धर्मनिरपेक्षवादाची देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश.
स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षाच्यानुसार धर्मनिरपेक्षवादाची व्याख्या : ह्या देशातील मुळ व बहूसंख्य हिंदू धर्मीयांचा द्वेष करणे त्यांना जाती-जातीत विभागुन ठेवणे. मुस्लिम (जे 30 करोड आहेत) त्यांना, ख्रिश्चन वगैर ध्रर्मीयांना अल्पसंख्य म्हणुन (मतपेटीसाठी) त्यांचे लाड पुरविणे म्हणजे धर्मनिरपेक्षवाद.
जर भारत खरच आज धर्मनिरपेक्षवादी देश असता तर येथे हिंदूना, सिख, जैन, बोद्ध ह्यांना एक कायदा व मुस्लमांना वेगळा नसता. जिथे धर्मास शासकीय मान्यताच नसती तिथे ख्रिश्चनांना धर्म पसाराची परवानगी नसती.
मला कुणी ब्राम्हण वगैरे समजू नका कारण मी ह्या देशाच्या राज्यघटनेनुसार मागास समाजातला आहे, परंतू आज ही हिंदू असलेला व समोरही हिंदूच राहणारा आहे.
प्रश्न : भारत खरचं धर्मनिपेक्ष देश आहे का? व स्वंघोषीत धर्मनिपेक्षवादी पक्षवादी पक्ष "धर्मनिपेक्षवादी" आहेत काय?
काही विचारपूर्वक दिलेल्या प्रतिक्रिया व विचार करण्याजोग्या :
प्रेषक सुनील ( सोम, 01/05/2009 - 11:30) .
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे काय?
कागदोपत्री आहे पण अंमलबजावणीत नाही. अर्थात, याचा अर्थ धर्मनिरपेक्ष हे तत्वच चुकीचे आहे, असा निश्चितच नाही. ह्या तत्वाची "इन लेटर ऍन्ड स्पिरीट" अंमलबजावणी झाली पाहिजे, हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
»
~ वाहीदा
धर्मनिरपेक्षता नाही म्हणुन्च धर्मांध पणा आहे हो ...
Both these things are Supplimentary to each other
by stating one side wrong the other side does not prove itself RIGHT
एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात ह्या धर्मनिरपेक्षता नसणे आणी धर्मांधपणा असणे
»
प्रेषक नितिन थत्ते ( सोम, 01/05/2009 - 13:17) .
सहमत.
समान नागरी कायदा करावा म्हणून उठसूट गळा काढणार्यांना विचारून पहा. ट्रिपल तलाक व चार बायका यापलिकडे काही सांगता येणार नाही.
इतरंचे सोडा .... सर्व हिन्दूनाही सारखा कायदा नाही. अनेक जातिमध्ये लग्न रजिस्टर करावे लागत नाही. नोटरी करून पुरते.
उद्या समान कायद्याच्या नावाखाली "हिंदू अविभक्त कुटुंब्" नावाची पळवाट बंद झालेली चालेल का? तेही ठरवावे लागेल.
»
प्रेषक तिरशिंगराव माणूसघाणे ( सोम, 01/05/2009 - 18:34) .
भारत हा धर्मनिरपेक्ष देश अजिबात नाही. कारणे पुढीलप्रमाणे :-
१. सरकारी छापील अर्जामधेच जात व धर्म विचारलेला असतो.
२. सर्व पायाभरणी, कोनशिला बसवणे इत्यादि तत्सम सरकारी कार्यक्रम मंत्र्यांच्या हस्ते हिंदु पध्दतीने होतात.
३. प्रत्येक धर्माच्या सणांना विनाकारण ,सरकारच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माची आठवण सरकार व सर्व राजकीय पक्षच मुद्दाम करुन देत असतात.
४. सार्वजनिक उत्सवांचे अवडंबर माजवले जाते, जे धार्मिक पायावरच आधारित असतात.
५. या सार्वजनिक उत्सवांचा सामान्य जनतेला किती त्रास होतो हे अजिबात लक्षांत घेतले जात नाही, किंबहुना त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते.
६. या सर्व उपद्व्यापात, देशाचा किती वेळ, पैसा जातो आणि उत्पादकतेवर त्याचा किती वाईट परिणाम होतो याकडे बेफिकीरीने दुर्लक्ष केले जाते.
एवढे सगळे चालले असताना या देशाची एवढी तरी कशी प्रगती झाली याचेच आश्चर्य वाटते.
»
प्रतिक्रिया
5 Jan 2009 - 9:55 am | विकास
तुर्तास आपल्या प्रश्नाचे उत्तरः
"भारत खरचं धर्मनिपेक्ष देश आहे का? व स्वंघोषीत धर्मनिपेक्षवादी पक्षवादी पक्ष "धर्मनिपेक्षवादी" आहेत काय?"
नाही. असल्यास "धर्मनिरपेक्ष" असेल...:-)
बाकी आपल्याला आधीपण विनंती केल्याप्रमाणे, चर्चा टाकताना विस्तारीत प्रतिसाद टाकल्यास या संकेतस्थळाचापण योग्य वापर केल्यासारखे वाटेल. नुसताच प्रश्न विचारून उत्तर हवे असल्यास कौल वापरणे योग्य राहील.
धन्यवाद.
5 Jan 2009 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा टाकताना विस्तारीत प्रतिसाद टाकल्यास या संकेतस्थळाचापण योग्य वापर केल्यासारखे वाटेल. नुसताच प्रश्न विचारून उत्तर हवे असल्यास कौल वापरणे योग्य राहील.
सहमत आहे !!!
5 Jan 2009 - 10:18 am | पांथस्थ
हा प्रश्न असा पाहिजे - भारत खरचं धर्मनिरपेक्ष देश आहे का? स्वंघोषीत धर्मनिरपेक्ष पक्ष खरचं "धर्मनिरपेक्षवादी" आहेत काय?
माझी टिचकी वाया गेली ;) म्हणजे पत्ता चुकला आहे अस वाटतं... (अश्या चुकिच्या टिचक्यांनी किती मस्सल-पॉवर वाया जाते हो) ह.घ्या.
(सापेक्ष धर्मनिरपेक्ष) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
5 Jan 2009 - 10:41 am | ए. प्रशांत
माझ्या ब्लॉग चा पत्ता : http://a-prshant.mywebdunia.com
5 Jan 2009 - 10:53 am | पांथस्थ
आपल्या मुळ लेखामधे तो पत्ता "http://a-prshant.mywebddunia.com/" दिला आहे. तेव्हा ओरडण्या ऐवजी ती चुक दुरुस्त करा.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
5 Jan 2009 - 6:45 pm | आपला अभिजित
पांथस्थ यांच्या प्रतिक्रियेसाठी...
हा प्रश्न असा पाहिजे - भारत खरचं धर्मनिरपेक्ष देश आहे का? स्वंघोषीत धर्मनिरपेक्ष पक्ष खरचं "धर्मनिरपेक्षवादी" आहेत काय?
हा प्रश्न असा पाहिजे. भारत खरंच धर्मनिरपेक्ष देश आहे का? स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष खरंच `धर्मनिरपेक्षवादी' आहेत काय?
खरचं चा उच्चार `खर्च' (=लोणचं ) सारखा होतो.
असो.
6 Jan 2009 - 9:03 am | पांथस्थ
गुरुजी,
खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच...
पुन्ना ह्यि चुक न्हाय करायचो...ह्या डावाला माफ करा...येउद्याकिहो वर्गात ;)
(सदैव "ड" तुकडित असलेला) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
5 Jan 2009 - 10:22 am | वेताळ
धर्मनिपेक्ष म्हनजे काय?सविस्तर लिहा. वेबदुनियावरुन काय ईमेल आले तुम्हाला? आता पुरे म्हणुन कि काय? ;) (ह्.घ्या.)
वेताळ
5 Jan 2009 - 11:21 am | सुनील
धर्मनिपेक्ष म्हनजे काय?
इंग्लीशप्रमाणे मराठीतही "र" सायलेंट ठेवायची टूम निघाली की काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 11:30 am | सुनील
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे काय?
कागदोपत्री आहे पण अंमलबजावणीत नाही. अर्थात, याचा अर्थ धर्मनिरपेक्ष हे तत्वच चुकीचे आहे, असा निश्चितच नाही. ह्या तत्वाची "इन लेटर ऍन्ड स्पिरीट" अंमलबजावणी झाली पाहिजे, हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 11:51 am | विनायक प्रभू
नाराज होउ नका हो बालीश प्रतिक्रियावर. सर्व जण थोडेच मानसशास्त्र व तर्कशास्त्राचे अभ्यासक असतात. तुमच्या विचारांची उंची नाही झेपत सर्वाना. अरे हो, अजिबात मते बदलु नका हो.आपली मते प्रतिक्रिया देउन बदलतील असे वाटणारे मिपाकर विरळा.
5 Jan 2009 - 6:24 pm | अवलिया
मानसशास्त्र, तर्कशास्त्र, धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यातले आपल्याला काहीच कळत नाही.
असो. लेख आणि प्रतिक्रिया वाचुन आमचा (आणि अनेक मिपाकरांचा) बालिशपणा कमी व्हावा असे वाटते.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
6 Jan 2009 - 12:10 pm | पिवळा डांबिस
लेख आणि प्रतिक्रिया वाचुन आमचा बालिशपणा कमी व्हावा असे वाटते.
"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा"
:)
6 Jan 2009 - 8:58 pm | कलंत्री
१००% मान्य.
5 Jan 2009 - 12:05 pm | वाहीदा
Link उघड्त नाही हो ...कृपया योग्य तरतुद क रावी
आम्ही भारतीय अजुन धर्मनिपेक्ष नाहीत म्हणुन भारत खरचं धर्मनिपेक्ष देश.....नाही
कारणं
१. विचारात प्रगल्भता नाही
२. ईतर धर्मांबद्ध्ल knowledge नाही आहे ते ही अर्ध व ट
Half knowledge is always dangerous
३. ईतर धर्मांबद्ध्ल Openness नाही !
~ वाहीदा
5 Jan 2009 - 12:46 pm | मनीषा
धर्मनिरपेक्ष नसेल कदाचित .... पण धर्मांध सुद्धा नाही ..
आणि राजकीय पक्षांबद्द्ल म्हणाल तर (काही अपवाद वगळता) सर्व फक्त सत्तावादी आहेत ...
5 Jan 2009 - 2:37 pm | वाहीदा
धर्मनिरपेक्षता नाही म्हणुन्च धर्मांध पणा आहे हो ...
Both these things are Supplimentary to each other
by stating one side wrong the other side does not prove itself RIGHT
एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात ह्या धर्मनिरपेक्षता नसणे आणी धर्मांधपणा असणे
~ वाहीदा
5 Jan 2009 - 1:16 pm | सुनील मोहन
स्वंघोषीत धर्मनिपेक्षवादी पक्षवादी पक्ष "धर्मनिपेक्षवादी" आहेत काय?
प्रश्नच आकलला नाहीये अजुन. त्यामुळे काय प्रतिक्रिया देणार?
(ठोंब्या) सुनील मोहन.
5 Jan 2009 - 1:17 pm | नितिन थत्ते
ईतर धर्मांबद्ध्ल knowledge नाही आहे ते ही अर्ध व ट
Half knowledge is always dangerous
सहमत.
समान नागरी कायदा करावा म्हणून उठसूट गळा काढणार्यांना विचारून पहा. ट्रिपल तलाक व चार बायका यापलिकडे काही सांगता येणार नाही.
इतरंचे सोडा .... सर्व हिन्दूनाही सारखा कायदा नाही. अनेक जातिमध्ये लग्न रजिस्टर करावे लागत नाही. नोटरी करून पुरते.
उद्या समान कायद्याच्या नावाखाली "हिंदू अविभक्त कुटुंब्" नावाची पळवाट बंद झालेली चालेल का? तेही ठरवावे लागेल.
5 Jan 2009 - 1:27 pm | अनिल हटेला
संजयजी ( की प्रशांत )आपले म्हणने आधी नीट मांडा...
तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा लिहा..आणी मग इतराची मते जाणुन घ्या...
तुम्ही लिहीलेले दोनही धागे वाचले आणी माफ करा पण माझ्या बालबुद्धीला काहीही झेपले नाही..
असो...चायना मध्ये ब-याचशा साइट उघडत नाहीत्,त्यामुळे तुमच्या ब्लॉग वरचा लेख वाचता आलेला नाही..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Jan 2009 - 6:34 pm | तिमा
भारत हा धर्मनिरपेक्ष देश अजिबात नाही. कारणे पुढीलप्रमाणे :-
१. सरकारी छापील अर्जामधेच जात व धर्म विचारलेला असतो.
२. सर्व पायाभरणी, कोनशिला बसवणे इत्यादि तत्सम सरकारी कार्यक्रम मंत्र्यांच्या हस्ते हिंदु पध्दतीने होतात.
३. प्रत्येक धर्माच्या सणांना विनाकारण ,सरकारच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माची आठवण सरकार व सर्व राजकीय पक्षच मुद्दाम करुन देत असतात.
४. सार्वजनिक उत्सवांचे अवडंबर माजवले जाते, जे धार्मिक पायावरच आधारित असतात.
५. या सार्वजनिक उत्सवांचा सामान्य जनतेला किती त्रास होतो हे अजिबात लक्षांत घेतले जात नाही, किंबहुना त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते.
६. या सर्व उपद्व्यापात, देशाचा किती वेळ, पैसा जातो आणि उत्पादकतेवर त्याचा किती वाईट परिणाम होतो याकडे बेफिकीरीने दुर्लक्ष केले जाते.
एवढे सगळे चालले असताना या देशाची एवढी तरी कशी प्रगती झाली याचेच आश्चर्य वाटते.
5 Jan 2009 - 6:59 pm | शंकरराव
तिरशिंगराव
एवढे सगळे चालले असताना या देशाची एवढी तरी कशी प्रगती झाली याचेच आश्चर्य वाटते.
व्वा! त्याला उत्तर :- ह्या देशाचा कारभार सगळा 'राम भरोसे' चालला आहे म्हणून देशाची एवढी प्रगती झाली असे आहे
5 Jan 2009 - 7:24 pm | वाहीदा
६. या सर्व उपद्व्यापात, देशाचा किती वेळ, पैसा जातो आणि उत्पादकतेवर त्याचा किती वाईट परिणाम होतो याकडे बेफिकीरीने दुर्लक्ष केले जाते.
हे सर्वात मह्त्वाचे !
~ वाहीदा
5 Jan 2009 - 8:22 pm | llपुण्याचे पेशवेll
या सगळया परीस्थितीत उत्पादकतेवर विशेष काही परीणाम होतो असे देशाच्या सध्याच्या लोकसंखेवरून तरी नाही वाटत. बाकी क्षेत्रातल्या उत्पादकतेवर होत असेल कदाचित:)
पुण्याचे पेशवे
Since 1984
6 Jan 2009 - 1:01 pm | सुचेल तसं
माझा पण एक बालिश प्रश्नः
तुमचं खरं नाव सन्जय आहे का श्रिराम आहे का प्रशांत आहे?
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
6 Jan 2009 - 1:47 pm | पांथस्थ
हा प्रश्न मलाहि पडला होता :)
तीन नावे म्हणजे त्रिदेव आहे कि काय? (ह.घ्या.)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
7 Jan 2009 - 12:18 am | ए. प्रशांत
प्रशांत उर्फ संजय श्रीराम आगलावे,
रा. नागपूर.
6 Jan 2009 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार
हा टॉपिक बालिश आहे काय ?
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य