गाभा:
आज पर्यंत मिपावर अनेक परदेशी गुप्तहेर खात्याबांबत (मोसाद/केजिबी/)बाबत अत्यंत माहितीपुर्ण लेख/कथानक आली आहेत्,परंतु भारतीय हेरखात्याबाबत मात्र फारशी माहिती येत नाही,तरी बोका-ए-आझम,स्पार्टाकस्, सोन्याबाप्पु/खरे सर यांना विनंती की आपल्या हेरखात्याबाबतही काही लेख मिपाकरांसाठी येउ द्यात.
प्रतिक्रिया
1 Jan 2016 - 8:44 pm | जेपी
वरील मुद्यावर शमत आहे.इस खुशी के मोके पर टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा.
1 Jan 2016 - 9:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान मुद्दा रे बाबा.भारतिय गुप्तहेर खात्याविषयी फारशी माहिती कोणालाच नसणे हेच ह्या यंत्रणेचे यश आहे असे वाचले होते.ह्या खात्यांची वेबसाईटही नाही,त्यांच्या "गुप्तहेर हवेत' अशा जाहिरातीही येत नाहीत.निवृत्त झाल्यावर १५-२० वर्षांनी हे लोक हळूच टी.व्ही.चॅनलवर येतात्,ते ही गॉगल वगैरे लावून.
2 Jan 2016 - 12:02 am | होबासराव
बोका साहेबांचे मोसाद वरिल लेख वाचुन असेच मनात येत होते.
@जेप्या च्या "टवाळ कार्टा आणी बॅटमॅन यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा" या मताशि बाडिस.
2 Jan 2016 - 9:34 am | मन१
रॉ आणि आय बी ह्यांच्या बद्दलची माहिती इतर खात्यांच्या तुलनेत फारच कमी उपलब्ध आहे; हे खरच. पण आपल्याला वटाटं तितकीही ती गुप्त नसते. निदान घटना घडून गेल्यावर तरी.
वृत्तपत्राच्या मथळ्यांइतके ह्याला अटेन्शन मिळत नसले; तरी आतमध्ये कुठेतरी बातम्या असतातच.
कित्येकदा ज्या घटना समोर दिसताहेत त्यावरुन निवव्वळ अंदाज बांधावा लागतो की पडद्यामागे क्काय घडत असेल.
.
.
.
पण सहज शोधतना आजवर मला जालावर सापडलेली माहिती इथे देतो आहे .
.
.
भारतात रॉ मध्ये लै उच्चपदावर एक माणूस काम करायचा. अगदि सचिवालयापर्यंतचा त्याला अॅक्सेस होता . (कल्पना करा, थेट पी एम ओ - प्रधानमंत्री कर्यालतील काही कागदपत्रेही त्याच्या हाताला लागलेली होती. तो नंतर काळात अमेरिकन गुप्तहेर खात्यासाठी काम करु लागला. भारतीय गुप्तहेर खात्यांची माहिती चोरुन बाहेर देउ लागला. आणि आपल्या यंत्रणा त्याच्या मागावर होत्याच. पण खात्रीशीर पुरावा मिळेपर्यंत त्याला धरले गेले नाही. नेमका तोवर अमेरिकेत तो उडून गेला होता कायमचा.)
ह्याबद्दल amar Bhushan ह्या त्या घटनेच्या तपाअसात सहभागी असणार्या अधिकार्याने पुस्तक लिहिलय. परकीयांणा फिर्तूर झाला तो माणूस म्हणजे Rabinder singh.
त्याची माहिती :-
https://en.wikipedia.org/wiki/Rabinder_Singh_(intelligence_officer)
.
.
लेखक अमर भूषण ह्यांचीए मुलाखत :-
http://www.outlookindia.com/article/i-have-written-it-as-it-happened-let...
.
.
अमेरिकेनं असं करण्याचं संभाव्य कारण :-
भारतानं अणुस्फोट करेपर्यंत त्यांच्या गुप्तहेर खात्यलाअ ह्याची माहितीच नव्हती. ही बाब त्यांना चांगलिच
झोंबली भारतावर "नजर" ठेवता यावी म्हणून त्यांनी एक माणूस फितवला.
.
.
.
पाकिस्तानी लष्करात एक भारतीय सिलेक्ट झाला. तो तिथे मेजर की ब्रिगेडियर अशा उच्च पदावरही पोचला!पाक्ते लोक त्याला पाकिस्तानी समजत होते. प्रत्यक्षात तो भारतीय होता. पण दुसर्या एजण्टच्या चुकीनं तो धरला गेला. त्याला हाल हाल कर्न पाकिस्तानमध्ये मारण्यात आलं. त्याच्या आयुष्याच्म फिल्मिकरण करुन पिच्चर बनला तो "एक था टायगर".
त्या खरोखरच्या माणसाची माहिती :-
.
.
https://en.wikipedia.org/wiki/Ravindra_Kaushik
.
.
१९व्य्च्या दशकात कधीतरी भारताला " पाकिस्तान काहुता आणि इतर ठिकाणी अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारित आहे" अशी खबर मिळाली. भारतानं इस्राइल सोबत गुप्तपणे कारवाई करायचं ठरवलं. एका रात्रीत हल्ला करुन त्यांची पूर्ण आण्विक क्षमता नष्ट करायचं ठरलं. हल्ल्याची तारिख , वेळ ठरली. इस्राइलनं अस्साच उद्योग करुन सद्दाम हुसेनच्या इराकची आण्विक क्षमता काहिच वर्षे अगोदर पूर्ण बेचिराख केली ह्तोई कायमची. पण नेमकी हल्ल्याच्या काही तास आधीच बातमी फुटली.
आपली आणिइस्राइअली विमानं हल्ल्याच्या वेळी गेली तेव्हा समोर पाकिस्तानी विमानं बचावाला सज्ज!
भारतीय यंत्रणेतून बातमी फुतली होती. मोहिमेला यश आलं नाही. शेवटी पाक अण्वस्त्रसज्ज बनलाच.
अगदिच स्वाबहभाविक कारणांमुळे ही बातमी बाहेर येउ देणं पाक आणि भारत दोघांनाही शरमेचं होतं. दोघांनीही मोठे मथळे होउ दिले नाहित. तरीही चर्चा होत राहिलीच.
त्याबद्दल लेख :-
http://indianexpress.com/article/explained/in-fact-did-india-plan-a-cove...
.
.
.
ओसामाला छापा घालून अमेरिकेनं मारलं . तसाच काहिसा प्रयत्न भारतीय गुप्तहेर खात्यानं पंचवीसेक वर्षापूर्वी केला लिट्टे प्रमुख प्रभाकरनला मारण्याचा . पण त्याहीवेळी नेमकी हल्ल्याची आधी प्रभाकरन -- लिट्टे प्रमुखला खबर लागली. त्याला मारायला गेलेलेच तीसेस भारतीय कमांडो हकनाक मारले गेले .
त्याचे तपशील :-
https://en.wikipedia.org/wiki/Jaffna_University_Helidrop
.
.
.
सध्याचपंतप्रधांच्नांचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाला ह्यांचे १९८७ मधील एक मोठ्ठे यश :-
.
.
ऑपरेशन ब्लू स्टार च्या वेळी १९८४ ला भारतीय फौजांनी शस्त्र बळाचा वापर केल्यानं प्रचंड रक्तपात झाला इंदिरा गांधींच्या काळात. त्यावेळी भारत बराच बदम्नाम झाला होता.
तीव्च वर्षांनी पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली होती. अतिरेकी त्याच सुवर्ण मंदिरात घुसून बसले.
त्यांना वाटलं की बदनामीच्या भीतीनं ह्यावेळी भारत काहिच करणार नाही.
त्यावेळी रॉ मध्ये उच्च पदावर असलेल्या अजित दोवाल ह्यांनी ऑल्मोस्ट कोणत्याही सिव्हिलिअनला इजा होउ न देता, ऑल्मोस्ट काहीच रक्तपात होउ न देता जबरदस्त कौशल्यानं प्रकरण हाताळात सुर्वर्ण मंदिर ताब्यात घेतले होते. एक धवल पान :-
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Black_Thunder
.
.
.
पाकिस्तान अणु बॉम्ब च्या तयारीत असताना, भारत त्यावर नजर ठेवून असल्याचं मोरारजी देसाइ ह्यां पंतपरधानपदी असलेल्या मानसामुळं पाकिस्तानला समजलं. आपले पाकिस्तानातील एजण्ट धरले गेले.
त्याबद्दल :-
http://defenceforumindia.com/forum/threads/how-morarji-desai-revealed-de...
.
.
.
गुजरालांमुळे भार्तीय हेरगिरीवर आलेल्या मर्यादा :-
http://www.dnaindia.com/india/report-gujral-the-man-behind-the-raw-doctr...
.
.
.
अगदि कारगिल लढाईच्यावेळी भारतानं प्रत्यक्षात पाकव्याप्त काश्मीरात घुसून कारवाई केल्याचं ऐकलय.
.
.
.
हे इतकं सगळं पब्लिक डोमेन मध्ये ऑलरेडी आहे. अजूनही खूप काही आहे. पण वेळम्नाही मजकडे.
2 Jan 2016 - 10:08 am | मुक्त विहारि
बाबा पाटील ह्यांच्या मताशी सहमत...
2 Jan 2016 - 11:22 am | प्रसाद प्रसाद
बाबा पाटील,
एपिक चॅनेलवर अदृश्य नावाची मालिका सुरु आहे. काल रात्रीच ११ ते १२ वाजता दाखवलेल्या अदृश्य या मालिकेत, वर मन१ यांनी उल्लेख केलेल्या रबिंदर सिंग केसवर १ तासाचा भाग झाला, रॉ तर्फे अमर भूषण आणि आय बी चे कोण होते ते कळल नाही. मालिका उत्तम आहे. बऱ्याच वेळा रॉ आणि आयबी मधील उच्चपदस्थ व्यक्ति माहिती देताना दिसतात. ह्या मालिकेत बहिर्जी नाईकवर पण छान एपिसोड दाखवला होता, सुरत लुटीवर भर होता.
मालिका बघा, मला आवडलीये, कदाचित तुम्हालाही आवडेल.
2 Jan 2016 - 12:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाबा,
मुळात एखाद्या गुप्तहेर संघटनेचे यश पहायचे तर शत्रुराष्ट्रातला मीडिया मॉनिटर करावा!, पाकिस्तानी मीडिया ची आर्काइव्ज चेक केल्यास प्रचंड खजिना मिळू शकतो, अन मिळतो ही.
2 Jan 2016 - 1:34 pm | आदूबाळ
बापूसाहेब, तुम्हीच याबद्दल एक कथा लिहिली होती ना? भारतीय एजंट पाक अण्वस्त्र तळावर न्हावी बनून जातात वगैरे?
2 Jan 2016 - 1:47 pm | महासंग्राम
खूप सुंदर कथा होती ती
यातली गौरी अजूनही डोळ्यसमोर आहे
2 Jan 2016 - 2:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार गाववाले! :)
2 Jan 2016 - 2:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
वह्य आदूबाळासाहेब भाई,
तो आमचाच प्रयत्न होता एक अन ते न्हावी वाले रेफेरेंस रॉ च्या विकी पेज वरुन घेतले होते अजुन एक प्लॉट आहे डोक्यात बघू कधी जमते लिहिणे
2 Jan 2016 - 2:21 pm | महासंग्राम
वर्ष झालं की कथेला बाप्पू नवीन कथा लौकर येवू द्या रायटर्स ब्लॉक गेला असेल तर. म्हणजे गौरी स्वप्नात येणे बंद होईल .
2 Jan 2016 - 2:47 pm | यशोधरा
बापू,लिंक मिळेल का?
2 Jan 2016 - 3:18 pm | महासंग्राम
छद्मयुद्ध
2 Jan 2016 - 3:31 pm | यशोधरा
धन्यवाद
2 Jan 2016 - 3:06 pm | विवेकपटाईत
गुप्त खात्यात कार्य करणारे लोक तुमच्या आमच्या सारखीच असतात. कार्य हि आपल्या सारखेच करतात. काही हि फरक नसतो. फक्त एवढेच आपण त्यांना ओळखत नाही.
2 Jan 2016 - 3:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
कार्य हि आपल्या सारखेच करतात. काही हि फरक नसतो
कसे काय बुआ?
2 Jan 2016 - 4:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
विविध सरकारी खात्यात काम करणारे अधिकारी पण गुपत्चर खात्यासाठी कधी कधी काम करत असतात असे ह्यांनी वाचले होते. आणीबाणीच्या काळात तर प्राथमिक शिक्षक,जिल्हा परिषदेतले कारकून.. अशा लोकांनाही माहिती गोळा करायच्या कामाला लावले होते.
3 Jan 2016 - 10:19 pm | अनिरुद्ध.वैद्य
येस.
बँकेतल्या अधिकारीवर्गास आजकाल मनी लौंड्रिंग विषयक ट्रेनिंग दिले जात असते ज्यात संशयास्पद व्यवहार ओळखून त्यांच रिपोर्टिंग कसे करावे, ह्याच प्रशिक्षण असत.
हे व्यवहार मोस्टली अतिरेकी संघटना आणि काळे पैसेवाले करतात. पैश्याच्या ट्रेलवरून बरेच गुन्हे उघडकीस आणता येऊ शकतात. अर्थात आपल्या देशात किती सिरीयसली हे होत असेल कोण जाणे.
4 Jan 2016 - 8:38 am | कैलासवासी सोन्याबापु
बँक मधे विजिलेंस ऑफिसर नावाची एक पोस्ट असते जी स्केल ३ किंवा स्केल ४ लेवल ची असते (बरीच वरिष्ठ) अन त्या पोस्ट वर सीबीआय किंवा पोलिस यंत्रणे मधील एखाद्या अनुभवी अधिकार्याला सिलेक्ट केले जाते, असाच एक विजिलेंस ऑफिसर ची नोकरी पत्करलेला माणुस एकदा भेटता सांगत होता की कितीही मेहनत केली तरी आपले रेपुटेशन पणाला लावायला नको म्हणून बँक स्वतःच पुढे पोलिस केस वगैरे करत नाही अन ते पैसे एनपीए मधे वर्ग करते असे काहीसे.
3 Jan 2016 - 3:50 pm | अर्जुन
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत.
उदा.
१. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत
२. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन
३. मिशन रॉ - झर्रार खान
४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना
५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर
3 Jan 2016 - 9:38 pm | आदूबाळ
यातलं #५ मलय कृष्ण धर यांचं पुस्तक महाभिकार आहे. आपल्याला सत्यकथा लिहायचीय का कादंबरी का आठवणी हे शंभरेक पानं झाल्यावरही नक्की ठरवता आलं नाहीये.
3 Jan 2016 - 3:50 pm | अर्जुन
भारतीय गुप्तहेरखात्याबांबत काही पुस्तके उपलब्ध आहेत.
उदा.
१. सॉफ्ट टार्गेट-झुरेन कुरेशी व म्यक ब्राअन,२३ जुन १९८५ ला झालेल्या एम्पायर कनिश्क विमानाच्या बांम्बस्पोटांच्या तपासाबाबत
२. काउबॉइज ऑफ रॉ - डाउन मेमरीज लेन बी रामन
३. मिशन रॉ - झर्रार खान
४. इन साइड रॉ : द स्टोरी ऑफ इंडीअन सीक्रेट सर्वीस-अशोक रैना
५. ओपन सिक्रेटस-मलॉय क्रिश्र्ण धर