मी अजिबात घाबरत नाही....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
2 Mar 2016 - 9:01 am
गाभा: 

डिस्क्लेमर : हा धागा मुद्दाम काथ्या कुटायला काढला आहे.न घाबरणार्‍या लोकांनी, घाबरणार्‍या लोकांसाठी, न घाबरता काढलेला काथ्याकूट धागा....

हिंदी सिनेमे बघायला मी अजिबात घाबरत नाही,
पण ते १९८०च्या पुर्वी असतील ह्याची मात्र खात्री करतो.

मिपावर तासन-तास पडीक रहायला मी अजिबात घाबरत नाही.
पण घरातली सगळी कामे करायला कुणी तरी आहे ना, ह्याची मात्र खात्री करून घेतो.

बायकोच्या हातचा चहा प्यायला मी अजिबात घाबरत नाही.
पण त्या चहाला आल्याचा स्वाद आहे ना, हे मात्र एक घोट घेवून बघतो.

केरसूणीने झूरळ मारायला मी अजिबात घाबरत नाही,
बायकोपुढे शौर्य गाजवायला तेवढाच एक चानस असतो.

मित्रांबरोबर बियर प्यायला मी अजिबात घाबरत नाही.
पण त्याआधी बायको महिलामंडळात त्या आठवड्यात जावून आली आहे का, हे परत एकदा आठवून बघतो.

मोबाईलवर येणारे काही फोन घ्यायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी आपल्याकडे फावला वेळ बराच आहे ना, ह्याची पण खात्री करून घेतो.

स्वैपाकघरांत पदार्थ बनवायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी मी सगळे जिन्नस घरात आहेत का, हे मात्र नजरेखालून घालतो.

कुणालाही भेटतांना मी घाबरत नाही
पण त्याआधी त्या व्यक्तीला शिंगे नाहीत ना, हे मात्र बघून घेतो.

चित्रे काढायला मी घाबरत नाही.
आणि लगेच ते चित्र फाडून टाकायला पण घाबरत नाही.

मिपावर पहिला प्रतिसाद द्यायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी आय.डी. बॅन झाला तर दुसरा आय.डी. काढायचा बेत नक्की करतो.

मिपावर धागे काढायला आणि जिलब्या पाडायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी मी डायरी मात्र आणून ठेवतो.

तसा मी अज्जून बर्‍याच गोष्टींना घाबरत नाही.
पण बायको-मुलांच्या अपरोक्षच कॅमेराला हात लावायला लागतो.

दंतवैद्याकडे जायला मी अजिबात घाबरत नाही
पण त्याआधी घरात आइसक्रीम मात्र नक्कीच आणून ठेवतो.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

2 Mar 2016 - 9:06 am | चौकटराजा

मी कट्ट्याला जायला अजिबात घाबरत नाही पण
त्या कट्ट्याला डॉ म्हात्रेंसारखे शिराळशेटी हजर आहेत ना याची खात्री करून घेतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2016 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिराळशेटी म्हणजे काय हो ?

चौकटराजा's picture

2 Mar 2016 - 4:03 pm | चौकटराजा

चौथीत की पाचवीत मराठी पुस्तकात एक धडा होता. त्यात हे पात्र म्हणजे "शिराळशेट" ,. हे एक उमदे व उदार असे गृहस्थ
व्यवसायाने व्यापारी. त्यानी कठीण काळात ( बहुदा तीव्र दुश्काळात ) आपली गोदामे रिकामी करून गरजूना धान्य वाटले.
आता संदर्भ आपल्याला समजून येईल.मला वाटते नागपंचमीचा सण व शिराळशेट याचा काहीतरी संबंध आहे.

आदूबाळ's picture

2 Mar 2016 - 4:56 pm | आदूबाळ

त्याबदल्यात शिराळशेटना विजापूरचा राजा केलं, पण ते औट (साडेतीन) घटकेसाठी. त्यातही त्यांनी अनेक दानधर्माची कामं केली.

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा हे शिराळशेटचं गाव असं म्हणतात. तिथला नागपंचमीचा उत्सव प्रसिद्ध आहे. त्या उत्सवाचा आणि शिराळशेटचा काय संबंध आहे ते माहीत नाही, पण प्रत्यक्ष शिराळशेटचा उत्सव दगडूशेठ गणपतीपाशी केला जातो.

भुताखेतांनना मी आजिबात घाबरत नाहि, पण अंधारात बहिणीचा हात पकडायला विसरत। नाही.

प्रचेतस's picture

2 Mar 2016 - 9:17 am | प्रचेतस

=))

तुषार काळभोर's picture

2 Mar 2016 - 9:29 am | तुषार काळभोर

आपण नाय कोनाला घाबरत,
चाकू, तलवार, बंदूक, तोफ, रणगाडा..
पन त्या आधी ते कोणी हाताळत नाही ना, याची खात्री करून घ्यायला पण विसरत नाही!

मी मिपावर लिहायला घाबरत नाही पण प्रतिसाद द्यायला मात्र घाबरतो

नाखु's picture

2 Mar 2016 - 9:44 am | नाखु

आपण कुठेही जायला घाबरत नाही.
फक्त तिथे आधी कुणी नाहीना याची खात्री करून घेतो.

आपण प्रतीसाद द्यायला घाबरत नाही.
पण तो कुणाला समजणार नाही (असाच) लिहायचा हे कटाक्षाने पाळतो

आपण खाडे करायला घाबरत नाही.
पण इमानदारीत हजर राहून दाद द्यायलाही नक्कीच जातो !

मी कुणाच्याच लक्ष्यात रहात नाही.
पण म्हणून कुणाच्याही आठवणीतून (कधीही) वजा होणार नाही याची खात्री बाळगून राहतो.

जेपी टक्या आणि पैजारबुवांच्या प्रतीक्षेत

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 9:45 am | उगा काहितरीच

मी "लेख आवडला नाही." हे लिहायला घाबरत नाही...
पण त्याअगोदर हळूच लेखकाचे "मिपीय वय" जास्त नाही ना याची खात्री करून घेतो. ;-)

एक एकटा एकटाच's picture

2 Mar 2016 - 7:12 pm | एक एकटा एकटाच

हे मस्तय

नीलमोहर's picture

2 Mar 2016 - 10:06 am | नीलमोहर

मी विडंबन लिहायला अजिबातच घाबरत नाही,
मात्र मिपाकर आणि संमं पाठीशी असल्याची खात्री असल्याशिवाय पुढे जात नाही ;)

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 10:27 am | तर्राट जोकर

प्रस्थापित वा विस्थापित, कोणाचीही पिसं काढायला मी अजिबात घाबरत नाही...
त्याआधी आपल्या मुद्द्यांमधे पुरेसा दम आहे ना याची खात्री करुन घेतो.

हे सोडून कुणालाच घाबरत नाही. मिपाकरांना तर अजिबात नाही. घरच्या लोकांना आणि मित्रांना कुणी घाबरतो का?

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 10:58 am | उगा काहितरीच

देवाला घाबरायचे कारणच काय ? तो तर आपले कल्याणच करतो ना ? आणी मृत्यूला घाबरण्याचे कारणच काय ? पहा हेकाय सांगून गेलेत ते ! ;-)

बोका-ए-आझम's picture

2 Mar 2016 - 9:36 pm | बोका-ए-आझम

कधीकधी डोंबिवलीही करु शकतो. म्हणून तर त्याला घाबरायचं. (डोंबिवलीकरांनी ह.घ्या. मीही माजी डोंबिवलीकर आहे.)

असा सगळा प्रकार झाला तर मुवि

अजया's picture

2 Mar 2016 - 11:36 am | अजया

मी स्पांडुच्या अच्च झालं तर ला घाबरत नाही.
घाबरायला घाबरत नाही
डु आयडीमागे लपून प्रतिसाद फेकायला घाबरत नाही;)

बेकार तरुण's picture

2 Mar 2016 - 11:44 am | बेकार तरुण

मी मिपावरचे आस्तिक नास्तिक धागे उघडायला धजत नाही
पण ३० पैकी २० धागे तसलेच असतील तर मिपावर यायचाच कंटाळा येउ लागेल काय?

बेकारच आहात ना मग येऊ दे की कंटाळा. तेवढाच टाइमपास.
आम्ही प्रतिसाद द्यायला घाबरत नाही=))

बेकार तरुण's picture

2 Mar 2016 - 12:00 pm | बेकार तरुण

:)

मी मिपावर यायला घाबरत नाही. फक्त माझे डुप्लिकेट आयडी लॉग्ड इन आहेत का हे बघून घेते.
मी जेपीच्या संन्यासाच्या धमक्यांना घाबरत नाही. फक्त घरात मिर्‍या आहेत का हे बघून घेते.
मी राजकारणाच्या धाग्यावर लोकांना शिकवायला घाबरत नाही. फक्त लोकांच्या अकला काढणारे आयडी आलेत का हे बघून घेते.

नूतन सावंत's picture

2 Mar 2016 - 1:04 pm | नूतन सावंत

मी कोणालाही आवाज द्यायला घाबरत नाही,पण तो आवाज कोणत्या शब्दात दिला तर परिणाम होईल हे मात्र बघून घेते.

मी घाबरतो, हे कबूल करायला मी घाबरत नाही.

बाबा योगिराज's picture

2 Mar 2016 - 1:20 pm | बाबा योगिराज

आपन सुध्दा कुणालाच घाबरत नै, फक्त थोडी भीती वाटते कधी कधी.

माफ करा मित्रांनाे( मैत्रीणींनाे बराेबर नाही) मला रच्याक या शब्दाचा अर्थ सांगाल का

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 1:42 pm | उगा काहितरीच

रस्त्याच्या कडेने ! It is a MIPIY version of "by the way"!

धन्यवाद। इतके दिवस मी एखादा आयडी समजत हाेताे

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2016 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भिती ? काय असतं ते ???

पद्मावति's picture

2 Mar 2016 - 2:47 pm | पद्मावति

:) मस्तं!

सस्नेह's picture

2 Mar 2016 - 3:04 pm | सस्नेह

कुणीच्च घाबरत नाही हे वाचून आम्ही मात्र घाबल्लो आहोत =))

मी मिपा वरचे लेख वाचायला अजिबात घाबरत नाही .....................

फक्त लेख कोणी लिहीले आहेत ते पहायला मात्र विसरत नाही.

मी पयला प्रतिसाद द्यायला घाबरत नाही,पण लेख आधी वाचुन घेतो...

मी कोकणी बोलायला घाबरत नाही,पण समोरच्याला मालवणी समजते का पाहतो..

मी संपादक व्हायला पण घाबरत नाही,पण...............

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2016 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाला काय वाटेल याचा विचार करुन मी लिहित नाही.
आणि कोणाला काही वाटतही असलं तरी मी अजिबात घाबरत नै. :)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:07 pm | पिलीयन रायडर

मी ऑफिसातुन प्रतिसादच काय तर धागेही काढायला घाबरत नाही..... फक्त डॅमेजर आजुबाजुला नाही ना ते बघुन घेते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2016 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा काढाच तुम्ही. ( नै खरडफळा केला त्या धाग्याचा तर नावाचा प्रा.डॉ.नै.)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:11 pm | पिलीयन रायडर

ओ धागे काढते मी.. ते तसे काकु न जनातलं मनातलंवाला रतीब घालत नाही फक्त! उगं दोन चार काढले अस्तील झालं..

आपण प्रवासवर्णनं लिहीतो..!

आणि तुम्ही करा हो खफ माझ्या धाग्यांचा... फुल्ल दंगा करु आपण!!

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 5:14 pm | मुक्त विहारि

खरा मिपाकर, दंगा करायला अजिबात घाबरत नै.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:19 pm | पिलीयन रायडर

करेक्ट!!!

मी म्हणलं ना प्राडॉ.. दंग्याला घाबरायला मी काही नवमिपाकर नाही!!! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2016 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते तसे काकु न जनातलं मनातलंवाला रतीब घालत नाही

=))

आत कुठे तरी तुम्ही घाबरला आहात हे नक्की.
काढाच तुम्ही एक स्वच्छ, पारदर्शक, शुभ्र स्फटीकासारखा एक धागा जो
असेल जनातलं मनातलं. :)

-दिलीप बिरुटे
(पिराच्या मनातलं जनात यायची वाट पाहणारा) :)

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:21 pm | पिलीयन रायडर

रतीब घालायला स्किल लागतं.. धैर्य नाही डिबी!!

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 5:23 pm | पिलीयन रायडर

बादवे.. माझ्या क्वीन धाग्यात पुष्कळ दंगा झाला होता.. चक्क वामा पण झाला होता तो धागा!! (हौ लकी!!)
त्यामुळे ठरवुन धाग्यावर दंगा घालणे प्रकार काय असतो ते माहितिये हो!!

पण तुमच्यासाठी जरुर काढु हां एक काकु किंवा जनातलं वाला धागा!!

हे कधि झाल होत ?! आत्ता शोधतो ति लिंक

गौरी लेले's picture

2 Mar 2016 - 6:04 pm | गौरी लेले

धागा कळाला नाही .

नक्की काय चर्चा अपेक्षित आहे इथे ?

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 7:42 pm | मुक्त विहारि

इतपतच हा धागा मर्यादित आहे.

एक एकटा एकटाच's picture

2 Mar 2016 - 7:32 pm | एक एकटा एकटाच

मी मिपावर एकसलग मोठी कथा टाकायला घाबरत नाही.

फ़क्त वाचकांना ती कंटाळवाणी वाटणार नाही एव्हढी काळजी घेतो

भाऊंचे भाऊ's picture

3 Mar 2016 - 8:12 am | भाऊंचे भाऊ

बोलेतो घाबरतो म्हणून या धाग्याला आपला पास...