काल शिर्डीत होते, अगदि द्वारकामाईच्या अगदी बाजुलाच काश्मिरी हँडलुमचे दुकान होते, काश्मीर हँडलुम डेव्हलपमेंट एम्पोरीयम. विविध प्रकारचे काशिदा काढलेले ड्रेसमटेरीयल पाहुन त्या दुकानात गेल्या वाचुन राहवले नाही. एका मैत्रीणीने पश्मिना शाली बद्द्ला विचारताच दुकानदाराने माहीती द्यायला सुरुवात केली. कश्या प्रकारे चिगु / चिरु नावाच्या प्राण्यांच्या शरीरावरील लोकर कापुन ब्लँकेटस बनवतात आणि त्या स्कीम मधे ग्राहकांना वापरायला देतात. त्याने एक ब्लँकेट दाखवली जी कोणत्याही ऋतुमधे वापरता येते, फर वाला भाग थंडी मधे आणि उलट बाजुकडील भाग उन्हाळ्यात वापरता येउ शकतो, मग त्याने सांगितले की याची किंमत काहीतरी २० हजारु रुपयांच्या वर आहे पण काश्मिर सरकारने बायकांसाठी स्कीम काढली आहे त्यात फक्त या ब्लँकेट साठी १०,८०० भरायचे आहेत, २१ महीने वापरल्यावर ही ब्लँकेट आपल्याला सरकारला परत करायची आहे, तेव्हा जर आपण त्यांना नेउन दिली तर १००% पैसे परत आणि जर त्यांचा माणुस आपल्याकडे येउन घेउन गेला तर आपल्याला ७५% पैसे परत मिळतील. आणि याची किंमत लोकांना जास्त वाटते म्हणुन यासाठी ५ गिफ्त हॅम्पर्स सुद्धा मिळतील जे ग्राहकाला परत करायचे नाहीत. त्या हॅम्पर्स मधे , एक बेड कव्हर विथ बेड शीट , एक साडी , एक फरचा गालिचा त्याला त्याने (बुलबुल का बच्चा) असे काहीसे नाव सांगितले, एक पश्मिना शाल जी अशी विकत घ्यायला गेलो तर ५ हजारच्या वर किंमत होती.आणि एक आणखी ब्लँकेट होते वरुन काश्मिरसाठी फ्री टु मीळेल जी हे ब्लॅंकेट घेतल्याच्या १ वर्षानंतर पासुन ते ५ वर्षापर्यंत आपण कधीही अवेल करु शकतो. हे सगळे फक्त काश्मिर सरकारने बायकांसाठी स्कीम मधे दिले आहे असे तो सांगत होता. तसेच सरकार ती ब्लँकेट परत घेउन काय करेल तर आपण ती ब्लँकेट वापरल्याने आपल्या शरीराच्या उष्णते मुळे त्या फर वर गोळे तयार होतात त्या गोळ्यापासुन सरकारच्या हँडलुम डीपार्टमेंट कडुन १० पश्मिना शाली बनवण्यात येतील ज्यांची किंमत ४२ हजार असेल म्हणजे काश्मिर सरकारला कमीत कमी ४ लाखांचा फायदा म्हणुन अशी स्कीम काढलीये नाहीतर कोण असे फुकट देईल. आणि आता तुमच्या कडे १०८००/- नसतील तर १८००/- रु आता डीपोझिट भरा बाकीचे तुम्हाला या वस्तु घरपोच केल्यावर द्या. या वस्तु घरी आल्यावर तुमचा एक फोटो रीसिप्ट वर चिकटवा आमच्या रेफरन्स साठी. आणि त्याने एक रजिस्टर ही दाखवलं. आणि स्कीम कार्ड मधे अशा ५-६ वेगवेगळ्या स्कीम्स होत्या .आताच घ्या नंतर काश्मीर फ्री टुर मिळणार नाही असे तो दुकानदार सांगत होता. पण आम्ही काही याला बळी पडलो नाही आणि नंतर पाहु असे सांगुन निघालो.
आज काश्मिर हँडलुम डीपार्टमेंटची वेबसाईट चेक केली तर त्यात या फसवणुकिबद्दल उल्लेख होता.
साईट -http://www.jkhandloomdepartment.org/downloads/beware.pdf
हे वाचुन काल अज्जिब्बत या स्कीम वर विश्वास ठेवला नाही याचा खुपच आनंद झाला, मी स्वतः तरी अशा स्कीम्स वर कधीच विश्वास ठेवत नाही पण बाकीच्यांनीही फसु नये म्हणुन तातडीने धागा काढलाय.
प्रतिक्रिया
22 Feb 2016 - 7:33 pm | एस
हे इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
22 Feb 2016 - 7:41 pm | होबासराव
.
22 Feb 2016 - 8:23 pm | शलभ
ही स्किम मनालीला गेलो असताना ऐकली होती. खूप मागे लागले होते. काहीतरी कारण सांगून कटवले.
22 Feb 2016 - 8:56 pm | बाबा योगिराज
असलं पण कै असतय का?
22 Feb 2016 - 10:04 pm | मुक्त विहारि
"ह्या जगांत कुठल्याच गोष्टी फुकट मिळत नाहीत."
22 Feb 2016 - 10:08 pm | राजकुमार१२३४५६
खर तर चिंगु नावाचा कोणताच प्राणी नाही आहे. हे लोक तुम्हाला माउंट अबू, मनाली, जम्मू या ठिकाणी हमखास दिसतील. आणि प्रत्येक माणसाकडून ते वेग वेगळी रक्कम वसूल करतात. गुगल वरती चिंगु नाव टाईप केले तर तुम्हाला फसलेल्या लोकांची खूप मोठी यादी दिसेल आणि कॉमेंट पण.
22 Feb 2016 - 10:12 pm | तर्राट जोकर
उपयुक्त माहितीसाठी खुप धन्यवाद.
22 Feb 2016 - 10:12 pm | राजकुमार१२३४५६
http://www.bcmtouring.com/forums/threads/chingu-beware-of-this-fraud-or-...
22 Feb 2016 - 10:14 pm | अजया
दुनिया फसती है फसानेवाला चाहिए!
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.बर्याच वर्षापासून हा चिंगू फ्राॅड ऐकतीये.माझ्या ओळखीच्या एक डाॅक्टर बाई या स्कॅमला बळी पडल्या होत्या.पण त्या इक्वल फ्राॅड असल्याने जैसी करनी वैसी भरनी म्हणत आम्ही खूप हसलो होतो ते आठवलं लेख वाचून!
23 Feb 2016 - 11:10 am | काळा पहाड
डॉक्टर लोक फ्रॉड नसतात. ते "आनंदी" असतात.
23 Feb 2016 - 10:56 am | पैसा
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद! सरकारचे नाव घेऊन असले कायच्या काय लोकांच्या माथी कसे मारतात?