ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
30 Jan 2016 - 8:02 pm
गाभा: 

नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.

माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.

आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.

ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 2:38 pm | टवाळ कार्टा

JD मध्ये ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 3:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

हा जेडी मधे नफीस चा टोस्ट बुचकळून खाल्ल्यासारखा प्रकार होईल तस्मात् आमचा तीव्र निषेध :D :D

हे नफीसचा टोस्ट हे कधीतरीचं प्रचंड रुटीनमधलं नाव वाटतंय पण तरीही नेमकं काय आणि कुठे मिळायचं हे मेमरी ताणताणूनही आठवेना.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 6:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

हे असतंय बघा गवि दादा नफीसचं टोस्ट

हो. बेकरीतले टोस्ट हे कळलं होतंच.

पण हेच्च ते..

द. महाराष्ट्र.. आठवलं..

सामान्य वाचक's picture

5 Feb 2016 - 2:43 pm | सामान्य वाचक

चा त बुडवून लै भारी असतात

हेमंत लाटकर's picture

31 Jan 2016 - 4:35 pm | हेमंत लाटकर

मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये.

दिबि, मग तुम्हाला प्रमाण कशासाठी पाहिजे.

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 5:29 pm | संदीप डांगे

भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.

त्या वाक्याच्या अगदी आधीच हे वाक्य आहे.

साती's picture

31 Jan 2016 - 6:12 pm | साती

प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे.
वय/ लिंग/ मानसिकता/ जन्मजात असणारी अल्कोहोलच्या विघटनाची क्षमता आणि इतर आजार यांवर हे अवलंबून आहे.
१. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी पिणे - लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत कमी प्या.
२. स्त्रियांनी पुरूषांपेक्षा कमी प्या- अल्कोहोलची युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने बरेच कमी पिता येते कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे.
३. मानसिकता- काही लोकांना दारू थोडीशी प्यायली तरी चढते. काहींना थोडीशी प्यायली तरी चढल्यासारखी 'वाटते'. काहींच्या मनात दारू पिल्याने अँटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी प्यावी.
४. जन्मजात असणारी अल्कोहोल विघटनाची क्षमता- काही लोकांच्या पेशींत अल्कोहोलचे विघटन जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू विघटनवाले अल्कोहोलच्या दीर्घ परिणामांन अजास्त बळी पडतात.
५. इतर आजार- लिव्हर, नर्वस सिस्टीम, हृदयविकार , ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांचे आजार असणार्‍यांनी शक्यतो कमीच दारू प्यावी. काही प्रकारच्या हृदयाच्या आजारांत वाईन उपयुक्त दिसत असली तरी ती प्यावीच असे काही नाही किंवा न पिल्याने काही त्रास होतो असेही नाही.

आता सर्वसाधारण आणि निरोगी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस ४ युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी अल्कोहोल प्यावे.
एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारणतः १० ग्रॅ अल्कोहोल म्हणजे एक पिंट बीअर किंवा १०० मिली वाईन किंवा २५-३० मिली रम/ व्हिस्की अश्या दारवा!
बरं त्याही आठवड्याला १४ युनिटपेक्षा कमी प्यावे अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी बिंजींग करणे हे तेवढीच अमाऊंट थोडे थोडे पिण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे.

माझ्याकडे येणार्‍या अर्थातच इतर आजारांनी त्रस्त असणार्‍या लोकांच्या मी 'लिव्हर फंक्शन टेस्टस करते. त्यात लिव्हरमधली काही एंझाईम्स विशेषतः गॅमा ग्लुटामील ट्रान्सफरेज लेवल बघून त्या रूग्णाला अल्कोहोलने होणारे लिवर डॅमेज होत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द अल्कोहोल टू हाफ किंवा कंप्लीटली स्टॉप असं सांगते.
दीर्घकाळ आणि बेसुमार पिणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा क्षय (अट्रोपी) न पिणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो.
अल्कोहोलमुळे होणारा हृदयाच्या स्नायूंचा क्षय ( अल्कोहोलिक कार्डीओमायोपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. अल्कोहोल पिणे याबरोबरच इतर शरीराचे पोषण व्यवस्थित नसणे हे त्याचे मुख्य कारण आहे.

आता ठरवा किती प्यायची ते!

मुक्त विहारि's picture

31 Jan 2016 - 7:30 pm | मुक्त विहारि

बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का?

स्वगत : अति दारू पिवून लिव्हर खराब होण्यापेक्षा, ते जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. लिव्हरची काळजी अधिक घेतली पाहिजे.हे सालं लिव्हर पण एकच असते. देवाने कमीतकमी ४-५ लिव्हर तरी द्यायला हवी होती.

तुम्ही चकण्यात लिव्हर मसाला किंवा लिव्हर फ्राय मागवत जा,त्यामुळे आपले लिव्हर चांगले राहण्यास मदत होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साती माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. ९० मी ली. काही हरकत नाही असे दिसते परन्तु भारतीय मानसिकता दिसते की थांबणे हा स्वभाव नाही. अजुन एक पेग, अजुन एक पेग आणि मग १८० एम् एल. होऊन जाते. आणि कोटा असा वाढत जातो.

डॉक्टर साती, माझे सासरे एक ९० मी ली घेतली की त्यांची शुगर लो होऊन जात असायची. अगदी मरणासन्न अवस्थेत जायचे मला म्हनायचं आहे की अल्कोहल शरीरात घेतल्यानंतर रक्तदाब वाढतो तशी शुगर कमी जास्त होते का ?

-दिलीप बिरुटे

अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं मोठं गंमतीचं आहे.
न पचणार्‍यांना किंवा लिवर /पँक्तियाचे आजार असणार्‍यांना / डायबेटीक्सना/ कुपोषित लोकांना अल्कोहोल अतीशय प्रमाणात इन्स्युलिन सिक्रीट करायला लावून रक्तातील साखर एकदम कमी करतं.
लोक अक्षरशः कोमात येतात. आणि शुगर सोल्यूशन (गुलकोज ;) ) लावल्यावर जादू झाल्यासारखे उठून बसतात. त्यावेळी पर्मनंट ब्रेन डॅमेज होऊ नये म्हणून गुलकोजच्या अगोदर एक हुशार डॉक्टर थायमिन नावाचे एक महत्त्वाचे व्हिटॅमिन अगोदर इंजेक्शनने टोचेल अर्थात.

बाकी दररोज भरपूर पिऊन मग अरबट चरबट किंवा दाबून खाणार्‍यांची ब्लड शुगर मात्र हळूहळू इन्स्युलीन सेन्सिटीविटी संपून वाढत जाते नी टाईप टू डायबेटीस देतो.
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरिरावर डिपेंड करतं असं दिसतं. डॉक्टर जमेल तसं धाग्यावर आरोग्याच्या सबंधी काही प्रश्न आले तर उत्तर जरुर लिहा. फ़ीस नाही पण थ्यांक्स डॉक्टर एवढं नक्की म्हणेन.

-दिलीप बिरुटे

साती's picture

31 Jan 2016 - 8:42 pm | साती

हो नक्कीच!

ह्या नात्याचा अंदाज होताच.

ह्याशिवाय

अल्कोहोल आणि मानसिक आरोग्य.

अल्कोहोल आणि व्यायाम

अल्कोहोल आणि योग-साधना

अल्कोहोल आणि दिनचर्या (दिनचर्या ====> आहार + विहार + निद्रा)

अल्कोहोल आणि कौटुंबिक समस्या

अशा बर्‍याच बाबी अल्कोहोल समवेत निगडीत असाव्यात.

असो,

आमचे बाबा महाराज म्हणतात, शांत चित्ताने, सुयोग्य व्यक्तीं बरोबर, योग्य त्या वेळेला आणि स्वतःच्या आरोग्याला योग्य ठरेल असा आहार ठेवत, सुरापान करत असाल तर आणि तरच, माफक प्रमाणात वारूणीच्या सानिध्यात रहावे.

वारूणी बरोबरचे आणि प्रेयसी बरोबरचे प्रणयाधारन, ह्यांचे नियम क्लिष्ट असले तरी, पाळावेच लागतात. "इति बाबा महाराजांचा , सुरापानातून आनंद हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १०वा,ओवी ४२०, पान ८४०."

नाखु's picture

1 Feb 2016 - 9:02 am | नाखु

दुर्घटना घटी.

बाबांची वचने काही प्रमाणात तरी खुली करावीत ही इच्छा असलेला

परात्पर शिष्य नाखु

एस's picture

31 Jan 2016 - 8:39 pm | एस

उत्तम माहिती.

कपिलमुनी's picture

2 Feb 2016 - 3:10 pm | कपिलमुनी

माहीतीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद !

मित्रहो's picture

31 Jan 2016 - 7:16 pm | मित्रहो

या गहन विषयावर तितक्याच गंभीरतेने चर्चा चाललेली आहे. मस्त प्रतिसाद येत आहेत.
मी ब्लॉगमधे फार पूर्वी काल्पनिक आणि सत्य असे मिश्रण असनारी गोष्ट लिहीली होती सुटण्याचे प्रयोग म्हणून. नोकरी लागेपर्यंत मदीरेच्या भव्य महालात आम्ही शिरलो नव्हतो. सुरवात केली ती डॉ. मल्ल्यांच्याच दुकानातून, मला आठवत रेग्युलर आणि प्रिमियम असे दोन भाग होते. ४५ रुपयाला बॉटल होती. किंगफिशर हा पक्षी असतो हे समजायला पोर शाळेत जावे लागले. मग ऑस्ट्रेलियन फॉस्टर्स पण आली. जपानी असाही आणि किरीन इकी बान. टोकीयोमधे बऱ्याच चौकात व्हेंडींग मशीन होत्या. बडवायझर वगेरे फार उशीरा आले आणि फार काळ टिकले नाही. टोकीयोत राइस वाइन होती साके. गरम पाण्यासोबत प्यावी लागायची. फारसी आवडली नाही. सोचू नावाची वाइन मात्र आवडली. ती तिथल्या चहासोबत प्यावी लागायची.
त्याच्या बाजूला दालन होते ते आपला स्वतःचा ठसा उमटवनाऱ्या Signature चे. मग antiquity वगेरे. काही वर्षांनी बरीच किर्ती ऐकलेल्या Chivas regal, Johnnie walker या मंडळीची ओळख झाली. त्यांनी हताश केले नाही. एका दर्दी मित्राने सांगितले काहीही न घालता प्यायचे परत तळाचा व्यास लहान असलेल्या ग्लासातून प्यायची म्हणजे ग्लासात जास्त राहत नाही. गोल्डन ड्रॉप काय असतो तेंव्हा कळले.
कुणीतरी Smirnoff वगेरेची ओळख करुन दिली. अगदी चार बॉटल वगेरे म्हणायच्या बरेच आधी. ही एक विचित्र असते. पिताना फारसे काही वाटत नाही पण अर्धा तासानंतर गंमत कळायला लागते. मागे एमिरिटस च्या फ्लाइटमधे grey goose पिण्यात आली आणि आम्ही तिच्या प्रेमात पडलो. पबमधे वगेरे टकीला आली.
बियर पिल्याने उगाचच पोट भरल्यासारखे वाटते. वय वाढतय. गाडी चाालवायची आहे. असली काहीकाही कारणे सांगून आम्ही बहुतेक साऱ्यांना हळूहळू फाटा दिला. ही अशी स्थितंतरे होत असताना ती लाल रंगाची फ्रांसमधली ललना सतत आमच्यासोबत होती. तिची रुपही विविध. त्यामुळे ती सोबतच राहीली. काही मल्याळी मित्रांकडची होम मेड वाइन पण पिली मस्त. तीची ती पांढऱ्या रंगाची बहीण मात्र फारसी आवडली नाही. तीच गत शँपेनची. आज कधी वोडका, किंवा वाइन यापलीकडे गाडी गेलीच तर ती जास्तीत जास्त मार्गरीटाला जाउन थांबते.
मूळ प्रश्न किती प्यावी, तर एकदा तरी इतकी नक्की प्यावी की होश न रहे. वर वैद्यकीय उत्तर आलेलेच आहे. मलाही एका डॉक्टरने सांगितले होते की रोज २०० मिली वाइन चालू शकते परंतु आज नाही म्हणून उद्या ४०० मिली अजिबात चालनार नाही.
पिण्याची गरज काय हा प्रश्न न पिणाऱ्यालाच पडतो पिणाऱ्याला नाही. .

मराठी कथालेखक's picture

31 Jan 2016 - 7:21 pm | मराठी कथालेखक

विस्की /स्कॉच प्रेमीनी काढलेला एखादा धागा आहे का ? नसल्यास मी काढावा का ?
मला वेगवेगळ्या विस्की/स्कॉच बद्दल, ते पिण्याच्या उत्तम पध्दतींबद्दल उहापोह करायला आवडेल.(उदा अमूक ब्रँड मध्ये सोडा चांगला वाटत असेल तर तमूक मध्ये पाणी वगैरे)
मी Mc Dowelll's No1 ने सुरुवात केली आणि बरीच वर्षे दुसरे काही फारसे आवडीने पिले नाही.
पण अलिकडे Blender's Pride , VAT69 , Ballantine Finest ई ची आवडू लागल्या. Ballantine Finest अगदी अलिकडे सापडली. पुर्वी Sprite वगैरे टाकून Quarter घ्यायचो. आता मुख्यत्वे पाणी, सोडा व बर्फ. आता बहूधा ९०-१२० ml पर्यंतच पितो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2016 - 7:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

काढ़ा आम्ही कंट्रीब्यूट करू स्वतः!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

चाणक्य's picture

1 Feb 2016 - 3:10 pm | चाणक्य

.

येउ द्याहो, अगदि माझ्या मनातले बोललात

भंकस बाबा's picture

31 Jan 2016 - 10:21 pm | भंकस बाबा

माझो रांग नंबर लागलो!
पण सातीचा प्रतिसाद आवडला.

चिगो's picture

31 Jan 2016 - 11:01 pm | चिगो

ह्यातला शेवटचा फोटो सर्व रसिकांसाठी.. (स्कॉचनी भरलेल्या क्रिस्टल ग्लासचा टॉप अँगल).. इएसाहेबांनी बरोबर ओळखलाय..

डॉक्टरसाहेबांनी शास्त्रशुद्ध ड्रिंक्स पिण्याबद्दल विचारलंय, ते फार माहीत नाही. पण कुठं आणि कुणासोबत पिताय, ह्यावर सगळं अवलंबून असते.. यारा-दोस्तांत, जे उलटी झाल्यावरपण सांभाळून घेतात, तिथं हात सैल सोडला तरी चालतो (अर्थात स्वतःच्या जबाबदारीवर). ऑफीशिअल पार्टीमध्ये नेहमीच माईल्ड, आणि माफक प्रमाणात घ्यावी.

मला स्कॉच/ रेड रम/ बिअर/ व्हाईट वाईन आवडते. रेड वाईन मला कडवट वाटते. व्होडका आणि व्हाईट रम मला फारच 'सिंथेटीक' टेस्टच्या वाटतात. इथे थंडी जास्त असल्याने स्कॉच/ रेड रम जास्त.. शिलाँगमध्ये काही लोक 'होममेड वाईन्स' बनवतात, वेगवेगळ्या फळांच्या/चवीच्या, त्यापण मस्त असतात.

मी जो नियम मुख्यतः पाळतो, तो म्हणजे मोकळ्यापोटी न पिण्याचा, आणि स्वस्तातली दारु न पिण्याचा. कित्येकदा चकनाच जास्त खाल्ला जातो.. त्यामुळे, स्प्राऊट्स/उकडलेले शेंगदाणे/चणे ह्यांची बारीक चिरलेला कांदा टाकून आणि लिंबू पिळून बनवलेला चकना/ किंवा उकडलेली अंडी बेष्ट..

मग, कधी जमवायची मैफील?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2016 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> मग, कधी जमवायची मैफील?
एक मिपा महाकट्टा करू. सर्वांनी ठरवा मी या मैफिलीत १००% असेन. अशा मित्रांच्या बैठकीत गप्पा रंगतात तेव्हा मैफिल चुकवणार नाही. :)

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

1 Feb 2016 - 9:57 am | संदीप डांगे

आम्ही पण सामील ह्या कटात... आयमीन कट्ट्यात...

मुक्त विहारि's picture

1 Feb 2016 - 10:07 am | मुक्त विहारि

+ १

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा

+१

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2016 - 3:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

चिगो नॉर्थ ईस्ट ला असता काय?

चिगो's picture

2 Feb 2016 - 6:34 pm | चिगो

हो, बापुसाहेब.. शिलाँगला आहे सध्या, मेघालयात..

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 12:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2016 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुनही माहितीपूर्ण आणि विविध ब्रांड्स पेय घेण्याच्या पद्धती ? भारतीय, पाश्चिमात्य पद्धती ?

''मास्तर केव्हाच मेला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा चाफा नको आणि मोगराही नको''

-दिलीप बिरुटे

'मास्तर केव्हाच मेला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा चाफा नको आणि मोगराही नको''

सर हे काये ओ? स्वगत???
कामून????

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 2:50 pm | शान्तिप्रिय

दारुबन्दीचा जहाल समर्थक या नात्याने मला असे लिहावेसे वाटते की
१. प्रत्येक प्रकारच्या दारुला अतिशय घाणेरडा वास येतो. वाइनला सुद्धा.
२. कुजलेल्या अन्नापासुन बनवलेले हे पेय कसे लोकप्रिय झाले कोण जाणे.
३. दारु पिणार्यां पैकी ९९% लोक दारूच्या आहारी जातात.
४. अतिशय थंडीत दारु पिल्यास माणूस जगू शकतो किंवा दारुने सर्दी बरी होते ही तद्दन मूर्ख मते
दारुचा धंदा करणार्यांनी दार्रुच्या प्रचारासाठी बनवली आहेत.

शक्यतो वाद विवादापासुन दूर रहाणारा मी
शान्तिप्रिय.

आनंदी गोपाळ's picture

6 Feb 2016 - 3:33 pm | आनंदी गोपाळ

१. अनेक प्रकारच्या चीज, ताक व दह्याला एक .... वास येतो. तसाच तो फसफसून वर आलेल्या इडली/डोसा बॅटरला, अथवा कुरड्यांसाठी भिजवलेल्या गव्हालाही येतो.
२. कुजलेल्या अन्नापासून बनवलेले हे पेय / खाद्य लोक कसे खातात कोण जाणे.
३. पाणी पिणार्‍यांपैकी १००% लोक पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत, इतक्या ते पाण्याच्या आहारी जातात.
४. दार्रूच्या प्रचारासाठी दार्रूचा धंदा करणार्‍यांनी बनवलेली क्यालेंडर्स अतीव प्रेक्षणीय असतात.

शक्यतो विवाद उकरून काढणारा मी
शांताप्रिय

शक्यतो विवाद उकरून काढणारा मी
शांताप्रिय

विवाद उकरताना एक त खाऊन टाकला की शांताप्रियच? :)

आनंदी गोपाळ's picture

6 Feb 2016 - 4:14 pm | आनंदी गोपाळ

त्यांची ती शान्ती. आमची शांता(बाई) ;)

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 2:53 pm | शान्तिप्रिय

दुरुस्ती:
वर शेवट्चा वाक्यात दारु हा शब्द चुकुन दार्रु असा लिहिला आहे.

वेल्लाभट's picture

1 Feb 2016 - 3:13 pm | वेल्लाभट

प्रमाणाबद्दल धागा होता. इथं तर मैफलच जमली !
:)

वेल्लाभट's picture

1 Feb 2016 - 3:15 pm | वेल्लाभट

एखादी पी-ज्ञान लेखमाला करा, संपादक मंडळ...
एक से एक लेख पडतील.

मोहनराव's picture

1 Feb 2016 - 4:21 pm | मोहनराव

चला मग कधी बसायचे?

हेमन्त वाघे's picture

1 Feb 2016 - 11:53 pm | हेमन्त वाघे

जर सिंगल माल्ट असेल
गाडी चालवायची नसेल
आणि जर माहोल असेल
तर
शांतपणे ऎकच १२० चा पेग बनवा ....होय १२०
मी सिंगल माल्ट बद्दल बोलतोय
सोडा नाही , पाणी नाही आणि बर्फ हि नाही

आणि तो पुरवा !!
बघा मज येईल
सिंगल माल्ट मध्ये काहीही घालणे म्हणजे तिचा अपमान आहे !

सुनील's picture

2 Feb 2016 - 8:29 am | सुनील

सिंगल माल्टच नव्हे तर, कुठलीही उत्तम प्रतीची स्कॉचदेखिल "नुसतीच" पिण्यात मजा आहे.

तशीच कोन्याकदेखिल!

एक जालीय गजलकार म्हणतात -

दारू नेहमी 'नीट'च प्यावी
भेसळ आम्हाला आवडत नाही!

अर्धवटराव's picture

2 Feb 2016 - 5:28 am | अर्धवटराव

'कितीही घेतली तरी आपण जागचं हालत' नाहि वगैरे प्रमाणबद्ध गोष्टी आपल्याला आवडतच नाहि. एकदम फुल्ल टाईट होत पर्यंत पिणं हे आमचं प्रमाण. साधारण २-३ बीअरने सुरुवात करावी. मग टकीलाचे ५-६ शॉट मारावे. त्यानंतर व्हिस्की/व्हॉडका सुरु करावी. सोडा, कोक, थंड पाणि... काय वाटेल ते घ्यावे. कोंबडीची टांग, अंडी, वेफर्स, काजु.... सगळं भरपूर असावं. अट एकच. आमचे टोळभैरव कंपू मैफीलीत असावे. शुक्रवार/शनिवार संध्याकाळी बैठक जमवावी. पहाटे ४/४:३० ला गुडनैट वगैरे न म्हणता आपसुक झोपी जावं. एकदम ८-१० तासानी सौ समोर रुमालाने हात बांधुन मिळेल ति शिक्षा भोगण्यास उभं राहावं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असाच एक मित्र मुंबईत आहे शिकत असतांना होस्टेलला पाण्याचा हौदाची भिंत कमरेवर पडली दोन्ही पाय असून नसून सारखेच सपोर्टर घेऊन चालतो.कमरेपासून खाली संवेदना गेल्या. सर आता आयुष्यभर फक्त आईसाठी जगायचं ठरलं. आई शिक्षिका सेवा निवृत. हा ऑनलाइन बुकिंग प्रवाशांच्या विविध प्रवास, हॉटेल बुक करतो एका जागेवर बसून. दिवस भराची कमाई दोस्त आणि त्याच्यासाठी. पहिल्यांदा नांदी म्हणून दोन स्ट्रांग बियर मग दोन रॉयल च्यालेंज आणि पुन्हा भैरवी दोन बियर. आणि मग रिक्षात बसून घरी जाणार. पण असला कोट़ा कामाचा नै. गप्पा करतो, शेरो शायरी, ग़जल / गाणं म्हणतो. फक्त सालं पहाट करतो पण वर्ष सहा महिन्यात त्याच्याशी गप्पा करायला आवडतं. पण आतून त्याच्याबद्दल खुप वाईट वाटत असतं. :(

-दिलीप बिरुटे

-

मित्रहो's picture

2 Feb 2016 - 8:16 am | मित्रहो

पिल्यावर उघडलेली रहस्ये आणि त्याचे किस्से

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण किती पिला होता हा मुद्दा सुटू द्यायचा नाही. आने दो किस्से.
आणि प्रमाण किती पाहिजे होतं हेही किश्याच्या शेवटी नुमूद करायचं. :)

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 8:40 am | कैलासवासी सोन्याबापु

ज्ञान सुरु

स्टीलच्या ग्लासात दारू पिणे म्हणजे

धबधब्याखाली रेनकोट घालुन उभे राहणे होय!

ज्ञान समाप्त

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 10:43 am | संदीप डांगे

हाण तिज्यायला... ;-)

शिस्तीत पिनार्‍याला हे ठिक आहे पण येळेला म्हणून चिनीमातीच्या बशीत पिलेले भाद्दर पण माहीतीयेत. एका ट्रीपमध्ये काहीच नसल्यामुळे गाडीचा टेललाईटमध्ये (आधीच ढिल्ला झालेला होता, धुवुन घेतला होता) पिणारा वीर पण माहीतीय.
इस्टीलच्या ग्लासात मात्र माप कळत नाही, लैच बल्ल्या होतो राव. आम्ही हॉस्टेललमध्ये असताना लॅबमधले बोरोसीलचे बीकर पळवून आणले होते. ;) त्याच्यावर लै परफेक्ट माप असते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 1:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्हाला सुद्धा ही ज्ञान प्राप्ती विद्यार्थीदशेत स्टीलच्या गिलास न दिलेल्या खो वरुन झाली आहे अभ्या भाऊ,

ग्लास वरुन एक किस्सा आठवला,

आमच्या एका दोस्ताला बार मधे ग्लास चोरायची सवय होती, एरवी चवलीपवलीची आचमने असत तेव्हा आम्ही ही सांभाळून घेत असू पण आउट व्हायच्या पार्टी मधे लोचे होत. एकदा असेच सायंकाळी साडे सात ला बसलो अन लास्ट ऑर्डर पर्यंत पितच बसलो होतो (माझ्या सिलेक्शनची पार्टी) साडे अकरा ला मागच्या गेट न बाहेर आलो ते कप्या गायब! मी माझा अन सिबिझेड चा तोल सावरत कसाबसा उभा होतो तितक्यात हा गड़ी लगबगीने आला , त्याच्या कड़े पाहता स्पॉन्डिलाइटिस झालेल्या माणसाने मानेला पट्टा लावतात तसा मान वर करून आला अन "चल बाप्या चल मार पाहु किक चल लवकर चल चल" सुरु केले ! मी पुर्ण बुंग झलेलो तसाच घेतला गाड़ीवर अन घरी . आल्यावर म्हणले कप्या तुला काय धाड़ भरली होती भाड्या? तर भाई ने प्रताप दाखवला, चार टेबल वरले १६ ग्लास एकात एक घालुन ती उतरंड शर्टाच्या आतून लपवून आणलेली लेकाच्याने!! हसावे का रडावे कळेना मला! सोबतचे अजुन दोघं अजुन बिलंदर! पाचव्या मित्राला फोन करून मंडई मधील प्यासा मधुन परत दारू मागवली अन त्या ग्लासेस चे उदघाटन करून रात्रभर परत पार्टी!!

अभ्या भाऊ, तू कदाचित असले कस्टमर पाहिले असतील बार मधे!!

अभ्या..'s picture

2 Feb 2016 - 1:14 pm | अभ्या..

असले लैच पाहिले बापूसाब.
डेली ३-४ तरी गायब असतात. साताठ खळ्ळ होतात. मार्केटमध्ये घ्यावेच लागतात कायम तरी कंपन्या देतात ग्लास वरचेवर म्हणून बरेय. ठेवणीत ठेवावे असे ग्लास म्हणले तर ब्लेंडर्स रिझर्वचे. मला स्मिर्नोफ चे बीकर स्टाइल उभे ग्लास लै आवडतेत. एक बॉक्स आहे काढलेला. आमचा तत्वज्ञानी मित्र आला की काढणारे वापरायला ;)

मी माझा अन सिबिझेड चा तोल सावरत कसाबसा उभा होतो तितक्यात हा गड़ी लगबगीने आला

मी पुर्ण बुंग झलेलो तसाच घेतला गाड़ीवर अन घरी .

हे पूर्णपणे टाळा अशी विनंती. ड्रायव्हिंग ..अजिबात नो नो.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2016 - 3:24 pm | पिलीयन रायडर

सोन्याबापु ही चिटींग आहे. तुम्ही म्हणलात की "इतकी" प्यायचीच नसते... आनी स्वत" बुंग होऊन गाडी चालवलीत. असं करु नकात हो..

म्हणजे आता करत नसालच..

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 3:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

सपशेल मान्य आहे मुद्दा!! जेव्हापासुन पिणे हे "नशा" सोडुन "रिलॅक्स" व्हायला सुरवात झाली तेव्हापासुन असले काही प्रताप केलेले नाहीत, अगदी विद्यार्थीदशेत सुद्धा क्वचितच असले काहीतरी करीत असू, वरती सांगितल्या प्रमाणे ५ वर्षे घासुन सेलेक्ट झाल्याची ती पार्टी होती म्हणून अंमळ जास्तच मोकाट सुटलो होतो!!

पण ती एक घोड़चुक होती

आधी कधी झाली असेल तीच शेवटची परत असली मस्ती केलेली नाही/ करणार ही नाही

:)

(जबाबदार झालेला) बाप्या

भाते's picture

2 Feb 2016 - 2:43 pm | भाते

चार सहा पेगनंतर काचेचा ग्लास फुटला आणि आयत्या वेळी स्टीलचा ग्लास नसल्याने दारू ढोसण्यासाठी करवंटी शोधणारे लोक बघितले आहेत. स्टीलच्या ग्लासातून माप कळत नाही हा आरोप चुकीचा आहे. पट्टीच्या पिणाऱ्याला बाटलीकडे बघुन पेग बरोबर भरला आहे का हे समजले पाहिजे. त्यासाठी काचेच्या ग्लासात बघायची काय गरज आहे?

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2016 - 12:10 pm | पिलीयन रायडर

एक प्रश्न

दारु पिल्यानंतर ती चढली की आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता..

ह्याची भीती वाटत नाही का?

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 12:18 pm | नीलमोहर

'दारु पिल्यानंतर ती चढली की आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही, एकंदरीत काय चाल्लय नक्की
हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता'

- यात असंबध्द बरळणं, विनाकारण हाहा हीही करणं, बेकार जोक मारणं, किंवा मग टोटल मौनव्रतात जाणं, इ. अ‍ॅड करा.
पिणार्‍यांची अशा परिस्थितीतील अवस्था पाहून करमणूक होणारी ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा एक मित्र एक नैंटी एम् एल पर्यन्त चांगल्या गप्पा मारतो ,आयुष्य, कटकट, जिन्दगी आणि मग हळु हळु ढुप होऊन जातो.

जेवतांना अरे राइस घे, अरे ग्रेव्ही घे, नुसता मानेने नकार होकार. बील पेड़ करतो किंवा जे शेअरिंग असेल तेही शांततेने देतो. निरोपाच्या वेळी मात्र गोड हसून गुड नाईट म्हणतो मला आवडतं त्याला कंपनी द्यायला.

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 12:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

इतकी प्यायचीच नसते तै!

जो तितकी पितो तो दर्दी नाही बेवड़ा असतो. There's a difference between connoisseur and chronic alcoholic people!!

जो स्कॉचच्या फ्यूमिंगचा आनंद घेऊ शकत नाही तो व्यर्थ पितो असे मत आहे आमचे

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 12:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

एवढी अवस्था होईपर्यंत कधीच घेत नाही हो चांगले पिणारे. वर बापूसाहेबांनी म्हंटले तसे दर्दी लोक जबाबदारीनेच घेतात.

नाही वाटत. ताळ्यावर राहायचा पण कंटाळा येतो कधीकधी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लास. जियो.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 12:36 pm | संदीप डांगे

हे फक्त दारूबद्दल नाही, प्रत्येक नशा देणार्‍या गोष्टीबद्दल (यात वस्तु, वास्तु, व्यक्ती, स्थावर, जंगम, सत्य, काल्पनिक) सगळंच आलं) आहे. ताळतंत्र सुटणे फक्त दारूत होतं असा गैरसमज आहे. बाकी बापुसाहेबांनी म्हटल्याप्रमाणेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही आम्ही पिलोय हे दाखवतात त्यामुळे काही ज़रा अति करतात. पण ताळतंत्र कोनाचं सुटत नाही. सालं बदनाम पिणारे झाले.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

2 Feb 2016 - 12:38 pm | अभ्या..

आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता..

काय सांगायचं पिराताई तुम्हाला. फक्त दारुनेच असे होत नाही हो. कित्येक लोक साध्या साध्या गोष्टीत ताळ सोडतात, परिस्थितीचे भान राहात नाही. अगदी आमच्या एका मित्राची बायको, भांडायला लागली की ताळ्यावर राहात नाही, परिस्थितीचे सोडा स्व्तःचे, स्वतःच्या नवर्‍याचे, मुलांचे पण भान राहात नाही. बाकी इतर वेळी अगदी नॉर्मल. बरेच लोक असतात हो असे. कुणाला वादाची नशा, कुणाला बुध्दीमत्तेची, कुणाला सौन्दर्याची तर कुणाला पैशाची. बच्चनसाह्यबांचं गाणं नाही का पाह्यलं? "नशा शराब मे होती तो नाचती बोतल"
;) भीती काय वाटायची त्यात?

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2016 - 1:25 pm | पिलीयन रायडर

आदुबाळ आणि तुमच्या बोलण्यात पण मुद्दा आहे हां..

ताळ्यावर रहायचाही कंटाळा येतोच की.. आणि दारु पिल्यावरच लोक डोक्यावर पडल्यासारखे वागतात असेही नाही..

मला दारूचे वावडे वगैरे काही नाही.. फक्त दारुचा वास बराच उग्र असतो.. आणि चवही..
त्यात नक्की काय न कसे एन्जॉय करायचे हे न कळल्याने प्रगती झाली नाही.. नाही तरी आम्ही पण मेगाबायटी प्रतिसाद दिले असते हो!! (म्हणुन समानता हवी.. ह्या गोष्टी का नाही शिकवत आम्हाला सुद्धा.. काय माहिती... ;) )

- दारुचा वास बराच उग्र असतो, लांबूनही सहन होत नाही. चव कशी असते ?
एवढे कौतुक करण्यासारखं काय असतं त्यात ?
दारूच्या थेंबालाही स्पर्श न केलेली, लांबून गंमत बघण्यात समाधान मानणारी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग उग्र वास आणि कडवटपनाचंही काही वाटत नाही असे म्हणतात. ड्रिंक्स करनं म्हणजे काय सोपं काम थोड़ी असतं :)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2016 - 2:34 pm | पिलीयन रायडर

मी थेंबालाही स्पर्श केला नाही कॅटेगरी नाहीये.. चव उग्रच असते.. नक्की का पित आहेत ते कळत नाही.. मला तरी काही हलकं.. किंवा रीलॅक्स इ वाटलं नाही..

कदाचित मी पुरेशी पिली नसेल ;)

नीलमोहर's picture

2 Feb 2016 - 2:45 pm | नीलमोहर

'हलकं.. किंवा रीलॅक्स इ वाटलं नाही..'
- तुम्ही ड्रग्ज वगैरे ट्राय केले का ? अगदीच गेलाबाजार झोपेच्या गोळ्या ?
हवेत तरंगत असल्याचा फील अशा गोष्टींनीही येतो म्हणतात ;)

'ड्रिंक्स करणं म्हणजे सोपं काम थोडी असतं'
- कठिण कामं करायचा किती तो सोस :)

अजया's picture

2 Feb 2016 - 4:35 pm | अजया

:)पिरा!

या निमित्ताने डीबी सरांच्या धाग्यावर जुनाट चोप्य पस्ते..:
.............

"साहेब कुठली ओतू?"

पटवर्धनच्या मोठ्ठ्या आवाजाने सगळ्या सोनेरी चंदेरी बाटल्या किणकिण हलल्या..

रॉयल चॅलेंज नाव छान वाटतं..पण त्याला आर सी म्हणायचं..
..
..

"नको हो आज पटवर्धन..मी काय पट्टीचा नव्हे हो..कशाला .. असू दे.. मी पेप्सी घेतो.."

"बसा हो.. घ्या..ए एक आर सी इकडे आणून ठेव रे.."
..
..

चला..पटवर्धन म्हणतोय एव्हढा मनापासून तर बसूया आज..
..
..

"पण स्मॉल बनवा हो.. मला ड्राइव्ह करायचंय.."

ग्लास भरला.. म्हणजे भरूनच आला.. आता त्यात किती ड्रिंक आणि किती सोडा कसं कळणार..??

घोट कडवट लागत होता..घसा आणि पोट गार गार जळालं.. पुढचा पेप्सी मधे घालूनच घ्यावा..

..

"अजून एक ओततोय बरं का साहेब.."

"आता बास् पटवर्धन..!!"

सालं आज काही खरं नाही.. हा आज ऐकत नाही.. एव्हढा एक गटागट पिऊन बास करायचं..

गटक गटक गटक..

"ए जगन्या..साहेबांचा ग्लास संपला की रिपीट करत जा.. विचारायचं नाही.."

अत्यंत खालच्या आवाजात पटवर्धन वेटरला बोलला..

मला काही ते नीट ऐकू आलं नाही.. जाउदे च्या मारी.. त्याची पार्टी आहे.. चालायचंच..

जगन्या.. म्हणजे जगन असणार.. अजूनही इतकी ओल्ड फॅशन्ड नावं ठेवतात? लहान दिसतो तसा..बालमजूर वाटतोय.. जाऊ दे..पोटाला तर मिळतंय ना त्याच्या..

तिसरा की दुसरा ग्लास आहे हा..? ग्लास म्हणायचं की पेग.. पेग बरं वाटतं.. देशी थोडीच आहे ही..

आता हा पटवर्धन "मराठी विरुद्ध अमराठी", किंवा एकदम "महाभारतातली द्रौपदी" असला काहीतरी विषय काढणार..

बरं असतं ड्रिंक्स सोबत..दोन तीन झाली की मग कुठलाही विषय मस्तच..

मस्तच.. मस्तच..मस्तच..

हे सालं कुठलं मधलंच गाणं लावलंय ?? ना धड दु:खी ना धड आनंदी..

एक तर गझल लावा किंवा मस्त अपटाऊन गर्लबिर्ल लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे..

हा चौथा की तिसरा ग्लास .. साला जगन सगळेच लार्ज भरत चाललाय वाटतं..

तो तरी काय करणार बिचारा.. पटवर्धनने ऑर्डर दिलीय ना..जाऊ दे भेंडी..

नुसते दाणे..?? चिजलींग तरी ठेवायची..

हाश्श्श....

"साहेब हळू सावकाश...!!" पटवर्धनचा आवाज कानात गूं करून घुसला..

अरे तिच्या मारी.. मी ग्लास जर्रा जोरात खाली ठेवला म्हणून लग्गेच..

"आय अॅम परफेक्टली अोक्के पटवर्धन!!.. एक सुरमई फ्राय सांगा लवकर"..

सुरमई.. सुरमई..

सुरमई शाम इस तरह आये..

भूक लागलीय तिच्या आयला...

सहावा की पाचवा ? की साडेचारावा ??

ग्लास आत्ता तर संपवला होता.. आपोआपच भरतोय.. नीट लक्ष ठेवलं पाहिजे..

लोक तरी किती आलेत पार्टीला..फ़ुकटचे खायला लगेच येतात लतकोडगे..

खाबू साले..खाबू खाबू खाबू ...

आत्ता चार पावलं फिरून आलं पाहिजे.. तरच मज्जा..

समोर जोश्या बसलाय.. त्याचा शर्ट वर गेलाय.. बाजरीच्या कणकेसारखं त्याचं पोट दिसतंय.. तरंगत जाऊन मस्त कणीक तिंबून काढावी का ??

का का का..
का का का..
कू कू कू..

अरे यार.. आपल्याच हाताच्या तळव्याकडे बघायला किती मजा येतेय.. वेडावाकडा हलतोय हात.. द्यावी का कोणाला ठेवून राप्पकन.. ?? धम्माल येईल.. लोक म्हणतील साहेबाला चढली.. त्याने तमाशा केला..

पण मला अजिबात चढत नाही हे त्यांना कोण पटवणार.. ??

शांत बसणं सेफ.. उगीच गैरसमज नको कोणाचा..

गैरसमज.. गैरसमज..बम बम..

आठवा ग्लास ?? काहीतरीच.. आपली एव्हढी कपॅसिटी नाहीच आहे..पाचवाच असेल फारतर..

पटवर्धन घेईल काळजी..

ही चायनीज चिंकी कधी आली.. चिकणी बनलीय एकदम..बेब..

हिचं सालं नावच विसरलो..

चिंकी.. चिंकी.. चिकणी.. चिकणी..

चिकन दिसतंय मख्खनवालं.. बुफे टेबलवर..

चिकन जाईल का आपल्याला आता.... पण पोट स्टफ झालंय..

अरे इतके ग्लास लिक्विड.. ****.. पोटाची काशी केलीत..

...

च्यायला.. आले आधार देऊन उठवायला वगैरे.. ज़रा दोन चार पेग घेतले की यांना वाटतं की टल्ली झाला..

मी काय त्यातला दिसतो काय..

मला उठवायला पटवर्धन कशाला.. चिंकीला तरी पाठवायचंत..

मी शांत आहे.. एकदम मस्त शांत..

किंचितही मरगळ नाही..एकदम फ्रेश..

मी उठून ड्राइव्ह करत मसणातही जाऊ शकतो..

मरगळ मरगळ..बरगळ बरगळ..

मळमळ मळमळ ..

काहीतरी यमक जुळतंय ..

मी उठून लिफ्ट पर्यंत सरळ चालत आलो तरी कुणाला पत्ताच नाही..

मस्त उत्तम भिकार फकीरचंद मूड..

जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे..

टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले..

...

मागे पटवर्धन अत्यंत हलक्या आवाजात कोणालातरी सांगतोय..

"साहेबांचं हे मस्त आहे.. कितीही प्यायले तरी एकदम सोबर माणूस..!!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लास ! आवडलं. मस्त.

''मास्तर केव्हाच मेला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा चाफा नको आणि मोगराही नको''

-दिलीप पटवर्धन ;)

एक तर गझल लावा किंवा मस्त अपटाऊन गर्लबिर्ल लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे..

1 नं. ह ह पु झा

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 1:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

२०० झाले

अभिनंदन सर! भरू का एक लार्ज? :D

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 1:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

अहो हपिसे आज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2016 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आईस आणि तळलेले पापड पण लागतील. हॉटेल मधे चखना म्हणून कुरडाया देतात का तिकडे ?

-दिलीप बिरुटे

एकच उत्तर " ओकू नये एवढा असावा"
ओकार पब्लीक डोक्याला ताप असता.

बाय द वे ,
आमचा एक जाणकार मित्र सांगतो , पार्टीच्या आधी ओमेझ किंवा पॅन डी टॅबलेट घ्यावी त्रास होत नाही.

खखोदेजा

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2016 - 4:29 pm | टवाळ कार्टा

वकार युनुस म्हणतात त्यांना :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 4:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

कश्याला आमेज़ अन पॅन-डी चे प्रयोग करावे म्हणतो मी , हिमालया ड्रग कंपनी ने पार्टी स्मार्ट कॅप्सुल काढल्या आहेत ती एक घ्यायची वक्का वक्का पण नाय अन दूसरे दिवशी हैंगओवर पण नाही होत अजिबात!

(मुळ मुद्दा हा की वक्का वक्का इतकी पिऊच नये)

तरीही, कोणाचा वक्का वक्का चा ट्रॅक रेकॉर्ड असल्यास अन पार्टीचा रंग बेरंग करायचा नसल्यास ही ती गोळी बघा

.

अजया's picture

2 Feb 2016 - 4:46 pm | अजया

बापरे! काय तो व्यासंग!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 5:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

हॉस्टल लाइफ जिंदाबाद!!!

सुबोध खरे's picture

2 Feb 2016 - 8:24 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
हे PARTISMART जे दावे करत आहेत कि त्यामुळे अल्कोहोल किंवा अल्डीहाईड डी हायड्रोजनेज विकराची पातळी वाढवते ते जर खरं असेल तर आपल्याला नशा येण्यासाठी जास्त दारू प्यावी लागेल. कारण प्यायलेली दारू यकृतात विघटन पटकन केली जाईल. त्यामुळे पुढच्या वेळेस फाजील अत्न्विश्वासाने आपण जास्त दारू प्याल आणी आपले हसे होईल. बाकी त्यांनी केलेले दावे आणी प्रत्यक्ष पुरावा यांचा मेळ बसताना दिसत नाही.
असो
Party Smart
Ingredients: Party smart contains a smorgasbord of herbal (read: ineffective) ingredients that prevent the buildup of acetaldehyde in the liver—which is produced by the partial oxidation of ethanol and is the cause of hangovers.
The Morning After: "Caution: PartySmart will not prevent intoxication and is not intended to treat or prevent the consequences of excessive alcohol consumption.” This is actually on the back of the Party Smart package. So, you really can't call them out for false advertising. Needless to say, second time was not a charm. There's nothing charming about emailing your work friends and telling them you're going to be penning articles from your bed as you're curled up in a fetal position.
Conclusion: PartySmart forces you to be smart in the way that you party, because herbal remedies don't work.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 9:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापरे! हे असे असते तर!! मी कधीतरी खच्चुन पार्टी होणार असे दिसले की ही गोळी घेत असे , लिमिट कधी क्रॉस केली नाही किंवा तसा निग्रह असला तरी! अर्थात ओकायचे झालेच कधी तर शिस्तीत वॉशरूम ला जाऊन फ्रेश होऊन येत असे (असे जास्त वेळ झालेच नाही) कारण दारू मजा पुरती बरी धतिंग नको हा हिशेब असे पण २-३ वेळ प्यायलोय ओकेपर्यंत! :D

अर्थात नोकरीत आल्यापासुन पिण्याला सुद्धा एक वेगळी डिसिप्लीन आली आहे! अन सुदैवाने पार्टी स्मार्टची गरज पडेल अश्या पार्टी आजकाल करायची इच्छा होत नाही अन पटत ही नाही!

तरीही शास्त्रोक्त माहीती करीता अनेक धन्यवाद

सुबोध खरे's picture

2 Feb 2016 - 8:15 pm | सुबोध खरे

ओकारी हा शरीराची संरक्षक प्रितीक्षिप्त क्रिया( PROTECTIVE REFLEX) आहे. पोटात कोणतेही विषारी द्रव्य गेले तर शरीर ते बाहेर टाकण्यासाठी ओकारी करते. आपण जेंव्हा दारू प्रमाणापेक्षा जास्त पितो(दारूचे यकृतात विघटन होण्याच्या क्षमतेपेक्षा) तेंव्हा आपले शरीर "अति सर्वत्र वर्जयेत" या उक्ती प्रमाणे( अति मीठ किंवा साखर खाल्ली तरी शरीर उलटी करते) जास्त झालेली दारू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. यासाठी उलटी होऊ नये म्हणून घेण्याची औषधे (पॅन डी मधील डी- DOMPERIDONE हा घटक ) घेतली तर काय होईल हा विचार करून पहा.
राहिली गोष्ट ओमेझ (OMEPRAZOLE) किंवा पॅन भाग ( PANTOPRAZOL) हे जठरात दारूने दाह झाल्याने तयार होणारे आम्ल कमी करते.
(पायावर किंवा हातावर झालेल्या जखमेवर दारू ओतून पहा कसे जळजळते ते)
मुळात जठराचा दाह होण्य़ा इतकी दारू आपण प्यावीच का हा एक मूळ प्रश्न आहे? (कारण हा दाह जठराच्या कर्करोगाला आमंत्रण देतो तो भाग वेगळा)
जठराचा दाह होतो किंवा उलटी येत आहे याचा अर्थच आपण प्रमाणापेक्षा जास्त दारू पीत आहात आणी आता आपल्या जठरात गरजेपेक्षा जास्त दारू "साठली" आहे. म्हणजेच काही काळाने हीच दारू आपल्या रक्तात शोषली जाऊन आपण टाईट होणार आहात.या वेळेस आपला ग्लास धरून ठेवला( (HOLDING YOUR DRINKS) तर आपली नशा कमी होणार नाही पण आपण टाईट पण होणार नाही.
आपल्या जठराने दिलेले संकेत दुर्लक्ष करायचे कि नाही हे स्वतः ठरवणे आवश्यक आहे. शरीर संकेत देत आहे कि जास्त झाली आहे आणी मित्र आग्रह करीत आहेत. यात आपण अजून दारू पिता याचा अर्थ आपल्या मेंदू आणी विचारशक्तीवरील ताबा दुसर्याकडे गेलेला आहे.
याचा सरळ अर्थ असा आहे कि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा आपली दारू कमी करणे आवश्यक आहे.
मग आपण टाईट होई पर्यंत दारू प्यायची आहे का मजेसाठी हा मूळ प्रश्न उभा राहतो. ज्या वेळेस आपल्याला ओकारी होत आहे किंवा जठराचा दाह होत आहे त्या वेळेस आपण आपला ग्लास नुसता हातात धरायला( प्यायला नव्हे) शिकायला पाहिजे. हे होत नसेल तर उगाच माझा स्वतः वर पूर्ण ताबा असतो या वल्गना करू नयेत.
राहिली गोष्ट दारू ज्याने त्याने आपल्या पैशाने लायकी आणी मगदुराप्रमाणे प्यावी.
या धाग्याच्या सुरुवातीला दिलेल्या दुव्यात अगोदरच्या धाग्यात केलेला उहापोह आहेच.

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 8:34 pm | संदीप डांगे

पूर्ण प्रतिसादाशी संपूर्ण सहमत. __/\__

ओकारी वाईट नाही. चांगलीच असते शरीरासाठी. पिण्याचं प्रमाण कळू न शकणार्‍याला लोक हसतात, पिणार्‍याला वाटतं ओकारीला हसतात. बिचारी ओकारी बदनाम.

चिगो's picture

5 Feb 2016 - 1:59 pm | चिगो

ओकण्याइतपत पिऊ नये, हा शहाणपणा.. पण मुद्दाम 'मद्यधुंद' होईपर्यंत प्यायलातच (मी एक-दोनदा असं ठरवून टल्ली होईपर्यंत प्यायलो होतओ.. स्वतःला तपासून बघायची खाज आहे मला.. ), तर गपगुमान ओकून टाकावं.. शरीराचं प्रोटेक्शन मेकॅनिझ्म आहे ते..

अवांतर : मी तरी कधी बेक्कार अ‍ॅसिडीटी झाली तर 'वमन पद्धती'चाच वापर करतो..

नाव आडनाव's picture

2 Feb 2016 - 3:29 pm | नाव आडनाव

दारू एक जहाल विष आहे,
.
दारू एक जहाल विष आहे,
.
.
.
चला आपण सगळे घोट-घोट पिऊन ते संपवून टाकू एकदाचं :)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

2 Feb 2016 - 10:36 pm | मम्बाजी सर्वज्ञ

https://www.youtube.com/watch?v=lT67w4_Uqz4

आत्ता बोला.................

साती's picture

4 Feb 2016 - 8:29 am | साती
साती's picture

4 Feb 2016 - 8:30 am | साती
साती's picture

4 Feb 2016 - 8:32 am | साती
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2016 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणता ज्योक.

-दिलीप बिरुटे

हेमंत लाटकर's picture

4 Feb 2016 - 10:47 pm | हेमंत लाटकर

प्रमाण कितीही घेतले तरी शरीराला अपायकारकच. कमी घेतली तर ६० जास्रत घेतली तर ४० ला राम नाम सत्य.

हेमन्त वाघे's picture

5 Feb 2016 - 7:52 am | हेमन्त वाघे

http://content.time.com/time/magazine/article/0,9171,2017200,00.html

http://www.cracked.com/article_20142_5-seemingly-harmful-things-that-mak...

हेला आपली बुद्धिमत्ता आपल्या नावाप्रमाणेच आहे का?

हे बेवडे इतके कसे जगले ?

१ फ्रांक सिनात्रा - ८३ वर्षे
२ चर्चिल ८९ varshe
३ राजेश खांना - ७० वर्षे
४ खुशवंत सिंघ ९९ वर्षे
५ दिन मार्टिन ७८ वर्षे
६ Ulysses S. Grant ६३ वर्षे

हेमंत लाटकर's picture

5 Feb 2016 - 9:15 am | हेमंत लाटकर

त्यांची जीवनशैली वेगळी होती. वय मागे पुढे होऊ शकते. ते बेवडे नव्हते गटारात पडणारे. वा पिणार्यांना साजेसे उदाहरम दिले आहे. पिणे काही मर्दपणा नव्हे.

अंवातर: लिहताना भाषा चांगली वापरावी वाघे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2016 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण काका सर्वच पिणारे गटारात थोड़ी पडतात पिणा-यांबददलही आदराने बोललं पाहिजे असं नाही का वाटत ? आता मर्दपणाही विषय आणि व्यक्तिपरत्वे बदलतो असे नाही का वाटत ?

-दिलीप बिरुटे

हेमन्त वाघे's picture

5 Feb 2016 - 10:14 am | हेमन्त वाघे

हेला ६० ची डेड लाइन तुम्ही दिली होती ....

त्याचप्रमाणे तुम्ही मी दिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत ( ते इंग्रजी भाषेत आहेत ) तुम्हाला एखाद वेळी माहित नसेल पण टाईम हे एक फार मोठे आणि प्रतिष्टीत नियतकालिक आहे ( तुम्हाला तो अमेरिकेचा संध्यानंद वाटला का? )

तसेच वरील यादीत खुशवंत सिंघ सोडून बाकी सर्व जबरदस्त पिणारे होते ... आपल्याला गुगळे हि सीते माहित आहे की ? त्यात वरील पैकी कोणाचेही नाव आणि ड्रिंकिंग असे लिहिल्यास बरीच माहिती मिळेल . ( इंग्रजी भाषेत )

सुनील's picture

5 Feb 2016 - 10:18 am | सुनील

म्हणजेच गूगल ही साइट!!

बाकी चालू द्या..आम्ही वाचतोयच.. (आज शुक्रवार!!!)

यशोधरा's picture

6 Feb 2016 - 4:23 am | यशोधरा

गुगळे हि सीते म्हणजेच गूगल ही साइट!! >> =))

एस's picture

7 Feb 2016 - 11:50 am | एस

मला वाटलं की 'सिंहीण' इकडेपण आली की काय!

सुबोध खरे's picture

5 Feb 2016 - 10:20 am | सुबोध खरे

वाघे साहेब
असे एक दोन नावानी काय होणार?
या नात्याने मोरारजी देसाई सुद्धा ९९ वर्षे जगले म्हणून सर्वांनी शिवांबू प्यायला पाहिजे असे म्हणावे लागेल.
असे "समर्थन" देण्याची गरज नाही.
बाकी अमुक इतकी एम एल दारू वाईट आणी अमुक तितकी चांगली याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.

उगा काहितरीच's picture

7 Feb 2016 - 12:55 am | उगा काहितरीच

काहीही म्हणा पण या धाग्यावरील प्रतिक्रिया पुन्हा वाचतानाही मज्जा येतेय . नुसता दारूच्या उल्लेखाने मज्जा येत असेल तर कदाचित पिल्यानेही मज्जा येत असावी . ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच एका एका वाचक मिपाकराने छायाचित्र पाठवलं आणि म्हटलं की प्रमाण इतकं असावं. साला आज रविवार साधुन दुपारीच बसला आहे. सोबत गझल असली पाहिजे म्हणुन मी त्याला 'जीस दिन के साजन बिछडे है ' लाव म्हटलं. :)
IMG_20160206_163138

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

7 Feb 2016 - 11:46 am | सतिश गावडे

वाह.. कसला बेत जमवला आहे पठ्ठयाने. याला म्हणतात जगणं !!!

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Feb 2016 - 11:46 am | लॉरी टांगटूंगकर

Jack
जॅक आत्ता नाही, थोडं कामात आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं आहे.

-दिलीप बिरुटे
(बीझी)

काकासाहेब केंजळे's picture

7 Feb 2016 - 12:00 pm | काकासाहेब केंजळे

मला स्वतःला दारुमध्ये बिअरची चव त्यातल्या त्यात बरी वाटते ,विस्कि, रम वगैरे प्रकार अत्यंत कडवट व नंतर हॅंगओवर देणारे असतात.एकदा हातभट्टीची दारु पिल्यानंतर माझे घरही मला सापडत न्हवते,एकाने घरी नेऊन सोडला.नंतर बापाने दोन कानाखाली ठेउन दिल्या.इथे परदेशी दारु नावे सांगून फुशारक्या मारणार्यांनी एकदा हातभट्टीची पिऊन दाखवावीच,,शंभर मीटर चालोत्सोवर गटारात पडतील याची खात्री आहे.

तर्राट जोकर's picture

7 Feb 2016 - 7:26 pm | तर्राट जोकर

सगळा हुच्चभ्रूंचा, हुच्चवारुण्यांचा क्लब हाय इथं जमलेला. आपला देशी ठर्र्र्याबद्दल कोणच नाय बोलत. पौव्वा, चपटी, गिलास १० रुपये, किदर है? ताडी, माडी, मोहाची, पैल्या धारंची, बांधावरच्या अनधि़कृत गाळणारांची, कै आठवन तर असु द्या हो हुच्च्च्वारुणीय.... काकासाहेब बोल्ला तो इतं आलो.

वामन देशमुख's picture

9 Feb 2016 - 3:52 pm | वामन देशमुख

माझेही दोन प्रश्न :

व्हिस्की (

  1. किंवा इतर कोणतेही मद्य) नीट (पाणी किंवा इतर द्रव घालून विरल न करता) पिण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
  2. हिप फ्लास्क मध्ये नीट व्हिस्की घालावी की तिच्यातपाणी वगैरे घालून पातळ करून घालावी?
  3. विस्कळीतपणाबद्धल क्षमस्व.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2016 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाणकार मदत करतीलच !

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 5:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

Hip Flask

च्यामारी. हे पाहिले की कानात द गूड द बॅड द अग्लीचे मुझिक वाजायला लागते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 5:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

१. ह्याचे वैद्यकीय उत्तर जाणकार देऊदेत पण सामान्यतः फायदे अन तोटे आपल्या कोट्यावर अवलंबून असतील असे वाटते

२.माझ्या माहीती प्रमाणे फ्लास्क मधे सामान्यतः ब्रांडी किंवा जिन भरली जाते, क्वचित् प्रसंगी डार्क रम ह्यातील ब्रांडी अन रम कोरा घोट मारल्यास कानसुले गरम करणारे प्रकार असतात तस्मात् अन फ्लास्क ची कैरिंग कैपेसिटी पाहता dilute मदिरा फ्लास्क मधे भरण्यात काही हशील नसावा असे वाटते, क्वार्टर जरी फ्लास्क मधे मावत असली तरी dilute केल्यावर ९० कशीबशी मावल अन इतकी कमी सोबत बाळगण्यात काही पॉइंट असेलसे वाटत नाही, अर्थात हे मी अंदाजे अदमासे सांगतोय हो! मला फ्लास्क वापरायचा अनुभव नाही

अगम्य's picture

10 Feb 2016 - 10:01 am | अगम्य

सोन्याबापुंनी व्यवस्थित सांगितले आहे. स्वानुभवाची पुस्ती माझ्याकडून.

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2016 - 8:52 pm | आनंदी गोपाळ

प्राण म्हणजे तेच आपले हिंदी पिच्चरमधले व्हिलन. हा फ्लास प्राणसाहेबांना पाहूनच माहिती झालाय. अन दुसरी ती व्हिस्कीच्या ग्लासात चिरुटाची राख झाडून हलवून पिण्याची कन्सेप्ट. कुठला पिच्चर ते विचारू नका.

तर, या फ्लास्कमधे दारू भरणारे लोक, अट्टल असतात. त्यांना पाणी घालून पातळ करून घातलेल्या दारवा 'पुरणार' नाहीत.

यात दारू कोणती भरावी याबद्दल वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. "नीट" पिता येईल अशी कोणतीही दारू भरता येते. व्हिस्की : स्कॉच किंवा बर्बन कोणतीही. ब्रॅंडी, रम, गेला बाजार लिक्युअर देखिल भरून आणलेली पाहिली आहे.

पण ह्यात वाईन किंवा बियर भरायचा बालिशपणा चुकूनही करू नये.

चवीने प्यायची असेल, तर टेस्टी काँबो करता येतात.

व्होडका भरायची असेल, तर तिच्यात फ्लेवरसाठी आवडीचं सरबत. ७ औंसाचा फ्लास्क असेल, तर १ औंस पिनाकोलाडा अन उरलेले ६ औंस = १ क्वार्टर (१८० मिली) अ‍ॅब्सोल्यूट. हे मिक्स्चर. पिनाकोलाडाऐवजी रसना, किंवा वाळ्याचं सरबत किंवा अगदी रूहअफझाही चालेल ;_) पसंद अपनी अपनी.

मी स्वतः ६ औंस बकार्डी प्लस ३ औंस मालिबू हे काँबो वापरतो. एकदम मस्त लागतं. माझा फ्लास्क ९ औंसाचा (दीड क्वार्टर साईज) आहे.

यातून दारू पिण्याचे फायदे म्हणजे हवा तेव्हा हवा तिथे रिचार्ज मारता येतो. बाटली फुटत नाही. "मागच्या" खिशात व्यवस्थीत मावते. प्रवासात चांगला पडतो हिप फ्लास्क.

तोटा म्हणजे गाऽर वगैरे करता येत नाही. अन भरण्यासाठी मेझरिंग सिलिंडर किंवा तत्सम व फनेल नसेल, तर हमखास दारू सांडते. घोर पातक ;)

राजाभाऊ's picture

10 Feb 2016 - 11:32 pm | राजाभाऊ

पोर्टेबिलिटी हा सगळ्यात मोठ्ठा अ‍ॅडवांटेज, फ्लास्कचा. फॉलमध्ये, प्रत्येक फेअरवेवर सिंगल माल्टचे मारलेले दोन घोट स्वर्गिय आनंद देतात.

आणि खरा शोकिन सिगारची राख स्कॉच मध्ये टाकत नाहि तर सिगारचं टोक (शिलगावलेलें नाहि) स्कॉच मध्ये बुडवुन झुरका घेतो. सिगार क्युबन अस्ली तर उत्त्तम... ;)

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 12:38 am | उगा काहितरीच

आणि खरा शोकिन सिगारची राख स्कॉच मध्ये टाकत नाहि तर सिगारचं टोक (शिलगावलेलें नाहि) स्कॉच मध्ये बुडवुन झुरका घेतो. सिगार क्युबन अस्ली तर उत्त्तम... ;)

काय तो व्यासंग ! बाबौ !!

व्हय जी.

चिरुटाचा प्रकार म्हणजे धुरापेक्षा चावून तंबाकू खाण्याचा मजा जास्त अशी गम्मत असते. स्पेशल आधीच दारूत भिजवलेल्या तंबाखूच्या पानांचाही सिगार मिळतो.

अवांतरः

सिगार/चिरुट/पाइप वि. सिगारेट, विडी यांच्यात तंबाकू 'कुजवण्याचा' फरक असतो. चहाची पाने जशी विशिष्ट प्रकारे कुजवतात तशी तंबाखू प्रोसेस् केली जाते. त्यामुळे सिगारेट / विडी यातील आयोनाईज्ड निकोटीन धुरातून रक्तात घेण्यासाठी जास्त मोठ्या (सरफेस एरिया) पृष्ठभागाची गरज लागते. ज्यासाठी हा धूर छातीत घ्यावा लागतो. सिगार/चिरुटचा धूर फक्त तोंडात घेऊन बाहेर सोडला तरी पुरेसे असते.

प्राध्यापक बिरुटे यांनी मनापासून हा धागा काढलेला आहे. अगदी बारकाईने ते नजर ठेवून आहेत. सोन्याबापूंचे प्रतिसाद मनापासून आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2016 - 12:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो, याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल यांचा अजिबात विचार करत नाही.

आपला ब्रांड आणि प्रमाण नाही सांगितलं तुम्ही. बाकी, कौतुकाबद्द्ल आभारी आहे. मिपावर लिहित राहा. :)

हम तो बनेही तबाह होने के लिए थे...!
उसका मिलना तो इक बहाना था..!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

11 Feb 2016 - 12:44 am | अभ्या..

आमच्यात पोरं पोरं बसली की कुणी एक उत्साही खंबा गलासात ओतायचा जिम्मा घ्यायचा. त्याने पुरती ओतायच्या आत कुणाचा तरी आवाज घुमायचाच. "मापात खोट त्याच्या बापात खोट" बिचारा तीन्तीनदा बघून ओतायचा.
.
असले काही लिक्योर कोट्स नाहीत का कुणाकडं?

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 12:57 am | उगा काहितरीच

आमच्या काही महाभागांचे व्हिडीओ आहेत. अशक्य डिक्शनरी असते . पब्लिकली नाही सांगता येत . ;-)

चेक आणि मेट's picture

10 Feb 2016 - 2:05 pm | चेक आणि मेट

छे ....
"हातभट्टीतली पिऊन गटारीत लोळण्यात जी मज्जा हाय,ती कशातच नाय."
असे एक बेवडा म्हणत होता ओ.

उगा काहितरीच's picture

11 Feb 2016 - 12:44 am | उगा काहितरीच

जो जे वांछील तो ते लाहो ...