे जसे कायद्याला अमान्य आहे तसे विवाह स्थिती चा निक॑ष धरून एखाद्याला अस्पृय्श्य ठरविता येते किवा कसे याचा खुलासा घटनेत होईल.

२) घटनेनंतर क्रम लागतो प्रचलित कायद्यांचा. त्यातील कोणत्याही तरतुदीविरद्ध ( इन डिटृरिमेण्ट )ठराव जनरल बॉडी वा कमिटीला बहुमतानेही करता येत नाही.

३) त्यानंतर क्रम येतो बाय लॉज चा.

४)त्यानंतर क्रम येतो. त्या नियमावलीचा जिथे वरील तीनही पातळीवरचे कायदे व उपकायदे गप्प आहेत. उदा. पाण्याच्या वेळा.

क्र ४ मधील सर्व नियमावली ठरवण्याचा अधिकार जनरल बॉडीलाच आहे. कमिटीला नाही.फक्त कारभारातील काही ठराव उदा एखाद्या सभासदाच्या गाळा विक्रीला ना हरकत देणे. ( हे देखील जनरल बॉडीने ठरवून दिलेल्या चौकटेतच करावे लागते.

वरील क्रमाने अभ्यास करून कमिटी विरूद्ध निबन्धका कडे रीत्सर तक्रार करा. आपण जिकल्यास ती ऐतिहासिक केस होईल.

चौकटराजा's picture

4 Mar 2016 - 10:10 am | चौकटराजा

कमिटी ही जनरल बॉडी व कायदा यांची नोकर आहे.स्वखुशीने काही जण तिचे सदस्य होतात. हे कायद्यातील गृहित तत्व आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच !

किंबहुना कमीटीत काम करणे म्हणजे फुकटच्या लष्करच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच असते ! जे काम करायला पुढे येत नाहीत असे सभासद सभेत (अ) आपल्यावर अक्षम्य अन्याय झाला आहे आणि / किंवा (आ) आम्हाला कमीटीपेक्षा जास्त कळते अश्या आवेशात बोलत असतात. :) ;)

तर्राट जोकर's picture

4 Mar 2016 - 3:26 pm | तर्राट जोकर

त्यासाठी काही उच्चभ्रू सोसायट्या पगारी नोकर ठेवायलेत असे ऐकून आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो पगारी नोकर सोसायटीचा व्यवस्थापक असतो... व तो धावपळीची (बिले भरणे, दुरुस्त्या करणे, इ) कामे करतो.

कायद्यासंबंधी / दंडांसंबंधी कायदेशीर अधिकार फक्त पदाधिकार्‍यांनाच असतात आणि सभासदांशिवाय इतर कोणालाही मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी होता येत नाही. ठराविक संखेच्या पदाधिकार्‍यांची मॅनेजिंग कमिटी स्थापन करणे व त्यांची नावे हाऊसिंग कमिशनरला लेखी देणे नुकतेच आवश्यक झाले आहे असे ऐकून आहे.

असा मी असामी's picture

8 Mar 2016 - 4:48 pm | असा मी असामी

अगदी अगदी मनातले बोललात. सध्या त्याच परीस्थितीतुन जात आहे.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 10:16 am | श्रीरंग_जोशी

नऊ वर्षांपूर्वी पुण्यातल्या कात्रज भागातील भारती विहार सोसायटीमध्ये टूंबाबरोबर राहणारे घरमालक अन भाड्यांच्या घरात राहणारे विद्यार्थी यांच्यातले वाद इतके विकोपाला गेले की काही दिवस पोलिस बंदोवस्त लावावा लागला होता. विद्यार्थ्यांकडून इतर कुटूंबाना होणार्‍या त्रासांबद्द्ल जवळ जवळ एक आठवडा बातम्या येत होत्या.

त्यातली एकदम रंगवून लिहिलेली गोष्ट अशी होती की सोसायटीतली लहान मुले अंगणात पडलेल्या निरोधांचे फुगे बनवून खेळतात...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2016 - 5:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बातम्या खर्‍या आहेत.

मी माझ्या घरात आतापर्यंत फक्त विवाहितच भाडेकरू ठेवले आहेत. याचे कारण सोसायटीतील लोकांनी काही काळाने एक आपसात ठराव केला होता कि शक्य असेल तर अविवाहित मुले किंवा मुलीना सदनिका देऊ नये. एका सदस्याने तीन मुलीना सदनिका दिली त्या मुलींचे मित्र रात्रीं अपरात्री मोटार सायकल उडवत येत असत. शिवाय सोसायटीच्या रखवालदाराबरोबर भांडण करणे, दारू पिऊन शिवी गाळ करणे. शेवटी ११ महिन्यांनी त्या सदस्याने त्या मुलीना काढून टाकले.
माझ्या घरात मी एका दाक्षिणात्य कुटुंबाला भाड्याने घर दिले होते. माणूस रेल्वेत नोकरीला, बायको एक कॉनव्हेंट शाळेत शिक्षिका एक मुलगा ५ वर्षाचा असे घरंदाज कुटुंब. पण हा माणूस रात्री दारू पिऊन तेथे गोंधळ घालत असे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सदस्यांनी खाजगीत हे सांगितले तेंव्हा मला हे कळले. मी त्या माणसाला कोपर्यात बोलावले आणी हग्या दम दिला पुढे तीन चार महिने तरी शांत होते पण परत येरे माझ्या मागल्या म्हणून शेवटी ११ महिने झाल्यावर त्याला रजा दिली. मी आतापर्यंत मराठी, दाक्षिणात्य, राजस्थानी जैन, मुसलमान अशा सर्व लोकांना घर भाड्याने दिलेले आहे परंतु वर म्हटलेला प्रसंग सोडला तर मला काही त्रास झाला नाही. वार्षिक सभेत मी शेजार्यांना भाडेकरूंबद्दल आवर्जून विचारत असे.
तात्पर्य -- विवाहित किंवा अविवाहित भाडे करू कसा निघेल ते नशिबावर आहे.

सोसाअय्टीमध्ये "नियम्/कायदा" पास करुन घ्यायला संख्याबळ्/टकेक्वारी किती पुरेशी आहे ?
५१ लोकांपैकी २६ मतं नियमाच्या बाजूनं आणि २५ नियमाच्याविरोधात असतील तर काय होइल ?
५१ पैकी ४२ नियमाच्या बाजूनं आणि ८ नियमाच्या विरोधात असले तर काय होइल ?
थोडक्यात विचारायचं तर "सर्वसाधारण बहुमत -- ५१% पुरेसं आहे की विशिश्ट बहुमत -- ६६% किम्वा ७५% किंवा ८०% वगैरे हवे असते ?"

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 2:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसाधारण सभेत वैध नियम करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत :

१. नियम राष्ट्रस्तरीय (भारतिय) कायदे, स्थानिक राज्यस्तरीय कायदे आणि कोऑप हा सोसायटीचे मॉडेल नियम (https://sahakarayukta.maharashtra.gov.in/site/upload/documents/Model_Bye...) या सर्वांत बसणारेच असणे आवश्यक आहे.

२. नियम बनविण्याची जबाबदारी व हक्क फक्त सर्वसाधारण सभेलाच असते. कार्यकारी मंडळाने त्या नियमांची अंमलबजावणी करायची असते,

३. सर्वसाधारण सभेत वैध नियम बनविण्यासाठी कमीत कमी हजर सदस्यसंख्या (कोरम) एकूण सदस्यांच्या २/३ किंवा २० यापैकी लहान संख्या पुरेशी असते.

४. सोसायटीच्या प्रत्येक सदनिकेच्या शेअर सर्टिफिकेटवर नाव (अनेक नावे असल्यास प्रथम नाव) असलेल्या सभासदाला एक मत असते.

५. सभेत पुरेशी सदस्यसंख्या नसल्यास :
५.अ. सभासदांच्या विनंतीवरून सभा बोलविलेली असली तर ती बाद ठरते.
५.आ. कार्यकारी मंडळाच्या अजेंड्याने सभा बोलविलेली असली तर, सभा तासाभरासाठी तात्पुरती तहकूब (अ‍ॅड्जर्न) करून त्याच जागी घेता येते अथवा ७ दिवसांच्या नोटीशीने नवीन वेळेस व नवीन जागी घेता येते व प्रथम जाहीर केलेल्या अजेंड्यावर विचार करता येतो... या दुसर्‍या सभेसाठी कोरमची (कमीत कमी हजर सदस्याच्या आकड्याची) अट लागू होत नाही.

६. नियम पास करण्यासाठी सभेत हजर सदस्यांच्यापैकी कमीत कमी ५१% मते (सिंपल मेजॉरिटी) मिळणे जरूर असते. मात्र असा पास झालेला नियम १००% सभासदांवर बंधनकारक असतो.

हे व बाकी बारकावे वर दिलेल्या दुव्यात आहेतच.

जेपी's picture

4 Mar 2016 - 5:40 pm | जेपी

माझा एक प्रश्न आहे-
जर इमारतीत 10 पेक्षा कमी सदनिका असतील तर सोसायटी करता येते का??
deed of declaration नाही.इमारत 12 वर्ष जुनी आहे.
--
नवा धागा काढावा का इथेच विचारावे.

---

चौकटराजा's picture

4 Mar 2016 - 7:18 pm | चौकटराजा

बहुतेक नाही. आपार्टमेट करा.

चौकटराजा's picture

5 Mar 2016 - 10:30 am | चौकटराजा

आजच्या दैनिक सकाळ मध्ये सोसायटी बद्दल लेख आला आहे. त्यात बेकायदेशीरपणे केलेले व निबंधकाची मान्यता घेतलेलेही ठ्रराव कायद्यापुढे कसे पराभूत होतात हे कळून येते.

मार्मिक गोडसे's picture

5 Mar 2016 - 11:51 am | मार्मिक गोडसे

धन्यवाद चौरासाहेब.
त्यालेखात शेवटी बायलॉजसंबंधी असेही म्हटले आहे, की बायलॉज, (दुय्यम उपनिबंधकांनी मान्य केले असले किंवा नसले तरी) हे कधीही कायद्याच्या विरुद्ध असू शकत नाही व बायलॉजपे़क्षा कायदा श्रेष्ठ असतो व असे बायलॉज हे कायद्याच्या विरुद्ध असून,सभासदांना लुटण्याचे एक साधन आहे.

हेच मी वरील एका उपप्रतिसादात निवार्‍याच्या संदर्भात लिहिले होते..

भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2016 - 12:21 pm | प्रकाश घाटपांडे

काही ठिकाणी मुलाचे आई वडिल येतात. भाडेकराराची नोंदणी ही त्यांच्या नावावर होते. त्यानंतर आईवडिल निघून जातात व मुलगा आपल्या मित्रांसह तिथे राहतो. उपद्रवी वर्तन केले तरच प्रश्न निर्माण होतो.

वैभव जाधव's picture

5 Mar 2016 - 2:10 pm | वैभव जाधव

सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद/विधिमंडळ सदस्य यांची तुलना करावीशी वाटते.

सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात नंतर कायदे चांगले बनवतात आणि त्याउप्पर भारी पळवाटा शोधतात. बाकी कमिटीवाले म्हणून 'मजा' असते ती वेगळीच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2016 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुलना इथेच थांबत नाही...

"सोसायटीच्या निवडणूकीत निवडून आलात ना* ? आता सोसायटीची काय असतील नसतील ती दुखणी कमिटीने काढावी. आम्ही आराम करायला आणि कमिटीवर टीका करायला मोकळे झालो." हे सोसायटी सभासद आणि मतदार जनतेमधले महत्वाचे साम्यही विसरू नका :)

* या निवडणूकीतले मतदानाचे प्रमाण संसद/विधिमंडळ निवडणूकीपेक्षा फार वेगळे नसते, हे पण एक अजून साम्य ! ;)

चौकटराजा's picture

5 Mar 2016 - 3:55 pm | चौकटराजा

कमिटीवर काम करताना अगदी हलकट वृतीच्या सभासदांबरोबर संबन्ध आलेला होता. इतका की घरात अशांती माजू लागली.
कित्येक वेळा पदरमोड ही करावी लागते. इतर क्रेडीट को ओप सोसा प्रमाणे इथी फायदा काहीही नाही. किमान सदस्यानी कृतज्ञ असावे ही अपेक्षा देखील फोल ठरते.

नाव आडनाव's picture

5 Mar 2016 - 4:27 pm | नाव आडनाव

पदरमोड एक गोष्ट झाली. बराच वेळ आणि एनर्जी पण द्यायला लागते. आणि एव्हढं करून कोणी चांगला म्हणणारा माई का लाल / लाली काही सापडत नाही :)

मी आमच्या सोसायटीच्या पहिल्या कमिटीत होतो. गेलं वर्ष ऑफिस नंतरचा वेळ फक्त कमिटी एके कमिटी केली. पण पब्लिकला तरीही प्रॉब्लेमंच आहे. तीनदा तर मारामारी पर्यंत वेळ आली - कारण काय तर एका लिफ्ट मधला बल्ब पहाटे ५-५:३० ला बंद झाला, एकदा डीजीची बॅटरी फुगल्यामुळे डीजी बंद पडला, एकदा लिफ्ट हँग झाली. आता हे काय मी केलंय का? मेंटेनंस देतो म्हणजे कमिटीवर उपकार करतोय अश्या थाटात बोलत असतं पब्लिक. सगळ्या गोष्टींची एएमसी आहे आणि रेग्युलर मेंटेनंस ते करतात. एकदा तर लोक मागेच लागले - "सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया". आता साप काय मी पाळले आहेत आणि सोसायटीत आणून सोडतोय का? कुछ करो म्हणजे काय? आणि मेल वर मेल. कोणी भेटला की तोच विषय. वैताग दिला पब्लिकने.

आज नवे कार्यकर्ते घेणार आहेत कमिटी. उद्यापासून सुटलो एकदाचा. सगळ्यात भारी तर ते कमिटी सदस्य जे काम काहीच करत नाहीत पण मिटींग मधे सगळ्यात पुढे. लोकांना वाटेल की हेच सगळं करत आहेत काय. एकाच सोसायटीत रहायला असल्यामुळे त्यांची "असलियत" (हिंदी पिच्चरने फॅमस केलेला शब्द :) ) सांगताही येत नाही.

"सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया".

मुंगुस पाळो बोलनेका.
.
बाकी दंगाकाकूधागा काढायला हा एकदम भारी इश्श्यु आहे.

एस's picture

5 Mar 2016 - 5:15 pm | एस

+७८५७४८३९२०१

काढाच धागा! शीटकव्हराखालच्या बोक्यापेक्षा जास्त ट्यार्पी देऊ. ;-) ;-)

मग काय तर. माझ्या डोक्यात आत्तापासूनच उपायांची पुंगी वाजायलीय. डोळ्यासमोर शिरीदेवी, मल्लिकापासून आमरसपुरीपर्यंत सगळ्यांचे हिरवे डोळे दिसायलेत.
प्रसांतभैय्या कुछ तो करो. साप का जहर और सोसायटीका कहर ये दंगाधागा लिखोच.

नाव आडनाव's picture

5 Mar 2016 - 5:49 pm | नाव आडनाव

मुंगुस पाळो
कितना अवघड हय. मुंगुस पाळो, उसको खाऊ पिऊ घालो, रात के वेळमे सोसायटीमे सोडो. आजारी पड गया तो औषधपाणी करो :)

त्यापेक्षा आम्ही थायमेट टाकलं. साप गायब.

बाकी साप आणि मुंगसाने "मॅटर सेटल" केला तर? (म्हणजे जीयो और जीने दो) :) बाजूच्या एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड ने टँकर वाल्याबरोबर सेटिंग केलं होतं. गार्डने पाणी कमी भरायचं आणि टँकर वाल्याने त्याला चहा पाण्याचे द्यायचे :)

लिहितो भावा. आज कमिटीचं भूत एकदा उतरलं की लिहितो. धिगाणा धागा होइल :)

थायमेट ने सापं गेले?? पेस्ट कंट्रोलचे थायमेट ना?
नेलकटरने अर्नॉल्ड घाबरला असे वाटले ते. ;)
एनी वे. गेले तर जाउदे. तू धागा काढच

नाव आडनाव's picture

5 Mar 2016 - 6:36 pm | नाव आडनाव

बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर घेउन आला आणि एका गार्ड्ने टाकलं. गेले म्हणजे नंतर दिसले नाहीत.
आता ते थायमेटने गेले की नाही माहित नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही झालेलं असू शकतं. पण प्राब्ळम सॉल्व्ह्ड :)

ससन्दीप's picture

7 Mar 2016 - 10:12 pm | ससन्दीप

एकंदरीत सर्व कमिटी मेम्बर्स आणि फ्लॅट धारकांचा हा समअनुभव आहे. मी वसईमध्ये ९४ फ्लॅट्सच्या सोसायटीत राहतो. आधिची मॅनेजिंग कमिटी ही अत्यंत कामचुकार होती. घोटाळे केले नसले तरी सोसायटी फंडचा निष्कारण अपव्यय केला. मोठ्या प्रयासाने सोसायटी मेम्बर्सनी ती कमिटी बरखास्त केली.
पुन्हा झालेल्या सोसायटीच्या निवडणूकीत बहूमतांनी निवडून आलो आणि सेक्रेटरी पदावर आलो. काही जणांनी सोसायटीला 'अच्छे दिन' आल्याची प्रतिक्रिया दिल्या, पण माझे 'बुरे दिन' चालू झाल्याचा साक्षात्कार व्हायला किमान एक महिनाही लागला नाही. काही कमिटी मेम्बर्सचा 'कुछ तो कर दिखाने" चा उत्साह लवकरच मावळायला लागला. कामं आम्ही बर्‍यापैकी केली जसे की सीसीटीवी, आगप्रतिबंधक उपकरणे, इन्व्हर्टर, सिमेंट, वेल्डींगची कामे वैगेरे. पण त्याची विशेष अशी पावती लोकांकडून कधीही मिळाली नाही. उलट कामाचा व्याप मात्र वाढत राहिला ज्याचा ताप माझ्या कुटुंबियाना होऊ लागला. लोकांच्या मते सेक्रेटरी म्हणजे एक चलता फिरता कस्टमर केअर. वेळीअवेळी द्याव्या लागणार्‍या डाॅक्यूमेंट्स, एनओसी, चेकवर सह्या. कधीही किरकोळ तक्रारी घेऊन उगवणारे शेजारी. मी घरी नसलो तर त्यांच्या तक्रारींची एक्नोलेजमेंट माझ्या घरच्यांकडुन मागणे. जो वेळ कुटुंब, करियरला किंवा घरातली कोळाष्टके काढण्यास दिला पाहिजे तो वेळ सोसायटीची गटारे काढण्यास जाऊ लागला. आपण 'बिन पगारी फुल अधिकारी' झालो आहोत ही भावना मनात बळावयास लागली. सिक्यूरिटी गार्डने चारचौघात आपल्याला सलाम ठोकण्यापलिकडे पदाचा विशेष काही फायदा नाही. इतर ठिकाणी पैशे खाणारे खात असतील पण मी कधी असा प्रकार केला नाही. (प्रामाणिकपणा नाही तर असे पैशे मला पचत नाही हा पुर्वानुभव)
अशामध्येच सोसायटीत काही बरे-वाईट झाले तर सरकार कमिटीलाच जबाबदार ठरविते याची बरीचशी उदाहरणे ऐकण्यात आणि पाहण्यात आली. विनाकारण जेलमध्ये जाणे परवडणारे नसल्याने एका शुल्लक कारणावरून राजीनामा देऊन पुर्वीसारखे आझादीचे जीवन जगतोय.
———
येथे विषय भटकविल्याबद्दल धागाकर्त्याची मी माफी मागतो.
पण येणार्‍या सोसायटीच्या एजीएममध्ये 'नायजेरीयन नको' चा ठराव आम्ही पास करून घेणार आहोत.

चौकटराजा's picture

5 Mar 2016 - 8:11 pm | चौकटराजा

आतापर्यंतच्या माझ्या प्रतिसादावरून मी नक्की सभासदांच्या बाजूचा आहे की कमिटीच्या असा प्रशन पडू शकेल. पण मी कायद्याच्या बाजूचा आहे हे स्पष्ट करतो. कारण सोसायटीची स्थापनाच मुळी एक कायदा अस्तित्वात आहे म्हणून होत असते सबब आपला शेजार्‍याशी संबन्ध प्रथम कायद्याचा आहे मग संस्कृतिचा, माणूसकीचा.

आता कायदा बॅचलर बाबत काय म्हणतो ? तर अनेक निकालानंतर असे दिसते की आपला भाडेकरू कोण असावा याचा अधिकार कमेटी पेक्षा पोलिसाना अधिक आहे. त्यानी व्हेरीफिकेशन दिले असेल तर आपण गैरवर्तणूक झाल्यानंतरच बॅचलर ना काढू शकतो. ते सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करूनच.अशी गैरवर्तणूक कायद्यात गैर म्हणून गणली गेलेली असली पाहिजे. उगीच भाडेकरू चेअरमनला रागाने काही म्हणाला तर ती गैरवर्तणूक ठरेलच असे नाही. ड्रग ट्रॅफिक, ह्युमन ट्रेफिक, हे धंदे कुटुम्ब चालविणारा माणूस करीतच नाही असे १०१ टक्के प्रमेय असते का ?

मिपाकरांपैकी कोणाला सोसायटी दिमॉलिश बद्दल काही माहेते आए का? सोसायटी बिल्डरला देताना काय काळजी घ्यावी ई

मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे.तुमच्या तालुक्याची जी हौझिंग फेडरेशन आहे ती संपूर्ण मदत करते.आणि २०११/१३ साली आलेल्या बायलॅाजमध्ये पूर्ण नियमावली दिली आहे.

# कोणाला भाड्याने देता येत नाही: एखाद्या विरुद्ध फौजदारी खटला असेल तर नोंदणी केलेला करारसुद्धा अवैध ( invalid,nullify ) ठरतो आणि त्याला ताबडतोब जागा खाली करावी लागते.परंतू केवळ अविवाहित असणेवर केवळ अशक्य आहे.पूर्ण दिवाणी खटले कज्जाचा निर्णय आल्याशिवाय नाही.

मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे

जुणी ईमारत पाडून नविन बान्धायची आहे. ते बायलॉज वाचले आहेत. माझ्या माहीतीप्रमाण सोसायटीला बिल्डिंग रिनोवेशनला द्यायचे अधिकार आहेत. कोणी प्रत्यक्श ह्या प्रोसेसमधून गेले असतील तर माहीती पाहीजे आहे.
अर्थात माझा प्रश्न ह्या धाग्यावर चालत असेल तर. अन्यथा दूसरा घागा काढतो.

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2016 - 10:19 pm | श्रीरंग_जोशी

ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण कदाचित येथे लागू होईल.

ट्रेनच्या डब्यात खूप गर्दी असते. ट्रेन फलाटावर थांबली असता बाहेरून चढणार्‍यांचा प्रयत्न करणार्‍यांना आतले लोक प्रतिबंध करत असतात. त्यांचा विरोध मोडून काही लोक आत घुसण्यात यशस्वी ठरतात. आता आत आल्यावर ते बाहेरच्यांना मदत करण्याऐवजी आतल्या इतर लोकांप्रमाणे बाहेरच्यांना आत यायला प्रतिबंध करू लागतात.

आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.

मार्मिक गोडसे's picture

7 Mar 2016 - 10:56 pm | मार्मिक गोडसे

आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.

कायदा काय सांगतो ह्यावर चर्चा चालू होती. शेजारी कसा असावा ज्याचे खाणे, दिसणे... ई.. मुळे मी खुष होइल ह्यावर नव्हती.

श्रीरंग_जोशी's picture

7 Mar 2016 - 10:59 pm | श्रीरंग_जोशी

अवांतर विचार असा उल्लेख करायचा राहून गेला.