गाभा:
निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?
निसर्गाने कोकणात आपले अनेक रंग ऊधळले आहेत. एवढ्या हिरव्यागार प्रदेशात पाण्याची कमतरता नक्कीच नसणार. शेतीची नक्की काय अवस्था आहे माहित नाही. बहुदा खडकाळ जमीनीवर शेती करता येत नसावी.
कोकणस्थांची रोजगार मिळवण्याची साधने कोणती?
किनारपट्टी लाभल्याने मासेमारी हा मुख्य व्यवसाय असावा. मात्र बोटींवर काही परराज्यातील तरुण आढळले.
आंबे फणस सुपारी यांचाही पारंपरिक व्यवसाय होत असावा.
कोकणातील बरेच तरुण नोकरीधंद्यानिम्मित्त पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थायिक झाले आहेत. कोकण हा म्हाताऱ्यांचा प्रदेश झाला आहे काय?
कोकणातील वाढत्या बेरोजगारी मागील कारणीमामांसा जाणून घेण्यास धागा काढण्यात आला आहे. ऐकीव माहिती मी वरती लिहीलेली आहेच. आपलेही मत जाणून घेण्यास उत्सुक.
चित्र यापेक्षा वेगळे असल्यास तेही स्पष्ट करा.
प्रतिक्रिया
7 Feb 2016 - 7:40 pm | जेपी
मी पयला.
(रोजगारी)जेपी
7 Feb 2016 - 8:21 pm | सुरवंट
मूळ कोकण निवासी सदस्यांनी याबाबत विस्तृत लिहावे ही विनंती .
7 Feb 2016 - 7:47 pm | पॉइंट ब्लँक
प्रश्न अर्धाच आहे. राहिलेला भाग - "ऱोजगारी आल्यावर कोकण निसर्गरम्य राहिल काय? "
कोकण बेरोजगार ठेवा असं सुचवायचं नाही आहे. पण प्रगती करायची म्हंटलं की त्याची किंमत मोजावी लागते. थोडक्यात आपल्या दुखांना अंत नाही.
7 Feb 2016 - 8:19 pm | सुरवंट
<<राहिलेला भाग - "ऱोजगारी आल्यावर कोकण निसर्गरम्य राहिल काय? ">>
हा पुढचा प्रश्न आहे आधी ' निसर्गरम्य कोकणात बेरोजगारी का?' यामागील कारणीमामांसा हवी आहे.
7 Feb 2016 - 8:58 pm | बोका-ए-आझम
पण पु.ल.देशपांड्यांचा एक किस्सा आठवला. त्यांना कोणीतरी कोकणातले सुतार काम का करत नाहीत असं विचारल्यावर ते मिस्किलपणे म्हणाले होते, " करवत नसेल."
(संदर्भ - कोट्याधीश पु.ल. - चतुरंग प्रतिष्ठान)
7 Feb 2016 - 9:01 pm | सतिश गावडे
=))
7 Feb 2016 - 9:49 pm | पैसा
पण कोंकणी स्वभावाला जागून विचारते. ही सगळी माहिती कशासाठी हवी आहे?
7 Feb 2016 - 10:08 pm | सुरवंट
आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेला विकायची आहे :(
;-)
(थोडेफार ज्ञानकण वेचायचे आहेत बाकी काही नाही :)
8 Feb 2016 - 11:46 am | sagarpdy
कोकणस्थ = कोकणात राहणारे कि सदाशिव पेठेत ? =))
8 Feb 2016 - 12:47 pm | खेडूत
तिथून कधीच क्यालिफोर्नियाला गेले अन तिकडेच कोकण केलाय म्हणतात!
मधे झी २४ तास वाहिनीवर सुवर्ण कोकण ही चांगली मालिका सहा महिने चालली होती. त्यावरून बेरोजगारी वगैरे असेल असं वाटत नाही...
9 Feb 2016 - 11:48 am | शरद
कोकणात बेरोजगारी ?
श्री.सुरववंट याना ही माहिती कुठे मिळाली ? आज कोकणात अशी परिस्थिती आहे की भाताची शेती करावयाला माणसे मिळत नाहीत. पोफळी-नारळ काढावयास माणसे नाहीत. आंब्यांच्या बागा राखावयाला परप्रांतीय माणसे आणावी लागतात. घरकामाला बाई-माणुस मिळवणे अवघड झाले आहे. पर्यटन उद्योगाला चांगला वाव आहे पण कामगार मिळणे अवघड झाल्याने बरेच जण तो विचार सोडून देतात.
याला माझ्या मते पुढील कारणे. पूर्वी भातशेतीची ३-४ महिन्यांची कामे सोडली तर तेथे कोणतीच कामे मिळत नव्हती. त्यामुळे माणसे आळशी झाली. ती स्वभावत: अल्पसंतुष्टही आहेत. रोज दोनशे रु. मिळत असतील तर २५ दिवव्स काम करून ५००० रु. मिळवण्याऐवजी दहा दिवसच काम करा व मिळणार्य़ा पैश्यात महिना भागवा हीच मनोवृत्ती. त्यात मायबाप सरकार दोन रु. किलोने ३५ किलो धान्य देते. कशाला काम करावयाचे ?
ही परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तलुक्याच्या भागातील, माझ्या माहितीची. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवावयाचा तर इतरही ठिकाणी फरक नाही.
शरद
9 Feb 2016 - 12:04 pm | सुबोध खरे
अगदी सत्य आहे. माझ्या मामेभावाने रेवदंड्याला आपली नारळी पोफळीची बाग विकून टाकली. कारण नारळ काढायला कोकणी माणूस मिळत नाही. फक्त शिरजोर मल्याळी माणसे उपलब्ध आहेत. वयामुळे त्याला त्यांच्या मागे जाणे जमत नाही. बाकी या पट्ट्य़ात बहुतांश माणसे पर्यटनाच्या व्यवसायात आहेत. नुसत्या घराच्या एक किंवा दोन खोल्या विकांताला भाड्याने दिल्या तरी फारसे कष्ट न करता पैसे मिळतात. दारू पार्टी करता मुंबईतून येणारी माणसे पैसे फेकायला तयार असतात. शिवाय सामिष जेवण बाहेरून( हॉटेलातून)आणून / उपलब्ध करून देता येते त्यामुळे बायका सुद्धा घरी "करण्याच्या" फंदात पडत नाहीत. असे जे लोक कष्टाळू आहेत त्यांनी भरपूर पैसा कमावला/ कमावत आहेत.
बाकी चिपळूण गुहागर कडे पण पर्यटन उद्योग किंवा आंब्याच्या बागांना माणसे मिळत नाहीत हि वस्तुस्थिती. तेथे हॉटेलात भय्ये आणी नेपाळी आहेत. नेपाळ्याना भारतीय ५००० रुपये नेपाळात पाठवले कि ८००० नेपाली रुपये होतात. त्यामुळे (त्त्यामानाने) कमी पैशात हि माणसे आनंदात काम करतात.आणी कोकणी माणसे बसून खातात.
कष्ट करण्याची तयारी असलेली माणसे मुंबईत आलेली आहेत किंवा तेथेच या व्यवसायात आहेत. आणी तेथे राहिलेली बाकी माणसे आळशी आणी ऐदी आहेत. त्यामुळे रोजगार उपलब्ध असला तरीही करण्याची तयारी नाही.
कोण म्हणतो बेकारी आहे?
9 Feb 2016 - 2:59 pm | मराठी कथालेखक
??
मराठी आणी इंग्रजीचा एकत्रित आकांत :)
9 Feb 2016 - 3:20 pm | sagarpdy
एकदम बरोबर. १० दिवस काम करायचं, बाकी वेळ पत्ते कुटायचे, जाकडी-झगडे करायचे/पहायचे, लाईफ एन्जॉय करायची असं आमचं तत्त्व आहे. (आम्ही लांजाचेच :P )
विनोदाचा भाग सोडा, पण कोकणात विविध कारणास्तव कारखानदारी व पर्यायाने नोकऱ्या (नियमित रोजगार) फार कमी, त्यामुळे बहुतेक लोक मुंबई-पुण्याकडे येउन नोकरी धरतात. कोकणात उरले आहेत ते आंबा-काजू बागायतदार, म्हातारी मंडळी, सरकारी नोकर. समुद्रकिनारच्या गावात मात्र पर्यटन व्यवसायामुळे मानसं आहेत. भातशेतीला माणसं मिळत नाहीत कारण तरुण मंडळी मुंबईत आहेत. म्हाताऱ्या माणसाना नांगर धरायला झेपत नाही (देवळाच अंगण करून घेणंही कठीण झालाय). हल्ली भात शेताचे हळूहळू काजू मळे होत आहेत, उन्हाळ्याचे ४ दिवस काम, बाकी वर्षभर आराम.
आशा आहे कि मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच होऊन कारखानदारी वाढावी आणि आहेत त्या माणसांना तरी नियमित रोजगार मिळावा.
9 Feb 2016 - 5:14 pm | पैसा
कितीही पैसे द्या. माणसं मिळत नाहीत. आले तर उपकार केल्यासारखे काम करतात. प्रामाणिकपणे काम करण्यापेक्षा मालकाला चुना कसा लावला याच्या गमजा ऐका नंतर. ज्यानी जमिनी सांभाळून ठेवल्यात त्यांच्या जमिनीत खोटेनाटे उपद्व्याप कोर्ट केसेस करून कूळ लावून जमीन हडप करणे हा मोठा धंदा झालाय. मामलेदार कचेरीतले लोक त्या हरामखोराना सगळी मदत करतात. मालक बाहेरगावी रहात असलेल्या लोकांच्या जमिनी लँड रेकॉर्डमधून या रिकामटेकड्याना दाखवणे, केससाठी पैसे पुरवणे इत्यादि.
गावात एक अख्खी वाडी आहे, त्याना सरकार इतके काही देते की पोटापाण्यासाठी काम करायची बिलकूल गरज नाही. पण म्हणून जास्तीचा वेळ काम करून जास्त पैसे मिळबतील किंवा शिकून शहाणे होतील, नाव नको. आजच काजूच्या बागेत कामाला ठेवलेल्याने आमच्या गैरहजेरीत गवताला आग लावून आणि मग हलगर्जीपणा करून ३५ झाडे होरपळल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी दिलीय. आता आधी सगळे टाकून तिकडे धावत जाणे भाग आहे.
झाडे लावा, वाढवा, खते घाला हे उपद्व्याप करून पैसे कोणाला नकोत. त्यापेक्षा दुसर्याने लावलेल्या झाडांच्या बिया चोरणे सोपे. येता जाता पाच एक किलो बिया उचलल्या की ५०० रुपयाची सोय झाली. मग ३/४ दिवस काही करायला नको. कहर म्हणजे आमच्या शेजारी ज्याची जमीन आहे तो त्याच्या झाडांना खते बिते घालत नाही. आम्ही घालतो. मग त्याला आयत्याच बिया मिळतात! फक्त गडगा ओलांडला की काम झाले. सकाळी संध्याकाळी आम्ही झाडाखाली जायला घाबरतो. साप बिप असतील म्हणून. या लोकांना कधीच साप चावत नाहीत. एकूण बियांपैकी ३० टक्के तरी चोरीला जातात. :(
आमचा गावही लांजा तालुक्यातच.
9 Feb 2016 - 3:54 pm | मंदार कात्रे
१००% सहमत
आमचे गाव रत्नागिरी कोल्हापूर हायवे वर ... रत्नागिरी पासून ३० किमी ... अगदी सेम सिच्युएशन आहे
9 Feb 2016 - 1:03 pm | काकासाहेब केंजळे
तसे नाही हो खरे साहेब,सुपिक जमीन नेहमी जेते किंवा जेनेटीकली सुपिरीअर लोक ताब्यात घेतात.अनेक नद्या घाटमाथ्यावर उगम पाऊन प.महाराष्ट्राक्डे वाहतात ,त्यामुळे नाशिकपासुन सांगलीपर्यंत सुपिक पट्टा आहे,माफक पाउस ,उत्तम हवामान यामुळे पुरातन काळापासुन जेनेटीकली सुपिरीअर व काँम्पीटीटीव लोकांनी हा भाग ताब्यात घेतला ,त्यामुळे उर्वरीत महाराष्ट्रात फक्त जेनेटीकली इन्फेरीअर लोकच राहीले,जे बुद्धी उद्यमशिलता यात सुमार होते व आजही राहीले.त्याचाच परिपाक म्हणून कोकण मराठवाडा मागास आहेत.
हेच तत्व युरोपला लागू होते ,तिथले हुशार ,रिस्कटेकर्स अमेरिकेत गेले व युरोपात सुमार लोक शिल्लक राहिले.त्यामुळे अमेरिका एकूण युरोपपेक्षाही प्रगत आहे.बेरोजगारीचा असा संबंध आहे.
9 Feb 2016 - 3:30 pm | sagarpdy
वाल्गुदस्वामिनी परवा टिळकांच काय वाक्य सांगितल हो विठाकाकांना ?
10 Feb 2016 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
काकेंसाहेब, धागा हजारप्रतिसादी करायला काडी टाकण्यासाठी आजकाल तुमचा काय रेट आहे ?! =)) ;)
9 Feb 2016 - 1:35 pm | कोंकणी माणूस
भरपूर काम हा ओ कोकणात … चार दिवस झाले माडाची अळी काढूक माणसा शोधतय गावनत नाय , दिवसाचे ३५०-४०० रुपये देयन. असली तर सांगा.
9 Feb 2016 - 3:21 pm | रघुनाथ.केरकर
compnya nastil koknat pan kaam khup aahe.... karun karrun sampat nahiy....
naal kadhuk manasa gavanat naay. naal soluk manasa naay, sadhya kalmanka paanimaruk sudha zilge gavanat naay.....
tumka berojgari khay deesali....
9 Feb 2016 - 5:42 pm | नन्दादीप
खैसुर्ले तुमि वो? अस्सल मालवनी बोलतास बाकी..
9 Feb 2016 - 3:56 pm | मंदार कात्रे
सध्या पुरुषाना ३०० तर महिलाना १५० रुपये मजुरी दिली जाते ... कारागीर (गवन्डी /सुतार )असेल तर ५००/- मिळते ... तरी ही कामाला माणसे मिळत नाहीत
9 Feb 2016 - 5:33 pm | नन्दादीप
नुकतेच मामाने घर बान्धले... ५००/- रोज... मोजून ५-६ माणसे... जास्त माणसच उपलब्ध होत नाहीत.
9 Feb 2016 - 5:53 pm | सतीश कुडतरकर
घरची धुणीभांडी करायला माणसे मिळत नाहीत म्हणून एव्हढा राग राग!
बेरोजगारी कोकणात??? मग नक्कीच आत्महत्यांचहि प्रमाण जास्त असावं.
9 Feb 2016 - 5:57 pm | चांदणे संदीप
इथे प्रतिसाद वाचून अचानक कोकणाबद्दल मनात कसेसेच व्हायला लागलेय कारण
१) "हिच्या गोवाला कोकण दाखवा" हे गाणे...
2) आमच्या गावाकडे रिकामटेकडे/आयतखाऊ मलातरी अपवादाने पहायला मिळाले. गावात गेलो तर सगळे बिझीच दिसतात शिवाय जे गावाकडून पुण्या-मुंबैला कामानिमित्त येऊन राहिलेत त्यांचाही कामात कोणी हात धरू शकत नाही - इंक्लूडिंग मी!! ;) वर आणि प्रामाणिकपणामध्ये तर आमच्या भागाने तर आख्ख्या भार्ताला..... नाही नाही, जगाला, कधीच मागे टाकलेय.
जास्त होत असलं तर येतो मी...चला!
:)
Sandy
9 Feb 2016 - 7:13 pm | यशोधरा
घोवाला.
9 Feb 2016 - 7:11 pm | आनन्दा
कोकणात काम नाही हा शोध लेखकाने कश्याच्या आधारावर लावला काही कळत नाही.
9 Feb 2016 - 9:24 pm | जेपी
अशी बेरोजगारी सर्वत्र पहायला मिळते.
आमच्या गावात मित्राच्या पानटपरी वर फुकट सुपारी घासत कितेक जण बसलेले असतात,पण काम करतो का विचारले की,तोंड वाकडे करतात..
10 Feb 2016 - 12:29 pm | नाखु
हे आयतोबा घराने(खोट्या प्रतिष्ठे भ्र्मातून)+भाऊबंदानी+गावाने+सरकारी योजनांनी आणि हो कधी-कधी आऱक्षणाने ही (घरातला एक सरकारी नोकरीत चिकटलाकी बाकीच्यांना अस्ले डोहाळे लागलेच म्हणून समजा, अगदी ताजे उदाहरण आहे)
यांना स्थल-प्रदेश-जात सापेक्षता नसते. कुठल्याही खेडेगावात जा दिसतीलच (वाघोली+खेडशिवापुर्+काम्शेत अश्या ठिकाणांना खेडेगाव म्हणून उदाहरण दिल्यास चिमणचा फाटा आहेच) खेडे गाव म्हणजे पाणी लांबून आणावे लागतेय आणि यष्टी फाट्यापर्यंतच येते (तिथुन गावाला फटफटी नाहीतर एम ८० चा भरोसा अश्याच गावांबाबत).
प्रत्यक्ष अनुभवी (नावालाच गांव असलेला) पांढरपेशा नाखु
10 Feb 2016 - 11:54 am | कोंकणी माणूस
एक गोष्ट मात्र हा, कि कोकणातलो झीलगो सरकारी नोकरीच्या तितकोसो मागे नाय, म्हणजे स्पर्धा परीक्षा MPSC वैगरेत, काय आपली भारती वैगरे असली तर मात्र Form भरतीत. आमच्याकडे पोर / पोरा (मुलगा /मुलगी ) हुशार निघाली कि डायरेक डॉक्टर नायतर Engineer. मग ती एकदा शिक्षणासाठी भायर पडली कि नोकरी घेवनच परत येतत. बाकी रवलेले सगळे बारीक सारीक धन्दो करतत. मगे ती शेती असो नायतर कॉम्पुटर क्लास असो.