जेव्हापासून दुचाकी वर भटकंती सुरु केली आणि लांबचे पल्ले गाठण्यास सुरुवात केली तेव्हापासून लोक्स अरे लडाखला जाऊन आलास का?, एवढा दुचाकी वर फिरतोस तर लडाख ला जाऊन ये असा सांगायला,सुचवायला लागले. तेव्हापासून सतत डोक्यात लडाख वारी चा विचार येत होता. भरपूर blogs वाचले, भरपूर माहिती मिळवली. त्या संदर्भातली भरपूर पुस्तक वाचली. असा म्हणा की गेले वर्षभर दहावीत असल्या सारखा अभ्यास चालू आहे लडाख वर.आता म्हणल बास जाऊन यायचंच ह्या वर्षी अन उचलला इडा लडाख चा बरोबर १ जानेवारी च्या उगवत्या सूर्याला साक्ष धरून.
त्या दृष्टीनी लगेचच तयारी सुरु केली. फिटनेस साठी नियमित व्यायाम चालू केलाय, गाडीची साधारण दुरुस्ती यावी म्हणून यामाहा workshop मध्ये रोज अर्धा तास शिकायला जातोय. पैशांची बचत चालू केलीये :P
कधी निघायचा हे अजून पक्क केलेलं नसल तरी तिकडच्या हवामानानुसार, रस्ता कधी खुला होईल हे सर्व बघून तारीख पक्की करीन. साधारण जुलै चा शेवटचा आठवडा पकडून चाललोय. पुणे-लडाख-पुणे circuit करणार असल्यामुळे २५ दिवसांचा कालावधी पकडून चाललोय.
हे लिहिण्याचा मूळ उद्देश असा की भरपूर लोक्स हे स्वप्न उराशी बाळगून असतात, तर ज्यांना कोणाला हे वेडेपण करायची इच्छा असेल ह्या वर्षी तर आत्ता पासूनच एकत्र येउन नियोजन चालू करू. २-३ छोट्या- मोठ्या ट्रीप करता येतील एकत्र जेणेकरून sync व्हायला मदत होईल.
शेवटी एकट्याने जाण्यापेक्षा टीम तयार झाली तर कामच छान होईल.!
प्रतिक्रिया
6 Jan 2016 - 11:54 am | सतिश पाटील
प्रवासाला शुभेच्चा....
नक्की जाऊन या
6 Jan 2016 - 12:07 pm | मोदक
लडाख जमणार नाहीये या वर्षी.. मात्र पुण्याजवळ ट्रीप असल्यास जरूर व्यनी करा. शक्य असेल तर नक्की येईन.
6 Jan 2016 - 12:11 pm | गिरीश मांधळे
ट्रीप ठरवल्याबद्दल अभिनंदन आणि प्रवासासाठी शुभेच्छा!
आमच्या(मी, "मार्गी" आणि अजून एक मित्र) ऑगस्ट २०११ ट्रीपची आठवण झाली. आधी बाईक्स घेऊन जायचे ठरवले होते पण प्रथम तो परिसर माहित करून घेऊ आणि नंतर पुढच्यावेळेस बाईकवर जाऊ असे ठरले. ते "पुढच्यावेळेस" अजून बाकी आहे! :) बघु कधी जमते.
तुमची बाईक कोणती आहे यामाहाची?
6 Jan 2016 - 12:34 pm | विलासराव
मी १५ में ते १५ जुलैपर्यंत लेहलाच असणार आहे. संपर्क साधल्यास जरूर भेटू.
6 Jan 2016 - 12:40 pm | मनराव
आयुष्यभर लक्षात राहिल असा प्रवास आहे........ :)
11 Jan 2016 - 11:38 am | राजकुमार१२३४५६
आम्हि तयार आहोत.
11 Jan 2016 - 12:35 pm | आरोह
माझा मित्र spity valey thru enfield bulet (१८ ते ९ ऑगस्ट २०१५) वरून लढखला गेला होता. काही मदत लागल्यास सांगा..
12 Jan 2016 - 5:02 pm | खंडेराव
पुणे लेह पुणे करण्यापेक्षा पुणे ते जम्मू ट्रेन ने गाडीबरोबर आणि येतंना चंडिगड ते पुणे ट्रेन असा करावा, आणि लद्दाख - काश्मीर मधे जास्त वेळ द्यावा. मी २० दिवस होतो पण तेही मला कमी वाटले.
14 Jan 2016 - 2:27 pm | मनराव
तिकडे मिळतील तितके दिवस कमीच पडणार.... पण पुणे-लेह-पुणे केवळ अप्रतीम.......
14 Jan 2016 - 4:55 pm | खंडेराव
आपापल्या आवडी. जर वेळ कमी असेल, तो नेहमीच असतो, तर लेहला जाण्यासाठी भारतभ्रमणाची गरज नाही. या प्रवेसा जे थ्रिल आहे ते लेह सर्किट ( जम्मू-श्रीनगर- लेह-मनाली - चंडीगड 2/2500 किमी)मधे मिळते. त्यासाठी 4000 किमी पुणे-जायपुर- दिल्ली कशाला? अर्थात, गाडी चालवणे हे ध्येय असेल तर कन्याकुमारी मार्गे ही जाता येईल!
14 Jan 2016 - 5:47 pm | मनराव
पुण्यातुन तिथे पर्यंत जाऊन परत येणे हा एक वेगळा अनुभव...
लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन त्रुप्त होत नाही... वहाँ तो बार बार जाना चाहिए... परत जाताना तुम्हि म्हणालात तसे जाऊ.......
13 Jan 2016 - 11:57 am | आनंदराव
पुण्यातील म्हणजे पुण्याजवळच्या राईड असतील तर सांगा
येऊ नक्की
13 Jan 2016 - 12:21 pm | कबीरा
आनंदराव,
पुण्या जवळच्या ride ठरवू नक्कीच.काय म्हणता? बोला कधी करायची सुरुवात?
14 Jan 2016 - 12:38 pm | आनंदराव
ठरवा कधीपण !
मी ठरवली तर तुम्हाला सांगेनच.
सग्ळ्यांची मोट जुळ्णे तसे अवघड असते. पण ट्राय तर करु !
येत्या रविवारी एक काम आहे. ते जर क्यान्सल झाले तर ताम्हीणी मार्गे लोणावळा करण्याचा बेत आहे.
अजुन फिक्स नाही.
बाय द वे, तुम्ही व्यायाम कोणता चालू केला आहे?
13 Jan 2016 - 12:22 pm | कबीरा
राजकुमार भाऊ, तयार असाल तर जमवूच नक्की
13 Jan 2016 - 12:31 pm | राजकुमार१२३४५६
आपल्याला व्यक्तिगत मेसेज पाठवला आहे. वाचा आणि परत पाठवा आपल्या मोबाईल नंबर सहित.
13 Jan 2016 - 12:38 pm | कपिलमुनी
ही बोलाची कढी बोलाच्या भातासोबत बर्याच वेळा खाल्ली आहे.
बाकी त्या कचकड्याच्या यामाहाचे बरेच पार्ट सोबत न्या !कधीपण गंडते.
13 Jan 2016 - 3:19 pm | सतिश पाटील
यामाहा गाडी इकडे सोबत नाही नेलीत तर तुमची ट्रीप सुखाची होईल.
बरेच यामाहा वाले हतबल होऊन गाडीला किका मारताना पाहिलेत लदाख मध्ये
13 Jan 2016 - 7:46 pm | राजकुमार१२३४५६
जरा कारण पण सांगितले तर सोयीचे होईल पाटील साहेब आमची पण यामाहा ची फेझर आहे.
14 Jan 2016 - 11:17 am | सतिश पाटील
जाताना असे वाचनात आले होते कि यामाहा तिकडे बंद पडते.
तिकडे प्रत्यक्षात खूप ठिकाणी पहिले. FZ आणि फेझर गाड्या तिकडे मधेच बंद पडतात. चालूच होत नाहीत.त्या चालकांचे हताश चेहरे पाहून दया येत होती.
ऑक्सिजन कमी असल्याने आणि ते वातावरण त्या गाडीच्या इंजिनाला ते कदाचित झेपत नसावे.
14 Jan 2016 - 1:47 pm | राजकुमार१२३४५६
आंतरजालावरती याचे कारण शोधले असता असे समजले कि, एर फिल्टर च्या बाबतीत modification करावे लागते. K&N 1100 universal air filter चा उपयोग केल्यास. carburator मध्ये जास्त हवा जाऊन power वाढते. आणि मायलेज मध्ये फक्त थोडा फार फरक पडतो. २ ते ४ kmpl ने कमी होतो.
आणि गाडीच्या आवाजात पण बदल होतो. फक्त या एका फिल्टर वरती बहुतेक जणांनी कोणताही अडथला न येता संपूर्ण लदाख पार केला आहे. snapdeal वर याची किमत ३००० रुपये आहे.
15 Jan 2016 - 11:50 am | सतिश पाटील
पावर वाढत असेल, पण प्रश्न आहे गाडी का बंद पडते? याचा शोध घ्या आणि उपाय शोधून तुम्ही यामाहा घेऊन जाऊ शकता.
14 Jan 2016 - 11:50 am | कबीरा
कपिलमुनी, बाकी तुमचा पाय बरा झाला कि बोलूच
14 Jan 2016 - 5:06 pm | कबीरा
गाडीपेक्षा इच्छाशक्ती वर जास्त जोर द्यावा लागेल अशा खडतर मोहिमेत
14 Jan 2016 - 5:11 pm | अभिजीत अवलिया
मला देखील लेह लदाख कारने करायची इच्छा आहे. गेली ३ वर्षे प्लान तर केले पण दर वेळी कुणीतरी ऐनवेळी नाही बोलण्याने कॅन्सल झाले. कारने ह्यासाठी जावे लागेल कारण आम्ही ३ जन आहोत. मी, पत्नी आणी छोटा मुलगा. तेव्हा काही प्रश्न
१) फोर्ड फिगो डीझेल ह्या कारने हा प्रवास केला जाऊ शकेल का?
२) जर वरील गाडीने शक्य नसल्यास ४ व्हीलर कुठे भाड्याने मिळतील?
३) तिथे कार चालवण्यासाठी काही वेगळे परमिट लागते का? तिथले रस्ते डेंजर असल्याने लागते असे कुणीतरी एकदा मला बोलले होते. खरे खोटे माहित नाही. लागत असल्यास ते कुठे मिळते?
४) तिथल्या विरळ हवेचा लहान मुलांना खूप त्रास होऊ शकतो का? होत असल्यास तो होऊ नये किंवा कमी व्हावा ह्यासाठी काय करावे लागेल?
14 Jan 2016 - 5:25 pm | खंडेराव
हो, अगदी व्यवस्तीत. लोक मारुती 800 नेही करतात.
2. सेल्फ ड्राइव गाड्यांना लेह मधे अडचणी येतात ( भाड्याने घेतलेल्या चार चाकी ) तशीही तुम्हाला गरज नाही.
3. गाडीचे एंजिन खाली जर कव्हरेड नसेल तर ते करून घ्या.
4. परमिट आधी लागायचे, आता नाही ( भारतियांसाठी ).
5. विरळ हवेसाठी एक गोळी आहे ( नाव विसरलो ). तसेच आक्लिमेटाइज़ेशन नीट झाले तर काहीही त्रास होत नाही. त्यासाठी श्रीनगर रस्ता चांगला.
14 Jan 2016 - 6:03 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
14 Jan 2016 - 6:06 pm | खंडेराव
बरोबर
15 Jan 2016 - 12:13 pm | सतिश पाटील
मनालीतून जाणार असाल तर आधी परमीत घ्यावे लागते मनाली मध्ये. फोटो ऑगस्ट २०१५ मधला आहे.
विरळ हवेसाठी डायमोक्स नावाची गोळी आहे डॉक्टर ला विचारून घ्या
17 Jan 2016 - 12:35 pm | यशोधरा
डायमॉक्स घ्यायलाच हवी असे नाही, त्रास झाला तरच घ्यावी.
14 Jan 2016 - 5:14 pm | खंडेराव
मी 100 सीसी गाडीने, 2 लोक ( बायको आणि मी ) आणि 20 दिवसाचे सामान असा हा प्रवास पूर्ण केला. गाडी पेक्षा गाडीवर बसलेले किती तयार आहेत हे महत्वाचे.
14 Jan 2016 - 5:49 pm | स्वच्छंदी_मनोज
गाडी पेक्षा गाडीवर बसलेले किती तयार आहेत हे महत्वाचे. >>>> +१
14 Jan 2016 - 6:04 pm | मनराव
हेच पुणे-लेह-पुणे ला पण लागू होते.......
17 Jan 2016 - 11:49 am | अभिजीत अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद. अजून एक दोन शंका. तिकडे गाडी चालवताना गाडीची काय काळजी घ्यावी लागते? प्रवासात चुकून बंद पडली तर कुत्रे देखील हाल खाणार नाही. गाडीला कोणत्या समस्या येऊ शकतात आणी त्यासाठी काय तयारी करून जावे. आणी 4 व्हीलर साठी जाण्याचा उत्तम काळ कोणता?