राम माधव आणि त्यांच्या मुलाखती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
30 Dec 2015 - 10:04 am
गाभा: 

राम माधव हे रा.स्व. संघाचे प्रचारक आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस (बरोबर ना ?) का कायसे आहेत. टिव्ही बातम्याण्च्या च्यनलांवरून सिताराम येचुरींची बाइट्स जशी मुद्देसूद असतात तसेच राम माधवांची बाइट्स सहसा चपखल असतात. मोदी सरकार स्थापनोत्तर आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर पडद्या मागच्या काही राजकीय स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमॅटीक यश राम माधवांचे असल्याची वृत्तपत्रीय वंदता असावी. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर भा.ज.पा.च्या राष्ट्रीय कार्यकारणीवर राम माधवांना जागा देण्यात संघ-भाजपाची काय राजकीय खेळी असावी याची भाजपाच्या अधिकृत वक्तव्ये आणि आणि भाजपेतर कयासांमध्ये फरक असू शक्तो. असो, अगदी अलिकडील अलजझीरास वर प्रसारीत मुलाखती पर्यंत तरी राम माधवांची भूमिका अजून काही काळतरी पडद्या मागील राजकारणाचीच राहील असा माझा व्यक्तीगत कयास होता तो अंशतःतरी चुकला. राम माधव चांगले वक्ते आणि राजकीय मुत्सद्देगिरी जमण्याची शक्यता गृहीतजरी धरली तरीही आंध्र-तेलंगाण या स्वभाषेच्या राजकीय आखाड्यात त्यांचा एकुण राजकीय प्रभावास अद्यापतरी मर्यादा असाव्यात.

राम माधवांची अलजझिरा मुलाखत मी पाहिली नाही आणि टेक्स्ट स्वरुपात उपलब्ध झाल्याशिवाय चर्चा-खल करण्यास मर्यादा येतात म्हणून मी ते ऑनलाइन शोधण्या पहाण्याच्या भानगडीत पडत नाही.) माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या दिसताहेत त्यावरून पडद्या बाहेर येण्यासाठी सरळ आंतरराष्ट्रीय च्यानलची निवड करणे कितपत सयुक्तीक अथवा घाईचे होते, त्यासाठी त्यांनी पुरेशी पुर्वतयारी केली असेल का असे प्रश्न मनात येऊन गेले.

पाकीस्तान आणि बांग्लादेशसहीत अखंड भारताचा मुद्दा मुलाखत घेणारे ते नंतरचे राजकीय विश्लेषक केवळ संघ-भाजपाचा मुद्दा असल्याप्रमाणे भासवत होते त्याच इंप्रेशन खाली संघ-भाजपाची मंडळी असावीत हि आश्चर्याची गोष्ट नसावी पण राम माधवांनी अभ्यास वाढवून उत्तर दिले असते तर १९४७ च्या आधी काँग्रेसने टू नेशन थेअरी स्विकारलेली नव्हती, नॉर्थवेस्ट फ्रंटीयरच्या खान अब्दुल गफारखानांनी स्विकारली नव्हती, एवढेच नव्हे टू नेशन थेअरीचा हवाला देऊन जे मुस्लीम भारतातून पाकीस्तानात गेले त्या मुहाजीरांच्या स्वातंत्र्योत्तर पिढीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या एम.क्यु.एम.चे नेते टू नेशन थेअरी फेल्युअर असल्याचे उघडपणे म्हणत असतात. अखंड भारताच्या विचाराचं कॅनडाच्या एका माजी मंत्र्याने गांधीवादी दृष्टीकोणातून समर्थन केले आहे.

माझ्या व्यक्तीगत मतानुसार बेसीकली एखाद्या देशाच्या निर्मितीचा धर्म हा घटक असू शकतो हा राजकीय तत्वज्ञानाच्या (पॉलीटीकल सायन्सच्या) शिक्षणातून विचार युरोपीय खासकरुन इंग्रजी शिक्षणातून गेली काही शतके बिंबवला गेला तोच मुळात ढिसाळ आणि फसव्या तार्कीक उणीवा असलेल्या गृहीतकांवर आधारीत आहे. समजा एखाद्या भौगोलीक देशातल्या अर्ध्या लोकांनी दर पन्नासवर्षांनी धर्म बदलले (मग इंग्लंडचही उदाहरण घ्यायला हरकत नाही) तर दर पन्नासवर्षांनी त्या भौगोलीक देशांतर्गत राजकिय सिमा बदलत ठेवायच्या का ? मोठ्या लोकसंख्येचे धर्म विषयक तत्वज्ञान बदलण्यासाठी पन्नासवर्षे हा फार थोडा काळ आहे पण हजार वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्याच्या धर्म विषयक कल्पनात बरेच परिवर्तन घडत असावे कितीही बाता मारल्या तरीही हजार वर्षाच्या कालावधीत जनसमुहांच्या विश्वासात खुपकाही फरक पडू शकतात. एकाच भौगोलीक प्रदेशातील काल वेगवेगळे विचार बाळगणार्‍यांचे विचार एकसारखेही होऊ शकतात. काल एकमेकांशी यादवी करणारी मंडळी पुन्हा एकत्रही येऊ शकतात.

अखंड भारताच्या संकल्पने बाबत राम माधव बोलले -कदाचित वेळ आणि च्यानल चुकला असेल- पण त्यात फारसे काही गैर वाटले नाही, समजा काही बोलून गेला आहात तर त्याला त्यांनी नंतरही भाजपाचा नाही पण माझा व्यक्तीगत विचार आहे म्हणून डिफेंड करावयास हवे होते पण त्यांनी प्रेशरखाली येऊन आपली भूमिका बदलली असे वाटले. कदाचित राजकारणात तसे करावे लागत असावे पण समहाऊ तसे करणे मला फारसे पटले नाही.

बाकी राम माधवांबद्दल केवळ एवढ्या मुलाखती पुरते नाही तर नंतरही वेळोवेळी चर्चा करता यावी असे धागालेखाचे शीर्षक ठेवले आहे.

प्रतिक्रिया

मोदक's picture

30 Dec 2015 - 12:02 pm | मोदक

ही त्यांची मुलाखत.

बाकी मला धाग्याचा उद्देश कळाला नाही.

बाकी राम माधवांबद्दल केवळ एवढ्या मुलाखती पुरते नाही तर नंतरही वेळोवेळी चर्चा करता यावी

हे खूपच मोघम वाटत आहे.

माहितगार's picture

30 Dec 2015 - 6:35 pm | माहितगार

राम माधव त्यांच्या भूमिकांबाबत बरेच फ्लेक्झीबल असतात असे इंडिया टुडेतील मुलाखतीवरून वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 12:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

भौगोलीक देशातल्या अर्ध्या लोकांनी दर पन्नासवर्षांनी धर्म बदलले (मग इंग्लंडचही उदाहरण घ्यायला हरकत नाही) तर दर पन्नासवर्षांनी त्या भौगोलीक देशांतर्गत राजकिय सिमा बदलत ठेवायच्या का ?

मला एकदम इंडोनेशिया आठवला :D

उगा काहितरीच's picture

30 Dec 2015 - 12:32 pm | उगा काहितरीच

हजार वर्षाच्या कालावधीत जनसमुहांच्या विश्वासात खुपकाही फरक पडू शकतात. एकाच भौगोलीक प्रदेशातील काल वेगवेगळे विचार बाळगणार्‍यांचे विचार एकसारखेही होऊ शकतात. काल एकमेकांशी यादवी करणारी मंडळी पुन्हा एकत्रही येऊ शकतात.

हजार वर्षे हा कालखंड जरा जास्तच मोठा आहे असं नाही का वाटत ? म्हणजे मला देशाच्या सीमेबद्दल बोलायच आहे. सलग १००० वर्षे साम्राज्याच्या सीमा बदलल्या नाहीत असे साम्राज्य इतिहासात विरळेच नाहीका ?

सलग १००० वर्षे साम्राज्याच्या सीमा बदलल्या नाहीत असे साम्राज्य इतिहासात विरळेच नाहीका ?

पण त्यावरुन निष्कर्षघाई करण्यापुर्वी यातील बर्‍याचशा सत्तांच्या लॉयल्टीज व्यक्ती किंवा राज्यकर्ते घराणे, धर्म, भाषा, वसाहतवाद अशा होत्या या स्वरुपाच्या लॉयल्टीज सहाजिकपणे फ्लुईड असणार आणि बुडण्यास अधिक पात्र असणार. वसुधैव कुटूंब राजकीय दृष्ट्या एकसंघ व्यवस्थाम्हणून उपलब्ध नाही तेव्हा आणि तो पर्यंत भौगोलीक सिमांवर आधारीत बहुविध संस्कृतींशी जुळवून घेऊ शकणारी राष्ट्राची संकल्पना ज्यात राज्य,विभाग,जिल्हा,गाव पातळीपर्यंतच्या सबनॅशनलीझमच्या रास्त अभिमानांशी जुळवून घेण्याची क्षमता, स्वतःस राष्ट्र म्हणून टिकूट ठेवण्यासाठी लागणारे आर्थीक आणि सामरीक सामर्थ्य आणि लोकविश्वास या गोष्टी उपलब्ध झाल्यास आधूनिक लोकशाही राष्ट्रांबाबत काय स्थिती राहील ते येणारा काळच सांगू शकेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Dec 2015 - 12:50 pm | निनाद मुक्काम प...

राम माधव ह्यांची मुलाखत आधीच पहिली आहे,
ह्या मुलाखतीत त्यांनी इतर अनेक राजकीय पक्षाचे विविध देशांचे नेते येउन जसे स्वताचे वस्त्रहरण करून घेतात तसे करून घेतले नाही ,
अखंड भारत ही संघाचे स्वप्न आहे व ते युद्धा शिवाय नाही तर लोकांच्या सहमतीने एकेदिवशी पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तो व्यक्त करतांना त्यांनी जर्मनी व विएतनाम चे उदाहरण दिले.
बीफ बंदी वर चांगले उत्तर दिले.

मी अद्यापही पुर्ण मुलाखत वाचलेली नाही. परदेशस्थांना हि मुलाखत कशी दिसू शकली असेल याचा अल्पसा अंदाज पार्थ पर्हीकरांच्या या ब्लॉग वरून यावा.

माहितगार's picture

9 Jan 2016 - 5:00 pm | माहितगार

अलजझीराच्या मुलाखतकारांनी बायस्ड प्रतिमा जगापुढे ठेवण्यासाठी मुलाखतीतला काही भाग कसा सोईस्करपणे वगळला याची ही ऑडीयन्समध्ये एका उपस्थीता कडूनची ऑनलाईन हकीकत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 1:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अखंड भारत वगैरे व्यवहारिक दृष्ट्या तितकेसे पटत नाही , सद्ध्यस्थितीत अखंड भारत म्हणजे घरचे झाले थोड़े अनविकत घेतले घोड़े असे होईल (कोणी जावई देणार नाही अखंड भारत म्हणून मॉडिफिकेशन)

मूकवाचक's picture

30 Dec 2015 - 4:49 pm | मूकवाचक

दहा वर्षांपूर्वी भारतात भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेत असणे की गोष्ट अशक्य कोटीतली वाटत होती. असो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 5:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी "अशक्य" असे म्हणले नाहिये तर "अव्यवहार्य" असे म्हणले आहे, समजण्यात गल्लत झालेली आहे असे नोंदवतो, असोच!

मूकवाचक's picture

30 Dec 2015 - 5:38 pm | मूकवाचक

सहमत...

माहितगार's picture

30 Dec 2015 - 6:15 pm | माहितगार

आताच्या पाकिस्तानची मदार तिथल्या पंजाब प्रांतावर आहे तिथे इंग्रजांनी आणि रणजितसंगाने राज्यकरून दाखवलेच होते, गोव्यात आणि काश्मिरात भाजप भागीदारीत सरकारे लोकशाहीतही चालवून दाखवतेच आहे, अरुणाचलप्रदेशात राजकारणाचा अनपेक्षित सारीपाट मांडतेच आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 6:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

संदर्भ समजत नाहिये माहितगार साहेब, बीजेपी नवी देशांतर्गत फ्रंटियर्स काबीज करते आहे ओके अन प्रसंगी स्वागतार्ह आहेच, अन पाकिस्तानात पंजाब प्रांताचा वरचष्मावजा दबदबा आहे अन तिथे ह्या अगोदर महाराजा रणजीतसिंह अन इंग्रजांनी राज्य केले आहे हे ही अटेस्टेड ट्रुथ आहे पण

त्याचा अन अखंड भारताचा आजच्या तारखेत काय संबंध आहे असे म्हणता आहात? कंडीशन खुप जास्त बदलली आहे असे मला वाटते

माहितगार's picture

30 Dec 2015 - 6:40 pm | माहितगार

एका जर-तरचा विचार करुन पहा पाकीस्तान मागणार्‍या तत्कालीन मुस्लीम लिग नेत्यांनी पाकीस्तान मागितलाच नसता आणि भारतातच राहीले असते तर जे अस्तीत्वात राहीले असते तो अखंड भारतच नव्हे का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 7:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

माफ़ करा "जर तर" इज नॉट माय फोर्ट! पण ठीक आहे, जर आपण जरतर मधे डील करतोच आहोत तर त्या केस मधे आज त्या संयुक्त भारताची स्थिती काय असती म्हणता? मुस्लिमलीग च्या नेत्यांनी जर वेगळा पाक मागितला नसता तरीही टु नेशन थ्योरी एप्लीकेबल असती का नाही त्यांना? बरं नाही असे मानले तरी ती प्रचंड लोकसंख्या कोणाच्या मार्गाने गेली असती?? कमाल पाशा की अब्दुल वहाब? आजच्या तारखेत जो पुंडावा शिया सुन्नी इस्माईली वगैरे मंडळी आपापसात करीत आहेत पाकिस्तानात तो अखंड भारतात झाला नसता का? खायबर पख़्तूनख्वा अन फ्रंटियर भागातल्या टोळ्यांनी तालिबान ला कसे रियेक्ट केले असते?? ह्या सगळ्यांच्या बाबतीत प्रमाणिक विचार करून आपण बोलुयात, कसे?

टिप :- माझे राम माधव ह्यांच्याशी काही वाकडे नाही किंवा त्यांच्या बोलण्याच्या हक्कावर सुद्धा आक्षेप नाही फ़क्त तोच हक्क वापरुन मला हे म्हणायचे आहे की आत्ताच्या स्थितीत हे अखंडभारत वगैरे तद्दन खुळचटपणा वाटतो मला, संघाने काय करावे इतके सल्ले द्यायला मी काही दत्तोबा कदम नाही बेनसन कंपनी चा, जे एक व्यक्ति म्हणुन वाटले ते मांडले

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Dec 2015 - 2:14 pm | निनाद मुक्काम प...

सध्यस्थितीतील अखंड भारत व्यावहारिक दृष्ट्या पतन नाही पण पुढील २५ वर्षात स्थिती बदलू शकते
१९९१ ते आजतागायत २४ ते २५ वर्षात भारताची स्थिती सर्वार्थाने बदलली
भविष्यात काय होईल कोणी सांगावे
अखंड भारत म्हणजे मुस्लिमांचे एकत्रीकरण होईल
इयु सारखी रचना झाली त्यात नेपाल म्यानमार आले तरी खुपकाही बदल होऊ शकतात.
पण त्यासाठी परिस्थिती बदलली पाहिजे

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 7:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रॅक्टिकली,

आजच्या तारखेत अखंड भारत वगैरे पेक्षा दक्षिणपूर्व एशिया किंवा सार्क देशांचे एखादे यूरोपियन यूनियन सारखे "इकॉनॉमिक कॉन्फेडरेशन" असल्यास ते जास्त व्यवहार्य अन आर्थिक दृष्ट्या भारताच्या जास्त फायद्याचे असेल, कारण यूरो सारखे भारतीय रुपया हार्ड करेंसी म्हणून फ्लोट करायला ते "कॉन्फेडरेशन" भरपुर उपयोगी ठरेल असे वाटते (अर्थतज्ञ मिपाकर, प्रगो, मृत्युंजय साहेब, वगैरे मंडळींनी ह्या कांसेप्ट मधे चुक किंवा अव्यवहार्य काही असल्यास चुकीची दुरुस्ती करून माझ्या ज्ञानात भर घालावी)

बापू.. वेगळा धागा काढता का? इंटरेस्टिंग विषय आहे.

केवळ अखंड भारत नाही तर सार्क ने ईयु सारखे काम करायचे ठरवले तर.. असे काहीसे. (अर्थात विसा वगैरे गोष्टी सोडूनच बोलावे लागेल.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Dec 2015 - 7:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोदक भाऊ,
मला काही अर्थशास्त्रात विशेष गती नाही हो, इथे मातब्बर लोक्स आहेत त्या क्षेत्रातले मी सहज म्हणुन हे विचार मांडले कारण "महासत्ता" व्हायचे तर चलन सशक्त अन सार्वत्रिक व्हायला हवे हे कॉमन सेन्स नॉलेज वाटले मला, डिटेल डिसेक्शन तज्ञ मंडळी करू दे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Jan 2016 - 2:05 am | निनाद मुक्काम प...

मी वरती तेच लिहिले आहे
मात्र इयु मध्ये कोणी कोणाच्याही देशात जाऊन वसती करू शकतात मात्र सरकार दरबारी त्याची नोंद ठेवली जाते
हे काम स्वेच्छेने नागरिक करतात कारण त्यांना सोशल बेनिफिट्स क्लेम करायचे असतील तर ज्या देशात राहतात त्या देशात नोंदणी करणे आवश्यक असते
आपल्याकडे भारतीय पाकिस्तानी असे करतीलच असे नाही
तेव्हा अगदी इयु सारखे न करता पर्यटक म्ह्णून काही दिवस
एकमेकांच्या देशात राहण्याची भूभा देणे किंवा एकमेकांच्या देशात काम करायचे असेल तर दुबई सारखी वर्क परमिट सिस्टीम करणे असे उपाय होऊ शकतात.
ह्याचा प्रचंड फायदा सर्व देशांना होऊल
नुसते पर्यटन म्हह्तले तर हिमालयीन शिखरे आल्प्स चे अर्ध्याहून जास्त पर्यटक खेचून घेईन, भारत पाकिस्तान ह्या भागात पर्यटनाचा मोठे शेत्र निर्माण करतील बाकी मोठी बाजारपेठ होऊन जगात दबदबा बनू शकेल

नितीनचंद्र's picture

31 Dec 2015 - 11:23 am | नितीनचंद्र

दर पन्नास वर्षांनी देशांच्या सिमा बदलत ठेवायच्या का ? असा प्रश्न विचारला गेला. माझ्या मते जे देश देशभावनेने निर्माण झालेले नव्हते त्यांच्या सिमा बदलायला वेळ लागत नाही. उदा. दुसर्‍या महायुध्दानंतर जर्मनीची झालेली फाळणी आणि १९४७ साली झालेली अखंड भारताची फाळणी यात तत्वतः फारसा फरक नाही.

जर जर्मनी एक होऊ शकते तर हिंदुस्थान- पाकिस्थान आणि बांग्ला देश का नाही. तो व्हावा असा आशावाद कोणी व्यक्त करत असेल आणि संघ किंवा भाजपने ह्या मुद्यावर राम माधव यांच्याशी फारकत घेतली असली तरी हा आशावाद काही गैर नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Dec 2015 - 1:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

दुसर्‍या महायुध्दानंतर जर्मनीची झालेली फाळणी आणि १९४७ साली झालेली अखंड भारताची फाळणी यात तत्वतः फारसा फरक नाही.

कसे म्हणे?

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 4:25 pm | नितीनचंद्र

सोन्याबापु,

१९४७ ची फाळणी इंग्रजांनी घडवुन आणली. भारताचे राजकीय महत्व वाढु नये म्हणुन. भारत एक शक्ती बनु नये म्हणुन. जर्मनीचे तेच झाले. हा सारा प्रकार लादलेला होता.

आपण हा प्रकार तत्वतः एक कसा नाही यावर अ‍ॅकेडेमीक प्रकाश टाकावा. मलाही वाचायला आवडेल.

मी लिहलेल्या प्रतिक्रियेचा आशय " आशावाद गैर नाही" असा होता. आपल्याला हा आशावाद गैर वाटत असेल तर त्याच्या समर्थनार्थ लिहाना .

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jan 2016 - 8:27 am | कैलासवासी सोन्याबापु

इंग्रजांनी भारताची फाळणी घडवून आणली का त्यांनी दुफळी माजवली अन फाळणी कोणी अजुन "मागितली" जर्मन अन भारतीय फाळणी एक प्रकारची नसणे ह्याच्या समर्थनार्थ मी २ मुद्देच देतो तुर्तास (कार्यबाहुल्य आहे सद्धया थोडेसे)

१. जर्मनी मधे कोणी फाळणी "मागितली" नव्हती तर ती युद्धात जिंकलेल्या मित्रराष्ट्रांच्या अहंगंडा ने आपापली राजकीय विचारधारा (फ्री मार्केट, कम्युनिज्म) पुढे रेटायला केली होती, मला एक सांगा, पूर्व जर्मनी किंवा पश्चिम जर्मनी मधे असे जनमत होते का की बुआ मला अमुक डाव्या बाजूला रशिया कड़े जायचे आहे किंवा मला अमेरिकेच्या गोटात जायचे आहे इत्यादी? आता हेच भारतीय फाळणी बद्दल बोलायचे झाले तर फोड़ा अन झोड़ा ला बळी पडलेल्या मुस्लिम लीग च्या नेत्यांनी राष्ट्र मागितले वेगळे, फरक लक्षात घ्या बॉस जर्मनी मधे अंतर्गत मागणी नव्हती फाळणी ची अन कितीही कडु वाटले तरी ती मागणी आपल्याकडे होती, फाळणी केली ब्रिटिशांनी पण आधी मागणी क्रिएट केली ती जस्टिफाई करायला अन आपण ती क्रिएट होऊ दिली होती.

२ जर्मन फाळणी धर्माधारित होती का?

नितिन थत्ते's picture

8 Jan 2016 - 10:00 pm | नितिन थत्ते

>>राम माधव हे रा.स्व. संघाचे प्रचारक आणि भा.ज.पा.चे राष्ट्रीय सरचिटणीस (बरोबर ना ?) का कायसे आहेत.

याबाबत शंका आहे. रा. स्व. संघ आणि भा. ज. पा. या दोन पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत असं नेहमी ऐकतो ब्वॉ !!

लिओ's picture

8 Jan 2016 - 10:53 pm | लिओ

पाकीस्तान आणि बांग्लादेशसहीत अखंड भारत संकल्पनेवर जर्मनी व विएतनाम चे उदाहरण दिले गेले ठीक आहे.

क्षणभर समजा
ई यु = अखंड भारत

जर्मनी = २०१५ मधील भारत

ग्रीस नं. १ = २०१५ मधील पाकीस्तान

ग्रीस नं. ३/४ = २०१५ मधील बांग्लादेश

भंकस बाबा's picture

9 Jan 2016 - 12:13 am | भंकस बाबा

म्या पामराला एक शंका आहे.
आपले हिरवे बंधू जे १६/१७ टक्के आहेत,ते आत्ताच आपली न्यायव्यवस्था फाट्यावर मारतात. तेव्हा काय करतील?

असं का वाटतं तुम्हाला ? उर्वरीत ८०/८५ पेक्षा फार काय वेगळं करतात ते ?

भंकस बाबा's picture

9 Jan 2016 - 8:29 am | भंकस बाबा

पुण्यातल्या सदाशिवपेठेत राहून असे बोलणे सोप्पे आहे.
अन्न,वस्त्र,निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असतात हे इयत्ता दुसरित का तिसरित आम्ही शिकलो होतो, या धर्मात मात्र प्रार्थनास्थळ हां व् हीच सर्वाधिक गरज आहे हे बिम्बवले जाते.
एखाद दुसऱ्या उदाहरणाने तुम्ही ८०% ना मोजणार का?
टक्केवारी काढलीच तर निरक्षरता, धर्मान्धता, गुन्हेगारी याची काढल्यास धक्कादायक निकाल हाती येईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jan 2016 - 9:02 am | कैलासवासी सोन्याबापु

सांगा की ज़रा आकड़े! म्हणजे कुठले का असना सत्य बाहेर येईल अन खुटा हलवून बळकट होईल

अर्धवटराव's picture

9 Jan 2016 - 1:57 pm | अर्धवटराव

मग ठीक आहे. मला वाटलं काहि लॉजीकल कारणं देताहात कि काय.

भंकस बाबा's picture

9 Jan 2016 - 3:04 pm | भंकस बाबा

पाकिस्तानी अतिरेक्यानि पाकिस्तानात केलेल्या फोनमधे एका अतिरेक्याने आपल्या आईला फ़ोन केला होता.त्यात त्याची आई त्याला परावृत्त करण्याऐवजि ,बेटा मरनेसे पहले कुछ खा लेना असे बजावत आहे.
एका मातेची ही मानसिकता तर देशाची काय असेल?
मियांमारमधे रोहिंग्याना,चिनमधे उघराना,रशियात चेचेन्याना मारताना तेथील लोक काय लॉजिक वापरत असतील हो? वरील उघृत केलेल्या जमाती मुस्लिम आहेत.
वर कोणीतरी टक्केवारीचे आंकड़े मागत आहे, पाकिस्तानात व बांग्लादेशात हिंदुचि, शिखांची, ख्रिश्चनाची टक्केवारी कशी कमी झाली वो?
राम माधव जे स्वप्न पहात आहेत ते अशक्य नाही आहे, कारण हे भिकमांगे देश आपल्या जनतेला पोटभर खायला घालू शकत नाही पण धर्माच्या नावाखाली अतिरेकी जरूर निर्माण करतात. अशी मानसिकता असलेले लोक्स नकोच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jan 2016 - 3:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

कोणीतरी नाही साहेब मीच मागतोय, अन माझे नाव सोन्याबापू आहे, कसे?

शिवाय जिथे जिथे "एका उज्वल भविष्याच्या" आसेने ही हाणामारी सुरु आहे त्या देशात आयुष्य चांगले आहे का भारतात आहे ह्याचा ही विचार व्हावा, अन हो, तेवढे आकडेवारीचे जमले तर पहाच्

अर्धवटराव's picture

9 Jan 2016 - 3:40 pm | अर्धवटराव

आपल्या देशातले १६% 'ते' देशाच्या कायद्याला फाट्यावर मारतात म्हणजे नक्की काय ते बोला ना नेमकं... शक्य असल्यास लॉजीकल.

भंकस बाबा's picture

9 Jan 2016 - 8:42 am | भंकस बाबा

मागे जेव्हा पाकीस्तानात अतिरेक्यांनी शाळेवर हल्ला करुन निरपराध मुलाचे जीव घेतले होते तेव्हा ज्यांच्या पोटचे गोळे मृत्युमुखी पडले होते त्यांनी टीवीवर बोलताना सांगितले होते की या भ्याड अतिरेक्यांनी आमच्या मुलाना मारण्यापेक्षा भारतावर हल्ला केला असता तर चांगले झाले असते. अशी मानसिकता असलेली लोक एकत्र आले तर भविष्यात शाहबानोला न्याय सोडा चाबकाने भर चौकात फटकावले जाईल.
आणि आम्ही सो कॉल्ड सेक्युलर त्यांची धार्मिक बाब आहे म्हणुन शेपुट घालून बसतील.

मुक्त विहारि's picture

9 Jan 2016 - 11:31 am | मुक्त विहारि

राम माधव ह्यांच्या विषयी अजून वाचायला नक्कीच आवडेल...

माहितगार's picture

9 Jan 2016 - 4:14 pm | माहितगार

टिव्हीवर बर्‍याचदा चपखल उत्तरे देताना दिसतात त्या शिवाय यांच्या बद्दल फारसे माहीत नाही. तुमच्या प्रतिसादामुळे गुगलले तर त्यांची हि वेबसाईट हाताशी आली. वेबमास्टर्स कोण आहेत हे उघडून पहावे इतपत वेबसाईट इम्प्रेसीव्ह वाटली. तेथील हि त्यांची प्रोफाईल पण वेबसाईट आणि प्रोफाईल वरून कार्यकर्ता पेक्षा दांडग्या राजकीय महत्वाकांक्षेचा माणूस वाटतो. प्रतिपक्षाला झेलण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत अधिक वाटते पण फडणवीसांचे बोलणे फुल न फुलाची पाकळी मतपेटीत परिवर्तीत होत असावे तसे राम माधवांचा तेलगु राज्यांमध्ये अद्याप नेमका प्रभाव पोटेंहीयलच्या मानाने पहाण्यात आला नाही, तसा तो असेल आणि आपल्याला(मला) माहीत नसेल असेही शक्य आहेच.