थँक यू मिस्टर ड्रॅगन – १
मित्रांनो,
मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना
चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. लेख माला संजीव ओकांनी राजमत टाईम्स मधे हे लिखाण केले आहे. मिपाकरांसाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणीस्तानमधून परतत असताना, पाकमध्ये संपूर्ण जगाला थक्क करणारा, जो अनपेक्षित थांबा घेतला, त्याचे दृष्य परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मोदी यांच्या धोरणाने संपूर्ण जग चकीत झाले असताना, चीननेही भांबावत आपल्या भूमिकेत बदल केलेला दिसून येतो आहे. नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार चीन-पाक दरम्यान जो बहुचर्चित ‘सीपीईसी’ अर्थात चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडार हा तब्बल 49 बिलियन डॉलर्सचा जो प्रकल्प उभारला जात आहे, त्याच्या पूर्ततेसाठी पाकने काश्मीरप्रकरणी ठोस भूमिका घ्यावी, असे पाकला सुनावले आहे. या प्रकल्पात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश असल्याने, वादग्रस्त भागात प्रकल्पासाठीचा रस्ता उभारण्याची चीनची मानसिकता नाही. पाकनेही गोंधळून जात गिलगीट-बल्टिस्तान हा पाकव्याप्त प्रदेश स्वतंत्र प्रांत म्हणून जाहीर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या, त्याला खुद्द काश्मीरमधून विरोध झाला आहे, हे विशेष. पाकने गिलगीट बेकायदा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर प्रथमच त्याला पाकचा घटनात्मक भाग करून घेण्यासाठी पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर दबाव असल्याने, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी पाकची अवस्था झाली आहे. शरीफ यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून, लवकरात लवकर अहवाल सादर करण्यासाठी या समितीला सांगण्यात आले आहे. गिलगीट-बल्टिस्तान हा प्रांत अस्तित्वात आलाच, तर (ही शक्यता अजिबात नाही) येथून दोघांना संसदेत प्रतिनिधित्व मिळेल, परंतु त्यांना मत मांडण्याचा वा पाकी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असणार नाही, असेही पाकी सूत्रांनी म्हटले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणतेही बांधकाम करू नये, असे हिंदुस्थानने चीनला ठणकावून सांगितले आहे.....
पुढे वाचा ...

- थँक यू मिस्टर ड्रॅगन –2
- थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3
- थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४
- थँक यू मिस्टर ड्रॅगन – 5वा अंतिम भाग
Book traversal links for थँक यू मिस्टर ड्रॅगन – १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचत आहे
हाह !
इए काकांनि म्हटल्याप्रमाणे
भारत फार काही करू शकतो का?
त्यावेळेस/ दिवशी न्यूजनेशन
40 आचारी
धक्कादायक माहिती
पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर
तुम्हा दोघांचा आयपी एकच आहे
तुमचे उत्खननकौशल्य वादातीत
न्यूज नेशन'चे कवरेज चांगले
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर
चीनला काय धाड भरली आहे की त्याला काश्मीर खोर्यात मध्यस्ती करायला लागते आहे?चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चीनला भारतिय महासागरात तडक प्रवेश मिळण्यासाठी "चीन-(गिलगिट-बाल्टिस्तान)-ग्वादर (बलुचिस्तान) बंदर" हा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्यात रस आहे. यामध्ये चीनचा केवळ आर्थिक स्वार्थ तर साधेलच, पण त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त महत्वाचे म्हणजे चीनला भारतिय महासागरात तडक प्रवेश मिळून चीनचे जागतिक सामरिक महत्व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वाढेल. म्हणूनच, चीन या प्रकल्पामध्ये $४६ बिलियन गुंतवायला तयार आहे. यात चीनबरोबर पाकिस्तानचाही खूप आर्थिक फायदा होईल. याशिवाय या दोन देशांची राजकीय-सामरिक मैत्री अधिक घट्ट होईल. अर्थातच, पाकिस्तानला अमेरिकेपासून दूर नेऊन अमेरिकेचा भारतिय उपखंडातला प्रभाव कमी करून स्वतःचा प्रभाव वाढवविण्यासाठी चीनला हा प्रकल्प अत्यंत उपयोगी आहे. मात्र यातला प्रकल्पातला महत्वाचा दुवा असलेला गिलगिट-बाल्टिस्तान हा भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे आणि त्यामुळे भारताचा त्यावर हक्क आहे. पाकिस्तानने आजपर्यंत हा भाग सार्वभौम पाकिस्तानातच्या भूमीत दाखविलेला नाही. त्यामुळे उद्या भारत हा भूभाग आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी झाल्यास चीनची सर्व गुंतवणूक पाण्यात जाईल. त्यामुळे चीनने पाकिस्तानला तो भूभाग आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे स्वतःच्या ताब्यात घेण्याची अट घातली आहे. पाकिस्तानाने आता तो आपला प्रदेश आहे असे जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत व त्याला भारताने विरोध केला आहे. आजपर्यंत स्वतः पाकिस्तान "काश्मीर वादग्रस्त प्रदेश आहे" या तत्वाच्या आधारे आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रस्ताळेपणे आरडाओरडा करत होता. त्यामुळे आता त्यांच्या "तो आमचा प्रदेश आहे" या दाव्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे कठीण आहे. या पार्श्वभूमीमुळे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पात अडचण झाल्याने पाकिस्तान व चीन दोघेही अस्वस्थ आहेत.चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर : २
इए काका
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर : ३
विंटरेस्टिंग...
डाॅ म्हात्रेंच्या
पाकिस्तानने गिलगिट
भारताचा हस्तक्षेप