मिपावर आय डि न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

नया है वह's picture
नया है वह in काथ्याकूट
15 Jan 2016 - 3:18 pm
गाभा: 

२०१६व्या वर्षात आय डि/ डु आय डि मिळणे अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....

बदलती मानसिकता: : लेखातील विचार पटत असतील तरच प्रतिसाद द्या. विचार वेगळे आहेत, पटत नाही असे वाटले तर वेगळे लेख लिहा, अशी संकल्पना रुजत आहे.

सामाजिक बदल : आज लेखक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी आणि माझे लेखन सक्षम आहे तर मी का प्रतिसाद लिहायचे, असे लेखकांचे म्हणणे असते.

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात(लेखक-वाचक) दरी निर्माण होत आहे. तरुण लेखकांच्या-वाचकांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे लेखक-वाचक एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. मिपावरील केवळ राजकिय काथ्याकूटमुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.

संपादकांचा हस्तक्षेप ः लेखकाला सर्व प्रतिसाद हवे तसेच मिळावे म्हणून लेखकाच्या कंपुतिल आय डि/ डु आय डिंचा हस्तक्षेप होतो आणि संपादकांणी आय डि बॅन करु नये म्हणून त्याच्या लेखात लेखकाच्या कंपुतिल आय डि सतत प्रतिसाद टाकतात.

अहंकार ः लेखक आणि वाचक दोघेही उच्चशिक्षित, वैचारिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे लेखामधे तणाव निर्माण होतो.

इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/पुर्वग्रह, कंपुबाजी, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, सिलेक्टिव रिडिंग आदी कारणांमुळे लेखावर समस्या निर्माण होतात.

उपाययोजना:

आय डि टिकण्यासाठी : "रिस्पेक्ट फ्रोम इच रिडर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "रिस्पेक्ट इच रिडर' करायचे ठरवले तरच आय डि टिकू शकतात.

मनमोकळा संवाद : लेखक-वाचक यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

स्पर्धा टाळावी ः मिपावर सर्वांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या ले़खावर नीट प्रतिसाद दिला नाहीस आता मीही तुझ्या ले़खावर चांगला प्रतिसाद देणार नाही.

स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता लेखण सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

जबाबदारीची जाणीव ः लेख झाल्यानंतर येणाऱ्या प्रतिसादंची जाणीव आणि ती स्वीकारण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.

तडजोडीची तयारी ः कोणत्याही चर्चेमध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.

थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर मिपावर आय डि टिकवणे शक्य होते.

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

15 Jan 2016 - 3:47 pm | मी-सौरभ

आय डी टीकण्यासाठी फार काही करावे लागत नाही. माझेच ऊदाहरण घ्या.
आय डी ऊडण्यासाठी मात्र आज काल कमी कष्ट करावे लागतात असे वाटते.

नाखु's picture

15 Jan 2016 - 3:53 pm | नाखु

किरकोळ फेरफार करुन एक "लग्न" टिकण्याचा/मोडण्याचा धागा टाकला जाऊ शकतो.

मिपा हेमंत व्याख्यानमाला मधील एका पुष्पातून साभार.

संकलक नाखु

एस's picture

15 Jan 2016 - 4:04 pm | एस

हाहाहा!

बादवे, लेखकाने ना शीर्षकात चौकोनी कंस टाकले ना धागाविषय विडंबन ठेवला. लोकांनी शिरेसली घेतलं तर काय करायचं ब्वॉ?

मारवा's picture

15 Jan 2016 - 6:57 pm | मारवा

वसंत व्याख्यानमाला माहीत होती नाशकातली
एकदा वसंत कानेटकरांना ऐकल होत तिथे
हेमंत व्याख्यानमाला माहीत नव्हती
कुठेशीक भरते ही आणि वक्ते कोण विषय काय शैली काय असते ?
पैसे भरावे लागतात की मोफत ?
ओपन थेटरात असते की बंदिस्त नाट्यगृहात
ओपन असली तर सतरंजी पाण्याचा तांब्या घरुन न्यावा लागतो की आयोजकां तर्फे असतो
उद्घाटक कोण असतात ?
मुख्य म्हणजे प्रेक्षक कसे असतात ?
विचक्षण की विलक्षण ?
विवेकी की अविवेकी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2016 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Very sleepy smiley

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

15 Jan 2016 - 4:04 pm | नंदन

आ मिल पकायें, सप्तपदी के भेद सुनायें...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2016 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन, काल खरडफळ्यावर प्रमोद देर्देकर यांनी अबीदा प्रवीणच्या सुफी गाण्यांची लिंक दिली होती एकापेक्षा एक सरस गाणी आणि गायकी आहेत. सुफी गायनावर काही चांगली मराठी पुस्तके आहेत का ?

-दिलीप बिरुटे

राम राम सर,
मला ठाऊक नव्हती, पण शोधल्यावर या संकेतस्थळावर दोन साधारण या विषयाच्या जवळपास असणारी पुस्तकं दिसली:
https://msblc.maharashtra.gov.in/download.html

(क्र. ११२, १९०)

देर्देकरांनी दिलेला दुवा शोधून निवांत ऐकतो, धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2016 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोऊ तो सपने मिलू.... सुप्पर.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2016 - 4:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संपादकांचा हस्तक्षेप ः लेखकाला सर्व प्रतिसाद हवे तसेच मिळावे म्हणून लेखकाच्या कंपुतिल आय डि/ डु आय डिंचा हस्तक्षेप होतो आणि संपादकांणी आय डि बॅन करु नये म्हणून त्याच्या लेखात लेखकाच्या कंपुतिल आय डि सतत प्रतिसाद टाकतात.

आपल्याकडे पुरावा आहे का? असेल तर द्या.

काही तीन चार वर्षांपुर्वींचे लेख पाहिले तर त्यात प्रतिसादांत दिसणारे आइडी आता दिसत नाहीत.त्यांना कंटाळा आला का? अथवा ते सोडून का गेले हे जाणून घ्यायचं आहे का?

मी नुकताच माझा आय डी बदलून घेतलाय. त्यामुळे माझा आधीचा आयडी आता टीकलेला नाही असं म्हणायचं का? की आय डी म्हणजे आय डी नाव नसून आय डी नंबर असतो?

उगा काहितरीच's picture

15 Jan 2016 - 4:40 pm | उगा काहितरीच

आयडी टिकण्याचा सर्वात चांगला उपाय , आयडी घ्या अन् संन्यास घ्या !

पगला गजोधर's picture

15 Jan 2016 - 5:05 pm | पगला गजोधर

(आय डि व डू आय डि हा नुसता सरळ संबंध नाही. कदाचित तुम्हाला सार्थक कंपुबाजीची कल्पना दिसत नाही.

सार्थक कंपुबाजीचे तीन पैलू आहेत. एक, पारस्पारिक अनुबंध, दोन, अपराध शून्य चित्तदशा आणि तीन, समय शून्यता. हे तीन पैलू एकत्र येणं हा अत्यंत दुर्लभ योग आहे आणि तो केवळ विविध आय डि व डू आय डि यांच्या कंपुबाजी संबंधातच येणं शक्य आहे.

कंपुबाजीत एकमेकात बेतहाशा भक्तीगिरी असेल तर, वेगळा विचार समजून घेण्याऐवजी, प्रत्युत्तर देण्याला कृतार्थता येते आणि ती कंपुबाजीची खरी खुमारी आहे. अपराधशून्य चित्तदशा केवळ कंपुबाज हुल्लडीतच असू शकते ही उघड गोष्ट आहे. आणि समयशून्यता म्हणजे कंपूबाज भक्तांच्याही मनावर वेळेचं कुठलंही दडपण नसते. या तीन गोष्टी सिद्ध झाल्या तर आणि तरच.... प्रथम त्यांचा इगो तृप्त होते आणि मग विखार तृप्त होतो. या तृप्तीचं नांव सार्थक कंपुबाज-भक्तीगिरी आहे.

अशा सार्थक कंपुबाज-भक्तीगिरीनंतर भक्तांना, फक्त ''आपणच काय ते देशप्रेमी आहोत'' असा अभिमान वाटू लागतो, त्यांचे रुपांतर ''भारतीय संस्कृतीचे एकमेव तारणहार'' असे होते. आणि लोकांना दहशत वाटू लागते. ते भयभीत होतात. आणि मग प्रत्येक नवीन फर्मान हा वेगळा रंग धारण करतो, त्यात कधीच तोचतोपणा येत नाही. या एकरुपतेतून मग त्यान्चा राष्ट्रवाद खुलत जातो. किरकोळ मतभेद, भिन्न आवडीनिवडी, एवढच काय पण शुल्लक गोष्टी सुद्धा, 'मॉर्निंग वॉक घेत चला' असा 'काळजीयुक्त' सल्ला देण्याचा प्रकार, अश्याच कंपूबाजीतून उगवतो. )

विवेकपटाईत's picture

15 Jan 2016 - 5:15 pm | विवेकपटाईत

हि आय डी तर नक्कीच टिकणार. नया है वह, कुणाची आठवण येते....

पगला गजोधर महाराज प्रणाम स्विकारावा.काय ते ओघवतं वक्तृत्व!

पगला गजोधर's picture

15 Jan 2016 - 6:15 pm | पगला गजोधर

(idamban kelay ho mi pan)

होबासराव's picture

15 Jan 2016 - 6:18 pm | होबासराव

एक, पारस्पारिक अनुबंध, दोन, अपराध शून्य चित्तदशा आणि तीन, समय शून्यता.
अहाहा काय ति खोलि आहे तुमच्या लेखनाला गजोधर भाउ :))

आठवा:- पु.ल. "विनोदि लेखक हा लेखकच नाहि", ति सौंदर्यात्मक अनुभुति, प्रा. अस्तरदार

मुक्त विहारि's picture

15 Jan 2016 - 6:35 pm | मुक्त विहारि

१. आय.डी. टिकवायचा असेल तर=====> रामदास, पिडां, सर्वसाक्षी, चतुरंग, पैजारबुवा, रणजित चितळे, गवि, खेडूत, डॉ.सुहास म्हात्रे, सुबोध खरे, बिरुटे सर, सुधांशू नुलकर, आजानुकर्ण, धमाल मुलगा, मिसळलेला काव्यप्रेमी, स्पा, आत्मबंध, प्रचेतस, नादखुळा, परीकथेतील राजकुमार, विजुभाउ, कंजूस, सुनिल, धर्मराज मुटके, इत्यादी असंख्य मान्यवर जसे वागतात तसे वागणे. (ह्यापैकी कूणीही व्यक्तीगत टीका टिपणी करत नाही आणि अयोग्य विचारांना, मग ते भले आपल्या मित्रांनी जरी टंकलेले असले तरी, थारा देत नाहीत.)

२. आय.डी. उडू नये असे वाटत असेल तर =====> मुद्दाम गहनविचार करत, हितोपदेश करणार्‍या मोठ्या गाढवकथा टाकू नयेत. (इथे कुठलाही हरी गाढवाचे पाय धरत नाही किंवा उगाच गाढवाला गीता पण वाचायला देत नाही.तसेही गाढवाला गुळाची चव समजत नसल्याने आणि "खर्‍या मिपा-कराला नेहमीच गूळ-साखरेचा रवा" खायला मिळत असल्याने, खरा मिपाकर "योग्य ते भान ठेवून, टवाळगिरी करत असतो." खरा मिपाकर इथले उत्तमोत्तम साहित्य वाचायला येत असल्याने आणि उत्तम विचार आत्मसात करत स्व-उन्नती करत असल्याने, खर्‍या मिपाकराला आय.डी. उडण्याची भिती वाटत नाही.)

हा मग ठिक आहे.. नायतर माझा बी नंबर लागल :))

१- मिपाकर दोन प्रकारचे असतात एक खरा व दुसरा खोटा
२- गाढव हा चव समजण्याच्या बाबतीत मिपाकरापेक्षा उजवा नसतो.
३- खरा मिपाकर उन्नतीउन्मुख असतो त्याचे अधःपतन होत नसते.
४- खरा मिपाकर निर्भय असतो.
५- लास्ट बट नॉट द लीस्ट खरा मिपाकर योग्य ते भान राखुन टवाळगिरी करत असतो.
पाचवा मुद्दा फार कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचा असा आहे. यात टवाळकी करतो म्हणुन कदाचित काही जण खरा मिपाकर खरा मिपाकरच्या एकुण दर्जावर साक्षेपी विवेकावर क्रीटीकल जजमेंट वर शंका उपस्थित करण्याची एक दुरस्थ का होइना अस्पष्टशी अंधुक संभावना निर्माण नाही म्हटल तरी होतेच. त्यावर मुक्तविहारी यांनी मोठी मार्मिक टीप्पणी केलेली आहे. लक्ष द्या अवधान द्यावे त्यांनी एक की वर्ड वापरलाय भान ठेवुन योग्य ते भान ठेवुन यात एकुण तीन बाबी आहेत
१- खरा मिपाकर हा भान बाळगुन असतो खोटा मिपाकर बेभान होतो.
२- खरा मिपाकर चे भान योग्य असते खोट्या मिपाकर मूद्दलातच बेभान असल्याने योग्य अयोग्य या वरच्या पायरीपर्यंत तो नाहीच त्यामुळे तो पहील्या पायरीतच बेभानपणापायी बाद होतो.
३- टवाळगिरी चा अर्थ येथे काहीसा आध्यात्मिक आहे. त्याविषयी हेमंत व्याख्यानमालेच्या सातव्या पुष्पात श्री मुक्त विहारींकडुन विवेचन करण्यात येईलच. आणि गुरुवर्यांच्या संदेशाचे प्रासादिक सुलभ विवेचन करावयास मला आनंदच होइल.

एवढ्यावर पीएचडी द्यायला हरकत नाही खरं तर ;)
आमच्या एका माजी जालीय मित्राने मिपा हिमनगाइतकेच दुसर्याला कळते.सो खाली तळ हुडकायला जाऊ नये असे ज्ञान दिले होते.त्यामुळे खरे काय खोटे काय जालिंदर बाबावर सोडून मिपावर असणे एंजाॅय करावे म्हणजे आय डी टिकेल.

होबासराव's picture

18 Jan 2016 - 2:35 pm | होबासराव

खरे काय खोटे काय जालिंदर बाबावर
जालिंदर बाबा :)) (गडबडा लोळणारी स्मायली कल्पावी)

मारवा's picture

15 Jan 2016 - 8:14 pm | मारवा

या धाग्याने मला नक्की काय दिल हा विचार करायला मी जेव्हा उभा राहतो तेव्हा
दोन दैदिप्यमान शब्द या धाग्याने माझ्या विचार विश्वा च्या ओंजळीत टाकले
१- हेमंत व्याख्यानमाला
२- जालिंदर बाबा
वा वा आंधळा मागतो एक डोळा मिळतात दोन
अस काहीस माझ्या बाबतीत झालय.
रच्याकने शब्द का व कसे पैदा होतात हा धागा मनात आकार घेतोय

यशोधरा's picture

16 Jan 2016 - 12:57 am | यशोधरा

सद्ध्या लाटकरकाका व मोगामियांचे धागे धावताहेत. त्यांचे नाविन्य संपले की मग तुमच्या धाग्याचा नंबर. ओक्के?

मी तर 10वि नापास आहे!!!!