गाभा:
शांताबाई ...............
बाणूबाया ....../......
पोपट पिसाटला ............
नागाच्या पिल्लाला ..........
ही पोळी साजूक तुपातळी ....
जपून दांडा धार ...
आणि काय काय ?
तर.........
तुझ्या आयची ......?
हेच का ते मराठी फिल्म म्युजिक ?
श्रीनिवास खळे , सुधीर फडके , दत्ता डावजेकर ,जयवंत कुलकर्णी आणि इतर नामवंत दिग्गजांनी ज्या उंचीवर नेवून ठेवले होते ...
तो दर्जा ... तो लेवहल नक्की किती खाली आणावं याला काही मर्यादा ?
की फक्त डीजे मध्ये वाजते एवढीच गाण्याची पातळी?
दिङ्मूढ उ.ख.
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 8:29 pm | आनंदी गोपाळ
म्हणजे काय?
10 Feb 2016 - 8:39 pm | विजय पुरोहित
दिक् + मूढ
= कोणत्या दिशेला जावे हे न कळलेला असा मूळ अर्थ...
10 Feb 2016 - 8:42 pm | जेपी
तुमी "डोगंरावचा देव" आणी इतर पुर्ण करा..
10 Feb 2016 - 8:46 pm | विजय पुरोहित
करतो की राव...
टंकायचा लैच कंटाळा येऊन राहिलाय...
काय उपाय सुचवाल?
10 Feb 2016 - 8:50 pm | जेपी
टंकनिका मिळवा..
10 Feb 2016 - 8:30 pm | संदीप डांगे
तीस वर्षांआधी '३६ नॉनस्टॉप कोलीगीते' वाजायची लाउडस्पीकरच्या भोंग्यावर तेव्हाही हाच प्रश्न पडला होता.
साठ वर्षांआधी ............................................................................................ तेव्हाही हाच प्रश्न पडला होता.
10 Feb 2016 - 8:32 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्ही म्हणताय ती जातकुळी वेगळी आहे...
लोकांना भीमसेन जोशी पण आवडतात आणि मिका पण... काय करायचं बोला.....
10 Feb 2016 - 8:38 pm | विजय पुरोहित
सहमत...
उत्तम प्रतिसाद...
10 Feb 2016 - 9:00 pm | अभ्या..
मिकाच्या कविता आम्हाला पण आवडतात. ;)
10 Feb 2016 - 8:39 pm | जेपी
मराठीत लै चांगली गाणी येत आहेत..
काल का परवा खफ वर बोलो होतो..
बाकी तुमच्या मागच्या ध्याग्या परमाण तुमी काय आता इकड फिरकत नाय..
10 Feb 2016 - 8:45 pm | शब्दबम्बाळ
शांताबाई हे गाण मराठी "फिल्म म्युजिक" का काय ते, त्यात येत का नक्की?
रिक्षावाल्याला विसरल्याबद्दल णिशेध!!
10 Feb 2016 - 8:48 pm | विजय पुरोहित
काय पण म्हणा...
ही गाणी असतात मात्र जबरा...
पूर्वग्रह बाजूला ठेवून ऐकली तर त्यातला ठेका, लय, जोश सगळंच झकास...
10 Feb 2016 - 8:47 pm | _मनश्री_
आजही अनेक उत्कृष्ट गाणी येत आहेत ,
कट्यारची सगळी गाणी उत्तम होती ,
'काकण'च टायटल सॉन्ग
'कॉफी आणि बरच काही'मध्ये संजीव अभ्यंकरांच खूप सुंदर गाणं होत
'निळकंठ मास्तर'मधे 'श्रेया घोषाल च अतिशय सुरेल गाणं होत असो ...आत्ताच्या काळातल्या उत्तम गाण्यांचे यादी करायची ठरवली तर बरीच मोठी यादी होईल.
कौशल इनामदार,अजय -अतुल,निलेश मोहरीर यांच्यासारखे बरेच उत्तम संगीतकार उत्कृष्ट काम करताहेत .
11 Feb 2016 - 11:07 am | मराठी कथालेखक
+१
सोबती सख्या रे तू असा (गजर)
पाय कुठे चालले (गजर)
प्रेमात रंगूनिया (मी तुझी तुझीच रे)
घे सावरून मन हे (रिंगा रिंगा)
आणि गजेंद्र अहिरेच्या अनेक सिनेमातली अनेक गाणी अत्यंत मधूर असतात [जसे : सुंबरान, सरीवर सरी, निळकंठ मास्तर, बयो , दिवसें दिवस , पिपाणी ]
तुम्ही मराठी गाण्यांचे दर्दी असाल तर ही सुरेल गाणी नक्की ऐका. अजूनही खूप आहेत मी तुम्हाला सांगू शकेन.
अवांतर : दिवसें दिवस मधील खूप छान गाणे मी पुर्वी ई टीव्ही वर पाहीले होत. पण ते मला जालावर सापडत नाहीये, गाण्यांचे शब्दही आठवत नाहीत त्यामुळे फक्त सिनेमाच्या नावाने शोधावे लागत आहे. कुणी मदत करु शकेल काय ?
10 Feb 2016 - 8:50 pm | संदीप डांगे
माझ्याकडे आत्ता मनमंदिरा आणि शान्ताबाई बॅक्टूबॅक वाजतंय... पोरांना दोन्ही आवडतात. पोरं दोन्ही गाणी बेंबीच्या देठापासून ओरडून गातायत..
10 Feb 2016 - 8:54 pm | विजय पुरोहित
मस्तच डांगे अण्णा...
दोन्ही गोष्टीत उगाच कमीजास्त ठरवणे चुकीचे आहे...
दोन्हीचा आनंद घ्यावा...
11 Feb 2016 - 9:48 am | तुषार काळभोर
+१
10 Feb 2016 - 9:12 pm | चेक आणि मेट
असली गाणी पाहिजेत राव!
त्याशिवाय मज्जा नाय!
असली गाणी लागल्यावर मदिरा न पिऊनही पिल्यासारखी वाटते.....
10 Feb 2016 - 9:15 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 9:28 pm | अन्नू
बातमी न्युज वर दाखवली होती ही, खरं तर लाऊड डीजे वर सगळीकडे बंदी असताना मुद्दाम दादागिरी करत हे मंडळवाले सहा-सात डेक वर रचून कर्णकर्कश आवाजात गाणी लावतात, आणि पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, ही सर्वात वाईट गोष्ट आहे! :(
एका ठिकाणी तर भिंत कोसल्याचेही ऐकले होते!
10 Feb 2016 - 9:23 pm | अन्नू
कसली ती मिळमिळीत गाणी ऐकायची? त्यापेक्षा अशी दणकेबाज गाणी असायला पाहिजेत! ;)
आता हेच बघा-
एखाद्या प्रेयसीने- "ये ना सजना वाट तुझी पाहते मी" असं पायात खुट्या ठोकल्यासारखं एका जागेवर डोलत म्हणण्यापेक्षा समुद्रातुन धावत येऊन बेधडकपणे-
"हेS पप्पी दे- पप्पी दे पारुला!" म्हणल्यावर कसं मेंदूला दणका दिल्यागत वाटतं?
10 Feb 2016 - 9:25 pm | विजय पुरोहित
मस्तच... भाईंदरकर राॅक्स...
10 Feb 2016 - 10:00 pm | टवाळ कार्टा
तुम्च्या नात्यातले कोणी हॉस्पिटलमध्ये असताना अशी गाणी मोठ्याने लावली तरी चालेल ना?
10 Feb 2016 - 10:08 pm | अन्नू
टकाजी गाणी मोठ्याने लावायचे बोलत नाही आंम्ही, गाण्याच्या रचनेविषयी बोलतोय! :)
कारण भाईंदरला कधी गणपती विसर्जनाला यायचे झाले तर येऊन बघा,
अगदी गोल्डन नेस्टपासून सगळ्या गाड्या बंद केलेल्या असतात आणि खाडीवर तर डीजेचा इतका धींगाणा असतो कि डोकं उठायला लागतं!
10 Feb 2016 - 10:47 pm | टवाळ कार्टा
खिक्क...मग ठिकाय...मला वाटले अता हिथे पण दंगा =))
11 Feb 2016 - 12:44 am | उगा काहितरीच
५-१० मिनीटं मस्त वाटत डिजेमुळे नंतर त्रास होतो.
11 Feb 2016 - 8:43 am | मित्रहो
आपल्याला आवडतात बा. हे गाणारे किंवा संगीतकार कधी असा दावा करीत नाही की आमची गाणी श्रेष्ठ आहे, काहीतरी वेगळे आहे वगेरे.
11 Feb 2016 - 9:58 am | मदनबाण
डिजे बाबतीतचा मला आठवलेला"बलमा" अनुभव ! डिजेचा आत्ता पर्यंतचा माझा अनुभव त्रासदायकच आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
11 Feb 2016 - 2:31 pm | बॅटमॅन
गाणी कशीही असूद्यात पण डीजेवर ढॅण्टढॅण लावल्यावर कुठलेही गाणे थोड्या सेकंदांनंतर ऐकवणारच नाही. एखादे ग्याजेटच डेव्हलप केले पाहिजे जे ऑटोम्याटिक असले आवाज बंद पाडून टाकेल.
11 Feb 2016 - 2:50 pm | अन्नू
"एखादे ग्याजेटच डेव्हलप केले पाहिजे"
आहे नं- प्रत्येकाने हेडफोन कानात घालून फुल्ल आवाजात गाणे चालवावून त्यावर नाचावं. ;)
त्याने इतरांना त्रासही होणार नाही अन् आवाजही स्वतःच्याच कानापुरता मर्यादित राहील! =)) =))
12 Feb 2016 - 12:59 pm | बॅटमॅन
ते आहेच म्हणा. पण तितकं लक्ष कोण देणार? त्यापेक्षा असे एखादे छोटे मिसाईलच सोडून बंद केले पाहिजेत असले डीजे.
13 Feb 2016 - 12:00 am | भंकस बाबा
अनिल अवचट यांच्या कार्यरत या पुस्तकात देशपांडे या वल्लिविषयी माहिती देताना या गैजेटचा उल्लेख आहे.
रच्याकने पूर्ण पुस्तक वाचनीय आहे
11 Feb 2016 - 5:36 pm | भीमराव
डाव्या हाताने साडी वर करा.
जाऊदे झाडुन पिना काढुन,
झगा,
चिकट भेंडी,
सुन मेरे आमीना दिदि,
गुबु गुबु
या मामाच्या पोरीला
ह्यलोव मि बाबुराव बोलतोय,
जवा नवीन पोपट हा
डोकं फिरलया
तुझी घागर नळाला लाव
गण बाय मोगरा
लिंबु मला मारीला
काल रात्री या आंटीची
बंबु डालके
वाट माझी बघतोय रिक्षावाला
बिनमालकीच्या शेतामंदी .....
येवढीच गाणी आठवली बाकीची पन खुप सारी कडक गाणी आहेत, यातले गुबु गुबु वाजतय हे गाणे तर एकदम बेष्ट,
11 Feb 2016 - 7:53 pm | आदूबाळ
अभ्यासपूर्ण कलेक्षणसाठी धन्यवाद!
एक प्रश्नः द्वैर्थी कोळीगीतांचा आल्बम काही वर्षांपूर्वी ऐकला होता. खूप प्रयत्न करूनही त्यातल्या एकाही गाण्यातला एकही शब्द आठवत नाहीये. तुम्हाला असं काही असल्याचं माहीत आहे का?
12 Feb 2016 - 4:13 pm | सतीश कुडतरकर
आजकाल DJ वर वाजवल्या जाणाऱ्या गाण्याना बेंजोवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांची सर नाही. (वैम)
डोंबिवलीमध्येच स्थानिक गावकऱ्यासोबत लहानाचा मोठा झालो, त्यामुळे आगरी-कोळी गीतांबरोबरच सगळे सणवार साजरे केले आहेत.
रस्त्यावरून जाता जाता अशीच एखादी वरात/मिरवणूक आडवी जाते. बेंजोवर गाणी वाजवली जात आहेत.
डोंगराचे आडून इकबाई चांद उगवला, चांद उगवला नि चांदण्या बघावा निघाल्या
पोरी येरा केलास, मना पागल केलास, तुझे नादानी पोरी येरा केलास, तुझे नादानी
एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाये तुजी कोल्यांवरी
पारू गो पारू, वेसावचे पारू, वर आयले तुला वर आयले
वरातीतले/मिरवणुकीतले लोक जोश मध्ये नाचत आहेत, बेंजोवाल्यानाही जोर चढलाय. सोन्याने आणि फुलांनी मढलेल्या स्त्रियाही दिलखुलास नाचत आहेत.
डांबरी रस्ता समुद्राकाठच असल्यागत वाटतोय आणि अचानक कोणीतरी जाउन बेंजोवाल्याच्या कानात जाउन काहीतरी सांगतो आणि सुरु होते-
मी हाय कोली, सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी
बास, त्याक्षणी आपणही 'कोली' असल्यागतच जागेवरच त्याच्याबरोबर नाचायला लागतो.
12 Feb 2016 - 4:40 pm | गॅरी शोमन
ऑफीस मधे साहेबाची कीट कीट घरी आल तर बायकोची यावर एकच उपाय आवाज वाढव डीजे ...... तुझ्या आयची ......
12 Feb 2016 - 4:49 pm | सूड
हे गाणं आहे? नक्की?