सुमन कल्याणपूर ............
एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी.
आपल्या अवीट स्वरांनी गेली अनेक दशके भारतीय मनांवर राज्य करणाऱ्या सुमनताई म्हणजे संगीताच्या सम्राज्ञीच! उद्या २७ जानेवारीला त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !
"समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा अपूर्व जाहला गे माये " या त्यांनी गायलेल्या गीताने माझ्या बालपणात मला त्यांच्या आवाजाची ओळख झाली. संत ज्ञानेश्वर यांचा समाधीचा दिवस आणि त्यांची भावंडे तो सोहळा एका डोळ्यात तातातुटीच्या दु:खाचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात स्थितप्रज्ञ भाव एकत्र करून कसा अनुभवतात याची सुंदर प्रचीती या गीतातून येते.
हुबेहूब स्वरसम्राज्ञी लताताइंसारखा आवाज लाभल्यामुळे सुमनताई काहीशा दुर्लक्षितच राहिल्या. परंतु त्यांची गायन कारकीर्द हा भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आहे आणि राहील. रफी साहेब आणि लतादीदी यांचे काही काळ बिनसल्यानंतर रफी आणि मुकेश यांच्याबरोबर सुमन ताईंची युगल गीते केवळ अप्रतिम होती आणि ती अतिशय गाजली.
"दिल ए बेताब को सिने से लगाना होगा , आज परदा है तो कल सामने आना होगा"
"इतना ही तुमसे प्यार मुझे मेरे राजदार जितने के इस जमीन पार जर्रे है बेशुमार "
"आज कल तेरे मेरे प्यार के किस्से हर जुबान पर "
"तुमने पुकारा और हम चले आए "
(वरील सर्व रफी साहेबांबरोबर )
"ये किसने गीत छेडा दिल मेरा नाचे थिरक थिरक " (मुकेश यांचेबरोबर)
ही काही युगल गीते म्हणजे सुमन ताईंच्या प्रतिभेची अलौकिक उदाहरणे होत.
याशिवाय "जुही सी कली मेरी लाडली " हे बाहुलीसारख्या गोड गोड मुलीचे गोड कौतुक करणारे गीत सुमनजींनी असे काही गायले आहे की प्रत्येक आईसाठी ते एक सुंदर ठेवा आहे.
याशिवाय मराठीत तर सुमनताईनी आपल्या प्रतिभेने सर्व रसिकांना थक्क करून सोडले
"पार्वती वेची बिल्वदळे … शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे …. "
"बुडता आवरी मज भवाचे सागरी"
"देह शुद्ध करोनी भजनी रमावे" ही भक्तीगीते .
"जिथे सागरा धरणी मिळते" यासारखी मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील गीते
"या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार" अशी बोधपर गीते
"तुला ते आठवेल का सारे" अशी भावगीते अशा अनेक मराठी गीतात सुमन ताइनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला
पंचम (आर डी बर्मन ) एकदा म्हणाले होते की लता ही संगीत क्षेत्रातील डॉन ब्रॅडमन आणि अशा गेरी सोबर्स आहे याच धर्तीवर सुमन ताई या संगीतातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहेत.
पुन्हा एकदा सुमन ताईना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा देऊन हा लेख संपवण्याआधी त्यांचे एक अप्रतीम मराठी गाणे उल्लेखत आहे .
या गीतात धरणी माय शेतकऱ्याना श्रम आणि स्वाभिमानाचे मोल समजावून सांगते आणि तितकेच ते सर्वांसाठीही बोधप्रद आहे.
______________________________________________________________________________________________________________________
गीतकार : गदिमा संगीतकार - स्नेहल भाटकर
मज नकोत अश्रू घाम हवा
हा नव्या युगाचा मंत्र नवा
होते तैसी अजून उते मी
सधन अन्नदा सुवर्णभूमी
खंडतुल्य या माझ्या धामी
का बुभुक्षितांचा रडे थवा ?
अपार लक्ष्मॆ माझ्या पोटी
का फिरसी मग माझ्या पाठी
एक मुठ भर अन्नासाठी
जगतोस तरी का भ्याड जीवा ?
काय लाविशी हात कपाळी
फेकून दे ती दुबळी झोळी
जाळ आळसाची तव होळी
तू जिंक बळाने पराभवा .
मोल श्रमाचे तुला कळुदे
हात मळे दे घाम गळू दे
सुखासीनता पूर्ण जळू दे
दैन्यास तुझ्या हा एक दवा.
प्रतिक्रिया
26 Jan 2016 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक अनभिषिक्त सूरसम्राज्ञी.
+१००26 Jan 2016 - 7:21 pm | राही
'अजून नाही जागी राधा' आणि 'अजहुं न आये बालमा, सावन बीता जाय' या दोन गाण्यांच्या उल्लेखाशिवाय आदरांजली पूर्ण होऊच शकत नाही.
अत्यंत आवडती महान गायिका.
26 Jan 2016 - 7:38 pm | सस्नेह
देव माझा विठू सावळा
अरे संसार संसार जसा तवा
मृदुल करांनी छेडित तारा
ही वाट दूर जाते
नाविका रे वारा वाहे रे
ही मराठी गीते सुमनताईंनी सोने केली.
तुम्हे याद होगा कभी हम
तुम्ही मेरे मीत हो
इ. हिंदी युगलगीते अजून वेडं करतात !
26 Jan 2016 - 8:38 pm | सुबोध खरे
+१
26 Jan 2016 - 10:28 pm | राही
ही वाट दूर जाते हे आशा भोंसले यांचे आहे आणि तुम्हें याद होगा कभी ह्म मिले थे हे लता मंगेशकर-मन्ना डे यांचे आहे.
27 Jan 2016 - 8:31 am | पैसा
+१
27 Jan 2016 - 11:40 am | सस्नेह
'ही वाट..' आशा आणि 'तुम्हे याद..' हे हेमंतकुमार -लता यांचे गीत आहे. सॉरी.
प्रत्यक्षात मला 'वाट इथे स्वप्नातील संपली जणू' हे गीत लिहायचे होते.
26 Jan 2016 - 8:58 pm | कंजूस
निगर्वी हे विशेष.
26 Jan 2016 - 10:01 pm | मारवा
क्या बात है !
सुं द र
धन्यवाद मित्रा
26 Jan 2016 - 10:25 pm | पद्मावति
ना ना करते प्यार तुम्हीसे..
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे....फक्त त्यांच्या आवाजामुळे ही गाणी खूप आवडतात. अत्यंत गोड आणि खनकदार आवाज. प्रचंड गुणी पण दुर्दैवाने अतीशय अंडर-रेटेड कलावंतांपैकी एक.
27 Jan 2016 - 2:37 am | अरणी
माझी आवडती गायिका! त्यांचे एकदाच यावे सखया - हे गाणे कितीही एेकले तरी मन भरत नाही.
27 Jan 2016 - 6:09 am | मोगा
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर.
27 Jan 2016 - 6:23 am | खटपट्या
कधी नव्हे ते +१
27 Jan 2016 - 10:57 am | असंका
+१
हे इतका वेळ शोधत होतो...
28 Jan 2016 - 3:48 pm | रंगासेठ
अत्यंत आवडते गाणे!
27 Jan 2016 - 8:12 am | अजया
हो ना!+१
27 Jan 2016 - 8:32 am | पैसा
सुमनताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अतिशय गोड आवाजाची गायिका.
27 Jan 2016 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार
पटकन आठवलेली काही.....
हिंदी
ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने,
सावन बीता जाय ( खरतर हे मेहमूद ने वाट लावलेला गाणं म्हणुनच लक्षात रहाते)
ये मौसम रंगिन समा (मुकेश बरोबर गायलेले एक अप्रतिम गाणे )
जुही की कली मेरी लाडली
तुमही मेरे मीत हो
मराठी
लिंब लोण उतरू कशी
जेथे सागरा धरणी मिळते
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
बघत राहुदे तुझ्या कडे
रिमझीम झरती श्रावण धारा
केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
मृदुल करांनी छेडित तारा
नंदा घरी नंदन वन फुलले
हरी आला ग माझ्या अंगणी
जगी ज्यास कोणी नाही
या गडे हासू या
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
आकाश पांघरोनी जग शांत झोपलेले
सुमनजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पैजारबुवा,
27 Jan 2016 - 11:22 am | सस्नेह
आवडती गाणी !
आणखी एक..
उघडले एक चंदनी दार
28 Jan 2016 - 4:20 pm | कानडाऊ योगेशु
निंबोणिच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ही अंगाई सगळेच कसे काय विसरलेत?
चित्रपटसृष्टीतील राजकारणाला कंटाळून त्यांनी अचानक गायनसन्यास घेतला असे मी वाचले होते ते खरे आहे का?
सुमनताईंना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
28 Jan 2016 - 4:08 pm | मराठी कथालेखक
मेरे महबूब न जा
मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है
28 Jan 2016 - 6:23 pm | अमेरिकन त्रिशंकू
ठेहेरिये होशमें आउ तो चले जाईयेगा.. रफी
परबतोंके पेडोंपर शामका बसेरा है.. रफी
तुमने पुकारा और हम चले आये.. रफी
ये मौसम रंगीन समा.. मुकेश
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
चक्रवाक पक्षी वियोगे
देव माझा विठू सावळा
दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
शब्द शब्द जपून ठेव
वार्यावरती घेत लकेरी
28 Jan 2016 - 7:47 pm | शान्तिप्रिय
रे क्षणांच्या संगतिने मी अशी भारावले
तसेच
अरुण दातेंजीबरोबर "पहिलिच भेट झाली पण ओढ ही युगांची" हे अप्रतिम भाव गीत.
एक सुंदर यादी तयार झाली सुमन ताईंच्या गीतांची . सर्वांना धन्यवाद.