देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा

आकाश कंदील's picture
आकाश कंदील in काथ्याकूट
29 Jan 2016 - 4:20 pm
गाभा: 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल. मी यावर जालावर शोधाशोध केल्यावर मला "http://indiatoday.intoday.in/story/who-freed-india-gandhi-or-bose/1/5798..." हा दुवा मिळाला. आणि हे सर्व वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचा खूपच मोठा वाटा आहे आणी त्याप्रमाणात त्याची योग्य नोंद न घेवून इतिहास लिहिणार्यांनी त्यांच्यावर थोडाफार जास्तच अन्याय केला आहे.

NDTV च्या International Agenda कार्यक्रमात एक गोष्ट कळली, कि ज्या ब्रिटीश पंतप्रधानांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंधर्भात कागदावर सही केली त्यांना ह्या निर्णयावर यायला नेताजीच्या "आजाद हिंद सेनेनी, त्यांच्या सैनिकांनी आणी इग्रज अधिपत्याखालील त्यांच्या सैनिक-बंधूनी " भाग पाडले होते. आणी हे सर्व स्वतः ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते. परिस्थिती अशी झाली होती कि जर त्यावेळी इग्रजानि स्वात्यंत्र दिले नसते तर खूप मोठा सैनिकी उठाव झाला असता आणि तो १८५७ पेक्षा मोठा आणि जास्त शिस्थबद्ध झाला असता आणि त्या वेळी इग्रज सैन्य अजून एक गृह-युद्ध टाळू इच्छित होते. बाकी सर्व वरील दुव्यावर जास्त विस्ताराने दिले आहे म्हणून मी ते सर्व परत लिहित बसत नाही. पण मला मिसळ पाव या संकेत स्थळावरील दिग्गज लोकांचे विचार/मते वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

29 Jan 2016 - 4:40 pm | तुषार काळभोर

की ३००+?

सनईचौघडा's picture

29 Jan 2016 - 4:48 pm | सनईचौघडा

अरे वा सध्या पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जोरात आहे. तो थोड्याच दिवसात लक्षाधीश होणार तर.

अत्रन्गि पाउस's picture

29 Jan 2016 - 4:53 pm | अत्रन्गि पाउस

३०० + साठी शुभेच्छा

महासंग्राम's picture

29 Jan 2016 - 4:58 pm | महासंग्राम

स्वातंत्र्य मिळवण्यात वाटा कोणाचाही असो, पण ते मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यात आपला वाटा किती हा गहन प्रश्न आहेच

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 5:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

+१११२२२२३३३४४४५५५६६६७७७८८८९९९

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 5:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही पटियाला पेग बनवला अन चिनारभाऊ न खंबाच् तोंडी लावला बापा!!!

होबासराव's picture

29 Jan 2016 - 5:47 pm | होबासराव

अबे गयाले भोक पडन ना.. पानी टाकत जा ना बे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2016 - 6:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

इकळे थंड लै पड़ते ना! अटी कोरेच लागते काम!!

अस्वस्थामा's picture

29 Jan 2016 - 4:58 pm | अस्वस्थामा

पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जोरात आहे

सहमत..

पॉपकॉर्नचा गाडाच लावतोय. ;)

अजया's picture

29 Jan 2016 - 4:59 pm | अजया

काय काय धागे यायलेत.मी एजन्सीच घेते पाॅपकाॅर्नची.

झालं …आता इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून सुरवात होणार ते पार मोदी ,केजरीवाल सगळ्यांचा उद्धार होणार. पुरोगामी येणार ,प्रतिगामी येणार… नुसतेच गामी येणार …बिग्रेडी येणार…. सहिष्णूता येणार…असहिष्णूता येणार… गांधी -नेहरू येणार…त्यांचे नातवंड येणार…. आणीबाणी येणार…
लय म्हंजे लयच मजा येणार …

पगला गजोधर's picture

29 Jan 2016 - 6:57 pm | पगला गजोधर

c

भंकस बाबा's picture

29 Jan 2016 - 5:14 pm | भंकस बाबा

धाग्यातली हवा काढून टाकायला टपलित सारी मंडळी! पहले सात प्रतिसाद तगड़ी ओढ़ताहेत धागावाल्याची!

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 5:19 pm | उगा काहितरीच

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा

दोघांचाही ! या दोघांशिवाय अजून काही लाख जणांचाही होता. कुणाचा किती टक्के होता हे कॕलकुलेट करता येणार नाही. विषय संपला !

माहितगार's picture

29 Jan 2016 - 5:25 pm | माहितगार

विषय संपला !

उगा तुमच्या धाग्यावरचा पॉपकॉर्नचा धंदा बसू नये म्हणून येथला विषय संपवण्याची घाई आहे का ? बिचार्‍या स्टार्टपांना चालू द्याकी जरा ;)

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 5:55 pm | उगा काहितरीच

ओके ओके चालू द्या ! इथे आम्ही पण प्रेक्षक मग. उगाच बॅटिंग करायला लावू नका ;-)
-(बॕटिंग करून दमलेला) उका.

अद्द्या's picture

29 Jan 2016 - 5:23 pm | अद्द्या

मागे कोणी तरी कुठल्या तरी धाग्यावर म्हणालं होतं .

आजकाल दंगा घालावे असे धागेच येत नाहीयेत . .

घ्या.. एका आठवड्यात इतके धागे आलेत कि कुठे किती दंग कराल आता. .

(पोपकोर्न च्या भरपूर गाड्या लागलेत . मी वडापाव वीकेन.. घेणार काय कोण ? )

ज्याचा वाटा असेल त्याला काय इस्टेट वगैरे मिळणार आहे का काय?

माहितगार's picture

29 Jan 2016 - 5:28 pm | माहितगार

लॉsल तसं नसतं त्यांच्या नावाने राजकारण यशस्वीपणे करू शकणार्‍यांना इस्टेटी गवसतात, धागा काढणारे आणि प्रतिसाद देणार्‍यांना फकस्त व्हर्च्युअल पॉ.कॉ. मिळते.

ह्म्म.. मग हे झाड काय कामाचं नाय. चला सगळे, दुसरीकडे जाऊ.

अस्मादिक हे 'दिग्गज' लोकांमध्ये मोडत नसल्याने आमची मते कशी काय मांडणार?

माहितगार's picture

29 Jan 2016 - 6:26 pm | माहितगार

एस हे आतापासून दिग्गज मिपाकर असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे

हे "तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस, कोंबडी म्हणून वाढलीस, पण आजपासून तो बटाटा आहेस" या वाक्याच्याअ चालीवर वाचायचे का?

तुषार काळभोर's picture

29 Jan 2016 - 6:19 pm | तुषार काळभोर

g

बोका-ए-आझम's picture

29 Jan 2016 - 6:40 pm | बोका-ए-आझम

आम्ही बोका असल्यामुळे आम्हीही यात येत नाही. तस्मात पास.

तुषार काळभोर's picture

29 Jan 2016 - 6:43 pm | तुषार काळभोर

जव्हेरगंजदादा

आदूबाळ's picture

29 Jan 2016 - 8:05 pm | आदूबाळ

आणि मी बाळ असल्याने सवालच उद्भवत नाही.

नाखु's picture

30 Jan 2016 - 8:52 am | नाखु

आणि खुळ्या लोकांचा नाद कुण्णीच करत नाही.

सबब नो गणती नो पणती..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2016 - 10:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी स्पॅरो असल्याने काही संबंधचं येत नाही.

छ्या फार काही पेटलाच नाहीये इथे धागा. आमची पिंक सावरकर वगैरे लोकांचे काय. जरा आरएसएस आणि हिंदू महासभा ह्यावर पण होवून जावू द्यात.

चांदणे संदीप's picture

29 Jan 2016 - 7:09 pm | चांदणे संदीप

कस काय सुचत राव लोकांना ट्यार्पि वाले धागे काढायला...मी पण काढणार आता...म्हणजे माझी तशी महत्वाकांक्षा आहे...!

=)) =))

Sandy

भंकस बाबा's picture

29 Jan 2016 - 7:24 pm | भंकस बाबा

बायकाना स्वयंपाक वेग्गेरे येत नाही म्हणुन लिहा, मिपा बायका छप्पर फाडके टीआरपी देतील.
हे माझे मत नाही मिपा बायकानो, नाहीतर माझे वस्त्रहरण सुरु होईल.

स्रुजा's picture

30 Jan 2016 - 2:00 am | स्रुजा

मीच एक धागा काढणार आहे: स्वैपाक विसरा, झाडावर चढा.

आम्ही आज काल ट्यारपी बघतो, देत नाही. त्या काकांनी काय काय तारे तोडले स्त्रियांच्या ("शिव शिव") नसलेल्या भावनांबद्दल, गेलो का आम्ही ट्यारपी द्यायला? हल्ली झाडावर बसुन पॉकॉ खायलाच लय भारी वाटतं. स्वैपाक पण नाही करावा लागत.

भंकस बाबा's picture

30 Jan 2016 - 9:54 am | भंकस बाबा

काका तर नेमके उलटे बोलत होते, 'मीच दाणे टाकत होतो चिमण्याना'
बाकी काही म्हणा काकाचा धागा हिट झाला होता.
'बदनाम हुवे तो क्या हुवा नाम तो हुवा।'

विवेकपटाईत's picture

29 Jan 2016 - 8:07 pm | विवेकपटाईत

मी तर हिटलरला श्रेय देईल. जगावर अत्याचार करणारे गोरे लोक आपसात लढून मेले. भारत सहित आशिया, अफ्रिका स्वतंत्र झाले. म्हणतात ना हर बुराई के पीछे अच्छाई होती है (सिरीयसली घेऊ नका चहा पिता पिता टंकतो आहे).

अनन्त अवधुत's picture

30 Jan 2016 - 4:07 am | अनन्त अवधुत

थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा |
आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध खरा ||

मोगा's picture

30 Jan 2016 - 8:39 am | मोगा

हुतात्मादिन व नथुरामनिषेध दिनाच्या शुभेच्छा

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 10:18 am | संदीप डांगे

स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे होत आली तरी असे वाद उकरुन काढण्यामागे नक्की काय कारणे असतील असा नेहमी विचार पडतो. देशाच्या आजच्या स्थितीस स्वातंत्र्यपुर्व परिस्थिती, काँग्रेसची तेव्हाची धोरणे, वैगरे कारणीभूत आहेत असा विचार देशातल्या जनतेत पसरलेला आहे. म्हणजे माझ्या आजच्या गरिब असल्याला माझ्या पणजोबांनी श्रम केले नाहीत म्हणून त्यांना दोष देण्यासारखे आहे. स्वातंत्र्यानंतर आज तिसरी पिढी असेल जी जणू १९३० मध्ये जन्मल्यासारखे, सर्व डोळ्यांनी पाहिल्यागत आपली मते देत असते. ज्या व्यक्तिंना कधीही डोळ्याने पाहिले नाही, जी परिस्थिती कधीच जगले नाहीत त्याबद्दल हिरिरीने आपले द्वेष, प्रेम व्यक्त करत असतात. काही तरुणांचा गांधींबद्दलचा द्वेष, हिटलरबद्दलचे प्रेम बघून ही परिस्थिती जास्त तीव्रतेने जाणवते.

मंदार यांनी म्हटल्याप्रमाणे "आज आपण काय करतोय" हाच प्रश्न सर्वात आवश्यक व कळीचा असला पाहिजे. आजच्या तरुणांना आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या मनासारखे बदल होत नाहीत याचे खापर पुर्वजांवर फोडायचे असेल काय? स्वत:वर येणार्‍या जबाबदार्‍यांपासून पळ काढण्यासाठी असे वाद उकरून काढले जातात काय?

मला नेहमी प्रश्न पडतो तो हा की नेहरूंऐवजी पटेल वा बोस पंतप्रधान झाले असते तर काय फरक पडला असता? तो जो फरक काही लोकांना अपेक्षित आहे तो फरक देशात पाडण्यासाठी बोस वा पटेल ह्याच व्यक्ति गरजेच्या आहेत काय? गांधींनी देशाचे नुकसान केले, ठिक आहे. मग असे म्हणणार्‍यांनी देशाचे नक्की काय भले केले? किंवा गांधीं ह्या एकट्या माणसाने इतके नुकसान केले की करोडो भारतीयांना ते दुरुस्त करता आले नाही.

आपण जर्मनी, जपान, चीन वा इतर अनेक देश बघतो. ज्यांच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी त्या देशावरच नव्हे तर एकूण जगावर विध्वंसक परिणाम घडवले. तरी ते देश त्या परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडून ते विध्वंसक परिणाम पुसून काढून प्रगत झाले. इकडे आपण भारतीय योग्य मार्गाने आजही प्रगती करत असून आपल्या जनमानसात एकप्रकारची नकारात्मकता बाळगून आहोत. ही मानसिकता घातक आहे. आपल्या परिस्थितीबद्दल दुसर्‍यास दोषी ठरवण्याची मानसिकता आपल्या परिस्थितीत काहीच सकारात्मक बदल घडवत नाही तर आपल्या प्रगतीच्या वेगास खीळच घालते.

खोटा इतिहास वा खरा इतिहास, याने नेमका 'माझ्या आजच्या परिस्थितीवर' काय फरक पडतो. माझ्यासाठी आजची परिस्थितीच महत्त्वाची. कारण काळ सतत बदलत आलेला आहे. आपण आज जे निर्णय घेतो त्याचे परिणाम भविष्यकाळावर होतात. पण ते नेमके काय होतील हे कुणीच सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात कोणी काय निर्णय घेतले ह्याचे परिणाम त्या लोकांनाही ठोस माहित असण्याचे कारण नाही. तीही माणसेच होती, देव नाही हे आतातरी मान्य करायला हवे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही. जगातल्या कुठल्याही घटनेला कुणी एक व्यक्ति जबाबदार नसते. व्यक्तिपूजक, व्यक्तिनिंदक लोकांनीच आज ही सगळी घाण पसरवलेली आहे. समस्त भारतीयांनी देशहित लक्षात घेऊन असे फुटीचे उद्योग बंद करायला हवेत व एकात्मिक विकासाच्या भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे असे वाटते.

उगा काहितरीच's picture

30 Jan 2016 - 10:53 am | उगा काहितरीच

एक्झॕक्टली ! शब्दाशब्दाशी सहमत !

राही's picture

30 Jan 2016 - 12:45 pm | राही

१९३०-४०च्या वातावरणाशी (तत्कालीन साहित्य, दस्तऐवज, ग्रंथ इ.द्वारे) काहीच परिचय नसणार्‍या पिढ्या टोकाची मते व्यक्त करताना पाहून आश्चर्य वाटते. शिवाय प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त चांगले होईल आणि कमीतकमी नुकसान होईल इतपतच द्रष्टेपणा कोणताही नेता दाखवू शकतो. ही मानवाची मर्यादा आहे. देशाची स्थिती वाईट आहे अशा समजुतीत सतत राहाणे ही एक प्रकारची नकारात्मक मानसिकता आहे.
त्या काळावर प्रकाश टाकणार्‍या अनेक संदर्भग्रंथांमध्ये 'मिशन वुइथ माउंट्बॅटन' हे एक थोडेसे दुर्लक्षित पुस्तक. ह्यामध्ये १९ डिसेंबर १९४६ पासून २८जून १९४८ पर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे माउंट्बॅटनचे सेक्रेटरी अ‍ॅलन कॅम्प् बेल जॉन्सन यांनी लिहिलेले 'डायरी नॅरेटिव' आहे. यात फक्त घटनांचे वर्णन आहे, शेरे ताशेरे नाहीत. अर्थात माउंट बॅटन केंद्रवर्ती आहेत. पण महत्त्वाच्या अश्या जवळजवळ सर्वच तत्कालीन नेत्यांशी संबंधित घटना यात आहेत. निष्कर्ष आपले आपण काढायचे. अशी अनेक पुस्तके आहेत.
प्रतिसाद अतिशय आवडला.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 1:11 pm | संदीप डांगे

'मिशन वुइथ माउंट्बॅटन' साठी अनेक धन्यवाद! अशी पुस्तके खरंच संदर्भ म्हणून जवळ असली पाहिजेत. त्या काळातले असे निरपेक्ष लिखाणच जास्तीत जास्त समोर आले पाहिजे. प्रोपगंडा बुक्स ऐतिहासिक संदर्भ म्हणून वापरणे हेच चुकते असे वाटते.

तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत.
परंतु तुमचे मत असे आहे का कि नेते नाहीत तर केवळ सामान्य माणूस देशाची प्रगतीची दिशा ठरवतो ?
तसे असेल तर मनमोहन सिंग- नरसिंह राव यांना आर्थिक उदारीकरणाचे श्रेय द्यावे का ? कि त्यांनी केलं नसतं तर अन्य कोणीतरी केलं असतं असे म्हणावे ?
अमेरिकेची संयुक्त राष्ट्रे लिंकनच्या प्रयत्नांनी बनली असे म्हणावे कि नाही ?
शिवाजी महाराज, लेनिन, हो ची मिन्ह, माओ, हिटलर इ. व्यक्तींनी इतिहास बदलला ना ? कि ते नसते तर अजून कोणी केलं असतं असं म्हणावं ?
प्रोजेक्ट मध्ये फक्त कामगार महत्त्वाचे, टीम लीड म्हणून कोणी चालतो असे म्हणून चालेल का ?
स्वातंत्र्यासाठी कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही हे मान्य, पण काही निवडक लोकांचा त्यात मोठा वाटा आहे हे अमान्य करणे कसे योग्य ठरेल?

तसेच स्वतंत्र भारतात बहुतांश काळ काँग्रेस सत्तेवर असेल, देशाची धोरणे आखत असेल तर जनता या काळातील घटनांचे श्रेय आणि जबाबदारी अर्थातच त्यांच्याकडे सोपवणार ! चीन सारखी धोरणे का राबवली नाहीत ? आर्थिक उदारीकरण सुरु करायला नेहरू-गांधी घराण्याबाहेरील पंतप्रधान का लागला ? हे प्रश्न निघणारच.
इतिहास उकरत न बसता देशहित लक्षात घेऊन असे फुटीचे उद्योग बंद करायला हवेत आणि विकासाकडे वाटचाल करावी हे मान्य पण समाजाला तिकडे नेण्यासाठी नेता, शासनाची धोरणे महत्त्वाची असतात. त्या शासनाचा नेता महत्त्वाचा ठरतो. आणि हा नेता निवडताना सध्या इतिहास आड येतोय (आमच्या सोसायटीचा वॉचमन फक्त 'गांधी' नावाला मत देतो).

अत्रन्गि पाउस's picture

30 Jan 2016 - 9:17 pm | अत्रन्गि पाउस

यथा राजा तथा प्रजा आणि people गेट द government they deserve
हे दोन्ही खरे आहे ...

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 10:13 pm | संदीप डांगे

परंतु तुमचे मत असे आहे का कि नेते नाहीत तर केवळ सामान्य माणूस देशाची प्रगतीची दिशा ठरवतो ?
नेते हे समाजातूनच आलेले असतात. नेत्यांनी काय करावं हे बरेचदा समाजाच्या इच्छेवर, प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असतं. स्वयंभू कुणीही नेता कुठल्याही निर्णयाला एकमेव जबाबदार नसतो. जगातल्या विकसित व बलाढ्य देशांची यादी बघितली तर ते देश कुणा एका माणसामुळे नाही तर त्या समाजातल्या विशिष्ट गुणांमुळे प्रगत झाले असे दिसून येते. राजकिय नेत्यांवर देशाच्या प्रगतीची पूर्ण भिस्त टाकणे भारतीयांच्या मानसिकतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

तसे असेल तर मनमोहन सिंग- नरसिंह राव यांना आर्थिक उदारीकरणाचे श्रेय द्यावे का ? कि त्यांनी केलं नसतं तर अन्य कोणीतरी केलं असतं असे म्हणावे ?
ममो-न.राव. यांना आर्थिक उदारिकरणाचा निर्णय घ्यायला भाग पाडण्यामागे त्यांच्याच सरकारचे चुकलेले निर्णय होते. कम्युनिजमच्या नादी लागून अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान गळ्याशी आल्यावर त्यांच्या जागी त्यावेळेस जे कुणी असते त्यांना ते निर्णय घ्यायला भाग पडलेच असते. हा जर तर चा प्रश्न आहे खरा पण आर्थिक उदारिकरणाचा निर्णय त्यांच्या हस्ते झाला म्हणून त्यांना श्रेय. सकाळी उठुन चला आर्थिक उदारिकरण आणूया म्हणून मॉर्निंगवॉक करत दोघांनी नक्कीच ठरवले नसेल.

अमेरिकेची संयुक्त राष्ट्रे लिंकनच्या प्रयत्नांनी बनली असे म्हणावे कि नाही ?
अमेरिकेची संयुक्त राष्ट्रे बनवण्यात लिंकनसाहेबांचे अथक प्रयत्न कुणीच नाकारणार नाही. पण ही घटना दखल घेण्याजोगी व्हावी ह्यासाठी सगळ्या अमेरिकन जनतेनेही अहोरात्र मेहनत करून देशाला महासत्ता बनवले. अन्यथा अमेरिका संयुक्त राष्ट्रे झाल्यावर काही वर्षांनी परत खिळखिळी झाली असती, पन्नास देश तयार होऊन परत यादवी करून संपले असते आणि अमेरिका नावाचे काही नामोनिशान राहिले नसते तर लिंकनच्या प्रयत्नांना एवढे महत्त्व आज राहिले असते काय?

शिवाजी महाराज, लेनिन, हो ची मिन्ह, माओ, हिटलर इ. व्यक्तींनी इतिहास बदलला ना ? कि ते नसते तर अजून कोणी केलं असतं असं म्हणावं ?

मी मांडलेला मुद्दा नेत्यांच्या कृतींचा देशाच्या जनतेवर झालेल्या परिणामांचा आहे. इतिहास तर प्रत्येक व्यक्ति चांगल्या वाईट कृतीने बदलत आली आहे, बदलत राहणार आहे. महत्त्व देशाच्या विकासात समाजाच्या सातत्यपूर्ण योगदानाला आहे/असतं. हिटलरने जे केलं त्याच्यामुळे जर्मनी उभीही राहिली आणि कोसळलीही. पण परत उभी करायला कोण हिटलर आला? हिटलर नंतरचे कोण मोठे नेते आठवतात का? पण जर्मनी बलाढ्य व प्रगत आहेच. इजरायलच्या मागे कोण मोठा नेता आहे?

प्रोजेक्ट मध्ये फक्त कामगार महत्त्वाचे, टीम लीड म्हणून कोणी चालतो असे म्हणून चालेल का ?

देश वा समाज हा प्रोजेक्ट नसतो. ते नेमून दिलेलं काम नसतं. राजकिय पुढारी आणि प्रोजेक्ट टीमलीडमध्ये मूलभूत फरक आहे. तुलना योग्य नव्हे.

स्वातंत्र्यासाठी कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही हे मान्य, पण काही निवडक लोकांचा त्यात मोठा वाटा आहे हे अमान्य करणे कसे योग्य ठरेल?
वाटा अमान्य कुणीच करत नाही. विरोध फक्त ह्याचा वाटा मोठा की त्याचा वाटा मोठा हा जो वाद होतो त्याला आहे. व्यक्तिपुजकांच्या झोंबाझोंबीला आहे. सर्वांच्या सहभागास योग्य मान देण्यात समस्या काय आहे? गांधी असो वा बोस वा नेहरू वा सावरकर वा फडके वा राजगुरु वा भगतसिंह वा बाबू गेनू वा खुदिराम बोस कुणाचेच योगदान कमी जास्त का मानावे?

तसेच स्वतंत्र भारतात बहुतांश काळ काँग्रेस सत्तेवर असेल, देशाची धोरणे आखत असेल तर जनता या काळातील घटनांचे श्रेय आणि जबाबदारी अर्थातच त्यांच्याकडे सोपवणार ! चीन सारखी धोरणे का राबवली नाहीत ? आर्थिक उदारीकरण सुरु करायला नेहरू-गांधी घराण्याबाहेरील पंतप्रधान का लागला ? हे प्रश्न निघणारच.

काँग्रेस सत्तेवर होती म्हणजे जनतेने निवडून देऊन सत्तेवर होती, हुकूमशाही नव्हे. त्यामुळे काँग्रेसने सत्ताधारी सरकार म्हणून घेतलेले निर्णय हे जनतेच्या पाठिंब्याने घेतलेत. त्याची जबाबदारी तत्कालिन जनतेवर आहे. आज भाजपाला सत्ताधारी म्हणून निवडून दिले, त्यांच्या बर्‍यावाईट निर्णयांचे मुखत्यार आजची जनताच असणार. त्यांच्याही 'आजच्या' निर्णयांवर 'आजच' प्रश्न उपस्थित केले जातात, ते प्रश्नही योग्य आहेत असे आपणांस वाटते का?

आपण एका लोकशाही देशात राहतो हे समजून घेणे इतके कठिण का जाते?

इतिहास उकरत न बसता देशहित लक्षात घेऊन असे फुटीचे उद्योग बंद करायला हवेत आणि विकासाकडे वाटचाल करावी हे मान्य पण समाजाला तिकडे नेण्यासाठी नेता, शासनाची धोरणे महत्त्वाची असतात. त्या शासनाचा नेता महत्त्वाचा ठरतो. आणि हा नेता निवडताना सध्या इतिहास आड येतोय (आमच्या सोसायटीचा वॉचमन फक्त 'गांधी' नावाला मत देतो).

मला तुमच्या सध्या ह्या शब्दावर आक्षेप आहे. शासनाचा नेता निवडतांना जनतेने गांधी या आडनावाला आज तर डावललेच आहे, ह्या आधीही डावलले आहे. त्यामुळे गांधी आडनाव वाला नेता आजतरी शासक नाही असे दिसते यापुढेही येणार नाही असेही दिसते. त्यामुळे इतिहासावर आक्षेप घेऊन वाद उकरत बसण्याचे नक्की कारण काय असावे?

दुसरे असे की 'गांधी' आडनावाला तुमचा वॉचमन मत देतो म्हणूनच 'दुसरे कुणीतरी सत्तेत येऊ शकत नाही' असे वाटणार्‍यांनी ते आडनाव जास्तीत जास्त मलिन करणे, त्या आडनावाच्या व्यक्ति कशा हिन, नालायक व देशविरोधी कृत्य करणार्‍या होत्या हा जो प्रचार खुल्या-छुप्या पद्धतीने करणे चालवले आहे ते नक्कीच स्विकारार्ह नाही. आपली रेष मोठी करण्याच्या कष्टात न पडता दुसर्‍याची रेष मिटवणे राजकारणासाठी, सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक व ग्राह्य असेलही. पण देश बांधण्यासाठी, सर्वांच्या संतुलित विकासासाठी नक्कीच नाही. ती गरज नाही आत्ताच्या घडीची. अशा बातम्या, चर्चा, वाद निघणे खरेच कुणाच्या फायद्याचे आहे? कुणा राजकिय पक्षासाठी, राजकिय स्वार्थासाठी असेल पण देशाच्या ७०% तरूणाईच्या तरी नाही. ती तरूणाई जी अमेरिका, सिंगापुर, इंग्लंड, जर्मनी, जापानसारखी प्रगती करण्यास आसुसलेली आहे, जिच्यात प्रचंड उर्जा, बुद्धीमत्ता, भूक आहे. त्या तरुणाईला इतिहासाच्या निरर्थक वादांमध्ये गुंतवून, फूट पाडून ते रिसोर्सेस वाया घालवून देशाचा तरी काहीच फायदा होणार नाही.

बोस मोठे की गांधी हे ठरवण्याची आत्ता आपली गरज नाही. सुभाषचंद्र बोस नव्हे तर सुभाष पाळेकर ही आपली आत्ताची प्रायोरिटी हवी. तुम्हाला काय वाटतं?

......ही आपली आत्ताची प्रायोरिटी हवी.

+ १.

नक्कीच, इतिहासातील कोण मोठे हे ठरवणे हि नक्कीच कमी प्रायोरिटीची गोष्ट आहे (स्वातंत्र्य सैनिकांची तुलना हि गोष्टच चुकीची व बालिश आहे).
माझा आक्षेप एवढाच आहे कि 'केवळ' समाजाने सुधारले पाहिजे असे आं जा वर टायपुन काही होत नाही. कारण सामान्य प्रजा हि बहुतांशी आं जा वर नाही अथवा एवढा विचारही करत नाही. एखादा चांगला नेताच ते काम करू शकतो. उदा भ्रष्टाचाराविषयी (तसा) उदासीन दृष्टीकोन ठेवणारा सामान्य माणूस अण्णा-केजरीवाल आंदोलना नंतर अचानक सर्व नेत्यांना, सरकारी यंत्रणांना चिकित्सक दृष्टीने पाहू लागतो. मोदींच्या उदयानंतर सर्व राजकीय पक्ष देशाचा विकास या मुद्द्यावर प्रसार करताहेत.
शिवाय जनता 'मुखत्यार' असली तरी टीका करणे हा हक्क आहेच.

पण परत उभी करायला कोण हिटलर आला?

जपान, जर्मनी, [इस्राइल] देश कोसळून जरी उभे राहिले असले तरी त्यांचे मनुष्यबळ व आपले यात जमीन-अस्मान फरक आहे (कुशलता, मानसिक परिपक्वता, professionalism इ). ती आणायला आपल्याला अजून थोडा वेळ लागणारे.

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 1:14 am | संदीप डांगे

माझा आक्षेप एवढाच आहे कि 'केवळ' समाजाने सुधारले पाहिजे असे आं जा वर टायपुन काही होत नाही. कारण सामान्य प्रजा हि बहुतांशी आं जा वर नाही अथवा एवढा विचारही करत नाही. एखादा चांगला नेताच ते काम करू शकतो.

तुमच्या मते इतिहासात काय चूकीचे/बरोबर ह्यावर काथ्याकूट करणे आवश्यक पण 'समाजानेच आता सुधारायला पाहिजे' असे म्हणणे निरर्थक? आंजावर टायपून काय काय होऊ शकते हे आपणास ठावूक नसेल तर आश्चर्य आहे. सामान्य प्रजा म्हणजे कोण? तुम्ही आम्ही ही सामान्य प्रजा नाही काय? व्हॉट्सॅप वापरणारे, एकमेकांना विनाकारण निरर्थक ढकलपत्रे पाठवणारे, हे जालावर नाहीत काय? चांगला नेता म्हणजे कोण? सगळ्यांचे पाय मातीचे असतात हे तर आपण नेहमीच बघत आलोय. किती काळ "संभवामि युगे युगे" ची वाट बघणार आहोत? तसेही चांगल्या चांगल्या नेत्यांची समाजानेच काय गत केली हेही आपणांस ठावुक असायला हवे.

उदा भ्रष्टाचाराविषयी (तसा) उदासीन दृष्टीकोन ठेवणारा सामान्य माणूस अण्णा-केजरीवाल आंदोलना नंतर अचानक सर्व नेत्यांना, सरकारी यंत्रणांना चिकित्सक दृष्टीने पाहू लागतो. मोदींच्या उदयानंतर सर्व राजकीय पक्ष देशाचा विकास या मुद्द्यावर प्रसार करताहेत.

त्या आंदोलनातून सामान्य माणसाच्या स्वत:च्या वागणूकीत काय बदल झाला? नक्की सकारात्मक बदल काय झाला 'समाजात' वा नेत्यांमधे वा सरकारी यंत्रणांमधे? भ्रष्टाचार थांबला? शिस्त आली? जागतिक क्रमवारीत क्रमांक घसरल्याची कालच वार्ता होती. सर्व राजकिय पक्ष नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर प्रसार करत आले आहेत. मागच्या पन्नास वर्षांमधल्या सर्व (अगदी ग्रामपंचायतही) निवडणुकीतल्या सर्व पक्षांचे जाहिरनामे उघडून बघा. त्यात विकासाचा मुद्दा नसेल तर मी काहीही हरायला तयार आहे. मोदींच्या आधी भारतात विकास झालाच नाही असेही आपणांस म्हणायचे असेल ते तुमचे वैयक्तिक मत असावे.

शिवाय जनता 'मुखत्यार' असली तरी टीका करणे हा हक्क आहेच.

टिका करण्याचा हक्क लोकशाहीनेच दिला आहे. जरूर व्हावी टिका, पण आताच्या सरकारवर टिका करु नका असे म्हणणारे तेव्हाच्या सरकारच्या निर्णयांचे वाभाडे काढण्यास टपलेलेच असतात हा विरोधाभास पटत नाही.

जपान, जर्मनी, [इस्राइल] देश कोसळून जरी उभे राहिले असले तरी त्यांचे मनुष्यबळ व आपले यात जमीन-अस्मान फरक आहे (कुशलता, मानसिक परिपक्वता, professionalism इ). ती आणायला आपल्याला अजून थोडा वेळ लागणारे.

वेळ लागेलच कारण ते सर्व आणणे सध्या आपली प्रायोरिटी नाही. जेव्हा ९१ सारखी नामुष्की परत भारतावर येईल तेव्हा तहान लागल्यावर विहिर खोदायला सुरुवात होईल. मग मोदींनी तेव्हाच समाजसुधारणेवर भर का नाही दिला अशी टिका २०४७ साली होत असेल.

केवळ समाजाला सुधारायला सांगू नका हे मत व्यक्त करून आपण मला खरंच विचारात पाडले बरं का. "केवळ समाज" असा गट कुठे असतो हे शोधायला पाहिजे. तसेच ही सामान्य प्रजा कुठे असते तेही शोधायला हवे. अण्णांच्या आंदोलनात टोपी+मेणबत्ती घेऊन फिरणारी सामान्य प्रजा सिग्नलवर थांबत नाही, टेबलाखालूनच्या व्यवहारांवर जास्त विश्वास ठेवते, रस्त्यांवर बिनदिक्कत कचरा करते हे चांगलेच अनुभवले आहे.

असो. धन्यवाद! या विषयावर अजून बोलण्यासारखे काही दिसत नाही. माझे मुद्दे दोन्ही प्रतिसादात नीट आलेले आहेत. मूळ मुद्दा हरवून 'जालावर बसून टायप करायला काय जातंय' छाप चर्चेकडे जाण्यापेक्षा थांबलेले बरे.

भंकस बाबा's picture

30 Jan 2016 - 10:57 am | भंकस बाबा

गांधीजी पूज्य आहेतच, पण जी आझादी आजचे गांधीवादी सांगतात त्याप्रमाणे बिना खड्ग बिना ढाल अजिबात आलेली नाही. असंख्य क्रांतिकारकाच्या आहुतीतून ती मिळाली आहे. गांधीजीचा उदो उदो करताना सोईस्करपणे कॉँग्रेस ह्या क्रान्तिकारकाना विसरते. उदा. सावरकरना देशभक्त मानायला हे तयार नसतात. ज्या माणसाने आपल्या संसाराची होळी करुन क्रान्तिकारकाना प्रेरणा दिली त्या माणसाला ह्या गाढ़वानी जातीयवादी शिक्का मारला. सावरकरानी लिहिलेले १८५७ एक स्वातंत्रसमर ह्या पुस्तकाचे नीट वाचन केले तर हे तथाकथित गांधीवादी किती अनाडी होते हे दिसून येईल.
फाळणीनंतर स्थलांतर करताना बळी पडलेल्याणी काय गुन्हा केला होता?
गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलित हजारो ब्राह्मणाची घरे जाळली गेली तेव्हा हे गांधीवादी कुठे होते?
जगाचा इतिहास सांगतो, रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र मिळाले नाहि.
दुसर्यांचे माहीत नाही पण भगतसिंग, सावरकर तसेच इतर असंख्य क्रांतिकारक ज्याच्याविषयी गांधीजीनि आकस दाखवला ते मला नेहमीच परके वाटतील.

तर्राट जोकर's picture

30 Jan 2016 - 11:04 am | तर्राट जोकर

गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलित हजारो ब्राह्मणाची घरे जाळली गेली

गांधीद्वेषामागे खरा मुद्दा आहे तो हाच. बाकीचे सगळे मुद्दे त्यावर पांघरूण घालण्यासाठी आहेत.

भंकस बाबा's picture

30 Jan 2016 - 12:08 pm | भंकस बाबा

फाळणी होणार ही काळ्या दगड़ावरची रेघ होती. स्थलांतरित लोकांना सुखरूप बाहेर काढणे ही त्या वेळच्या सरकारची जबाबदारी होती. पाकिस्तानी सरकारवर फाजिल विश्वास ठेऊन ह्या लोकांना स्थलांतरित होउ दिले. परिणाम हजारो लोक मारले गेले. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. गांधीजींच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांनी स्वताला या परिस्थितीत कल्पुन बघावे मग याची भीषणता लक्षात येईल. एका रात्रित तुमचे सर्वस्व जाते वर भर म्हणुन तुमच्च्या ईज्जतीचे धिंडवड़े देखिल निघतात. ही सर्वस्व गमावली गेलेली माणसे जेव्हा दिल्लीत आलि तेव्हा त्यांनी अनेक मंदिरातून , मशिदीतून आश्रय घेतला तेव्हा ऐन थंडीत त्यांना मुस्लमानाच्या भावना दुखावतात म्हणुन बाहेर काढण्यात आले व हे गांधीजींच्या आदेशानुसार झाले.
महात्मा बनण्यासाठी गांधीजीनि फार मोठी किमंत देशाला मोजायला लावली आहे. या गोष्टीचा अनेक वेळा उहापोह झालेला आहे. मी काही वेगळे सांगत नाही आहे.

मोगा's picture

30 Jan 2016 - 12:34 pm | मोगा

त्यावेळचं सरकार म्हणजे नेमकं कोणतं ? इंग्रज , की काँग्रेस ?

फाळणी झाली भारताची वाटणी भारताला आली , पाकिस्तानची त्याना गेली... मग पाकिस्तानच्या हद्दीतील लोकांना भारतातले सरकार नेमकी कशी मदत करणार होते ? भारताच्या हद्दीत आल्यावर भारत सरकारची जबाबदारी सुरु होणार ना ?

त्यावेळी पाकिस्तान हद्दीत संघाच्या शाखा नव्हत्या का ? ते काय करत होते ?

पाकिस्तानच्या हद्दीत दंगल होउन लोक मेले तरी काँग्रेस व गांधीजी जबाबदार ! मग काश्मीर दंगलीला जबाबदार कोण ? काश्मीरचा राजा - रामसिंग की कोण , तो काय ?

मोगा's picture

30 Jan 2016 - 11:12 am | मोगा

भगतसिंग, सावरकर तसेच इतर असंख्य क्रांतिकारक ज्याच्याविषयी गांधीजीनि आकस दाखवला ते मला नेहमीच परके वाटतील

....

नेमका काय आकस दाखवला म्हणे ?

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 11:38 am | संदीप डांगे

पण जी आझादी आजचे गांधीवादी सांगतात त्याप्रमाणे बिना खड्ग बिना ढाल अजिबात आलेली नाही.

गांधीवादी जे सांगतात ते व्यक्तिपुजेशी संबंधीत आहे, व्यक्तीपुजा भारतात फार कॉमन आहे. जे गांधींचा द्वेष करतात तेही कुठल्यातरी व्यक्तीचे पूजक आहेतच. उदा: सावरकरवादी, गोडसेवादी, हिटलरवादी, बोसवादी, आंबेडकरवादी, इत्यादी. कुणाच्या काही म्हटल्याने गुणगान केल्याने 'आजच्या परिस्थितीत' काय फरक पडतो? असे गुणगान गल्लोगल्लीच्या देवदेवतांबद्दलही, नेत्या-पुढार्‍यांबद्दल केले जाते. त्याबद्दल असे तीव्र आक्षेप कधीच येत नाहीत. गांधींबद्दल विचार करतांनाच पराकोटीची घृणा का दिसत असावी?

असंख्य क्रांतिकारकाच्या आहुतीतून ती मिळाली आहे. गांधीजीचा उदो उदो करताना सोईस्करपणे कॉँग्रेस ह्या क्रान्तिकारकाना विसरते.

परत तेच. काँग्रेस उदोउदो करणारच. तो एक पक्ष आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याच्या योगदानाबद्दल उदो उदो करतो व इतरांचे योगदान विसरले गेले पाहिजे असे प्रयत्न करतो. जसे आत्ता भाजप + संबंधित पक्ष, संस्था करत आहे. त्यात काँग्रेसला विलन ठरवणे संयुक्तिक वाटत नाही.

उदा. सावरकरना देशभक्त मानायला हे तयार नसतात. ज्या माणसाने आपल्या संसाराची होळी करुन क्रान्तिकारकाना प्रेरणा दिली त्या माणसाला ह्या गाढ़वानी जातीयवादी शिक्का मारला.

ज्या अधिकाराने आपण कॉंगेसला गाढव म्हणताय त्याच अधिकाराने त्यांना सावरकरांना देशभक्त न मानण्याची सवलत आहे. ज्याप्रकारे आपण सावरकरांचे चाहते आहात तसे ते विरोधक असू शकतात, त्याबद्दल आक्षेप एक भारतीय म्हणून का असावा?

सावरकरानी लिहिलेले १८५७ एक स्वातंत्रसमर ह्या पुस्तकाचे नीट वाचन केले तर हे तथाकथित गांधीवादी किती अनाडी होते हे दिसून येईल.

प्रत्येकाचा आपला प्रोपगंडा असतो. विचार असतो, मत असते. आपल्याला पटते ते मत आपल्याला सत्य वाटते. तुमच्याच लॉजिकने सावरकरवादी गांधीवाद्यांना अनाडी वाटू शकतात.

फाळणीनंतर स्थलांतर करताना बळी पडलेल्याणी काय गुन्हा केला होता?
गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलित हजारो ब्राह्मणाची घरे जाळली गेली तेव्हा हे गांधीवादी कुठे होते?

स्वातंत्र्यासाठी जर गांधी एकमेव जबाबदार नाहीत तर फाळणीसाठी कसे जबाबदार धरल्या जातात? म्हणजे जे चांगले झाले त्यात गांधींना सामील करण्यात आक्षेप, जे वाईट झाले त्यास सर्वस्वी गांधी जबाबदार हा कोणता न्याय?
गांधीहत्या ही चूक की बरोबर याबद्दल आपले वैयक्तिक मत काय? जशी गुजरात दंगल ही गोध्राची उस्फूर्त व विचारहीन प्रतिक्रिया म्हणून मानले जाते, त्याच प्रमाणे हे घरे जाळणे प्रकरण समजावे काय?

जगाचा इतिहास सांगतो, रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र मिळाले नाहि.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यात एकटे कुणीच जबाबदार नाही, बदलती जागतिक परिस्थिती ही जास्त जबाबदार होती. अन्यथा दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळण्यास १९९४ उजाडले नसते.

दुसर्यांचे माहीत नाही पण भगतसिंग, सावरकर तसेच इतर असंख्य क्रांतिकारक ज्याच्याविषयी गांधीजीनि आकस दाखवला ते मला नेहमीच परके वाटतील.

गांधींजींबद्दल जो द्वेष आहेत त्याचे मूळ भलतीकडेच आहे, भगतसिंग, सावरकर वैगरे कारणे वरवरची आहेत.

राँर्बट's picture

30 Jan 2016 - 9:03 pm | राँर्बट

दक्षिण आफ्रीकेला स्वातंत्र्य १९९४ मध्ये?

दक्षिण आफ्रीका कितीतरी आधीपासून स्वतंत्र देशच होता. तिथल्या वर्णद्वेषी धोरणाला मूठमाती देण्यात आली असं म्हणा हवंतर. आणि ते सुद्धा १९९० मध्ये.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 9:20 pm | संदीप डांगे

सॉरी, काही गडबड झाली का? तो कधी स्वतंत्र झाला व कुणापासून?

मोगा's picture

31 Jan 2016 - 7:36 am | मोगा

शालेय इतिहासात स्वातंत्र्याची चार कारणे दिली आहेत.

१. मवाळ , गांधी काँग्रेस इ नी केलेली आंदोलने
२. जहालांकडुन झालेला विरोध
३. महयुद्धामुळे इंग्रज खिळखिळे झाले.
४. सैन्याचे बंड.

फक्त गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळाले , असे कुठेही शिकवले जात नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jan 2016 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमचे अंतुशेठ सांगतात "स्वराज्याचा संबंध गांधिंशीही नाही टिळकांशीही नाही आणि सावरकरांशीही नाही. इंग्रज गेला तो कंटाळुन. आहो लुटण्यासारखं काय शिल्लक का होता इथे? धंदा बुडीत खाती जायला लागला म्हणून फुकलन दिवाळं. कुंभार मडकी घेउन गेला तुम्ही फुंका उकिरडा, हे सगळे चक्रनेमिक्रमेण होते. सत्ता इंग्रजाचीही नाही, नेहरुचीही नाही आणि जनतेचेही नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. "

पुलंचा पंखा

पैजारबुवा,

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 12:41 pm | संदीप डांगे

येकच नंबर... अंतुशेठ जिन्दाबाद!

भंकस बाबा's picture

30 Jan 2016 - 12:56 pm | भंकस बाबा

साल्या ह्या इतिहासाच्या पुस्तकानि शाळंत जीव नकुसा केला व्हता.
ते वर मोगा संघाच्या नावाने बोम्बलतंय,

तर्राट जोकर's picture

30 Jan 2016 - 11:05 pm | तर्राट जोकर

बाडीस,

मोगा's picture

31 Jan 2016 - 7:40 am | मोगा

अंतुशेटचे बोलवते धनी देशपांडे होते.

देशपांडे गेले आणि अंतुच्या हाकाही बंद पडल्या.

इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्य मावळायला लागला तो...हिटलरमुळे...स्वतःच्या घराला सावरायला म्हणून इंग्रजांनी, आपली माणसे परत नेली आणि भारताला वार्‍यावर सोडले....

एक काडी अज्जुन टाकतो.....

...हिटलरचा विजय झाला असता तर भारतावर जर्मनीचे किंवा जपानचे राज्य आले असते आणि ते तर जास्तच घातक ठरले असते...

बाकी चालू द्यात.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 1:20 pm | संदीप डांगे

तसे जर झाले असते तर आज करवादणार्‍या पिढीने काय केले असते ह्याचा विचार करतोय. =))

अहिंसक आंदोलन वगैरे ला कुणी हिंग लाऊन विचारले नसते ...
शुध्द हुकुमशाहीची चव घेता आली असती ...

+ १

आजतरी कोण विचारतो? ट्रकभर पुरावे देणारे खैरनार गेले, अण्णा हजारे यांची आंदोलने थंडावली, सलमान खानच्या अंगरक्षकाचे नामोनिशाण उरले नाही.एखाद्या जिल्हाधिकार्‍याने लोकसेवेचे व्रत कठोरपणे राबवायला सुरुवात केली की त्याची बदली ठरलेलीच.

---------------------------------

"शुध्द हुकुमशाहीची चव घेता आली असती ..."

शक्यच नाही....

कारण आम्ही जन्माला पण नसतो आलो.ज्यू लोकांनंतर इतर धर्मीयांचा नंबर होताच.स्वस्तिक उलटा असला तरी, हिटलरचे आणि त्याच्या नंतर येणार्‍या गेस्टापोंचे धोरण, इतर धर्मीयांचा नायनाट, असेच असते.

फरक इतकाच की युरोपपेक्षा भारतात गॅस चेंबरची संख्या सगळ्यात जास्त असती.

स्वगत मोड ऑन--------

परत एकदा हॅरी पॉटर मधले वाक्य आठवले, आधी मगलू, मग रक्ताचा घात करणारी, शेवटी उरतील ती फक्त पाणभक्षी मंडळी.हिटलरही टॉम रीडलपेक्षा वेगळा न्हवता.हॅरीला मदत करण्यासाठी इतर मित्र मंडळी तरी होती.भारताच्या बाबतीत ती पण गोष्ट कठीणच.अद्याप आपल्याला उत्तम शेजार पण मिळाला नाही, परदेशांची तर गोष्टच सोडा.

हिंदू धर्मीय नेपाळ असो, किंवा बौद्ध धर्मीय श्रीलंका असो.

नेभळट आणि दुर्बळ राष्ट्राला मित्र नसतात, इति कौटिल्य.
---------

स्वगत मोड ऑफ.

तर्राट जोकर's picture

30 Jan 2016 - 11:04 pm | तर्राट जोकर

.....आणीबाणी बरी होती की मग?

मोगा's picture

31 Jan 2016 - 7:42 am | मोगा

मोघलाना संताजी धनाजी दिसायचे दिवसरात्र .

तसे हिंदुत्ववाद्याना अजुनही - पूर्ण बहुमतात मोदी येऊनही - नेहरु व गांधी दिसत रहातात

अन्नू's picture

1 Feb 2016 - 11:10 pm | अन्नू

जाने कितने झूले थे फाँसी पर, कितनो ने
गोली खाई थी |
क्यो झूठ बोलते हो साहब, कि चरखे से
आजादी आई थी ||
चरखा हरदम खामोश रहा, और अंत देश
को बांट दिया |
लाखों बेघर,लाखो मर गए, जब गाँधी ने
बंदरबाँट किया ||
जिन्ना के हिस्से पाक गया , नेहरू को
हिन्दुस्तान मिला |
जो जान लुटा गए भारत पर, उन्हे ढंग
का न सम्मान मिला ||
इन्ही सियासी लोगों ने, शेखर को भी
आतंकी बतलाया था |
रोया अलफ्रेड पार्क था उस दिन, एक
एक पत्ता थर्राया था ||
जो देश के लिए जिये मरे और फाँसी के
फंदे पर झूल गए |
हमें कजरे गजरे तो याद रहे, पर अमर
पुरोधा हम भूल गए ||

मोगा's picture

2 Feb 2016 - 9:18 am | मोगा

गांधीजींचा जयजयकार मान्य नसेल तर उत्तर ध्रुवावर जाऊन रहावे.

वाचा (सर्व पटलं पाहिजे असं नाही)

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Feb 2016 - 12:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमच्या लेखी

दोघांचाही वाटा समसमान आहे!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Feb 2016 - 12:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

याच्या इतका निर्बुद्ध प्रश्न ऐकला नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

2 Feb 2016 - 1:14 pm | अनिरुद्ध.वैद्य

मलातरी इंग्रजांचा वाटतो. अहो त्यांनी भारताला पारतंत्र्यात टाकल म्हणून तर आपलं स्वातंत्र्य मिळवता आलं न?
:D

नाव आडनाव's picture

2 Feb 2016 - 1:39 pm | नाव आडनाव

मला वाटतं भारतीयांच्या इंग्रजीचा मोठा वाटा आहे - भारतीय लोक चुकिचं इंग्रजी बोलायला लागले आणि गोर्‍या साहेबाचं कन्फ्यूजन झालं - ह्यांचं बरोबर की आपलं? त्याच रागा-वैतागात गोरा साहेब पळून गेला. what is and what is not? (हाकानाका).

मोठमोठ्या पोस्टरांवरचे हिंदी मालिकांचे / पिच्चरांचे शीर्षक इंग्रजीतून वाचतांना साहेबाच्या आजच्या पिढीतला माणूस पण वाचता-वाचता पडायचा तिच्यायला -
Maine Pyaar Kiya
Hum Aapake Dil Mein Rahete Hain
Saans Bhee Kabhee Bahu Thee
Darr
Mann
हे कसं वाचत असतील इंग्रज भारतात आल्या नंतर :)

'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' आठवला :)

पैसा's picture

2 Feb 2016 - 2:37 pm | पैसा

माईने प्यार किया
हुम आपाके डिल मेइन रहेते हाईन
सान्स भी काभी बाहु थीऽ
दार्र
मन्न

कपिलमुनी's picture

2 Feb 2016 - 2:29 pm | कपिलमुनी

हत्तीचा वाटा , वाघाचा वाटा यांवर देखील धागा येउ द्या

होबासराव's picture

2 Feb 2016 - 2:46 pm | होबासराव

आपण काहि दिग्गज नाय बॉ त्यामळे ह्या विषयावर आपला पास्...तरि पण आलोय तर हि एक आवडति जुनि जाहिरात :)

पोरी ये पोरी, पाव्हणं आलं बघ.... खरतर माह्या घरची लक्षमी व्हायची , पण मी हिला सून म्हणून आणली, हि साधी लक्षमी न्हाही , वनलक्षमी हाये वनलक्षमी !! गुरांना चारा, जळणाला लाकूड, गाठीला पैका घरच्या घरी.. सामाजिक वनीकरण येता दारी !

नाव आडनाव's picture

2 Feb 2016 - 3:03 pm | नाव आडनाव

अर्रर्र... मी पण "दिग्गज" नाही हे लिहायला विसरलोच होतो माझ्या प्रतिसादात. तसा डिस्क्लेमर आहे असं समजा मंडळी :)

होबासराव, तुमचा प्रतिसाद वाचून बरं झालं लक्षात आलं, नाहीतर लोक मला "दिग्गज" समजायला लागले असते तर? काय इमेज झाली असती माझी चार लोकांत :):):)

इथे डकवली राव्...एक दोन शब्द एक सामान्य दर्शक म्हणुन मांडा कि ?